Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.उपदेशापूर्वी उपासना गीत गायले: “उंच भूमि” (जॉन्सन ओटमन यांच्याद्वारा, ज्युनि.,1856-1926)


कोरोना वायर`स आपणांस थांबवू शकेल?

SHALL THE CORONAVIRUS STOP US?
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा,
पास्टर एमिरीट्स
by Dr. R. L. Hymers, Jr.,
Pastor Emeritus
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी दुपारी,
10 मे, 2020 रोजी दिलेला उपदेश
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, May 10, 2020


लुक 21:8-11पाहूया.

“तो म्हणाला, तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा; कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन मी तो आहे आणि काळ जवळ आला आहे असे म्हणतील; त्यांच्या नादी लागू नका. आणि जेव्हां तुम्ही लढाया व दंगे ऐकाल तेव्हां घाबरु नका; कारण ह्या गोष्टी प्रथम ‘होणे अवश्य आहे’ तरी एवढ्यात शेवट नाही. मग त्यानें त्यांना म्हटले, राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल; मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजागी म-या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील” (लुक 21:8-11).

आता मत्तय 24:4-8 कडे वळूया.

“येशूने त्यांस उत्तर दिले, तुम्हांस कोणी फसवू नये, म्हणून सावध असा. कारण पुष्कळ जण माझ्या नांवाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळांस फसवितील. तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरुन जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण असे होणे अवश्य आहे. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील; पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत” (मत्तय 24:4-8).

ह्या उता-यातील एका शब्दाकडे म्हणजे − “पेस्टीलेन्सेस.” नंतर मत्तय 24:8 कडे लक्ष द्या, “पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत.”

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता शब्द “पेस्टीलेन्सेस” हा महत्वाचा आहे, तो ग्रीक मध्ये लोइमोइ (अनेकवचनी) असा आहे. अंजरचे पवित्रशास्त्र समालोचन म्हणते की तो शब्द “महामारीसाठी...वापरलेला आहे.” येशूने एड्सच्या महामारीविषयी अगोदर सांगून ठेवले. हा शब्द कोरोना वायरसच्या महामारीविषयी सुद्धा बोलतो. वचन 8 मध्ये, ख्रिस्ताने ह्या महामारीविषयी काय सांगितले ते पाहा, “ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत” (मॅक्आर्थर).

आमच्या काळात बोलतांना, जे. एन. डर्बी म्हणाले, “तेव्हां तेथे खोटी मंडळी असेल, तेथे दुष्काळ, महामारी, भूमिकंप होईल.” वाईन्स एक्स्पोझीटरी डिक्शनरी महामारीची व्याख्या सांगतांना म्हणते, “आजार पसरविणारा कोणताही संसर्ग, लुक 21:11 मध्ये अनेकवचनी स्वरुपात आहे.”

आता समजून घ्या की कोविडच्या महामारीमध्ये लोक “मंडळीत” उपासना कशी करतील onenewsnow.com वरील (24 एप्रिल, 2020) चा एक “कोविडच्या संकट काळात लोक “मंडळीत” उपासना कशी करतील? या नावाच्या कार्यक्रमाचा अहवाल आला.” तो असा म्हणतो की पुष्कळ लोक “ऑनलाइन उपासना करतील.” तो असा म्हणतो की “मंडळीची जीवनशैली ही ह्या महामारी नंतर पूर्णतः बदलून जाणार आहे ती पूर्वीसारखी राहणार नाही.” “42% लोक म्हणतात महामारीच्या पूर्वी पेक्षा आता देणे हे अतिशय वाईट आहे.” “चिंता करणा-या मंडळीच्या पुढा-यांमध्ये हा लॉकडाऊन संपल्यानंतर काय होणार ह्याची मोठ्या प्रमाणात भीति आढळते.” “मोठ्या मंडळीस जाणा-या लोकांचा एक मोठा भाग, विशेषतः अमेरिकेतील मंडळीच्या पुढा-यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीति आढळून येते.” “वर्तणूक शास्त्रज्ञ म्हणून, ‘दृष्याच्या जागी’ अधिक असण्याच्या शक्यतेवर आपण विश्वास ठेवतो – आणि तशी अनेक पाळकांस काळजी असते.” “मागणी प्रमाणे उपलब्धता... अशी अपेक्षा करण्यास लोकांस संस्कृति शिकविते.”

सेवेमध्ये मागील 62 वर्षे खर्च केल्यानंतर, मला विश्वास आहे की ही भीति अगदी जमीनी-स्तरावरील आहे. मला वाटते II थेस्सल 2:3 मध्ये सांगितलेल्या भविष्यवाणीनुसार हा शेवटच्या-काळातील भाग आहे, “कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन” (हे अपोस्टासिया – विश्वासाचा त्याग). डॉ. मेरिल एफ. अंगर म्हणतात, “कांही प्रमाणात विश्वास त्याग हा संपूर्ण विश्वासाचा त्याग करण्याचा मार्ग होय − ख्रिस्ती व्यक्तीने पूर्णतः विश्वास सोडून−दूर जाणे” (बिबिलीकल डिमॉनोलटजी, पृष्ठ 207). शास्त्रातील हे महत्वाचे वचन पाळण्यास आपण असमर्थ ठरु तर आम्ही खरे ख्रिस्ती आहोत का?

“आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा” (इब्री 10:25).

डॉ. डब्लू. ए. क्रिसवेल ह्या वचनासंबंधाने म्हणतात, “इब्रीकरांस पत्राचा लेखक जसजसा ख्रिस्ताचा दिवस जवळ येण्याचा दिसेल तेव्हां...एकत्र जमण्याचे अधिक वाढवावे...स्थानिक मंडळ्यांचे महत्व, आणि स्थानिक समाजातील पवित्रजनांशी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने विश्वासू राहिले पाहिजे” (द क्रिसवेल स्टडी बायबल, इब्री 10:25 वरील टिपण्णी).

माझा विश्वास आहे की जसजसा ख्रिस्ताच्या दुस-या आगमनाचा काळ जवळ येतो आहे, ही वचने आजच्या काळात अधिक अर्थपूर्ण आहेत. नवीन-सुवार्तिकवादी हे वचन पाळत नाहीत. जसजसे आपण महासंकटाच्या काळाकडे जात आहोत तसतसे हे अधिक नाकारले जाईल. सैतानाला ठाऊक आहे की ख-या ख्रिस्ती लोकांना अधिक दुर्बळ करण्यासाठी त्यांना त्यांच्या स्थानिक मंडळ्यापासून दूर ठेवावे लागेल, म्हणजे ते शेवटी ख्रिस्त विरोधकाच्या स्वाधीन होतील.

डेव्हिड जरमियाह सारखे लोक स्थानिक मंडळ्यामंध्ये अधिक उपस्थिती असावी ह्यासाठी आग्रही नाहीत याचे मला दुःख होते. महासंकटास सामोरे जाण्याची तयारी कशी करावी हे सांगण्यास डॉ. जरमियाह अपयशी ठरलेत.

आता मत्तय 24:6-8 याकडे वळा.

“तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरुन जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण असे होणे अवश्य आहे. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील; पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत” (मत्तय 24: 6, 7, 8).

“अजून हा शेवट नव्हे” (24:6).

“कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील; पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत” (मत्तय 24: 7, 8).

“ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत” (24:8).

मी डॉ. जे. वरनॉन मॅकगी यांच्याशी सहमत आहे की 24:9 हे महासंकटाचा आरंभ आहे. डॉ. ए. डब्लू. टोझर म्हणाले,

“खरोखर दे दिवस दुष्टतेचे व काळ अधिक लांबतोय (वाढतोय), परंतू खरे ख्रिस्ती बेसावध आढळत नाहीत. अशा काळासंबंधाने त्याला आधीच सुचित करण्यात आले आहे व त्याची तो वाट पाहतोय” (“ऑफ गॉड अँड मेन,” पृष्ठ 131).

कृपया उभे राहा व मत्तय 24:7-14.

“तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरुन जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण असे होणे अवश्य आहे. कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील; पण ह्या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. तेव्हा तुमचे हाल करण्याकरिता ते तुम्हांस धरुन देतील व तुम्हांस जिवें मारतील आणि माझ्या नावांमुळे सर्व राष्ट्रें तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण अडखळतील, एकमेकांस धरुन देतील, व एकमेकांचा द्वेष करतील; पुष्कळ खोटे संदेष्टे उठतील व अनेकांस फसवितील; आणि अनीति वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीति थंडावेल; परंतू जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगांत गाजविली जाईल तेव्हां शेवट होईल” (मत्तय 24:7-14).

आता मला तुम्हांला सांगू द्या की महासंकट काळापूर्वी वर उचलले जाणार यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास आहे की वर उचलले जाणे हे देवाचा क्रोध ओतला जाण्यापूर्वी होणार. अशाप्रकारे, सर्वसामान्यपणे, मंडळीचे वर उचलले जाणे हे देवाच्या−क्रोधापूर्वी होणार असा माझा विश्वास आहे, जसे की मार्विन रोसेंथल त्यांचे पुस्तक द प्रि-व्रॅथ राप्चर ऑफ द चर्च (थॉमस नेल्सन पब्लिकेशन्स, 1990) मध्ये म्हणतात. प्रथम रोसेंथल यांचे पुस्तक वाचण्यापूर्वी त्यावर भाष्य करु नका.

मार्विन जे. रोसेंथल, माझ्या प्रमाणेच, मंडळीचे वर उचलले जाणे हे देवाच्या−क्रोधापूर्वी होणार असा विश्वास धरणारे आहेत. त्यांच्या पुस्तकात, मि. रोसेंथल शिकवितात, की प्रकटीकरण 16 व्या अध्यायातील क्रोधाच्या वाटीच्या न्यायापूर्वी मंडळीचे वर उचलले जाणे होणार नाही. अशाप्रकारे, मी वर उचलले जाणे यावर विश्वास ठेवतो, परंतू प्रकटीकरण 16 व्या अध्यायातील क्रोधाच्या वाटीच्या न्यायापूर्वी होणार नाही. हा माझा पाखंडपणा नाही, परंतू ख-या अर्थाने पवित्रशास्त्र जे सांगते तेच आहे. महान चीनी सुवार्तिक जॉन संग यावर विश्वास ठेवतात. माझे मार्गदर्शक व गेली 24 वर्षे पाळकीय सेवा करणारे, डॉ. तिमथी लिन सुद्धा असा विश्वास ठेवतात. डॉ. ख्रिस्टोफर एल. कागन सुद्धा असा विश्वास ठेवतात.

रोसेंथल बरोबर आहेत? मला वाटते ते बरोबर असण्याच्या अगदी जवळ आहेत. रोसेंथल यांच्याशी असहमत होण्यापूर्वी, तुम्ही त्यांच्या पुस्तकातील सोळावा पाठ वाचायला हवा, “आगमन व शेवट.”

ह्या उपदेशाच्या पाठीमागचा माझा उद्देश हा आहे की आपण “ख्रिस्ती” आहोत तर महासंकटाच्या दिवसांपूर्वी अशाप्रकारच्या “महामारीच्या” ओझ्याखाली राहू नये, राहिले तर त्या महासंकटाच्या काळात ते कसे उभे राहतील?

“कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही,’ व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे ‘संकट’ त्या काळी येईल; आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतू निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील” (मत्तय 24:21, 22).

ही वचने “महासंकट” दर्शविते. डॉ. जे वरनॉन मॅकगी म्हणतात, “आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकात वाचतो की महासंकटाच्या काळात पृवीवरील एक तृतियांश लोकसंख्येचा नाश होणार...त्या काळात हा महासंहार होणार. असा काळ होता जेव्हां अशाप्रकरे होईल ही अतिशयोक्ती वाटत असे. तथापि, आता पुष्कळ राष्ट्रांकडे अण्विक बॉम्ब आहेत, जे जगातील बहुतांश लोकसंख्येचा नाश करु शकते, आता ही अतिशयोक्ती राहिली नाही” (थ्रु द बायबल; मत्तय 24:22 वरील टिपण्णी).

येशू म्हणाला, “दानिएल संदेष्ट्याच्या द्वारे सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्रस्थानात’ उभा असलेला तुम्ही पाहाल, (वाचकाने हे ध्यानात आणावे)” (मत्तय 24:15). डॉ. मॅकगी म्हणतात, “ख्रिस्तविरोधकाची प्रतिमा...आपला प्रभू अगदी अचूक संदर्भ देत आहे (पाहा दानिएल 12:11) ज्याची [पुनर्निर्माण] केलेल्या मंदिरात स्थापना केली जाणार आहे.” .”

“कारण ‘जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत आले नाही,’ व पुढे कधीहि येणार नाही असे मोठे ‘संकट’ त्या काळी येईल; आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाहि मनुष्याचा निभाव लागला नसता; परंतू निवडलेल्यांसाठी ते कमी केले जातील” (मत्तय 24:21, 22).

डॉ. मॅकगी म्हणाले, “त्यामुळेच ह्या एवढ्या थोडक्या काळात. देव मनुष्यांस आत्मघात करु देत नाही.” (मॅकगी, ibid., मत्तय 24:22 वरील टिपण्णी). लक्षात घ्या येथे “निवडलेले” ख्रिस्ती सुद्धा असणार, जसे की मार्विन जे. रोसेंथल त्यांचे पुस्तक द प्री-व्रॅथ राप्चर ऑफ द चर्च मध्ये म्हणतात.

आता कृपया II थेस्सल. 2:3 कडे वळा.

“कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरुष प्रगट होईल” (II थेस्सल. 2:3).

“प्रथम विश्वासणारे त्याग करतील” (आधुनिक अनुवाद).

ह्या काळात पुष्कळ सुवार्तिक सुद्धा विश्वास त्याग करतील, जसे की क्रिगटन आणि वाल्ड्रीप यांच्या सारखे, I तिमथी 4:1, 2 येथे दिलेला इशारा विसरला. I तिमथी 4:1, 2.

“आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील; त्या माणसांची सद्सद्विवेकबुद्धि तर डाग दिल्यासारखीच आहे, अशा खोटे बोलणा-या माणसांच्या ढोंगाने ते फुसलाविणा-या आत्म्यांच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील” (I तिमथी 4:1,2).

त्यांनी ही भविष्यवाणी विसरल्यांने, ते फुसलाविणा-या आत्म्यांच्या, व सैतानाच्या (भूतांच्या) शिक्षणाच्या नादी लागलेत; ढोंगीपणाने खोटे बोलतात; त्यांची सद्सदविवेकबद्धि गरम इस्त्रीने डाग दिल्यासारखी झाली आहे.” त्यामुळेच त्यांच्यासारखे लोक मंडळीत फूट पाडतात. का? कारण ते अंधळेपणाने “सैतानाच्या शिक्षणाकडे लक्ष देतात”, त्यामुळेच!

मंडळीत फूट पाडतात अशा “पुढा-यांची” येथे कांही वैशिष्टें पाहा. ही डॉ. रॉय ब्रॅन्सन, यांनी त्यांचे पुस्तक, मंडळीची फूट (पृष्ठ 29-31) यामध्ये दिली आहेत.


1.  ते गर्विष्ठ असतात. कोणालाही, पाळकांना सुद्धा, ते त्यांच्या पेक्षा शहाणे आहेत हे सांगावयास इच्छूक असतात.

2.  ते स्वार्थी असतात. त्यांना आपल्या मार्गानीच जायला आवडते, मग त्याचा कोणालाही किंवा त्याच्या परिणामाचा कसलाही त्रास झाला तरी हरकत नाही.

3.  त्यांची चूक ते कबूल करु इच्छित नाहीत. गर्विष्ठपणाचे आणखी एक चिन्ह.

4.  ते वैयक्तिक प्रसिद्धी व कौतुकास भुकेले असतात.

5.  ते स्वतःला मोठे समजतात. पालन करण्याकरिता पाळकाचे अधिकार व त्यांच्या सुचना यापेक्षा पवित्रशास्त्रातील शिक्षणात स्पष्टता नाही. ते म्हणतात की ते ख्रिस्ताशी एकनिष्ठ आहेत. ते म्हणतात पाळक हा क्रूर जुलमी आहे.

6.  ते फसवणूक करणारे असतात. ते मंडळीची काळजी करण्याचे ढोंग करतात. खरेतर ते स्वतःच्या वर्चस्व व रुदबा याची काळजी करतात.

7.  ते शब्दांचा दुरुपयोग करतात, “ मी पाळकावर प्रेम करतो, परंतू...” नंतर ते पाळकावरच हल्लाबोल करतात.

8.  ते पाळकास चुकीचे प्रस्तुत करतात, किंवा त्यांच्या शब्दासंबंधाने चुकीचा उद्देश धरतात

9.  पाळक जे कांही करतो त्याचा चुकीचा उद्देश पकडतात.

10. ते शिक्षणाचा स्विकार करीत नाहीत. पवित्रशास्त्र जे सांगते त्याच्या “विरुद्ध तार जुळलेली” असते.

11. पाळकाविरुद्ध इतर लोक तक्रार करतात याचे महत्वाचे कारण हे लोक असतात. अशाप्रकारे, ते मंडळीच्या होणा-या फूटीसाठी सहयोग करतात.


ही सर्व वैशिष्टें क्रिगटन/वालड्रीप फूटी दरम्यान आढळून आलेली आहेत.

मी जेव्हां प्रचार केला तेव्हां मी उभा राहू शकलो नाही. हा उत्साही क्रिगटन. खरेतर लाजाळू मनुष्य आहे, पण त्याला मी मुख्य प्रचारक होऊ दिले नाही त्यामुळे तो माझ्यावर रागावलेला होता. तो पुन्हां पुन्हां म्हणाला की तो नाराज नाही. त्याने लिहून डॉ. कागन ह्यांनाही सांगितले की “समाधान व्हावे” म्हणून त्याला प्रचार करण्याची गरज नाही. मी त्याला प्रचार करु दिले नाही कारण ते करण्यास लागणारे दान त्याच्याकडे नाही. तो माझ्याशी सहमत आहे असे तो म्हणाला. पण असे म्हणताना खोटे बोलला. इतर तरुणांसारखेच त्याचेही त्याच्या वडीलांसोबत चांगले नातेसंबंध नव्हते. त्यामुळे, मी आजारी पडलो तेव्हां, त्याने माझ्यासह त्याच्या वडीलांविरुद्ध बंडाचा झेंडा उभारला. पण त्याने हे गुप्तपणे केले. माझ्याशी बोलण्याऐवजी, त्याने दुसरे प्रचारक, वालड्रीप यांच्याबरोबर गुप्त भेटी घेतल्या. त्याने वालड्रीप यांच्याबरोबर घेतलेल्या भेटीची मला कांहीच कल्पना नव्हती. ह्या “गुप्त” भेटींचा वालड्रीप हा त्याचा सहकारी बनला.

क्रिगटन हा मंडळीतील इतर लोकांना त्याचे माझ्याशी पटत नाही हे सांगू लागला. परंतू त्याने त्याच्या ह्या असहमती विषयी मला कधीच सांगितले नाही. दरम्यानच्या काळात मी क्रिगटनच्या बंडखोरी बद्दल मी ऐकले पण तोवर खूप उशीर झाला होता. त्याने आमच्या मंडळीतील एकतृतियांश तरुणांना वेगळे करुन त्याने त्याची वेगळी “मंडळी” सुरु केली. आमच्याबरोबर केवळ निष्ठावान 35 लोक राहिले.

फूटीच्या वेळी, मी 80 वर्षे वयाचा झालो होतो, आणि आजारी होतो. अशा प्रकारच्या परिस्थीतीतून पूर्वी मी गेलो असल्याने, मला माहित होते की देव माझ्यासोबत अजूनही राहणार, त्यामुळे त्याची मी फारशी काळजी केली नाही.

एक डीकन माझ्याशी बुक्क्या मारुन भांडण्याचा प्रयत्न करु लागला. आणखी एका डिकनने आपले स्वतःचे व एका बाईची अश्लिल चित्रे संकेतस्थळावर टाकली. आणखी एक पुढारी म्हणाला की मी आपल्या मंडळीतील काळ्या लोकांविरुद्ध असहिष्णूपणे वागलो. आणखी एक पुढारी म्हणाला की मी LGBTQS ह्या लोकांकडून होणा-या हल्ल्यामुळे रस्त्यांवरील प्रचार बंद केला, जो कुठल्याही प्रकारे मदत करीत नव्हता.

ह्या स्रव् गोष्टी बाहेर आल्या तेव्हां, मी पाळकीय पदाचा राजीनामा दिला व डॉ. कागन पाळक म्हणून नियुक्त केले. त्यांचा स्वतःचा मुलगा, ज्याला मी आमचा पुढील पाळक समजत होतो, तोही सोडून गेला, तसेच मी त्याला माझा जवळचा मित्र समजतो होतो.

आणि मग कोरोनाचा विषाणू आला! त्यामुळे आम्ही जुन्या मंडळीतून निघून घरामध्ये सभा घेऊ लागलो, माझ्यासह, पास्टर म्हणून एमिरीट्स, दर रविवारी घरातून टी.व्ही. वर उपदेश देऊ लागला.

लॉस एंजिल्सच्या उपनगरामध्ये आम्ही मंडळीसाठी नवीन इमारत खरेदी केली. मी स्वतः प्रचार करु शकत नसल्यामुळे माझी जागा घेण्यास एका चीनी तरुणास मी प्रोत्साहन देत राहीन.

सैतान व मंडळीतील फूट यावर प्रचार केल्याने माझ्यावर टिका झाली, परंतू “तिस-या- जगतातील” श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला ज्यानी 43 भाषेतून संपूर्ण तिस-या जगात माझा उपदेश वाचण्यात आला. “तिस-या-जगतात” तसेच अमेरिकेतही मंडळीतील फूटी घडत असताना, हा माझा उपदेश त्यांना तसेच आम्हांलाही साहाय्यभूत ठरेल असे मला वाटते. जसे की आम्ही नवीन चीनी मंडळी सुरु केल्याने ह्या विषयावर मी बोलावे अशी देवाची इच्छा आहे असे मला वाटते.

मी 19 वर्षाचा असतांना चीनी लोकांमध्ये सेवा करण्यास मला मिशनरी म्हणून देवाने पाचारण केले त्याबद्दल मी देवाचा ऋणी आहे. 60 वर्षानंतर सुद्धा मला देवाने ज्यासाठी पाचारण केले ते मी आजही करीत आहे. देवाच्या कृपेने मी आजही मिशनरी आहे. काहीतरी होण्याची माझी कल्पना मी खूप वर्षापूर्वी सोडली! जॉन वेस्ली यांनी त्यांच्या प्रबंधात नमुद केलेली ही एक छोटीशी कविता पाहा,

छोटासा समारंभ, इकडे तिकडे डोलतो,
जसे की हिवाळ्यातील दिवसात एखादे सूर्यकिरण,
सर्वकाही महान व सामर्थ्यशाली आहे
पाळणा व विचारशीलता यांच्यामध्ये!

माझ्या 62 वर्षाच्या सुवार्तिक कार्यकाळात मी पुष्कळ मंडळ्या “कष्टातून” सुरु केल्या. मला खात्री आहे की देव नव्याने सुरुवात करण्यास डॉ. कागन व मला पुन्हा एकदा मदत करणार.

तरीही, हे तितकेसे सोपे असणार नाही. पण आम्ही, देवाच्या कृपेने, शेवटच्या काळातील ह्या नव्या-सुवार्तिवादाच्या नामनिर्देशविरोधी परिस्थितीत नवीन मंडळी सुरु करणार आहोत. त्यासाठी तुम्हांला कणखर मूलतत्ववादी असले पाहिजे. तुम्ही इतके कणखर असले पाहिजे की तुम्ही येशू ख्रिस्तासाठी डॉ. तिमथी लिन व पास्टर रिचर्ड वुर्मब्रँड प्रमाणे होण्यास कोरोना सारखी लहानशी गोष्टही तुम्हांला थांबवू शकणार नाही. लक्षात ठेवा, “आपणांस पुष्कळ संकटातून टिकून देवाच्या राज्यात जावे लागते”(प्रे.कृ. 14:22).

मी वर जाणा-या मार्गास जोर देत आहे, दररोज मी नवीन उंची गाठत आहे;
   तरीही वर जाण्यास बांधील राहून प्रार्थना करतोय, “प्रभू, माझे चरण उच्च स्थळी रोव.”
प्रभू, मला उंच कर व मला उभे राहू दे, विश्वासाने, स्वर्गीय मेज भूमिवर,
   मला मिळालेल्या पेक्षा, उंच भूमिवर; प्रभू, माझे चरण उच्च स्थळी रोव.

जेथे शंका व भीती वसते तेथे मला अंतःकरणापासून राहण्याची इच्छा नाही;
   तेथे काहीजण राहतील, तरी माझी प्रार्थना, माझा उद्देश, उच्च स्थळी राहण्याचा आहे.
प्रभू, मला उंच कर व मला उभे राहू दे, विश्वासाने, स्वर्गीय मेज भूमिवर,
   मला मिळालेल्या पेक्षा, उंच भूमिवर; प्रभू, माझे चरण उच्च स्थळी रोव.

जगाच्या वर मला राहायचं आहे, सैतानाच्या बाणांनी अढखळण केले तरी;
   कारण विश्वासाने आनंदाचा ध्वनी पकडला आहे, पवित्रजाणांचे गीत उच्च स्थळी आहे.
प्रभू, मला उंच कर व मला उभे राहू दे, विश्वासाने, स्वर्गीय मेज भूमिवर,
   मला मिळालेल्या पेक्षा, उंच भूमिवर; प्रभू, माझे चरण उच्च स्थळी रोव.

मला सर्वोच्च शिखर गाठायचाय आहे आणि चमकत्या वैभवाचा किरण पकडायचाय;
   पण स्वर्ग मिळेस्तोवर मी प्रार्थना करीन, “प्रभू, मला उच्च स्थळी ने.”
प्रभू, मला उंच कर व मला उभे राहू दे, विश्वासाने, स्वर्गीय मेज भूमिवर,
   मला मिळालेल्या पेक्षा, उंच भूमिवर; प्रभू, माझे चरण उच्च स्थळी रोव.
(“हायर ग्राउंड” जॉन्सन ओटमान यांच्याद्वारा, ज्युनि., 1856-1926).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.