Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
पवित्रशास्त्र व स्थानिक मंडळीचा विश्वासघात करणारा

THE BIBLE AND TRAITORS TO A LOCAL CHURCH
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत
व रेव्ह. जॉन सॅम्युएल कागॅन यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 4 नोव्हेबंर, 2018 रोजी
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, November 4, 2018

“आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीहि आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले” (I योहान 2:19).


अल्बर्ट कॅमस व जीन-पौल सारत्रे हे दोघे तत्ववेत्ते होते ज्यांनी अस्तित्ववाद प्रसिद्ध केला. सध्या त्यांचे तत्वज्ञान ब-याच लोकांची विचारप्रणाली अधोरेखीत करते, जरी ते वास्तववादी नसले तरी. डॉ. आर. सी. स्प्राउल म्हणाले, “आम्ही जीवनातील प्रत्येक दिवशी व संस्कृतीच्या प्रत्येक पुर्जात आभासीरित्या अस्तित्ववादाच्या प्रभावाला सामोरे जातो...आम्ही दररोज त्याच्या प्रभावाखाली जगत आहोत” (डॉ. आर. सी. स्प्राउल, लाईफविव्ज, फ्लेमिंग एच. रेव्हल, 1986, पृष्ठ 49).

कॅमस व सारत्रे यांच्या अस्तित्ववादाचा मूल विषय “देवहीन जगातील मनुष्याच्या एकाकीपणा” यावर भर देतो (डॉ. जॉन ब्लॅँचर्ड, नास्तिकपणावर देवाचा विश्वास आहे?, इव्हांजिलीकल प्रेस, 2000, पृष्ठ 138).

आपण “दररोज” ह्या तत्वज्ञानाच्या “प्रभावाखाली” जगत आहोत असे जे आर. सी. स्प्राउल यांचे म्हणणे आहे ते बरोबर आहे? होय, असे मला वाटते. त्यामुळे एकाकीपणाच्या ह्या विषयात मोठे आवाहन आहे, विशेषत: तरुणांना. हे तत्वज्ञान कोठून आले, किंवा ते कोण म्हणाले हे समजून न घेता, त्याची जाणीव होऊ द्या – “देवहीन जगातील माणसाचा मूलभूत एकाकीपणा.” ह्या वाक्यांशामध्ये सत्य आहे. प्रत्येक तरुणांना ते जाणवतेt – “देवहीन जगातील माणसाचा मूलभूत एकाकीपणा.”

आणि तुम्हांस गर्दीतहि एकाकीपणा जाणवू शकतो. गोंगाटात, किंवा गर्दीतील मॉलमध्ये, सुद्धा तुम्हांस एकाकीपणा वाटू शकतो. एका मुलाने आमचे पाळक, डॉ. हायमर्स म्हणाला, “मला खूप एकाकी वाटते मला कळत नाही की मी काय करावे.” कांही आठवड्यानंतर त्याने आत्महत्या केली. आणि सध्या बरीच तरुण मुले एकाकीपणाच्या भावनेने अगदी पीडीत आहेत. हा अस्तित्ववादाचा परिपाक आहे ज्याने “आपल्या संस्कृतीचा प्रत्येक अंग” व्यापला आहे.

एकाकीपणा ही समस्या आहे, पण त्यावर उपाय काय आहे? त्यावर इलाज काय आहे? येशू ख्रिस्ताला वैयक्तिकरित्या ओळखणे – आणि स्थानिक मंडळीत देवाच्या कुटंबाचा हिस्सा बनून राहणे हा उपाय आहे. “एकाकी का व्हायचं? असे म्हणतो तेव्हां आपण अस्तित्ववादाच्या भयास उत्तर देत असतो. मंडळीत – आपल्या घरी या! हरवून का जाताय? घरी या – येशू ख्रिस्ताकडे, देवाच्या पुत्राकडे या!” असे जेव्हां आपण म्हणतो तेव्हां कॅमस, व सात्रे, आणि सर्वसाधारणपणे अस्तित्ववादाला उत्तर देतो! असे जेव्हां आपण म्हणतो तेव्हां वेदना, एकाकीपणा, आधुनिक जगाच्या अर्थहीन वेगळेपणाला आपण उत्तर देतो! त्याला ओरडा! त्याला बोला! लांब व रुंद त्याला सांगा! एकाकी का व्हायच? घरी या – मंडळीत या! का हरवून जायचं? घरी या – येशू ख्रिस्ताकडे, देवाच्या पुत्राकडे या!

पण असेही कांही जण आहेत ज्यांना इतरांशिवाय एकच हवे असते. त्यांना येशू ख्रिस्तातील परिवर्तनाशिवाय केवळ स्थानिक मंडळीबरोबर मैत्री हवी असते. पण शेवटी ते काम करीत नाही. त्यांनी एकत्र जायला हवे. अशाप्रकारे ख्रिस्तीपणा – मंडळीबरोबर मैत्री व येशू ख्रिस्तातील परिवर्तन हे बरोबरीने एकत्र चालले पाहिजे. तुम्हांस इतराशिवाय एक असू शकत नाही!

परिवर्तनाशिवाय केवळ मैत्रीचा प्रयत्न करता तर काय घडते ते पाहा. सरतेशेवटी सहभागिता संपणार. लगेच किंवा नंतरहि ते काम करणार नाही. तेच तर आपला हा उतारा सांगतो आहे.

“आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर
आपल्याबोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीहि आपला नाही हे प्रकट
व्हावे म्हणून ते निघाले” (I योहान 2:19).

डॉ. डब्लू. ए. क्रिसवेल म्हणाले, “कांही जण आमच्या मंडळीतून बाहेर पडले...त्यांचे निघून जाणे हे त्यांच्याकडे तारणासाठी लागणारा विश्वास, व तसेच खरी सहभागिता नव्हती हे दर्शविते” (द क्रिसवेल स्टडी बायबल, I योहान 2:19 वरील टिपण्णी). हे पाहा I योहान 2:19 चे आधुनिक भाषांतर,

“ते आमच्यातूनच बाहेर निघाले, पण ते ख-या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर ते आमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचा नव्हता” (I योहान 2:19 NIV).

चला ह्या उता-यावर अधिक विचार करु.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

I. प्रथम, त्यांनी काय केले.

डॉ. क्रिसवेल म्हणाले, “मंडळ्यातून कांही जण सोडून गेले.” पण निसंशयपणे ते मंडळीत केवळ सहभागितेचा आनंद उपभोगण्यासाठी येत होते. आरंभीच्या रोमी जगतातील मंडळ्या थंडपणा व निर्दयताने भरलेल्या मैत्रीचे ठिकाण होते. त्या लोकांना मंडळीतील उबदारपणा व मैत्री आवडत होती,

“देवाची स्तुति करीत, सर्व लोक त्यांना प्रसन्न असत” (प्रेषित 2:47).

पण त्यांना लगेचच कळते की ख्रिस्ती जीवन हे सोपे नाही. कांहीना हे कळाले की सोडून जातात. प्रेषित पौल म्हणाला,

“कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकांस गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला. लुक मात्र माझ्याजवळ आहे” (II तिमथी 4:10-11).

जेव्हां छळ झाला तेव्हां देमास, क्रेस्केस व तीत सोडून गेले.

असे सध्या घडते की नाही? होय असे घडते. कांही काळाकरिता लोक मंडळीत येतात. ते मंडळीत केलेल्या मैत्रीचा आनंद घेतात. त्यांना ही सर्व मजा वाटते. पण मग कांहीतरी येते. मी अशा व्यक्तीबद्दल ऐकले आहे की जो रविवारी सकाळी लास वेगासला गेला. त्या व्यक्तीला मंडळीत येणे आवडते, पण त्याला लास वेगास येथे अधिक मजा येते! नाताळ व नवीन वर्षाच्या काळात इतरांना मेजवाण्या खुणावून बोलावित आहेत. जगातील मेजवाण्या व सण त्यांना मोहित करीत असतात – त्याचमुळे ते मंडळी सोडून जातात. “ते आमच्यातून निघून गेले, ख-या अर्थाने ते आमच्यातील कधी ते नव्हतेच” (I योहान 2:19).

II. दुसरे, त्यांनी असे का केले.

आपला उतारा म्हणतो, “ख-या अर्थाने ते आमच्यातील नव्हते, ते खरेच आमच्यातील असते तर ते आपणाला सोडून गेले नसते” (I योहान 2:19). I योहान 2:19 ला मजबूती देताना, डॉ. जॉन वरनॉन मॅक् गी म्हणाले,

ज्याप्रकारे तुम्ही ख-या देवाच्या लेकरांला सांगू शकता ज्यामुळे शेवटी तो जर देवाचे खरे लेकरु नसेल तर मनुष्य आपला खरा रंग दाखवितो व देवाची मंडळी सोडून देतो. तो ख्रिस्ती, विश्वासणा-यांचे शरीर यातून तो निघून जातो, आणि तो जातो...जगात परततो...असे पुष्कळ आहेत जे ख्रिस्ती असल्याचा बनाव करतात, पण खरे ख्रिस्ती नसतात (जे. वरनॉन मॅक् गी, टीएच., थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 1983, आवृत्ति V, पृष्ट 777).

मी अल्बर्ट बॅरन्स यांचे पवित्रशास्त्रावरील समालोचन, यातील शब्द त्यावर कोणतीहि प्रतिक्रिया न देता देत आहे,

कारण ते आमच्यातील असते तर. ते गंभीर व खरे ख्रिस्ती असते तर. तर ते आमच्यात राहिले असते...ते खरे ख्रिस्ती असते तर ते मंडळी सोडून गेले नसते. ते इतके सामान्य घोषणा करतात की ते वैश्विक सत्यासंबंधी असू शकते, तसेच त्यातील कांही जरी ख-या अर्थाने ‘आमच्यातील’ असते तर, म्हणजेच, ते जर खरे ख्रिस्ती असते तर, तर ते मंडळीत राहिले असते, किंवा ते कधीच सोडून गेले नसते. तसेच हे वाक्य सुद्धा शिकविण्यास असे केले आहे की जर कोणी मंडळी सोडून जातो, म्हणजेच त्यांच्याकडे कोणताच धर्म नाही हे सत्य प्रकट करते. जर त्यांच्याकडे खरेच असता तर ते मंडळीत स्थिर राहिले नसते (अल्बर्ट बॅरन्स, नवीन करारावरील टिपण्णी, बेकर बुक हाऊस, 1983 पुनर्मुद्रीत 1884-85 ची आवृत्ति, I योहान 2:19 वरील टिपण्णी).

येशू म्हणाला,

“खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हां वचन आनंदाने ग्रहण करितात; पण त्यास मूळ नसते व परिक्षेच्या वेळी गळून पडतात” (लुक 8:13).

III. तिसरे, त्यावर उपाय कसे करावेत.

“आपल्यातून ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर
आपल्याबोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीहि आपला नाही हे प्रकट
व्हावे म्हणून ते निघाले” (I योहान 2:19).

मॅथ्यू हेन्री म्हणाले,

आपण जसे आतून आहोत तसे ते नाहीत; पण ते आमच्यातील नाहीत; त्यांना जो चांगला सिद्धात शिकविला त्याचे त्यानी पालन केले नाही; ख्रिस्त जो मस्तक त्याच्याशी ते समरुप झाले नव्हते (मॅथ्यू हेन्री यांची संपूर्ण पवित्रशास्त्रावरील समालोचन, हेन्ड्रीकसन, 1996 पुनर्मुद्रीत, आवृत्ति 6, पृष्ठ 863).

ते ख्रिस्ताशी जोडले गेले नव्हते. ते “आमच्यातील” नव्हते. डॉ. मॅक् गी या वचनांविषयी म्हणाले,

योहान येथे एक एकमेव व गंभीर विधान करतो, आणि हे विधान तो आता आपल्यालाहि करतो आहे. निकेदम, या धार्मिक मनुष्यास येशू म्हणाला, तू नव्याने जन्म घेतला पाहिजे. तो त्याला म्हणाला... “नव्याने जन्मल्यावाचून कोणालाहि देवाचे राज्य पाहाता येत नाही” (योहान 3:3). योहान येथे म्हणतो, “आपल्यातून ते निघून गेले आहेत, कारण ते आमच्यातील नव्हते.” ते देवाच्या लेकरांप्रमाणे दिसत होते, पण खरेतर ते तसे नव्हते (जे. वर्नॉन मॅक् गी., ibid.).

“आमच्यातील” होण्यास तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे, जसे की डॉ. मॅक् गी दर्शवितात. तुम्ही ख्रिस्ताशी जोले गेलेले असले पाहिजे. हे तेव्हांच घडू शकते जेव्हां तुम्ही ख-या अर्थाने नव्याने जन्मलेले असता. येशू म्हणाला,

“तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे” (योहान 3:7).

विश्वास त्यागावरचा उपाय नव्याने जन्मने हा आहे! हे तेव्हांच घडू शकते जेव्हां तुम्ही पापी आहांत हे स्विकारता व ख्रिस्ताकडे येता. तुम्ही त्याच्याकडे येता तेव्हां, तो तुमचा स्विकार करतो आणि तो त्याच्या रक्ताने तुमची पापे शुद्ध करतो. तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू शकता, कारण तो म्हणाला,

“जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

तुम्ही येशूकडे येता, आणि त्याच्याशी जोडले जाता तेव्हां, तुम्हांला नवीन जन्म प्राप्त होतो. तुमचे पाप रद्दबादल केले जातात, आ तुम्ही देवाचे लेकरु बनता. स्थानिक मंडळीत तुम्ही तेव्हांच खरे सभासद होऊ शकता, जेव्हां तुम्ही नव्याने जन्म घेता. तुम्ही ख्रिस्ताकडे येता व नव्याने जन्म घेता तेव्हां अस्तित्ववाद नाहीसा होतो. “ह्या देवहीन जगातील मनुष्याचा सैद्धांतिक एकाकीपणा” तेव्हांच त्यावर उपाय व तो बरा होऊ शकतो जेव्हां तुम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताचा सामना करता, आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्ही स्थानिक मंडळीचा जिवंत अविभाज्य घटक बनता. येशू म्हणाला,

“जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

हरविलेले का राहता? घरी परत या – देवाचा पुत्र, येशू ख्रिस्ताकडे या!

चार्ल्स स्पर्जन यांनी “प्रीतीने जीवन सिद्ध होते” या शिर्षकाचा उपदेश दिला होता. तो I योहान 3:14 वर बेतलेला होता,

“आपण बंधूजनांवर प्रीति करितो ह्यावरुन आपणांस कळून येते की , आपण मरणातून निघून जीवनात आलो आहोत” (I योहान 3:14).

स्पर्जन म्हणाले,

जोवर तुम्ही नव्याने जन्म घेत नाही तोवर, तुम्हांला देवाची कृपा कधीच कळणार नाही. नवीन जीवन मिळून, तुम्ही मरणातून निघून जीवनात गेला पाहिजे, नाहीतर या गोष्टी तुम्हांल कळणार नाही... “आपण बंधूवर प्रीति करितो ह्यावरुन आपणांल कळून येते की आपण मरणातून निघून जीवनात आलो आहो.” म्हणून बंधूनो, देवाचे लोक म्हणून, आम्ही देवावर प्रीति करितो असे आपण म्हणतो, कारण ते देवाचे लोक आहेत, म्हणजे आपण मरणातून निघून जीवनात आलो आहो ह्याचे हे चिन्ह होय (सी. एच. स्पर्जन, “प्रीतीने जीवन सिद्ध होते,” द मेट्रोपोलिटीयन टॅबरनिकल पुलपीट, पीलग्रीम पब्लिकेशन्स,1976 पुनर्मुद्रीत, आवृत्ति XLIV, पृष्ठ 80-81).

परिवर्तनाद्वारे जेव्हां आपम मरणातून जीवनात जातो, तेव्हां आपण आपल्या स्थानिक मंडळीतील बंधूवर प्रीति करितो!

ह्या मंडळीत केलेल्या मैत्रीस मान देतो तर, खात्री करा की तुम्हांस परिवर्तनाचा अनुभव आला का. तुमचे परिवर्तन होणे आवश्यक आहे. ख्रिस्त हा “डिंक” आहे जो तुम्हांस मंडळीत तुमच्या मैत्रीस एकत्र जोडून ठेवतो!


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. जॅक नॅन यांनी गायले: “ब्लेस्ट बी द टाय दॅट बाइंड्स” (जॉन फॅवसेट यांच्याद्वारा, 1740-1817).
“Blest Be the Tie that Binds” (by John Fawcett, 1740-1817).


रुपरेषा

पवित्रशास्त्र व स्थानिक मंडळीचा विश्वासघात करणारा

THE BIBLE AND TRAITORS TO A LOCAL CHURCH

डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत
व रेव्ह. जॉन सॅम्युएल कागॅन यांच्याद्वारा दिलेला
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan

“आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीहि आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले” (I योहान 2:19).

I.   प्रथम, त्यांनी काय केले, प्रेषित 2:47; II तिमथी 4:10-11.

II.  दुसरे, त्यांनी असे का केले, लुक 8:13.

III. तिसरे, त्यावर उपाय कसे करावे, योहान 3:3, 7; 6:37; I योहान 3:14.