Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
सुवार्तेचा उद्रेक!

THE EVANGELISM EXPLOSION
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 3 नोव्हेंबर, 2019 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, November 3, 2019

“कारण कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही” (इफिस 2:8, 9).


गेल्या गुरुवारी मी प्रार्थना सभेसाठी आपल्या मंडळीत आलो. मी उपासनेत प्रचार किंवा पुढारीपण केले नाही. परंतू मी सभागृहाच्या शेवची पाठीमागे बसलो असतांना मी एक तरुण जो पापात हरविलेला होता त्यासंबंधाने मी सजग झालो. उपासनेच्या शेवटी इतर सगळे निघून गेले तेव्हां मी त्याला म्हणालो की माझ्याजवळ ये व माझ्या बाजूला बस.

डॉ. जेम्स केनडी द्वारा लिखीत सुवार्तेचा उद्रेक हे वाचत होतो. म्हणून मी डॉ. केनडी यांनी सांगितले ते या तरुणावर प्रयत्न करावा असे वाटले. ते त्याला खूप साधे सरळ वाटले. त्या सगळ्यानंतर, तो त्याच्या जीवनभर मंडळीला येऊ लागला. त्यांने पुष्कळ सुवार्तेसंबंधाने उपदेश ऐकले होते. डॉ. केनडींचा कसा काय एक साधा विचार त्याला त्याने जे सर्व महान उपदेश ऐकलेले होते ते विसरायला लावतो? परंतू, जे सर्व आपण बोललो त्याने त्याचे तारण होण्यास मदत झाली नाही तरी मला वाटते की डॉ. केनडींचे साधे स्पष्टीकरण मी त्याला देऊ शकतो.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

मी त्याला म्हणालो, “जर तुझा आज रात्री मृत्यू झाला, व तुला स्वर्गाच्या दारात देवाला समोरे जावे लागले – आणि देव तुला म्हणाला, ‘मी तुला स्वर्गात का येऊ द्यावे?’ तेव्हां तू देवाला काय म्हणशील?” पुष्कळ सेकंद तो गप्प होता. नंतर तो म्हणाला, “मी देवाला म्हणेन की मी एक चांगला मुलगा होतो.”

रोम 6:23 म्हणते, “देवाचे कृपादान सार्वकालीक जीवन आहे.” स्वर्ग ही देणगी मोफत आहे. आपण ती कमावू किंवा कर्माने मिळवू शकत नाही. मग मी म्हणालो, “मला पुष्कळ वर्षे विचार यायचा की तू काय करणार. स्वर्ग ‘मिळावा’ म्हणून मी जसा चांगला वागतो, व त्यासाठी काम करतो.”

तो जे कांही म्हणाला त्यावर मी विश्वास ठेऊ शकलो नाही. म्हणून मी तो प्रश्न त्याला पुन्हा विचारलाः “”जर देवाने तुला म्हटले, ‘मी तुला स्वर्गात का येऊ द्यावे?’ तेव्हां तू देवाला काय म्हणशील?” यावेळी माझ्या लक्षात आले की त्याच्या डोळ्यात अश्रू होते. परंतू त्याने पुन्हां तेच उत्तर दिले, “मी देवाला म्हणेन की मी एक चांगला मुलगा होतो.” एक तरुण त्याच्या पौगांडावस्थेनंतर जो त्याच्या संपूर्ण जीवनभर – रविवारी सकाळी व रविवारी रात्री, तसेच मध्य आठवड्याच्या प्रार्थना सभेलाही मंडळीत हजर असायचा. तरीही त्याचे उत्तर स्पष्ट होते की – चांगली कर्मे केल्याने तारण मिळते असा त्याचा विश्वास होता. आणि त्याचा इफिस 2:8, 9 यावर विश्वास नव्हता!!!

मी त्याला फटकारले नाही. तर मी त्याला सरळ म्हणालो, “तू कधीही ऐकली नाही अशी एक महान गोष्ट मी पुढच्या पाच मिनिटात तुला सांगणार आहे.” मग मी त्याला माझ्या पवित्रशास्त्राकडे बघायला लावले आणि इफिस 2:8, 9 ही वचने वाचायला लावली.

“कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही“ (इफिस 2:8, 9).

मग मी म्हणालो, “पवित्रशास्त्रातील ही वचनें जवळून बघ.” त्याची सुरुवात “कृपेनेच तुमचे तारण झाले आहे” अशी आहे. कृपा हे दान आहे, “हे देवाचे दान आहे.” स्वर्ग हे दान आहे – सार्वकालीक जीवनाचे दान आहे. त्यानंतर मी रोम 6:23 याचा दुसरा भाग सांगितला, “देवाचे कृपादान सार्वकालीक जीवन आहे.” स्वर्ग हे मोफत मिळालेले दान आहे. आपण ते कमावू किंवा ते कर्माने मिळवू शकत नाही. मग मी म्हणालो, “मला पुष्कळ वर्षे विचार यायचा की तू काय करणार. स्वर्ग ‘मिळावा’ म्हणून मी जसा चांगला वागतो, व त्यासाठी काम करतो.” मग मला शेवटी आढळून आले की स्वर्ग हे मोफत दान आहे — अगदी मोफत! त्यामुळे मी आश्चर्यचकीत झालो! पवित्रशास्त्र म्हणते की, ‘कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले — माणसाने आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही’ (इफिस 2:8, 9).”

मग मी त्याला सांगितले की “सर्वांनी पाप केले आहे, आणि ते देवाच्या गौरवला उणे पडले आहेत” (रोम 3:23). आम्ही आमचे बोलणे, विचार आणि कृत्यांद्वारे पाप केलेले आहे. स्वर्ग प्राप्ती होईल असा कोणीही नीतिमान नाही. आपण परिपूर्ण असू शकत नाही.

परंतू देव दयाळू आहे. आम्हांला दंड द्यावा असे त्याला वाटत नाही. परंतू देव न्यायी सुद्धा आहे — त्यामुळे त्याला पापाबद्दल दंड देणे अनिवार्य आहे. देवाने त्याच्या ज्ञानाने एक समाधान शोधले. देवाने त्याचा पुत्र, येशू, आपल्या तारणासाठी पाठवून त्याने ही समस्या सोडविली. येशू कोण आहे? येशू हा देव-मानव आहे. पवित्रशास्त्रानुसार, येशू ख्रिस्त हा देव आहे, त्रैक्यातील दुसरा व्यक्ति. आणि पवित्रशास्त्र असे म्हणते की, “तो देही झाला व त्याने आम्हांमध्ये वसति केली” (योहान 1:1, 14). आपल्या पापाबद्दल दंड भरण्यास व स्वर्गातील सार्वकालीक जीवन देण्यास येशू, देव-मानव, हा वधस्तंभावर मरण पावला आणि तो मरणातून पुन्हां उठला. वधस्तंभावर, येशूने आपले पाप आपणां स्वतःवर घेतले. ख्रिस्ताने “स्वतः तुमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली” (I पेत्र 2:24). त्याला तीन दिवस कबरेत ठेवण्यात आले. परंतू आपल्यासाठी जागा तयार करावयास, तो मरणातून उठला व स्वर्गात चढला. आपल्यासाठी एक मोफत दान म्हणून — आता येशू स्वर्गात सार्वकालीक जीवन देतो आहे. आम्ही ते कसे स्विकारु शकतो? आम्ही हे दान विश्वासाच्याद्वारे स्विकारतो! “कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले” (इफिस 2:8). .

येशूवरील विश्वासाच्याद्वारे स्वर्गाचे दार उघडते. विश्वास ही केवळ बौद्धिक संमती आहे असे नव्हे. सैतान व त्यांचे दूत देखील येशूच्या दैवत्वावर विश्वास ठेवतात. पण त्यांचे तारण झालेल नाही. विश्वास हा आपल्या जीवनात – आरोग्य, धन, संरक्षण व मार्गदर्शन यासारख्या गोष्टी मिळण्यासाठी नाही – तर ज्या गोष्टी ह्या जीवनासंबंधाने आहेत त्या कालांतराने नाहीशा होतील.

पवित्रशास्त्राधारीत, विश्वास म्हणजे, केवळ येशूवर भरवंसा ठेवणे होय. आम्हांला स्वर्ग मिळावा म्हणून येशू आला, त्यामुळे आपणांस सार्वकालीक जीवन मिळेल! पवित्रशास्त्र म्हणते, “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे तारण होईल” (प्रेषित 16:31).

लोक दोनापैकी एकावर विश्वास ठेवतात – आपणां स्वतःवर किंवा येशू ख्रिस्तावर. चांगल्याप्रकारचे जीवन जगावे म्हणून मी माझ्या कष्टावर विश्वास ठेवला. मग मला कळून चुकले की स्वतःवर विश्वास ठेवणे थांबविले पाहिजे, आणि त्याऐवजी येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. मी ते केले – आणि येशूने मला सार्वकालीक जीवनाचे दान दिले. जे हे दान होते, “ते मला माझ्या कर्माने मिळालेले नाही.”

या खुर्चीबरोबर ते कसे घडते ते मी दाखवितो. तुम्ही या खुर्चीवर बसता तेव्हां ती आधार देणार, असा विश्वास तुम्ही ठेवता की नाही? (होय).

परंतू ती आता मला आधार देत नाही – कारण मी त्यावर बसलो नाही. मी खरोखर खुर्चीवर विश्वास ठेवतो हे मी कसे सिद्ध करु शकतो? हे बरोबर आहे, त्यावर बसल्यानंतरच!

आणि आम्ही असेच येशू बरोबर केले पाहिजे. स्वर्ग प्राप्ती करण्यासाठी आम्ही त्याच्यावर अवलंबून राहिले पाहिजे. तू म्हणाला, “मी देवाला म्हणेन की मी एक चांगला मुलगा आहे.” तुझ्या उत्तरामध्ये तो एकमेव व्यक्ति कोण होता? (तुम्ही).

जेव्हां तू असे म्हणालास तू स्वर्ग मिळविण्यासाठी कोणावर विश्वास ठेवलास? (ते बरोबर आहे, तू).

तू स्वर्ग मिळण्यासाठी स्वतःवर भरवंसा ठेवणे थांबविले पाहिजे आणि त्याऐवजी तू येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. (मोकळ्या खुर्चीवर बस).

काय तुला कळाले का? आता तुला देव हा प्रश्न विचारतोय की − “आता तुला सार्वकालीक जीवनाचे दान मिळावे असे वाटते का?” (होय, मला वाटते).

आता मी प्रार्थना करतो, “आता मी प्रार्थना करतो की माझा मित्र सार्वकालीक जीवनाचे दान तुला देवो.”

आता, येशू येथे आहे, आणि तो तुझे ऐकतो आहे. तुझ्याकरिता मला येशूला सांगावेसे वाटते की तुला खरोखर सार्वकालीक जीवन हवे आहे. मी जे शब्द म्हणतो ते माझ्या मागे म्हण, परंतू ते येशूला सांग,

“येशू, आता मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. मी एक पापी आहे. आजवर मी स्वतःवर व माझ्या सत्कर्मावर विश्वास ठेवत होतो. प्रभू येशू, आता मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे. येशू, आता मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो की तू माझ्या पापाची खंडणी भरण्यास मरण पावला. येशू, आता मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी माझे सत्कर्म व माझे पाप यापासून मागे फिरतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. सार्वकालीक जीवनाचे मोफत दान मी स्विकारतो. येशू, तुझ्या नावांमध्ये. आमेन.”

आता, मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. “येशू, माझ्या मित्राने केलेली प्रार्थना तू ऐकली आहेस. ‘तुझ्या पापाची क्षमा करतो’ असे तू म्हणण्याचा आवाज, त्याच्या अंतःकरणात त्याला ऐकू येऊ दे अशी मी प्रार्थना करतो. ‘जो कोणी त्याजवर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालीक जीवन मिळावे.’ येशूच्या नावामध्ये ही प्रार्थना करतो, आमेन.”

आता तुम्ही योहान 6:47 मोठ्याने वाचावे अशी माझी इच्छा आहे.

“मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त झाले आहे.”

भावनांकडे पाहू नको. विश्वास ठेवण्याच्या साध्या कृतीने तू येशू ख्रिस्तावर भरवंसा ठेवला आहेस. ते बरोबर आहे ना?

तुझ्या तारणाकरिता आता तू कोणावर विश्वास ठेवतोस? (येशू ख्रिस्त).

विश्वासाचे बोलणे म्हणजे सार्वकालीक तारणासाठी येशूवर भरवंसा ठेवणे होय. ते तू आता केले तेच ना? (होय).

येशू म्हणतो जो कोणी असे करतो त्याला सार्वकालीक जीवन मिळते. ते तू आता केले तेच ना? (होय).

आता, आज रात्री झोपेत तू मेला आणि देवाने विचारले की त्याने तुला स्वर्गात का येऊ द्यावे, तेव्हां तू काय म्हणशील? (सार्वकालीक जीवनाकरिता मी येशूवर विश्वास ठेवतो).

मित्रा, तू जी आता प्रार्थना केली त्याचे तुला महत्व आहे, तर येशूने तुझ्या पापाची क्षमा केली आहे, आणि आताच सार्वकालीक जीवन तुला मिळणार!

तू योहानकृत शुभवर्तमानाच्या पुस्तकातील, रोज एक असा अध्याय वाचावा. योहानकृत शुभवर्तमानाच्या पुस्तकात 21 अध्याय आहेत. तू एका दिवसात एक अध्याय वाचावा, आणि हे योहानकृत शुभवर्तमानाचे पुस्तक तीन आठवड्यात वाचून पूर्ण होईल.

आज रात्री एका व्यक्तीला काय झाले ते मी तुला सांगतो. तो व्यक्ती कोण असू शकते? (माझ्या बंधू).

आज रात्री तुम्ही येशूवर विश्वास ठेवला हे तू त्याला सांगशील? (होय).

आता, तुला माझ्याबरोबर घेऊन पुढच्या रविवारी मंडळीत जायला आवडेल. रविवारी माझ्याबरोबर यायला मी तुला सोबत घेऊ काय? (होय). त्याच्या अगोदर तुला माझ्याशी बोलायचे असेल तर मला फोन कर. हा माझा फोन नंबर आहे.

आता, कांही वेळेकरिता, तुझ्या जीवाचे तारण केल्याबद्दल व तुला सार्वकालीक जीवन दिल्याबद्दल येशूला धन्यवाद देऊया का? (प्रार्थना).

आता, इफिस 2:8, 9 तुम्ही मोठ्याने वाचावा अशी माझी इच्छा आहे.

“कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही“ (इफिस 2:8, 9).

संपूर्ण जगामध्ये हजारो लोकांचे एका साध्या पद्धतीने ख-या अर्थाने परिवर्तन झालेले आहे. अजूनही त्यांना खातरी नसेल तर, तुमच्या चेह-यावर हास्य आणून सभा समाप्त करा, आणि योहानकृत शुभवर्तमानाचा किमान एक अध्याय दररोज वाचण्याचे त्यांच्याकडून अभिवचन घ्या. तुम्ही त्यांना वेडे केले नसेल तर, तुम्हांला त्यांच्याशी बोलण्याची आणखी एक संधी उपलब्ध असेल.

हा उपदेश तुम्ही तुमच्याबरोबर घरी घेऊन जा. तुम्हांला तुमच्या स्मृतीतून एक कल्पना मिळत नाही तोवर तो उपदेश वाचा. आताच तुम्ही तुमच्या मित्रावर किंवा तुमच्या नातेवाईकांवर याचा प्रयोग करुन पाहा. कदाचित तुम्ही अचंबित व्हाल जेव्हां ते ख-या अर्थाने यामध्ये रस घेतील आणि तुमच्याबरोबर ते मंडळीला येतील!


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.