Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
शिष्य आणि भुतें

DISCIPLES AND DEMONS
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत
आणि रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 22 जुलै, 2018 रोजी
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, July 22, 2018


ख्रिस्त आपल्या शिष्यांना देत असलेल्या प्रशिक्षणावरचा आपला हा तिसरा अभ्यास आहे. येशू त्यांना देत असलेले प्रशिक्षण आपण अनुसरत असतांना, आपण सध्या शिष्यांना कसे प्रशिक्षण द्यावे हे शिकतो.

सध्या आपल्या मंडळ्या जशा तरुणांना प्रशिक्षण देतात तसे येशूने आपल्या शिष्यांना प्रशिक्षण दिले नाही. ज्या पद्धतीने येशूने शिष्य बनविले त्याकडे आपण बारीक लक्ष दिले पाहिजे, कारण तो सर्वात यशस्वी होता, व आपल्या मंडळ्या अपयशी ठरत आहेत. सध्याच्या शिष्य बनविण्याच्या पद्धतीत चूक आहे ती म्हणजे आपण त्यांना शिष्य करण्या पूर्वी परिवर्तनासाठी प्रयत्न करतो. परंतू येशूने त्यांचा नव्याने जन्म होण्यापूर्वी, त्यांना शिकविण्यास तीन वर्षे घालविली (योहान 20:22; पाहा जे. वरनॉन मॅक् गी व थॉमस हेल). येशूने जे केले, व आपण जे करतोय त्यामध्ये हा मुख्य फरक आहे.

येशूने शिकविलेल्या विषयातील आणखी एक मोठा फरक हा आहे. अगदी आरंभी येशूने त्यांना बोलावून म्हटले, “मी तुम्हांला माणसे धरणारे करीन” (मार्क 1:17). त्याने एका मोठ्या उद्देशाने त्यांना प्रशिक्षण दिले — त्यांनी इतरांना शिष्य करावे अशाप्रकारे त्यांना सक्षम केले. अगदी आरंभीच त्याने त्यांना आपला उद्देश सांगितलेला होता. आणि माझाहि उद्देश तोच आहे. ते शब्बाथ शाळांत शिकवितात तसे, येथे मी तुम्हांस पवित्रशास्त्रातील गोष्टी शिकवित नाही. तुम्ही आत्मे जिंकणारे असावेत हा माझा उद्देश आहे. आणि येशूने हे त्यांना आरंभीच सांगितले होते (पाहा मार्क 1: 16-20).

सैतान व त्याचे दूत यांच्याशी कसा व्यवहार करावा ही दुसरी गोष्ट ख्रिस्ताने शिकविली. मार्क 1:21-27 पाहा.

“नंतर ते कफर्णहूमास गेले; आणि लागलेच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले. त्याच्या शिकवणीवरुन लोक थक्क झाले, कारण ती त्यांना शास्त्री लोकांसारखा नव्हे तर अधिकार असल्यासारखा शिकवित होता. त्याच वेळी सभास्थानांत अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो ओरडून म्हणाला, हे येशू नासरेथकरा, तूं आमच्यामध्ये का पडतोस? आमचा नाश करावयास आलास काय? तूं कोण आहेस हे मला ठाऊक आहे, देवाचा पवित्र तो तूंच. येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व ह्याच्यातून निघ. तेव्हां अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला. तेव्हां ते इतके थक्क झाले की ते एकमेंकांस विचारु लागले, हे आहे तरी काय? काय ही अधिकारयुक्त शिकवण! हा अशुद्ध आत्म्यांनाहि आज्ञा करितो व ते त्याचे ऐकतात” (मार्क 1:21-27).

पाहा, दुसरी गोष्ट जी ख्रिस्ताने सैतान व त्याचे दूत यांच्यावरील सामर्थ्य याविषयी आपल्या चार शिष्यांना शिकविले होते. द रिफॉर्मेशन स्ट़डी बायबल (पृष्ठ 290) म्हणते,

भुते ही पतित झालेले देवदूत आहेत...जे सैतानासाठी काम करतात. जे सैतानाबरोबर बंडखोरीत सामील होते, ज्यांना स्वर्गातून खाली टाकण्यात आले...सैतानाचे सैन्य भुते फसवणूक व निराशा अशा विविध मार्गाचा [वापर] करतात. त्यांना विरोध करणे म्हणजे आध्यात्मिक युद्ध होय. (इफिस 6:10-18).

एक नवीन शिष्य म्हणून, आम्ही सैतान व भूतांविषयी जाणावे असे येशूला वाटते. एक भूतग्रस्त व्यक्ति येशू समोर आला. किंग जेम्स बायबलच्या आवृत्तीत भुतें हा ग्रीक शब्द “सैतान” असा अनुवादित करण्यात आला आहे. मार्क 1:39 पाहा,

“मग तो [येशू] संबंध गालीलांत त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत व भुतें काढीत फिरला” (मार्क 1:39).

जसे तुम्ही येशूचे शिष्य बनता, तसे तुम्ही तुमच्या सभोवती असलेल्या भुतांविषयी सजग असला पाहिजे. पवित्रशास्त्रात दिलेल्या सत्यासंबंधी सैतान तुम्हांस आंधळे करतो. सैतान तुम्हाला घाबरवितो व तो तुम्हांस मंडळीत येण्यापासून रोखतो. सैतान तुम्हांला ख्रिस्ती होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करतो. डॉ. थॉमस हेल म्हणाले,

भुतग्रस्तपणा म्हणजे मानसिक रोग नव्हे हे आम्ही समजले पाहिजे. भुतें किंवा दुरात्मे हे मुख्य भुत, सैतान याचे दास आहेत. ते दुष्टतेचे कामकरी आहेत. जेव्हां ते माणसात शिरतात तेव्हां ते त्याला आपला दास किंवा बंदीवान करतात. केवळ येशूच्या सामर्थ्याने ह्या भुतांवर विजय मिळवून त्या मनुष्यांस सुटका देऊ शकतो (थॉमस हेल, एम. डी., द अप्लायड न्यू टेस्टामेंट कॉमेंट्री; मार्क 1:21-28 वरील टिपण्णी).

मादक द्रव्य सेवन, गुढ विद्या, आणि इतर वेगवेगळ्या माध्यमातून देवाच्या विरोधात बंड करुन सैतानाला वश होतात.

“ठिक,” कोणीतरी म्हणेल, “मी मादक द्रव्य घेत नाही, मी गुढ विद्या करीत नाही, मी अशा प्रकारच्या गोष्टी करीत नाही.” मी खुश आहे की तुम्ही अशा प्रकारच्या पापात पडला नाही. कांही हरकत नाही, “अंतरिक्षातील राज्याच्या अधिपतिच्या” द्वारे तुमची मने कार्य करीत होते (इफिस 2:2). त्यामुळे तुमचे अपरिवर्तित मन हे “अंतरिक्षातील राज्याच्या अधिपतिच्या” द्वारे (उर्जित) संचलीत होत होती.

दुसरी गोष्ट ते तुम्हांला सत्यासंबंधाने अंध करते. II करिंथ 4:3-4 ऐका.

“परंतू आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेव-णा-या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत असा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये” (II करिंथ 4:3- 4).

“ह्या युगाचे दैवत” ऐवजी “ह्या जगाचे दैवत” हा अनुवाद चांगला आहे. सैतान हा ह्या युगाचे दैवत आहे. “विश्वास न ठेवणा-या लोकांची” मने सैतानाने आंधळी केली आहेत. ख्रिस्ताची सुवार्ता का समजत नाही म्हणून तुम्हांला आश्चर्य वाटेल. ह्याचे उत्तर सोपे आहे – ह्या युगाच्या दैवताने [सैतान] तुमची मने आंधळी केली आहेत. परंतू सैतान, किंवा कोणत्याहि भुतांपेक्षा कितीतरी अधिक सामर्थ्य ख्रिस्ताकडे आहे. त्यामुळे ख्रिस्त कफर्णहूम मध्ये सहजपणे भुतांना काढू शकला. ख्रिस्त म्हणाला, “ह्याच्यातून निघ” व भुत “त्याच्यातून निघाले” (मार्क 1:25, 26).

तुम्हांला खरे ख्रिस्ती व येशूचे शिष्य व्हायचेय, मग ख्रिस्ताने तुमच्या विचारातून सैतानाचे नियंत्रण काढले पाहिजे. एका हिप्पीने डॉ. हायमर्सना सांगितले, “मला मेंदू बदलायचा आहे.” हा तो अतिरेकी मार्ग होय. त्या तरुण मनुष्याला आपले मन येशूच्या द्वारे शुद्ध व्हायला हवे होते. ज्या प्रकारे येशूने ते केले ते अगदी सोपे आहे. देवाच्या वचन − पवित्रशास्त्राने तो तुमची मने शुद्ध करतो. “वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ” करण्यासंबंधाने पवित्रशास्त्र बोलते (इफिस 5:26). स्तोत्र 119:130 म्हणते,

“तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो; त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते” (स्तोत्र 119:130).

तुम्हांला येशूचे शिष्य व्हायचे आहे का? सुरु करण्यास हा पाहा प्रात्याक्षिक मार्ग. तुम्ही झोपी जाण्यापूर्वी रोज रात्री डॉ. हायमर्स यांचा आमच्या संकेतस्थळावरील एक लिखीत उपदेश वाचा. आमचे संकेतस्थळ www.sermonsfortheworld.com हे आहे. तुम्ही जर झोपी जाण्यापूर्वी रोज रात्री डॉ. हायमर्स यांचा एक लिखीत उपदेश वाचला, तर पवित्रशास्त्रातील वचने व भाष्य तुमच्या मनास शुद्ध करील आणि तुम्ही लवकरच येशूवर विश्वास ठेवाल व तुमचे तारण होईल! कृपया उभे राहा व गीत क्रं. 5, “आय नो द बायबल इज ट्रु” हे गा.

मला माहित पवित्रशास्त्र हे देवाने पाठविले आहे, नवा तसेच जुना करार सुद्धा;
   इश्वरप्रेरित व पवित्र, सजीव वचन, मला माहित पवित्रशास्त्र सत्य आहे.
मला माहित, मला माहित, पवित्रशास्त्र सत्य आहे;
   संपूर्ण शास्त्र इश्वर प्रेरित आहे, मला माहित पवित्रशास्त्र सत्य आहे.

शांति ज्यातून मला मिळते त्यासाठी, मला माहित पवित्रशास्त्र संपूर्णत: सत्य आहे;
   रोजं अन रोज ती मला मिळते, सांत्वना देते, आणि पापावर मला विजय देते.
मला माहित, मला माहित, पवित्रशास्त्र सत्य आहे;
   संपूर्ण शास्त्र इश्वर प्रेरित आहे, मला माहित पवित्रशास्त्र सत्य आहे.

धैर्याच्या आत्म्याने शत्रू जरी त्याला नाकारतो, संदेश जुना, तरी आजूनहि नवा,
   प्रत्येक समयी त्याचे सत्य अधिक मधूर, मला माहित पवित्रशास्त्र सत्य आहे.
मला माहित, मला माहित, पवित्रशास्त्र सत्य आहे;
   संपूर्ण शास्त्र इश्वर प्रेरित आहे, मला माहित पवित्रशास्त्र सत्य आहे.
(“आय नो बायबल इज ट्रु” डॉ. बी.बी. मॅक् किनी यांच्याद्वारा, 1886-1952).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले:
      “आय नो द बायबल इज ट्रु” (डॉ. बी. बी. मॅक् किनी, यांच्याद्वारा, 1886-1952
      “I Know the Bible is True” (by Dr. B. B. McKinney, 1886-1952).