Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
पवित्रशास्त्र व सध्याचा विश्वास त्याग!

THE BIBLE AND TODAY’S APOSTASY!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 17 जून, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Evening, June 17, 2018


कृपया आपल्या पवित्रशास्त्रातून II तिमथी, तिस-या अध्यायाकडे वळूया. ते स्कोफिल्ड स्टडी बायबलमध्ये 1280 पानावर आहे. आता पाहा. पवित्रशास्त्रातून तो अध्याय उघडून ठेवा.

मला वाटते की, आपणांस आजच्या साठी II तिमथी, तिसरा व चौथा अध्याय हे खूप महत्वाचे आहेत. प्रेषित पवित्रशास्त्राकरिता लिहणारी II तिमथी ही शेवटची गोष्ट आहे. हे अंदाजे इ.स. 67 साली लिहले आहे. पौल हा ख्रिस्ती शिक्षक बनल्याने न्यूरो राजाने त्याला अटक केली होती. ममेरटाईन जे कलस्सैपासून कांही अंतरावर आहे, तेथे तुरुंगात त्याला साखळदंड घातले होते. मी व माझी पत्नी त्या अंधा-या तुरुंगात गेलो होतो. तेथेच पौलाने हे पत्र लिहले आहे. II तिमथी हे पत्र लिहल्यानंतर कांही महिन्यात त्याचा शिरच्छेद करण्यात आला. आपण विश्वास त्याग होत असतांना—अविश्वास आणि ख्रिस्तीपणा नाकारण्याच्या काळात आम्ही ख्रिस्ती म्हणून कसे जगावे हे दर्शविण्यासाठी हे पत्र लिहले आहे. विशेषत: आपण ज्या काळात राहतो त्यासाठी हे लिहले आहे! जागतिक इतिहासात 20 वे 21 वे शतक हे सर्वात देवहीन आहे. अध्याय तिसरा, वचन 1 याकडे पाहा.

“शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे” (II तिमथी 3:1).

पाहा. कांही लेखक म्हणतात की हा जो काळ आहे तो म्हणजे ख्रिस्ताच्या स्वर्गारोहनानंतरचा संपूर्ण काळ होय. मी यावर विश्वास ठेवीत नाही. डॉ. जे. वरनॉन मॅक् गी म्हणाले, “आपण, शेवटल्या काळात जात आहो, असा माझा विश्वास आहे... माझा विश्वास आहे आता आपण त्या ‘कठीण’ दिवसात [राहत] आहोत. मला ठाऊक नाही की हे किती दिवस चालेल, पण मला खात्री आहे की ते भयंकर असे होणार” (मॅक् गी, थ्रु द बायबल, II तिमथी 3:1 वरील टिपण्णी). पुढील कांही वचनें आपण ज्या काळात राहत आहोत त्याचे रेखांकित चित्र बनविते. 2-7 वचनें पाहा.

“कारण माणसें स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रुर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हुड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रुप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासून दूर राहा. त्यांच्यापैकी असे कांही लोक आहेत की जे घरात हळूच शिरुन पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी बहकलेल्या, सदा शिकत असूनहि सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहंचणा-या, अशा भोळ्या स्त्रियांस वश करितात” (II तिमथी 3:2-7).

मि. ऑलिवाज यांनी मंडळी सोडली तेव्हां ज्यानी मंडळीत फूट पाडली त्यांच्यासारख्यांची ही आपणांस यादी वाटते. शेवटल्या काळात राहत आहोत! आता वचन 12 व 13 पाहा.

“ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल; आणि दुष्ट व भोंदू माणसे ही दुस-यांस फसवून व स्वत: फसून दुष्टपणात अधिक सरसावतील”
     (II तिमथी 3:12, 13).

पाहा.

ही वचने विश्वास त्याग करणा-या जगाचे वर्णन करते, जे जग ज्याने देवाला व पवित्रशास्त्राला नाकारले, दुष्टतेत व दुस-याच्या दु:खात आनंद मानणारे, जेथे लोक क्रुरतेने वागतात, जग जेथे “सुभक्तीने वागणा-यांचा” [ख्रिस्तीपणाने] एकीकडे छळ होईल किंवा दुसरीकडे, जग जेथे चांगल्या ख्रिस्ती लोकांची फसवणूक होईल [वचन 3]. हे सर्व सध्या आपण पाहत आहोत. धर्मनिरपेक्षवादी जे ख्रिस्ती “लैंगिक क्रांतीच्या” विरोधात उभे राहतात त्यांना धमक्या देतात. त्याने पुष्कळ मंडळ्यांचे सभासद घाबरलेत. गेल्या वर्षी सदर्न बाप्टिस्ट त्यांच्या मंडळ्यामधून 200,000 पळून गेले. भीतीने, ह्या “संकटाच्या,” धोक्याच्या, आणि सैतानी वेळे पासून जीव वाचविण्यासाठी — ह्या वर्षी आणखी दूर पळून जातायत. मुस्लिम येत आहेत. बाँब फेकले जात आहेत. मादक द्रव्य घेणा-यांची वाढ होत आहे. वधस्तंभ तोडले जात आहेत. शाळेत प्रार्थना म्हणणार नाही असे लेकरं सांगताहेत. आपल्या देशात आणि जगात भयंकर गोष्टी घडणार आहेत हे सर्वांना कळून आले आहे असे प्रत्येकांस वाटते.

तुम्ही व मी ह्या कठीण दिवसात राहतो. ब्रिटीश सुवार्तिक लिओनार्ड रेवंहिल म्हणाले, “हे शेवटले दिवस आहेत!” हे वाक्य लिहल्यानंतर कांही सेकंदात मला समजले की पॅरिसमधील कित्येक भागात मुस्लिम आतंकवाद्यानी हल्ला केला आहे. मुस्लिमानी 120 च्या वर लोकांना थंड डोक्यानी ठार केले आहे. केवळ 24 तासापूर्वी ओबामा म्हणाले, “इसीसचे (ISIS) आता भरुन आले आहे.” काय हा विनोद! ओबामा हे जिमी कार्टर्स यांच्यानंतर अमेरिकेचे सर्वात कमजोर राष्ट्राध्यक्ष होते!

हा कठीण दिवसांचा काळ आहे. हा विश्वास त्याग करणा-यांचा काळ आहे. आपल्या मंडळ्यात पापात हरविलेले लोक भरले आहेत. कोणीतरी मंडळी सोडून जातील — कोणतरी हरविलेला व्यक्ति रागवेल या भीतीने पुष्कळ पाळक इतके घाबरलेले आहेत की ते शुभवर्तमानाचा प्रचारच करीत नाहीत! तुमच्या महाविद्यालयातील नशापान-धुम्रपान करणारे प्राध्यापक जे पवित्रशास्त्र खोटेपणाने भरले आहे असे तुम्हांला सांगतात. तुम्हांला माहित आहे की ते हे करतात! तुम्हांला माहित आहे की मी बरोबर आहे! उत्तर काय आहे? आपण काय करावे? प्रेषित 14 व्या वचनात देतोय,

“तूं तर ज्या गोष्टी शिकलास व ज्याविषयी तुझी खातरी झाली आहे त्या धरुन राहा”
      (II तिमथी 3:14).

“तूं ज्या गोष्टी शिकलास त्या धरुन राहा.” कांहीहि घडो काय हरकत नाही मंडळीला येत राहा! “ज्या गोष्टी तुम्ही शिकलात त्या धरुन राहा.” डॉ. ली रॉबर्सन (1909-2007) हे एक महान जुने बॅप्टिस्ट धर्मोपदेशक आहेत. “भरभराटीसाठी तीन” हा त्यांचा उद्देश होता — “जो उद्देश मी गेली साठ वर्षाहून अधिक प्रचार करतोय!” — “रविवारी सकाळच्या, रविवारी संध्याकाळच्या आणि बुधवारी रात्रीच्या — उपासनेत विश्वासूपणे राहा” (ली रॉबर्सन, डी.डी., “थ्री टू थ्राइव्ह स्टेटमेंट.” द मॅन इन सेल क्रं. 1, स्वोर्ड ऑफ द लॉर्ड पब्लिशर्स, 1993, मागील पृष्ठभाग).

त्याच चुकीचे काय आहे? त्यात चुकीचे कांहीहि नाही! अविश्वासणा-यांबरोबर मेजवाण्यास जाण्यापेक्षा येथे मंडळीत राहा! लास वेगास, किंवा दुष्ट नगरी सॅनफ्रान्सिस्कोला जाण्यापेक्षा येथे मंडळीत राहा! दर रविवारी सकाळी, दर रविवारी संध्याकाळी आणि बुधवारी रात्री येथे मंडळीत राहा! कांहीहि घडो काय हरकत नाही! विश्वास त्यागाचा अंधकार वाढत असतांना, “ज्या गोष्टी तुम्ही शिकलात त्या धरुन राहा.” त्यासाठी आमेन! आता वचन 15 पाहा.

“त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे”
      (II तिमथी 3: 15).

पाहा. डॉ. मॅक् गी काय म्हणाले,

ह्या जगातल्या विश्वास त्यागावरील उतारा देवाचे वचन [पवित्रशास्त्र] आहे. देवाच्या मुलांना केवळ एकच स्त्रोत आणि तो स्त्रोत म्हणजे देवाचे वचन आहे.

तुम्ही दररोज पवित्रशास्त्र वाचत नाही तर, तुम्ही ह्या विश्वास त्यागाच्या दिवसात गोंधळलेले व अस्थिर राहणार. आता वचन 15 पाहा,

“त्या कोणापासून शिकलास हे, आणि बालपणापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे हे तुला ठाऊक आहे; ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे” (II तिमथी 3: 15).

डॉ. मॅक् गी म्हणाले,

पवित्रशास्त्र आपणांस केवळ तारणाचा [मार्ग] देत नाही...तर ते आपणांस सध्याच्या दुष्ट जगापासून सुद्धा वाचविते...सतत देवाच्या वचनाचा अभ्यास करणे केवळ हेच [उत्तर] आहे हा माझा मुद्दा आहे. “ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्या द्वारे तारणासाठी ज्ञानी करावयास” ते समर्थ आहे. आणि...[ह्या दुष्ट जगामध्ये] जगण्यास ज्ञानी करावयास ते समर्थ आहे.

आम्ही पवित्रशास्त्र का वाचावे, व त्याचे पालन करावे? कारण पवित्रशास्त्र हे इतर पुस्तकासारखे नाही, वचन 16 पाहा,

“प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे” “(II तिमथी 3: 16).

डॉ. डब्लू. ए. क्रिसवेल (1909-2002) हे एक महान पवित्रशास्त्राचे पंडीत होते. ते म्हणाले,

पौलाचा अर्थ अनुवादित करण्यासाठी मार्ग पुढीलप्रमाणे आहे: “सर्व शास्त्रलेख, देवाच्या मुखातून निघाल्याने, ते उपयोगी आहे...मुळ शास्त्रलेख म्हणतो: हे देवाच्या मुखातून निघालेला (थिओन्यूस्टोस, ग्रीक), म्हणजेच, शास्त्रलेखातील वचनें ही स्वत: देवाकडून मिळालेली आहेत. वचन हे “देवाच्या मुखातून निघालेला शब्द” आहे हा शास्त्रलेखाचा सिद्धांत पवित्रशास्त्रात जपलेला आहे...जे [शब्द] देव देऊ इच्छित होता ते पवित्र आत्म्याने शास्त्रलेखाच्या लेखकांने दिले याचा आणखी पुरावा दुसरे पेत्र 1:21 आपणांस देते” (डब्लू. ए. क्रिसवेल, पीएच.डी., द क्रिसवेल स्टडी बायबल, II तिमथी 3:16 वरील टिपण्णी).

II पेत्र 1:21 म्हणते की “पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे.” “प्रेरित झालेल्या” हा ग्रीक शब्द फेरो पासून आलेला आहे. ज्याचा अर्थ “संगे पुढे चालणे.” पवित्रशास्त्र अचूक आहे कारण ज्या लेखकांनी पवित्रशास्त्राचे शब्द बोलले आणि लिहले ते पवित्र आत्म्याने “वाहिले अथवा संगे आणले.” मानवी लेखकांस निर्दोषपणे लिहण्यास पवित्र आत्म्याने शब्द दिले. अशाप्रकारे, इब्री किंवा ग्रीक पवित्रशास्त्राचे शब्द हे मानवासाठी देवाचा शब्द आहेत. डॉ. हेन्री एम. मॉरिस म्हणाले, “‘सर्व शास्त्रलेख,’ प्रत्येक वैयक्तिक ‘शास्त्रलेख,’ ...केवळ विचार नव्हे तर वास्तविक लिखाण, लिहलेले शब्द समावेश केले आहेत. अशाप्रकारे शब्द हे देवाच्या प्रेरणेने देण्यात आले आहे...खरा सिद्धांत हा आहे की पवित्र लिखाणाची पूर्ण तोंडी प्रेरणा आहे” (हेन्री एम. मॉरिस, पीएच.डी., द डिफेंडर्स स्टडी बायबल, II तिमथी 3:16 वरील टिपण्णी).

“प्लेनरी” म्हणजे सर्व.” “व्हर्बल” म्हणजे तोंडचे “शब्द.” “प्रेरित” म्हणजे “देवाच्या मुखातून आलेला.” पवित्रशास्त्रातील सर्व वचने ही इश्वरप्रेरित आहेत. म्हणजेच सर्व वचनें इश्वरप्रेरित, पारंपारिक ख्रिस्तीपणाचा अचूक सिद्धांत आहे (डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि.).

संपूर्ण पवित्रशास्त्रासाठी इब्री व ग्रीक शब्द “थिओपन्यूस्टोस” — “देवाच्या मुखातून निघालेला” — इश्वरप्रेरित असा आहे. संदेष्ट्ये व प्रेषितांची मने पवित्र आत्म्याने जशी “प्रेरित केली” तसे त्यांनी इब्री व ग्रीक शब्द लिहून काढले. प्रेरितपणा हा इतर दुस-या कुठल्या भाषांतरास लागू पडत नाही, त्यात KJV सुद्धा आहे, परंतू केवळ संदेष्ट्ये व प्रेषितांनी जे इब्री व ग्रीक शब्द लिहून काढले तेवढेच. मृत समुद्राची गुडांळी हे इब्री पवित्रशास्त्र संवर्धनाचा एक मोठ नमुना आहे. मूळ ग्रीक नवीन कराराचे टेक्स्टस रेसिप्टस ग्रीक हे खूप विश्वसनीय रुपांतरण आहे. तुम्ही जेव्हां किंग जेम्स पवित्रशास्त्र उघडाल तेव्हां तुम्ही देवाच्या — मुखातून निघालेल्या वचनाचे इब्री व ग्रीक पवित्रशास्त्राचे एक अतिशय विश्वसनीय भाषंतर वाचाल.

हे का महत्वाचे आहे? डॉ. बी.बी.मॅक् किन्नी हे सदर्न बॅप्टिस्ट स्कूल, बेलोर विद्यापीठात संगीत विभाग प्रमुख म्हणून पुष्कळ वर्षे कार्यरत आहेत. अगोदरच, 1920 मध्ये, बेलोर व इतर सदर्न बॅप्टिस्ट स्कूलमधून मुक्तवादी शिक्षक पवित्रशास्त्रात चुका आहेत असे शिकवित होते. त्यामुळे डॉ. मॅक् किन्नी यांनी “मला माहित आहे पवित्रशास्त्र हे सत्य आहे” हे गीत लिहले. डॉ. मॅक् किन्नी हे डॉ. जॉन आर. राईस यांचे मित्र होते, आणि शास्त्रलेखाच्या अचूकतेवर त्यांचा विश्वास आहे. त्यामुळे मॅक् किन्नीचे गीत म्हणते,

मला माहित आहे पवित्रशास्त्र हे देवाने पाठविले होते,
   जुना तसेच नवा करार सुद्धा;
इश्वरप्रेरित व पवित्र, जिवंत वचन,
   मला माहित आहे पवित्रशास्त्र सत्य आहे.

जरी शत्रूने धैर्याच्या आत्म्याने नाकारले,
   संदेश जुना आहे, पण अजूनहि नवा आहे,
त्याचे सत्य प्रत्येक वेळी मधूर सांगितले आहे,
   मला माहित आहे पवित्रशास्त्र सत्य आहे.

मला माहित आहे मला माहित आहे पवित्रशास्त्र सत्य आहे;
   संपूर्णपणे दैवी प्रेरित आहे,
पवित्रशास्त्र सत्य आहे.       
(“मला माहित आहे पवित्रशास्त्र सत्य आहे” डॉ. बी.बी.मॅक् किन्नी यांच्याद्वारा, 1886-1952).

डॉ. तिमथी लिन, माझे ब-याच-काळ असलेले पाळक, जे एक प्रभावशाली पवित्रशास्त्राचे विद्वान, आणि बॉब जोन्स विद्यापिठाच्या पदवी विभागात शिकविले होते त्यांच्याकडून मी पवित्रशास्त्र शिकलो. नंतर डॉ. जेम्स हडसन टेलर III, ज्यांना मी तीन वेळा भेटलो, त्यांच्या तैपई, तैवान येथील चायना इव्हांजिलीकल सेमीनरीच्या अध्यक्षीय कालखंडानंतर ते अध्यक्ष होण्यासाठी गेले. माझे दुसरे शिक्षक डॉ. जे. वरनॉन मॅक् गी, ज्यांना मी रेडिओवरुन दहा वर्षाहून अधिक ऐकले. ह्या महान पवित्रशास्त्राच्या विद्वानाकडून पवित्रशास्त्र अगदी सत्य आहे हे मी शिकलो.

त्यामुळे, मी कॅल स्टेट, लॉस एंजिल्स येथून, माझी पदवी संपादन करु शकलो, मुक्तवादी जे पवित्रशास्त्र-नाकारण्यास शिकवित तरी मी गोंधळून गेलो नाही. मला ठाऊक होते की ते चुकीचे होते, आणि पवित्रशास्त्र सत्य होते. मग मी सॅनफ्रॅन्सिस्को जवळील गोल्डन गेट बॅप्टिस्ट थिऑलॉजिकल सेमीनरीतून मास्टर ऑफ डिवीनिटी ही पदवी मिळविली. खर् तर तेथील प्रत्येक प्राध्यापक हा पवित्रशास्त्र-नाकारणारा मुक्तवादी होता. तेथे असण्याचा मला तिरस्कार वाटे. ते अगदी थंड व निर्जीव तसेच मृतवत असे होते. जे “आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झाले होते” त्यांनी मला शिकविले (इफिस 2:1) — प्राध्यापक जे “ज्यांची बुद्धि अंधकारमय झाली होती, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले [होते] आहे” इफिस 4:18.

त्यांनी सांगितलेले खोटे आणि घेतलेल्या चाचणीत त्यांना अपेक्षित दिलेले उत्तर मला आठवले. पण मी त्यांनी शिकविलेल्या एकाहि मुक्तवादी शुल्लक गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. त्या विश्वास त्याग करणा-या सेमीनरीतून भयंकर अशी तीन वर्षे घालविण्यास मला स्तोत्र 119 मधील जीन वचनांची मला मदत झाली,

“अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वै-यापेक्षा अधिक सूज्ञ करितात; कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करितो” (स्तोत्र 119:97-99).

त्या मुक्तवादी सैतानी उंदराच्या-बीळातून माझ्या अभ्यासक्रम संपण्याच्या सुमारास, मला अगदी मेल्यासारखे वाटले. मला जिवंत ठेवले ते केवळ पवित्रशास्त्राने. स्तोत्रसंहिता 119 उघडून — उराशी कवटाळून त्या विश्रामगृहात थंड व एकाकी कित्येक रात्री मी व्यतित केल्या. डॉ. मॅक् गी यांच्याशी मी पूर्णपमे सहमत आहे जेव्हां ते म्हणाले, “विश्वास त्याग करणा-या जगासाठी देवाचे वचन हाच केवळ उपाय आहे. देवाच्या लेकरांना देवाचे वचन हाच केवळ स्त्रोत आणि स्त्रोत आहे...सर्व शास्त्रलेख हे इश्वरप्रेरित — देवाच्या मुखातून निघालेले आहेत. देवाला काय सांगायचे होते ते सांगते, आणि त्याला जे सांगायचे होते ते सर्वकांही सांगितले. ह्या कारणाकरिता ते मानवी अंत:करणाची गरज भागविते” (मॅक् गी, ibid., II तिमथी 3:14-17 वरील टिपण्णी).

देवाचे आशिर्वादित वचन मी आठवू पाहतो. नीतिसुत्रे 3:5-7 काढा. हे स्कोफिल्ड स्टडी बायबल मध्ये पृष्ठ 673 वर आहे.

“तूं आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धिवर अवलंबून राहू नको; तूं आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तूं आपल्या दृष्टिने स्वत:स शहाणा समजू नको; परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा” (नीतिसुत्रे 3:5-7).

हे वचन ध्यानात ठेवा. तुम्ही ते पुन्हा म्हणा. “तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो, त्याने भोळ्यांना ज्ञान प्राप्त होते” (स्तोत्र 119:130). मी तुम्हांला लक्षात ठेवावयास सांगणारा उतारा स्तोत्र 119: 97-99 हा आहे. तो स्कोपिल्ड स्टडी बायबल मध्ये पृष्ठ 660 वर आहे. चला तो उभा राहून मोठ्याने वाचूया.

“अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो. तुझ्या आज्ञा मला आपल्या वै-यापेक्षा अधिक सूज्ञ करितात; कारण त्या सदोदित माझ्या जवळच आहेत. माझ्या सर्व शिक्षकापेक्षा मी अधिक समंजस आहे, कारण मी तुझ्या निर्बंधांचे मनन करितो” (स्तोत्र 119:97-99).

आपण खाली बसू शकता.

मी कशी प्रार्थना करावी, ह्यासाठी खुद्द देवाने शब्द पुरविले, ते तुम्हांस धर्मनिरपेक्ष शिक्षण घेताना अविश्वासू शिक्षक भलतीकडे वळविण्यापासून मदत करील. धर्मनिरपेक्ष विद्यालयातून पदवी घेताना वाचाव्या लागणा-या देवास-नाकारणा-या पुस्तकापासून तुमचे रक्षण करील.

ह्या विश्वास त्याग व पापमय दिवसात, तुम्हा दररोज पवित्रशास्त्र वाचावे अशी मी प्रार्थना करितो. त्यावर प्रीति करायला तुम्ही शिकाल. तुमच्या जीवनात सहन कराव्या लागणा-या एकाकीपणाच्या व ह्दयविकाराच्या झटक्याच्या समयी ते तुमचा जीवलग मित्र होईल. माझे आदर्श आब्राहाम लिंकन म्हणाले, “पवित्रशास्त्र हे मनुष्यास देवाने दिलेली सर्वात उत्तम भेट होय. हे सगळे पुस्तक घ्या व विश्वासाने जीवनात संतुलन आणा, आणि मग तुम्ही एक चांगला मनुष्य म्हणून जगाल व मराल.”

आणखी एक लक्षात ठेवण्यासाठी वचन. इब्री 13:17 काढा. ते स्कोपिल्ड स्टडी बायबल मध्ये पृष्ठ 1304 वर आहे. उभा राहा व मोठ्याने वाचा.

“आपल्या अधिका-याच्या आज्ञेत राहा व त्याच्या अधीन असा; कारण आपणांस हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवाची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करिता यावे, कन्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही” (इब्री 13:17).

आपण खाली बसू शकता. जे “तुमच्यावर अधिकार गाजवितात” ते तुमच्या मंडळीचे पाळक आहेत. प्रेषित 20:28 मध्ये प्रेषित पौल पाळक व पुढा-यांना म्हणतो, “जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वत:करिता मिळविली तिचे तुम्ही पालन करावे.” तसा एखादा मेंढपाळ आपल्या मेंढरांना मार्गदर्श करितो व पुढे नेतो तसे तुम्हांस पाळक व पुढारी आहेत. पाळक परिपूर्ण असत नाही. पण मला असे आढळले आहे की, जरी पाळक हा परिपूर्ण मनुष्य नसला, तरी तो देवावर प्रीति करणारा व सेवा करणारा मनुष्य आहे. मी देवाशी वैर केले असते तर मी आज पाळक म्हणून येथे नसतो.

आणि लक्षात ठेवण्यास आणखी एक उतारा. इब्री 10:24, 25 काढा. ते स्कोपिल्ड बायबल मध्ये पृष्ठ 1300 वर आहे. उभा राहा व मोठ्याने वाचा.

“आणि प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा” (इब्री10:24, 25).

आपण खाली बसू शकता. हा तो मोठा मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही स्वत:स आध्यात्मिक चांगल्या स्थानी राखाल. त्यातील एक चांगला मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या विश्वासातील माणसांचा एक छोटासा प्रार्थना गट तयार करणे होय. मी माझ्या मंडळीतील कांही लोकांबरोबर नेहमी संपर्कात असतो. डॉ. कागॅन व तरुण यांच्या गटाशिवाय, मी केव्हांच सोडून दिले असते.

“सुज्ञाची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील, मुर्खाचा सोबती कष्ट पावतो” (नीतिसुत्रे 13:20).

आणि आणखी एक गोष्ट, पवित्रशास्त्र जे सांगते ते करा आणि तुमचे परिवर्तन होईल. पवित्रशास्त्र म्हणते, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल” (प्रेषित 16:31). तुम्ही येशूवर विश्वास ठेवाल, पूर्ण अंत:करणाने त्याच्यावर विश्वास ठेवाल, तर तुमचे तारण होईल. तुमच्या पापाचा दंड भरण्यासाठी, तुमच्या ऐवजी, तो मेला, वधस्तंभावर खिळला गेला. त्याच्या शरीरानरील पाच जखमांतून त्याचे रक्त सांडले गेले. तुमच्या पापापासून तुम्हांस शुद्ध करण्यासाठी रक्त सांडले गेले. या व येशूवर विश्वास ठेवा, आणि तुमचे अनंतकाळासाठी तारण होईल. म्हणून पवित्रशास्त्र म्हणते – पवित्रशास्त्र खोटे बोलू शकत नाही, कारण ते जिवंत देवाचे वचन आहे!

तुझा खरा मित्र मला सदैव ठाऊक आहे,
तुझी स्थिरता मी अनुभवली;
जेव्हां सर्वकांही खोटे आहे, तेव्हां मला सत्य सापडले,
माझा समुपदेशक व मार्गदर्शक.

सर्व धरत्री माझी आहे कोणी धन मला देत नाही,
एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी करते,
जीवनात कसे जगावे याचा मार्ग शिकविते,
ते मला कसे मरावे हे शिकविते!

अति मौल्यवान, कधीहि न बदलणारा आमचा तारणारा येशू यांने ह्या पवित्र पुस्तकाच्या पानांतून प्रगट केले आहे! आमेन!


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. नोहा साँग यांनी गायले: “आय नो द वायबल इज ट्रु”
(डॉ. बी.बी. मॅक् किन्नी, यांच्याद्वारा, 1886-1952). “
I Know the Bible is True” (Dr. B. B. McKinney, 1886-1952).