Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
ख्रिस्त त्याचे पृथ्वीवरील राज्य कसे प्रस्थापित करील

HOW CHRIST WILL SET UP HIS EARTHLY KINGDOM
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 13 जानेवारी, 2019 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, January 13, 2019

“आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतूनझाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हां जैतूनझाडाच्या डोंगर पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल; अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. तुम्ही माझ्या डोंगराच्या को-याकडे धावाल; कारण डोंगराचे खोरे असलापर्यंत जाऊन भिडेल; व यहुदाचा राजा उज्जीया याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल; परमेश्वर माझा देव येईल, तुजसमागमे तुझे सर्व भक्त येतील; ...तेव्हां परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील” (जख-या 14:4-5, 9).


कुमारी मरियेच्या पोटी, तसेच बेथलेहेम येथे गव्हाणीत जन्मलेल्या, ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या संबंधाने जगातील जवळजवळ सर्वानी ऐकलेले आहे. हो, तुम्ही सर्वांनी ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या संबंधाने ऐकलेले आहे. आणि पवित्रशास्त्रात त्याच्या दुस-या आगमनाचा संदर्भ हा पहिल्या आगमनाच्या संदर्भाशी आठास एक असा आहे तरीहि. डॉ. डेव्हीड जर्मियाह म्हणाले,

शास्त्रपंडीत दुस-या आगमनासंबंधीचे पवित्रशास्त्रीय संदर्भ 1,845 एवढे मोजतात, नवीन करारातील 318 संदर्भासह. जुन्या करारात सतरा पुस्तकापेक्षा कमी नाही आणि नवीन करारात दहापैकी सात अध्यायात त्याच्या परत येण्याविषयी भर दिलेला आहे. [ख्रिस्ताने] स्वतः त्याच्या परत आगमनासंबंधाने एक-वीस वेळा सांगितलेले आहे. नवीन करारातील दुसरा सर्वात प्रभावशाली विषय हा केवळ दुसरे आगमन आहे (डेव्हीड जर्मियाह, डी.डी., व्हाट इन द वर्ल्ड इज गोइंग ऑन?, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 2008, पृष्ठ 217).

ख्रिस्ताच्या दुस-या आगमनासंबंधीचा शास्त्रलेख हा आपला उतारा जख-या 14:4-5, 9 मध्ये अगदी सुस्पष्ट आहे. ह्या उता-यातून आपण तीन धडे शिकतो.

I. प्रथम, ख्रिस्त हा जैतूनाच्या डोंगरावर येईल.

स्कोफिल्डच्या टिपण्णी अगदी बरोबर आहेत हे मला पटले आहे.

जख-या 14 हा ह्या संपूर्ण विषयाचा संक्षिप्त भाग आहे. ह्या [घटनेचा] क्रम असा आहे: (1) राष्ट्रांना एकत्र करणे, वचन 2 (“हर्मगिदोन”, प्रकटी. 16:14; 19:11, वरील टिपण्णी पाहा); (2) सुटका, वचन 3; (3) ख्रिस्ताचे जैतूनाच्या डोंगरावर परत येणे, आणि भौतिक दृष्य बदलणे, वचन 4-8; (4) राज्याची स्थापना करणे, व पूर्णतः जगीक आशिर्वाद, 9-21 (स्कोफिल्ड स्टडी बायबल, 1917 आवृत्ती, पृष्ठ 978; जख-या 13:8 वरील टिपण्णी).

परराष्ट्रीयांवर जो राज्य करितो, तो ख्रिस्तविरोधक मुख्य आहे, तो इस्त्राएल विरोधात आपली सेना, ज्यांस हर्मगिदोन म्हणतात म्हणजेच मेगीद्दो खो-यात पाठविल. ख्रिस्तविरोधकाचे सैन्य यरुशलेम जवळ येईल, पण अकस्मात स्वर्गातून ख्रिस्त येईल व त्यांच्यावर विजय मिळविल. कृपया उभे राहा व जख-या 14:3-4 वाचा.

“तेव्हां परमेश्वर पुढे सरसावेल; पूर्वी युद्धसमयी ज्या प्रकारे त्याने युद्ध केले त्या प्रकारे त्या राष्ट्रांबरोबर तो युद्ध करील. आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतूनझाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हां जैतूनझाडाचा डोंगर पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल; अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणकडे सरेल” (जख-या 14:3-4).

आपण खाली बसू शकता.

“त्या दिवशी त्याचे पाय जैतूनझाडाच्या डोंगराला लागतील” (जख-या 14:4). जैतूनझाडाचा डोंगर हा यरुशलेमेच्या अगदी पूर्वेला आहे. हाच तो डोंगर ज्यावर येशू रात्रीचा प्रार्थनेस गेला होता व तेव्हां त्यास अटक केली गेली. प्रे.कृ. 1:9-12 मध्ये नोंद केल्याप्रमाणे, त्याच डोंगरावरुन येशूने स्वर्गारोहण केले होते.

“असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यादेखत तो वर घेतला गेला, आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीआड केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हां पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालीलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पहात उभे राहिला? हा जो येशू तुम्हांपासून वर आकाशात घेतला गेला आहे तोच, तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले, तसाच येईल. मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनाचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरुन ते यरुशलेमेस परत आले” (प्रेषित.1:9-12)

“त्या दिवशी त्याचे पाय जैतूनझाडाच्या डोंगराला लागतील” (जख-या 14:4). त्याच पायात वधस्तंभावर असतांना खिळे ठोकले होते ते पाय पुन्हां स्वर्गातून उतरतांना त्याच डोंगराला लागतील प्रेषित.1:9.

“आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतूनझाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हां जैतूनझाडाचा डोंगर पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल; अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणकडे सरेल” (जख-या 14:4). डॉ. मॅक् गी म्हणाले,

मोठा भौतिक बदल होणार यासंबंधी येथे नमुद केले आहे. मोठा धरणीकंप होईल, जैतुनझाडाचा डोंगर मधोमध दुभागेल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. “आणि तेथे एक मोठे खोरे उत्पन्न होईल” (जे. वरनॉन मॅक् गी, टीएच.डी., थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 1982, आवृत्ती III, पृष्ठ 986).

अशाप्रकारे, पहिला मुद्दा असा आहे की – ख्रिस्त स्वर्गातून जैतुनाच्या डोंगरावर परत येईल.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

II. दुसरे, ख्रिस्त हा आपल्या सर्व पवित्र जनांसह परत येईल.

शेवटच्या पाचव्या वचनाकडे पाहा.

“परमेश्वर माझा देव येईल, तुजसमागमे तुझे सर्व भक्त येतील” (जख-या 14:5)

म्हणजेच पूर्वी ज्यांचे लोकांतरण झाले ते सर्व, ख्रिस्ताच्या पाठोपाठ स्वर्गातून जैतुनाच्या डोंगरावर, खाली येतील. ह्या घटनेसंबंधी पहिली भविष्यवाणी हनोखने केली होती.

“आदामापासून सातवा पुरुष हनोख ह्याने त्यांना उद्देशून असा संदेश दिला की, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसह आला” (यहुदा 14).

आणि प्रेषित योहान प्रकटी. 19:14 मध्ये म्हणाला, “स्वर्गातील सैन्ये पांढरी व शुद्ध अशी तागाची वस्त्रे घालून त्याच्यामागे चालत होती,” तो ख्रिस्त विरोधकाच्या सैन्याचा नाश करण्यास जैतुनाच्या डोंगरावर येणार. डॉ. जर्मियाह म्हणाले,

ख्रिस्ताबरोबर स्वर्गातील सैन्य त्याच्या दुस-या आगमनाच्या वेळी असेल ते पवित्रजन व देवदूत−तुमच्या माझ्यासारखे लोक बाजू− बाजूला स्वर्गिय सामर्थ्याने युक्त उभे राहिलेले असू त्या सर्वांनी बनलेली असेल...ते सैन्य लढणार नाही. तर येशू स्वतः त्या बंडखोरांचा शिरच्छेद करील (डेव्हीड जर्मियाह, ibid., पृष्ठ 224).

“परमेश्वर माझा देव येईल, तुजसमागमे तुझे सर्व भक्त येतील” (जख-या 14:5).

डॉ. मॅक् गी म्हणाले,

हा शास्त्रलेखाचा उतारा खूपच मनोरंजक आहे. प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर परत येण्याचे हे दृष्य आहे. आपणांस हे प्रकटीकरण 19 मध्ये सुद्धा आढळते जेथे स्वर्गातील सैन्य त्याच्या मागे येईल असे सांगितलेले आहे (जे. वरनॉन मॅक् गी, ibid.).

जख-याच्या भविष्यवाणी मधील हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे – ख्रिस्त हा त्याच्या पवित्र जनांसह ख्रिस्तविरोधकाच्या सैन्यावर विजय मिळविण्यास परत येणार आहे. त्या समयी सर्व काळातील, सर्व खरे विश्वासणारे, ख्रिस्ताबरोबर पृथ्वीवर परततील.

लाखोच्या लाखो लाखो संख्येने
   पांढरे शुभ्र चमकदार वस्त्रे घालून,
खंडणी भरुन विकत घेतलेले सैन्य
   प्रकाशाची पावले सर्वत्र पसरतात;
हे पूर्ण झाली, सर्व पूर्ण झाली,
   त्यांची मृत्यू व पापाबरोबरची लढाई;
तडाख्याने सुवर्ण दरवाजा पूर्णपणे उघडतो,
   आणि विजय मिळविणा-यांना आत घेतो.
(“टेन थाऊझंड टाईम टेन थाऊझंड” हेन्री अलफोर्ड यांच्याद्वारा, 1810-1871).

जॉन केन्निक व चार्ल्स वेस्ली लिहतात,

पाहा! तो मेघासह खाली उतरतो,
   एकदा आमच्या तारणाच्या वधण्यास;
हजारोच्या हजारो पवित्र जनांसह,
   त्याच्या विजयोत्सवी रथाच्या नादासह;
हालेलुया! हालेलुया!
   पृथ्वीवर राज्य करण्यास देव अवतरील.
(“लो! ही कम्स” जॉन केन्निक यांच्याद्वारा, 1718-1755;
      चार्ल्स वेस्लीनी बदल केला, 1707-1788).

III. तिसरे, ख्रिस्त त्याचे पृथ्वीवरील राज्य प्रस्थापित करण्यास परत येणार.

कृपया उभे राहा व जख-या 14:9 मोठ्याने वाचा.

“तेव्हां परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील” (जख-या 14:9).

आपण खाली बसू शकता. त्यासमयी परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल. शेवटी, दोन हजार वर्षापूर्वी ख्रिस्ती लोकांनी केलेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल.

“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहि तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” (मत्तय 6:10).

आणि त्याचे पृथ्वीवरील राज्य हे एक हजार वर्षाचे असेल. कृपया प्रकटीकरण, अध्याय 20, वचन 4 ते 6 काढा. ती वचने मोठ्याने वाचा.

“नंतर मी राजासनें पाहिली, त्यावर कोणी बसले होते; त्यांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार दिला होता; आणि येशूविषयीच्या साक्षमुळे व देवाच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि कपाळावर त्याची खूण धारण केलेली नव्हती, त्यांचे आत्मेहि पाहिले; ते जिवंत झाले आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. मृतांपैकी बाकीचे लोक, ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत जिवंत झाले नाहीत. हेच पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा लोकांवर दुस-या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील” (प्रकटी 20:4-6).

यहोवा विटनेस वाले 1,000- वर्षाच्या राज्याविषयी विश्वास ठेवतात. पण त्यात प्रवेश कसा करायचा हे त्यांना स्वतःला ठाऊक नाही! “सर्व कष्टाचा लवकरच अंत होणार!” अशा शिर्षकाचे यहोवा विटनेसची हस्तपत्रिका माझ्या कार्यालयात आहे. त्या हस्तपत्रिकेच्या शेवटी असे म्हटलेले आहे की, “अंत होणार, तेव्हां कोणाचा बचाव होईल?...जो यहोवाची इच्छा जाणून त्याप्रमाणे करील त्याचा” (“सर्व कष्टाचा लवकरच अंत होणार!”, वॉच टॉवर बायबल अँड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ पेनसिल्विया, 2005, पृष्ठ 6). अशाप्रकारे यहोवा विटनेस शिकवितात की त्याच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी देवाचे सत्य “जाणून घ्या” “व त्याप्रमाणे करा.” ही सर्वात मोठी चूक आहे. सतकृत्यां द्वारे तारण — कांहीतरी “शिकणे” किंवा “कर्म करणे” या द्वारा तारण यासंबंधीची चूक! विचित्रपणा हा की, यहोवा विटनेसवाल्यांची चूक ही रोमन कॅथलिकांप्रमाणेच आहे ज्याविषयी ते वारंवार बोलतात. कॅथलिक व यहोवा विटनेस दोघेहि तारण हे कर्म केल्याने मिळते, शिकणे किंवा कर्म करणे या द्वारा तारण मिळते असे शिकवितात!

परंतू पवित्रशास्त्र शिकविते की तारण हे शिकणे किंवा कर्म करणे या द्वारा नव्हे, तर कृपेने मिळते; तसेच मानवी प्रयत्नाने नव्हे, तर केवळ कृपेनेच मिळते.

“कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही” (इफिस 2:8-9).

जॉन न्युटन म्हणाले,

अद्भूत कृपा! किती गोड हा आवाज
   माझ्या सारख्या पाप्यांचे तारण केले!
कधीकाळी मी हरविलो होतो, पण आता मी सापडलो आहे;
   मी आंधळा होतो, पण आता पाहू शकतो.


मी भय धरावे म्हणून माझ्या ह्दयात त्या शिकविल्या,
   आणि कृपेने माझी भीति घालविली;
किती मौल्यवान जी कृपा मिळाली
   ती वेळ जेव्हां प्रथम मी विश्वास ठेवला!
(“अमेझिंग ग्रेस” जॉन यांच्याद्वारा, 1725-1807).

देव तुम्हांला त्याची कृपा पुरवो

“प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल” (प्रेषित. 16:31).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि. जॅक नगान यांनी गायले: “ही इज कमिंग अगेन”
(मेबल जॉन्स्टन कॅम्प यांच्याद्वारा, 1871-1937).
“He is Coming Again” (by Mabel Johnston Camp, 1871-1937).


रुपरेषा

ख्रिस्त त्याचे पृथ्वीवरील राज्य कसे प्रस्थापित करील

HOW CHRIST WILL SET UP HIS EARTHLY KINGDOM

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतूनझाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हां जैतूनझाडाच्या डोंगर पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल; अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल. तुम्ही माझ्या डोंगराच्या को-याकडे धावाल; कारण डोंगराचे खोरे असलापर्यंत जाऊन भिडेल; व यहुदाचा राजा उज्जीया याच्या काळात झालेल्या भूमिकंपापासून जसे तुम्ही पळाला तसे पळाल; परमेश्वर माझा देव येईल, तुजसमागमे तुझे सर्व भक्त येतील; ...तेव्हां परमेश्वर सर्व पृथ्वीवर राजा होईल; त्या दिवशी परमेश्वर तेवढा व त्याचे नाम तेवढे राहील” (जख-या 14:4-5, 9).

I. प्रथम, ख्रिस्त हा जैतुनाच्या डोंगरावर परत येईल,
जख-या 14:3-4; प्रेषित. 1:9-12.

II. दुसरे, ख्रिस्त हा आपल्या सर्व पवित्र जनांसह परत येईल, जख-या 14:5;
यहुदा 14; प्रकटी. 19:14.

III. तिसरे, ख्रिस्त त्याचे पृथ्वीवरील राज्य प्रस्थापित करण्यास परत येणार,
जख-या 14:9; मत्तय 6:10; प्रकटी. 20:4-6; इफिस 2:8-9; प्रेषित. 16:31.