Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
योना — संजीवन करणारा संदेष्टा !

JONAH – THE PROPHET OF REVIVAL!
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा,
पास्टर इमिरटस्
by Dr. R. L. Hymers, Jr.
Pastor Emeritus

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी दुपारी, 14 जून, 2020 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, June 14, 2020

“अमित्तयाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे” (योना 1:1, 2).


योना हे पुस्तक स्वतः योना संदेष्ट्याने लिहलेले आहे. मी हे म्हणतो कारण हे पुस्तक योनाचे विचार व प्रार्थना प्रकट करते, जे इतर कोणालाही ठाऊक नाही पण स्वतः योनाला ठाऊक आहे. योनाचे तथ्य एक ऐतिह्यासिक व्यक्तित्व म्हणून II राजे 14:24-25 मध्ये दिलेले आहे जेव्हां जुन्या काळातील शिक्षकानी त्याला, “गथ-हेफेर येथील संदेष्टा अमित्तयाचा पुत्र, योना, असे त्याला संबोधले आहे” (II राजे 14:25). प्रभू येशू ख्रिस्त स्वतः योनाविषयी बोलताना म्हणतो हा एक खरा, ऐतिह्यासिक संदेष्टा आहे. कृपया मत्तय 12:39-41 काढा. योनाविषयी येशू जे बोलला ते माझ्याबरोबर वाचा,

“त्याने उत्तर दिले, दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते, परंतू त्यां योना संदेष्टा ह्याच्यावाचून तिला दुसरे चिन्ह मिळणार नाही. कारण जसा योना ‘तीन दिवस व तीन रात्री माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून दोषी ठरवितील, कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरुन पश्चाताप केला; आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे” (मत्तय 12:39-41).

उभेच राहा व लुक 11:29-30 काढा.

“तेव्हां लोकसमुदाय त्याच्याजवळ एकत्र जमत असताना तो असे म्हणू लागला, ‘ही पिढी दुष्ट पिढी आहे, ही चिन्ह मागते; परंतू योना संदेष्ट्याच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही’. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल” (लुक 11:29-30).

आपण खाली बसू शकता.

त्यामुळे II राजे 14:25 हे योनाविषयी ऐतिह्यासिक माहिती देते. आणि लुक 11:29-30 योनाला हा चिन्ह असे येशूने संबोधले हे नमुद करते. आणि मत्तय 12:39-41 मध्ये येशू योनाचे पुनरुत्थान हे स्वतःचे पुरले जाणे व तिस-या दिवशी मेलेल्यांतून पुनरुत्थित होणे ह्याचे चिन्ह सांगतो. अशाप्रकारे, जुना करार योनाला एक खरे व्यक्तित्व असे नमुद करते, आणि योनाचे मरणे व पुनरुत्थित होणे हे ख्रिस्त आपल्या स्वतःचे मरण व पुनरुत्थान ह्याचे भविष्य आहे असे सांगतो.

विन्सटन चर्चिल साहेब हे खूप चांगले बोलले आहेत, “आम्हांला [उदारमतवादी] प्राध्यापक ग्रॅडग्राईन्ड व डॉ. ड्रायसडस्ट यांचे पटलेले नाही. आपणांस खातरी असेल की ह्या ज्या सर्व गोष्टी घडल्या आहेत जसे की त्यांनी पवित्र लिखान [पवित्रशास्त्र] प्रमाणे ठेवलेल्या आहेत.” डॉ. जे. वरनॉन मॅक् गी यांच्यद्वारा उद्धृत, थ्रु द बायबल, आवृत्ती III, योनाची ओळख यावरील टिपण्णी, पृष्ठ 738).

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +
आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

I.  प्रथम, योनाचे पाचारण.

“अमित्तयाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर... (योना 1:1, 2).

वचन तिसरे,

“पण परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शीशास पळून जाण्यास निघाला...” (योना 1:3).

हा मनुष्य योना याला मी समजू शकतो. त्यामुळेच जुन्या करारातील योनाचे हे छोठेसे पुस्तक माझ्या आवडीचे पुस्तक आहे. योना हा परमेश्वराच्या समक्षतेतून पळून गेला. मी असे केले नाही. मला सुवार्तिक म्हणून पाचारण होते आणि मला ते समजून आले. परंतू महाविद्यालयात मी इतका कच्चा विद्यार्थी होतो की मी माझी पदवी पूर्ण करु शकलो नाही. सदर्न बॅप्टिस्ट मिशनरी व्हायचे असेल तर मला महाविद्यालयात जाऊन सेमीनरीतून पदवी घ्यायला लागणार होती. पण मला योनासारखे वाटले. मला ठाऊक होते की मला पाचारण आहे, पण महाविद्यालयातून नापास होण्याच्या भीतीने मी देवाच्या समक्षतेतून पळण्याचा प्रयत्न केला. मी अशक्य कांहीतरी करावे असे मला परमेश्वर सांगत होता.

सेमीनरीतील एक तरुण मला म्हणाला, “मी सुवार्ताकार्य करणार नाही कारण मला ठाऊक आहे की मी मोडून जाईल व खाक होईल.” सुवार्ताकार्यात तो अपयशी ठरेल अशी त्याला भीति वाटत होती. I thought about that. मग मी त्याला म्हणालो, “मी अगोदरच पुष्कळदा तूटून गेलोय व खाक झालोय त्यामुळे आता मी घाबरत नाही.”

ती भीति असते जी देवाने-पाचारण केलेल्या माणसास सुवार्ताकार्यापासून दूर ठेवते. भीति ही नेहमी एकांगी किवा दुस-या बाजूने असू शकते. हा जो तरुण होता तो जो करी त्यात विजयी झालेला होता — पण तो सुवार्ताकार्यास भीत होता. त्याचा छोटा भाऊ त्याला म्हणाला, “माझ्या भावा तू कांहीही करु शकतो.” पण तो “तूटून जाण्याच्या व खाक होण्याच्या” भीतीवर मात करु शकला नाही. तो सहा फूट उंचीचा, सडसडीत, आणि सुवार्तेचे दान असलेला होता. परंतू तो परमेश्वराच्या समक्षतेतून पळून गेला कारण तो घाबरलेला होता!

आता, माझ्या तरुण मित्रानो, मी माझ्या जीवनात जे शिकलो ते मला सांगू द्या, “तुम्ही कांहीही करु शकता कांहीही — करण्यास देव तुम्हांला पाचारण करतो!” पवित्रशास्त्र म्हणते, “मला जो सामर्थ्य देतो त्या ख्रिस्ताद्वारे मी सर्वकांही करण्यास शक्तिमान आहे” (फिलिप्पै 4:13). कारण हे वचन मी सिद्ध केले आहे, मला ठाऊक आहे ते सत्य आहे. आता मी माझ्या वयाच्या 80 व्या वर्षाचा, कर्क रोगातून वाचलेला, गुडघे दुखीने त्रस्त असा आहे, पण भयंकरपणे आमची 3/4 मंडळी फोडून दोन दुष्ट माणसे घेऊन गेलीत तरीही मी घाबरलो नाही. मी आईच्या हातात असलेल्या लहान बाळासारखा मी निर्धास्त व शांत असा आहे. मी घाबरतो काय? खरेतर, मी कणभर सुद्धा घाबरत नाही! माझ्या आईची आई मला नेहमी सांगे की, “तू घाबरावे असे काही नाही पण खुद्द भीति ही आहे ती घाबरविते,” तिने हे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रोझवेल्ट यांनी त्यांच्या मोठ्या नैराश्येच्या काळात म्हटले तेव्हां ऐकले होते. आणि मला कळून आले की माझ्या आजीने सांगितले ते खरे होते!

मला हे ही कळून आले की तुम्ही “देवाच्या समक्षतेतून पळून” जाऊ शकत नाही. का? कारण तुम्ही जेथे कोठे जाता तेथे देव येतो — त्यामुळे! योना जसा, तार्शीशला गेला, तसे तुम्ही जाऊ शकता! देव जेवढा घरात असतो तेवढाच तो तेथे असतो! आणि देव प्रचारकास मोठ्या संघर्षाशिवाय जाऊ देत नाही.

एका दारुड्या माणसास ओळखत होतो. मला नंतर कळाले की तो त्याच्या मनास बंद करण्यास प्यायचा कारण देवाने त्याला पाचारण केले होते, पण तो देवाचे पाचारण पाळण्यास घाबरत होता. त्यामुळे तो भीतीपासून दूर जाण्यासाठी रोज रात्री दारु प्यायचा. त्याचे नाव जॉन बिर्च (विनोद नव्हे!) आणि तो माझ्याबरोबर सेमीनरीत असतांना, वसतिगृहातून चोरुन बाहेर ये जा करी कारण तो प्यायलेला असायचा!

मी ॲलन नावाच्या आणखी एका माणसास ओळखतो. ॲलनला ख्रिस्ताकडे मी आणले, पण ते खूप खठीण होते. का? ॲलनला भीति वाटायची की त्याचे तारण झाले तर त्याला स्वर्गात जावे लागेल! तो स्वर्गात जायला तो घाबरत होता? एके दिवशी त्याने मला सांगितले, “मला माझ्या बाबाला पुन्हां पाहायला लागेल आणि ते मला बघितल्यावर रागावतील कारण मी सेमीनरीत गेलो नाही व त्यांच्या सारखा मी प्रेसबिटेरियन प्रचारक झालो नाही.” ॲलन हा साठ वर्षाचा होता. तो रविवारी प्रेसबिटेरियन मंडळीत बसला होता, त्याचे तारण होईल म्हणून तो घाबरत असे कारण त्याचे स्वर्गीय बाबा स्वर्गात त्याच्यावर रागावतील! तो चाळीस वर्षाहून अधिक ह्या विचाराने त्रस्त होता. पण मी त्याचे मत परिवर्तन करु शकलो की त्याचे बाबा [रेव्ह. मि. ब्लॅक] त्याला पाहून आनंदाने त्याला मिठी मारतील, ज्याप्रमाणे तो उधळ्या पुत्र परत घरी आल्यावर, त्या उधळ्या पुत्राच्या बापाने त्याला केले. मी ख्रिस्ताकडे आणलेल्या पैकी ॲलन हा पहिला व्यक्ति होता!

मी सेमीनरीत होतो तेव्हां, आमच्या एका सभेत एका महाविद्यायीन-वयाच्या मुलीचे तारण झाले. ती एक लाजाळू मुलगी होती, पण मला लक्षात आले की ती कोणत्यातरी अडचणीत होती, म्हणूण मी तिच्याशी बोलण्यास गेलो. ती म्हणाली, “माझे तारण झाले हे सांगण्यास मला माझ्या आईची भीति वाटते.” म्हणालो, “जा आणि तिला सांग. ती कांही वेडी नाही.” पण मी चुकीचा होतो. तिचे तारण झाले आहे हे जेव्हां तिच्या आईला कळाले, तेव्हां तिला तिच्या आईने घरातून हाकलून दिले. त्या मुलीला रडतानां मी पाहिले. म्हणून मी म्हणालो, “मी जाऊन तुझ्या आईशी मी बोलतो.” मी टाय व कोट घालून, त्या स्त्रीला पाहण्यास गेलो. मी कोण आहे हे जेव्हां तिला कळाले की, मी कोण होतो, तेव्हा ती माझ्यावर रागावून ओरडू लागली. शेवटी मी तिच्या घरात गेलो. मी म्हणालो, “तुम्ही तुमच्या मुलीला घरी येऊ देणार नाही का?” ती म्हणाली, “तिने व्यभिचार केला असता किंवा मादक द्रव्य सेवन केले असते तरी मी तिला पाठींबा दिला असता. पण ती ख्रिस्ती झालेली आहे! त्यामुळे तिला पुन्हा कधीही माझ्या घरात स्थान नाही.”

त्या बिचा-या मुलीला मंडळीतील कोणाच्या घरी आसरा मिळाला व तिला नोकरी लागली, आणि तिने तिचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शेवटी तिने एका चांगल्या ख्रिस्ती तरुणाशी विवाह केला. मला कळाले की तिची आई लग्नाला आली नाही. ते दोघे उभयंता युरोपातील एका देशात मिशनरी म्हणून गेले. आम्ही त्यांच्या मदतीसाठी महिन्याला त्यांना पैसे पाठवितो.

मला एके दिवशी ऐकायला मिळाले की तिच्या आईच्या दारासमोर वर्तमान पत्रांचा ढिग पडला आहे. पोलीसानी दरवाजा तोडून आत गेले तेव्हां तिच्या आईचा — मृतदेह जमीनीवर पडलेला दिसल — तिच्या हातात अर्धवट प्यायलेली व्होडकाची बाटली पकडलेली होती!

अरेरे! त्या मुलीला ख्रिस्ती व मिशनरी होण्यामुळे किती दुःख भोगावे व अश्रू गाळावे लागले! पण तिने येशूवर एवढी प्रीति केली की ती तिच्या भीतीवर मात आणि सेवाकर्याच्या क्षेत्रात प्रभूचे अनुकरण करु शकली! आणि ती आध्यात्मिक एवढी सक्षम होती की येशूने जे सांगितले ते ती ऐकी, आणि त्याने जे सांगितले ते पालन केले.

उभे राहा आणि तुमच्या पवित्रशास्त्रातून मत्तय 10:34-39 काढा.

“मी पृथ्वीवर शांतता आणण्यास आलो आहे असे समजू नका. मी शांतता आणण्यास नव्हे तर तलवार चालविण्यास आलो आहे. कारण ‘मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फूट’ पाडण्यास मी आलो आहे; आणि ‘मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.’ जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; आणि जो आपला वधस्तंभ उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही तो मला योग्य नाही. ज्याने आपला जीव राखला तो त्याला गमावील, आणि ज्याने माझ्याकरता आपला जीव गमावला तो त्याला राखील” (मत्तय 10:34-39).

आपण खाली बसू शकता.

मला माहित आहे की तुमच्यापैकी काहीजणांचे पालक आहेत जे तुम्ही ही मंडळी सोडून जावी म्हणून शर्तीचे प्रयत्न करतील. कृपया ह्या मुलीचे धैर्य ध्यानात घ्या व तिचे अनुकरण करा. तुम्ही असे कराल, तेव्हां ते तुमच्यावर रागावतील — थोड्या वेळाकरिता. पण जेव्हां ते तुमचे चांगले जीवन पाहतील, अंततः ते — भविष्यात असतील — तुमच्याबरोबर ते मंडळीत येतील. पण त्यांनी तुमचा पुन्हां स्विकार केला नाही तरी, ख्रिस्ताला अनुसरण्यात तुम्ही विश्वासू असले पाहिजे! योनासारखे होऊ नका आणि परमेश्वराच्या समक्षतेतून पळून जाऊ नका!!!

चीनी मंडळीत, माझे दोन मित्र होते — त्यांची नावे बेन व जॅक होती. बेन हा डॉ. लिन यांच्याविरुद्ध बंड करणारा होता. अंततः तो एका मुली बरोबर पळून गेला. मी त्याला पुन्हां कधीही पाहिला नाही. परंतू रॅकने फार्मासिस्टचे शिक्षण घेतले. पण त्याला हे आवडत नाही, त्यामुळे तो तालबूत सेमीनरीत गेला आणि सुवार्ताप्रचारक झाला. तो माझा खूप जवळचा मित्र आहे. मी त्याच्या लग्नात सर्वात महत्वाचा व्यक्ति होतो. आमच्या एका सभेत त्याने येशूवर विश्वास ठेवला. त्यानंतर तो लिहतो की, “कांही वर्षानी माझ्या पालकांच्या तारणाचे प्रतिफळ दिसले...मी साक्षीदार आहे की माझे बाबा शिकले व शब्बाथशाळा शिक्षक झाले, त्यानी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडला आणि मंडळीच्या वाढीत सहभाग घेतला.”

II. दुसरे, योनाचे दुःखसहन.

“पण परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून योना तार्शीशास पळून जाण्यास निघाला तो याफोस गेला; तेथे त्याला तार्शीशास जाणारे जहाज आढळले; त्याने त्याचे प्रवासभाडे दिले व परमेश्वराच्या दृष्टिआड व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर तार्शीशास निघून जाण्यासाठी तो शहरात जाऊन बसला. तेव्हां परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले” (योना 1:3-4).

पाहा. योनाला माहित होते की हे तुफान देवाकडून आहे.

“तो त्यांना म्हणाला, ‘मला उचलून फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे’” (योना 1:12).

शेवटी खलाशानी योनाला घेतले व समुद्रात टाकून दिले, आणि मग खवळलेला समुद्र शांत झाला.

“परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता; योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता. माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली” (योना 1:17-2:1).

सुरुवातीला ह्यावर विश्वास ठेवणे मला कठीण गेले. पण नंतर मी पाहिले की ही जी घटना आहे ती येशूच्या सारखी आहे, जो वधस्तभावर मरण पावला, पुरला गेला, आणि मरणातून तिस-या दिवशी पुन्हा उठला.

योना व हा मोठा मासा ह्याविषयी डॉ. एम.आर. डेहान जे म्हणाले ते मी वाचले. डॉ. डेहान असे म्हणाले की योना माशाच्या पोटात मेला होता. डॉ. जे. वरनॉन मॅक गी म्हणतात,

खरेतर हे पुस्तक पुनरुत्थानाची भविष्यवाणी संबंधाने आहे. स्वतः प्रभू येशू म्हणाला की जसे की योना हा निनवेसाठी चिन्ह होता, तसा हा त्याच्या पीढीस त्याच्या मरणातून पुन्हा उठण्यासंबंधआने चिन्ह आहे...योनाचे हे छोटेसे पुस्तक प्रभू येशूच्या पुनरुत्थानासंबंधी दर्शविते व शिक्षण देते (थ्रु द बायबल, योनाचे मरणातून पुनरुत्थानावरील नोंदी, आवृत्ति III, पृष्ठ 739).

योना 1:17 कडे पाहा.

“परमेश्वराने योनाला गिळण्यास एक प्रचंड मासा सिद्ध केला होता; योना त्या माशाच्या पोटात तीन दिवस व तीन रात्री होता”(योना 1:17).

योनाच्या पुस्तकातील सर्वात महत्वाचे शब्द पाहा, शेवटचे तीन शब्द योना 2:9,

“तारण परमेश्वरापासून होते” (योना2:9b).

मी येथे थांबतो आणि मोठ्या माशाच्या पोटातील योनाच्या दुःखासंबंधी माझे विचार मांडतो.

काल रात्री मी योनाचे पुस्तक वाचीत असतांना, मला यापूर्वी कधीही आला नाही तो विचार मला सुचला. सर्वसामान्यपणे असा विचार करतात की बाह्य परिस्थीतीवरुन संजीवन “प्रकाशित” होते. कित्येक सु-परिचित प्रचारक असे म्हणतात की कोरोना व्हायरस संजीवन “प्रकाशित” करील. माझा यावर अजिबात विश्वास नाही!!! हा विचार फिनीने केला, जो पूर्णतः चुकीचा आहे.

परंतू संजीवनाचे खरे वास्तव हे आहे — तो प्रकाशित होते (सध्या मला नव-सुवार्तिक ह्या शब्दाची घृणा वाटते) — संजीवन देव स्वतः “प्रकाशित” करतो, “तारण परमेश्वरापासून होते” (योना 2:9b).

पण येथे जे कांही त्या रात्री मी पाहिले — संजीवनाचा महान इतिहास वाचतांना, आम्हांला कळून आले की जे मोठे संजीवन आले ते पुढा-यांच्या दुःखसहनाद्वारा आले. मला माहित असलेल्यांची कांही नावे सांगतो.

जॉन वेस्ली – पहिल्या महान जागृतीपूर्वी त्यांनी सहन केलेली कांही दुःखे सांगतो. एक मिशनरी म्हणून ते जॉर्जियामध्ये अपयशी ठरले. त्यांना सैतानाशी सामना करावा लागला. त्यांचा पुतळा जाळण्यात आला. ते जवळजवळ मृतवत झाले. त्यांचे मित्र जॉर्ज विटफिल्ड यानी त्यांच्याशी नातेसंबंध तोडले. त्यांच्या स्वतःच्या पंथीय लोकांनी त्यांची निंदा केली. त्यांची त्यांच्या वडीलांच्या मंडळीत निंदा केली गेली आणि तेथील पाळकाने त्यांना प्रभू भोजन नाकारले. ज्या महलेशी त्यांनी लग्न केले तिने त्यांचे केस ओढले व त्यांना सोडून दिले. त्यानंतर वेस्लीनी स्वतःच्या पेंटॅकॉस्टचा अनुभव घेतला! त्यानंतर केवळ त्यांनी स्वतःच्या पेंटॅकॉस्टचा अनुभव घेतला! गोठावणा-या थंडीत हजारो लोक त्यांचा उपदेश ऐकायला उभे राहत. त्यांचे जीवन व कार्य राजाच्या वकीलाने सांगून ठेवले आहे: “कोणत्याही एका व्यक्तीने एवढ्या संख्येच्या लोक मनावर प्रभाव टाकलेला नाही. कोणताही एका आवाजाने अशाप्रकारे अनेकांच्या हृदयाला स्पर्श केलेला नाही. इंग्लंडसाठी अशाप्रकारचे कार्य कोणीही केलेले नाही.” एक प्रकाशनाने म्हटले की, प्रेषिताच्या काळापासून सध्याच्या काळात जॉन वेस्ली हे “एक सर्वात सामर्थ्यशाली सुवार्ताप्रचारक आहेत.”

मेरी मॉन्सेन – चीनमध्ये संजीवन येण्यासाठी तिने उपवास व प्रार्थना सुरु केली. सैतानाने तिला खाली पाडले व तिच्या शरीरावर नागीन आजार झाला. ती कोणतीही मदत किंवा पाठींब्याविना, एकाकी, एकहाती महिला मिशनरी होती जिने आपल्या प्रार्थनेने संजीवन आणले जे आजही चीनमधील गृहमंडळ्यातून आहे.

जोनाथन गोफोर्थ – ते आणि त्यांची पत्नी चीनला गेले जेथे त्यांना भयंकर छळ झाला. त्यांची चार लेकरें मरण पावली. मि. गोफोर्थ दोनदा जवळजवळ मेलेच होते. त्यांना त्यांच्या मृतदेहांस ख्रिस्तीपणाने मूठमाती देण्यासाठी बैलगाडीतून 12 बारा तास प्रवास करावा लागला. मला वाटते मिसेस गोफोर्थ व त्यांच्या मुलांना किती भयंकर जाच सहन करावा लागला हे तुम्हांला सांगण्यास माझ्याकडे वेळ हवा होता. जेव्हां त्यांचे लेकरु कॉन्स्टेंस वारले, “आमच्या लहानग्या कॉन्स्टेंसला त्याच्या बहिणीच्या वाढदिवशी, 13 ऑक्टेबर, 1902 रोजी तिच्या कबरेच्या बाजूलाच पुरले.”
     केवळ त्यानंतरच गोफोर्थ यांच्या सभेत देवाच्या संजीवनाचा अग्नि खाली उतरला. प्रार्थनेकरिता संधी दिली होती. मिसेस गोफोर्थ म्हणाल्या, “वादळाच्या अचानकपणा व क्रौरता यातून हे आले...त्यामुळे येथे प्रार्थनेचे वादळ आहे. तेथे त्यास निर्बंध नव्हता, आणि तो करण्याचा प्रयत्न नव्हता...जसे की स्त्री व पुरुष देवाच्या सामर्थ्यात येत होते...कांहीजण जे देवापासून खूप दूर भरकटलेले होते असे, सार्वजनिकरित्या आपल्या पापाचा अंगिकार करुन त्याच्याकडे परत आले होते...तेथे कोणताही गोंधळ नव्हता. संपूर्ण मंडळी प्रार्थनेत ऐक्याने जोडली होती...आम्ही गुडघ्यावर आल्यानंतर थेट सभेला जात होतो, आणि, वाह, त्याच्या हर्ष व महिमा!...आम्ही आमची मस्तके लववून देव आम्हांला काय सांगतो ते ऐकणे एवढेच आम्ही करु शकत होतो, ‘स्तब्ध राहा व जाणून घे की मी देव आहे.’ आता आम्ही शिकलो आहोत की ‘हे आमच्या बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी होते, असे परमेश्वर म्हणतो.’
     मोठा समुदाय, 700 पेक्षा जास्त, आपल्या पापाचा अंगिकार करण्यास पुठे गर्दी करीत होते...सभा समाप्त करण्यास मोठी अडचण येत होती. प्रत्येक सभा तीन तास चाले. खरेतर, प्रत्येक सभा ही दिवसभर चाले...गोफोर्थ यानी दिलेला एक छोटासा उपदेश हा ह्या आरंभापासून पुढे कोठेतरी प्रत्येकाच्या चांगल्या जीवनाचा अनुभव घेण्यास उपयोगी पडतो. हे अगदी प्रेस्बिटेरियन, सामान्यतः नियंत्रित होते, नंतर एक शक्तीशाली प्रेस्बिटेरियन प्रचारक, कृपेकरिता हाक मारीत... जो एकटाच आपल्याच खोलीत, मोठा खेदाने आत्म्यात विव्हळत आढळला.” मिसेस गोफोर्थ म्हणाल्या, “अशाप्रकारच्या प्रार्थना — ज्या सरळ, व साध्या, खात्रीदायक अशा होत्या! अशाप्रकारचे वातावरण निर्माण करण्यास हे प्रेरणादायी आहे!”
     “गो-या मिशन-यांनी त्यांच्या चीनी बंधूबरोबर आपले दोष व पातके आणि उणे-पणा अंगिकार करण्यात भाग घेतला. सर्वांना एकत्रित आणण्याची ही वेळ होती — चीनी ते चीनी, मिशनरी ते चीनी, आणि हे सर्व कारण ते ख्रिस्तात एकसंघ झाले होते. आणि ख्रिस्त आपल्या सगळ्यांना म्हणतो आहे, ‘त्या सगळ्यांनी एक व्हावे...जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, ह्यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे.’”

आमच्या जुन्या मंडळीत आमच्या कांही सभा होत्या की ज्या बाहेरील डॉ. गोफोर्थ यांच्या चीनमधील सभासारख्या दिसत होत्या. मी “बाहेरील” मुद्दाम म्हणालो. परंतू आमच्या मंडळीतील बरेच “पुढारी” पापांगिकर करतांना देवाशी खोटे बोलत होते. अशाप्रकारे. जसे की डॉ. टोझर म्हणाले, त्यांनी दोन पातके केलीत—खोटे बोलण्याचे पाप, आणि देवाच्या नावात खोटे बोलण्याचे पाप! क्रिघटन हे डॉ. कागेन यांच्याशी खोटे बोलले जेव्हां ते म्हणाले की “परिपूर्ण” होण्यास त्यांना “प्रचार” करण्याची गरज नाही. अशाप्रकारे हा दुःखी छोटासा मनुष्य यहुदासारखा झाला, ज्याने ख्रिस्ताचा विश्वासघात केला, पेत्रासारखा ज्याने गंभीरपणे पश्चाताप केला.

जोनाथन गोफोर्थ यांच्याद्वारा झालेले खरे संजीवन हे डॉ. तिमथी लिन, यांच्याद्वारा झालेल्या 1960 च्या शेवटात पहिल्या चीनी बॅप्टिस्ट मंडळीतील मी पाहिलेल्या ख-या संजीवनासारखेच होते, जेथे “आम्याच्या वरदानांवर” भर दिला जात नसे — परंतू गंभीररित्या केलेला पश्चाताप व प्रार्थना यावर दिला जात असे. खेदाने, मला मात्र, ही “खातरी व पश्चाताप” भावनिक वाटे — पण गंभीररित्या केलेले नाही. ह्याचे मला अजूनही आश्चर्य वाटते की क्रिघटन व ग्रीफिथ सारख्या लोकांना वाटते ते देवाला फसवू शकतात!!! किती आंधळेपणा हा!!!

कांही रात्रींपूर्वी मी हा उपदेश स्नानगृहात लिहत असतांना, मी बाथटबच्या काठावर बसलो होतो. एका क्षणी मी माझे डोके टबच्या तळाला घासत, आमच्या बाथटबमध्ये पाठीवर पडलो. तेथे मी माझे पाय सरळ करुन पडलो. मी वळवळ न करता स्थीर राहण्याचा प्रयत्न केला, पण मी करु शकलो नाही. मी तेथे टबमध्ये पडलेलो असतांना, मी टबमध्ये अडकलो, मला वाटले माझी मान मोडली. पण मी माझे पाय हलवू शकलो, त्यामुळे मला कळाले की माझा मणका मोडलेला नाही.

अशा भयंकर स्थितीत मी पडलो असतांना, सैतान मला म्हणाला की आमच्यामध्ये कधीही खरे संजीवन येणार नाही. त्याचवेळी मला देवाने दाखविले की वेस्ली, मारी मॉन्सेन, आणि जोनाथन, आणि जॉन संग यांच्यासारख्या सेवक यांनां मोठ्या परिक्षेतून जावे लागले त्यानंतरच इतिहासातील मोठे संजीवन आले, जसा की योना हा मोठ्या माशाच्या पोटात राहिला, अशाप्रकारच्या संजीवनाने त्यांच्यावर देव विश्वास करण्यापूर्वी. आता आपल्यामध्ये खरे संजीवन आहे? कदाचित असेल. पण आम्ही खूप गंभीर व विश्वसनीय असलो पाहिजे, अन्यथा देव खरे संजीवन पाठविणार नाही, ज्यासाठी आपणांपैकी कित्येकजण सर्व वर्षे प्रार्थना करीत असतील!

योना प्रमाणेच, पास्टर रिचर्ड वुरब्रँड हे 14 वर्षे कमुनिष्टांच्या तुरुंगवासात माशाच्या पोटातल्या प्रमाणे राहिले. त्यांनी 14 वर्षे कोणासही न बघता पण, अंधारकोठडीत कमुनिष्टांचा छळ सोशीत व्यतित केली. देवाने वुरब्रँड ह्यांना सर्वांतून का जायला लावले? तुम्ही त्यांचे पुस्तक वाचले तर तुम्हांला दिसेल की देवाने त्यांच्या ह्या तुरुंगवासाचा उपयोग प्रेमळ व गंभीर होण्यास केला. रिचर्ड वुरब्रँड यांच्या इतका गंभीर माणूस मी अजून पाहिला नाही. तरुंगातून सुटल्यानंतर संपूर्ण जगाशी कसे गंभीरपणे बोलावे ते हे ह्या एकांतवासात शिकले. क्रिघटन व ग्रिफिथ सारखी छोटी माणसे कधीच गंभीर नाहीत. ते देवाशी सुद्धा लबाट बोलतात. ते जे पापाची “कबुली” देतात त्याला कांही अर्थच नसतो.

जॉन वेस्ली, मारी मॉन्सेन, आणि जोनाथन गोफोर्थ ह्या गंभीर लोकांना पाहणे खूप सोपे आहे, ते शुल्लक नाहीत. तसाच योना सुद्धा होता!

डॉ. ए. डब्लू. टोझर म्हणाले, “आपण हे करण्यास मुर्ख असू तर, देवा संजीवन पाठीव अशी मागणी करण्यास वर्षे वाया घालवू, तसेच आपण आंधळेपणाने त्याच्या गरजेकडे दुर्लक्ष करु व त्याच्या आज्ञाभंग करीत राहू. किंवा आपण त्याच्या आज्ञापालन करण्यास व त्या आज्ञापालनाचा आशिर्वाद घेण्यास शिकू. देवाचे वचन आपणां समोर आहे. त्यात जे लिहले आहे ते आपण वाचू व त्याप्रमाणे करु शकतो आणि संजीवन...हे आपोआप येईल जसे की बी पेरल्यावर व मशागत केल्यावर हंगाम येतो” (“व्हाट अबाउट रिवायव्हल?— भाग I”). गंभीरता ज्याचा शोध देव आपल्यात घेतो!


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.


रुपरेषा

योना — संजीवन करणारा संदेष्टा !

JONAH – THE PROPHET OF REVIVAL!

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा,
पास्टर इमिरटस्

“अमित्तयाचा पुत्र योना ह्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा व त्याच्याविरुद्ध आरोळी कर; कारण त्याची दुष्टता माझ्यापुढे आली आहे” (योना 1:1, 2).

(II राजे 14:25; मत्तय 12:39-41; लुक 11:29-30)

I.   प्रथम, योनाचे पाचारण, योना 1:1, 2, 3; फिलिप्पै 4:13; मत्तय 10:34-39.

II.  दुसरे, योनाचे दुःखसहन, योना 1:3-4, 12; 1:17-2:1;1:17; 2:9b.