Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




डॉ. जॉन संग यांचे खरे परिवर्तन

(चीनी मध्य-शरद ऋतूतील उत्सवात दिलेला उपदेश)
THE REAL CONVERSION OF DR. JOHN SUNG
(A SERMON GIVEN AT THE CHINESE MID-AUTUMN FESTIVAL)
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 23 सप्टेंबर, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, September 23, 2018

“कारण मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जिवाचा नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ?” (मार्क 8:36).


4 जून, 2018 हा “टियानानमेन चौकातील हत्याकांडा” चा एकोण-तीसावा स्मृतिदिन आहे. अधिक वैचारिक स्वातंत्र्य मिळावे म्हणून, 1989 मध्ये हजारो चीनी विद्यार्थी शांततने, सहा आठवडे प्रदर्शन करीत होते. त्यानंतर, 4 जूनच्या, सकाळच्या प्रहरी सरकारी सैनिकानी निशस्त्र प्रदर्शन करणा-यांवर बेछूट गोळीबार केला, त्यात हजारो मारले गेले व हजारोने जखमीहि झाले. हाँग युजिआन जे पेन्सील्व्हीया विद्यापीठात एक्सचेंज विद्यार्थी होते त्यांनी बिजिंगमध्ये टीव्हीवर तो हिंसाचार पाहिला. ते म्हणाले की टियानानमेन चौकातील हत्याकांडाने शास्त्र व राजकारण यातील आशेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले व ते एक ख्रिस्ती झाले.

ते म्हणतात की टियानानमेन चौकातील हत्याकांडाने त्यांना व इतरांना त्यांचे पाप दिसण्यात व ख्रिस्ताची गरज भासण्यात मदत झाली: “मला वाटते की देवाने याचा उपयोग चीनी लोकांचा मार्ग लपविण्यास व त्यांची अंत:करणे उघडण्यास केला असावा” (वर्ल्ड मॅगेझिन, 6 जून 2009, पृष्ठ 38).

“सर्व कांही येशूसाठी.” हे गीत गा!

सर्वकांही येशूसाठी! सर्वकांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ;
सर्वकांही येशूसाठी! सर्वकांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ.
   (“ऑल फॉर जीजस” मेरी डी जेम्स यांच्याद्वारा, 1810-1883).

वर्ल्ड मॅगेझिन म्हणते,

गेल्या 20 वर्षात चीनमध्ये ख्रिस्तीपणाचा वृद्धिदर जो आहे खूपच वाढला आहे. शहरीकरण व प्रभावित होऊन ख्रिस्ताला अंगिकारणा-या विचारवंतांची वाढती संख्या याचे तज्ञ मंडळी उदाहरण देतात (ibid.).

1949 मध्ये, जेव्हां कमुनिस्टानी चीनचा ताबा घेतला, तेव्हां 10 लाख मूळचे चीनी ख्रिस्ती होते. सध्या चीनमध्ये 160 कोटी ख्रिस्ती असावेत असा अंदाज आहे! येथे अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन व ऑष्ट्रेलिया येथे मिळून जेवढे ख्रिस्ती आहेत त्यापेक्षा चीन मधील मंडळ्यांमध्ये अधिक ख्रिस्ती आहेत! डॉ. सी. एल. कागॅन, आकडेवारी तज्ञ, अंदाज करतात की चीनमध्ये, दिवसातील 24 तासांत, दर तासाला 700 लोक ख्रिस्तात परिवर्तित झाले आहेत. “सर्वकांही येशूसाठी.” हे गीत पुन्हा गा!

सर्व कांही येशूसाठी! सर्व कांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ;
सर्व कांही येशूसाठी! सर्व कांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ.

चीनमधील ख्रिस्तीपणाचा इतिहास हा सगळीकडच्या ख्रिस्तीजणांसाठी रंजक वाटला पाहिजे. रॉबर्ट मॉरिसन (1782-1834) यांच्यापासून आधुनिक मिशनरी चळवळ सुरु झाली. मॉरिसन यांना लंडन मिशनरी सोसायटीने 1807 मध्ये चीनला पाठविले होते. त्यांचे सहकारी, विल्ययम मिल्न यांच्या साहाय्याने त्यांनी संपूर्ण पवित्रशास्त्र चीनीमंध्ये 1821 ला भाषांतरीत केले. 27 वर्षाच्या त्यांच्या चीनमधील वास्तव्यात केवळ थोडक्याच लोकांना बाप्तिस्मा दिला – तरीहि ते सर्व शेवटपर्यंत विश्वासू ख्रिस्ती राहिलेत. पवित्रशास्त्र भाषंतर, आणि सुवार्तिक साहित्याचे मुद्रण, हे चीनमधील सुवार्तिक ख्रिस्तीपणाचा पाया झाला.

1853 मध्ये जेम्स हडसन टेलर, एक इंग्रज वैद्य, जहाजाने चीनला आले. 1860 मध्ये त्यांनी चायना इनलॅँड मिशन स्थापले, आता ते ओवरसीज मिशनरी फेलोशिप म्हणून ओळखले जाते. डॉ. टेलरच्या सहका-यांनी सरतेशेवटी चीनच्या संपूर्ण अंतर्गत भागात ख्रिस्तीत्व पसरविले. 1905 मध्ये चांगशा येथे हडसन टेलर मरण पावले.

1901 मध्ये जॉन संग यांचा जन्म झाला. चीनच्या इतिहासातील सर्वात महान सुवार्तिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या प्रचारामुळे पालट झालेले हजारो लोक 1949 मध्ये कमुनिस्टानी चीनचा ताबा घेतल्या नंतरहि ते ख्रिस्ताशी विश्वासू राहिले. गेल्या 60 वर्षात चीनमध्ये ख्रिस्ती लोकांची संख्या भयंकर वाढलेली असून ह्या आधुनिक इतिहासात ख्रिस्तीत्वाचे सर्वात महान संजीवन पसरले आहे. ह्या सकाळी मी तुम्हांस डॉ. जॉन संग यांची उल्लेखनीय गोष्ट सांगणार आहे. डॉ. एल्गिन एस. मोयर यांनी दिलेल्या रुपरेषेवरुन मी सुरुवात करणार आहे.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

आता आमचे उपदेश हे तुमच्या सेलफोनवर उपलब्ध झालेले आहेत.
WWW.SERMONSFORTHEWORLD.COM. या संकेतस्थळावर जा
“APP” अशा शब्दासह हिरव्या बटनावर क्लिक करा.
ज्या सुचना येतील त्याच्याप्रमाणे करा.

+ + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + + +

जॉन संग (1901-1944), प्रसिद्ध राष्ट्रीय चीनी सुवार्तिक; हिंगवा, फुकिन, चीन येथे जन्मले; ते मेथडिस्ट पाळकाचे सुपुत्र होते. [ज्यांचे वयाच्या नवव्या वर्षी खोटे “परिवर्तन” होते.] ते हुशार विद्यार्थी, वेस्लीयन विद्यापीठात, ओहियो स्टेट विद्यापीठ, आणि युनियन थिऑलॉजिकल सेमीनरी येथे शिकले. रसायनशास्त्रात त्यांनी पी.एचडी मिळविली. चीनला परतल्यानंतरशास्त्र शिकविण्या ऐवजी शुभवर्तमानाचा प्रचार केला. एका अद्वितिय सामर्थ्य व प्रभाव यासह संपूर्ण चीन व आजूबाजूच्या देशांत प्रचार करीत पंधरा वर्षे व्यतित केली. (एल्गिन एस. मोयर, पी.एचडी., हू वॉज हू इन द चर्च हिस्ट्री, मुडी प्रेस, 1968 आवृत्ति, पृष्ठ 394).

“सर्वकांही येशूसाठी.” हे गीत पुन्हा गा!

सर्व कांही येशूसाठी! सर्व कांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ;
सर्व कांही येशूसाठी! सर्व कांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ.

ते डॉ. जॉन संग यांच्या जीवनाचे थोडक्यात चित्रण. माझा विश्वासच बसत नाही की त्यांचे वयाच्या नवव्या वर्षी परिवर्तन झाले होते. माझा विश्वासच बसत नाही की त्यांचे फेब्रुवारी, 1927 पर्यंत परिवर्तित झाले होते.

डॉ. संग स्वत: म्हणाले की ते वयाच्या 26 वर्षी आध्यात्मिक संकटातून गेले नाही तोवर परिवर्तन झाले नाही. ते नऊ वर्षाचे असतांना हिंगवा येथे संजीवन आले. एका महिन्यात तेथे जवळजवळ 3,000 ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे होते. उत्तम शुक्रवारच्या सकाळी त्यांनी “गेथशेमाने बागेतील येशू” यावरील उपदेश ऐकला. प्रचारकाने झोपलेले शिष्य यांची निर्भीड येशूबरोबर भेट झाली याचा भेद दर्शविला. उपदेशानंतर पुष्कळ लोक दु:खाने रडायचे. या शोक करण-यांमध्ये एका चीना मेथडिस्ट प्रचारकाचे नऊ-वर्षाचे चिरंजीव जॉन संग हे होते. अशाप्रकारे जॉन संग यांनी आपले जीवन ख्रिस्ताला “समर्पित केले” पण ते खरे परिवर्तन नव्हते. डॉ. तिमथी लीन (जे एक प्रचारक सुद्धा होते) चीनी बाप्टिस्ट मंडळीचे माझ्या माजी पाळकांच्या प्रमाणे, जॉन संग यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि वयाच्या तेराव्या वर्षी आपल्या वडिलांना मदत केली. पण तसेच डॉ. लीन यांच्याप्रमाणे, अजूनहि ख-या परिवर्नाचा अनुभव आला नव्हता. जॉन संग हे एक मेहनती विद्यार्थी होते व त्यांनी माध्यमिक शाळा वरच्या स्तराने उत्तीर्ण झाले. या काळात ते “लहानगे पाळक” सर्वांना परिचित झाले. त्यांचा हा सर्व आवेश व कार्य असूनहि ते ह्दयातून पूर्णत: समाधानी नव्हते. सेवाकार्यात जे काम ते करीत त्याचे वर्णन “पाणकावळ्याचे निळे पंख, उन्हाळ्यातील विपुल पाने असे करीत, परंतू प्रभू येशूला अर्पण्यासाठी न खुडता काढलेले ताजे फळ” (लेस्ली टी. लायल, जॉन संग यांचे आत्मचरित्र, चायना आयलंड मिशन, 1965 आवृत्ति, पृष्ठ 15).

संग 1919 मध्ये, वयाच्या 18 वर्षी, त्याने अमेरिकेला जाण्याचे ठरविले, आणि मोफत शिकवणी सह ओहिओ वेस्लीयन विद्यापीठ स्विकारले. त्याने पूर्व-वैद्यकीय व पूर्व-इश्वर विज्ञान अभ्यासक्रम सुरु केला, पण पूर्व-इश्वर विज्ञान सोडून दिला व गणित व रसायनशास्त्र या मध्ये विशेष प्राविण्य मिळवायचे असे ठरविले. तो मंडळीस नियमीत जात असे व विद्यार्थ्यांमध्ये सुवार्तिक बॅँड उभारला. परंतू त्याने शेवटच्या सत्रात पवित्रशास्त्र अभ्यास व प्रार्थनेकडे दुर्लक्ष केले, आणि त्याच्या एका परिक्षेत त्याने फसवणूक केली. वर्गातील तीनशे विद्यार्थ्यातून तो वरच्या चार पैकी एक असे, त्याने प्राविण्यासह 1923 मध्ये पदवी संपादन केली. त्याला सुवर्ण पदक आणि भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र यासाठी रोख बक्षिस बहाल करण्यात आले. त्याची फी बिटा कप्पा फ्रॅटरनिटी, तसेच अग्रगण्य समाजाचा विद्वान म्हणून त्याला निवडले, आणि त्याला सुवर्ण किल्ली, शिष्यवृत्तील महान प्राविण्य देण्यात आले.

हॉवर्ड विद्यापीठासह, अनेक विद्यापीठे त्याला शिष्यवृत्ती देऊ करु लागल्या. त्याने ओहिओ स्टेट विद्यापीठाकडून शास्त्राच्या पदवीत्तोर अभ्याक्रमासाठी शिष्यवृत्ती स्विकारली. त्याने ही पदवीत्तोर अभ्याक्रम! त्यानंतर त्यास हॉवर्ड येथे वैद्यकशास्त्रातील अभ्याक्रमासाठी शिष्यवृत्ती देऊ केली. त्याला सेमीनरीत अभ्यास करण्यास सुद्धा आणखी एक संधी दिली गेली. त्यास इश्वरविज्ञानाचा अभ्यास करावासा वाटला, पण जी प्रसिद्धी त्याला आली त्यामुळे सेवक होण्याची इच्छा रद्द करावी लागली. पण त्याऐवजी तो ओहिओ स्टेट विद्यापीठात रसायनशास्त्रातील वैद्यकशास्त्र कार्यक्रमात प्रवेश घेतला. त्याने पी.एचडी. ही पदवी केवळ एक-वीस महिन्यात मिळविली! पी.एचडी. ही पदवी मिळविणारा तो युनायटेड स्टेस्टस् मधला पहिला चीनी विद्यार्थी होय. “ओहिओचा सर्वात प्रसिद्ध विद्यार्थी” अशाप्रकारे पेपरमधून वर्णन करु लागले. “परंतू आता दूरवर आत त्याच्या ह्दयात शांतता नव्हती. वृद्धिंगत होणारा पण तो दु:खात दर्शविणारा होता” (लायल, ibid., पृष्ठ 22).

ह्या कालखंडात तो मुक्त इश्वरविज्ञान, आणि त्यांचे “सामाजिक शुभवर्तमान” यांच्या प्रभावाखाली आला. मुक्त इश्वरविज्ञान शिकविते की येशू हा आमचा महान उदाहरण आहे, पण तो तारणारा नाही. जॉन संग जेव्हां ते नऊ वर्षाचे होते तेव्हां ते येशू हा केवळ आमचा “महान उदाहरण” आहे असे त्यांना वाटते, आणि त्यामुळे त्यांचे एक खोटे परिवर्तन होते. परंतू अजूनहि त्याला पाचारण करीत होता. एके संध्याकाळी तो एकटा असतांना त्याला असे म्हणतांना देवाचा आवाज ऐकला की, “मनुष्याने सारे जग मिळविले, पण आपल्या जिवाचा नाश केला तर, त्याला काय लाभ?”

दुस-या दिवशी त्याने एका मुक्त मेथडिस्ट प्राध्यापकाशी चर्चा केली. त्याने त्या प्राध्यापकाशी बोलला की तो मूलत: पवित्रशास्त्रीय शिक्षण शिकण्यास अमेरिकेत आला होता. प्राध्यापकाने त्याला न्यूयार्कला कट्टरपंथी इश्वरविज्ञान शिकण्यास युनियन थिऑलॉजिकल सेमीनरीत जाण्याचे आव्हान दिले. एका क्षणाभराच्या संकोच्यानंतर त्याने जायचे ठरविले. युनियन सेमीनरीत त्याला शिष्यवृत्ती आणि राहण्याच्या भत्ते सुविधा देण्यात आल्या. त्यानंतर तो म्हणाला की सेवेत त्याला कसलाच रस नाही, पण त्याला केवळ वडिलांच्या समाधानासाठी एक वर्षासाठी इश्वरविज्ञानाचे शिक्षण घ्यायचे आहे, आणि मग शास्त्रीय व्यावसायाकडे वळायचे. त्याच्या ह्दयात केवळ गोंधळ व अंधकार भरलेला होता.

1926 च्या शरद ऋतूत जॉन संग यांनी युनियन थिऑलॉजिकल सेमीनरीत नाव नोंदविले. तेव्हां अगदी मुक्तवादी डॉ. हेन्री स्लोन कॉफिन यांनी नुकतेच अध्यक्ष म्हणून विराजमान झाले होते. डॉ. हॅरी इमर्सन फोस्डिक, पवित्रशास्त्र-विश्वासाच्या ख्रिस्तीत्वाविरुद्ध लिहलेल्या पुस्तकाचे लेखक यांच्यासारखे मुक्तवादाचे कट्टर-समर्थक प्राध्यापक म्हणून होते. त्यांनी “पवित्रशास्त्राचा आधुनिक उपयोग” व “प्रभूची मानवता” यासारखी पुस्तके लिहली. फोस्डिक यांचे सर्वात गाजलेले भाषण “मूलतत्ववादी जिंकतील काय?” (1922) हे होते. फोस्डिक हे ख्रिस्ताचे दैहिक पुनरुत्थान व पवित्रशास्त्राची सत्यता याविरुद्ध दर आठवडी रेडियोवरुन प्रचार करीत होते. सेमीनरी म्हणजे पवित्रशास्त्रावर टिका व सुवार्तिक इश्वरविज्ञानास नाकार याविषयी गरम-चर्चा होणारे केंद्र होते. “पवित्रशास्त्रातील शास्त्रीय दृष्ट्या ज्याचा टिकाव लागत नसे ते नाकारुन विश्वासास अयोग्य ते ठरवित असत! उत्पत्ती हे बिगर ऐतिहासिक ठरविले होते व चमत्कारावरील विश्वास अशास्त्रीय ठरविला. ऐतिहासिक येशूला ते आदर्श समजत असत, वधस्तंभावरील त्याच्या मरणाचे बदली मोल, आणि त्याचे दैहिक पुनरुत्थान नाकारले गेले होते. प्रार्थना म्हणजे वायफळ वेळ घालविणे समजले जाई. अशा प्रकारच्या दृष्टिकोनास [असहमत होणे] साठी दया व थट्टा याची वस्तू बनून राहिली” (लायल, ibid., पृष्ठ 29-30).

सर्व बुद्धी सामर्थ्याने मुक्तवाद इश्वरविज्ञान अभ्यासात डॉ. संग येथे शिरले. डॉ. संग त्या वर्षी त्यांनी उच्च श्रेणी बनविली, पण तो बौद्ध व तासोइजम याचा अभ्यास केल्याने ख्रिस्तीत्वापासून दूर केले. त्याच्या खोलीतून बौद्ध वचनाचे पठण सुरु झाले, अशासाठी की स्व-नकार शांति आणील, पण त्याने कांही आली नाही. त्यानी लिहले, “माझा जिव अरण्यात भटकला.”

त्यांचे जीवन असह्य झाले. त्यानी लिहले, “ते झोपू किंवा जेवू शकत नव्हते...माझे ह्दय खोल दु:खाने भरुन गेले.” सेमीनरीतील अधिका-यांस लक्षात आले की तो निराशेच्या मनस्थितीत नेहमी असतो.

ही त्यांची भावनिक स्थिती होती की ते कांही विद्यार्थ्यांसमवेत डॉ. आय. एम. हॅल्डेमॅन, मूलतत्ववादी, पवित्रशास्त्र-विश्वासणारे, न्यूयार्क शहरातील बाप्टिस्ट मंडळीचे प्रथम पाळक यांना ऐकायला गेले. डॉ. हॅल्डेमॅन यांचे प्रसिद्ध म्हण अशी की, “कुमारिकेपासून जन्माचा जे नाकार करतात पवित्रशास्त्रीय ख्रिस्तीत्व नाकारतात.” डॉ. हॅल्डेमॅन यांचा हॅरी इमर्सन फोस्डिक व युनियन थिऑलॉजीकल सेमीनरी यांच्याशी विरोध होता. एक उत्सुकता म्हणून जॉन संग त्यांचा प्रचार ऐकायले गेले. डॉ. हॅल्डेमॅन यांनी त्या रात्र प्रचार केला नाही. परंतू एका पंधरा वर्षाच्या मुलीने साक्ष दिली. त्यांनी वचन वाचले आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मरण याविषयी बोलले. संग म्हणाले की उपासनेत देवाची समक्षता अनुभवायला हवी. सेमीनरीतील त्याचे सवंगडी थट्टा करीत व हास्य करीत, पण ते स्वत:च सलग दुस-या संध्याकाळी सुवार्तिक उपासनेस गेले. “सर्वकांही येशूसाठी.” हे गीत पुन्हा गा!

सर्व कांही येशूसाठी! सर्व कांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ;
सर्व कांही येशूसाठी! सर्व कांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ.

प्रथम बाप्टिस्ट मंडळीच्या त्या सुवार्तिक सभांतून अनुभवलेले सामर्थ्य शोधण्यासाठी, जॉन वेस्ली, जॉर्ज व्हिटफिल्ड व यासारख्या इतर महान प्रचारकांची आत्मचरित्रे वाचू लागले. सेमीनरीतील एका तासिके दरम्यान शिक्षक ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बदली मरणाच्या विरुद्ध जोरजोरात बोलत होते. शिक्षकाचे बोलणे संपल्यावर जॉन संग उभे राहिले व आश्चर्यचकीत विद्यार्थी समितीच्या समोर उत्तरले.

शेवटी, 10 फेब्रुवारी, 1927 रोजी त्यामनी खरे परिवर्तन अनुभवले. “त्यांच्या जीवनातील सर्व पातके त्यांच्यासमोर उभी राहिली. सकृत दर्शनी वाटले की या सर्व पापांतून सुटका होणे अशक्य व ते नरकांत निश्चित जाणार. ते त्यांचे पाप विसरण्याचा प्रयत्न करु लागले पण शक्य झाले नाही. त्यांचे ह्दय भग्न झाले. मग ते लुक xxiii मधील वधस्तंभाच्या गोष्टीकडे वळले, ते ही गोष्ट वाचीत असता ते खरे वाटू लागले...ते वधस्तंभाच्या पायथ्याशी आहेत व [ख्रिस्ताच्या] मौल्यवान रक्ताने सर्व पापे धुतली जावीत म्हणून याचना करीत आहेत असे त्यांना वाटू लागले...मध्यरात्रीपर्यंत ते रडत व प्रार्थना करीत होते. मग त्यांना आवाज [ऐकल्याचा भास] झाला की, ‘मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ आणि पापाचा सर्व भार त्याच्या खांद्यावरु खाली पडल्यासारखे वाटले...‘हालेलुयाचा’ गजर करीत आपला पाय त्याने उचलला!” (लायल, ibid., पृष्ठ 33-34) तो वसतिगृहाच्या सभागृहातून ओरडत व देवाची स्तूती करीत गेला. ख्रिस्ताच्या गरजेबाबत, त्यांचे वर्गमित्र व सोमीनरीतील शिक्षक ते बोलू लागले. त्यांने हॅरी इमर्सन फोस्डिकची गोष्ट जी तारणासाठी गरजेची आहे ती सुद्धा सांगितली. “सर्वकांही येशूसाठी.” हे गीत पुन्हा गा!

सर्व कांही येशूसाठी! सर्व कांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ;
सर्व कांही येशूसाठी! सर्व कांही येशूसाठी! माझे सर्व दिवस व सर्व वेळ.

सेमीनरीच्या अध्यक्षांना वाटले की अति अभ्यास व हुशारीपणामुळे वेडा झाला आहे, आणि त्याला त्यांनी वेड्यांच्या दवाखान्यात भरती केले होते. त्यांनी त्या मनोरुग्णांच्या दवाखान्यात मोजून सहा महिने घालविले. हिंसक मनोरुग्णांना ताब्यात ठेवण्यासाठी जे कपडे घालतात ते त्यांना घालायचे. या दरम्यान त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चाळीस वेळा पवित्रशास्त्र वाचले. “अशाप्रकारे हा मनोरुग्ण दवाखाना त्यांच्यासाठी खरी सेमीनरी झाली!” (लायल, पृष्ठ 38). चीनला परत जाण्याच्या – आणि परत अमेरिकेस परतू नये या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. मुक्तवाद इश्वरविज्ञानाची पुस्तके, ज्याला ते “सैतानाची पुस्तके” संबोधित होते ती जाळून जॉन संग यांनी युनियन सेमीनरीचा संबंध तोडून टाकला.

चीन जाताना जलप्रवासादरम्यान त्यांना समजले की कांही चीनी विद्यापीठात सहज रसायनशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पद मिळवू शकतात. “एके दिवशी, त्यांच्या जलप्रवासाच्या शेवटी, जॉन संग त्यांच्या रुममध्ये गेले, त्यांची पदविकेची पेटी, त्यांची पदके व त्यांचे मानपत्रे घेतली व जहाजातून [समुद्रात] फेकून दिली. वैद्यकशास्त्राची पदविका सोडून, जी वडिलांना समाधान देण्यासाठी ठेवली” (लायल, पृष्ठ 40).

डॉ. जॉन संग हे सर्वात चीनी इतिहासातील महान सुवार्तिक होण्यासाठी, 1927 साल संपण्याच्या सुमारास शांघायला जहाजातून उतरले. त्यांना ब-याचदा “चीनचे वेस्ली” असे संबोधित असे. जॉन संग हे शुभवर्तमानाचे सर्वात सामर्थ्यशाली प्रचारक झाले. केवळ तीन वर्षात त्यांच्या प्रचारामुळे चीनमध्ये 100,000 च्या वर लोकांचे परिवर्तन झाले! त्यांनी बर्मा, कंबोडिया, सिंगापूर, कोरिया, व फिलीपाईन्स मध्येहि सुवार्ता प्रचार केला. ते नेहमी अनुवादकासह प्रचार करीत, चीनमध्ये सुद्धा, कारण त्यांची बोलीभाषा सर्वत्र परिचित नव्हती. जॉर्ज व्हिटफिल्ड यांच्या प्रमाणे ते त्यांच्या प्रचारास प्रतिसाद देणा-याबरोबर थेट समुदेशन करीत. “चीन व तैवान मधील सध्याचे ख्रिस्ती हे जॉन संगच्या सेवेचे देणे लागते; ते पूर्वेकडील राष्ट्रांकरिता विसाव्या शतकातील देवाकडून आलेली महान भेट आहेत” (टी. फरक, जे. डी. डग्लसमध्ये, पी.एचडी., हुज हू इन ख्रिश्चन हिस्ट्री, तायंडल हाऊस, 1992, पृष्ठ 650). सर्वात चांगली थोडक्यात असलेले जॉन संगचे आत्मचरित्र हे रेव्ह. विलियम इ. शुबर्ट याचे, “मला आठविलेले जॉन संग,” हे आहे जे www.strategicpress.org. वर येथे उपलब्ध आहे तरी रेव्ह. शुबर्टचे आत्मचरित्र खरेदी करण्यास येथे क्लिक करा. लेस्ली लायल यांच्याद्वारा लिखित डॉ. जॉन संगचे आत्मचरित्र खरेदी करण्यास येते क्लिक करा (शुबर्ट यांच्या इतकी चांगली नाही पण वाचण्यास मजेदार आहे). डॉ. जॉन संग यांची “द जर्नल वन्स लॉस्ट” नावाची रोजनिशी खरेदी करण्यास येथे क्लिक करा. डॉ. संग यांचे विकीपिडीयावरील साहित्य वाचण्यास येथे क्लिक करा.

वयाच्या चौव्वे-चाळीसाव्या वर्षी, ते 1944 मध्ये कर्करोगामुळे मरण पावले.

“मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपल्या जिवाचा नाश करुन घेतला तर त्याला काय लाभ?” (मार्क 8:36).

जसे डॉ. संग यांचे परिवर्तन झाले तसे, तुमचेहि व्हावे अशी माझी प्रार्थना आहे. तुमच्या जीवनातील रिक्तपणा देवाने तुम्हांला दाखवावा; आणि देवाने तुम्हांला पापची जाणीव करु द्यावी; आणि ख्रिस्ताच्या प्राय:श्चिताच्या रक्ताने तुमची पापे धुऊन शुद्ध होण्यास देवाने तुम्हांला त्याच्याकडे आकर्षित करावे म्हणून मी प्रार्थना करितो. तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवाल तेव्हां तुमचा नवा जन्म होईल, व त्याच्यातील अद्भूत नवीन जीवन प्राप्त होईल. आणि मी प्रार्थना करितो की तुम्ही “वुईथ डॉ. जॉन संग ॲट अ लिबरल सेमीनरी” या शिर्षकाचा उपदेश ऐकावयास संध्याकाळी 6:15 वाजता परत याल. (तो वाचण्यास येथे क्लिक करा). आमेन. कृपया उभे राहा व तुमच्या गीत पत्रिकेवरील गीत क्रं. एक गा, “जीजस पेड इट ऑल.”

तारणारा असे म्हणतांना मी ऐकले, “तुझी शक्ति खरोखर कमी आहे,
मुलांचा अशक्तपणा, जागा अस व प्रार्थना कर, मला तू सर्वत्र पाहा,” येशूने सर्व दंड भरला आहे, सर्वकांही मी त्याला देणे आहे;
किरमिजी डाग सोडून पाप गेले, बर्फासारखे शुभ्र त्याने शुद्ध केले.

प्रभू, मला तुझे सामर्थ्य खरोखर मिळाले, व केवळ तुझेच,
कुष्टाचा डाग घालवितो, व पाषाणमय ह्दय मऊ करतो.
येशूने सर्व दंड भरला आहे, सर्वकांही मी त्याला देणे आहे;
किरमिजी डाग सोडून पाप गेले, बर्फासारखे शुभ्र त्याने शुद्ध केले.
(“जीजस पेड इट ऑल” एल्विना एम. हॉल यांच्याद्वारा,1820-1889).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले: “सर्वकांही येशूसाठी”
(मेरी डी. जेम्स, यांच्याद्वारा, 1810-1883).
“All For Jesus” (Mary D. James, 1810-1883).