Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




आरंभीच्या मंडळ्यांतील सुवार्ताप्रचार

EVANGELISM IN THE EARLY CHURCHES
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 19 ऑगस्ट, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, August 19, 2018

“नंतर बारा जणांस आपल्या जवळ बोलावून तो त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला” (मार्क 6:7).


हे बारा माणसे येशूबरोबर केवळ कांही आठवडे होती. परंतू त्याने थेट त्यांना सुवार्ता प्रचारास पाठविले (मार्क 6:12). त्याच वेळी येशूने त्यांना बोलाविले, त्याने ह्यासाठी हे केले की “त्यांना सुवार्ता प्रचारास पाठवावे” (मार्क 3:14). निश्चितार्थाने तुम्हांस ठाऊक आहे की ती माणसे आध्यात्मिक नव्हती. निश्चितार्थाने तुम्हांस ठाऊक आहे की यहुदाचे परिवर्तन झाले नव्हते. तसेच थोमाचाहि अजून शुभवर्तमानावर विश्वास नव्हता, तसेच पेत्राने त्यानंतर येशूला वधस्तंभावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. तरीहि ख्रिस्ताने त्यांना एकदा सुवार्ता प्रचारास पाठविले! पेत्र व आंद्रियाला येशूने सर्वात पहिली सांगितलेली गोष्ट होती, “माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हांला माणसें धरणारे करीन लागलीच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले” (मत्तय 4:19-20).

पुन्हां, एका वर्षानंतर, येशूने त्याच्या बहात्तर अनुयायांना बोलाविले, “आणि ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी स्वत: जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणांपुढे पाठविले” (लुक 10:1). कृपया लुक 10 उता-याकडे वळूया. उभे राहून वचन1 ते 3 वाचूया.

“ह्यानंतर प्रभूने आणखी बहात्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी स्वत: जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणांपुढे पाठविले. तेव्हां त्याने त्यांना म्हटले, पीक फार परंतू कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावें म्हणून त्याची प्रार्थना करा. जा लांडग्यामध्ये कोकरें तसे तुम्हांस मी पाठवीत आहे, पाहा” (लुक 10:1-3).

आपण खाली बसू शकता.

सुवार्तेकरिता दोघे-दोघे जणांस पाठविणे ही ख्रिस्ताची पद्धत होती. मला वाटते आजहि आपणांस असेच करणे गरजेचे आहे. तसे लक्षात घ्या की ते लोक नवशिके, ख्रिस्तीत्वात बाळक असे होते, तरी त्यांने लगेच त्यांना पाठविले. त्यांना पाठविण्यापूर्वी शिकविण्यास वर्षभर घालविला नाही. नाही! तो त्यांना म्हणाला,

“जा लांडग्यामध्ये कोकरें तसे तुम्हांस मी पाठवीत आहे, पाहा” (लुक 10:1-3).

लक्षात घ्या ख्रिस्ताने अननुभवी तरुण अनुयायांना कशासाठी प्रार्थना करावी हे सुद्धा सांगितले. आणि अगदी कशासाठी प्रार्थना करावी हे दुस-या वचनात सांगितले,

“म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावें म्हणून त्याची प्रार्थना करा” (लुक 10:2).

देवाने हंगामासाठी अधिक कामकरी पाठवावे म्हणून ह्या बहात्तर तरुण अनुयायांना त्याने सांगितले! डॉ. जॉन आर. राईस त्यांच्या चलत गीतात खूप छान म्हणाले. ते तुमच्या गीत पत्रिकेवर क्रं. 4 वर आहे!

हंगामाच्या धन्याकडे आपण प्रार्थना करावी की,
   “तुझ्या शेतात काम-यांस पाठवावे.”
कामकरी थोडे आहेत; पिक शुभ्र होऊन
   वाया जातेय, किती भरघोस पिक आलेय.
पाहा मी आहे! पाहा मी आहे! मला पाठीव, हंगामाच्या प्रभू,
   तुझा पवित्र आत्मा माझ्याठायी घाल.
पाहा मी आहे! पाहा मी आहे!
   कांही मोलवान आत्मे जिंकण्यास आज मला पाठीव.
(“हिअर आय एम” जॉन आर. राईस, 1895-1980).

दुस-या शतकात महान इश्वरविज्ञान पंडीत ओरिजन म्हणाले, “संपूर्ण जगात आपल्या विश्वासाचा प्रचार करण्याचे सामर्थ्य ख्रिस्ती लोकांत आहे.” ख्रिस्त, त्याच्या जगातील सेवाकार्याच्या शेवटी म्हणाला,

“स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे; तेव्हां जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावांने बाप्तिस्मा द्या; जे कांही मी तुम्हांला आज्ञापिले आहे ते सर्व पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन” (मत्तय 28:18-20).

मार्काच्या शेवटी ख्रिस्त म्हणाला,

“सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा” (मार्क 16:15).

लुकाच्या शेवटी ख्रिस्त म्हणाला,

“...यरुशलेमपासून आरंभ करुन राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा घोषित करण्यात यावी” (लुक 24:47).

योहानाच्या शुभवर्तमानाच्या शेवटी ख्रिस्त म्हणाला,

“जसे पित्याने मला पाठविले आहे तसे मीहि तुम्हांला पाठवितो” (योहान 20:21).

आणि ख्रिस्ताचे स्वर्गारोहन होण्यापूर्वी त्याचे शेवटचे शब्द होते,

“आणि यरुशलेमेत, सर्व यहुदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल” (प्रेषित 1:8).

एकदा एक मनुष्य होता ज्याने ही आज्ञा केवळ प्रेषितांसाठी होती, आणि ती आता आपणांस पाळण्याची गरज नाही असे म्हणून आपल्या मंडळीत फूट पाडली. लोक त्याच्या मागे यावे व त्यांची मंडळी सोडावी म्हणून त्याने लोकांना आकर्षित करण्यासाठी हायपर-कॅल्विनिस्ट वादाचा बुरखा घातला होता. पण कांही घडले नाही, जेथे येशूचे वचन तोडलेमोडले व त्याची अवज्ञा केली जाते तेथे आशिर्वाद कधीच नसतो.

स्पर्जन हे पाच-सुत्री कॅल्विनिस्टवादी होते, पण हायपर-कॅल्विनिस्टवादी नव्हते. त्या दोहोतील, फरक आपण पाहणार होतो. स्पर्जन म्हणाले,

ओहो! हे वचन तिला तारणा-यांने सांगावे अशी मी मंडळीसाठी अपेक्षा करितो; कारण ख्रिस्ताचे शब्द हे सजीव वचन आहे, त्यात केवळ कालच सामर्थ्य नव्हते, तर आजहि आहे. तारणा-याचा आदेश [हुकुम] त्यांच्यासाठी शाश्वत बंधनकारक आहे: तो केवळ प्रेषितांसाठी बंधनकारक नाही, आपणाला सुद्धा, आणि प्रत्येक ख्रिस्तीजणांस ज्यावर हे जू आहे, “तेव्हां जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावांने बाप्तिस्मा द्या.” आज-हि कोक-याच्या प्रथम शिष्याच्या सेवेतून आपणांस सुटका नाही; त्यांना पुढे जाण्याचा जो आदेश होता तोच आम्हांलाहि आहे, आणि त्यांच्यासारखे तत्पर व परिपूर्ण आज्ञापालन करावे अशी आपल्या कर्णधाराची आपणांकडून इच्छा (सी. एच. स्पर्जन, द मेट्रोपोलीटन टॅबरनिकल पुलपीठ, पिलग्रीम पब्लिकेशन्स, 1986 पुनर्मुद्रीत, आवृत्ती VII, पृष्ठ 281).

डॉ. जॉन आर. राईस यांच्याबरोबर आपण सर्वजण म्हणू,

पाहा मी आहे! पाहा मी आहे! मला पाठीव, हंगामाच्या प्रभू,
   तुझा पवित्र आत्मा माझ्याठायी घाल.
पाहा मी आहे! पाहा मी आहे!
   कांही मोलवान आत्मे जिंकण्यास आज मला पाठीव.

मोठ्या जेवणावळीच्या दृष्टांतात येशू म्हणाला, “माझे घर भरुन जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करु घेऊन ये” (लुक 14:23). लग्नाच्या मेजवाणीच्या दृष्टांतात येशू म्हणाला, “म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हांस आढळतील तितक्यांस लग्नाच्या मेजवानीस बोलवा” (मत्तय 22:9).

यरुशलेमेत स्थानिक मंडळी जी येशूने स्थापली तिने त्याची ही आज्ञा जशीच्या तशी घेतली. पेंटाकॉस्टच्या कांही दिवसानंतर मुख्य याजक तक्रार करु लागले की “तुम्ही आपल्या शिकवणीने यरुशलेम भरु टाकले आहे” (प्रेषित 5:28). मग प्रेषित 5:42 आपणांस सांगितले, “आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकविण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविम्याचे त्यांनी सोडले नाही.” प्रेषित 6:1 मध्ये आपण वाचतो की, “शिष्यांची संख्या वाढत गेली.” नंतर, प्रेषित 12:24 मध्ये आपण वाचतो, “पण देवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.” डॉ. जॉन आर. राईस म्हणाले,

     शोमरोन, जेथे सहकारी फिलिप्प सुवार्ता प्रचारासाठी गेला, असे प्रेषित 8:6 मध्ये सांगितले, “तेव्हां...लोकसमुदायाने फिलिप्पाने सांगितलेल्या गोष्टींकडे एकचित्ताने लक्ष दिले” पुन्हा वचन 12 मध्ये, “तरी पण फिलिप्प देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नांव ह्याविषयीची सुवार्ता सांगत असता लोकांचा विश्वास बसला आणि पुरुष व स्त्रिया ह्यांचा बाप्तिस्मा झाला.” अशी ही अद्भूत देवाच्या सामर्थ्याची लाट आहे आणि तारण होणे हे नवीन करारातील मंडळ्यासाठी सामान्य होते.
     खरे तर, प्रेषित 9:31 म्हणते, “...मंडळीस स्वस्थता मिळाली, आणि तिची उन्नति होऊन ती प्रभूच्या भयांत व पवित्र आत्म्याच्या समाधानांत चालत असतां वाढत गेली.”
     मंडळ्या “वाढत” होत्या, विश्वासणा-यांची संख्या व मंडळ्या वाढत होत्या. नवीन करारातील मंडळ्यांतून हे नेहमीचे, सातत्यपूर्ण झाले होते जेथे ख्रिस्तीजण दररोज प्रत्येकांस जिंकण्यास व साक्ष देण्यास बाहेर पडत होते (जॉन आर. राईस, डी.डी., व्हाय अवर चर्चेस डू नॉट विन साऊल्स, स्वोर्ड ऑफ द पब्लिशर्स, 1966, पृष्ठ 25).

डॉ. राईस पुढे म्हणतात, “छळ, दुष्टता, अंध लोक, असतांनाहि त्यांनी पुष्कळांस जिंकले...” नवीन करारातील मंडळ्यांची अद्भूत वृद्धी ही आपल्या समजण्यापलीकडची आहे. वारनोक, त्यांच्या हिस्ट्री ऑफ प्रोटेस्टंट मिशन्स, मध्ये, म्हणतात की पहिल्या शतकाच्या समाप्तीस पेंटाकॉस्टच्या [सदुसस्ट] वर्षानंतर, तेथे जवळजवळ 200,000 ख्रिस्ती लोक होते. तो म्हणतो भयंकर छळ व हजारो हुतात्मे झाले असतानाहि तिस-या शतकाच्या शेवटी तेथे, जवळजवळ [8,000,000] ख्रिस्ती लोक होते. संपूर्ण रोमी साम्राज्यात रंक्तरंजीत छळ होतांना सुद्धा...ते आता रोमी साम्राज्याच्या एक-पंधरामांश होते! [ म्हणजेच, पंधरा व्यक्तीच्या मागे एक व्यक्ति ख्रिस्ती होता] स्तेफनाला दगडमार करुन व याकोबास यरुशलेमेत मारले, पुष्कळांचा ‘मरेपर्यंत, छळ केला, पुरुष व स्त्रियांना तुरुंगात टाकले’ (प्रेषितs 22:4), पौलाला तुरुंगात टाकण्याचा व मारण्याचा प्रयत्न केला, असे सर्व असूनहि यहुद्यांतून हजारोनां जिंकले. न्यूरो, ज्याने पौल व इतरांचा शिरच्छेद केला त्याच्या अधिपत्याखाली झालेला छळ; हाड्रीयन व विशेषत: आन्टेनिअस पायस, मार्कस ऑरेलिअस आणि सेप्टिमस सेवरस यांच्या अधिपत्याखाली झालेला छळ, तरीहि सुवार्तेचा पेटलेला अग्नि अजूनहि चालू आहे. वर्कमॅन म्हणतात,

“दोनशे वर्षाकरिता, ख्रिस्ती होणे म्हणजे महान त्याग, तिरस्कारीत समाजाला जोडले जाणे, प्रसिद्ध गाठीच्या लाटेच्या प्रहावा विरुद्ध पोहणे, साम्राज्याच्या बंदीच्या अंतर्गत येणारे, आणि केव्हांहि तुरुंगवास व भयंकर अशा मृत्यू रुपाची शक्यता. कारण तो ख्रिस्ताचा दोनशे वर्षे अनुयायी असेल तर त्याला किंमत ही मोजावी लागणार, वा किंमत मोजण्याची तयारी छेवावी लागेल...आपले स्वातंत्र्य व जीवन याबरोबर. दोनशे वर्षासाठी ख्रिस्तीत्व हो एक गुन्हा होता” (राईस, ibid., पृष्ठ 27-28).

डॉ. राईस म्हणाले, “विपरीत परिस्थिती, हिसंक द्वेष, छळ आणि ‘बंद दररवाजे’ अशा स्थितीत, नवीन करारातील ख्रिस्ती लोकांनी आत्मे-जिंकण्याचे अद्भूत काम चालू ठेवले. आपल्या मंडळ्यांचे आत्मे-जिंकण्याचे कामाची तुलना नवीन करारातील मंडळ्यांचे शिक्षण व काम याच्याशी कसे कराल?” (राईस, ibid.). “नवीन करारातील मंडळ्यां व नवीन करारातील ख्रिस्ती लोकांशी तुलना करता, सध्याच्या-काळातील मंडळ्या व ख्रिस्ती लोक सपशेल व लाजिरवाणे अपयशी ठरल्या आहेत” (राईस, ibid., पृष्ठ 29).

पुन्हा, डॉ. राईस म्हणाले, “केवळ सपूर्णत: प्रयत्न नवीन करारातील आत्मे जिंकण्याला जुळू शकतो...देवाचे काम करण्यामध्ये आपला शुल्लक दैहिक स्वभाव जी वृत्ती सपूर्णत: आज्ञापालन, लाल-गरम उत्साह व जोश यापासून भटकून कोमटपणा, नाउमेदीत बदलला. जसे की जुने महान गीत म्हणते,

भटकण्यास पालथा पडतो, प्रभू, मला ते जाणवते,
देवाला प्रेम करणे सोडण्यास पालथा पडतो.

अशाप्रकारे तेथे मंडळ्यांत पुन्हा पुन्हा उत्साहाचे संजीवन, आत्मे-जिंकण्याच्या आवेशाचे संजीवन, आपल्यावरील देवाच्या सामर्थ्याचे संजीवन हवे आहे. नवीन कराराच्या पद्धतीनंतर मंडळ्यांना आत्मे जिंकण्यास सपूर्णत: प्रयत्ना शिवाय इतर कुठलाहि मार्ग नाही” (राईस, ibid., पृष्ठ 149-150).

मला ठाऊक आहे की असेहि कांहीजण आहेत ते म्हणतील की प्रत्येक व्यक्तीने सुवार्ता सांगावी यावर डॉ. राईस जे भर देतात ते “काम” करणार नाही. त्यामुळे कांहीजण हायपर-कॅल्विनीवादाकडे वळले — पाच-सुत्री कॅल्विनीवादाकडे नव्हे — पण हायपर-कॅल्विनीवादाकडे, संकल्पना अशी की पतन झाल्यानंतर तुम्हांला जाण्याची गरज नाही; ख्रिस्ती लोकांनी सुवार्ताकार्य न करता देव त्याच्या सार्वभौम कृपेने त्यांना आत आणील. जॉर्ज व्हिटफिल्ड, विलियम कॅरी, स्पर्जन आणि इतर महान आत्मे-जिंकणारे हे पाच-सुत्री कॅल्विनीवादी होते परंतू ते हायपर-कॅल्विनीवादी नव्हते. ते विश्वास ठेवीत की आपणांस “सुवार्तेचे कार्य करायचे आहे” (II तिमथी 4:5). मी आशा करतो की प्रत्येक सुधारणावादी पाळकाने हे वाचले पाहिजे, स्पर्जन व्ही. हायपर-कॅल्विनीझम, रेव्ह. इआन एच. मुरे (बॅनर ऑफ ट्रुथ ट्रस्ट, 1995). मागविण्यास येथे क्लिक करा. हे खूप छान पुस्तक आहे जे तुम्हांला प्रेरणा दईल, तुमचे ह्दय चेतवील, आणि पतन पावलेल्यांसाठी सुवार्ता सांगण्यास तुमचा उत्साह नवा करील!

डॉ. राईस ख्रिस्ती लोकांना सुवार्तेच्या कामामध्ये आपले ह्दय आणि आपला जीव झोकून देण्यास सांगतात ते चुकीचे नाही. दुबळे येतात कारण पुष्कळ मंडळ्या त्यांचा पाठपुरावा करतात पण पतन झालेल्यांस आत आणण्यास ते पुरेसा वेळ देत नाहीत. साधारणत: बाप्तिस्मा करण्यापूर्वी लोकांनी पश्चाताप केला की नाही, येशू ख्रिस्तात खरे परिवर्तन झाले की नाही याची खातरजमा न करता ते त्यांना “जलद प्रार्थना” म्हणावयास लावतात. डॉ. कागॅन व मी आम्ही दोघानी “निर्णयकता” यावर एक पुस्तक लिहल् आहे. जे तुम्ही टुडेज अपोस्टे: हाऊ डिसीजनीझम इज डिस्ट्रॉइंग अवर चर्चेस या संकेतस्थळावर मोफत वाचू शकता.

अंघोळीच्या तबकातून बाळास फेकू नका! डॉ. जॉन आर. राईस यंनी दिलेल्या या विधानाशी मी पूर्णपणे सहमत आहे. आरंभीच्या मंडळ्यांचा सुवार्तेसंबंधीचा आवेश आपण तपासायला हवा, व त्यांचे अनुकरण करायला हवे! चला आपल्या स्वत:ला हरविलेल्यांस सुवार्ता सांगण्यास खर्च करुयात! तसेच ते बाप्तिस्मा करण्यापूर्वी ख-या अर्थाने परिवर्तित झालेत की नाही याचीहि खातरी करुयात! ह्या सर्वाहून, ख्रिस्ताची आज्ञा लक्षात ठेऊ,

“माझे घर भरुन जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करु घेऊन ये” (लुक 14:23).

दुस-या शतकात ओरिजन म्हणाले, “ख्रिस्ती लोक संपूर्ण जगात त्यांच्या विश्वासाचा प्रसार करण्यास त्यांचे सर्व सामर्थ्य पणाला लावतात,” चला अशीच गोष्ट करुया! उभे राहा व डॉ. ओस्वाल्ड जे. स्मिथ यांचे महान जुने गीत — “सुवार्ता सांगा! सुवार्ता सांगा!” हे गाऊ. ते तुमच्या गीत पत्रिकेवर क्रं.1 वर आहे.

ह्या वेळेकरिता आम्हांस घोषणा दे, रोमांचकारी शब्द, सामर्थ्याचा शब्द,
रणांगण, ज्वलंत श्वास ज्याला विजय किंवा मृत्यू म्हणतील.
शब्द मंडळीस शांततेतून जागा करणारा, प्रभूची महान विनंतीकडे लक्ष देण्यास.
पाचारण दिले आहे, हे यजमाना, ऊठ, आपली घोषणा आहे, सुवार्ता सांगा!

आनंदी सुवार्तिक आता घोषणा करा, संपूर्ण पृथ्वीवर, येशूच्या नावांत;
सुवार्ता सांगा! सुवार्ता सांगा! हा शब्द संपूर्ण आकाशात गुंजत आहे:
मरणा-या मनुष्यांस, पतित जातीसुंहांस, शुभवर्तमानाच्या कृपेची भेट करुन द्या;
शब्द जो आता अंधकारात पडला आहे, सुवार्ता सांगा! सुवार्ता सांगा!
   (“इव्हांजलाईज! इव्हांजलाईज!” डॉ. ओस्वाल्ड जे. स्मिथ, 1889-1986; चाल
      “अँड कॅन इट बी?” चार्लस् वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले: “हिअर एम आय”
(डॉ. जॉन आर. राईस, यांच्याद्वारा, 1895-1980).
“Here Am I” (by Dr. John R. Rice, 1895-1980).