Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
खोटारडे ख्रिस्ती आढळून आले!

THE FALSE CHRISTIAN DISCOVERED!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 7 जुलै, 2019 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, July 7, 2019


“मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणा-या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भुते घालविली व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्ये केली नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, अहो अनाचार करणा-यांनो, माझ्यापुढून निघून जा” (मत्तय 7:21-23).

मी माझ्या उतारा 21 व्या वचनातून घेतला आहे,

“मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणा-या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल” (मत्तय 7:21).

हा उपदेश माझ्या विचारांवर आधारलेला नाही. तर स्वतः ख्रिस्ताच्या वचनांवर, आणि महान सुधारणावादी समालोचक मॅथ्यू मिड यांच्या प्रतिक्रियेवर बेतलेला आहे (1629-1699). पवित्रशास्त्राचे समालोचक जॉन मॅक्आर्थर यांनी अगदी बरोबर मिड यांचे, द अलमोस्ट ख्रिश्चन डिसकव्हर्ड पुस्तकास प्रोत्साहन दिले आहे. मी सुद्धा त्यास प्रोत्साहन देतो.

“मला ‘प्रभूजी, प्रभूजी’ असे म्हणणा-या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही; तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल” (मत्तय 7:21).

एखाद्या व्यक्तीकडे पुष्कळ जगीक किवा ख्रिस्ताविषयी ज्ञानसंपदा असते, व तरीही तो पापात पडू शकतो. परुश्यांकडे पुष्कळ ज्ञान होते, परंतू ते त्या काळातील ढोंगी होते. दुर्दैव! हे की पुष्कळजण ज्ञान असून नरकात गेले आहेत! थोडकी माहिती असताना अधिक जाणून घेणे ही झाली जिज्ञासा. दिखाव्यासाठी जाणून घेणे ते सर्व व्यर्थ आहे. जाणून घेणे व त्याप्रमाणे वागणे म्हणजे खरे ख्रिस्तीत्व होय!

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

एखाद्या व्यक्तीकडे मोठ मोठी आध्यात्मिक वरदानें असतात व तरीही तो पापात पडू शकतो. प्रार्थनेचे वरदान हे आध्यात्मिक वरदान आहे. एखादा व्यक्ती प्रार्थना चांगली करतो तरीही तो पापात पडू शकतो. एखाद्या मनुष्याकडे सुवार्तेचे वरदान असते व तरीही तो तारण न पावलेला असू शकतो. यहुदा हा मोठा प्रचारक होता. यहुदा म्हणाला, “प्रभूजी प्रभूजी, आम्ही तुमच्या नावाने [सुवार्ता] गाजविली, तुझ्या नावाने आम्ही भुते घालविली.” जो खरा ख्रिस्ती कदाचित खूप छान-प्रार्थना करीत असेल, आणि खूप छान-सुवार्ता गाजवित असेल व तरीही तो खरा ख्रिस्ती असणार नाही. एखादा मनुष्य आपल्या प्रार्थना व सुवार्ता सांगण्याद्वारा इतर लोकांना मदत करीत असेल व तरीही तो या संबंधाने स्वतःला मदत करु शकत नाही.

सुवार्ता प्रचार व प्रार्थनेचे सामर्थ्य हे प्रचारकाच्या अधिकारावर अवलंबून नसते, तर देवाचा अधिकार जो आशिर्वाद देतो त्यावर अवलंबून असतो. त्याच्या प्रचारामुळे कोणाचा तरी पालट झाला असेल, आणि तरीही त्या प्रचारकास नरकातच टाकले जाऊ शकते! पेंडलटॉन याने सँडर्सला क्विन्स मेरीच्या दिवसामध्ये सुवार्तेकरिता उभे राहण्यास प्रचार केला होता, तरीही तो विश्वासापासून दूर केला त्यामुळे तो नरकात गेला! मला एक तरुण ठाऊक आहे जो सामर्थ्यवान प्रचारक होता, पण नंतर तो ढोंगी असा सिद्ध झाला! एखादा मनुष्य प्रेषितासारखा उपदेश करतो व देवदूतांसारखा प्रार्थना करतो, तरीही त्याचे हृदय सैतानी असू शकते! एखाद्या मनुष्याकडे मोठी वरदानें असतील आणि तरीही तो पापात असू शकतो. एक महान बिशप म्हणाले, “गरीब, अशिक्षीत यांना स्वर्ग प्राप्ती होईल, परंतू आपण, जे सर्व शिक्षीत नरकात पडू शकतो.” एखाद्या मनुष्याकडे मोठी वरदानें असतील आणि तरीही तो पापात हरविलेला असू शकतो. मोहरीच्या दान्याएवढी खरी कृपा जरी असेल तरी ती दहा पौंड वरदानांपेक्षा अधिक असू शकते. यहुदाने ख्रिस्ताचे अनुकरण केले! त्याने ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगितले, त्याने ख्रिस्ताच्या नावांत, भुते घालीविली, ख्रिस्ताप्रमाणे त्याच मेजातून ते खाल्ले किंवा पिल्ले, तरीही यहुदा हा केवळ ढोंगी असा होता, नरकात “जो आपल्या स्थानी” गेला! त्याने पवित्र असण्याचा बनाव केला आणि मात्र चांगुलपणाचा नमुना असणे असे “चांगुलपणाने वागला नाही, पण त्याने त्याचे सामर्थ्य नाकारले.”

एक व्यक्ति ख्रिस्ती असल्याचे दर्शविते, आणि तो अंतःकरणातून कधीही बदलला नाही. तो एक ढोंगी आहे जो चांगला असल्याचे दाखवितो, परंतू तो गर्व व बंडखोरी वृत्तीने भरला आहे. पुष्कळजण धार्मिक असल्याचे दर्शवितात, खरेतर त्यानी त्यांचा गर्व व बंडखोरी वृत्ती लपविण्यासाठी, ते धार्मिकतेचा बुरखा घातलेला असतो. परंतू जो मनुष्य सेमीनरीत गेला व ज्याचे ऑर्डीनेशन झाले त्याचे हे वर्णन आहे. पण अंतःकरणात मात्र बदल झालेला नसतो. त्यामुळे त्याने एका सुंदर मुलीच्या मागे लागून आमची मंडळी सोडली. “कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून गेला” (II तिमथी 4:10). हे डॉ. क्रिगटन एल. चान यांचे वर्णन दर्शविते, जो एक ढोंगी म्हणून सिद्ध झाला होता त्याचवेळी त्याचा गर्व व बंडखोरपणा दिसून आला, जेव्हां त्यांचा हा बुरखा बाजूला गेला व आम्ही त्याला ढोंगी असे पाहिले.

“त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, ‘प्रभो, प्रभो, [आम्ही] तुझ्या नावाने संदेश दिला [नाही] काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, अहो अनाचार करणा-यांनो, माझ्यापुढून निघून जा.”

उंदीर व मांजर एका घरात राहू शकतात. पण जेव्हां ते पडतांना दिसेल, तेव्हा ते पळून जातील, कारण दुसरी सुरक्षित जागा ते शोधतील. सुखाच्या काळात पुष्कळ ढोंगी मंडळीत येतील. परंतू जेव्हां मंडळी हादरेल, तेव्हां ते पळून जातील – मागे ते काय बोलले याची तमा न बाळगता. हे पाहा त्यातील कांहीजण.

एक मनुष्य म्हणाला,“तो मला जिकडे घेऊन जाईल तिकडे जाईन. जरी मला त्रास किंवा छळ सोसावा लागला तरी येशूने...मला जीवन दिले आहे. येशूच्या मौल्यवान नावाची स्तुति असो.” परंतू जेव्हां मडंळी तुटू लागली तेव्हां पहिला पळून जाणारा हाच होता.

एक चीनी मुलगी म्हणाली, “देवाने माझ्या जीवनात ज्या महान गोष्टी केल्यात त्या लोकांनी जाण्याव्या असे मला वाटते. देवाने त्याच्या साक्षीसाठी माझा उपयोग करुन घ्यावा.” परंतू मंडळी तुटण्याच्या पूर्वीच ती पळून गेली!

आणखी एक चीनी मनुष्य म्हणाला,“येशूने तारण करणे किती महान आहे हे मी सांगू शकत नाही...माझ्यासाठी ख्रिस्ताने ज्या महान गोष्टी केल्या त्या इतरांनी जाणाव्यात असे मला वाटते.” चानच्या मागे लागून लगेचच त्याने मंडळी सोडून दिली, आणि त्याच्या बोलण्याला कांही अर्थ नव्हता हे दर्शविले. तो नरकात जाणारा, पापात हरविलेला ढोंगी आहे!

विएतनाम मधील एक तरुण म्हणाला,“येशूचे माझ्यावर असलेल्या सर्व प्रेमानिशी, त्याच्यावर मी पुरेसे प्रेम करु शकत नाही. येशू, माझा तारणारा त्याला मी माझे जीवन देतो.” एका वर्षानंतर तारणा-याला नाकारले, आणि अधिच विश्वास त्याग केलेल्या चान बरोबर मंडळी सोडली.

आणखी एक महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणाला,“येशू ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताने धुवून शुद्ध केल्याबद्दल देवाचे मी आभार मानतो. प्रभूची स्तुति असो!” चांगले वाटते, नाही का? परंतू असे म्हटल्यानंतर लगेचच ती म्हणाली की, ती परत पापात गेली व आमची मंडळी सोडली.

एक जपानी/अमेरिकी मुलगी म्हणाली,“माझी साक्ष अगदी सोपी आहे. मी येशूवर विश्वास ठेवला, व त्याने माझे तारण केले” – आणि विश्वास त्याग केलेल्या चान बरोबर मंडळी सोडली व तिने अशी परतफेड केली!

एक मेक्सिकन मनुष्य म्हणाला,“प्रेमळ तारणा-याने माझ्यावर दया केली, आणि ती कधीही विसरणार नाही” – पण कांही काळानंतर तो जे बोलला ते विसरुन गेला, आणि विश्वास त्याग केलेल्या चान बरोबर पळून गेला. तो बंडखोर ढोंगी, त्याग केलेल्या चान बरोबर उभा असलेला त्याचा फोटो माझ्याजवळ आहे.

चीन मधील एक तरुण स्त्री म्हणाली,“येशू माझ्यावर प्रेम करतो! आता मी माझा तारणारा, येशू ख्रिस्त याच्यासाठी गीत गाऊ इच्छितो!” चांगले वाटते, नाही का? पण लगेचच तिने आमच्या मंडळीचा विश्वासघात केला व विश्वास त्याग केलेल्या चान बरोबर मंडळी सोडली!

कोणीतरी मला म्हणाले की, “डॉ. हायमर्स, अधिक चीनी लोकांना आणू नका. ते सर्व दु−तोंडी ढोंगी आहेत!” ब-याच अंशी खरे आहे, जोवर त्यांचे ख-या अर्ताने परिवर्तन होत नाही तोवर मी जसे म्हणालो तसे ते पापात हरविलेल्या एकासारखे आहेत. येशू म्हणाला, “तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे” (योहान 3:7).

“स्वस्ताची कृपा” व “सोपा विश्वासूपणा” ह्या नव्या संज्ञा आहेत, परंतू “अभिषेकपणा” नाही. मार्टिन ल्युथर (1483-1546) यांनी ही आपणांस व्याख्या दिली आहे. ही ह्यांना संदर्भित करते जे तारणाचे सर्व फायदे घेऊ इच्छितात परंतू त्यांना कोणतीही बंधने मात्र नकोत (सोली डिओ ग्लोरिया पब्लिकेशन्स, द अलमोस्ट ख्रिश्चन डिस्कव्हर्ड, हे मॅथ्यू मिड यांचे जॅकेट कव्हर, अग्रलेख जॉन मॅक्आर्थर यांच्याद्वारा).

विश्वास त्याग करणा-या चानच्या लोकांपैकी एकजण म्हणतो, “डॉ. हायमर्सना वाटते की त्यांच्या मंडळीत आल्याशिवाय कोणाचेही तारण होत नाही.” असे हे विश्वास त्याग करणारे आपले हरविलेपण व दुष्ट पाप लपविण्यासाठी कोणतेही खोटे बोलू शकतात. आणि अशाप्रकारच्या व्यक्तीचे मला आश्चर्य वाटले नाही, कारण त्याला पूर्ण ठाऊक आहे की मी असे कधीही बोललो नाही − किंवा माझा यावर विश्वास नाही.

परंतू मंडळी ही “ख्रिस्ताचे शरीर” आहे असा माझा विश्वास आहे (इफिस 4:12). जे त्याची मंडळी सोडून जातात ते त्याचे शरीर दुबळी बनवितात. जे त्याच्या मंडळीवर हल्ला करतात, ते त्याच्या शरीरावर हल्ला करतात. जे त्याची मंडळी फोडतात, तो त्याचे शरीर फोडतात. जे त्याच्या मंडळीचे सभासद नाहीत, ते त्याच्या शरीराचेही सभासद नाहीत. बरेच नवीन-सुवार्तिक शास्त्रलेख गंभीरतेने घेत नाहीत. त्यामुळेच ते ख्रिस्ताच्या शरीरास सोडून जाता आहेत!

कांही लोक त्यास “मार्गदर्शक खूण” म्हणून बघतात. त्याला तुम्ही काय म्हणता याची मला गरज नाही, ही पवित्रशास्त्रीय स्थिती आहे. मंडळी ही “ख्रिस्ताचे शरीर” आहे!

या सकाळी मी तुम्हांस येशूकडे येण्याचे आमंत्रण देतो आहे. तो मरणातून पुन्हा उठला आहे. तो स्वर्गात, देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. येशूकडे या. जग व पापापासून परत फिरा. येशूवर भरवंसा ठेवा, आणि तो त्या मोलवान रक्ताने तुमची सर्व पापे शुद्ध करील! येशूवर भरवंसा ठेवा, आणि तुम्ही त्याच्या शरीराचे सहभागीदार व्हाल, जी त्याची ही मंडळी आहे. आमेन.

जर तुम्हांला ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासंबंधाने आमच्याशी बोलावयाचे आहे तर आताच पुढच्या रांगेत येऊन बसा. आम्ही गीत क्र.5 “जसा मी आहे,” म्हणतो आहोत तेव्हां तुम्ही या.

जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार
की वाहे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा!

आलो तसाच, करु काय? व्हायास शुद्ध हीनोपाय;
तुझेच रक्त दे सहाय, देवाच्या प्रिय कोकरा!

आलो तसाच अंधळा, दुःखी दरिद्रि दुबळा,
साठा तुझाच सगळा, पुरीव प्रिय कोकरा!
   (“जसा मी आहे” शार्लोट एलियोट यांच्याद्वारा, 1789-1871, पाळकानी यात बदल केला).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.