Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
आपणांस दुबळे करणा-या सैतानावर
विजय मिळविणे – “ही जात”!

OVERCOMING THE DEMONS THAT WEAKEN US –
“THIS KIND”!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 5 ऑगस्ट, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, August 5, 2018

“मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी एकांती विचारले, आम्हांला तो का काढता ला नाही? तो त्यांस म्हणाला ही जात प्रार्थनेवाचून दुस-या कशानेहि निघणारी नाही” (मार्क 9:28-29).


आज रात्रौ मी भुते व सैतान यावर बोलणार आहे, आणि डॉ. जे. आय. पॅकर हे “सध्याच्या मंडळीच्या भग्न स्थितीविषयी बोलले,” आणि 1859 पासून अमेरिकेत कोणतेहि मोठ्या राष्ट्रीय संजीवन झाले नाही ह्या कारणास्तव. डॉ. मार्टिन लॉईड- जोन्स यांच्या उपदेशाच्या आराखड्यावर मी अवलंबून आहे. मूळ विषय व आराखडा हा डॉ. लॉईड- जोन्स यांच्या उपदेशातून आहे.

“मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी एकांती विचारले, आम्हांला तो का काढता ला नाही? तो त्यांस म्हणाला ही जात प्रार्थनेवाचून दुस-या कशानेहि निघणारी नाही” (मार्क 9:28-29).

ह्या दोन वचनावर विचार करावा असे मला वाटते. अमेरिका व पश्चिम जगतातील “भग्न” मंडळीसाठी रडणा-यांसाठी ह्या वचनांचा वापर करणार आहे — कांही मुद्दे आपल्या मंडळीकडे सुद्धा निर्देशित करतात.

सध्या “संजीवन” हा शब्द लोकांसाठी सुट्टी होतो. त्याविषयी त्यांना ऐकावेसे वाटत नाही. पण त्यांना असे वाटते कारण ते सैतानी आहे! हाच तो विषय आहे त्याविषयी लोकांनी विचार करु नये असे सैतानाला वाटते. म्हणून मी प्रार्थना करतो की आपल्या मंडळीची, आणि सा-या मंडळ्यांची ही गंभीर गरज त्यावर मी बोलत असतांना तुम्ही काळजीपूर्वक ऐकावे.

हा तो विषय आहे ज्यात प्रत्येकांने विशेष रस घेतले पाहिजे. मंडळ्यांची जी सद्यस्थिती आहे त्यासंबंधाने तुम्हांला काळजी नसेल तर आपण गरीब ख्रिस्ती आहोत. खरे तर, तुम्हांला ख-या संजीवनात रस नसेल तर, तुम्ही ख्रिस्ती आहांत की नाही याविषयी शंका आहे! तुम्हांला आपल्या मंडळी, आणि इतरांविषयी काळजी नसेल तर, तुम्ही उत्साही ख्रिस्ती नव्हे! मी पुन्हां सांगतो, खरे संजीवन म्हणजे आपणां सर्वांमध्ये सर्वांसंबंधाने विशेष रस असणे. .

मार्काच्या नवव्या अध्यायातील घटनेसंबंधी विचार करण्यास सुरु करा. ही खूप महत्वाची घटना आहे, कारण चार पैकी तीन शुभवर्तमान, मत्तय, मार्क, आणि लुक मध्ये ही घटनेचे वृत्त देण्यास पवित्र आत्म्याने साहाय्य केले आहे. मी मार्क मधील वृत्तातून दोन वचने वाचत आहे. मार्काच्या आरंभीच्या अध्यायात मार्क आपणांस सांगतो ख्रिस्त पेत्र, याकोब, व योहान यांना घेऊन रुपांतरणाच्या डोंगरावर गेला जेथे त्यांनी अदभूत घटना पाहिली. पण, जेव्हां ते डोंगरावरुन खाली आले, तेव्हां त्यानी बाकीच्या शिष्यांना मोठ्या समुदायाने वेढले होते व ते त्यांच्याशी वाद घालीत होते असे पाहिले! येशूबरोबर जे तिघे खाली आले त्यांना हे काय चालले आहे हे समजले नाही. मग एक मनुष्य गर्दीतून पुढे आला व येशूला म्हणाला की त्याच्या मुलाला भुत लागल्याने त्याच्या तोंडाला फेस येतो व कडकडा दात खातो आहे. मग तो मनुष्य म्हणाला, “त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले, परंतू त्यांना तो काढता येईना” (मार्क 9:18). त्यांना प्रयत्न केला, पण अपयशी झाले.

येशूने त्या माणसास कांही प्रश्न विचारले. मग त्या लगोलग त्या भुतास मुलाच्या शरीरातून बाहेर काढले. मग येशू घरात गेला, आणि शिष्य सुद्धा त्याच्याबरोबर गेले. मगते घरातच असतांना शिष्यांनी त्याला विचारले, “आम्हांला तो का काढता आला नाही?” (मार्क 9:28). त्यांनी बराच प्रयत्न केला होता. यापूर्वी ते ब-याचदा यशश्वी झाले होते. पण यावेळी ते पूर्णत: अपयशी ठरले होते. तरीहि ख्रिस्त सहज म्हणाला, “ह्याच्यातून नीघ” आणि मुलगा बरा झाला. ते म्हणाले, “आम्हांला तो का काढता आला नाही?” ख्रिस्ताने उत्तर दिले, “ही जात उपवास व प्रार्थना यावाचून निघणारी नाही” (मार्क 9:29).

आता मी तुम्हांला या घटनेचा उपयोग करुन सध्याच्या मंडळीतील समस्या दाखवितो. हा मुलगा आधुनिक जगातील मंडळ्यातील तरुणांचे प्रतिनिधीत्व करतो. शिष्य हे सध्याच्या मंडळीला प्रतिनिधीत्व दर्शवितात. तरुणांना साहाय्य करण्यास आपल्या मंडळ्या कमी पडतायत हे स्पष्ट आहे नाही का? जॉर्ज बर्ना आम्हांला सांगतात की मंडळीत वाढलेली, आपली 88% मुले आपण गमाविली आहेत. आणि आपण जगातून नगन्य प्रमाणात जिंकत आहोत, अगदी नगन्य. आपल्या मंडळ्या रिकाम्या पडल्या आहेत व वेगाने अपयशी ठरतायत. सदर्न बाप्टिस्ट सध्या दरवर्षी 1,000 मंडळ्या गमावित आहे! ही त्यांची स्वत:ची आकडेवारी आहे! आपल्या स्वतंत्र मंडळ्या सुद्धा चांगले काम तरीत नाहीत. ह्या आकडेवरीला पाहून कोणीहि सांगेल की शंभर वर्षापूर्वी मंडळ्या जशा बळकट होत्या त्याच्या निम्म्याहून सुद्धा आताच्या मंडळ्या नाहीत. त्यामुळे डॉ. जे. आय. पॅकर म्हणाले, “सध्याच्या मंडळ्यांची स्थिती मोडकळीस आली आहे.”

आपल्या मंडळ्या, शिष्याप्रमाणे, त्यांना जे शक्य आहे ते सर्व करतात, आणि तरीहि ते अपयशी होतात. शिष्य जसे त्या मुलाला बरे करण्यास अपयशी ठरले तसे तेहि अपयशी ठरतायेत. आम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे की “आम्ही तो का काढू शकत नाही?” या अपयशाचे कारण काय?

येथे, मार्काच्या नवव्या अध्यायात, मला वाटते की ख्रिस्त ह्या प्रश्नाचे उत्तर देतोय. आणि जे उत्तर ख्रिस्ताने दिले ते मागे जसे महत्वाचे होते तसे आताहि आहे.

“मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी एकांती विचारले, आम्हांला तो का काढता ला नाही? तो त्यांस म्हणाला ही जात प्रार्थनेवाचून दुस-या कशानेहि निघणारी नाही” (मार्क 9:28-29).

पुढीलभाग तीन साध्या मुद्द्यांमध्ये विभागला आहे.

I. पहिला मुद्दा आहे “ह्या जातीचे”

ते त्याला का काढू शकले नाहीत? ख्रिस्त म्हणाला, “ही जात प्रार्थना व उपासावाचून जाणारी नाही.” एक बाब इतर बाबीपेक्षा वेगळी असते हे त्याने सांगितले. मागे ख्रिस्ताने त्यांना सुवार्ता सांगण्यास व भुते काढण्यास पाठविले होते — आणि ते गेले सुवार्ता सांगितली व पुष्कळ भुते सुद्धा काढलीत. ते आनंदाने परत आले होते. ते म्हणाले भुते सुद्धा आम्हांला अधीन होतात.

त्यामुळे जेव्हां ह्या मनुष्याने त्याचा मुलगा त्यांच्याकडे आणला तेव्हां त्यांना खात्री होती की मागे जसे केले तसे आताहि आपण करु. तरी पण ते यावेळी सपशेल अपयशी ठरले. सर्वप्रकारचा प्रयत्न करुनहि त्या मुलाला सुटका मिळाली नव्हती, आणि याचे त्यांना आश्चर्य वाटले. ख्रिस्त म्हणाला, “ही जात.” त्यानी ज्या पद्धतीचा सामना केला होता त्यापेक्षा “ही जात” यामध्ये फरक आहे.

अशाप्रकारे, समस्या ही नेहमी सारखीच नसते. सैतान व त्याच्या दूतांच्या तावडीतून तरुणांना सोडविण्याचे काम, “त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे” (प्रेषित 26:18). हे प्रत्येक पीढीत, आणि प्रत्येक संस्कृतीत नेहमी सारखेच आहे. मंडळ्यांना नेहमी सैतान व त्याच्या दूतांना हाताळावे लागते. परंतू तेथे भुतांमध्ये फरक आहे. ते सगळे सारखे नसतात. प्रेषित पौल म्हणाला की, “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिका-यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे” (इफिस 6:12). त्या भुतांचा वेगवेगळा दर्जा आहे, आणि त्यांचा पुढारी हा सैतान आहे, “अंतरिक्षातील अधिपति म्हणजे आज्ञा मोडणा-या लोकांत कार्य करणा-या आत्म्याचा अधिपति” (इफिस 2:2). सैतान त्याच्या सामर्थ्यासहित जिवंत आहे. पण त्याच्या अधिपत्याखाली कमी सामर्थ्यशाली भुते. शिष्य कमी ताकदीच्या भुतांना लगेच काढू शकले. पण येथे, या मुलात, अधिक सामर्थ्यशाली दुरात्मा होता. “ही जात” हे वेगळी आहे, आणि त्यामुळे अधिक मोठी समस्या आहे. पहिली गोष्ट आपणास समजली ती म्हणजे “ही जात” याच्याशी आपणांस सध्या सामना करावयाचा आहे.

आपण ह्या “ही जात” दोन शब्दाकडे पाहिले तर आपण ज्या युद्धात आहोत ते आध्यात्मिक आहे हे सध्याच्या पुष्कळ पाळकांना समजले तरी मला आश्चर्य वाटेल. मला खात्री आहे की पुष्कळ पाळक कधीच विचार करीत नाहीत की ते सैतान व दुष्ट आत्म्यांबरोबरील युद्धात आहेत. सेमीनरीज, आणि पवित्रशास्त्र महाविद्यालयेहि, मानवी पद्धतीवर भर देतात. परंतू त्यांची मुख्य समस्या आध्यात्मिक क्षेत्रात असते प्रचारकांना हे ते शिकवित नाहीत.

त्यामुळे ते भूतकाळा यशश्वी होण्यास वापरलेल्या ठराविक पद्धतीचा अवलंब करतात. “ही जात” याच्याशी त्यांची जुनी पद्धत कामी येत नाही हे त्यांना समजत नाही. प्रत्येकाला ठाऊक की ही गरज आहे. पण प्रश्न हा आहे की — ती गरज काय आहे? जोवर आपण गरज काय हे जाणून घेत नाही, तोवर त्या मुलाच्या बाबतीत शिष्य जसे अपयशी ठरले तसे आपण अपयशी ठरु.

“ही जात” सध्या काय आहे? “ही जात” म्हणजे सैतानाचा अस्तित्ववाद होय. अस्तित्ववाद म्हणजे कांहीतरी वास्तवात आहे परंतू ते तुम्हांस अनुभवा लागेल — तेव्हांच तुम्हांला त्याची जाणीव होईल. सध्या ह्या “जाणीवेच्या सैतानाने” लोकांची मनें आंधळी केली आहेत. ह्या अस्तित्ववादाचा जाणीवेचा सैतान म्हणतो तुम्हांला सारकाचा — खात्रीचा अनुभव असलाच पाहिजे. सैतान म्हणतो तुम्हांला ती जाणीव असेल तर, तुमचे तारण झाले आहे हे सिद्ध होते आहे.

हे अंध लोक न्यायाच्या देवावर विश्वास ठेवीत नाहीत. ते केवळ भावनेवर विश्वास ठेवतात. तारण होण्यास भावनेची गरज आहे असे त्यांना वाटते. त्यांचे तारण झाले आहे हे सिद्ध करण्यास त्यांना “खात्रीच्याभावनेची गरच असते. त्यांची “खात्री” ही मूर्ति असते! ते येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवता, ते त्यांच्या भावनेवर विश्वास ठेवतात! आम्ही लोकांना विचारले, “तुम्ही येशूवर विश्वास ठेवला काय?” ते म्हणतात, “नाही.” ते नाही का म्हणतात? कारण त्यांची भावना य़ोग्य नसते! ते ख्रिस्तावर विश्वास न ठेवता, ते त्यांच्या भावनेवर विश्वास ठेवतात! सैतानाने त्यांची मने आंधळी केली आहेत. “ह्या जातीचे” सैतान केवळ प्रार्थना उपवास केल्यानेच पराभूत होऊ शकतो! “ह्या जातीची” पकड तोडण्याकरिता आम्ही उपवास केला पाहिजे!

II. दुसरा मुद्दा आहे पद्धत जी अपयशी ठरली.

मी पाहतो की आपल्या मंडळ्या ह्या भूतकाळात खूप उपयोगी होत्या त्या करतात, परंतू “ह्या जातीच्या” साठी परिणामकारक नव्हत्या. आपण जुन्या पद्धतीवर अवलंबून असल्याने, आपण आपले सर्व तरुण गमावित आहोत, आणि जगातील इतरांना क्वचितच परिवर्तित करीत आहोत. गैरसमजूत होण्याच्या धोक्याने, मी शब्बाथशाळा त्या वर्गात टाकतो. एकशे-पंचवीस वर्षापूर्वी हे अतिशय परिणामकारक होते. पण मला वाटतं आता त्याला किंमत नाही. तारणाच्या पत्रिकेसंबंधीसुद्धा असेच आहे असे सांगावेसे वाटते. एखाद्या वेळेस लोक त्यास वाचतील व मंडळीला येतील. पण मी कोणत्याहि पाळकाला विचारीन की, “तुमच्या मंडळीत असा कोणी तरुण आहे का ज्याचे तारण पत्रिका वाचून झाले व तो आता मंडळीत आहे?” मला वाटते हे स्पष्ट आहे की आपल्या काळातील “ह्या जातीचा” भूतकाळात वापरलेल्या पद्धतीला चांगला प्रतिसाद वगैरे दईल. त्या प्रकारात मी दारो-दारी भेट दिली आहे. ह्याचा भूतकाळात सामर्थ्याने उपयोग झाला आहे, पण “ह्या जातीच्या” प्रकारातील तरुणांशी वागत असतांना हे तरुण मंडळीत येण्यास आता मदत होत नाही.

जोवर ते “ह्या जातीच्या” साठी त्या विशिष्ठ गोष्टी सध्या वापरत नाहीत, तोवर त्या निरोपयोगी आहेत. दुस-या शब्दात, ख्रिस्त परिणामयुक्त सांगत होता की, “ह्या बाबतीत तुम्ही अपयशी झाला कारण तुमच्याकडे जे सामर्थ्य होते, ते दुस-या बाबतीत पुरेसे होते, येथे त्याला कांही किंमत नाही. ‘ह्या जातीच्या’ सामर्थ्याच्या अधिपत्याखाली असलेल्या या मुलास मदत करण्यास तुम्ही दुर्बळ ठरलात.”

मला ठाऊक आहे की आपण भूतकाळात ज्या गोष्टी केल्या त्या आता निरोपयोगी आहेत हे पुष्कळ पाळकांना कळाले असेल. पण त्यांना सैतानाच्या “डावपेचा” ऐवजी पद्धतीविषयी विचार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे (II करिंथ 2:11) — त्यामुळे जुन्या पद्धतीपेक्षा अधिक चांगल्या नसणा-या नव्या पद्धतीकडे ते वळतात — म्हणजेच, जर आपण तरुणांना मंडळीचे खंबीर सभासद म्हणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हां. उदाहरणत: आपल्याकडे कांही अशी माणसे असतात की ते म्हणतात की उत्पत्ती ही पविशास्त्रातील उत्पत्तीच्या पुस्तकात सांगितल्या प्रमाणे खरी आहे आणि उत्क्रांती खोटी आहे हे “सिद्ध” करणारे उत्तर तरुणांना द्यायला हवे. त्यांना वाटते की उत्क्रांती खोटी आहे हे सिद्ध करु शकू व उत्पत्तीच्या पुस्तकातून त्यांना उत्तरे मिळतील तेव्हां तरुणांचे परिवर्तन होईल व जगातील इतर लोकहि येतील. ह्या पद्धतीने आपण सध्याच्या परिस्थीतीचा सामना करु शकू असे त्यांना वाटते.

डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले, “अठराव्या शतकाच्या आरंभी ते अगदी असेच होते, जेव्हां लोक त्यांचा विश्वास ताणत होते [क्षमायाचना] करीत होते. अशाप्रकारे, त्यानी आम्हांला शिकविले की ज्या गोष्टी ते दाखविणार ते होते ख्रिस्तीपणाचे सत्य, पण त्याप्रमाणे ते करीत नाहीत. ‘ही जात’ दुसरे कशानेहि निघू शकत नाही.”

आणखी एक पद्धत जी अपयशी झाली ती म्हणजे आधुनिक अनुवाद. आपणांस सांगण्यात आले की किंग जेम्सचे पवित्रशास्त्र तरुणांना समजत नाही. आपणांस काय गरज आहे तर आधुनिक नवीन अनुवादित पवित्रशास्त्र. मग तरुण ते वाचतील. मग ते म्हणतील, “हाच तो ख्रिस्तीपणा” – आणि ते आपल्या मंडळ्यात जमावाने येतील. पण तसे कांही घडले नाही. खरेतर, अगदी त्याच्या उलटे घडले. मी गेली साठ वर्षे केवळ तरुणांमध्ये काम करतो आहोत. आधुनिक अनुवाद तरुणांना अजिबात आकर्षित करु शकला नाही हे सत्य मी जाणतो. खरेतर, पुष्कळांना म्हणतांना मी ऐकले आहे की, “हे चांगले वाटत नाही. हे पवित्रशास्त्रासारखे चांगले वाटत नाही.”

मी आधुनिक अनुवादातून कधीच प्रचार केला नाही, व करणारहि नाही. आणि दोन्ही म्हणजे मंडळीत, व बाहेरच्या जगात सुद्धा, तरुण सर्ववेळ परिवर्तित होत असलेले आम्ही पाहत आहोत. ह्या आधुनिक अनुवादाची कांहीहि किंमत असो, त्याने समस्या सुटणार नाही. ते “ह्या जातीच्या” समस्या सोडवणार नाही.

आणखी कशाचा ते प्रयत्न करताहेत? ओ, मोठे आधुनिक संगीत! “आपल्याकडे चांगले संगीत असले पाहिजे मग ते येतील व ख्रिस्ती बनतील.” हे खूप दु:खद आहे. ह्यावर मी खरोबर प्रतिक्रिया द्यावी की नाही? लॉस्एंजिल्स येथील सदर्न बाप्टिस्ट मंडळी आपल्या भाड्यातून खर्च भागविते. पाळक टी शर्ट घालतात व स्टुलवर बसतात. त्यांनी उपदेश देण्यापूर्वी, तासाहून अधिक वेळ रॉकसंगीत वाजविले जाते. आमच्यातील एकजन ते तपासण्यासाठी आत गेला. तो थक्क झाला. तो म्हणाला उपासना ही अंधकारमय व दयनीय अशी होती, जराहि आध्यात्मिक नव्हती. तो म्हणाला ते लोक आत्मे जिंकीत नाहीत, आणि आपल्या तरुणाप्रमाणे ते एक तासभर प्रार्थना करीत असतील याची तो कल्पनाहि करु शकत नाही. तासभर सोडा केवळ प्रार्थना तरी करतात की नाही? विसरा सगळे! त्यामुळे, आधुनिक संगीत “ह्या जाती” वर विजय मिळविण्यात अपयशी ठरले.

III. तिसरा मुद्दा हा आहे की आपणांस असे कांहीतरी हवे जे त्या दुष्ट शक्तीच्या खाली जाईल, आणि ते ढासळू शकेल, आणि हे केवळ एकच शक्ति करु शकते, ते म्हणजे देवाचे सामर्थ्य!

डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले, “आपण हे समजून घेतले पाहिजे की “ह्या जातीचे” कितीहि सामर्थ्य असले तरी, देवाचे सामर्थ्य हे अगणित मोठे आहे, त्यामुळे आपणांस अधिक ज्ञान, अधिक समज, अधिक क्षमायाचना, [नवीन अनुवाद, किंवा रॉक संगीत] यांची गरज नाही – नाही, आपणांस अशा सामर्थ्याची गरज आहे जे माणसाच्या आत्म्यात शिरेल व त्यास भग्न करील व त्याचा चुराडा करील व त्यास नम्र करील व एक नवी उत्पत्ती करील. आणि ते जिवंत देवाचे सामर्थ्य आहे.” आणि हे आपणांस ह्या उता-याकडे नेते,

“मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी एकांती विचारले, आम्हांला तो का काढता ला नाही? तो त्यांस म्हणाला ही जात प्रार्थनेवाचून दुस-या कशानेहि निघणारी नाही” (मार्क 9:28-29).

प्रार्थना व उपवास. “ह्या जातीचे” सैतानी हल्ला परतावून लावण्यास दुसरा कशाचा उपयोग नाही. सध्या आपल्या मंडळ्या तरुणांपर्यंत पोहंचत नाहीत. आपण काय करु शकतो? “ही जात प्रार्थना व उपवासावचून दुस-या कशानेहि निघणारी नाही.”

कांही “शास्त्रपंडीत” म्हणतील, “सर्वात चांगला शास्त्रलेख ‘व उपवास’ करावयास सांगत नाही.” परंतू त्या “शास्त्रपंडीत” ना सैतानाविषया काय माहिती आहे? आपल्या शहरातील रस्त्यावरील व महाविद्यालयाच्या परिसरातील अविश्वासणा-यांना कसे परिवर्तित करणार? संजीवनाबद्दल तो काय जाणतो – संजीवन जे ते सध्या चीनमध्ये अनुभवत आहेत? त्या गोष्टी कांही नाही हे तो जाणतो. पाप-ढासळणा-या संजीवनाचा मी माझ्या जीवनात तीन वेळा प्रत्यक्ष दर्शनी साक्षी आहे. त्या संजीवनाचा मला प्रचार करण्याचे सौभाग्य लाभले याचा विचार करताना मी भारावून गेलो. त्यांच्या सुवार्तिक सभा नसतात. त्यांच्याकडे अशी एक वेळ येते त्यावेळी देवाचे सामर्थ्य माणसांच्या अंत:करणात येते, व त्यांस भग्न करते, व त्यांचा चुराडा करते, त्यांस नम्र करते, व त्यांस येशू ख्रिस्तात नवी उत्पत्ती बनविते!

त्यामुळे, आम्ही दोन जुने शास्त्रलेख मानत नाही ज्यातून “उपवास” हा शब्द काढला आहे. नॉस्टिकवादी उपवासावर जोर देतात. त्यामुळे ज्या माणसांनी सिनायटिक शास्त्रलेख नकल केला त्यांनी “व उपवास” हे शब्द काढून टाकले यासाठी की नॉस्टिकवाद्याने ते शब्द वापरु नयेत. “नॉस्टिकवाद्यांनी उपासमार होईस्तोवर उपवास केला” (विलयम आर. हॉर्ने, ट्रिनिटी इव्हांजिलीकल सेमीनरी, “मंडळी इतिहासामध्ये केलेले उपवास पालन,” पृष्ठ 3). नकल करणा-यांनी त्या शब्दांची भर घातली असे आधुनिक “शास्त्रपंडीत” आपणांस सांगतात. पण त्यांनी काढून टाकले असेच जास्त वाटते (पाहा द सिक्रेट हिस्ट्री ऑफ द नॉस्टिक: बिलिफ अँड ट्रॅडिशन्स, अँड्रु फिलीप्प स्मिथ यांच्याद्वारा, अध्याय 5, पृष्ठ 1). आपणांस ठाऊक हे की ख्रिस्त म्हणाला, “व उपवास.” आपणांस ते कसे कळाले? आपणांस ठाऊक आहे ते दोन कारणांनी. पहिले, शिष्यांनी अगोदर भुत काढण्याचा प्रयत्न करतांना प्रार्थना ही केली असणारच. त्यामुळे आणखी कांहीतरी करावे लागणार. आणखी कांहीतरी पाहिजे − उपवास! केवळ प्रार्थना पुरेशी नाही. आपल्या अनुभवाने सुद्धा आपणांस कळते. आपण उपवास केला व आपण आपल्या डोळ्यांनी पाहिले की जेव्हां आपण आपले अंत:करण उपवास व प्रार्थनेत ओततो तेव्हां देव काय करु शकतो.

आता मी मार्टिन लॉईड-जोन्स यांच्या आणखी एका वचनाने समाप्ती करीत आहे. काय प्रचारक आहे! काय अंतर्ज्ञान! त्यांच्यासाठी मी देवाचे कसे आभार मानू. एका ठिकाणी ते म्हणाले,

उपवासाच्या बाबतीत जे आपणांस हवे ते आपणाबाबतीत कधी घडले आहे का याचे मला आश्चर्य आहे? सत्य हे आहे की, हे नाही का, की संपूर्ण विषय आपल्या जीवनातून, आणि आपल्या संपूर्ण ख्रिस्ती विचारातून वगळला आहे असे वाटते?

आणि ते, कदाचित इतर कशापेक्षाहि जास्त आहे, आपण “ह्या जाती” वर विजय का मिळवू शकत नाही.

मी आपल्या मंडळीत साधारण उपवासाकरिता बोलावितो. त्या विषयी अधिक मी तुम्हांस नंतर सांगतो. आपण उपवास कधी करायचा हे मी सांगतो. उपवास कसा करायचा हे मी तुम्हांस सागंतो, आणि तुमचा उपवास कसा समाप्त करायचा हे सांगतो.

त्यावेळी आपण मंडळीत येणार आहोत व प्रार्थना सभा करण्यापूर्वी जेवण करणार आहोत. डॉ. कागॅन कांही फोन कर्त्यांना कांही वेळेकरिता फोन करण्यास सांगतील. बाकीचे इतर प्रार्थना करतील, आणि डॉ. कागॅन व मी प्रश्नांची उत्तरे देणार.

1. आपण आपल्या नवीन कार्यक्रमासाठी उपवास व प्रार्थना करणार आहोत.

2. आपण आपल्या नवीन मुलांच्या “गटा” साठी व नवीन मुलींच्या “गट” साठी उपवास व प्रार्थना करणार आहोत. हा “गटात” पाच किंवा सहाजण असतील जे शनिवार, रविवार सकाळ, रविवार संध्याकाळ एकत्र येतील आणि जे शिष्य होण्यास उत्सुक आहेत.

3. आपण आपल्या मंडळीतील परिवर्तनासाठी उपवास व प्रार्थना करणार आहोत. “ह्या जातीच्या” — सैतान जो भावनेच्या शोधातील लोकांना गुलाम करतो त्यासाठी विशेष लक्ष देणार आहोत.


आता येशू शिवाय बोलून ही सभा संपवायची नाही. आपणांस त्याच्यातच सर्व शोधायचे. इब्रीकरांसचे पुस्तक म्हणते,

“देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा किंचितकाल कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे ‘गौरव व थोरवी ह्यांनी मुकुटमंडित केलेला’ असा आपण पाहतो” (इब्री 2:9).

येशू, देवाचा पुत्र, पापांच्या बदली मरण पावला, पापांच्या जागी. येशू तुम्हाला जीवन देण्यासाठी दैहिक, रक्तमांसाने व हाडासहित, मरणातून उठला. ज्या क्षणी तुम्ही येशूला स्वत:चे समर्पण करता त्याक्षणी त्याच्या वधस्तंभावरील मरणआने तुमचे पाप नाहीसे होते. ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला तारणा-यावर झोकून देता, त्याक्षणी ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्तद्वारे तुमचे पाप देवाच्या नोंदीतून कायमचे काढून टाकले जोते. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवावे व तुमचे पापापासून तारण व्हावे अशी प्रार्थना करतो. आमेन व आमेन. कृपया उभे राहा व गीतांच्या पत्रिकेवरील गीत क्रं. 4 गा.

आमचा देव बळकट दुर्ग, अभेद्य अशी पडणारी तटबंदी आहे,
   प्रचलित नित्याच्या संकटात, तो आमचा साहाय्यकर्ता आहे.
तरीहि आमचा प्राचीन शत्रू दु:ख देण्याचे मार्ग शोधतो;
   त्याची कला व सामर्थ्य मोठे आहे, आणि द्वेषाने भरलेली हत्यारे,
पृथ्वीवर त्याचे हे समान नाही.

आम्ही आमच्या ताकदीवर अवलंबून आहो, आमचे प्रयत्न गमावून बसू,
   आपल्या बाजूने कोणी चांगला माणूस नाही, देवाने स्वत: निवडलेला मनुष्य.
मित्रा कोण आहे ते विचार? तो ख्रिस्त येशू, आहे;
   त्याचे नाव शब्बाथाचा धनी होय, युगा न युगा सारखे,
आणि तो युद्ध जिंकलाच पाहिजे.
      (“अ माईटी फोट्रेस इज अवर गॉड” मार्टिन ल्युथर यांच्याद्वारा, 1483-1546).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले:
“ओल्ड-टाईम पॉवर” (पौल राडर यांच्याद्वारा, 1878-1938).
“Old-Time Power” (by Paul Rader, 1878-1938).


रुपरेषा

आपणांस दुबळे करणा-या सैतानावर
विजय मिळविणे – “ही जात”!

OVERCOMING THE DEMONS THAT WEAKEN US –
“THIS KIND”!

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“मग तो घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी एकांती विचारले, आम्हांला तो का काढता ला नाही? तो त्यांस म्हणाला ही जात प्रार्थनेवाचून दुस-या कशानेहि निघणारी नाही” (मार्क 9:28-29).

(मार्क 9:18)

I.   पहिला मुद्दा आहे “ह्या जातीचे”, प्रेषित 26:18; इफिस 6:12; 2:2.

II.  दुसरा मुद्दा आहे पद्धती जी अयशश्वी ठरली, II करिंथ 2:11.

III. तिसरा मुद्दा हा आहे की आपणांस असे कांहीतरी हवे जे त्या दुष्ट शक्तीच्या खाली जाईल, आणि ते ढासळू शकेल, आणि हे केवळ एकच शक्ति करु शकते, ते म्हणजे देवाचे सामर्थ्य! इब्री 2:9.