Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




वधस्तंभावरचा ख्रिस्त

THE CHRIST OF THE CROSS
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
लिखीत व रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 10 जून, 2018 रोजी
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, June 10, 2018

“बंधूजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली, जिचा तुम्ही स्विकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरहि राहात आहां; जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हांस कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हांस ही सुवार्ता सांगितली त्या वचनांनुसार ती तुम्ही दृढ धरली असेल; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांस सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:1-3).


हे प्रेषित पौलाचे ख्रिस्ती सुवार्तेसंबंधीचे स्पष्ट व मुद्देसुद विधान आहे. “शुभवर्तमान” ह्या शब्दाचा साधा अर्थ “सु वार्ता.” करिंथ येथील मंडळीस पौलाने म्हटले की त्याने शुभवर्तमानाची सुवार्ता त्यांना सांगितली आहे. तो म्हणाला त्यांचे खोटे परिवर्तन झाले नसल्यास, त्यांचे सुवार्तेमुळे तारण झाले आहे, “नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे” (I करिंथ 15:2). मग त्याने सुवार्ता पुन्हां त्यांना सांगितली होती. शुभवर्तमानात तीन साधे मुद्दे होते: (1)“शास्त्राप्रमाणे, ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला.” (2) “आणि त्याला पुरण्यात आले.” (3) “आणि तो शास्त्राप्रमाणे, तिस-या दिवशी मरणातून पुन्हा उठला.” हेच ते शुभवर्तमान होय. संपूर्ण शतकातील काळांमध्ये प्रचारकांनी जे शुभवर्तमान गाजविले ते हेच होय. माझी दिक्षा झाली तेव्हां, माझ्या दिक्षा प्रमाणपत्रावर लिहले होते माझी दिक्षा ही “शुभवर्तमानाच्या सेवेस” झाली आहे. याचा अर्थ माझी नेमणूक किंवा प्राथमिकरित्या मला वेगळे सुवार्ता सांगण्यास करण्यात आले होते. “शुभवर्तमानाच्या सेवेत” मला मुख्यत्वे जे करायचे ते म्हणजे ख्रिस्ताचे मरण, त्याचे पुरले जाणे आणि पुनरुत्थान ह्या सुवार्तेची घोषणा करणे. त्यासाठीच प्रत्येक पाळकाचे पाचारण, दिक्षा, आणि वेगळे करणे आहे. आणि पौल म्हणाला, “जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली तीच सुवार्ता मी तुम्हांस कळवितो” (I करिंथ 15:1). परंतू मला सुवार्ता सांगण्यास पाचारण याविषयी पुष्कळ गोष्टी सांगावयाच्या आहेत.

I. प्रथम, सध्याच्या पुष्कळ पाळकांचा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू सुवार्तेपेक्षा वेगळा असतो.

असे कांही आहेत ते राजकारणावर प्रचार करतात. राजकारणात काय घडामोड्या चालू आहत त्यावर त्यांचा उपदेश बेतलेला असतो. अशाप्रकारचे उपदेशक हे तारणावर क्वचितच भर देतात कारण ते त्यांना गरजेचे वाटत नाही. ते अगदी राजकारणी माणसे असतात. कांही वर्षापूर्वी, आपले पाळक, डॉ. हायमर्स, जेथे चीनी मंडळीत सभासद होते, तेथे एक तरुण होता त्याला वाटत होते की डॉ. लिन यांनी विएतनाम युद्धाच्या विरुद्ध प्रचार करावा. शेवटी त्याने मंडळी सोडून पुष्कळ तरुणांना आपल्याबरोबर घेतले. ते पॅसेडेना, ह्या लॉस एंजिल्सच्या एका उपनगरातील ऑल सेंट इपिस्कोपल मंडळीत जाऊ लागले. ती मंडळी अगदी अद्यायावत होती. पाळक, चॉ. जॉर्ज रेगस, जवळजवळ दर रविवारी विएतनाम युद्धाच्या विरुद्ध व इतर राजकीय विषयावर प्रचार करीत असे. परंतू कांही काळानंतर राजकारणाशिवाय इतर कांही ऐकायला नसलेने कंटाळले. सरतेशेवटी त्यांनी ती मंचळी सुद्धा सोडली व परत जगात गेले. डॉ. हायमर्स यांच्या माहितीप्रमाणे सध्यात्यातील कोणीहि मंडळीत जात नाही. “मुख्य प्रवाहातील” (मेनलाईन) म्हटल्या जाण्या-या सर्व पंथाची हीच परिस्थीती आहे. डाव्या बाजूच्या राजकीय प्रचाराने आपण लोकांना राखू शकत नाही. मागील कांही वर्षात मुख्य प्रवाहातील सगळ्या मंडळ्यांनी दहापटीने, आणि लाखोच्या लाखो, सभासद गमाविले आहेत, कारण हेच की त्यांचे उपदेश हे राजकारण व सामाजिक विषयावर बेतलेले आहेत.

त्यानंतर असे कांहीजन आहेत जे मानसिकतेच्या प्रचारावर भर देतात. त्यांच्या स्वत:ला-मदत करण्याचा उपदेश हा जोएल ऑस्टीन सारखा आहे. कधीकधी ते पवित्रशास्त्रातील वचन घेतात, परंतू त्यांच्या उपदेशाचा बराच भाग पवित्रशास्त्र केंद्रित नसतो. दूरदर्शनवरील ऑपरा विनफ्रे आणि डॉ. ड्र्यू यांच्याप्रमाणे, त्यांचा विषय चांगला कसा वाटेल व यशश्वी कसे व्हाल हा असतो. रोमन कॅथलिक परिचारिका जी दर रविवारी मास उपासनेला जायची व दूरदर्शनवरील जोएल ऑस्टीन यांचा कार्यक्रम सुद्धा पाहायची तिच्याशी एकेदिवशी डॉ. हायमर्स बोलले. ती एक फिलिपाईन परिचारिका होती जी एका इस्पितळात जेथे डॉ. हायमर्स यांची छोटीशी शल्यप्रक्रिया झाली तेथे होती. डॉ. हायमर्स जेव्हां कधी तिच्याकडे पाहायचे तेव्हां त्यांना तिच्या चेह-यावर खिन्नता दिसायची. त्यांनी तिला कांही विनोद ऐकविले, तरी ती हसली नाही. शेवटी त्यांनी तिला तिच्या धर्माविषयी विचारले, तेव्हां तिने सांगितले की ती दर रविवारी मास उपासनेला जाते, तसेच ती जोएल ऑस्टीन यांचा कार्यक्रम सुद्धा पाहते, कारण सुखी कसे राहावे ह्याविषयी ते शिकवितात! अशाप्रकारचे लोक लोकांना खुश करतात, परंतू त्यांच्या वैयक्तिक जीवनावर, आणि त्यांच्या सार्वकालिक आत्म्याच्या तारणा संबंधी अगदी थोडा प्रभाव पडतो किंवा फारसा पडत नाही!

तिसरे, असे कांहीजन आहेत जे पवित्रशास्त्राचे वचन अन् वचन शिकवितात. पवित्रशास्त्रात पुष्कळ विषय असलेने, ही माणसे त्यांच्या उपदेशातून, एका विषयातून दुस-या विषयात, इकडून तिकडे उड्या मारतात. सध्या बरेचसे पुराणमतवादी पाळक अशा प्रकारचा प्रचार करतात. पण ते पूर्णत! वायफळ असे आहे. भरपूर विचाराने किंवा विषयाने भरलेले उपदेश सुद्धा लोकांचे जीवन बदलत नाही. माझे वडिल, डॉ. कागॅन, हे त्यांच्या परिवर्तनापूर्वी, डॉ. जॉन मॅक्आर्थर यांच्या मंडळीस कित्येक महिने उपस्थित राहत होते. डॉ. मॅक्आर्थर यांनी उपदेशाचे मजेदार सादरीकरण केले, पण डॉ. कागॅन यांना तारण मिळविण्यास ते प्रेरित करु शकले नाही. त्यांची इच्छा एक खंबीर ख्रिस्ती होण्याची असूनहि, ते आले आणि तारणाविना मंडळीतून बाहेर पडले. वचन अन् वचन घेणा-या मंडळीतून साधारण विषय असा चालतो की पवित्रशास्त्र अभ्यास सुरु राहावा किंवा बंद राहावा हाच त्यांच्या उपदेशाचा हेतू असतो. पवित्रशास्त्रातील ख्रिस्ताऐवजी, त्यांचा पवित्रशास्त्र हाच केंद्रबिंदू असतो. यांस सॅंडेमिनिइझम म्हणतात. अशा प्रकारच्या मंडळ्यातील बरेचसे लोक थंड, पण चतुर, जुन्या काळतील परुश्यांसारखे होतात.

शेवटी, ज्याला “आराधना” म्हणतात त्यावर लक्ष केंद्रित करणारे ते आहेत. यामध्ये बरेच विचित्र चढ व उतार आहेत. डॉ. हायमर्स व त्यांचे मित्र पाळक ह्या भयंकर आराधनेचे प्रत्यक्ष-साक्षीदार आहेत जेथे लोक सिंहासारखे गर्जना करीत होते, एकमेकानां ओरबडत होते, त्याचवेळी इतर कांही ओरडत होते व मोकळे सोडलेल्या भूतग्रस्तासारखे जमीनीवर लोळत होते. आणखी एक आराधनेमध्ये जी डॉ. हायमर्स, त्यांची पत्नि व मुलांनी पाहिली ज्यात लोक अक्षरश: मूर्तिची पूजा करीत होते तसेच ते जोरजोरात हसत होते आणि जमीनीवर लोटांगण घालीत होते. त्यांना असे कांही विचित्र वाटले जसे ते एका वेड्यांच्या इस्पितळातच आहेत की काय! आणखी एका ठिकाणी, ख्रिस्ती महाविद्यालयात, डॉ. हायमर्सनी पाहिले की एक मुलगी वेश्यासारखी नाचते आहे व तिच्यावर एका यंत्राने तांबडा धूर सोडला जात होता, आणि कान बहिरे होतील असे संगीत वाजत होते. दुसरी, कमी झगमगाट असलेली “आराधना” ज्यात तास-भर एकच समुहगीत पुन्हां पुन्हां म्हटले जाते जोवर लोक संम्मोहित होत नाहीत. अशा उपासनेत ख-या सुवार्ता प्रचारास खूप कमी वाव असतो. सांगण्याची आवश्यकता नाही की, ह्या मंडळ्याच्या उपदेशात ख्रिस्ताला महत्व नसते!

आणि “ख्रिस्त” जो कधीतरी ह्यांच्या उपासनेत सांगितला जातो तो खरा ख्रिस्त नसतोच. शुभवर्तमानातील उद्देशित ख्रिस्त एखाद्याच्या व्यक्तिमत्वातील भावनेत रुपांतरीत होतो. मनाला भावणारे पुस्तक, ख्राईस्टलेस ख्रिस्टीयनिटी, यामध्ये डॉ. मायकेल हॉर्टन म्हणाले,

येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला देवा बरोबरील वैयक्तिक नातेसंबंधाविषयी जितके जास्त बोलू, तितका तो तेथे वास्तवात बिल्कुल नातेसंबंध नसणार, स्वत:...येशूला सोडले तर ते माझ्या अंहकारात रुपांतरीत होतो (मायकल हॉर्टन, पीएच.डी., बेकर बुक्स, 2008, पृष्ठ 43).

एक तरुण डॉ. हायमर्सना भेटून म्हणाला, “मला पवित्रशास्त्र किंवा मंडळीची गरज नाही. ख्रिस्ताबरोबर माझा वैयक्तिक नातेसंबंध आहे, आणि तेवढे मला पुरेसे आहे.” सध्याचे बरेचसे उपदेश अशाप्रकारचे लोक बनवितात, ज्यांचा विश्वास आहे की त्यांचे स्वत:चे विचार व भावना हा ख्रिस्तच आहे. तो आणखी एक येशू! तो खोटा ख्रिस्त आहे! ही ती सुवार्ता नाही जी पौलाने आपल्या ह्या उता-यात सांगितलेली आहे! ह्या प्रकारचे विचार व इतर खोट्या कल्पना, ज्या अनेक पाळकांकरवी येतात व त्यांच्या प्रचाराचे केंद्र सुवार्ता पेक्षा वेगळेच बनते. प्रेषित पौल हा “तुम्ही स्विकारली नाही, अशी दुसरी सुवार्ता” या विषयी बोलत आहे (II करिंथ 11:4). ह्या मुद्द्यात मी जे कांही बोललो आहे ते सर्व “दुसरी सुवार्ता” केंद्रित आहे. पौल आपल्या उता-यात म्हणतो,

“कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांस सांगून टाकले; त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:3).

ती हीच सुवार्ता आहे!

II. दुसरे, सुवार्तेचा केंद्रबिंदू हा ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे.

मी आता पर्यंत सांगितलेल्या प्रचाराच्या प्रकारात, ख्रिस्ताचा वधस्तंभ केंद्रस्थानी नाही — मुख्य गोष्ट नाही — ख्रिस्तीत्वाचा पाया नाही. डॉ. डब्लू. ए. क्रिसवेल म्हणाले,

     संदेशातून ख्रिस्ताचे मरण वगळले...तर मग कांहीच उरत नाही. आणि प्रचारकाची “सु वार्ता,” आपल्या पापाच्या क्षमेचा प्रचार राहत नाही...जे ह्या...प्रकारचे ख्रिस्तीत्व आहे ते नवीन कराराचे ख्रिस्तीत्व आहे का? खरोखर ते निसंशय वधस्तंभाचे ख्रिस्तीत्व आहे. (डब्लू. ए. क्रिसवेल, पीएच.डी., इन डिफेन्स ऑफ द फेथ, झोन्डरवॅन पब्लिशिंग हाऊस, 1967, पृष्ठ 67).

प्रेषित पौल म्हणाला,

“आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाहि अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो” (गलती 6:14).

“ख्रिस्त आपल्या पापाबद्दल मरण पावला.” हा पौलाच्या प्रचाराचा मुख्य विषय होता. खरे तर, करिंथ येथील मंडळीस म्हणाला, “कारण येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असतांना दुसरे कांही जमेस धरु नये असा मी ठाम निश्चय केला” (I करिंथ 2:2). पवित्रशास्त्राचे हे ख्रिस्तीत्व आहे तर, ते वधस्तंभाचे ख्रिस्तीत्व आहे. महान स्पर्जन, “प्रचारकाचा बादशहा” म्हणाले, “सुवार्तेचे ह्दय ही पापापासून मुक्ति आहे, पापापासून मुक्तीचा सुवास हा ख्रिस्ताचे वधस्तंभावरील बदली अर्पण आहे.”

सध्या ब–याच मंडळ्या ह्या आपला विश्वासाचे निदर्शक म्हणून कबूतराचे चिन्ह वापरतात. मी म्हणेन ते चुक आहे. कबूतर हे पवित्र आत्म्याचे निदर्शक आहे. पण पवित्र आत्मा हा सुवार्तेच्या उपदेशातील त्र्यैक्याचा मुख्य व्यक्ति नाही. योहानाच्या सोळाव्या अध्यायात येशू म्हणाला की पवित्र आत्मा “आपल्या स्वत:चे सांगणार नाही” (योहान 16: 13). पुन्हा येशू म्हणाला, “तो माझे गौरव करील” (योहान 16:14). पवित्र आत्म्याचे कार्य हे आपल्या स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचे नसून, ख्रिस्ताचे गौरव करणे हे आहे. त्यामुळे ज्या मंडळीचा मुख्य संदेश पवित्र आत्म्यावर केंद्रित आहे ती पवित्रशास्त्रीय मंडळी नाही.प्रेषित पौल म्हणाला की आपल्या संपूर्ण सेवेत व प्रचारात ख्रिस्ताचे अधिपत्य असले पाहिजेत. तो म्हणाला की ख्रिस्त

“...तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे; तो आदि, मृतातून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे; [कारण त्याच्याठायी सर्व पूर्णता वसावी]. आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांति करुन...त्याचा स्वत:बरोबर त्याच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले” (कलस्सै 1:18-20).

“त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे” पापापासून क्षमा आहे, आणि देवाबरोबर शांति आहे — आणि केवळ ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील रक्ताद्वारे आहे!

तुम्हांस शुद्ध करण्याचे सामर्थ्य येशूकडे आहे?
   काय तुम्ही कोक-याच्या रक्तात धुऊन शुद्ध झाला?
ह्या क्षणी तुम्ही पूर्णत: त्याच्या कृपेवर विश्वास ठेवता?
   काय तुम्ही कोक-याच्या रक्तात धुऊन शुद्ध झाला?
रक्तात तुम्ही धुऊन शुद्ध झाला, कोक-याच्या आत्मा-शुद्ध करणा-या रक्तात?
   तुमची वस्त्रे डागविरहीत आहेत? काय ते बर्फासारखे शुभ्र आहेत?
काय तुम्ही कोक-याच्या रक्तात धुऊन शुद्ध झाला?
    (“आर यु वॉश्ड इन द ब्लड?” अलिशा ए. हॉफ्पमॅन, 1839-1929).

ओ! मुल्यवान प्रवाह तो आहे
   तो मला बर्फासारखा शुभ्र करतो:
दुसरा कोणता झरा मी न जाणे,
   दुसरा कोणता नाही केवळ येशूचे रक्त.
(“नथिंग बट द ब्लड” रॉबर्ट लॉरी, 1826-1899).

“कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांस सांगून टाकले... ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:3).

डॉ. क्रिसवेल म्हणाले,

     “सर्वप्रथम” ह्या शब्दातून त्याला काय सांगावयाचे आहे? त्याचा संदर्भ प्रभावा प्रमाणेच काळाशीहि कांही देणे घेणे लागत नाही...ख्रिस्ताच्या मरणाने आपल्या पापाचे प्रायश्चित आपल्या ऐवजी [पाप्यांच्या बदली] त्यांने करण्याचा हा सिद्धांत कृपेचा कोनशिला, व सुवार्तेचे ह्दय आहे. दुसरे कोणतेहि सत्य एवढ्या उच्चस्थानी नाही...पवित्रशास्त्रातील सर्व महान सिद्धांत हे वधस्तंभाकडे घेऊन जातात.
     एक टिकाकार चार्ल्स हॅडोन स्पर्जनशी म्हणाले, “तुमचे सर्व उपदेश हे ध्वनीसारखे आहेत,” जे एक जगृ-प्रसिद्ध लंडनचे प्रचारक यांस त्यांनी उत्तर दिले, “होय, मी पवित्रशास्त्रातून कोणताहि उतारा घेतो आणि वधस्तंभापर्यंत थेट जातो [सरळ रेषा मारतो].” प्रायश्चिताशिवाय क्षमा नाही; रक्त ओतल्यावाचून मुक्ति नाही; दंड भरपाई केल्याशिवाय समेट नाही...
     ख्रिस्ताच्या प्रायश्चितरुपी मरणाची घोषणा करणे हा नवीन कराराचा विशेष, निश्चयी सिद्धात आहे. हे आपला विश्वास इतर धर्माहून वेगळा करतो. पाप मुक्तीसाठी ख्रिस्ती संदेश हा वेगळा आहे. पापाच्या बंधनातून व न्यायापासून मनुष्यास सोडविणे हा मूलभूत उद्देश आहे...मुक्तीची सुवार्ता, शुभ वार्ता म्हणजे देवाने आम्हाला ख्रिस्तामुळे क्षमा केल्याची घोषणा हे पहिले व सर्वांच्या वर असे आहे (डब्लू. ए. क्रिसवेल, पीएच.डी., इन डिफेन्स ऑफ द फेथ, ibid., पृष्ठ 68-70).

III. तिसरे, वधस्तंभावरचा ख्रिस्त आपणांस आपल्या पापापासून तारण देतो.

एका अर्थी — मुस्लीम येशूवर विश्वास ठेवतात. ते त्याला “इसा” असे संबोधतात. कुराण सुद्धा म्हणते की तो कुमारीच्या उदरी जन्मास आला. तो परत स्वर्गात जाणार असेहि ते म्हणतात. कांही मुर्ख लोक म्हणतात एवढे पुरे आहे. पण मुस्लीम जगतातून शेकडोने तरुण कुराणतील “इसा” येळूकडे वळत आहेत. मागील कोणत्याहि काळापेक्षा सध्या अधिक शेकडोने तरुण मुस्लीम पवित्रशास्त्रातील येशूकडे वळत आहेत. ख्रिस्तीत्वातील येशूवर विश्वास ठेवतांना छळ व दु:ख त्यांना नेहमीच सहन करावे लागते. आपल्या येशूवर विश्वास ठेवतांना त्यांना दु:खातून, छळातूनहि का जावे लागतेय? का ते मी सागंतो! कुराण मधील येशूने आपल्या पापाचा मोबदला देण्यास वधस्तंभावर मेला नाही — त्यामुळेच! कुराण म्हणते, तो आपल्या तारणासाठी वधस्तंभावर मेला नाही! परंतू पापाचा क्षमा कशी मिळते हे कुराण सांगत नाही. सत्कृत्ये करा, आणि नियमशास्त्र पाळा असे ते सांगते, पण पापाची क्षमा कशी मिळते व देवाचे मुल म्हणून कसा स्विकार होईल हे ते सांगत नाही. कुराण त्यांना ते सांगू शकत नाही, कारण येशू वधस्तंभावर मेला हे कुराण नाकारते! आपल्या येशूवर विश्वास ठेवल्याने त्यांना मोठ्या छळातून जावे लागते कारण केवळ तोच त्यांना देवाबरोबर शांति देतो, “त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे त्याने शांति दिली” (कलस्सै 1:20).

वधस्तंभावरील ख्रिस्तावर विश्वास ठेवतांना तुमचा छळ होतोय का? “त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे” देवाबरोबरील शांति मिळवितांना तुमचे जीवन धोक्यात आहे का? ते घालतात. ते हे दररोज जीव धोक्यात घालतात. तुम्हाला तारण्यासाठी ख्रिस्ताने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताच्या द्वारे क्षमा मिळविण्यासाठी मस्लिम लोकांच्या द्वेषाच्या क्रोधातून तुम्ही गेला काय? ते जातात. ते दररोज द्वेषाच्या क्रोधातून जातात.

कांही काळापूर्वी पास्टर वुर्मब्रॅंड यांच्या मासिकात मी एका इंडेशियन मुस्लिम मुलीचा चेहरा पाहिला. तिने येशूवर विश्वास ठेवल्याने तिच्या चेह-यावर ॲसिड टाकले होते. तिचा चेहरा अगदी भयंकर, अगदी अवर्णनीय होता. पण ती हसत होती. ते म्हणाले ती सर्व वेळ हसत होती. वधस्तंभावरील ख्रिस्त मिळविण्यासाठी चेह-याची किंमत मोजावी लागली तर काय हरकत नाही असे तिला वाटले! का? कारण,

“शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:3).

माझे पाप — ओ, हा गौरवी विचाराचा आनंद,
   माझे पाप, थोडे थोडे नको, पण पूर्णत: —
ते वधस्तंभावर खिळले व इथून पुढे मला सहन नाही करायचे,
   हे माझ्या जीवा, प्रभूची स्तुति कर, प्रभूची स्तुति कर!
(“इट इज वेल वुईथ माय सोल” एच. जी. स्पॅफ्फोर्ड, 1828-1888).

होय, ख्रिस्त स्वर्गातून परत येणार. पण कुराण म्हणते की! येशूचे वधस्तंभाशिवाय स्वर्गातून येणे झाले तर — तुम्हांला तारण नाही. तुम्हांला वधस्तंभ पाहिजे! त्यामुळे येशूने तुमच्या पापाबद्दल वधस्तंभावर दंड भरला. ख्रिस्ताशिवाय पापाचा दंड भरला जात नाही, आणि देवाबरोबर तुम्हांस शांति नाही. केवळ वधस्तंभावरील ख्रिस्त तुमच्या पापापासून तुम्हांला तारु शकतो! केवळ वधस्तंभावरील ख्रिस्ताने तुम्हांस तुमच्या सर्व पापापासून शुद्ध करण्यासाठी रक्त सांडले. होय,

“शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:3).

हजारो शहिद व संतानी म्हटले आहे, “मी स्वत:ला वधस्तंभावरील ख्रिस्ताला देतो! मी माझे हात व पाय वधस्तंभावरील ख्रिस्ताला देतो! मी माझे शरीर वधस्तंभावरील ख्रिस्ताकरिता जगंली पशूला देतो! मी माझे संपूर्ण जीवन वधस्तंभावरील ख्रिस्ताला देतो!”

ते जुलमी राजाच्या क्रोधीत शस्त्राला भेटले,
   सिंहाचे भयंकर आयाळ;
जाणण्यासाठी ते आपल्या वाकलेल्या माना मरणाला देतात:
   त्यांच्या प्रमाणे कोण करणार?
(“द सन ऑप गॉड फोर्थ टू वार” रेजिनाल्ड हेबर यांच्याद्वारा,1783-1826).

ते म्हणाले वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या द्वारे त्यांच्या पापांची क्षमा मिळण्यास व शुद्ध होण्यास ते तेवढे किमती वा त्याहून अधिक आहे.

तुम्ही ख्रिस्ताचा स्विकार करता काय? आज ह्या सकाळी, त्याच्यावर विश्वास ठेवता काय? “येथे, प्रभू, मी स्वत:ला देऊन टाकतो, हेच काय ते मी करु शकतो” असे, डॉ. वॅट्स बरोबर तुम्ही म्हणाल काय ? तुम्ही म्हणता, “वधस्तंभावरील ख्रिस्ताला मी स्वत:ला देण्यास तयार आहे, जो मला माझ्या पापापासून तारण्यासाठी मेला.” बाकीचे सगळे जेवणासाठी वर जातील. ते जेव्हां वर जातील तेव्हां, तुम्ही पुढे येऊन पहिल्या दोन रांगेत बसा. येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधी आम्ही तुमच्याशी बोलू. ह्या सकाळी कोणी तरी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा अशी मी प्रार्थना करितो. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “द ओल्ड रगेड क्रॉस”
(जॉर्ज बेन्नार्ड यांच्याद्वारा, 1851-1935).
“The Old Rugged Cross” (by George Bennard, 1873-1958).


रुपरेषा

वधस्तंभावरचा ख्रिस्त

THE CHRIST OF THE CROSS

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत
व रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा दिलेला उपदेश
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan

“बंधूजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांस सांगितली, जिचा तुम्ही स्विकार केला, जिच्यात तुम्ही स्थिरहि राहात आहां; जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हांस कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हांस ही सुवार्ता सांगितली त्या वचनांनुसार ती तुम्ही दृढ धरली असेल; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांस सांगून टाकले, त्यापैकी मुख्य हे की, शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला” (I करिंथ 15:1-3).

I.    प्रथम, सध्याच्या पुष्कळ पाळकांचा त्यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू सुवार्तेपेक्षा वेगळा असतो, II करिंथ 11:4.

II.   दुसरे, सुवार्तेचा केंद्रबिंदू हा ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे, गलती 6:14; I करिंथ 2:2; योहान 16:13,14; कलस्सै 1:18-20.

III.  तिसरे, वधस्तंभावरचा ख्रिस्त आपणांस आपल्या पापापासून तारण देतो,
कलस्सै 1:20.