Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




तिस-या जगातील पेंटाकॉस्टवाद

PENTECOSTALISM IN THE THIRD WORLD
(Marathi)

डॉ. ख्रिस्टोफर एल. कागेन यांच्याद्वारा
by Dr. Christopher L. Cagan

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे
प्रभूवारी दुपारी, 21 नोव्हेंबर, 2021 रोजी शिकविलेला पाठ
A lesson taught at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, November 21, 2021

पाठापूर्वी गायलेले उपासना गीत: “हालेलुया, काय हा तारणारा!”
(फिलिप्प. पी. ब्लीस यांच्याद्वारा, 1838-1876).

“येशूने त्यांना म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही” (योहान 14:6).


ख्रिस्ताने म्हटले की देवाकडे जाण्याचा तोच केवळ मार्ग आहे. तारणाकरिता येशूची अत्यंत गरज आहे. त्याच्याद्वारे आल्यावाचून कोणीहि देवाकडे येऊ शकत नाही. तुम्ही देवाकडे बुद्ध किंवा हिंदू देवतांच्या होऊद्वारे येऊ शकत नाही. तुमचे तारण तुमच्या सत्कर्माच्याद्वारे होऊ शकत नाही. तुम्ही पवित्र आत्म्याच्याद्वारे सुद्धा तारण मिळवू शकत नाही – परंतू येशूच्याद्वारे मात्र मिळवू शकता! प्रेषित पेत्राने हीच गोष्ट सांगितली आहे,

“आणि तारण दुस-या कोणाकडून नाही; कारण जेणेकरुन आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नांव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही” (प्रे.कृ. 4:123).

येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याखेरीज कोणीहि स्वर्ग प्राप्त करु शकत नाही. केवळ तो आणि तोच देवाचा परिपूर्ण पुत्र आहे ज्याने आपल्या पापांचा दंड देण्यासाठी वधस्तंभावर मरण पत्करले, आपले पाप धुण्यासाठी रक्त सांडले, आणि आपणांस जीवन देण्यासाठी मृतांतून पुन्हा उठला. हे थोडके स्पष्टीकरण नाही. हा मूलभूत ख्रिस्ती सिध्दांत आहे, संपूर्ण पीढ्यांच्याद्वारे विश्वास ठेवला जातो. दुर्दवाने, पेंटाकॉस्टवाद्यांकडून हे गंभीरपणे घेतले नाही जे तिस-या जगतातील “ख्रिस्ती” धर्म यावर वर्चस्व गाजवितात. होय, अशा काय मंडळ्या आहेत ज्या पेंटाकॉस्टवादी नाहीत, परंतू त्या लहान व शोधण्यास कठीण अशा आहेत. तेथे ख्रिस्तीत्वाची मुख्य शाखा ही पेंटाकॉस्टवादापासून फार दूर आहे. ह्या मंडळ्या कशाचा प्रचार करतात? ते काय करतात?

मी भारत व आफ्रिकेतील तीन देशांमध्ये सेवाकार्यासाठी गेलो. जसे की मी म्हणालो, तेथे सर्व मंडळ्या ह्या पेंटाकॉस्टवादी आहेत. काही ज्या लहान व शांत अशा आहेत. त्यांच्याविषयी कोणीहि बोलत नाही. जवळ जवळ सर्व ज्या ख्रिस्ती म्हणून गणल्या गेल्या त्या पेंटाकस्टवादी आहेत. परंतू त्यातील काही परिवर्तित झाल्या आहेत. मी जे पाहिले ते मला सांगू द्या.

ह्या मंडळ्यांमधून मी खूप थोडा येशू व खूप थोडी सुवार्ता ऐकली. त्याऐवजी, प्रचारक हा “जादूगार मनुष्य” बनलेला असायचा जो लोकांना आशिर्वाद देतो, जसे की आफ्रिकेतील एखादा मांत्रिक वैद्य किंवा भारतातील एखादा साधू करतो. लहान मंडळीचा पाळक हा स्वतःला पास्टर किंवा प्रचारक म्हणवून घेतो. पुढे जाऊन मोठी मंडळी किंवा सेवाकार्यातील, स्वतःला ब-याचदा “बिशप” म्हणून संबोधतात. तो जर ख-या अर्थाने यशश्वी झाला असेल तर, “प्रेषित” म्हणून स्वतःला संबोधतो. त्यातील काही प्रचारक तंत्र-मंत्र विद्येच्या शक्तीचा वापर करीत असावेत. त्यातील काहीजण पुष्कळ गर्भ श्रीमंत आहेत, जरी त्यांचा देश गरीब असला तरी.

समृद्धीचे प्रचारक लोकांचे लक्ष वेधून घेतात. मी त्यांची एक भली मोठी जाहिरात मोठ्या फलकावर पाहिली. त्यांचे टेलिविजनवर कार्यक्रम असतात. भारतात अशापैकी एका मनुष्याने टेलिविजनवर समृद्धीचा भला मोठा संदेश दिला. उपदेशाच्या शेवटी तो म्हणाला जोवर तुमचे तारण होणार नाही तोवर तुम्हांला ही समृद्धी मिळणार नाही. मग त्याने लोकांना पाप्यांची प्रार्थना म्हणावयास सांगितली जेणेकरुन त्यांचे तारण होईल. परंतू त्या लोकांनी त्यांच्या पापांची व्हावी म्हणून पाप्यांची प्रार्थना म्हटली नाही. समृद्धीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी ती प्रार्थना केली. श्रीमंत होण्याचा एक प्रवेशद्वार म्हणून त्यांनी येशूवर “विश्वास” ठेवला.

मी कधीकधी म्हणतो, “पैसा ही एक वैश्विक भाषा आहे जी सर्वांना समजते.” हे पेटाकॉस्टवादी प्रचारकाच्या बाबतीत तंतोतंत खरे आहे! ते शुभवर्तमान सांगत नाहीत, परंतू त्यांना पैसा समजतो! एका सभेमध्ये, एका प्रचारकाने लोकांना हात वर करायला लावले आणि मोठ्याने, “मी श्रीमंत आहे, मी श्रीमंत आहे” असे म्हणावयास लावले. परंतू त्यातील एकच व्यक्ति श्रीमंत झाला तो म्हणजे प्रचारक होय. समद्धीचे इश्वरविज्ञान काम करीत नाही. ती एक युक्ति आहे!

मला एक प्रश्न विचारु द्या. समृद्धीचा प्रचार देशातील गरीब, खेड्यातील आणि शेतातील लोकांना का सांगितला जात नाही? तेथील लोकांना पैसा नको आहे का? परंतू अशा देशांत समृद्धीचा प्रचार केला जातो असे मी पाहिले नाही. का दिला जात नाही? तेथील गरीब लोकांना अशा प्रकारच्या एखाद्या प्रचारकाच्या जीवनशैलीसाठी द्यावा लागणारा पैसा त्यांच्याकडे नसतो! त्यांच्याकडे अशा प्रचारकांच्या महागड्या कारसाठी, विमानाच्या प्रवासासाठी, त्याच्या मोठ्या घरासाठी, त्याच्या पत्नीच्या नव्या कपड्यांसाठी, आणि टेलिविजनवरील वेळेसाठी पैसा नसतो. त्यामुळे ह्या प्रचारकांना गरीब लोकांविषयी काही देणेघेणे नसते. त्याला ठाऊक असते की त्यांनी त्याचा उपदेश ऐकला तरी ते श्रीमंत होणार नाहीत. त्याला ठाऊक असते की ते त्याला काही देऊ शकणार नाहीत. मी समृद्धीचा प्रचार करणा-यांना केवळ शहरात पाहिले आहे जेथे पैसा घेतला जातो. कोंबड्या जेथे नसतात तेथे कोल्हा जात नाही!

केवळ हेच मी पाहिले नाही. प्रचारकाकडून स्पर्श करुन घ्यावा म्हणून रांगेत उभे राहिलेले मी पाहिले. मग ते खाली वाकून पाया पडतात व काही शांत पडून राहतात, काही वेळा वेडेवाकडे होतात किंवा झटके मारतात. ह्याला “आत्म्यामध्ये वधले जाणे” असे म्हणतात. परंतू पवित्र आत्मा त्यांच्यासंबंधाने काही करीत नाही. प्रचारक त्यांना स्पर्श करण्यापूर्वी, लोक त्यांच्या गुडघ्यावर येतात, मागे वाकतात, आणि त्यांचे डोके मागे टेकवितात. प्रचारक त्यांच्या कपाळावर हात ठेवतो आणि हळूच त्यांना मागे ढकलतो. जर ते खरे असते, ते गुडघ्यावर आले किंवा नाही आले तरी पवित्र आत्म्याने त्यांच्यामध्ये कार्य केले असते! ते खोटे आहे – अगदीच. सर्वात वाईट म्हणजे ते सैतानी होते.

भारतात एक मनुष्य माझ्याकडे पळत आला व माझे पाय धरले. मी त्याला विचारले तू हे का केले. त्याने उत्तर दिले, एका अनुवादाकाकडून, माझा पदस्पर्श करुन त्याला तारण मिळवायचे होते असे कळले. मी तारण देऊ शकत नाही हे मी त्याला सांगितले. मी एक साधा मनुष्य, जसा तू पापी तसा मीहि पापी मनुष्य होतो. त्याला मी सांगितले माझ्यापेक्षा थोर असा एक मनुष्य होता जो माझ्या नवीन मित्राला जर तो त्याच्याकडे आला व त्याने त्याचा स्विकार केला तर तो त्याला तारण देणार. त्या मनुष्याचे नाव येशू आहे. मी त्याला येशूविषयी सांगितले, तो कोण आहे व त्याने काय केले होते. मग मी त्या गरीब भारतीय मनुष्यास ख्रिस्ताकडे नेले. त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला. एका महिन्यानंतर तो मनुष्य मेला आणि स्वर्गात गेला.

भारतातील पुष्कळ पेंटाकॉस्टल प्रचारक हे एखादा गुरु किंवा आध्यात्मिक “गुरुजी” ह्या भूमिकेत गेले आहेत जे त्यांच्या शिष्यांना ऊर्जा देतात व त्यांना उंच करतात. मी हे पुन्हा न पुन्हा पाहिले आहे. उपदेशानंतर– आरोग्य, पैसा, किंवा इतर काही अशा आपल्या विनंत्या प्रचारकास (किंवा मला!) सांगण्यासाठी लोक पुढे येतात. हिंदू गुरुला जसे करतात तसे ते आपले हात जोडतात व वाकून नमस्कार करतात. त्यांच्या मस्तकावर हात ठेऊन मला प्रार्थना करावयास सांगितली. जेव्हा ते बोलतात तेव्हा ते ख्रिस्ती प्रचारकास तोच शब्द वापरतात जो ते गुरुसाठी वापरतात. ते म्हणतात, “देवाचा मनुष्य” – अगदी तंतोतंत दोन्ही प्रकारच्या माणसास बोलतात तसाच उच्चार करतात. ह्या लोकांना, उपदेश महत्वाचा नसतो. महत्वाचे ते असते जे उपदेशानंतर येते ते – आशिर्वाद जो प्रचारकाचा मस्तकावर हात ठेऊन घेतला जातो.

भारतात व आफ्रिकेत मी कधीहि पारंपारिक उपासनेचे गीत गायलेले ऐकले नाही. मला त्यांची भाषा ठाऊक नाही, परंतू मी त्याची चाल ओळखली असती! भारतातील गरीब मंडळीत रॉक बँड साठी इलेक्ट्रिक गिटार किंवा मोठ मोठे स्पीकर नाहीत. परंतू त्यांच्याकडे ड्रम मात्र आहे. लोक पुन्हा पुन्हा “येसूआ” जवळजवळ वीस मिनिटे जोवर ड्रम वाजतोय तोवर गाताना ऐकले आहे. मला वाटले हत्ती रस्त्यावरुन तालात चालत आहे – असा तो ड्रम ते वाजवित होते. “येसूआ” हे येशूसाठी वापरलेले नाव आहे. परंतू ते स्तुतीचे गीत नव्हे तर, ते एखाद्या जपासारखे वापरलेले असते.

जरी येशूचा उल्लेख केला असला तरी ख्रिस्त किंवा शुभवर्तमान ह्या मंडळ्यांच्या केंद्रस्थानी नाही. इतर गोष्टी त्यांच्या केंद्रस्थानी असतात – म्हणजे पवित्र आत्मा, प्रचारकाने मस्तकावर हात ठेऊन प्रार्थना करणे, समृद्धि – इतर सर्वकाही केवळ रक्ताळलेला ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरत वधस्तंभावर असलेला सोडून.

आफ्रिकेतील एका सभेमध्ये मी उपदेशापूर्वी एक तास गीतसंगीत ऐकले, लोक मंचावर व मंचाच्या समोर सुद्धा नाचत होते. गीतसंगीत संपल्यानंतर तेथील पाळक माझ्याजवळ आले व मला म्हणाले येथे असे काही लोक आहेत ज्यांना नव्याने जन्म घ्यावयाचा आहे. परंतू त्यांनी अजून शुभवर्तमान ऐकले नाही! कोणता “नवा जन्म” त्यांना मिळाला आहे? मी त्या पाळकाला सांगितले मी अशा कोणालाहि समुपदेशन करणार नाही ज्याने कधीहि शुभवर्तमान ऐकले नाही. त्याला हे आश्चर्य वाटले! उपदेशानंतर मी काही लोकांचे समुपदेशन केले आणि त्यांना ख्रिस्तामध्ये आणण्याचा प्रयत्न केला.

ते लोक खूप “वाईट” दर्जाचे होते जे परिवर्तन झाल्यासारखे दिसत होते. मी असं ऐकले की कोणीतरी पुरुष व महिला ह्या जादूटोना करण्यात व्यस्त होत्या. उपदेश संपल्यानंतर केवळ पुरुषांना आमंत्रण द्यावे असे मी त्या पाळकाला सांगितले, जे पाळकाने ऐकले नाही. मी त्याला चार वेळा विनवणी केली तेव्हा शेवटी त्याने आमंत्रण दिले व परत परत ते स्थानिक भाषेत सागितले. सहा किंवा सात लोक आले. त्यांना ठाऊक होते की त्यांनी चूक केली आहे. ते पूर्वीचेच ख्रिस्ती आहे असे त्यांना वाटत नव्हते. त्यांना ठाऊक होते की ते त्रासामध्ये आहेत. मी त्यांचे समुपदेशन केले आणि त्यांच्यातील सैतानी समावेश हाताळला. त्यानंतर मी शुभवर्तमानाची घोषणा केली व त्यांना येशूकडे नेले.

पेंटाकॉस्टवादामध्ये भावनांना खूप वाव आहे परंतू तारणाला खूप कमी. तुम्ही वर्षों वर्षे पुढे जाऊ शकता, दशकभर, तुमचे संपूर्ण जीवन हे सर्व परिवर्तनाविना असू शकते. तुम्ही पेंटाकॉस्टवादी लोक हिंदू किंवा मूर्तीपूजक यांच्याप्रमाणे नरकात जाऊ शकता.

शास्त्रीय ख्रिस्ती मंडळी यांच्यापेक्षा पेंटाकॉस्टवादी मंडळ्याना काय वेगळे बनविते? शास्त्रीय ख्रिस्ती मंडळीमध्ये, सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे उपदेश. पाळक देवाच्या वचनातून उपदेश देतो. शुभवर्तमानाचे सादरीकरण केले जाते.

पेंटाकॉस्टच्या मंडळीमध्ये सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे भावना व अनुभव. संगीतामुळे लोक उत्साहित होतात. आणि शेवटी ते पाळकांकडून प्रार्थना करवून घेतात. ते श्रीमंतीच्या मार्गाची अपेक्षा करतात. कधीकधी ते “आत्म्याने” झपाटतात आणि खाली पडतात. परंतू ह्या सर्व भावना आहेत. ते तारण नाही! सरतेशेवटी तो वेळेचा अपव्यय, आणि सैतानी वाईटपणा होय.

कोणाला तरी वाटेल, “जे तिस-या जगात पाहिले ते हेच होय. आम्ही येथे अमेरिकेत बरे आहोत.” नाही, नाही! येथे काय वेगळे आहे? शेवटी, तिस-या जगातील पेंटाकॉस्टवाद्यांनी हा मुर्खपणा आपल्या देशातील पेंटाकॉस्टवाद्यांच्या मुर्खपणातून शिकला आहे.

काही वर्षापूर्वी जॅक नगान व मी एका पेंटाकॉस्टवादी सभेला भेट दिली. ती संजीवन सभा असायला हवी. ती मोठ्या रॉक संगीताने सुरु झाली. शेवटी एक मनुष्य एक स्त्री आली आणि बांधलेल्या दोरावरुन ते सर्कशीतील कलाकाराप्रमाणे मागे पुढे चालू लागले. जेव्हा ते ख-या अर्थाने वर दोरावर लटकून राहिले तेव्हा पडद्यावर संजीवन! हा शब्द मोठ्या अक्षरात दाखविण्यात आला. अर्थात ते संजीवन बिल्कुल नव्हते.! परंतू लोकांनी टाळ्या वाजविल्या. त्यानंतर काही पाळक बोलले. एक तासाच्या उपदेशानंतर, येशूचे एकदाच नाव घेण्यात आले. शुभवर्तमान सांगण्यात आले नाही. मला आठवते अरिझोनावरुन आलेला एक पाहुणा पाळक जो म्हणाला की त्याचे लोक “अग्नीच्या बोगद्यातून” जात आहेत. विचार केल्यावर मला आठवले, “पवित्रशास्त्रात अग्नीचा बोगदा कोठेहि नाही.” परंतू ज्या मोठ्या गोष्टी घडत होत्या त्यामुळे ते खूप उत्साहित होत होते! शेवटी पुढारीपण करणा-या पाळकाने घोषित केले की प्रार्थना करुन घ्यावयाची आहे अशा लोक, ते लोक मंचावर येऊ शकतात. लोक मंचावर चढले आणि पाळकाने त्यांच्यावर हात ठेवला व त्यांच्यासाठी प्रार्थना केली. लोक वेडेवाकडे होत, हिसका देत व झटके देत खाली पडले. त्यातील एक पाळक ओरडला, “पकडणारे लोकहो!” ते हे लोक होते जे पडणा-या लोकांना पकडण्यासाठी सज्ज होते व ते त्यांना पकडत होते. ते सर्व नियोजित होते! शेवटी ती सभा रात्री बरोबर 9:30 वाजता संपली. अशाप्रकारे भाड्याने आणलेला “पवित्र आत्मा” 9:30 वाजता ती खोली सोडून गेला. लोक बाहेर पडू लागले, जसे ते आत गेले तसे, किंबहुना ते अधिक सैतानाच्या प्रभावाखाली आले होते. ती एक “संजीवन” सभा असायला हवी होती परंतू ती नव्हती.

प्रत्येक पेंटाकॉस्टवादी किंवा चमत्कारवादी मंडळी इतकी जंगली नसते. परंतू जोर सारखाच असतो – शुभवर्तमान नाही परंतू मनोरंजन व उत्साहपणा असतो. अमेरिकेतील पुष्कळ मंडळ्यामधून शुभवर्तमानाचा क्वचितच उल्लेख केला जातो व सुवार्ता प्रचार केला जात नाही. त्यांच्यासाठी, येशू हा एक सहाय्यक असा आहे जो लोकांना त्यांच्या नातेसंबंधात चालवित असतांना सहज स्वर्गाचे तिकीट देतो. त्याचे मुख्य काम हे पापाची क्षमा करणे नसून लोकांना सुखी करणे हे आहे. पेंटाकॉस्टवादी मंडळ्या भावना व अनुभव देऊ करतात. लोक उत्साही व्हावेत म्हणून ते जंगली रॉक संगीत वाजवितात! पेंटाकॉस्टवादी अन्य भाषा बोलतात, संपत्ती व आरोग्याची आशा देऊ करतात. परंतू वधस्तंभावरील ख्रिस्त मात्र देऊ शकत नाहीत. .

उत्तर काय आहे? येशू ख्रिस्त उत्तर देतो,

“मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्याद्वारे आल्यावांचून पित्याकडे कोणी येत नाही” (योहान 14:6).

पाळकहो, तुम्ही स्वतःची खात्री करुन घ्या की तुम्ही येशूवर विश्वास ठेवता आहात. मग येशू ख्रिस्ताविषयी प्रचार करा व शिकवा! येशू कोण आहे व येशूने आपल्यासाठी काय केले हे नीट समजावून घ्या. शुभवर्तमानाची घोषणा काळजीपूर्वक करा – शुभवर्तमानाशिवाय काही नको. शब्बाथ शाळा व पवित्रशास्त्राभ्यासात शुभवर्तमानाच्या शिकवणीसह त्याचे अनुसरण करा. ख्रिस्त व तारण ह्या गोष्टी तुमच्या मंडळीमध्ये मुख्य विषय बनवा. आध्यात्मिक वरदानें व समृद्धीचा आशिर्वाद नसला तरी चालेल. लोक श्रीमंत होणार नाहीत. असेहि ते श्रीमंत नसणार आहेत. अन्यभाषा नसल्या तरी हरकत नाही. अन्यभाषा कधीहि कोणाचे काही चांगले करीत नाही. केवळ येशू ख्रिस्ताचा प्रचार करणे व शिक्षण देणे हे करा!

तुमच्या मंडळीतील प्रत्येकाशी वैयक्तिक बोला. लोकांनी शुभवर्तमान समजून घ्यावे व येशूवर विश्वास ठेवावा म्हणून शक्य त्या सर्व गोष्टी तुम्ही करताय ह्याची खातरजमा करा. त्यानंतर ते खरे ख्रिस्ती होतील. हे तुमचे खरे सेवाकार्य आहे. ते तुम्ही करीत असतांना देव तुम्हांला आशिर्वादित करो. येशूच्या नावांमध्ये, आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.