Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




त्याने झाडांसारखी चालणारी माणसे पाहिली

HE SAW MEN AS TREES WALKING!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 26 ऑगस्ट, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, August 26, 2018

“मग ते बेथसैदा येथे आले तेव्हां लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणिले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. तेव्हां त्याने त्या आंधळ्याचा हात धरुन त्याला गावांबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात धरुन त्याला विचारले, तुला कांही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटतेकारण ती मला झाडासारखी दिसत आहे, तरी पण ती चालत आहेत. नंतर त्याने त्याच्याडोळ्यावर पुन्हा हात ठिवले; तेव्हां त्याने निरखून पाहिले, आणि तो बरा झाला व सर्वकांही त्याला स्पष्ट दिसू लागले” (मार्क 8:22-25).


ख्रिस्त बेथसैदा येथे आला. परंतू त्याने बेथसैदा येथे प्रचार केला नाही. बेथसैदा येथे त्याच्या शिष्यांनी एका अंधाला त्याच्याकडे आणले. परंतब ख्रिस्ताने त्या माणसाला त्या नगरात बरे केले नाही. बेथसैदा ठिकाण असे होते जेथे येशूने पाच भाकरी व आणि दोन मासे 5,000 लोकांना खाण्यास पुरेसे होतील असे बदलून 5,000 लोकांना खाऊ घातले (मार्क 6:38-44). तेथे येशू पाणअयावर चालला, व त्याने इतर पुष्कळहि महत्कृत्यें तेथे केली होती. तरीहि बेथसैदा येथील लोक पश्चाताप करीत नव्हते व येशूवर विश्वास ठेवीत नव्हते. त्यामुळे त्या नगराला ख्रिस्ताने शाप दिला. ख्रिस्त म्हणाला “न्यायाच्या दिवशी” देव त्यांचा न्याय कठोरपणे करील.

आता ख्रिस्त व त्याचे शिष्य त्या शापीत नगरात आले.

“मग ते बेथसैदा येथे आले तेव्हां लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणिले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली” (मार्क 8:22).

लॉस एजिंल्ससारख्या पापी नगरात एका तरुणाचे कसे परिवर्तन झाले याचे हे चित्रण आहे.

I. प्रथम, नगर शापीत होते, पण तो निवडलेला आंधळा मुलगा नव्हता.

जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने निवडलेले लोक म्हणजे “निवड” कलेले, “निवडलेल्या लोकांना मिळाले; आणि बाकीचे कोडगे झाले” (रोम 11:7). संपूर्ण नगर अंध झाले होते, देवाकडून आले होते, कारण त्यांनी येशू ख्रिस्ताला नाकारले – संपूर्ण नगर शापीत झाले, तरी, तेथे निवडलेला असा एक होता, आणि त्याच्या शिष्यांनी त्याला येशूकडे आणले!

“निवड” म्हणजे निवडणे किंवा पंसत करणे. सृष्टीच्या निर्मितीपूर्वी मानव जातीतून निवड करणे मग त्यांना तो मुक्त करील.

तो आंधळा एक निवडलेला होता. त्यामुळे त्याच्या शिष्यांनी ह्या माणसांस येशूकडे आणण्यास एका माणसाला पाठविले!

येशूला नाकारल्याने संपूर्ण नगराला नापसंत करुन, न्याय केला जात होता. मंडळीत लोकांना आणण्यासाठी आपणांस बाहेर जावे लागेल. आपणांस ठाऊक आहे की त्यातील बरेच येत नाहीत. आपणांस ठाऊक आहे की त्यांचे तारण झाले आहे असे त्यातील पुष्कळांना वाटते. आपणांस ठाऊक आहे की लॉस एंजिल्समधील पुष्कळ लोक सैतानाच्य अधिपत्याखाली आहेत. मंडळीत येऊन येशूविषयी ऐकणे त्यांना आवडत नाही! त्यातील पुष्कळांचे तारण होणार नाही, त्यांचे तारण होणार नाही कारण त्यांनी देवाने त्यांना पूर्वीच नाकारले आहे, तरीहि आपण त्यांना मंडळीत येण्याचे आमंत्रण देण्यास बाहेर गेले पाहिजे. पवित्रशास्त्र म्हणते, “देवाने त्यांना स्वाधीन केले... देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले... [ते] देवाचा द्वेष करणारे, आईवडीलांची अवज्ञा करणारे...चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी...देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी आहेत” (रोम 1:26-30; II तिमथी 3:3, 4).

होय, आपले संपूर्ण नगर ढोंगी, मादक द्रव्याचे सेवन करणारे, व्यभिचारी, चांगले न करणारे, अभद्र, आणि येशूचा तिरस्कार करणारे आहे. मला तुमच्यापेक्षा अधिक ठाभक आहे. या अधार्मिर नगरात साठ वर्षे प्रचार करीत घालविली!

पण मला हेहि ठाऊक आहे की कोठेतरी, यापैकी एका अपार्टमेंट, खेळण्याच्या गल्लीत, या एका शाळेत – मला हे ठाऊक आहे की यापैकी कोणत्यातरी जागी देवाने निवडलेला पुरुष किंवा स्त्री आहे, हजारो पापी जणांच्यामधून निवडलेले आहे, येशू ख्रिस्त, देवाचा एकुलता एक पुत्राच्या द्वारे तारण होण्यास निवडले!!! माझा विश्वास आहे की तुम्ही ते निवडलेले आहांत!

आणि तो तरुण किंवा स्त्री लवकरच मंडळीत येणार, आत्म्याने प्रकाशीत होणार, सैतानाच्या तावजीतून सुटणार, आणि येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताने शुद्ध होणार!!!

वधस्तंभावरच्याच्या रक्ताने तारले गेले!
   पापातून खंडणी भरुन सोडविलेले व नवीन कार्य सुरु झाले,
पित्याला स्तुति द्या व पुत्राला स्तुति द्या,
   वधस्तंभावरच्याच्या रक्ताने तारले गेले!
तारण झाले! तारण झाले! पापाची क्षमा झालेली आहे, माझे पाप गेले, माझा दोष गेला!
तारण झाले! तारण झाले! माझे तारण वधस्तंभावरच्याने केले!
   (“रक्ताने तारले” एस.जे. हेंडरसन द्वारा, 1902).

आमेन! देवाची स्तुति असो! हालेलुया! वधस्तंभावरच्याच्या रक्ताने माझे तारणा झाले!

हा मनुष्य देवाची निवड आहे. आणि शिष्य आले व तो पापी असा सापडला – संपूर्ण नगर-नरक झाले – तसे आम्ही गेलो व तुम्ही भेटलात! आणि त्यांनी अंध मुलाला येशूकडे आणले! आमेन! हे नगर शापीत व अपयशी होते, पण निवडलेला अंध मुलगा नव्हता! त्यांनी त्याला येशूकडे आणिले!

II. दुसरे, तो तरुण आंधळा होता.

तो थंड-दगडासारखा अंध होता– तो वटवाघुळासारखा अंध होता ! तुर्की-पक्षीचे मुंडके कापल्यासारखे अंध होता!!! ते तुम्हांला जसे मिळतात तसे अंध याविषयी! होय, तो तरुण मनुष्य – अंध होता!

आता, ते कांहीतरी आहे! म्हणजे तो अंध आहे, होय! परंतू ते नव्या करारात त्याहून अधिक कांहीतरी आहे! म्हणजेच, जसे मॅथ्यू हेनरी लिहतात की, “आध्यात्मिक अंधपणा.” आणि लुक शुभवर्तमान लिहते की येशूने यशया 61:1 मधील “आंधळ्यांस पुन्हा दृष्टीचा लाभ” हा प्रचार पूर्ण केला (लुक 4:18).

येशूने अंध मनुष्यांस हाताने घेतले, “आणि त्याला नगराबाहेर नेले”(मार्क 8:23). ते हे दर्शविते की अंध पाप्यास बरे व्हायचे असेल तर इतर पाप्यापासून विभक्त व्हायला पाहिजे. पवित्रशास्त्र म्हणते,

“तुम्ही विश्वास न धरणा-याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका... म्हणून “त्याच्यामधून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो...आणि मी तुम्हांला पिता असा होईन, तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल” (II करिंथ 6:14, 17-18).

पुष्कळदा तरुणांना तारण व्हावेसे वाटते, देवाला जाणावेसे वाटते, त्यांना पापी मित्रांनी बंदिस्त केसे आहे – मित्रानो येशूकरिता ते माघार घेणार नाहीत. धन्यवाद देवा, त्याची पुनरपी यायच्या अगोदर येशूने “त्यांना नगराबाहेर काढले.” त्याला त्या हेलीश कंपनीतून बाहेर पडावे लागेल. बाहेर! बाहेर जा! बाहेर जा! जो त्याला अंध ठेवण्याचा प्रयत्न करताना त्या दुष्ट मित्रांला बाहेर काढावे लागेल! येशूने त्याला हाताने “नगराबाहेर नेले.” बेथसदा येथील दुष्ट मित्रांबरोबर मित्रत्वाचे नाते असतांना ते तारण पावले आहेत यावर माझा विश्वास नाही!

III. तिसरे, त्याची दृष्टी वाढणारी होती.

“आणि जेव्हां तो त्याच्या डोळ्यांवर थुंकला [खरोखर, “त्याच्या डोळ्यांवर थुंकला”], आणि त्याने त्याचा हात ठेवला, मग त्याने त्याला विचारले त्याला [कांहीतरी] दिसते का. आणि त्याने वर पाहिले, आणि म्हणाला, माणसे झाडासारखी हालताना पाहिले. त्यानंतर त्याने त्याचा हात त्याच्या डोळ्यांवर ठेवला, त्याला वर पाहायला लावले: व त्याला दृष्टी आली, आणि सर्वांनां स्पष्टपणे पाहू लागला” (मार्क 8:23-25). नीतिसुत्रेचे पुस्तक यावर चांगले विधान करते की,

“परंतू धार्मिकाचा मार्ग मध्यानापर्यत उत्तरोत्तर वाढणा-या उदयप्रकाशासारखा आहे” (नीतिसुत्रे 4:18).

प्रथम दर्शनी तुम्ही आध्यात्मिक अंध आहांत. तुम्ही मंडळीत येता, पण तुम्ही जे सर्व ऐकता त्याविषयी तुमची स्पष्टता नाही. मग तुम्हांला जाणीव होईल की ख्रिस्त तुम्हांला मदत करु शकतो. तो तुम्हांला मदत करणार अशी आशा ठेवण्यास सुरु करतो. पण तुम्ही त्याला पाहू शकत नाही, व तुम्ही त्याला अनुभवू शकत नाही. मग तुम्हाला कऴते “विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयाचा भरंवसा आणि न दिसणा-या खातरी” (इब्री 11:1).

प्रेषित थोमा म्हणाला, “मी विश्वास ठेवणार नाही.” मग येशू आला व थोमा त्याला म्हणाला, “माझ्या प्रभू माझ्या देवा.” आणि येशू थोमाला म्हणाला, “पाहिल्यावाचून विश्वास ठेवणारे ते धन्य.” गेली दोन हजार वर्षे “ज्यानी त्याला पाहिले नाही तरीहि त्याच्यावर विश्वास ठेवाला” अशा लाखो लोकांचे तारण येशूने केले.

जॉन कागॅन काय म्हणतात ते ऐका, ते म्हणाले, “मला कसलीहि शांति मिळू शकली नाही. मी मरतोय असे मला वाटले...[मग] कळाले की मला केवळ [येशू] वर विश्वास ठेवायचा होता. मला दैहिक कोणतीहि भावना नव्हती, मला भावनेची गरज नव्हती, कारण माझ्याकडे ख्रिस्त होता! मी केवळ येशूकडे पाहिले! केवळ विश्वासाने मला कळाले की येशूच्याद्वारे माझी सर्व पापे धुतली गेली, आणि ठोस पुराव्याशिवाय मला कसे समजले याचे मला आश्चर्य वाटते, पण...मी माझे मन व विचार येशूवर सोपविल्यानंतर मला शांति लाभली. केवळ येशूच माझे उत्तर आहे.”

फिलिप्प चान काय म्हणतात ते ऐका. “मला आठवते की माझा कधीहि पालट झाला नसता. पालट खरा आहे की खोटा यावरहि मी शंका घेऊ लागले...[मग] ज्यांच्याकडे ख्रिस्त नाही त्यांना सैतान कसे आंधळा करतो ह्यावर डॉ. हायमर्सनी प्रचार केला. पापी माणसाच्या अंत:करणात सैतान काम करतो आणि त्याला खातरीची भावना व्हावी असे त्यांना करतो, ही एक त्याची पद्धत आहे. मग डॉ. हायमर्स म्हणाले मला केवळ येशूवर विश्वास ठेवावा लागेल. इतर कोणावर, कोणावरहि नाही. [माझे मन! शंका व पृथकरण करण्याच्या चक्रात अडकण्यापूर्वी...आता येशू आहे. आता तारणारा मला त्याच्या बाहूत घेण्यास वाट पाहात होता! पाप धरुन येशू जो माझ्या जिवावर प्रेम करितो त्याच्याकडे न पाहता कसा काय राहू शकतो? मी माझ्या गुडघ्यावर आलो व स्वत: येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. भावनेच्या अनुभवाची मी वाट पाहिली नाही. सैतानाचे खोटे ऐकण्यास थांबलो नाही. माझ्या पापापासून शुद्धता होण्यास मला येशूकडे जायचे होते. मला थांबण्याची गरज नव्हती! खातरजमा करण्याचा विचार निघून गेला. मी येशूवर विश्वास ठेवला. [स्वत:] येशू माझी खातरी व आशा झाला. येशूने माझ्या पापाची भार दूर केला. त्याने त्याच्या स्वत:च्या रक्ताने माझे पापाची नोंद नाहीशी केली. आता मला “येशू, माझ्या जिवाचा प्रेमी” हे गीत आठवते आणि मला आठवते येशूमध्ये माझा मित्र आहे. देवाने त्याचा पुत्र येशूला, त्याच्या रक्ताने माझ्या पापाची क्षमा करण्यास दिला म्हणून त्याची स्तुति असो!”

ज्या मुलीने येशूला बरेच वर्षे नाकारले तिचे शब्द ऐका. ती म्हणाली, “मला माझ्या पापाची खोल जाणीव झाली व मी अगदी निराश झाले. मी जवळजवळ दररोज प्रार्थना केली. हस्तलिखीत उपदेश रोज वाचले. त्याने मदत झाली नाही कारण मी अजूनहि अधिक भावना व अधिक विश्वासाची वाट पाहत होते. मी डॉ. कागॅन यांना सांगितले की मी अस्पष्ट मनाची आहे, त्यामुळे मी येशूकडे येऊ शकत नाही. डॉ. कागॅन म्हणाले, ‘मग तूं तुझ्या अस्पष्ट मनाने येशूकडे ये!’ माझे परिवर्तन होण्याच्या अगोदर, मि. ग्रिफ्फिथ यांनी गायले, ‘अधिक चांगले होण्याची वाट पाहाल तर, तुम्ही कधीच येणार नाही.’ [मला ठाऊक आहे की] माझा भाव व [भावना] ह्या भरवशाच्या नाहीत, त्यामुळे मी त्यावर विश्वास ठेऊ शकत नाही. जेव्हां मी येशूवर विश्वास ठेवला तेव्हा, त्याने क्षमा केली व माझ्या सर्व पापापासून शुद्धता केली. त्याने त्याच्या मोलवान रक्ताने मला शुद्ध केले व माझी सर्व पापे धुऊन शुद्ध केली. येशूने मला यैतानाच्या तावडीतून सोडवून मला मुक्त केले! सैतान जो माझा नाश करतो, आणि शेवटी मला नरकात पाठवितो, त्याचा दास होण्यापेक्षा, येशू जो माझ्यावर प्रीति व काळजी करितो त्याचा मी दास असेन.” हे तुमच्या गीत पत्रिकेवर 2 क्रमांकावर आहे. उभे राहा व ते गा!

येशू, माझ्या जिवाचा प्रेमी,
   मला तुझ्या उराजवळ उडू दे,
जेव्हां जवळचे पाणी वाहील,
   जेव्हां वादळ अजूनहि जोरात आहे:
मला लपीव, हे माझ्या तारका, मला लपीव,
   जीवनातील वादळ शमवून;
स्वर्गात सुरक्षित नेईपर्यंत;
   शेवटी माझ्या जीवाचा स्विकार कर!
(“जीजस, लव्हर ऑफ माय सौल” चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).

आपण काली बसू शकता.

मला ठाऊक आहे की तुम्हांला तुमचे पाप येशूच्या द्वारे धुऊन शुद्ध करायचे आहे! तुमच्या तारणासाठी तुम्हांला येशूची हवा आहे हे मला ठाऊक आहे! पूर्णत्वाची अपेक्षा करु नका. तुचे पाप व दोष यापासून सुटकेसाठी केवळ येशूची अपेक्षा करा. पूर्णत्व नंतर येईल. आता येशूचे वचन ऐका. ही वचने खुद्द येशूच्या मुखातून आली आहेत.

“अहो, कष्टी व भाराक्रांत जणहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या; म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन” (मत्तय 11:28).

“अहो, कष्टी व भाराक्रांत जणहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या.” रात्री तुम्ही झोपी जाता तेव्हां तुम्हांला कित्येकदा पापी व हरविलेले वाटते. रात्री तुम्ही पापाविषयी चिंता करीत झोपी जाता. पुन्हा चिंतेत का झोपी जाता?येशू म्हणतो,

“अहो, कष्टी व भाराक्रांत जणहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या; म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन”

तुम्हांला खातरीची गरज नाही. तुम्हांला विसाव्याची गरज आहे. तुमच्या जीवास विसावा. तुमच्या गीत पत्रिकेवरील गीत 3 क्रमांकावर वळा. व ते गा.

मी तुझे स्वागताचा आवाज ऐकतो,
   प्रभू, तुझ्याकडे, तो मला बोलावितो
तुझ्या मोलवान रक्ताने शुद्ध करण्यासाठी
   जे कालवरीवरी वाहिले.
मी येत आहे, प्रभू! आता तुझ्याकडे येत आहे!
   तुझ्यारक्ताने मला धु, शुद्ध कर
जे कालवरीवरी वाहिले.
   (“मी येत आहे, प्रभू” लेविस हार्टसोग यांच्याद्वारा,1828-1919).

येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधी आमच्याशी बोलू इच्छिता तर, कृपया पुढे या व पहिल्या दोन रांगेत बसा. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले: “आय एम कमिंग”
(लेवीस हार्टसोग, यांच्याद्वारा, 1828-1919).
“I Am Coming, Lord” (by Lewis Hartsough, 1828-1919).


रुपरेषा

त्याने झाडांसारखी चालणारी माणसे पाहिली

HE SAW MEN AS TREES WALKING!

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“मग ते बेथसैदा येथे आले तेव्हां लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणिले व आपण त्याला स्पर्श करावा अशी त्याला विनंती केली. तेव्हां त्याने त्या आंधळ्याचा हात धरुन त्याला गावांबाहेर नेले आणि त्याच्या डोळ्यावर थुंकून व त्याच्यावर हात धरुन त्याला विचारले, तुला कांही दिसते काय? तो वर पाहून म्हणाला, मला माणसे दिसत आहेत असे वाटतेकारण ती मला झाडासारखी दिसत आहे, तरी पण ती चालत आहेत. नंतर त्याने त्याच्या डोळ्यावर पुन्हा हात ठिवले; तेव्हां त्याने निरखून पाहिले, आणि तो बरा झाला व सर्वकांही त्याला स्पष्ट दिसू लागले” (मार्क 8:22-25).

I.   प्रथम, नगर शापित होते, पण तो निवडलेला आंधळा मुलगा नव्हता! रोम 11:7;
रोम 1:26-30; II तिमथी 3:3, 4.

II.  दुसरे, तरुण मनुष्य आंधळा होता, लुक 4:18; मार्क 8:23;
II करिंथ 6:14, 17-18.

III. तिसरे, त्याची दृष्टी वाढणारी होती, मार्क 8:23-25; नीतिसुत्रे 4:18;
इब्री 11:1; मत्तय 11:28.