Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




संजीवनावर ए.डब्लु. टोजर

A. W. TOZER ON REVIVAL
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा,
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे
प्रभूवारी दुपारी, 9 मे, 2021 रोजी शिकविलेला पाठ
A lesson taught at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, May 9, 2021

पाठापूर्वी उपासना गीत गायलेः “माझा सर्व दृष्टांत भर”
    (अवीज बर्जेसन क्रिस्टेनसन यांच्याद्वारा, 1895-1985).


माझ्या सोबत यहोशवा 7:12 काढा आणि ते वाचा.

“म्हणून इस्त्राएल लोकांना आपल्या शत्रूपुढे टिकाव धरवत नाही; तो आपल्या शत्रूंना पाठ दाखवितात, कारण ते शापित झाले आहेत; तुमच्यामधून त्या मूर्तिला समर्पित वस्तूं नष्ट केल्या शिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही” (यहोशवा 7:12).

आपण खाली बसू शकता. आतापर्यंत इस्त्राएल लोक त्यांच्या अविश्वासू लोकांवर विजय मिळविण्यात यशश्वी झाले होते. एका माणसाने जिंकलेल्या वस्तूंमधून काही वस्तू चोरल्या होत्या. आता त्या अरण्यात परमेश्वर मंडळीवर क्रोधीत झाला होता. अखान नावाच्या माणसाने देव पूर्वी जसा मदत करीत होता ती त्याने थांबविली होती. डॉ. स्कोफिल्ड यानी खूप चांगले म्हणालेत,

“ख्रिस्ताच्या जखमी होण्याचे महत्वाचे कारण हे एका माणसाचे पाप, दुर्लक्षितपणा, किंवा अधार्मिकता आहे” (पृष्ठ 266 वरील तळ टिप).

आपण देवाकडे तासंतास संजीवन पाठव अशी देवाकडे विनवणी करतो व त्याचवेळी दुस-या बाजूला आज्ञाभंगही करतो, देवाला काय हवे याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे परमेश्वर यहोशवाला म्हणाला,

“तुमच्यामधून त्या मूर्तिला समर्पित वस्तूं नष्ट केल्या शिवाय येथून पुढे मी तुमच्याबरोबर राहणार नाही” (यहोशवा 7:12).

कॅथलिक पार्श्वभूमी असलेला एका व्यक्तीला आपल्या पापांची जाणीव झाली, त्याची त्याला कबुली द्यायची होती. परंतु अशाप्रकाची कबुली ही दुप्पट वाईट आहे. नीतिसुत्रे 28:13 काढा. उभे राहा व मोठ्याने वाचूया.

“जो आपले पाप झाकितो त्याचे बरे होत नाही; जो ते कबुल करुन सोडून देतो त्याजवर दया होते” (नीतिसुत्रे 28:13).

आपण खाली बसू शकता. पाप सोडून न देता केवळ त्याची कबुली देणे हे कबुली न देण्यापेक्षा वाईट आहे. का? बंडखोर व्यक्तीसाठी त्याची काही एक मदत होणार नाही!

योहान 14:21 काढा.

“ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीति करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीति करितो त्याच्यावर माझा पिता प्रीति करील; मीही त्याच्यावर प्रीति करीन व स्वतः त्याला प्रगट होईन” (योहान 14:21).

आता योहान 14:15 कडे वळा,

“माझ्यावर तुमची प्रीति असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल”

संजीवना करिता डॉ. टोजर यांच्या पाय-या.

(1) स्वतःसंबंधाने असमाधानी व्हा. तुमच्या जीवनाच्या बदलाकडे तुमचा चेहरा वळवा.

(2) आशिर्वादाच्या मार्गी स्वतःला ठेवा. संजीवनाची इच्छा धरा आणि त्याच वेळी एकतर्फी इच्छा असलेल्या वैयक्तिक प्रार्थनेकडे कानाडोळा करा व दुसरी कडे चाला.

(3) पूर्णतः पश्चाताप करा. तो केल्या केल्या मिळण्याची घाई करु नका.

(4) जेवढे शक्य तेवढे पुनर्वसन करा.

(5) तुम्ही स्वतः मनाने-गंभीर व्हा. तुमची टी.व्ही. बंद करा. तुमच्या आचरणात काही मूलभूत बदल होणे आवश्यक आहेत त्याशिवाय कोणतीही सुधारणा तुमच्या आध्यात्मिक जीवनात होणार नाही.

(6) तुमची आवड कमी करा. जेव्हा तुमचे हृदय जग व पापासाठी बंद होऊन येशूख्रिस्ताला उघडे झाल्याशिवाय तुमच्या अंतःकरणात संजीवन येणार नाही.

(7) "कंटाळा करण्याचे" टाळा. तुम्ही तुमच्या पाळकारिता ते जे सांगतील ते करण्यास तयार राहा. आज्ञाधारकपणा शिका.

(8) साक्ष देण्यास सुरुवात करा. ह्या रविवारी कोणालातरी बरोबर घेऊन मंडळीत या.

(9) हळू आवाजात पवित्रशास्त्र वाचा. जेव्हा महान शास्त्रपंडीत डॉ. शमुवेल जॉन्सन हे इंग्लंडच्या राजाला भेटले, शांतपणे दोघेही काहीवेळ बसले. शेवटी राजा डॉ. जॉन्सन यांना म्हणाला, “मला वाटतं तुम्ही एक महान व्यवहार वाचला असावा.” “हो साहेब,” डॉ. जॉन्सन म्हणाले, “परंतु मला वाटतं हा महान व्यवहाहार अधिक आहे.”

(10) देवावर विश्वास ठेवा. अपेक्षा करण्यास सुरु करा. देवाकडे मदतीसाठी दृष्टि लावा. तो तुम्हांला कधीही निराश करणार नाही.


देवाला ठाऊक आहे की तुमची मंडळी किती आगतिक होऊन संजीवनाची वाट पाहतेय. आणि हे तुमच्या सारख्या संजीवीत झालेल्या लोककरवीच संजीवन येऊ शकते.

मला वाटतं की हा पाठ तुम्ही घरी घेऊन जावे. संजीवनासंबंधाने डॉ. टोजर यांनी जे काही सांगितले ते करा. तुम्ही स्वतःला संजीवीत करा आणि देव तुमचा उपयोग इतरांना संजीवनाचा अनुभव घडविण्यासाठी करील. उभे राहा व उपासना गीत गा.

तारका, मला संपूर्ण दृष्टांताने भर, मी प्रार्थना करितो की, आज मला केवळ येशूला पाहू द्या;
   मोठ्या दरीतूनही जात असलो तरी तू मला चालवितोस, तुझी निरागस महिमा मला व्यापते.
दैवी तारका, मला संपूर्ण दृष्टांताने भर, जोवर माझा आत्मा तुझ्या गौरवाने भरुन जात नाही.
   मला संपूर्ण दृष्टांताने भर, तोवर जोवर तुझी प्रतिमा माझामधून प्रतिबिंबीत होत नाही.

मला संपूर्ण दृष्टांताने भर, प्रत्येक इच्छा तुझ्या गौरवाने; माझ्या आत्म्याला प्रेरित करण्यास ठेव,
   तुझ्या परिपूर्णतेने, तुझ्या पवित्र प्रीतीने, तुझ्या वरील प्रकाशाने माझा मार्ग उजीन निघाला आहे.
दैवी तारका, मला संपूर्ण दृष्टांताने भर, जोवर माझा आत्मा तुझ्या गौरवाने जात नाही.
   मला संपूर्ण दृष्टांताने भर, जोवर तुझी प्रतिमा माझामधून प्रतिबिंबीत होत नाही.

मला संपूर्ण दृष्टांताने भर, पापाच्या सावलीने आतील चमचमता प्रकाश कमी होऊ देऊ नको.
   केवळ तुझा धन्य चेहरा मला पाहू दे, जोवर माझा जीव तुझ्या अनंत कृपेने तृप्त होत नाही.
दैवी तारका, मला संपूर्ण दृष्टांताने भर, तोवर जोवर माझा आत्मा तुझ्या गौरवाने भरुन जाईल.
   मला संपूर्ण दृष्टांताने भर, तोवर जोवर तुझी प्रतिमा माझामधून प्रतिबिंबीत होत नाही.
(“मला संपूर्ण दृष्टांताने भर” बर्जसन ख्रिस्टेनसेन यांच्याद्वारा, 1895-1985).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.