Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
पेत्र कसा शिष्य झाला

HOW PETER BECAME A DISCIPLE
(Marathi)

डॉ. ख्रिस्टोफर एल. कागॅन लिखीत
डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी संध्याकाळी,
1 सप्टेंबर, 2019 रोजी दिलेला उपदेश
Text by Dr. Christopher L. Cagan;
preached by Dr. R. L. Hymers, Jr.
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, September 1, 2019

“योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हां तो त्याला म्हणाला, ‘मशिहा म्हणजे ख्रिस्त आम्हांला सापडला आहे’. त्याने त्याला येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, ‘तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस; तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील” (योहान 1:40-42; पृष्ठ 1116 स्कोफिल्ड).


पेत्र येशूला भेटण्याची ही पहिली वेळ होती. त्याचे मूळ नाव शिमोन होते. येशूने त्याला “पेत्र,” असे नाव दिले ज्याच्या अर्थ “खडक” आहे. आंद्रे हा त्याचा भाऊ होता. पेत्र हा मासेमारी करणारा होता. आंद्रे व पेत्र हे गालील समुद्राच्या जवळच असलेल्या एका गावात राहत होते, जेथे ते मासेमारी हा व्यवसाय करीत होते. मासेमारी करण्यासाठी शाररिक श्रम भरपूर लागत असलेने, त्याचे जीवन कष्टमय होते. पेत्र हा विवाहित होता हे कळते कारण येशूने त्याच्या सासूला बरे केले होते. पेत्र येशूला भेटला त्यावेळी तो 30 वर्षे वयाचा होता. शिष्यांमध्ये तो सर्वात वयस्क होता.

गालील समुद्रामध्ये मासेमारी करणारे लोक खूप खणखर होते. मासेमारी करण्यास खूप शाररिक श्रम करावे लागते. त्यांना भीतीला तोंड द्यावे लागते, कारण ब-याचदा गालील समुद्रामध्ये अकस्मित मोठे वादळ यायचे. हे वादळ त्यांच्या छोट्याश्या नावेवर येऊन आदळायचे व त्यामुळे माणसे बुडली जायची.

पेत्र हा परुशी नव्हता. तो यहुदी असल्याने ब-याचदा सभागृहात जायचा. तो परश्यांप्रमाणे, खूप परंपरावादी नव्हता. पण तो इतर मासेमारी करणा-या माणसांप्रमाणे नव्हता, तर पेत्राला तो पातकी असल्याची त्याच्या ह्दयात जाणीव होती. नंतर तो येशूला म्हणाला, “प्रभूजी, माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. (लुक 5:8; पृष्ठ 1078).

अशाप्रकारे, पेत्राने एक धार्मिक मनुष्य, किंवा चांगला व्यक्ति म्हणून आपले जीवन सुरु केले. तो रांगड्या स्वभावाचा होता. मासेमारी करणारा म्हणून त्याला रांगडे राहावे लागे. “मंडळीतील व्यक्ती” सारखा तो पूर्ण प्रशिक्षित नव्हता. तो शिवीगाळ करणारा व तापट स्वभावाचा होता. ज्याने अनेक चुका केल्या असा तो पापी मनुष्य होता.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

ख्रिस्तासाठी ज्या व्यक्तीला तुम्ही जिंकणार त्याच्याविषयी विचार करा. पेत्रा प्रमाणे, तो पूर्ण सुसज्ज व “मंडळीतील व्यक्ती” सारखा पूर्ण प्रशिक्षित नाही. मंडळीतील सभेला तो का येतो हे त्याला समजत नाही. तासोंतास व्हिडीओ गेम खेळणे, किंवा जगातील मित्रांबरोबर वेळ घालविणे त्याला योग्य आहे असे वाटते. जेवढ्यांना तो ओळखतो तेवढे त्याच्यासारखे आहेत असे त्याला वाटते. ते त्याचे पाप आहे. त्या त्याच्या वाईट कल्पना आहेत. त्या त्याच्या समस्या आहेत. त्याच्याशी वाद करुन तुम्ही त्याला ख्रिस्तासाठी जिंकणार नाही. त्याऐवजी, त्याला येशूविषयी सांगा. तुमच्यासाठी येशूने काय केले ते त्याला सांगा. त्याच्याशी मित्रत्वाने वागा. तुम्हांबरोबर मंडळीत येण्याचा विचार त्याला येईल. पेत्र हा प्रशिक्षित नव्हता, आणि तो जगातही हरविलेला नव्हता.

त्याचा भाऊ आंद्रे त्याच्याशी येशूविषयी बोलला. “त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन [पेत्र] पहिल्याने भेटला, तेव्हां तो त्याला म्हणाला, मसीहा म्हणजे [ख्रिस्त] आम्हांला सापडला आहे” (योहान 1:41; पृष्ठ 1116). पेत्र प्रथम शिष्य झाला नाही तर त्याने प्रथम येशूविषयी ऐकले.

हे खूप महत्वाचे आहे. “निर्णयवाद,” यावरील निबंधात डॉ. ए. डब्लू. टोझर स्पष्ट करतात की “पाप्यांची प्रार्थना” मुद्दाम म्हणवून घेणे यामुळे सहसा खरे ख्रिस्ती, खरे शिष्य निर्माण होत नाहीत. जेव्हां पहिल्यांदा पेत्राने येशूविषयी ऐकले तेव्हां त्याने “निर्णय” घेतला नाही. होय, पेत्राला रुची होती. त्याला अधिक ऐकायचे होते. परंतू तोवर नाही, जोवर बाप्तिस्मा करणा-या योहानाला अटक झाली नाही, त्यानंतर पेत्राने शिष्य म्हणून येशूला अनुसरण्याचे ठरविले.

“योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवत गालीलात आला व म्हणाला, ‘काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आहे आहे; पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा.’ नंतर गालील समुद्राजवळून जात असताना त्याला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया हे समुद्रात जाळे टाकताना दिसले, कारण ते मासे धरणारे होते. येशू त्यांना म्हणाला, ‘माझ्यामागे या म्हणजे तुम्ही माणसे धरणारे व्हाल, असे मी करीन.’ मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले” (मार्क 1:14-18; पृष्ठ 1046).

ती प्रत्येक व्यक्ति ज्याला तुम्ही ख्रिस्ताकडे आणण्याचा प्रयत्न करता — ती एका ठराविक बिंदूला ख्रिस्ताचे शिष्य व्हायचे की नाही हा निर्णय करील. हा संघर्ष आहे. हे युद्ध आहे. एक आठवडा किंवा एक महिना तो तुमच्या बरोबर मंडळीत येतो तेव्हां येथे संपले नाही. हे पुढे महिना वा त्याहून अधिक पुढे चालू राहते.

हे समजून न घेता कसे काय क्रिघटन चान यांना सुवार्तेमध्ये प्रभावशाली केले. त्यांना, पुष्कळ निर्णयवादी आवडतात, विचार करतात की ते “आत” आहेत जेव्हां त्यांना शुभवर्तमानाचे कच्चे “तथ्य” समजते. चान व वाल्ड्रीप सारखे निर्णयवादी नवीन लोकांना लगेचच दूर “जावू” देतात. खरे आत्मे — जिंकणे म्हणजे सततचे युद्ध आहे हे त्यांना समजत नाही. त्यामुळे खरे आत्मे — जिंकण्यासाठी ज्ञानाची गरज असते: “जो ज्ञानी असतो तो जिवास वश करतो” (नीतिसुत्रे 11:30; पृष्ठ 680). हे वचन असेही अनुवादित करु शकतो, “ज्याच्याकडे ज्ञान आहे तो आत्मे जिंकतो.” डॉ. ए. डब्लू. टोझर हुशारीने म्हणाले,

“दोघांच्या एका अनुभवात सर्वांचे तारण ढकलण्याचा प्रयत्न करुन, विकासाचा नियम जो सर्व निसर्गाद्वारे चालतो तो झटपट ख्रिस्तीत्वाचे वकील मुर्ख ठरवितात. ते दुःखसहन, वधस्तंभ वाहणे व प्रत्यक्षात आज्ञापालन यांचा पवित्र परिणाम दुर्लक्षित करतात. आध्यत्मिक प्रशिक्षणाची गरज, योग्य धार्मिक सवय लागण्याची गरज आणि जग, सैतान व देह यांविरुद्ध लढण्याची गरज आहे” (‘झटपट ख्रिस्तवाची’ कमतरता).

मोठे “मंडळी विभाजन” झाले त्या दरम्यान पेत्राची परिक्षा होती. इतर सोडून जात होते. पण पेत्राने न जाण्याचे ठरविले. इतरांबरोबर जायचे नाही हे ठरविले.

“ह्यावरुन त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. म्हणून येशू बारा शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमेन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणर? सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत; आणि आम्ही विश्वास ठेवला व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात” (योहान 6:66-69; पृष्ठ 1124).

येशू बारा जणांना म्हणाला, “तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय?” “मग शिमोन पेत्राने उत्तर दिले, प्रभूजी आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत” (योहान 6:67, 68). या उता-यातील दोन गोष्ट खूप महत्वाच्या आहेत.

1. जे मागे राहिले त्यांनी कधी पुन्हा काय ऐकले नाही! मला कळून आले की, सेवेच्या माझ्या 61 वर्षाच्या सेवाकार्यात, जे मंडळी सोडून मंडली तशीच टाकून गेले ते कधीच शिष्य बनले नाहीत. ज्याने केले तो कधीच दिसला नाही!

2. “फूटी” च्या द्वारे पेत्र गेला होता त्याचा पालट कधीच झाला नाही.

“आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते त्यांच्याकडील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले” (I योहान 2:19; पृष्ठ 1322).

“ते तुम्हांस असे सांगत असत की, शेवटल्या आपल्या कुवासनांप्रमाणे चालणारी कुटाळ माणसे निघतील. ती फूट पाडणारी, देहबुद्धीची, ज्यांस पवित्र आत्मा नाही अशी आहेत” (यहुदा 18, 19; पृष्ठ 1329).

जे सोडून जातात ते हे दर्शिवातात की ते वास्तवात ख्रिस्ती शिष्यत्वात नाहीत. एक शिष्य, खरे पालट झालेले म्हणून, केवळ कांही वचने पाठ करणे, किंवा कांही सिद्धांतार विश्वा ठेवणे पुरेसे नाही. शिष्यत्वामध्ये निर्णय घेऊन थआंबमे देखील असते; सोडून जाण्याची कोणतीही मनशा नसते, कारण “तेथे बाहेर” ह्याहून अधिक मुल्यवान कांहीच नसते. पेत्राने हे पाहिले — परंतू तरीही त्याचा पालट झाला नाही!

मला वाटते की तुम्हांला दिसतेय की आत्मा जिंकणे हा मोठा प्रकल्प आहे! हे केवळ नाव कमाविणे किंवा कोणाकडून प्रार्थना करुन घेणे नव्हे. तर जिवंत व्यक्तीच्या आत्म्यासाठी केलेला हा जिवंत संघर्ष आहे!

पालट व शिष्यत्व हे येशू कोण आहे याविषयी माहिती समजण्यापेक्षा कितीतरी अधिक आहे!

“तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहां. येशूने त्याला म्हटले, शिमोन बर्ना, धन्य तुझी; कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे” (मत्तय 16:15-17; पृष्ठ 1021).

येशू कोण होता हे देव जो पिता त्याने पेत्राला दाखविले (प्रकट) केले. वास्तवात येशू कोण आहे हे देवाने पेत्राला दाखविले. परंतू तरीही पेत्राचा पालट झाला नाही!!! पुष्कळांना वाटते की त्याचा पालट झाला होता. पण ते चुकीचे आहेत!

योहानाने पेत्राला येशू कोण आहे हे दाखविल्यानंतर — मग पेत्र शुभवर्तमान नाकारतोय!!!

“तेव्हांपासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिस-या दिवशी उठविले जावे ह्याचे अगत्य आहे. तेव्हां पेत्र त्याला जवळ येऊन त्याचा निषेध करुन म्हणाला, प्रभूजी, आपणांवर दया असो, असे आपल्याला होणारच नाही; परंतू तो वळून पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तू मला अडखळण आहेस कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही, माणसाच्या गोष्टीकडे आहे” (मत्तय 16:21-23; पृष्ठ 1022).

पेत्राने शुभवर्तमानाला विरोध केला. तो वधस्तंभावर जाणार व पुन्हा उठणार असे म्हणून त्याने येशूचा सुद्धा निषेध केला. त्याने शुभवर्तमान नाकारले! त्यामुळे, कादा व्यक्ती कित्येक वर्षे शिष्य असू शकतो व तरीही लिहू व भांडू शकतो. अगदी बरोबर!

तो किती खंबीर ख्रिस्ती होता याविषयी पेत्राने बढाई मारली. येशूला वधस्तंभावर द्यायच्या आदल्या रात्री, पेत्र त्याला म्हणाला, “आपणआंबरोबर मला मरावे लागले तरी मी आपल्याला नाकारणार नाही” (मत्तय 26:35; पृष्ठ 1038). परंतू तरीही कांही तासानंतर पेत्राने त्याला तीन वेळा नाकारले!

पेत्राने अजून जिंकले नव्हते! जेव्हां येशूला गेथशेमाने बागेत अटक झाली तेव्हां तो तेथून पळून गेला. त्याने मोठ्या तीन वेळा येशूला नाकारले. पेत्र हा इतर शिष्याप्रमाणे शिष्य होता — परंतू तरी त्याचा संघर्ष मात्र संपलेला नव्हता. तो अजून जिंकला नव्हता. तो अजूनही “आत” नव्हता!

जोवर येशू मरणातून उठला नाही तोवर हे होते शेवटी त्याचा पालट झाला. हे योहान 20:22 मध्ये नोंद आहे,

“असे बोलून त्याने [येशूने] त्यांच्यावर [पेत्र व इतर शिष्य] फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्विकार करा” (योहान 20:19-22; पृष्ठ 1144).

पवित्र शास्त्राचे समालोचक जॉन एलियोटनी आम्हांस सांगितले की प्रेषित योहानाला “त्या क्षणाचा त्यांच्या भविष्यातील जीवनावर कसा प्रभाव झाला व ते नवीन आत्मिक उत्पती झाले, त्यामुळे ते मरणातून जीवनात आले असे त्यांना म्हणू लागले” (एलियोट यांची संपूर्ण पवित्रशास्त्रावरील समालोचन) . आणि अर्थात, डॉ. जे. वरनॉन म्हणाले की, हे तेव्हां झाले जेव्हां येशू ज्या रात्री मरणातून उठला, त्या रात्री पेत्राचा पालट, नवा जन्म झाला! ( पाहा थ्रू द बायबल योहान 20:22 वरील).

जेव्हां पेत्राने येशूवर पूर्णपणे विश्वास ठेवला. नंतर तो लवकरच एक धाडसी प्रेषित झाला ज्याने पेंटाकॉस्टच्या दिवशी सुवार्ता सांगतली ज्यामुळे तीन हजार लोकांचे तारण झाले तेव्हां. त्यानंतर त्याला नाकारण्याऐवजी ख्रिस्ताकरिता मरण पत्करले. पण या सर्वां अगोदर, पेत्र चुकीची सुरुवात व अपयश व संघर्ष व अंतदृष्टि यातून गेला.

काय तुम्हांला दिसते का की आत्मे जिंकणे हे गंभीर, मोठे संघर्षमय आहे? हे एक फोन करुन किंवा प्रार्थना करुनही करता येते. हा पुरुष किंवा स्त्रीचा जीवन — आत्मा जिंकण्याचा जीवन — संघर्ष आहे. ह्यासाठी तुमच्या प्रार्थना लागतील. यासाठी तुमचे ज्ञान लागेल. यासाठी तुमचे प्रयत्न लागतील. यासाठी तुमचा वेळ लागेल. जर तुम्ही तुमच्या संपूर्ण जीवनात एखादा आत्मा जिंकला तरी, तुम्ही धन्य आहांत. तुम्ही पुष्कळ केले आहे. तुम्ही चांगले केले आहे. मी प्रार्थना करतो की तुम्ही हे तुमच्या जीवनात करावे.

हे करण्याकरिता हा तुम्हांस मोठा लांबचा रस्ता वाटतो का? काय तुम्हाला हे अतिशय कठीण व दूर वाटते का? येशू म्हणाला, “परंतू जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत” (मत्तय 7:14; पृष्ठ 1004).

परंतू पेत्राने शेवटचा संदेश दिला तो मला सांगू द्या. पेत्राला वधस्तंभावर देण्यापूर्वीचे त्याचे हे शेवटचे शब्द होते,

“आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्यांच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा, त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो” (II पेत्र 3:18; पृष्ठ 1320).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.