Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




प्रश्नांची उत्तरे देणे

ANSWERING QUESTIONS
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा,
पास्टर एमिरीट्स
by Dr. R. L. Hymers, Jr.,
Pastor Emeritus

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी दुपारी,
4 ऑक्टोबर, 2020 रोजी दिलेला पाठ
A lesson given at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, October 4, 2020

पाठापूर्वी उपासनेचे गीत गायलेः
“एक हजार भाषेकरिता” (चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).


आपल्याला एखाद्याने प्रश्न केला तर आपण रागावले पाहिजे का? कधीच नाही. प्रेष् पेत्र म्हणाला,

“तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना; आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणा-या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या” (I पेत्र 3:15).

सामान्य प्रश्न

1. मी पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवित नाही.

ग्रीक ज्यानी पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवला नाही त्यांना पवित्रशास्त्राचा उल्लेख केला. पौलाने ज्यांना साक्ष दिली त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला नाही. साक्ष सागंण्याच्या क्रियेत आपले आद्य कर्तव्य बचावात्मक बोलणे हे नसून, सुवार्ता प्रचार करणे हे आहे.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

एखाद्या व्यक्तीला सार्वकालिक जीवन कसे मिळेल हा पवित्रशास्त्राचा मुख्य संदेश आहे. त्याने जर म्हटले की तो सार्वकालिक जीवनावर विश्वास ठेवित नाही, तर तुम्ही म्हणू शकता, “ह्या विषयाच्या संदर्भात पवित्रशास्त्र काय म्हणते हे आपणांस ठाऊक आहे का? ह्या विषयाच्या संदर्भात पवित्रशास्त्र काय शिकविते याची आपल्याला काय समज आहे?”

बहुतांशी 98 टक्के वेळा, ते म्हणतील, “दहा आज्ञांचे पालन व येशू ख्रिस्ताचे अनुकरण करण्याद्वारा.” त्यानंतर तुम्ही म्हणाल, “हा मला त्याचीच भीति होती. तुम्ही पवित्रशास्त्राचा मुख्य संदेश समजून घेता त्याचा तुम्ही नाकार केलेला आहे, कारण तुमचे उत्तर केवळ चुकीचेच नसून पवित्रशास्त्र जे शिकविते त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे व्यासाच्या दोन टोकासारखे आहे. आता, या विषयावर पवित्रशास्त्र काय शिकविते याविषयी मला अधिक बौद्धिक प्रतिसाद मिळेल हे आपणास वाटत नाही काय? मग तुम्ही त्याला नाकारण्याचा किंवा स्विकारण्याचा असेल असा एक बौद्धिक निर्णय घेऊ शकता.”

आता मी येशू संबंधाने 10 शक्यता वाचून दाखवितो.

(1) थट्टा केली,

“त्यांनी त्याला अन्न म्हणून विष खायला दिले, तहान भागवण्यास मला आंब दिली” (स्तोत्र 69:21).

(2) इतरांसाठी छळ सहन करणे

“खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले...खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला...आम्हां सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले” (यशया 53:4-6).

(3) अद्भूते काम करतात

“तेव्हां अंधांचे नेत्र उघडतील, बहि-यांचे कान खुले होतील” (यशया 35:5 – 713 ख्रिस्तपूर्व).

(4) मित्रा करवी विश्वासघात झाला

“जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे” (स्तोत्र 41:9).

(5) रुप्याच्या तीस नाण्यांना विकले गेले

“तुम्हांला बरे दिसेल तर मला माझे वेतन द्या...तेव्हां त्यांनी मला माझे वेतन तीस रुपे तोलून दिले” (जख-या 11:12 – 487 ख्रिस्तपूर्व).

(6) तोंडावर थुंकले व उपमर्द केला

मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली...उपमर्द व छिथू ह्यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही. (यशया 50:6 – 712 ख्रिस्तपूर्व).

(7) वधस्तंभावर खिळले

“त्यांनी माझे हातपाय विंधले आहेत” (स्तोत्र 22:16).

(8) देवाने त्याग केला

“माझ्या देवा, माझ्या देवा, तूं माझा त्याग का केलास? (स्तोत्र 22:1).

(9) त्याचे पुनरुत्थान

“तूं आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस” (स्तोत्र 16:10).

(10) तो परराष्ट्रीयांचे परिवर्तन करील

“पाहा, हा माझा सेवक...तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करुन देईल” (यशया 42:1 – 712 ख्रिस्तपूर्व).

ह्या येशू ख्रिस्तासंबंधाने 10 भविष्यवाण्या आहेत. पवित्रशास्त्रात अशा दोन हजारांपेक्षा जास्त ठराविक भविष्यवाण्या आहेत ज्या पूर्वीच पूर्ण झालेल्या आहेत.

कित्येक वर्षापूर्वी नॅशनल एन्क्वायरर या मासिकात एका आधुनिक आघाडीच्या “संदेष्ट्याने” 61 भविष्यवाण्या सांगितल्या होत्या. ह्या 61 भविष्यवाण्या त्या वर्षीच्या सहा महिन्यात पूर्ण व्हावयाच्या होत्या. त्यांनी ते कसे कले? तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेऊ नका, त्या सगळ्या 61 भविष्यवाण्या पूर्ण झाल्या नाहीत! ते म्हणाले होते की पोप पौल निवृत्त होऊन रोमन कॅथलिक चर्च वडीलमंडळी ताब्यात घेईल; ते जॉर्ज फोरमन आफ्रिकेतील मोहमद अली विरुद्धचा आपला हेवीवेट किताब राखतील; आणि ते टेड केनडी अध्यक्ष पदासाठी प्रचार करतील! आधुनिक भविष्यवाण्यां व पवित्रशास्त्रातील भविष्यवाण्यांमध्ये एक फरक म्हणजे आधुनिक “भविष्यवाण्यां ह्या नेहमीच चुकीच्या आहेत, व पवित्रशास्त्रातील भविष्यवाण्यां ह्या अचूक बरोबर आहेत!

2. उत्क्रांतीमुळे सृष्टीचा नाश होत नाही का?

डॉ. ए. डब्लू. टोझर म्हणाले, “आपण जे माहिती असलेल्या पवित्रशास्त्रावर विश्वास ठेवतो की विश्व ही उत्पत्ती आहे. आणि हे विश्व सुरुवातीपासून सार्वकालीक नव्हते. आनंदी संयोगाच्या यशाचा परिणाम तो नव्हे ज्याद्वारे पुष्कळ जुळणारे पुर्जे आकस्मित एकमेकांना भेटत नाहीत, तर त्या जागी खाली पडतात, आणि ते आवाज करु लागतात. यावर विश्वास ठेवण्यासाठी कांही लोकांच्याकडे असते ती विश्वासार्हता असणे गरजेचे आहे.”

एका तरुणाने विचारले, “कोणता पुरावा तुम्हांला पटला ज्यामुळे उत्क्रांति तुम्हांला खरी वाटते?” त्यानी उत्तर दिले, “प्राणी व मनुष्यांतील समानता. त्यामुळे मला पटले की, उत्क्रांति खरी आहे.”

1950 अगोदर जेम्स वॅटसन व फ्रान्सीस क्रिक जीवनाच्या मुख्य रेणूचा शोध लावला, डीएनए – ज्या शोधामुळे त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. ती अविश्वसनीय अशी किचकट यंत्रणा आहे.

क्रिक, एक नास्तिक व उत्क्रांतवादी, यानी 4.6 अब्ज वर्षाच्या कालखंडात उत्स्फूर्तपणे उद्भविलेल्या डीएनए रेणूचा संभावितपणा शोधण्याचा निर्णय घेतला ज्याला उत्क्रांतवादी पृथ्वीचे आयुष्य असे संबोधतात. पृथ्वीच्या इतिहासामध्ये एकाच कोषाच्या डीएनए रेणूची शक्यता किती आहे? त्याचा निष्कर्ष तुम्हांला माहिती आहे काय? शून्य. 4.6 अब्ज वर्षाच्या कालखंडात, हे कधीच शक्य झाले नाही!

काय मग फ्रान्सिस क्रिक असे म्हणाले का की हे देवाने बनविले आहे? ते म्हणाले नाहीत.

हे सर्व चमत्कारीक नाही का, पुरावे मिळून सुद्धा, एकाही शास्त्रज्ञाला हा सिद्धांत चुकीचा आहे हे कबूल करावे? त्यातील एकानेही म्हटले नाही, “डार्विन पासून, आम्ही असत्य शिकवित आहोत.” आम्ही शिकविले की चिखलाप्रमाणे अमिनो ॲसिड एकत्र झाले व कोषिका तयार झाल्या त्यातून आदिम बाहेर आला. आणि, अब्जावधी वर्षानी, आपण येथे आहोत. ते कसे घडले असेल याचा आम्ही कधी विचार केला. पण येथे आपला सिद्धांत नाकारला जातो. आम्ही दिलगीर आहोत की आम्ही तुमची दिशाभूल केली.”

फ्रान्सिस किकने काय केले हे तुम्हांला माहित आहे का? तो आणखी एक सिद्धांत घेऊन आला जो पूर्वीपेक्षाही अशक्य असा होता. त्याचा नवीन सिद्धांत असा होता की प्राण्यांच्या उन्नत प्रजातीद्वारे, कांही दूरच्या ग्रहावर, त्यांच्या शुक्राणूसह अंतरिक्ष यान पाठविले, आणि विविध ग्रह उपजविले. आणि तेथूनच आपणही आलो आहोत. हे ता-यांच्या युद्धा सारखे वाटते!

निर्जीवातून जीवन येऊ शकत नाही. त्यामुळे पवित्रशास्त्र म्हणते, “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली” (उत्पत्ती 1:1).

आपल्याकडे तीन पुरावे आहेत ते देव आहे असा मी विश्वास धरण्यास मला मदत करतातः

(1) कारण व परिणाम करणारे नियमशास्त्र.

     कारण ह्या विश्वामध्ये आपण कारणे व परिणाम पाहू शकतो जे मला तर्कशुद्धपणे दर्शविते की महान अदृष्य कारण ज्यावर देव म्हणून मी विश्वास ठेवतो.

(2) रचना केल्याचा पुरावा.

     जर तुम्ही मंगळावर गेला तर तुम्हांला तेथे हुबेहुब घड्याळ्याची रचना दिसेल, तुम्ही तर्कशुद्धपणे विचार केला तर हे घड्याळ त्या घड्याळ्याच्या निर्माणकर्त्याकडे दिशानिर्देश करते. त्याचप्रमाणे हे अतिशय सुंदर जग त्या जगाच्या निर्माणकर्त्याकडे दिशानिर्देश करते, तो रचनाकार ज्याला मी देव म्हणतो.

(3) व्यक्तीमत्वाचा पुरावा.

     आपण प्रसिद्ध असे मोना लिसाचे छायाचित्र पाहतो. आपण व्यक्तीमत्वाचा पुरावा पाहातो. ह्या छायाचित्रामागचे कारण आपण व्यक्तीनिरपेक्षता असू शकत नाही. हा तिसरा पुरावा महत्वाचा आहे कारण एक निमित्त किंवा शक्ति आपणास कारणीभूत ठरवू शकणार नाही, परंतू एखादा व्यक्ति मात्र आपल्या पापाकरिता आपल्याला जबाबदार ठरवू शकेल.

3. माझा देव त्या सारखा नाही.

जॉन वेस्लीचे जीवन, ज्याने मेथॉडीस्ट सुरु केले, तारणासाठी फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे का महत्वाचे आहे हे ते स्पष्टपणे सांगतात. ते ऑक्सफर्ड सेमीनरीमध्ये पाच वर्षे शिकले आणि चर्च ऑफ इंग्लंडचे सेवक झाले, तेथे त्यांनी दहा वर्षे सेवा केली. त्या वर्षीच्या अंतिम काळात, म्हणजे जवळजवळ 1735 मध्ये, ते जॉर्जियाला इंग्लंडचे मिशनरी म्हणून गेले.

त्यांच्या संपूर्ण आयुष्यात, ते सेवेत बहुतांशी अपयशी ठरले, ते असे होते तरीही, आपण त्यांना, एक खूप धार्मिक मनुष्य असा गणतो. ते सकाळी भल्या पहाटे चार वाजता उठत व ते दोन तास प्रार्थना करीत. मग ते तुरुंग, बंदिशाळा व दवाखाना अशा ठिकाणच्या लोकांना सुवार्ता सांगण्यासा जाण्यापूर्वी एक तास पवित्रशास्त्र वाचीत असे. रात्री उशीरापर्यंत ते लोकांना शिक्षण देत, प्रार्थना करीत व त्यांना मदत करीत असे. त्यानी हे काम कित्येक वर्षे केले. खरे तर, वेस्ली व त्यांच्या मित्रांच्या अशाप्रकारे धार्मिक जीवन जगण्याच्या पद्धतीवरुन त्यांचे मेथॉडीस्ट चर्च असे नामकरण झाले.

अमेरिकेहून त्यांच्या परतीच्या प्रवासात, समुद्रात खूप मोठे वादळ आले होते. ते ज्या लहानशा जहाजात बसले होते ते जवळजवळ बुडणारच होते. मोठमोठ्या लाटा जहाजाच्या डेकवर येऊन आदळत होत्या, आणि वा-यामुळे जहाज चालविणे अवघड झाले होते. त्यावेळी ते बुडून मरणार अशी भीति वेस्लीना वाटली, आणि ते भयंकर भयभीत झाले. ते मेल्यावर त्यांच्या माघारी काय घडेल याची त्यांना खात्री नव्हती. चांगले व्हावे यासाठी केलेले प्रयत्न असूनही, मरण हे त्यांच्यासाठी एक प्रकारे मोठे, काळे, भयंकर असे प्रश्न चिन्ह होते.

त्याच जहाजात दुस-या बाजूला माणसांचा एक समुह होता जो उपासने गीते गात होता. त्यांनी त्यांना विचारले, “ह्याच रात्री तुम्ही मरणार आहांत तरी तुम्ही गाऊ कसे शकता?” त्यांनी उत्तर दिले, “जर हे जहाज बुडाले, तर आम्ही प्रभूबरोबर राहण्यासाठी वर जाऊ.”

मान हलवित वेस्ली दुसरीकडे गेले, व विचार करु लागले, “त्यांना हे कसे ठाऊक आहे? मी जे केले त्यापेक्षा त्यांनी अधिक काय केले आहे?” मग ते म्हणाले, “माझा पालट नास्तिकातून झाला आहे. अरे, पण माझा पालट कोणी केला?”

देवाच्या कृपेमुळे, जहाज इंग्लंडला परत येऊ शकले. वेस्ली लंडनला गेले व तेथे त्यांना अल्डर्सगेट स्ट्रीटवरील एका लहान चॅपलचा मार्ग सापडला. तेथे एक मनुष्य दोनशे वर्षापूर्वीचा मार्टिन ल्युथर यांचा उपदेश वाचत असतांना त्यांनी ऐकले, त्याचं शिर्षक “रोमकरांस पत्राच्या पुस्तकास ल्युथर यांची प्रस्तावना.” खरा विश्वास काय हे हा उपदेश सांगत होता. ते म्हणजे तारणासाठी आपल्या सत्कृत्यांवर नव्हे — तर केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे होय.

वेस्लींना अचानक समजले की ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चुकीच्या मार्गावर चालत होते. त्या रात्री त्यांनी त्यांच्या रोजनिशीमध्ये हे शब्द लिहले: “पाऊणे नऊ वाजता, ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे देवाने जी कृत्यें केली त्याने त्यांच्या अंतःकरणात बदल झाला त्याचा तपशील ते देत होते तेव्हां, विचित्ररित्या मला माझे अंतःकरण उबदार वाटत होते. तारणासाठी, मी केवळ ख्रिस्त, ख्रिस्तावर विश्वास ठेवला असे वाटत होते; आणि मला खातरी झाली की त्याने माझे पाप दूर केले आहे, माझे सुद्धा, आणि नियमशास्त्राद्वारे आलेले पाप व मरण यापासून मला तारले आहे.”

ते तेथे आहे. तो तारणारा विश्वास आहे. त्याच्या पापासाठी पश्चाताप करणे, त्यांनी तारणासाठी केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. त्या रात्री पूर्वी वेस्लीनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नव्हता असे आता तुम्ही म्हणू शकता काय? अर्थात, त्यांनी ठेवला होता. ते पवित्रशास्त्राचे विद्वान होते आणि त्यांनी येशू ख्रिस्तासंबधाने, इंग्रजी, लॅटिन, लॅटिन, ग्रिक व इब्री मधून अभ्यास केला होता. त्यांनी त्या सर्व भाषेतील ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता. परंतू त्यांच्या तारणासाठी त्यांनी जॉन वेस्लीवर विश्वास ठेवला.

ह्या नंतर, ते अठराव्या शतकातील एक महान प्रचारक बनले. पण हे तेव्हांच घडले जेव्हां त्यांने तारणासाठी केवळ येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याचा प्रभू म्हणून स्विकार जाईल. (डॉ. डी. जेम्स केन्नडी, सुवार्तेचा स्फोट, चौथी आवृत्ति, तायंडेल हाऊस पब्लिशर, 1996, पृष्ठ 183-184).

ज्ञानशास्त्र ही तत्वज्ञानाची शाखा आहे — जे ह्यासंबंधाने बोलते की — तुम्हांला कसे माहित आहे? ते देवासांबंधाने काय विचार करतात याच्याविषयी याचे लोक दोन पद्धतीने उत्तर देतात.

1. बुद्धिप्रामाण्यवाद: बुद्धिप्रामाण्यवाद वापरल्याने मनुष्यांस खाली काही अनोळखी व विचित्र अशा धार्मिक मार्गाकडे घेऊन जातो.

2. प्रकटीकरण: आता, ख्रिस्ती मंडळी नेहमी जमेत धरली जाते की देवाने स्वतःला पवित्रशास्त्राद्वारे, आणि मुख्यतः त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताद्वारे प्रकट केले. म्हणून आता आपण जो विचार करतो त्याचा प्रश्न नाही. तर प्रश्न असा आहे की, “पवित्रशास्त्र आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्ताद्वारे देव काय म्हणाला?”

4. अधर्मी पापात हरविले आहेत का?

म्हणा, “आपण येथे काय करतो आहोत आणि आता पवित्रशास्त्रीय वीदविवाद सेटल करण्यापेक्षा फारच घाईचे आहे.”

तुम्ही म्हणाला, “बॉब, तो छान प्रश्न आहे, परंतू माझा विश्वास आहे की आपण ख-या अर्थाने आफ्रिकेतील देवाचे हात, जो अनंत महान व अनंत दयाळू आहे त्याद्वारे अधर्मीपणातून बाहेर पडू. आता मला वाटते की तू खात्रीने जाणावे की तुला सार्वकालीक जीवन आहे. कदाचित नंतर ज्यानी कधीही सुवार्ता ऐकली नाही ज्याविषयी देव बोलला त्या सर्वांना आपण पाहू शकू...समस्या प्रश्नाच्या भोवती फिरते, त्याच्याविषयी कधीही ऐकले नसल्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही म्हणून ‘देव अधर्मीना नरकात पाठविल?’

ज्यांना पूर्वीच दोषी ठरविण्यात आले आहे त्यांना ख्रिस्त दोषी ठरविण्यासाठी आला नाही असे पवित्रशास्त्र आपणांस शिकविते. मनुष्यांस केवळ एकाच गोष्टीसाठी दोशी ठरविले जाते — ते म्हणजे त्यांच्या पापांसाठी.”

5. मरणानंतरच्या जीवनावर मी विश्वास ठेवित नाही.

(1) प्लॅटो. प्राचिन तत्ववेत्त्याने दर्शविले की जे झाड गोड फळे देते ते अगोदर विघटन होऊन त्याला मरावे लागते. प्लॅटो समाप्ति करताना म्हणतो की दुस-या जगात बाहेर येणे व दुसरे जीवन मिळविणे यापूर्वी मानवी शरीर मेले पाहिजे.
     ख्रिस्त व प्रेषित पौल यांच्यापूर्वी प्लॅटो चौथ्या शतकात राहत होता. पौल व ख्रिस्त I करिंथ 15:35-36 आणि योहान 12:24 यामध्ये मरणानंतरच्या जीवनाचा पुरावा दाखविला तरीही त्याने तोच पुरावा शिकविला.

(2) तत्ववेत्ता इम्मानुएल कांत यांच्या निदर्शनात आले की सर्व मनुष्यें ही बरे किंवा वाईट, तसेच एक नैतिक जबाबदारी याविषयी काळजी करतात. ते म्हणआले, “न्यायाचा विजय होत नाही तर ते खरे कसे?” दुस-या शब्दात, त्याने कारण दिले की त्याने तर्क केला की कर्तव्याची जाणीव ही अर्थपूर्ण असावी, तेथे न्याय असावा, न्यायाचा विजय होत नाही तर ते खरे कसे? त्याने तर्क केला की ह्या जीवनात न्यायाचा विजय होत नाही, तर जेथे असेल तेथे दुस-या जागी गेले पाहिजे. दुस-या शब्दात, तत्ववेत्ता इम्मानुएल कांत यानी तर्क केला की मरणानंतर न्याय जीवनाची मागणी करतो. हे आपणांस पवित्रशास्त्रातील इब्री 9:27 मध्ये वर्णिलेल्या सारखे प्रतित होते.
     अशाप्रकारे इम्मानुएल कांत, प्रत्यक्षात नीतितत्वाने मरणानंतर जीवनाची गरज आहे, आणि पवित्रशास्त्राचा देव बहुतांशी त्या न्यायाधिशासारखा आहे.

(3) उष्णताशास्त्राचा पहिला नियम, जो आईन्स्टाईन सिद्ध केला. ते हे सांगते की की उर्जा व तद्वतच पदार्थ हे निर्माण अथवा नष्ट होत नाही. जर मनुष्य अस्तित्व थांबवितो, तो करण्यासारखी एकमेव गोष्ट ह्या विश्वात असेल. पवित्रशास्त्रातील I करिंथ 15:49-51 वर्णन करते की कशाप्रकारे ख्रिस्ती शरीर शेवटपर्यंत राहते. आईन्स्टाईन हा नास्तिक नव्हता.

(4) मरणा-या लोकांचा शेवटचा शब्द.
नास्तिक गिबोन, त्याच्या मृत्यूशयय्येवर, मोठ्याने आरोळी मारला, “सर्वकांही अंधकारमय आहे.” आणखी एक नास्तिक त्याचे नाव आदाम जेव्हां तो मरत होता तेव्हां त्याला किंचाळ्या ऐकू आल्या, “सैतान ह्या कक्षात आहे आणि ते मला खाली ओढू पाहत आहेत.”
त्याच्या विरुद्ध, ख्रिस्ती गीतलेखक टॉपलेडी ओरडले, “सर्वकांही प्रकाशमय, प्रकाश, प्रकाश!” एव्हर्ट, मरणापूर्वी 25 मिनिटे, म्हणाले, “महिमा, महिमा, महिमा.” हजारो लोकांना पुढे काय होणार ते दाखविले, म्हणजे ज्या जीवनातून ते पार होणार आहेत ते जीवन.

6. पुनरुत्थित लोकांची पुन्हां जमवाजमव.

हे जाणून घेण्यासारखे आहे की अलिकडे कित्येक शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक जगात खळबळ उडविली आहे की त्यांच्या तपासणीच्या निष्कर्षांमुळेच त्यांचा असा विश्वास बसला आहे की मरण हे पलिकडे जात आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्यानी स्वर्ग किंवा नरकाचा अंदाज घेतला आहे असे मी ऐकले आहे. ह्या अनुभवाने काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. परंतू त्यामुळे मनोरंजक साक्ष मिळाली आहे.

एलिजाबेथ कुबलर-रॉस सकृत दर्शनी ख्रिस्ती नाही, परंतू त्यांचे हे विधान आहे, “पुरावा हा आता निर्णायक आहे. मरणानंतर ही जीवन आहे.” डॉ. कुबलर-रॉस म्हणाले की हा मरणा-जवळचा अनुभवास शास्त्रीय पद्धतीने पडताळणी केली आहे. “त्या संबंधाने बोलावयास भीति वाटते,” त्या म्हणाल्या.

डॉ. रेमंड मुडी म्हणाले, “मरणाच्या क्षणी गोंगाट व खोल वर्तुळ असते.” त्या सर्वांचा अहवाल आहे की त्यांचे शरीर हे वर तरंगते व पुनरुज्जीवन कक्षातील सर्व डॉक्टरांकडे पाहतात. हे कमी नाही, परंतू पाचशे पेक्षा जास्त लोकांना, संपूर्ण जगातून घेतले आहे. ह्यातील प्रत्येकजणांनी सांगितले की त्यांनी एका धार्मिक पुरुषाला पाहिले. हे विशेषतः खरे नास्तिक होते.

शेकडो वैद्यकीय तज्ञ ज्यानी तिला ऐकले त्यांना डॉ. कुबलर-रॉस म्हणाले, “मी म्हणत असे की, ‘मी मरणानंतरच्या जीवनावर विश्वास ठेवतो.’ परंतू मला ठाऊक आहे.”

जेव्हां तिने आपले हे भाषण संपविले तेव्हां एक हजार वैद्यकीय व्यावसायीक व विद्वानानी उभे राहून मान वंदना दिली.

7. पुनर्जन्मासंबंधाने काय?

हिंदूत्व व बौद्ध धर्मीयांमध्ये असा विश्वास आहे की, पण तो ख्रिस्तीत्वामध्ये नाही! मी प्रतिसाद देतो, “पवित्रशास्त्र म्हणते, ‘मनुष्यांसाठी एकदाचे मरणे हे नेमून ठेवले आहे, परंतू त्यानंतर न्याय आहे’” (इब्री 9:27).

ह्या सर्व कल्पना येशू ख्रिस्ताचे अर्पण व त्याचे परिपूर्ण नातिमत्व दुर्लक्षित करते. त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे तो, एकदाच सर्वांसाठी, आपणां सर्वांचे पाप नाहिसे करतो. त्यामुळे जेव्हां आपण येशूवर विश्वास ठेवतो, तेव्हां त्याने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताद्वारे आपण शुद्ध होतो!

8. नरक खरा नाही.

कधीकधी आपणांस असे म्हणण्यास मदत होते, “तुम्हांला ठाऊक आहे, मानसशास्त्राचे एक सत्य आहे की आपणांस ज्याची जास्त भीति वाटते ते आपण मुद्दामहून नाकारतो. नरकाची भीति ही तुमच्या हृदयात खोलवर अशी धारणा असते की अशा प्रकारची जागा खरोखर असेल तर तेथे आपण जाऊ यावर तुमचा विश्वास नसेल तर त्याचे मला नवल वाटेल.” ब-याचदा त्याचे उत्तर असे असते, “मला वाटतं तुम्ही बरोबर आहां.”

परंतू तुम्ही पुढे जाऊन सांगायला हवे की, “मला वाटते की नरकावर तुम्ही विश्वास ठेवू नये. तुम्हांला खातरीने ठाऊक असायला हवे की तुम्ही नरकात जाणार नाही. शुभवर्तमानाचे हे सार आहे. नरक आहे यावर माझा विश्वास आहे, पण मी तेथे जाणार नाही कारण असे मला देवाचे अभिवचन आहे. असे म्हणण्यापेक्षा ते कितीतरी चांगले आहे, ‘मला ठाऊक आहे मी नरकात जाणार नाही कारण अशाप्रकारची जागा आहे यावरच माझा विश्वास नाही.’”

9. येथे पृथ्वीवर आपला नरक आहे.

तुम्हांला ठाऊक आहे, तुम्ही अंशतः बरोबर आहे. मला ठाऊक आहे मादक द्रव्ये घेणारे हे पृथ्वीवरील जीवंत नरकात जातील. मला दारु पिणारे ठाऊक आहेत जे दारुचे गुलाम आहेत.

पास्टर मार्क बकली मादक द्रव्य याविषयी सांगतो व मनोविकृति दवाखान्यात शेवट करतो. येशूवरील विश्वासाच्याद्वारे पास्टर बकली यांची पृथ्वीवरील ह्या नरकातून सुटका. येशूने रेव्ह. बकली यांना मादक द्रव्याचे व्यसन — पृथ्वीवरील नरक यापासून वाचविले. तुम्ही येशूबरोबरच्या अद्भूत संभाषणाची सीडी मागवू शकता — येशू ख्रिस्तातील जीवन-बदलणारे तारण. अमेझॉन.कॉम वरुन मार्क यांटे पुस्क मागवा. त्याचे शिर्षक आहे, “अंधकारातून प्रकाशाकडेः माझा प्रवास” पास्टर मार्क बकली यांच्याद्वारा. तुम्ही जर पहिली कांही पाने वाचलात तर, तुम्ही सगळे पुस्तक वाचाल. मी ते आता दोनदा वाचले.

आपण सब्बातरीन नाही आहोत, परंतू आपण पास्टर बकली यांच्याशी शहमत आहोत, जे म्हणाले,

“जेव्हां आम्ही देवावर विश्वास ठेऊन अवलंबून राहतो, तो आम्हांला अंतर्ज्ञान व समज देतो जे आम्हांला दिर्घकालीन फलदायी बनविते...मी आध्यात्मिक कायदेशीरपणाची वकीली करीत नाही. मी तुम्हांला प्रोत्साहन देतो की तुम्ही विश्रांतीसाठी वेळ काढा त्यामुळे तुम्ही निरोगी राहाल” (अंधकारातून प्रकाशाकडेः माझा प्रवास, मार्क बकली द्वारा).

उभे राहून हे उपासनागीत गा!

अरे हजारो अन्यभाषेत गीते गातात
   माझ्या महान मुक्तीदात्याची स्तुति,
माझा देव व राजा याचा महिमा,,
   त्याच्या कृपेचा विजय.

माझ्या कृपाळू गुरुजी व माझ्या देवा,
   घोषणा करण्यास मला मदत कर,
संपूर्ण पृथ्वीवर पसरविण्यासाठी,
   तुझ्या नावाचा महिमा असो.

येशू! ते नाव जे आमची भीति नाहीशी करते,
   ते आमचे सर्व दुःख थांबविते;
हे पाप्यांच्या कानातील संगीत
   हे जीवन, आणि आरोग्य, व शांति.

तो रद्द केलेल्या पापाचे सामर्थ्य नाहीसे करतो,
   तो बंदिवानास मुक्त करतो;
त्याचे रक्त आम्हांस शुद्ध करते;
   त्याच्या रक्ताचा मला लाभ झाला.
(“अरे एक हजारो भाषेसाठी” चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.