Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




आपणासं सुवार्तिक म्हणून पाचारण आहे!

OUR CALL TO BE MISSIONARIES!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
पास्टर एमिरीट्स
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी दुपारी,
8 मार्च, 2020 रोजी दिलेला उपदेश
by Dr. R. L. Hymers, Jr.
Pastor Emeritus
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Afternoon, March 8, 2020


यशया हा, सर्वात महान संदेष्टा आहे असे, मला वाटत होते. पण यशया हा कसा काय असा देवाचा मनुष्य झाला? यशयाच्या सहाव्या अध्यायात, आपणांस याचे उत्तर मिळते.

“उज्जीया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभूला उच्चस्थळी असलेल्या सिंहासनावर बसलेले मी पाहिले; त्याच्या झग्याच्या सोग्यांनी मंदिर व्यापून गेले होते” (यशया 6:1; पृष्ठ 718 स्कोफिल्ड).

सराफिम उच्च स्वरांने, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधिश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे” असे म्हणतांना यशयाने ऐकले (यशया 6:3) .

एक चांगला व प्रतिष्ठीत राजा म्हणून, उज्जीया राजा तरुण यशयाला आवडत असे. पण आता हा चांगला राजा मरण पावला होता. असा हा चांगला राजा मरण पावला त्यामुळे आता यशयाचे काय होणार? मला वाटते ह्या तरुणांला तुमच्यापैकी कांहीजनांसारखे वाटले असेल. आमची मंडळी नामशेष झाल्याने तुम्हांला निराशा झाली असेल. परंतू यशयाच्या द्वारे देवाला असे वाटले नाही.

देवाच्या दृष्टांताने त्याच्या जीवाचा ताबा घेतला. यशया निराश गर्तेत पडला नाही. तर, देवाच्या दृष्टांताने त्याला वेगळ्या पद्धतीने ताब्यात घेतले. तो म्हणाला,

“हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो, आणि सेनाधिश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले” (यशया 6:5).

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

तरुण यशयाला हा एक पहिलाच आध्यात्मिक अनुभव होता! तुमच्यासाठी हा सुद्धा पहिलाच अनुभव असू शकतो. पण तुम्ही इतर कोणापेक्षाही जास्त देवाची आस धरली पाहिजे! डॉ. ए. डब्लू. टोजर म्हणाले, “ते मंडळीतून निघून गेले नाहीत कारण त्यांना देव नको होता – परंतू त्यांना देवापेक्षा जे अधिक असे कांही मिळाले होते...जेव्हां त्यांचा जुना स्वभाव ढवळला गेला तेव्हां ते पुन्हां देवाकडे वळले व त्यांच्या मंडळीतून निघून गेले. ते अधर्मी तरुण मित्र किंवा मैत्रीणींच्या सहवासात गेले. ते जगीक मित्रत्वामध्ये गेले. त्यांनी अशी नोकरी पत्करली जेथे कुठल्याही प्रकारे देवाचे गौरव व स्तुति केली जात नाही. ते पुन्हां जगात परतले. ते जे अत्याधिक प्रिय आहे ते ते मिळवित....मी फसवणूक करणेस नाकारले आणि तुम्ही ख्रिस्ती होऊन ह्या सध्याच्या जगावर प्रेम करु शकता त्यांना हे शिकवून मी धिक्कारले, कारण तुम्ही असे करु शकत नाही. होय, तुम्ही ढोंगी बनून जगावर प्रेम करु शकता. तुम्ही पाळकांना फसवून जगावर प्रेम करु शकता. तुम्ही आधुनिक सुवार्ता शुल्लक समजून जगावर प्रेम करु शकता. परंतू तुम्ही खरे पवित्रशास्त्रीय ख्रिस्ती बनून जगावर प्रेम करु शकत नाही. केवळ या सिद्धांतावर अवलंबून राहिल्यास मला खेद होईल, परंतू त्यासंबंधाने मी तुमच्याशी खोटे बोलणार नाही” (द टोजर पुलपीठ).

पुन्हा, डॉ. टोजर म्हणतात, “माझ्या मते, आजची सर्वात एकमेव गरज ही आहे की आनंदी-ह्दय, उथळ सुवार्तिक होण्यासाठी देवाच्या दृष्टांताने पडले जाणे आणि त्याच्या सोग्यानी मंदीर भरले जाणे आवश्यक आहे.” देवाच्या दृष्टांताशिवाय जसे की “आम्ही काय करावे हे आमच्या इच्छेवर सोडले आहे, आणि मंडळीतील लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शुल्लक व भपकेबाजपणात येण्यास भाग पाडणे...संकोचित होण्यास आम्ही घाबरतो यासाठी की आम्ही जगासाठी आमचे दरवाजे उघडले आहेत. हे आत्मिक आघाताकडे घेऊन जाते...सुवार्तावादाची प्रवृत्ति ही देवाप्रति, त्याची प्रवृत्ति ही जगाप्रति, त्याची प्रवृत्ति ही पापाप्रति तोकडी पडतेय” (लिनिंग इनटू द विंड).

5 व्या वचनाकडे लक्ष द्या,

“मग मी म्हणालो, हायहाय! माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे आणि अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो, आणि सेनाधिश परमेश्वर, राजाधिराज ह्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहिले” (यशया 6:5).

केवळ देवाच्या अग्नीचा इंगळ लावल्यावर तरुण यशया शुद्ध झाला “म्हणून तुझा दोष दूर झाला आहे, तुझ्या पापाचे प्रायःश्चित झाले आहे” (यशया 6:7).

8 व्या वचनाकडे पाहा. “तेव्हां मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, ‘मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?’ तेव्हां मी म्हणालो, ‘हा मी आहे! मला पाठव’” (यशया 6:8).

मंडळीत फूट पडली तेव्हां मी सुवार्तेसंबंधाने माझा आवेश हरविला आहे असे मला वाटले. त्यामुळे मी ठरविले की ज्यांनी आपले सर्वस्व ख्रिस्तासाठी दिले आहे अशा तीन व्यक्तीसोबत मी रोज रात्री वेळ घालवायचा – पास्टर रिचर्ड वुर्मब्रँड, जॉन वेस्ली, आणि चीनमधील शेवटचा मूळ सुवार्तिक, जॉनाथन गोफर्थ. तो शहाणपणाचा निर्णय होता. मी लहानसे स्वच्छतागृह बनविले, आमच्या शयनकक्षाच्या पुढे, या देवाच्या महान मनुष्यांसोबत प्रार्थना व सहभागितेसाठी असलेली माझी ती जागा होय. वुर्मब्रँड यांच्याकडून मी निश्चयीपणा शिकलो. एका मागोमाग एक अशा येणा-या आव्हानांना तोंड देत पुढे जाणे हे मी वेस्ली यांच्याकडून शिकलो. पण गोफर्थ व त्यांची पत्नि यांच्याकडून मात्र, आम्ही गुढघ्यावर येत प्रार्थना करुन पुढे जायला हवे हे शिकलो. गोफोर्थ व त्यांच्या पत्नीला हडसन टेलर यांनी लिहलेल्या पत्राने ते प्रेरित झाले. हडसन टेलर म्हणाले, “[चीनच्या] होनान प्रांतात प्रवेश करण्यासाठी आम्ही आमच्या सेवेचा भाग म्हणून दोन वर्षे अथक प्रयत्न केले, आणि आता नुकतेच यश मिळाले. बंधू, जर तुम्ही त्या प्रांतात प्रवेश केला की, तुम्ही गुडघ्यावर पुढे जायला हवे.” हडसन टेलर यांचे ते शब्द गोफर्थच्या नॉर्थ होनान मिशनचे ब्रिदवाक्य बनले आहे.

त्यांनंतर त्यांचे बाळ मरण पावले. गोफर्थ लिहतात, “गेरट्रुड मरण पावली. आमच्यासाठी ते मोठे नुकसान आहे. दोन आठवड्यापूर्वी ती चांगली होती, पण जुलै 24 ला ती वारली, ती हगवणीने आजारी पडल्याच्या केवळ सहा दिवसानंतर हे असे झाले. मला तिचे पार्थिव गाडीतून पन्नास मैल न्यावे लागले...तीन्हीसांजाच्या संध्याकाळी तेथे आमच्या प्रियेचे शरीर विसाव्यास घातले.” दोन लहान चीनी मुली दररोज सकाळी त्या जागी येत व ताजी फुले आमच्या प्रियेच्या कबरेवर वाहत.

गेरट्रुडच्या मरणानंतर, एक सुंदर बाळ मुलगा मिसेस गोफर्थ यांना जन्मास आला. ते त्याला “बाळ डोनाल्ड” अशी हाक मारी. तो खाली पडला व त्याच्या लहान डोक्याला लागले. पुढे जाऊन तो त्याच्या हातापायाची हालचाल करण्यास विसरला. त्या उन्हाळ्याच्या कडक उष्णतेने, जुलै 25 रोजी, जेव्हां तो केवळ एकोणीस महिन्याचा असतांना, बाळ डोनाल्ड वारला. दुस-यांदा जेव्हां गोफर्थनी आपल्या बाळ मुलाचे पार्थिवगाडीतून पन्नास मैल नेले तेव्हां. बाळ डोनाल्डचे पार्थिव त्याची लहानगी बहिण गेरट्रुडच्या कबरेच्या बाजूलाच पुरले. त्याच्या परतल्या नंतर लगोलग, गोफोर्थ व त्यांची प्रिय पत्नीने दक्षिण होनान मधील नव्या घराकडे जाण्याची तयारी सुरु केली. पाच-महिने-वयाचा पौल त्यांच्याबरोबर तेथे गेला.

विषमज्वराच्या तापाने जॉनाथन गोफर्थ भयंकररित्या आजारी पडले. जीवन व मृत्यूच्या मध्ये समतोल राखण्यात त्यांचे जीवन लटकले. जानेवारी 3 रोजी, बाळ फ्लॉरेन्स जन्मास आले. तेथे उन्हाळा खूप कडक होता इतका की त्या उष्माघाताने लहानसा पौल जवळजवळ मेलाच होता, पण उष्णता संपल्यावर कसाबसा तो जगला.

पुष्कळसे भयंकर कठीण प्रसंग व संकटे आली. त्यांचे पहिले मुल वसंत ऋतूत वारले. त्यांची इतर मुले हिवताप व मेंदूज्वराने मरण पावली. नंतर गोफर्थ व त्यांची पत्नि यांना बॉक्सर रिबेलियन मधून निघून जावे लागले. ते केवळ अद्भूतरित्या त्यांचा खून होता होता वाचले.

मिसेस रोसालिंड गोफर्थ बहि-या झाल्या. ते त्यांचे कान बनले. ते स्वतः अंध झाले, तेव्हां त्या त्यांचे डोळे झाली. ते त्यांच्या झोपेतच वारले, त्यावेळी त्यांची पत्नि स्नानगृहात होती. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी, त्यांचा मुलगा त्यांच्याविषयी म्हणाला, “माझ्यासाठी माझे बाबा एक महान व्यक्ति होते.” त्यांची मुलगी रुथ ही विएतनाममध्ये सुवार्तिका होती. रुथने आपल्या आईला लिहले, “बाबाच्या जाण्यातील फक्त गौरवी भाग मी बघते...देवाने त्यांना आणखी वरच्या सेवेसाठी बढती दिली आहे.”

गोफर्थ ऑफ चायना, हे पुस्तक, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नि रोसालिंड यांनी लिहले. खरोखर रोसालिंड गोफर्थ ह्या एक अद्भूत सुवार्तिका होत्या!

त्या त्यांच्या पवित्रशास्त्राकडे पाहत असतांना त्यांना भेटल्या, “त्यांचे पवित्रशास्त्र वापरुन जवळजवळ फाटलेले मला दिसले, आणि पाना पानावर सगळीकडे खुणा केलेल्या होत्या.” रोसालिंड म्हणाल्या, “अशा प्रकारचा माणूस मला पति म्हणून हवा होता.” त्या शरद ऋतूत ते तिला म्हणाले, “चीन करिता तू तुझे जीवन माझ्याबरोबर घालवशील काय?” तिचे उत्तर होते “होय.” कांही दिवसानंतर ते तिला म्हणाले, “मी माझ्या जीवनामध्ये तुझ्याही अगोदर, केवळ परमेश्वर व त्याच्या कार्याला प्रथम प्राधान्य देण्यास संमती देण्याचे अभिवचन देशील काय?” ती त्यांना म्हणाली, “होय, मी नेहमी, तुमच्याबरोबर असेन.” ह्या थोडक्यामुळे किती मोठी किंमत तिला मोजावी लागणार हे तिला ठाऊक होते!

तेव्हां मी प्रभूची वाणी ऐकली ती अशी, ‘मी कोणाला पाठवू? आमच्यासाठी कोण जाईल?’ तेव्हां मी म्हणालो, ‘हा मी आहे! मला पाठव’” (यशया 6:8).

ज्यांना सुवार्तिक व्हायचे नव्हते ते आमची मंडळी सोडून गेले. माझी प्रार्थना आहे की आज दुपारी येथे हजर असलेले प्रत्येकजण सुवार्तिक बनावे. इंटरनेट सेवा चालू ठेवण्यास येणा-या काळात आपणाला कठीण जाणार आहे. पुढील गोष्टी करुन तुम्ही व मी सुवार्तिक बनू शकतो (1) आत्मे जिंकण्याद्वारा; (2) जगभरात−पसलेल्या सेवेसाठी प्रार्थना करण्याद्वारा; (3) इंटरनेट सेवेद्वारा उपदेश पाठविण्यास दर महिण्याला मदत करण्याद्वारा, त्यात ह्या उपदेशाचा सुद्धा समावेश आहे, सुवार्ता प्रचारास तिस-या जगातील सुवार्तिकांना मदत करण्याद्वारा. एक पाळक आज उपलब्ध असलेल्या संधी बद्दल बोलले, “वैश्विक सेवा घेऊन आम्ही वैश्विक ख्रिस्ती बनले पाहिजे कारण आफला देव सुद्धा वैश्विक आहे.” काय तुम्ही रोसलिंड गोफर्थ सारखे उत्तर द्याल, “होय, मी नेहमी, तुमच्याबरोबर असेन?”

तारका, माझे सर्व दृष्टांत भर, मी प्रार्थना करतो, आज मला केवळ येशूच दिसू दे;
   कठीण अशा दरीतून तू मला चालीव, तुझ्या तेजोमय वैभवाने मला वेढून टाक.
दैवी तारका, माझे सर्व दृष्टांत भर, तुझ्या वैभवाने माझा आत्मा तेजोमय होईस्तवर.
   माझे सर्व दृष्टांत भर, म्हणजे तुझी प्रतिबिंबीत पवित्र प्रतिमा माझ्यातून सर्वजण पाहतील.

माझे सर्व दृष्टांत भर, सर्व इच्छा तुझ्या गौरवासाठी; माझा आत्मा उल्हासतो,
   तुझ्या परिपूर्णतेसह, तुझे पवित्र प्रेम, वरुन माझ्या माझ्या मार्गावर प्रकाशासह वाहत आहे.
दैवी तारका, माझे सर्व दृष्टांत भर, तुझ्या वैभवाने माझा आत्मा तेजोमय होईस्तवर.
   माझे सर्व दृष्टांत भर, म्हणजे तुझी प्रतिबिंबीत पवित्र प्रतिमा माझ्यातून सर्वजण पाहतील.

माझे सर्व दृष्टांत भर, पापाची सावली नव्हे तर तुझे तेज माझ्यामध्ये दिसून येवो.
   केवळ तुझे धन्य मुखकमल मला पाहू दे, तुझ्या अनंत कृपेने माझा जीव मेजवानी करो.
दैवी तारका, माझे सर्व दृष्टांत भर, तुझ्या वैभवाने माझा आत्मा तेजोमय होईस्तवर.
   माझे सर्व दृष्टांत भर, म्हणजे तुझी प्रतिबिंबीत पवित्र प्रतिमा माझ्यातून सर्वजण पाहतील.
(“माझे सर्व दृष्टांत भर” अविस बर्गेसन ख्रिस्टीऩसेन यांच्याद्वारा, 1895-1985).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.