Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
शिष्य बनविण्याची ख्रिस्ताची पद्धत

CHRIST’S METHOD OF MAKING DISCIPLES
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 15 जुलै, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Morning, July 15, 2018


कृपया मत्तय 10:1 काढा. ते स्कोफिल्ड बायबलमध्ये 1008 पानावर आहे. 1 वचनाच्या पहिल्या अर्ध्याभागावर लक्ष द्या.

“तेव्हां त्याने आपल्या बारा शिष्यांना जवळ बोलाविले...”

“शिष्य” हा शब्द “मॅथेटीज” ह्या ग्रीक शब्दापासून अनुवादित केला आहे. नवीन करारामध्ये हा शब्द जो व्यक्ति गुरु कडून कांही शिकतो व त्याचे अनुकरण करतो त्या संदर्भात आहे. ज्या बारा माणसांनी येशूचे अनुकरण केले त्यांच्या बाबतीत हा वापरला आहे.

ख्रिस्ताने ह्या बारा माणसांना पाचारण केले, आणि त्यांचा नवा जन्म होण्या पूर्वी त्यांना त्यांने प्रशिक्षण दिले. ही ती पद्धत आहे जी सध्याच्या आपल्या मंडळीत वापरली जात नाही. अन्य भाषा बोलणारे पेंटाकॉस्टल ते मूलभूत पवित्रशास्त्र — मला ठाऊक असलेल्या सर्वांमध्ये तीच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने करतात. ते साधारणत: नवीन व्यक्तीला बाजूला घेतात व “तुम्हांला स्वर्गात जायचं आहे का?” असे कांही विचारतात. जोवर तो, “होय, मला जायचंय” असे म्हणत नाही तोवर नव्या व्यक्तीवर ते दबाव आणतात. मग आत्मा-जिंकणारा म्हणतो, “माझ्यासह ही प्रार्थना करा.” तो गोंधळलेला नवीन व्यक्ति “आत्मा-जिंकणारा” जसे म्हणतो तेच शब्द म्हणतो − जोएल ओस्टीन जसे त्यांच्या उपदेशाच्या अंती म्हणतात, “आमचा विश्वास आहे, तुम्ही ही प्रार्थना म्हटली आहे तर, आता तुमचा नवा जन्म झाला आहे” तसे तो म्हणतो. इतर मंडळ्यामधून ज्या व्यक्तीसाठी प्रार्थना केलेली असते त्याचे नाव व फोन नं. घेतला जातो− आणि त्यानंतर, कांही दिवसाने, तथा-कथीत परिवर्तन झालेल्या व्यक्तीकडे “पाठपुराव्यासाठी” कोणा एकाला तरी पाठविले जाते. माझा असा अनुभव आहे की अशाने खरा ख्रिस्ती क्वचितच निर्माण होतो! ज्या व्यक्तीबरोबर त्यांनी प्रार्थना कलेली असते त्याचा सहसा पालट झालेला नसतो. तो त्या “आत्मा- जिंकणा-या,” पासून लपत असतो किंवा “दूर निघून जा” असे ते त्याच्यावर ओरडतात! जेव्हां ते त्यांचा “पाठपुरावा” घेण्याचा प्रयत्न करतात तेव्हां ते त्यांना योग्य तो प्रतिसाद देत नाहीत!

ह्या पद्धतीत काय दोष आहे? ही सहसा काम करीत नाही! खरेतर ही क्वचितच काम करते. मी बाप्टिस्ट प्रचारक म्हणून गेली साठ वर्षे काम करतो व तसा माझा अनुभव आहे. ही पद्धत का “काम” करीत नाही? ही का शिष्य तयार करीत नाही? याचे महत्वाचे कारण असे की ज्या पद्धतीने येशूने शिष्य केले त्यावर आपण विचार केलेला नसतो! त्यामुळे!

मी “प्रभूत्वाचे तारण” शिकवीत आहे असे तुम्हांला वाटेल, पण नाही. मॅक्आर्थर व पौल वॉशर जे शिकवितात ते मी शिकवित नाही. “प्रभूत्वाचे तारण” मी का नाकारतो हे जाणून घेण्यासाठी आपले पुस्तक नाश पावणा-या राष्ट्रांस सुवार्ता प्रचार, पृष्ठ 117-119 कृपया वाचा. www.sermonsfortheworld.com या संकेतस्थळावर, हे सपूंर्ण पुस्तक मोफत तुम्ही वाचू शकता. येशूवर विश्वास ठेवल्याने व त्याच्या रक्ताने शुद्ध झाल्याने तारण प्राप्त होते.

परंतू चारी शुभवर्तमानातून मला एक ठिकाण असे दाखवा जेथे येशूने “पाप्यांसाठी प्रार्थना” म्हणावयास लावली आणि मग त्याचा पाठपुरावा केला. येशूने असे केले अशी एकहि जागा सापडणार नाही! त्यांने नेहमीच प्रथम “पाठपुरावा” केला. प्रथम काय मिळत आहे हे त्यांना कळू द्या!

त्याच पद्धतीने येशू ख्रिस्ताने त्याच्या माणसांचे परिवर्तन केले! ते पूर्णत: त्याच्यावर विश्वास ठेवणे व तारण होणे यापूर्वी − त्यांना शिष्यत्वाचे कठीण सत्य प्रथम समजणे गरजेचे होते हे त्याला ठाऊक होते!

“परंतू,” कोणीतरी म्हणेल, “कठीण सत्याने ते घाबरुन दूर जातील.” खरंच! कठीण सत्याला घाबरुन त्यातील पुष्कळ दूर जातील! ख्रिस्ताचे पुष्कळ शिष्य त्याला सोडून गेले. त्यांना त्याने थांबण्याचा आग्रह केला नाही. तो बारा शिष्यांना म्हणाला, “तुमचीहि निघून जाण्याची इच्छा आहे काय?” (योहान 6:67). आम्ही बिल्कुल निघून जाणार नाही! जे राहिले व शिकले ते ख्रिस्ताचे खडकासारखे खंबीर शिष्य आणि वधस्तंभाचे सैनिक झाले!

डॉ. इस्साक वॅट्स 18 व्या शतकांतील जुन्या प्रकारच्या सुवार्तिकाशी बोलले. इस्साक वॅट्स म्हणाले,

काय मी वधस्तंभाचा सैनिक, कोक-याचा अनुयायी आहे,
आणि त्याचे कारण जिंकण्यास भितो, किंवा त्याचे नाव सांगण्यास लाज वाटते?

मला खात्रीने लढले पाहिजे, मी राज्य करतो तर; प्रभू, माझे धैर्य वाढव.
तुझ्या वचनाच्या सहाय्याने, मी कष्ट सहन करीन, वेदना सहन करीन.
   (“मी वधस्तंभाचा सैनिक आहे?” डॉ. इस्साक वॅट्स यांच्याद्वारा,1674-1748).

ख्रिस्ताकरिता रक्तरंजीत युद्धात प्रथम उडी मारावी अशी आपण अपेक्षा करु शकत नाही. त्यांनी ते केले तर सोपे होईल. पण त्या मार्गाने मी ख्रिस्ती झालो नाही. वधस्तंभ-वाहणारे ख्रिस्ती हे खरे ख्रिस्ती होते हे मी शिकायला हवे होते. मी येशूवर विश्वास ठेवणे, व मी वधस्तंभाचा सैनिक होण्या पूर्वी मला कठीण प्रसंगातून जावे लागले होते. आणि म्हणून तुम्हांलाहि जायला हवे!

मी जे म्हणालो ते बहुतांश मंडळ्यातून आचरणात आणले जात नाही! तरीहि, हे सत्य आहे. “खात्रीने मला लढले पाहिजे, मी राज्य करतो तर, माझे धैर्य वाढव, प्रभू.” त्यामुळेच 18व्या शतकातील महान सुवार्तिक गीत लिहणारे लिहतात. आणि त्यामुळेच जॉर्ज व्हिटफिल्ड किंवा जॉन वेस्ली प्रचार करतात त्यांच्या समोर गाण्यासाठी घोट्यापर्यंत खोल, बर्फात उभे राहिले! सध्या सहसा पुष्कळ उपासनेत जी गीते गातात ती तुम्ही ऐकली सुद्धा नसती! त्यामुळेच मला वाटते की आपण जे उपासना संगीत वापरतो त्यात “ख्रिस्ती युद्ध” यावरील गीते खूप कमी आहेत. 18व्या शतकात जेव्हां इस्साक वॅट्स “एम आय अ सोल्जर ऑफ द क्रॉस?” लिहतात त्यापेक्षा ख्रिस्ती गीते व गंभीर शिष्यत्व याप्रकारची गीते खूप कमी प्रसिद्ध होती.

त्यांने आपणांस शुभवर्तमानाचा संदेश आणला. येशूने त्यांच्या शिष्यांना कधी सुवार्ता प्रचार करण्यास सुरुवात केली? I करिंथ 15:3, 4 हे शुभवर्तमानाचा मूलभूत सत्य दर्शविते:

“कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांस सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिस-या दिवशी त्याला पुन्हां उठविण्यात आले; आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला” (I करिंथ 15:3, 4).

येशूने त्यांच्या शिष्यांना ते त्याला अनुसरण्याचे एक वर्ष झाल्या नंतर प्रचार करण्यास सुरुवात केली. ते मत्तय 16:21, 22 मध्ये नमुद करण्यात आले आहे,

“तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून दु:खे सोसावी, जिवे मारले जावे व तिस-या दिवशी उठविले जावे ह्याचे अगत्य आहे. तेव्हां पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करुऩ म्हणाला, प्रभूजी, आपणांवर दया असो, असे आपल्याला होणारच नाही” (मत्तय 16:21, 22).

वर्षभर पेत्र येशूचा शिष्य होता. तरीहि पेत्राने येशू “जिवे मारले जावे, व तिस-या दिवशी उठविले जावे” असे म्हटले त्याचा निषेध केला (मत्तय 16:21). येशूचा शिष्य होऊन वर्ष झाले तरी पेत्राला शुभवर्तमान अजून समजले नव्हते हे स्पष्ट आहे.

त्या वर्षानंतर येशूने पुन्हां शिष्यांना शुभवर्तमान सांगितले,

“ते गालीलांत एकत्र बसले असतांना येशू त्यांना म्हणाला, मनुष्यांचा पुत्र लोकांच्या होती धरुन दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील आणि तिस-या दिवशी तो उठविला जाईल; तेव्हां ते फार खिन्न झाले” (मत्तय 17:22, 23).

लक्षात घ्या येशूचे असे रुपांतरण झालेले त्यांनी अगोदरच पाहिले. येशूचे हे रुपांतरण पाहिल्यानंतर ते एका तरुणातून भूत काढण्यास अपयशी ठरले. आम्ही ते भूत का काढू शकलो नाही असे जेव्हां त्यांनी येशूला विचारले तेव्हां येशू म्हणाला, “कारण तुमच्या अल्पविश्वासामुळे” (मत्तय 17:20). त्यानंतर येशूने त्यांना पुन्हां शुभवर्तमान दिले, “ते त्याला (येशूला) जिवे मारतील व तिस-या दिवशी तो (येशू) उठविला जाईल; तेव्हां ते (शिष्य) फार खिन्न झाले” (मत्तय 17:23 NKJV). शिष्यांना अजूनहि शुभवर्तमान कळाले नाही!

येशूने शिष्यांना तिस-यांदा शुभवर्तमान सांगितले ते मत्तय 20:17-19 मध्ये आहे. तोच समांतर उतारा लुक 18:31-34 मध्ये आहे.

“तेव्हां त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले, पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहे, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांच्या द्वारे लिहण्यात आलेल्या सरव् गोष्ची पूर्ण होणार आहेत; म्हमजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्यांची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील, आणि तो तिस-या दिवशी पुन्हां उठेल. त्यांस ह्या गोष्टींपैकी कांहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:31-34).

येशू त्यांना दोन वर्ष शिकवित होता तरी शिष्यांना अजूनहि शुभवर्तमान कळले नाही,

“त्यांस ह्या गोष्टींपैकी कांहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:34).

एवढ्या वेळेस शुभवर्तमान ऐकूनहि, शिष्यांना येशू कशाविषयी बोलत होता हे कळालेच नाही!

पण येशूने पुन्हां त्यांना सांगितले, “तुम्हांस ठाऊक आहे की, दोन दिवसांनी वल्हांडण आहे, आणि मनुष्याचा पुत्र (येशू) वधस्तंभावर खिळण्याकरिता धरुन दिला जाईल” (मत्तय 26:2).

आता, शुभवर्तमान पुन्हां पुन्हां ऐकून सुद्धा, त्यातील एक शिष्य, यहुदा, याने मुख्य याजकांस येशूला धरुन देण्याचे ठरविले! (मत्तय 26:14, 15).

पुन्हा एकदा येशूने त्यांना शुबवर्तमान सांगितले (मत्तय 26:31, 32). गेथशेमाने बागेत पेत्र व इतर शिष्य झोपी गेले होते. जेव्हां सैनिक येशूला अटक करण्यास आले, तेव्हां पेत्राने आपली तलवार काढली व व सैनिकांस मारण्याचा प्रयत्न केला. “तेव्हां सर्व शिष्य त्याला (येशूला) सोडून गेले” (मत्तय 26:56).

आता आपण, शेवटी, अकरा शिष्यांचा नवीन जन्म, परिवर्तन याकडे येऊया. येशूने अगोदरच फाशी लावून घेतली होती आणि नव्या जन्माचा अनुभव घेतला नव्हता. पुनरुत्थित ख्रिस्त इतर शिष्यांना भेटला. त्याने त्यांना त्याच्या जखमा दाखविल्या,

“तेव्हां त्याना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले” (लुक 24:45).

शुभवर्तमानाविषयी “त्यांना शास्त्र समजावे म्हणून त्याने त्यांचे मन उघडले” तेव्हां त्यांच्या नव्या जन्माची सुरुवात येथे झाली (लुक 24:46).

आता योहान 20:21-22 वळा. येथे शिष्यांचा नवा जन्म आहे. पुनरुत्थित येशू त्यांच्याकडे आला,

“येशू पुन्हां त्यांना म्हणाला, तुम्हांस शांति असो. असे बोलून त्याने त्यांच्यावर फुंकर टाकला आणि त्यांना म्हटले, पवित्र आत्म्याचा स्विकार करा” (योहान 20:21, 22).

त्यांना पवित्र आत्म्याचा स्विकार केला व किमान ते नवीन जन्म झालेले झाले!

जुने समालोचकांची ह्यांस संमती आहे. लुक 24:46 वर मॅथ्यू हेन्री, व विशेषत: चार्ल्स एलिकॉट यांचे कोणी तरी वाचा. डॉ. जे वरनॉन मॅक् गी म्हणाले, “मला व्यक्तीश: वाटते की त्यावेळी आपल्या प्रभूने त्यांच्यावर फुंकर घातली व म्हणाला, ‘तुम्ही पवित्र आत्म्याचा स्विकार करा’, ह्या मनुष्यांचा नवा जन्म झाला [नव्याने जन्मने]. यापूर्वी देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये राहत नव्हता...येशू ख्रिस्ताने त्या मनुष्यांत सार्वकालिक जीवन फुंकले” (जे. वरनॉन मॅक् गी, थ्रु द बायबल, योहान 20:22 वरील टिपण्णी).

डॉ. थॉमस हेल यांनी सुद्धा स्पष्ट केले आहे, “शिष्यांना पवित्र आत्मा देणे ही त्यांच्या जीवनातील सर्वात महत्वाची घटना होती. कारण त्यानंतर त्यांचा नव्याने जन्म झाला...त्यांनी सत्य स्विकारले व पूर्ण विश्वास ठेवला तेव्हां हे घडले. जेव्हां त्यांना आध्यात्मिक जीवन मिळेले तेव्हां” (थ़ॉमस हेल, एम.डी., द अप्लायड न्यू टेस्टामेंट कमेंट्री, योहान 20:22 वरील टिपण्णी पृष्ठ 448).

कांही दोन तीन कारणांसाठी ख्रिस्ताच्या शिष्यांचा नव्याने जन्म.

1. प्रथम ते नव्याने जन्माविषयीची आधुनिक कल्पनेची सुधारणा करतो आणि त्यानंतर शिष्य. सध्याच्या मंडळ्यातून हाच ते सिद्धांत सर्वत्र अक्षरश: पाळला जातो.

2. हे आपणांस शिष्य बनविण्याठी ख्रिस्ताची पद्धत देते: प्रथम त्यांना तुम्ही शिकवा, आणि मग त्यांच्या परिवर्तनासाठी काम करा. या पुस्तकात जे दिले त्याच्या अगदी विरुद्ध आहे नेविगेटर्स यांचे, द लॉस्टआर्ट ऑफ डिसायपल मेकिंग. माझ्या मते हे पुस्तक चुकीचे आहे. त्यांचा नव्याने जन्म होण्यापूर्वी त्यांना शिष्य करा असे येशूने शिकविले.

येशूने आपणांस महान आज्ञेमध्ये “शिष्य बनविण्याचा” आदेश दिला आहे (मत्तय 28:19, 20 NASB).

“तेव्हां तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील [लोकांस शिष्य करा; NASB] त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे कांही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे. आमेन” (मत्तय 28:19, 20).

माझे विद्वान पाळक, डॉ. तिमथी लीन म्हणाले,

“केवळ ‘शिष्य करा’ हे क्रियापद आज्ञावाचकामध्ये मोडते...दुस-या शब्दात ‘जा’ ही आज्ञा नाही, पण [येथे] ‘शिष्य करा’ हे आहे. महान आज्ञेची ही मुख्य विचारधारा आहे” (द सिक्रेट ऑफ चर्च ग्रोथ, पृष्ठ 57).

“सर्व राष्ट्रांस शिकवा” अशी ख्रिस्त आपणांस आज्ञा देतो — अधिक वास्तविक अनुवाद “शिष्य करा” हा आहे — डब्लू. ए. क्रिसवेल. खरे तर न्यू अमेरिकन स्टॅँडर्ड बायबल हे, “शिष्य करा” असे अनुवाद करते.

हे पहिल्या तीनशे वर्षात केले जात होते, जेथे नवीन लोकांना त्यांचा बाप्तिस्मा होण्यापूर्वी त्यांना शिष्यत्व शिकविले जाई. डॉ. फिलिप शाफ, ख्रिस्ती इतिहासकार, म्हणाले, “या सुचनेची [लांबी] ठरलेली होती कधीकधी दोन वर्षे, कधीकधी तीन.” इ.स. 217 ते इ.स. 235 पर्यंत हिप्पोलीटस म्हणाला, [त्यांना] किमान तीन वर्षे जगातील ऐकण्यात वेळ व्यतित करु द्या” (द अपोस्टलिक ट्रॅडिशन ऑफ हिप्पोलीटस, पार्ट II).

हा शिष्यत्व काळ बाप्तिस्म्याच्या पूर्वी येतो. प्रेषितांच्या पुस्तकाच किमान दोन उदाहरणे आहे जेथे पौल ही कॅटेचुमेन्स पद्धत शिकवितो. बर्नबा पौलास अंत्युखियास आणतो.

“मग असे झाले की, त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळूनमिसळून ब-याच लोकांना शिकविले” (प्रेषित 11:26).

पौलाने हीच गोष्ट लुस्त्र, इकुन्या, अणि पुन्हां अंत्युखिया ह्या नगरांतून केली,

“आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांनी त्यांना असा बोध केला की, विश्वासात टिकून राहा; कारण आपणांला पुष्कळ संकटात टिकून देवाच्या राज्यात जावे लागते” (प्रेषित 14:22).

डॉ. शाफ म्हणाले, “मंडळी ही असभ्य जागात आहे...ती बाप्तिस्म्यासाठी लोकांच्या तयारीस विशेष शिक्षकांची गरज आहे हे पाहते...[वर्ग] हे...मंडळी व जगामध्ये दुवा होते...आरंभीच्यांना प्रौढतेत नेण्यासाठी. जे [शिकणारे] होते त्यांना अविश्वासू म्हणत नव्हते, पण अर्धे-ख्रिस्ती [अजून शिष्य नसलेले]” (हिस्ट्री ऑफ द ख्रिश्चन चर्च, आवृत्ती 2, पृष्ठ 256). डॉ. शाफ म्हणाले ही पद्धत मिशनरी जागेत “अजूनहि चालू आहे” (ibid., पृष्ठ 255).

आम्ही आमची सकाळची उपासना शिष्यत्वाच्या वर्गात बदलणार आहोत. मला वाटते की आपली स्वत:ची मुले बाहेर राहण्याचे अपयश, आणि जगातून तरुणांची नोंदणी होत नाही त्याचे अपयश, सध्याची तरुण असभ्य जगात आहेत, मूर्तिपुजक त्यांना नव्या जन्माच्या अनुभवा पूर्वी त्यांना शिष्य केले पाहिजे, आणि ख्रिस्ती जीवन जगू दिले पाहिजे ह्याची मंडळ्यांना जाणीव होत नाही हे सत्य आपणांस यातून मिळू शकेल. सदर्न बाप्टिस्ट दरवर्षी 200,000 सभासद गमाविते जे “अर्धे ख्रिस्ती” — शिष्य नसलेले! जॉन एस. डिकर्सन म्हणाले की सुवार्तिक तरुणांचे प्रमाण “जर नवीन शिष्य निर्माण होणार नाहीत तर — अमेरिकन 7 टक्क्याहून 4 टक्के किंवा त्यापेक्षा खाली येणार” (द ग्रेट इव्हांजिलीकल रिसेशन, पृष्ठ 314).

ते आपले उद्दिष्ट आहे! ख्रिस्तामध्ये तरुणांना त्यांच्या सर्वोच्च क्षमतेत पोहंचण्यास साहाय्य करणे हे आपले उद्दिष्ट आहे. आपण येथे तरुणांना मंडळीत येण्यास, येशूचे शिष्य बनविण्यास, नव्या जन्माचे होण्यास सहाय्य करणे, आणि इतरांना येशू पासून शिकण्यास मंडळीत आणण्यास, त्याच्यावर विश्वास ठेवण्यास, व नव्याने जन्म घेण्यावर काम करणे!

तरुण लोक, जे निवडले आहेत, ते कांहीतरी कठीण व आव्हानात्मक करण्यास तयार असतात. ज्यांना ख-या ख्रिस्तीपणातील आव्हान स्विकारणे आवडते ते स्वत:ला बाहेर काढून घेतात. त्यांनी असे करु नये असे वाटते, पण आपणांस अनुभवाने ठाऊक आहे ते करणार! ते जातील तेव्हां तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ देऊ नका. येशूने काय म्हटले ते आठवा, “बोलाविलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.” केवळ खरे शिष्य जे नव्याने जन्मले आहेत तेच राहतील!

आपण सर्व एकत्र जाऊ व आपला देव अजून जीवंत व सर्वसामर्थी आहे हे सिद्ध करु. भूतकाळ आपण चुका केल्या आहेत. पण आपल्या चुकां व अनुभवाने आपणांस लाभ होतो. आपण पले अपयश यशामध्ये बदलू शकतो. सध्याच्या ह्या विश्वास भ्रष्टतेच्या दिवसांत अशक्त मंडळी शिष्य असलेली बळकट मंडळी तयार करण्यास पुढचे पाऊल टाकतांना आपण पुढे अधिक व मोठे यश पाहू. लक्षात ठेवा, आपण कधीहि थांबणार नाही, कधीहि मजा करणार नाही, आणि कधीहि धीर सोडणार नाही. आपली चांगली मंडळी ही महान मंडळी बनणार नाही तोवर थांबणार नाही — हे तरुणांना आव्हान आहे आणि त्यांना एक शिष्यांचे बलवान सैन्य जे नव्याने जन्मले आहेत ते बनतील! उभे राहा व गीत पत्रिकेतील सहा क्रमांकाचे गीत गा, “एम आय अ सोल्जर ऑफ द क्रॉस?” डॉ. इस्साक वॅट्स यांच्याद्वारा (1674-1748).

काय मी वधस्तंभाचा सैनिक, कोक-याचा अनुयायी आहे,
आणि त्याचे कारण जिंकण्यास भितो, किंवा त्याचे नाव सांगण्यास लाज वाटते?

काय मी फुलांच्या सहजतेचा बिछाना आकाशात नेला पाहिजे,
ज्यावेळी इतर बक्षिस जिंकत, आणि रक्तमय सागरातून जात आहेत?

माझा सामना करावयास शत्रू नाही का? मी पूर फुंकुन टाकू नये का?
देवाबद्दल मला मदत करण्यासाठी, काय हे दुष्ट जग कृपेचा मित्र आहे?

मला खात्रीने लढले पाहिजे, मी राज्य करतो तर; प्रभू, माझे धैर्य वाढव.
तुझ्या वचनाच्या सहाय्याने, मी कष्ट सहन करीन, वेदना सहन करीन.
   (“मी वधस्तंभाचा सैनिक आहे?”डॉ. इस्साक वॅट्स यांच्याद्वारा, 1674-1748).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकेड ग्रिफ्फित यांनी गायले: “एम आय अ
सोल्जर ऑफ द क्रॉस? (डॉ. इस्साक वॅट्स, यांच्याद्वारा, 1674-1748).
“Am I a Soldier of the Cross?” (by Dr. Isaac Watts, 1674-1748).