Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




पवित्रशास्त्रातील भविष्यवाणीची हरविलेली शांति
आज आपणांकरिता प्रकट झाली

A MISSING PIECE OF BIBLE PROPHECY
ILLUMINATED FOR US TODAY
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी सकाळी,
22 सप्टेंबर, 2019 रोजी दिलेला उपदेश
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, September 22, 2019

“हे दानीएला, तू अंतसमयापर्यंत ही वचनें गुप्त ठेव व हे पुस्तक मुद्रित करुन ठेव...” (दानीएल 12:4; पृष्ठ 919 स्कोफिल्ड).

“मी हे ऐकले पण समजलो नाही; तेव्हां मी म्हणालो, हे माझ्या स्वामी, या गोष्टी परिणाम काय? तो म्हणाला, हे दानीएला, तू आपला स्वस्थ राहा; कारण अंतसमयापर्यंत ही वचनें गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत” (दानीएल 12:8, 9; पृष्ठ 920).


“अंतसमय” यासंबंधाने दानीएल संदेष्टयास काहींच समजले नाही. आपणांस हे वचन 8, मध्ये सांगितले आहे, “मी हे ऐकले पण समजलो नाही.” मग देव म्हणाला, “अंतसमयापर्यंत ही वचनें गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत” (दानीएल 12:9).

दानीएलास भविष्यवाणीची वचनें समजली. परंतू त्याला हे समजले नाही की अंत−समय कसा असणार. “कारण अंतसमयापर्यंत ही वचनें गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत” (दानीएल 12:9). त्याला आत्म्याने प्रेरित होऊन वचन दिले. परंतू त्याचा अर्थ त्याला प्रकट झाला नव्हता. “अंतसमयापर्यंत” त्या वचनाचे प्रकटीकरण त्याला होणार नव्हते. जसे की आपण ह्या युगाच्या अंताला जात आहोत, तर मग भविष्यवाणीचा उलगडा वाढणार.

“वर उचलले जाणे” यासंबंधाने जेव्हां मी पहिल्यांदा ऐकले ते मला स्पष्ट आठवते. I वर उचलले जाणे हे सात − वर्षाचा महासंकटाच्या काळा पूर्वी होणार असे मला माझ्या शिक्षकाने सांगितले. मी माझ्या शिक्षकांना विचारले महासंकटाच्या काळा पूर्वी वर उचलले जाणे होणार असे पवित्रशास्त्रात कोठे शिकविले आहे. ते मला उत्तर देऊ शकले नाहीत. अशाप्रकारे, वर उचलले जाणे हे सात − वर्षाचा महासंकटाच्या काळा पूर्वी “कोणत्याही क्षणी” होणार, असा मला दहा वर्षे प्रश्न पडला. नंतर मला समजले की महासंकटाच्या काळा पूर्वीचे – वर उचलले जाणे हे प्रथम जे. एन. डर्बेनी प्रसिद्ध केले, आणि ह्या डर्बेना पंधरा-वर्षे- वयाच्या मार्गारेट मॅक् डोनाल्ड नावाच्या मुलीकडून याची माहिती “मिळाली” होती, जी एक करस्मॅटिक होती जिला यासबंधाचे “स्वप्न” पडले होते. कांही कारणास्तव जे. एन. डर्बे ह्याचा प्रचार करु लागले. त्यानंतर त्याचा प्रचार स्कोफिल्ड स्टडी बायबल मधून सी. आय. स्कोफिल्ड करु लागले. बहुतांश नव्या-सुवार्तिकांची सध्या ह्या प्रकारची स्थिती आहे.

त्यानंतर मार्विन जे. रोसेंथल यांनी मंडळीचे उचलले जाण्या पूर्वीचा-क्रोध या नावाचे पुस्तक लिहले (थॉमस नेल्सन, 1990). तसेच रोसेंथल यांनी जे कांही सर्व लिहले त्याच्याशी मी सहमत नव्हतो, पण मला वाटते की “वर उचलले जाणे” केव्हां होणार यासंबंधाने अधिक समजण्यास त्यांनी दार उघडले आहे. रेव्ह. रोसेंथल यांचा दृष्टिकोनावर टिका करण्यापूर्वी ते पुस्तक घ्या व काळजीपूर्वक वाचा. ते शिकवितात की “वर उचलले जाणे” हे महासंकटाच्या काळाच्या शेवटाजवळ, प्रकटीकरण, अध्याय 16 मध्ये सांगितलेल्या “न्यायाच्या-वाटीतून” देवाचा क्रोध तो ओतण्याच्या थोडे पूर्वी होणार. त्याचा मला अर्थ कळाला — त्या मुलीच्या स्वप्नावर आधारलेल्या पेक्षा अधिक चांगला कळाला!

हे का महत्वाचे आहे? मी तुम्हांला सांगतो का. वर उचलले जाणे हे सात-वर्षाच्या महासंकटाच्या पूर्वी झाले तर, ख्रिस्ती लोकांना करण्यासारखे कांहीच नाही. रविवारच्या सकाळी गर्दीसह एक तास मंडळीत जायचे! तुम्हांला आत्मे जिंकण्याची गरज नाही. अधर्मी लोकांपासून वेगळे होण्याची गरज नाही. हे आन्टीनॉमीझम कडे घेऊन जाते (त्यासंबंधी वाचण्यास येथे क्लिक करा).

या उपदेशाचे शिर्षक आहे, “पवित्रशास्त्रातील भविष्यवाणीची हरविलेली शांति आज आपणांकरिता आज प्रकट झाली.” ती “हरविलेली शांति” काय आहे? ते म्हणजे “विश्वास त्याग” होय. मी पवित्रशास्त्रातील भविष्यवाणींचा गेली 50 वर्षाहून अधिक काळ अभ्यास करीत आहे. “विश्वास त्याग” या सारखा एक महत्वाचा विषय आजच्या आपल्या काळात ब-यापैकी दुर्लक्षित राहिल्याचे माझ्या एकदम लक्षात आले. माझ्या कपाटात पवित्रशास्त्रातील भविष्यवाणींच्या विषयाची तीन महत्वी पुस्तके आहेत — ज्यामध्ये सगळे विषय समावेश केलेले आहेत. ती पुस्तके चांगल्या व धार्मिक माणसांनी लिहली आहेत, अशा ह्या महत्वाच्या विषयासंबंधाने ह्या माणसांवर विश्वास ठेऊ शकतो. परंतू “विश्वास त्याग” या विषयावर एकही भाग नाही. आणि “विश्वास त्याग” हा विषय आज आपल्यासाठी मुख्य मुद्दा आहे.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

कृपया II थेस्सल 2:3 काढा. किंग जेम्स मध्ये हे आहे,

“कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो पापपुरुष प्रकट होईल, नाशाचा पुत्र” (II थेस्सल 2:3; पृष्ठ 1272 स्कोफिल्ड).

न्यू अमेरिकन स्टॅंडर्ड बायबल आवृत्तीमध्ये हे वचन, जसेच्या तसे अनुवादित केले आहे,

“कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका, कारण प्रथम विश्वास त्याग होणार नाही तोवर [प्रभूचा दिवस] येणार नाही, आणि तो अनीतिमान पुरुष प्रकट होईल, नाशाचा पुत्र” (II थेस्सल 2:3, NASB).

“विश्वास त्याग” हा “हे अपोस्टासिआ” यापासून अनुवादित आहे. तसेच तो किंग जेम्स मध्ये विश्वासातून “दूर जाणे” असा अनुवादित केला आहे.

डॉ. डब्लू. ए. क्रिसवेल यांनी लौइसविले, केंटुके येथील सदर्न बॅप्टिस्ट थिऑलॉजिकल सेमीनरी मधून ग्रीक शास्त्रातील पीएच.डी. मिळविली. नवीन करारातील ग्रीक शब्दांवर डॉ. क्रिसवेल यांचे बारीक लक्ष होते. डॉ. क्रिसवेल म्हणाले, “प्रभूचा दिवस येण्यापूर्वी, कथित विश्वासणार विश्वासातून दूर जाणार. [hē] या शब्दाचा वापर करणे हे दर्शविते की पौलाच्या मनात विशिष्ट प्रकारचा विश्वास त्याग आहे.” हे समजल्यावर, आपणांस दोन महत्वाच्या गोष्टी II थेस्सल 2:3 मधून शिकायला भेटतात,


1. प्रभूचा दिवस येण्यापूर्वी, हा विश्वास त्याग होणार आहे.

2. प्रभूचा दिवस येण्यापूर्वी, ख्रिस्तविरोधक “प्रकट” होणार.


ह्या दोन्हीही गोष्टी प्रभूच्या दिवस येण्या पूर्वी घडणार आहेत, जो महासंकटाचा काळ व देवाचा क्रोध ओतण्याचा समय आहे, ह्या युगाचा अंतिम समय. महासंकटा-पूर्वीचे वर उचलले जाणे हा सिद्धांतातून सर्व ख्रिस्ती पूर्वी गेलेले आहेत. त्यामुळे “विश्वास त्याग” यासंबंधाने नव्या सुवार्तिक मंडळ्यांमधून सध्या प्रचार केला जात नाही, आणि त्यामुळेच “विश्वास त्याग” हा भाग ब-याच पवित्रशास्त्रातील भविष्यवाणींच्या पुस्तकांमध्ये आढळत नाही!

परंतू मार्विन रोसेंथल बरोबर असतील, आणि ते बरोबर आहेत तर, आपण आता “विश्वास त्याग” याच्या आरंभामध्ये आहोत! याचा ख्रिस्ती लोकांवर काय परिणाम होणार? “तिस-या जगतात” पूर्वी कधी छळ झाला नाही इतका छळ तेथे होतोय. आणि “पश्चिमी जगतात” आपणावर सैतान व त्याच्या दूतांकडून मोठे हल्ले होतायत. दानीएल संदेष्ट्याला या गोष्टी सांगितल्या होत्या, पण तो म्हणतो, “मला समजले नाही.” मग देव दानीएलास म्हणाला, “अंतसमयापर्यंत ही वचनें गुप्त ठेवून ती मुद्रित केली आहेत” (दानीएल 12:8, 9).

जॉन एस. डिकर्सन यांनी महान सुवार्तिक मंदी (बेकर बुक्स, 2013) नावाचे खूप छान पुस्तक लिहले आहे. डिकर्सन गेब लियॉनचे विधान सांगतात, जे म्हणाले,

“ही वेळ इतिहासातील इतर कोणत्याही वेळे सारखी नाही. तिला मूळ प्रतिसादाची अद्वितीय मागणी आहे. जर आम्ही पुढे जाण्यास वेगळा मार्ग देऊ केला, तर आपण संपूर्ण पीढी नाशात व निराशेत [गमावून] बसू...आपले मित्र इतर प्रकारच्या उपासने [कडे] वळू लागतील...वेळ कमी, परंतू अधिक आकर्षक आहे (पुढील ख्रिस्ती, डबलडे, 2010, पृष्ठ 11; माझा भर).

डिकर्सनच्या पुस्तकाचा मुख्य पृष्ठभाग म्हणतो,

“अमेरिकन मंडळी ही...कमी होतेय. तरुण ख्रिस्ती पळून गेलेत. दान दशांश आटतायेत...संयुक्त अमेरिकेची सांस्कृति ही विरोधी व अनिष्टतेकडे वळतेय. ही विनाशकारी पडझड कशी रोखू शकतो?”

तसेच मला डिकर्सनच्या पुस्तकाचा पहिला भाग मला आवडतो, शेवटच्या भागाविषयी मी पूर्णतः असहमत आहे, कशी तयारी करावी यावर.

तयारी करण्यासाठी आपणास लक्षात आले पाहिजे की, आता आपण, “विश्वास त्यागा” च्या आरंभी आहोत. आपले वर उचलले जाणे हे अधिक छळ होण्यापूर्वी होईल असा जर आपण विचार करु, तर पुढे जे वाढून ठेवले आहे त्यासाठी आम्ही तयार नसणार.

पास्टर रिचर्ड वुर्मब्रॅंड हे सुवार्तिक होते ज्यानी 14 वर्षे कमुनिष्टांच्या कारावासात घालविली, त्यांचा रोमानियामध्ये ख्रिस्ताकरिता छळ झाला. त्यांचा रोमानियातील कारावासातील अनुभव हा अमेरिकेतील ख्रिस्ती छळ सहन करतात त्यापेक्षा अत्यंत वेगळा आहे. रात्रीमध्ये त्या तुरुंगाच्या खोलीमध्ये उंदरांनी त्यांचे पाय कुरतडले. त्यांना मारण्यात आले. लालबुंद लोखंडाच्या सळीने त्यांच्या संपूर्ण मानेवर व शरीरावर चटके देण्यात आले. त्यांना मरणाची भिक मागे पर्यंत मारण्यात आले. आणि असा हा त्यांचा भयंकर छळ 14 वर्षे चालू होता. यामुळे वुर्मब्रॅंड यानी ज्याला “दुःखसहनविज्ञान,” म्हणजे दुःखसहनाचा सिद्धांत म्हणतात तो त्यांनी विकसित केला. मग ते (अद्भूतपणे) अमेरिकेस आले जेथे ते अमेरिका — पर्यायाने मंडळ्या व त्यांची स्वतःची मंडळीही दुःखसहनासाठी तयार असली पाहिजे हे शिकवू लागले. अमेरिकेतील ख्रिस्ती लोकांनी दुःखसहनासाठी तयार असले पाहिजे हे डॉ. वुर्मब्रॅंड शिकविले. ते म्हणाले, “आम्ही कारावासात जाण्यापूर्वी, आताच आम्हांला तयारी करायला हवी. करावासात तुम्ही तुमचे सर्व गमावणार...जीवन सुखी होईल असे कांही राहणार नाही. ज्यानी आधीच जीवनाचे सुख त्यागले नाही असे कोणीही विरोध करणार नाहीत” (राष्ट्रें आनंद करोत, बेकर बुक्स, 2020, पृष्ठ 10, यातील जॉन पायपर यांचे विधान).

डॉ. पौल नायक्विस्ट म्हणाले, “तयार व्हा. आपल्या संपूर्ण देशात संस्कृति बदलत असतांना, ज्याविषयी...छळाला प्रतिसाद देणे याविषयी पवित्रशास्त्र जगायला शिकविते तसे आपण लवकरच बदलून जाऊ” (जे. पौल नायक्विस्ट, तयार असाः विरोधी वातावरणात आपला विश्वास राखून जगणे, मुडी पब्लिकेशर्स, 2015, पृष्ठ 14).

नोहाच्या काळ हा विश्वास त्यागाचे दिवस आहेत

येशू म्हणाला,

“[नोहा] च्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हां जसे की जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत [नोहा] तारवांत गेला त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करुन घेत होते, लग्न करुन देत होते, आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहवून नेईपर्यंत त्यांना समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल” (मत्तय 24:37-39; पृष्ठ 1034).

पुष्कळसे विद्वान विचार करतात की नोहाचे दिवस हे सर्वात अधिक छळाचे होते. पण त्याहून अधिकही होते. नोहाच्या दिवसांत लोक “नोहा तारवांत गेला त्या दिवसापर्यंत खातपीत होते, लग्न करुन घेत होते लग्न करुन देत होते” (मत्तय 24:38).

आता अमेरिकेत व पश्चिम जगतात अगदी तेच घडते आहे! तेथे “तिस-या जगतात” विश्वासणा-यांचा भयंकर छळ होतोय. चीन सारख्या ठिकाणी सुद्धा संजीवन येतेय. परंतू अमेरिकेत व पश्चिमेमध्ये नाही! येथे भौतिकवादासंबंधाने चिंतीत आहेत. तेथे खाणे व पिणे, लग्न करुन घेणे व लग्न करुन देणे चालू आहे. असे करणे तेथे सामान्य गोष्ट आहे. पण तेथे याहून अधिक आहे. हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे — “खाणे व पिणे, लग्न करुन घेणे व लग्न करुन देणे.” त्यांना वाटते की जगण्यासाठी ह्याच गोष्टींची गरज आहे! त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू देव नाही! जीवनावश्यक भौतिक गोष्टी त्यांना अधिक महत्वाच्या आहेत!

लवादिकीया मंडळीचे चित्रण हे अमेरिका व
पश्चिम जगतातील मंडळ्यांचे चित्र आहे

येशू म्हणाला,

“लवादिकीया येथील मंडळीच्या दूताला लिही: ‘जो आमेन, जो विश्वसनीय व खरा, जो देवाच्या सृष्टीचे आदिकरण तो म्हणतो: तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत; तू शीत नाहीस व उष्ण नाहीस, तू शीत किंवा उष्ण असतास तर बरें होते; पण तू तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे व मला कांही उणे नाही असे तू म्हणतोस; पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला मसलत देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे; तुझी लज्जास्पद नग्नता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे; आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालण्यास अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांच्या निषेध करुन त्यांना शिक्षा करतो; म्हणून आस्था बाळग आणि पश्चाताप कर” (प्रकटीकरण 3:14-19; पृष्ठ 1334).

हे विश्वास त्याग करणा-या मंडळीचे चित्रण आहे. ही अशी मंडळी आहे जी कोमट, “ना शीत किंवा ना उष्ण” आहे (प्रकटी. 3:16). ही अशी मंडळी आहे ज्यात संपूर्ण पालट न झालेले लोक आहेत (प्रकटी. 3:17). ही अशी मंडळी आहे जिने पश्चातापास नकार दिला (प्रकटी. 3:19).

मागील 40 वर्षात आपण आपल्या मंडळीचे मोठे दोन विभाजन अनुभवले. दोन्ही वेळेस ज्यांना “कोमट” राहायचे होते जे आपणांस सोडून गेले. दोन्ही वेळेस आत्मे-जिंकण्याच्या संबंधाने “कोमट” केले होते. दोन्ही वेळे त्यांना गंभीर ख्रिस्ती व्हायचे नव्हते. ज्या गोष्टीमुळे आपल्यातून लोक निघून गेले, ते म्हणजे, आपण “अगदी शिस्तीचे” होतो व आपणांस सोडले तर त्यांना केवळ “मौजमजा” करायची होती. दोन्ही वेळेस आत्म्याने पेटलेली मंडळी होण्यास अपयशी ठरली. दोन्ही वेळेस असे लक्षात आले (पण खूप उशिराने) की कोमट परिस्थीतीत त्यांना त्यांच्या लोकाना ठेवायचे नव्हते. दोन्ही वेळेस शेवटी ते अपयशी ठरले. येशू म्हणाला, “म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून [उलटी] टाकणार” (प्रकटी. 3:16). त्यांना जगापासून वेगळे व्हायचे नव्हते, त्यामुळे ते जगाशी, देहाशी, व सैतानाशी समरुप होऊन झाले. त्यांना कठोर तत्ववादी व्हायचे नाही, त्यामुळे ते लगोलग कोमट-सुवार्तिक बनले! आध्यात्मिक दृष्ट्या अर्धे मेले — किंवा याहून वाईट झाले!

स्वतःला विचारा. जे लोक चान बरोबर सोडून गेले ते चीन मध्ये आहेत, काय ते भूमीगत मंडळीत राहत असतील, किंवा ते कम्युनिस्ट-पाठींब्यावरील “त्रै-स्वयं मंडळीत” जात असतील? तुम्हांला उत्तर माहित आहे! तुम्हांला ते उत्तर अगोदरच माहित आहे! ते निश्चितच कम्युनिस्ट मंडळीत जात असतील. का? कारण त्यांना खरे ख्रिस्तीत्व नको होते. त्यांच्या तोंडाला मऊ, नव्या-सुवार्तिक “मंडळीची” भूक आहे. आणि विश्वास त्याग करणा-या चानने त्यांना दिले! एक मऊ, नवी-सुवार्तिक “मंडळी.” ते तुम्हांला माहित आहे! तुम्हांला ते अगोदरच माहित आहे!!! मी तुम्हांला नवीन कांही सांगत नाही!!!

आपल्या ह्या युगातील विश्वास त्याग करणा-या नवीन-सुवार्तिक मंडळ्यांचे वर्णन करुन ह्या उपदेशाची मी सांगता करणार आहे,

“शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे, कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हुड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुख-विलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रुप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्याच्यापासून दूर राहा” (II तिमथी 3:1-5; पृष्ठ 1280, 1281).

“सदा शिकत असूनहि सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहंचणा-या, अशा भोळ्या स्त्रियांस वश करितात” (II तिमथी 3:7; पृष्ठ 1281).

“ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल” (II तिमथी 3:12; पृष्ठ 1281).

“वचनांची घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचारानें आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवितील. आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल. तूं तर सर्व गोष्टींविषयी सावध ऐस, दुःखे सोस, सार्तिकाचे काम कर, तुला सोपविलेली सेवा पूर्ण कर” (II तिमथी 4:2-5; पृष्ठ 1281).

“कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला (II तिमथी 4:10; पृष्ठ 1281).

“आता बंधूजनहो, मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर व्हा. कारण तसले लोक आपल्या प्रभूची सेवा करत नाहीत, तर स्वतःच्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंतःकरणे भुलवतात” (रोम 16:17, 18; पृष्ठ 1210).

माझ्या प्रिय बंधू व भगिनीनो, आज रात्री मी जो उपदेश सांगितला तो महान संदेष्टा दानीएलला पूर्णपणे समजला नाही. पण देवाचे आभार मानतो की त्यांने मार्विन रोसेंथल नावाच्या सुवार्तिकास आम्हांला सांगण्यास व “उचलले जाणे संबंधाने नवीन समज करुन देण्यास उभे केले. तसेच महासंकट व येशूचे दुसरे येणे” यासंबंधाने (क्रोधा-पूर्वी मंडळीचे उचलले जाणे याचे आच्छादन, थॉमस नेल्सन, 1990).

होय, आपण आता मोठ्या विश्वास त्यागाच्या शेवटल्या-काळाच्या आरंभात आहोत. होय, आपणांस छळ सहन करावा लागेल, जसे की चीनमधील लोकांप्रमाणे, जसे की रिचर्ड वुर्मब्रँडनी केले, जसे की “तिस-या जगता” मधील लोकांप्रमाणे. परंतू जो ख्रिस्तावर प्रेम करतो तो विजयी होतो, कारण येशू म्हणाला,

“धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहेस म्हणून पृथ्वीवर राहणा-या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षाप्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन. मी लवकर येतो; तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ हे ते दृढ धरुन राहा. जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन; तो तेथून कधीही बाहेर जाणार नाही; त्याच्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे येरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी, हिचे नाव,’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन. आत्मा मंडळ्यास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको” (प्रकटी. 3:10-13; पृष्ठ 1334).

कपया उभे राहा व “मी वधस्तंभाचा सैनिक आहे का?” चला या गीताचा 1, 2 आणि 4 थे कडवे गाऊया,

काय मी वधस्तंभाचा सैनिक, कोक-याचा अनुयायी आहे,
आणि त्याच्यामुळे, किंवा त्याचे नाव सांगण्यास मी घाबरावे का?

सहजतेच्या फुलांचा बिछाना आकाशापर्यंत न्यावा काय,
त्याचवेळी इतर पारितोषिक जिंकण्यासाठी झगडतात, आणि रक्तमय समुद्रातून नेले?

जर मला राज्य करायचे आहे, तर खरोखर मला लढले पाहिजे, प्रभू, माझे धैर्य, वाढव; तुझ्या वचनांमुळे जगाकडून भोगावे लागणारे, परिश्रम करीन, वेदना सहन करीन.
(“काय मी वधस्तंभाचा सैनिक आहे?” डॉ. इस्साक वॅट्स यांच्याद्वारा, 1674-1748).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.