Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
अधोलोकाचे द्वार हल्ला करीत आहे!

STORMING THE GATES OF HELL!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 8 जुलै, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Morning, July 8, 2018


मत्तय 16:18 काढा, वचनातील दुसरा अर्धा भाग. ते स्कोफिल्ड बायबल मध्ये पृष्ठ 1021 वर आहे. येशू म्हणाला,

“मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे कांहीच चालणार नाही” (मत्तय 16:18ब).

समालोचक आर. सी. एच. लेन्स्की म्हणाले, “त्याचा अन्वयार्थ असा की ख्रिस्ताच्या मंडळीची हत्या करण्यास अधोलोकाचे द्वार आपल्या दूतांना (दूरात्म्यांना) पाठवितो, पण मंडळीचा नाश होणार नाही” (मत्तय 16:18 ब वरील लेन्स्की, यांची टिपण्णी). अर्थात हे ख-या मंडळी संद्रभात आहे, शेवटल्या काळातील विश्वास त्याग करणा-या मंडळी सारखा नव्हे. विश्वास त्याग करणा-या अगोदरच दूरात्म्यांनी ताब्यात घेतले. पवित्रशास्त्रात हे भविष्य सांगण्यात आले आहे,

“आत्मा स्पष्ट म्हणतो की, पुढील काळी विश्वासापासून कित्येक लोक भ्रष्ट होतील, ज्या माणसांची सदसद्विवेकबुद्धि तर डाग दिल्यासारखी आहे, अशा खोट्या बोलणा-या माणसांच्या ढोंगाने ते फूसलावणा-या आत्म्याच्या व भूतांच्या शिक्षणाच्या नादी लागतील (I तिमथी 4:1).

सैतान व त्याच्या दूतांच्या कारवायांनी खोट्या मंडळ्या देवाने-दिलेले पवित्रशास्त्राचे वचन सोडून देऊन “विश्वासापासून भ्रष्ट” होण्यास कारणीभूत ठरतील.

II तिमथी 3:1-8 मध्ये वर्णिलेल्या प्रमाणे “शेवटल्या काळातील” खोटी मंडळी, जेथे बरेचसे मंडळीचे सभासद असे आहेत

“विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ [बाह्य रुप] दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील” (II तिमथी 3:4, 5).

अशाप्रकारे आपण पाहतो की पवित्रशास्त्रात सध्या दोन मंडळ्या आहेत — खोटी मंडळी व खरी मंडळी. येशूने केवळ ख-या मंडळीस हे अभिवचन दिलेले आहे,

“मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे कांहीच चालणार नाही” (मत्तय 16:18ब).

आपण अमेरिकेत सध्या खोट्या मंडळ्यांनी वेढलेलो आहोत. लवादिकीयाच्या मंडळीप्रमाणे खोट्या मंडळ्या, ज्यांस स्कोफिल्ड बायबल “विश्वास त्याग करण्याची शेवटची स्थीति” असेल असे जाहिर करते. हे पाहा ख्रिस्ताने सांगितल्याप्रमाणे सध्याच्या पुष्कळ मंडळ्या विश्वासपासून दूर जाताहेत:

“मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहेव मला कांही उणे नाही असे तूं म्हणतोस; पण तूं कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडावाघडा आहेस, हे तुला कळत नाही”(प्रकटीकरण 3:17).

“पण तूं तसा नाहीस, कोमट आहेस; म्हणजे उष्ण नाहीस शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे” (प्रकटीकरण 3: 16).

सैतानी शिक्षण ऐकणे (I तिमथी 4:1) व केवळ बाह्यस्वरुपाचे ख्रिस्तीत्व (II तिमथी 3:4, 5) यामुळे ह्या शेवटल्या काळात पुष्कळशा सुवार्तिक मंडळ्या ह्या विश्वासापासून दूर गेल्या आहेत. डॉ. जॉन मॅक्आर्थर बरोबर म्हणाले की, ह्या मंडळ्यांच्या सभासदांकडे आवेश नाही, आणि “कोमट, ढोंगी, ख्रिस्त माहित असल्याचा बनाव, परंतू स्वत: त्याचे नाहीत...हे स्वयं-फसविलेले ढोंगी [आजारी] ख्रिस्ती आहेत.” तसेच डॉ. मॅक्आर्थर हे ख्रिस्ताच्या रक्तासंबंधी चुकीचे आहेत, “स्वयं-फसविलेले ढोंगी” असे जे त्यांनी बहुतांश सुवार्तिक ख्रिस्तीजणांविषयी बोलले ते अगदी बरोबर आहेत.

आणि त्यामुळे ह्या सुवार्तिक मंडळ्या त्यांच्या तरुणांना अक्षरश: गमावित आहेत. जॉनाथन एस. डिकर्सन यांनी, द ग्रेट इव्हांजिलीकल रिसेशन (बेकर बुक्स) ह्या शिर्षकाचे पुस्तक लिहले. त्यांनी त्यात खरी आकडेवारी दिली आहे. सध्या केवळ 7 टक्के तरुण ख्रिस्ती म्हणवून घेतात. तरुण सुवार्तिकांची ही 7 टक्के संख्या कमी होऊन “4 टक्के किंवा त्याहून कमी होईल – जर नवीन शिष्य तयार केले नाही” (डिकर्सन, पृष्ठ 144).

सध्या मंडळीत तरुणांची संख्या एवढी का कमी आहे? त्याचे मुख्य कारण असे आहे की मंडळीतील बहुतांश सभासद हे जॉन मॅक्आर्थर यांनी म्हटल्या प्रमाणे, “स्वयं-फसविलेले ढोंगी” आहेत हे ते पाहतात. मंडळीचे वयस्क सभासद हा ढिला, अशक्त व दुर्बळ असल्याने तो त्याच्या अवतीभोवती असलेल्या पापी जगास विरोध करीत नाहीत हे ते पाहतात, त्यामुळे! इश्वरविज्ञान पंडीत डॉ. डेव्हीड एफ. वेल्स हे सुद्धा पाहतात. त्यामुळे ते त्यांचे पुस्तक, नो प्लेस फॉर ट्रुथ: किंवा व्हाटएवर हॅपन्ड टू इव्हांजिलीकल थिऑलॉजी? (एर्डमन्स, 1993) मध्ये लिहतात. प्रसिद्ध इश्वरविज्ञान पंडीत डॉ. कार्ल एफ. एच. हेन्री सुद्धा पाहतात. ते म्हणाले,

“संपूर्ण पिढी ही पुन्हां जन्म घेणे (नवा जन्म) च्या जागृतीशिवाय वाढत आहे. दुष्टता ह्या पिढीस नाशाच्या धुळीत आणि अगोदरच कमजोर असलेल्या मंडळीस अपराधीपणाच्या सावलीत लोटत आहे” (ट्विलाईट ऑफ अ ग्रेट सिविलायझेशन, क्रॉसवे बुक्स, पृष्ठ 15-17).

“अपंग मंडळी.” हेच ते डॉ. कार्ल एफ. एच. हेन्री यांना सुवार्तिक मंडळीला म्हणतात! “अपंग मंडळी.” आणि महान प्रचारक डॉ. मार्टिन लॉईड-जोन्स म्हणतात “गेले एक शतक भयंकर असा विश्वास त्याग मंडळ्यांमधून वाढला आहे” (रिवायव्हल, क्रॉसवे बुक्स, पृष्ठ 57).

आपण मंडळ्यातील अक्षरश: सर्व तरुण गमावित आहोत. आपण “नवीन शिष्य तयार करण्यात” सपशेल अपयशी ठरलो आहोत. डॉ. वेल्स म्हणाले, “सुवार्तिक [मंडळी] तिचे पुरोगामीपणा हरवित आहे.” सुवार्तिक मंडळ्या ह्या मुलायम, अशक्त, अंतर्मुखी व स्वार्थी अशा आहेत — पुरोगामी शिष्यत्वासंबंधी बोलण्यास व बोलाविण्यास त्या घाबरतात. साहजिकच आहे तरुणांना हे आवडत नाही!

तुम्हांस अशक्त, स्वार्थी सुवार्तिक बनविण्यास आपण येथे नाही आहोत. तुम्ही येशू ख्रिस्ताचे पुरोगामी शिष्य बनण्यास बोलावित आहे! मंडळी म्हणून हे आमचे ध्येय आहे. ख्रिस्तातील सर्वोच्च क्षमतेपर्यंत पोहंचण्यास तरुणांना प्रोत्साहित करणे. येशू ख्रिस्त व त्याचे राज्याकरिता तुम्ही सुवर्ण विजेता बनण्यास सहाय्य करितो! तुमचे तरुण, जे निवडलेत, पुरोगामी प्रोटेस्टंट ख्रिस्ती बनण्याचे आव्हान पेलण्यास तयार आहेत. सामर्थ्यशाली अपेक्षित ख्रिस्तीपणाचे आव्हांन पेलण्यास जे तयार नाहीत त्यांनी बाहेर पडले ती चालेल! येशेने जे म्हटले ते आठवा, “बोलाविलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत.”

शुभवर्तमान गति कमी करण्याची ही वेळ नाही. गेल्या रात्री आम्ही येथे रात्रभोज केले आणि नंतर “पौल, अपॉस्टल ऑफ ख्राईस्ट” पाहिला. “पौल, अपॉस्टल ऑफ ख्राईस्ट” ख्रिस्ताचे खरे शिष्य होण्यास पहिल्या शतकातील ख्रिस्ती लोक कशाप्रकारे संकटे व छळाला सामोरे गेलीत ते दाखविले. ह्या दुपारी आपण दुस-या तरुणांना पुरोगामी शिष्य करण्यास प्रचारासाठी बाहेर जाणार आहोत. ख्रिस्ताची आज्ञा पाळण्यास, किती मोठा समय हा आहे. ख्रिस्त म्हणाला, “बाहेर महामार्ग व सीमा येथे जा, व त्यांना येण्यास भाग पाडा.” ख्रिस्त आपणांस तारणासाठी येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. येशू ख्रिस्त जीवन देण्यासाठी, दैहिकरित्या, देहात व हाडात, मरणांतून उठला!

मला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त मरणातून पुन्हां उठला. केवळ पुनरुत्थानाच्या दिवशी नव्हे, तर दररोज मला ठाऊक आहे. मी रात्री गाढ झोपतो तेव्हां मला ठाऊक आहे. मला सकाळी, व संपूर्ण दिवसभर मला ठाऊक आहे. “तो येथे नाही – तो मरणातून उठला आहे!” मला ठाऊक आहे की येशू ख्रिस्त मरणातून पुन्हां उठला आहे कारण देवाचे वचन तसे म्हणते! आज सकाळी तो ह्या वृद्ध माणसाच्या ओठाद्वारे तुमच्याकडे येतो. तो तुमच्याकडे येतो. तो तुम्हांस म्हणतो − “मी सदासर्वकाळ जिवंत आहे.” आणि ख्रिस्त जिवंत असल्याने तो काय करु शकतो हे मला ठाऊक आहे. कारण तो जगतो आहे म्हणून तुम्ही जगता आहां. कारण तो सदासर्वकाळ जगतो आहे म्हणून तुम्हीहि त्याच्या कृपेने सदासर्वकाळ जगता आहां. ख्रिस्ताच्या ख-या शिष्यांचा अंत नाही. उद्याच्या उज्वल येशूबरोबरच्या अनंतकाळच्या जीवनात जाण्यासाठी चला आमच्याबरोबर या. तो तुम्हांला अपयशी करणार नाही! चला, ख्रिस्त व त्याच्या राज्याकरिता एक सैनिकी दल, बलाढ्य सैन्य करण्यास आम्हांस मदत करा!

रेव्ह. जॉन कागॅन हे 24 वर्षाचे आहे. ते येशूचे शिष्य आहेत. ते वधस्तंभाचे सैनिक आहेत. ख्रिस्ताच्या राज्यात त्यांनी सुवर्ण पदक मिळविले आहे. आज रात्री 6:15 वाजता जो उपदेश देणार आहे तो मी वाचला आहे! मी वाचलेल्या उपदेशापैकी एक उत्तम प्रेरणा देणारा उपदेश आहे. चला या आणि पास्टर जॉन त्याच्याबरोबर येण्यास व देवासाठी ही मंडळी प्रकाशघर बनविण्यास, आणि सैतानाच्या दुष्ट शक्तीविरुद्ध लढण्यास सैन्य बनविण्यास तुम्हाला प्रेरणा देवो!

देवाचे लोकहो, उठा! छोटेयाशा गोष्टी केलेल्या आहेत;
राजांच्या राजाची सेवा करण्यास आपले ह्दय, व जीव व मन व सामर्थ्य त्याला द्या.

देवाचे लोकहो, उठा! मंडळी तमच्यासाठी वाट पाहते,
तिचे सामर्थ्य हे तिच्या कार्याबरोबर नाही; उठा! आणि तिला मोठे करा!
   (“राईज अप, ओ मेन ऑफ, विलीयम पी. मेरिल 1867-1954, यांच्याद्वारा, पाळकांनी
   यात बदल केला आहे).

ते तुमच्या पत्रिकेवर 1 क्रमांकावर आहे. उभे राहा व ते गा!

देवाचे लोकहो, उठा! छोटेयाशा गोष्टी केलेल्या आहेत;
राजांच्या राजाची सेवा करण्यास आपले ह्दय, व जीव व मन व सामर्थ्य त्याला द्या.

देवाचे लोकहो, उठा! मंडळी तमच्यासाठी वाट पाहते,
तिचे सामर्थ्य हे तिच्या कार्याबरोबर नाही; उठा! आणि तिला मोठे करा!

आपण खाली बसू शकता.

होय, आपण अशा काळात आहोत की सुवार्तिक मंडळ्या लवादिकीया प्रमाणे अशक्त व विश्वास भ्रष्ट झालेल्या आहेत? होय, जवळजवळ सर्वच तरुण ते गमावित आहेत. होय, त्यांच्याबरोबर सैन्य भरतीसाठी ते त्यांना प्रोत्साहित करीत नाहीत. होय, ते मुलायम, अशक्त व रुचीहीन असे आहेत. होय, मला आठवते की, मी तुमच्यासारखा तरुण होतो तेव्हां मी कसे “मला थोपविले” हे मला आठवते. मी त्यांच्या विरुद्ध बंड केले, पवित्र बंडासह, मार्टिन ल्युथरसारखे बंड. इतर सुधारणा विसरलेत. त्यांना झोपू दे. आपल्या मंडळीत आता तुम्ही येऊन आणि नवीन सुधारणा करण्यास मदत करा! आता सुधारणा! उद्यासाठी सुधारणा! अनंतकाळासाठी सुधारणा!

विश्वास भ्रष्ट लवादिकीया सारखे फिलदेल्फिया येथील मंडळी आहे? फिलदेल्फिया येथील मंडळीस येशू म्हणाला,

“तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तझ्यापुढे दीर उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करु शकत नाही. तुला शक्ति थोडी आहे, तरी तूं माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही”(प्रकटी 3:8).

आपली मंडळी तरुण ख्रिस्ताचे शिष्यांनी भरलेली असावी? तुम्ही म्हणाल हे हरविल्याचे कारण आहे. हे अश्क्य आहे. अध्यक्षीय भाषण लिहणारे पॅट्रिक जे. बुचानन म्हणाले ते आवडते.” परत या व आमच्याबरोबर 6:15 वाजता रात्रभोज घ्या. परत या व पास्टर जॉन कागॅन तुम्हाला युद्धात सामील होण्यास उत्तेजन देवोत — त्याकरिता हे हरविल्याचे कारण नव्हे का. हे असे वाटते, पण खात्रीने विजय आहे. ख्रिस्त म्हणाला, “ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन, तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे कांहीच चालणार नाही.” “तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचे कांहीच चालणार नाही.” अधोलोकाचे दार हे मृत्यूचे दार आहे. अधोलोकाचे दार आपणांस थांबवू शकत नाही कारण ख्रिस्त आपला प्रभू मरणातू उठला आहे! कारण तो जिवंत आहे आपल्यापुढे “अधोलोकाच्या द्वाराचे” कांहीच चालणार नाही! आमेन. पुन्हां 6:15 वाजता परत या. अधोलोकाचे द्वार आपणांवर विजय मिळवणार नाही!

डॉ. फ्रँन्सीस ए. शेफर यांच्या उत्तेजनपर शब्दाने समाप्त करतो. डॉ. शेफर हे महान इश्वरविज्ञान पंडीत, आणि आपल्या काळातील खरे संदेष्टे होते. ते म्हणाले, “सुवार्तिक मंडळ्या ह्या जिवंत ख्रिस्ताशी विश्वासू नसून, त्या जगीक आहेत...मी आव्हान करतो. मी पुरोगामी ख्रिस्ती लोकांना बोलावितो, विशेषत: तरुण पुरोगामी ख्रिस्ती लोकांना, आपल्या मंडळीत, आपल्या संस्कृतीत, आणि राज्यात जे कांही चुकीचे व विध्वसंक आहे त्या विरोधात प्रेमाने उभे राहा” (द ग्रेट इव्हांजिलीकल डिजास्टर, पृष्ठ 38, 151).

उभे राहा व गीत क्रं. 2 गा. हे मार्टिन ल्युथर चे सुधारणावादी गीत आहे! जेवढे शक्य तेवढे मोठ्याने गा!

आमचा देव एक मजबूकट दुर्ग आहे, तिची तटबंदी ढासळत नाही,
   तो आमचा मदतगार, दरम्यान प्रचलित नश्वर बाधकांचा थोपणारा पूर.
अजूनही आमचे जुने शत्रू आम्हांला काम शोधतात;
   त्याची कला व सामर्थ्य महान आहे, आणि, सशस्त्र क्रूर तिरस्कारासह,
ह्या पृथ्वीवर त्याची समानता नाही.

आणि जरी हे जग, दुष्टतेने भरलेले, आपणांस मागे येण्याची धमकी देत असले तरी,
   आम्ही भिणार नाही, कारण देवाने आम्हांद्वारे विजय म्हणून त्याचे सत्य दिले आहे.
निष्ठूर अंधकाराचा राजा – त्याला आम्ही भिऊ नये;
   त्याचा क्रोध आपण सहन करु, कारण! त्याचे मरण अटळ आहे,
एका छोट्या शब्दाने तो खाली पडेल.

तो शब्द जगातील सामर्थ्याहून बलवान आहे – त्यांना धन्वाद नाही – त्यात राहा;
   जो आमच्या बाजूने आहे त्याद्वारे आत्मा व वरदानें ही आमची आहेत.
वस्तू व नातेवाईक जाऊ द्या, हे मर्त्य जीवनहि;
   देहाला ते ठार मारतील: पण देवाचे सत्य अजूनहि राहते,
त्याचे राज्य सदासर्वकाळ आहे.
   (“अ माईटी फोट्रेस इज अवर गॉड” मार्टिन ल्युथर यांच्याद्वारा, 1483-1546).

पास्टर जॉन, आम्हांस प्रार्थनेत चालवा व जेवणाबद्दल देवाला धन्यवाद द्या.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. नोहा साँग यांनी गायले: “अ माईटी फोट्रेस इज अवर गॉड”
(मार्टिन ल्युथर, यांच्याद्वारा, 1483-1546).
“A Mighty Fortress Is Our God” (by Martin Luther, 1483-1546).