Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
पवित्रशास्त्रीय सेवक

BIBLICAL DEACONS
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा,
पास्टर एमिरीट्स
by Dr. R. L. Hymers, Jr.,
Pastor Emeritus

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी दुपारी,
10 जाने, 2021 रोजी दिलेला उपदेश
A lesson taught at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, January 10, 2021

पाठाच्यापूर्वी गीत गायलेः “पवित्र होण्यासाठी वेळ काढा”
   (विलियम डी. लाँगस्टाफ यांच्याद्वारा, 1822-1894; कडवे 1, 2 आणि 4).


आजच्या दुपारी सेवकाच्या संबंधाने देव काय म्हणतो ते तुम्ही पाहावे. कृपया प्रेषित. 6:1-7 काढा.

“त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असतां हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरु झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हां बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. तर बंधूजनहो, तुम्ही आपल्यांमधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने परिपूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा, त्यांना आम्ही कामावर नेमूं. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व यहुदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली; त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करुन त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या वाढत गेली; याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली” (प्रेषित. 6:1-7).

आपण खाली बसू शकता.

लॉस एंजिल्स येथील, पहिल्या चीनी बॅप्टिस्ट मंडळीचे माझे ब-याच-काळापासूनचे पाळक, डॉ. तिमथी लीन, यांना सर्व सेवक प्रतिनिधीनी सेवकांसाठी असलेल्या दहा गोष्टींचे पालन करणे आवश्यक होते:

“मंडळीतील सेवक प्रतिनिधीनी सेवकांसाठी असलेल्या कराव्या लागणा-या दहा गोष्टी”

(1) सेवक म्हणून काम करण्याची इच्छा व एकमेकांचा आदर करण्याच्या भावना असली पाहिजे.

(2) 1 तिमथी 3:1-10 मध्ये सेवकांसाठी करण्यास सांगितलेल्या गोष्टी करण्याचा सतत प्रयत्न करणारा असावा.

(3) पवित्रशास्त्राचे वाचन करणारा व दररोज प्रार्थना करणारा आणि दान दशांश संतोषाने व नियमितपणे देणारा असावा.

(4) तो विवाहीत असावा व त्याची पत्नी त्याला त्याच्या सेवकाच्या कार्यात तिच्या सर्वस्वानिशी मदत करणारी असावी.

(5) शब्बाथ शाळेत शिकविता आले पाहिजे.

(6) कोणत्याही स्तरावर परमेश्वराची सेवा करण्याची इच्छा हवी, विशेषतः भेटी देणे वगैरे.

(7) सर्व प्रकारच्या मूलभूत बैठकींना म्हणजे, लौकीक उपासना, शब्बाथ शाळा, प्रार्थना बैठक, अधिका-यांची बैठक, व व्यावसायिक बैठकींना हजर राहिले पाहिजे आणि सर्व मंडळीच्या संस्था व प्रकल्पांना मदत करावी लागेल.

(8) प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला पाहिजे व मंडळीच्या किंवा तर प्रशिक्षण कार्यक्रमातून इतरांना प्रशिक्षण दिले पाहिजे.

(9) ख्रिस्ती तरुणांसमोर एक चांगला आदर्श ठेवला पाहिजे. प्रशिक्षणाशिवाय त्यांच्याशी कधीही वादविवाद वा त्यांच्यावर रागराग करु नये.

(10) पाळकाबरोबर काम केले पाहिजे.
  (डॉ. तिमथी लिन, मंडळीच्या वाढीचे गुपित, पृष्ठ 45, 46).


डॉ. लिन हे बरोबर होते. सेवकांनी डॉ. लिन यांनी जे सांगितले ते अनुसरले, तर ते मंडळीच्या फुटीस कारणीभूत नसतील. परंतू सध्या असे होतांना दिसत नाही.

सेवक, आमच्या सारख्या स्वतंत्र मंडळीतील, ब-याचदा फुटीस कारणीभूत ठरतात. आमच्या मंडळीतील फुटीस सेवक हा 92 टक्के कारणीभूत आहे. सदर्न बॅप्टिस्ट मंडळीतील फुटीस सेवक हा 93 टक्के कारणीभूत आहे. ही जी आकडेवारी आहे ती डॉ. रॉय एल.ब्रॅन्सन यांच्याद्वारा लिखीत मंडळीतील फुट यातून घेतली आहे. डॉ. डब्लू.ए. क्रिसवेल हे डॉ. रॉय एल.ब्रॅन्सन यांचे पुस्तक, मंडळीतील फुट याविषयी म्हणाले की,

या वर्षी इतर कांही तुम्ही विसरलात तरी चालेल, परंतू मंडळीतील फुट विसरु नका. प्रत्येक पाळकाने वाचले पाहिजे असे हे पुस्तक आहे.

–डॉ. डब्लू.ए. क्रिसवेल,
  जेष्ठ पाळक, पहिली बॅप्टिस्ट मंडळी,
  दल्लास, टेक्सास.


डॉ. ली रॉबर्सन, कुलगुरु, टेनिस्सी टेंपल विद्यापीठ, हे डॉ. ब्रॅन्सन यांच्या पुस्तकाविषयी म्हणाले,

हे पुस्तक वाचल्यामुळे पाळक व पुढा-यांना भरपूर पायदा हाईल.

डॉ. ब्रॅन्सन म्हणाले, “पुष्कळ सेवक हे धोकादायक आहेत कारण ते ज्यास पात्र नाहीत अशी कामे करण्याच्या प्रयत्न करतात” (ब्रॅन्सन, पृष्ठ 51).

भविष्यातील फुट आपण कशी टाळू शकतो? डॉ. ब्रॅन्सन म्हणतात आपण आपल्या पहिल्या सिद्धांताकडे वळले पाहिजे. डॉ. ब्रॅन्सन म्हणतात की,

a. त्यांचा कार्यक्रम हा सुवार्ताप्रचार, प्रार्थना, शिक्षण देणे व शुभवर्तमान सांगणे हा होता.

b. त्यांचे संचलन त्यांचे पाळक करीत.

“जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हांला देवाचे वचन सांगितले, त्यांची आठवण करा; त्यांच्या वर्तुणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा” (इब्री. 13:7).

“आपल्या अधिका-याच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवाची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही” (इब्री. 13:17).

c. हरविलेल्यांना शोधणे व त्यांना शिक्षण देणे हा त्यांचा आवेश होता.

d. सर्वकांही सुटसुटीत करणे!

सुवार्ताप्रचार, प्रार्थना करणे, व शुभवर्तमान गाजविणे या व्यतिरिक्त इतर सर्वांवर मात करणे.

1. व्यावसायिक बैठकीपासून सुटका करुन घ्या.

2. सेवकाच्या बैठकीपासून सुटका करुन घ्या.

3. इत्यादी (पृष्ठ 228, 229, 230 ब्रॅन्सन).

4. व्यावसायिक बैठकी व सर्व विश्वस्त आणि परिषदेपासून सुटका करुन घ्या.


डॉ. ब्रॅन्सन म्हणाले, “पवित्रशास्त्रात एकच ‘व्यावसायिक बैठक’ आहे जेव्हा पाळक/संदेष्ट्यांनी लोकांना एकत्र बोलाविले व तत्वानिशी बोलले, ‘ते हेच आहे जे आम्ही करणार आहोत,’ आणि लोकांनी प्रतिसाद देत म्हणाले, ‘खूप छान, आम्ही ते करु.’”

डॉ. ब्रॅन्सन म्हणतात, “पुष्कळसे सेवक धोकादायक आहेत कारण ज्यामध्ये ते पारंगत नाहीत ते ते करतात”( 51).

सेवक हे संचालक मंडळ नव्हे: पवित्रशास्त्रात त्यांना कोणताही निर्णय- घेण्याचा अधिकार दिलेला नाही. केवळ पाळकांनाच मंडळीवर अधिकार चालविता येतो. परमेश्वर म्हणतो,

“आपल्या अधिका-याच्या आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवाची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही” (इब्री. 13:17).

एक सेवक म्हणाला, “सेवकांनी काय करावं असे तुम्हांला वाटतं?”

पाळकाने प्रेषित 6:1-6 उघडले. मग पाळक म्हणाले, “हेच ते काम आहे जे विशेषतः पवित्रशास्त्रात दिले आहे.” सेवक म्हणाले, “”पवित्रशास्त्राने संपूर्णतः इतर कोणापेक्षा अधिक परिपूर्ण असा अधिकार दिलेला आहे!”

त्यानंतर आणखी एक सेवक म्हणाला, “मला ठाऊक आहे की पवित्रशास्त्राने सेवकांना करण्यासारखे भरपूर कांही दिलेले आहे.”

पाळक म्हणाले, “ती शेवट वेळ होती ज्यावेळी हा विषय आम्ही ऐकला. का? पवित्रशास्त्रात असे कांही आम्हांस सापडत नाही.”

सेवकाची दिक्षा केली जात नसलेने आणि काय करावे व काय करु नये हे पाळकास सांगू शकत नसलेने, या मंडळीचा संस्थापक आणि सन्मानीय निवृत्त पाळक म्हणून, मी आता तिघांना एक वर्षाकरिता सेवक म्हणून नेमणूक करीत आहे. मि. मेन्सिया, मि. नगान आणि जॉन वेस्ली हायमर्स यांची एका वर्षाकरिता व डॉ. कागॅन यांची दोन वर्षाकरिता सेवक म्हणून नेमणूक करीत आहे.

प्रत्येक जानेवारीमध्ये आपली एक व्यावसायिक बैठक असते, ज्यामध्ये मी सेवकांची पुढील वर्षाकरिता नियुक्ती किंवा जर तो काम करण्यास तंदुरुस्त असेल तर, पुनर्नियुक्ती करीन.

मी आता आरंभीचा उतारा पुन्हां वाचतो. कृपया पवित्रशास्त्रातून प्रेषित. 6:1-7 काढा.

“त्या दिवसांत शिष्यांची संख्या वाढत चालली असतां हेल्लेणी यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरु झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. तेव्हां बारा प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्तिसेवा करावी हे ठीक नाही. तर बंधूजनहो, तुम्ही आपल्यांमधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने परिपूर्ण असे सात प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा, त्यांना आम्ही कामावर नेमूं. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली; आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन, आणि फिलीप्प, प्रखर, नीकानुर, तीमोन, पर्मिना व यहुदीयमतानुसारी नीकलाव अंत्युखीयकर ह्यांची निवड केली; त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करुन त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरुशलेमेत शिष्यांची संख्या वाढत गेली; याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली” (प्रेषित. 6:1-7).

कृपया उभे राहा व आजचे आपले उपासना गीत गाऊया,

पवित्र होण्यास वेळ घ्या, प्रभूशी हळूवार बोला;
   नेहमी त्याच्यामध्ये राहा, त्याच्या वचनाने पोट भरा.
देवाच्या मुलांना आपले मित्र बनवा, जे अशक्त त्यांना मदत करा,
त्याला शोधण्याचा आशिर्वाद कधीही विसरणार नाही.

पवित्र होण्यास वेळ घ्या, जग त्याच्याकडे धावते;
   येशूबरोबर गुप्तपणे एकाकी भरपूर वेळ घालवा.
येशूकडे पाहून तुम्ही त्याच्यासारखे बना;
   तुझे मित्र त्याच्या व्यवहारात त्याच्यासारखा दिसू दे.

पवित्र होण्यास वेळ घ्या, जीवांत शांतता बाळगा,
   प्रत्येक विचार व प्रत्येक इच्छा ही त्याच्या ताब्यात असो.
अशाप्रकारे त्याच्या आत्म्याने प्रीतीच्या झ-याकडे न्यावे,
   लवकरच त्याने वरील सेवेकरिता सज्ज व्हावे.
(“पवित्र होण्यास वेळ घ्या” विलिएम डी. लॉन्गस्टाफ यांच्याद्वारा, 1822-1894;
       कडवे 1, 2 आणि 4).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.