Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
ख्रिस्ताच्या रक्तात धुऊन शुद्ध केले!

WASHED IN CHRIST’S BLOOD!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
लिखीत व रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश प्रभूवारी सकाळी, 3 जून, 2018 रोजी
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, June 3, 2018

“जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकापासून मुक्त केले’” (प्रकटीकरण 1:5).


पहिल्या अर्ध्या भागातील वचनांत प्रेषित योहानाचा सलाम आहे, ज्यामध्ये, सात मंडळ्यात, येशू ख्रिस्त, “जो विश्वसनीय साक्षी, मेलेल्यांतून प्रथम जन्मलेला व पृथ्वीवरील अधिपति” याच्यापासून कृपा व शांति असावी म्हणून, तो श्रोत्यांसाठी प्रार्थना करतोय. ख्रिस्ताविषयी हे भाष्य केल्यानंतर, योहान म्हणाला,

“जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकापासून मुक्त केले’” (प्रकटीकरण 1:5).

हा उतारा म्हणतो ख्रिस्ताने त्याच्या स्वत:च्या रक्ताने “आम्हांवर प्रीति केली, व आम्हांस शुद्ध केले.” विद्वतेच्या नावाने, आधुनिक टिकाकारानी “शुद्ध केले” हे “ढिले केले” असा बदल केला. त्यांनी हे नेस्टल-ॲलंड ग्रीक नवीन करारातील, गुढ-दुषित सिनायटीक उता-यातील ग्रीक शब्दात झालेल्या बदलामुळे केला. पण “ढिले केले” हा कमी दर्जाचा अलेक्झान्ड्रीयन शब्द आहे, तो नोस्टी- सीझमने दुषित झालेला आहे. रक्तात “शुद्ध केलेले” असण्यात नोस्टीक्स आश्चर्य असू शकते! म्हणून, नोस्टीक्साईज्ड अलेक्झान्ड्रीयन यांनी ग्रीक शब्द वगळून — “शुद्ध केले” ऐवजी “ढिले केले” असा त्यात टाकला.

डॉ. चार्ल्स जॉन एलिकॉट (1829-1903) एक अँग्लिकन विद्वान, केम्ब्रीजमध्ये नवीन कराराचे प्राध्यापक, आणि ज्यानी नवीन कराराची सुधारीत आवृत्ती (RV) भाषंतरीत केली गेली त्या विद्वानाच्या समितीचे अध्यक्ष होते. डॉ. एलिकॉट हे एलिकॉट्स कॉमेंट्री ऑन द होल बायबल (झोंडेरवॅन पब्लिशिंग हाऊस) याचे संपादक होते. आपल्या ह्या उता-वर एलिकॉट यांची कॉमेंट्री म्हणते,

“आपणास शुद्ध केले” याऐवजी, कांही [हस्तलिखीते] “ढीले केले” असे वाचतात. ग्रीकमध्ये या दोन शब्दात केवळ एका अक्षराचा फरक आहे. आपल्या सामान्य विचाराचा स्वर हा “शुद्ध केले” असे खरे वाचन करण्यास पसंती देतो. एका पवित्र प्रसंगी, प्रभूने जे म्हटले, ते योहान स्पष्टपणे आठवितो, “मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.” ख्रिस्ताला भोसकलेल्या बाजूने जे पाणी व रक्त वाहिले ते पाहिले त्यामुळे त्या “शुद्ध करणा-या रक्ताच्या” विचाराची तीव्रता वाढली [योहान19:34], ब-याचदा पुन्हां ते त्याच्या मनाशी घडते, प्रकटी 7:13, 14; I योहान 1:7; 5:5-8 (चार्ल्स जॉन एलिकॉट, एम.ए., डी.डी., एलिकॉट्स कॉमेंट्री ऑन द होल बायबल, झोंडेरवॅन पब्लिशिंग हाऊस, एन.डी., आवृत्ती VIII, पृष्ठ 535; प्रकटी 1:5 वरील टिपण्णी).

प्रकटी 7:14 मध्ये आणखी पुढे सांगण्यात आले आहे,

“मी त्याला म्हटले, प्रभो, हे तुला ठाऊक आहे तो मला म्हणाला, मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत; ह्यांनी ‘आपले झगे’ कोक-याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत” (प्रकटी 7:14).

ह्या वचनात आपणास स्पष्ट सांगण्यात आले आहे की जे स्वर्गात आहेत त्यांनी आपले झगे “कोक-याच्या रक्तात “धुऊन” शुभ्र केले आहेत.” प्रकटी 7:14 चा हा स्पष्ट अर्थ आहे, आपल्या उता-यात “धुतले” चा उपयोग असा केला पाहिजे:

“जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकापासून मुक्त केले’” (प्रकटीकरण 1:5).

डॉ. जॉन एफ. वालवुर्ड निर्देशित करतात की ग्रीक शब्द “लोउओ” (धुतले) मध्ये “लुओ” (ढीले केले) यापेक्षा एक अक्षर जास्त आहे. डॉ. वालवुर्ड म्हणाले की एलिकॉट सारखे विद्वान मोठा शब्द (धुतले) वापरण्यास पसंती देतात कारण “नकल करणा-यांसाठी एक शब्द वाढविण्यापेक्षा एक शब्द वगळणे सोपे आहे” (जॉन एफ. वुडवर्ड, टीएच.डी., द रिव्हेलेशन ऑफ जी>जस ख्राईस्ट, मुडी मुद्रणालय, 1966, तळटिप 1, पृष्ठ 38). किंग जेम्स भाषांतराच्या बाजूने तो भक्कम युक्तिवाद आहे.

ल्युथर यांच्या “पवित्रशास्त्रातील साम्यता” चा दृष्टिकोन अजूनहि खरा आहे — शात्स्त्रातील एक भाग दुस-यास प्रकट करतो, जो त्याच विषयासंबंधी सांगतो — आणि विशेषत: त्याच पुस्तकात! त्यामुळे आपण आधुनिक लेखक ज्यांनी आपणांपासून तो पवित्र, इश्वरप्रेरित भाषांतरीत ग्रीक शब्द “धुतले” दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापासून आपले डोळे खाली व पाठ मागे फिरवतो. परमेश्वराचे आभार, प्रत्येक खरा ख्रिस्ती येशूचे “गौरव” करु शकतो, “जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने आपणांस पातकांपासून शुद्ध केले”!

मी ह्या मुद्द्यावर का भर देतो आता ह्याला कारण आहे. तुम्ही तुमच्या पापापासून “शुद्ध होणे” हे खूप महत्वाचे आहे, आणि ते केवळ त्यापासून “ढिले होणे” महत्वाचे नाही. तुम्ही देवाला तोंडोतोंड भेटणार आहोत. पदरी पाप घेऊन न्यायसमयी देवाला भेटलात, तर तुम्ही ख-या अर्थाने संकटात सापडणार! न्यायसमयी तुमचे संपूर्ण दप्तर शुद्ध असले पाहिजे नाहीतर देव नरकातील न विझणा-या अग्नीचा दंड देईल (प्रकटी 20:11-15). जेव्हां देव तुमची नोंदवही पाहिल तेव्हां त्या दप्तरात तुमचे पाप सापडू नये म्हणजे बरे. न्यायाच्या दिवशी तुमचे पाप केवळ “ढिले” होऊन चालणार नाही. अरेरे, नाही! अनंतकालिक नरक यातनेपासून तुमची सुटका व्हायची असेल तर तुम्ही “कोक-याच्या रक्तात धुऊन शुभ्र [व्हायला हवे]” (प्रकटी 7:14). आपणांस प्रकटीकरण 7 मध्ये सांगितले आहे की जे स्वर्गात आहेत त्यांनी “आपले झगे कोक-याच्या रक्तात धुऊन शुभ्र केले आहेत” (प्रकटी 7:14). ह्या वचनापर्यंत आपणांस कळून आले की आपला नरकापासून सुटका होऊन स्वर्गात सुरक्षित राहायची आपणांस आशा आहे तर आम्ही ख्रिस्ताच्या रक्तात शुद्ध झाले पाहिजे. त्यामुळे मी ह्या मुद्द्यावर जोर दिला आहे. तुम्ही ख्रिस्ताच्या रक्तात शुद्ध झाले पाहिजे नाहीतर अनंतकाळासाठी तुम्ही नरकात जाल. हे उदारवादी व नवीन-सुवार्तिक “पवित्रशास्त्राचे शिक्षक” म्हणतील की “शुद्ध केले” ऐवजी “ढिले केले” म्हणणे वावगे नाही. परंतू तुमच्या सारख्या पाप्यांना उपदेश देणे माझे काम आहे. तुमच्या दप्तरी तुमचे पाप आहे! ते धुऊन शुद्ध झाले पाहिजे नाहीतर देव तुम्हांला नरकात पाठविणार. कशाने तुमचे पाप शुद्ध होऊ शकते? येशूच्या रक्ताशिवाय कशानेहि नाही!

“जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकापासून मुक्त केले’” (प्रकटीकरण 1:5).

आता, ह्या ठिकाणी, मला तुम्हांला सांगू द्या, की ख्रिस्ताचे रक्त खूप महत्वाचे आहे! जेथे ख्रिस्ताचे रक्तावर तुम्ही सार्वकालिकता कुठे घालविणार हे अवलंबून आहे! तुमचे ख्रिस्ताचे रक्तावरील अवलंबीत्व जीवन यशश्वी जगा किंवा नाही. रक्तावरील कांही महत्वाचे मुद्दे येथे पाहा.

I. प्रथम, रक्ताचे अर्पण अगदी आरंभीच्या काळापर्यंत मागे जाते.

जगातील सर्व प्राचिन लोक रक्ताच्या अर्पणावरती विश्वास ठेवीत. जगामध्ये अशी कोणतीहि प्राचिन संस्कृति सापडणार नाही जेथे रक्ताचे अर्पण नव्हते. उदाहरणत: प्राचिन मेक्सिकोच्या अझ्टेक भारतीयांनी 20,000 पेक्षा जास्त मनुष्याचे बळी, खोट्या देवी देवतांचा क्रोध शमविण्यासाठी त्यांच्या मुर्तीवर अर्पिले होते. मयान्सनी सुद्धा असेच केले होते. पॅसिफिक बेटावरील सर्व आदिवासी प्राचिन काळात रक्ताचे अर्पण करीत असत. अशाच प्रकारे आफ्रिकेतील सर्व आदिवासीनी प्रतिकात्मक केले आहे. अंदाजे येशू ख्रिस्ताच्या 2,000 पूर्वी, शांग टी नावाच्या, एकेश्वरवादाचा देवासाठी प्राचिन चीनी लोक रक्ताचे अर्पण करीत असत. आरंभीच्या काळात, इतिहासाच्या सुरुवातीला, एक देव आहे व त्याला रक्ताचे अर्पणाची गरज आहे हे चीनी लोकांना ठाऊक होते! प्राचिन चीनी लोकांनी देव, व त्याला रक्ताचे अर्पणाविषयी, हाडे व कासवाच्या कवचावर लिखाण केले होते, जे नुकतेच सापडले आहे! ही कृत्रिमता चार हजार वर्षापूर्वी मागे जाते. ही कल्पना कोठून आली? ही आदाम व त्याच्या वंशजानी केलेल्या पहिल्या अर्पणापासून पिढ्या दर पिढ्या चालत आलेले आहे.

इतिहासाच्य आरंभीच मोशेने उत्पत्तीचे पुस्तक लिहले. आपल्या पहिल्या मात्यापित्यांनी पाप केल्यावर ते झाकण्यासाठी प्राण्याचा वध करावा लागला हे त्याने नमुद केले आहे. त्यांचा पुत्र हाबेल रक्ताचे अर्पण आणले व त्यांने देव संतुष्ट झाला. त्याचा भाऊ काईनने शेतातील उपज अर्पिला जो नाकारला गेला. नोहाने देवाला रक्ताचे अर्पण केले. तसेच अब्राहामानेहि केले. ही सर्व अर्पणे देवाने यहुदी लोकांना प्राण्याचे अर्पण करण्याचे सांगायच्या कितीतरी वर्षे अगोदर केली जायची. ते मिसरात गुलाम म्हणून असतांना देवाने त्यांना प्राण्याचे अर्पण करुन त्याचे रक्त दाराच्या कपाळपट्टीला लावण्यास सांगितले होते. देव त्यांना म्हणाला जेव्हां तो हे रक्त पाहिल, आणि त्यांचा त्यांच्या पापाबद्दल न्याय करणार नाही. त्या संबधीचे गीत आपल्याकडे आहे,

मी जेव्हां रक्त पाहीन, मी जेव्हां रक्त पाहीन,
   मी जेव्हां रक्त पाहीन, तेव्हां मी ओलांडून जाईन,
मी ओलांडून जाईन.
   (“व्हेन आय सी द ब्लड” जॉन फुट, 19 वे शतक).

पहिल्या वल्हांडणाच्या सणामध्ये, मिसरात, गुलामगीरीत असतांना यहुद्यांना देवाने हेच ते सांगितले होते. त्या रात्री देवाने यहुद्यांना म्हटले,

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन; मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हां तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही” (निर्गम 12:13).

यहुदी लोक रक्ताच्या अर्पणाचा हा वल्हांडणाचा सण आज पर्यंत प्रतिकात्मक साजरा करतायत. वधस्तंभावर जाण्याच्या पूर्व रात्री, वल्हांडणाचा अर्थ बदलला जेव्हां त्यांने तो प्रभू भोजनात बदलला. कांही मंडळ्या त्यास पवित्र सहभागिता म्हणतात. कॅथलिक व पूर्वेकडील पारंपारिक मंडळ्या त्यांस मास म्हणतात. परंतू त्रैक्यातील प्रत्येक मंडळ्या ते पाळतात. पवित्रशास्त्र म्हणते,

“मग ते भोजन करीत असतांना येशूने भाकरी घेतली व आशिर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे; आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुति करुन तो त्यांस दिला व म्हले, तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे [नव्या] ‘कराराचे रक्त’ आहे हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळाकरिता ओतले जात आहे” (मत्तय 26:26-28).

तुम्ही पाहता, मूर्तीपुजेची रक्ताची अर्पणे ही माणसाला देवाला अर्पणे गरजेचे आहे या छोट्याशा आठवणीतून आले आहे. आणि जुन्या करारातील वल्हांडण, मसीहा, ख्रिस्ताचे अर्पण, जे ते वधस्तंभावर होणार होते ह्याचे निदर्शक आहे. आजचे प्रभू भोजन ख्रिस्ताने आपणांस तारण्यासाठी जे केले ते पुढे निर्देशित करते. ख्रिस्ताचे वधस्तंभावरील मरण, आणि तेथे त्याचे रक्त ओतले जाणे, ही संपूर्ण जागतिक इतिहासातील मध्यवर्ति धार्मिक घटना आहे!

“जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकापासून मुक्त केले’” (प्रकटीकरण 1:5).

ख्रिस्ताचे वधस्तंभावरील प्रायश्चित हे इतके का महत्वाचे आहे ते मी सागंत आहे. परंतू पहिल्यांदा मला दुसरा मुद्दा सांगावयाचा आहे.

II. दुसरे, सैतान ख्रिस्ताच्या रक्ताचा द्वेष कडवटपणे करतो.

प्रकटीकरणाच्या पुस्तकात आपण वाचतो,

“कारण आमच्या बंधूना दोष देणारा [सैतान] आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषरोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोक-याच्या रक्तामुळे व आपल्या साक्षीच्या वचनांमुळे जिंकले...”(प्रकटी 12:10-11).

सैतानाला ठाऊक आहे की जर कोणी त्याच्यावर विजय मिळवू शकतो ते केवळ कोक-याच्या रक्ताने — म्हणजेच, ख्रिस्ताचे रक्त, देवाच्या कोक-याचे रक्त याद्वारे. पवित्रशास्त्र सांगते की सैतान हा खूनी आहे. जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यां सर्वांचा तो नाश करु इच्छितो. आणि त्यामुळेच इतक्या खडवटपणे ख्रिस्ताच्या रक्ताचा द्वेष करतो. त्याला ठाऊक आहे की एकदा का एक व्यक्तीजवळ ख्रिस्ताचे रक्त आहे तर, तो त्याच्यावर विजय मिळवतो. पापी ख्रिस्ताच्या रक्ताने सैतानावर विजय मिळवितात. हे घडू नये अशी सैतानाची इच्छा आहे. त्यामुळे तो ख्रिस्ताच्या रक्ताचे महत्व कमी व बदनामी करण्यास सर्वकांही करतो.

एकोणिसाव्या शतकाच्या अंतिम भागात व विसाव्या शतकाच्या आरंभीच्या भागात सैतानाने पुष्कळ आघाडीच्या स्वैर इश्वरविज्ञानाच्या अभ्यासक, उदाहरणत: डॉ. हॅरी इमर्सन फोस्डीक व डॉ. नेल्स फेरे यांचा उपयोग ख्रिस्ताच्या रक्तावर हल्ला करण्यास केला. डॉ. फेरे म्हणाले, “ख्रिस्ताच्या रक्ताचे सामर्थ्य हे कोंबडीच्या रक्तापेक्षा जास्त नाही. डॉ. फोस्डीक हे रक्ताच्या प्रायश्चितास, “कत्तलखान्याचा धर्म” म्हणतात. अशाप्रकारची ही माणसे ख्रिस्ताच्या रक्ताविषयी विचित्रपणे बोलतात — आणि असे करण्यास त्यांना सैतानाने प्रेरित केलेले असते.

परंतू, विसाव्या शतकाच्या आरंभीच्या पुढच्या भागात, ख्रिस्ताच्या रक्तावर तो वेगळ्या मार्गाने हल्ला करण्यास सुरु केले. त्याने पुराणमतवादी सुवार्तिक माणसांचे मन ख्रिस्ताच्या रक्ताचे महत्व कमी करण्यास तयार केले. ही सैतानी चाल, डॉ. जे. वरनॉन मॅक् गी, अमेरिकेचे सर्वात प्रिय व रेडिओवरील पवित्रशास्त्राचे शिक्षक, यांच्या ध्यानात आली. आपला उतारा प्रकटी 1:5 यावर, आपल्या लिखणात डॉ. मॅक् गी म्हणाले,

सध्या इतर कांहीजण ख्रिस्ताच्या रक्ताला शुल्लक करण्याचा प्रयत्न करतात तसा मी करीत नाही. हे शब्द असलेले गीत मला अजूनहि आवडते,

   रक्ताने भरलेला झरा तेथे आहे
      इम्मानुएलाच्या धमन्यातून वाहणारे;
   आणि पापी, त्या पुरात बुडून निघाले,
      त्यांचे सर्व दुषित डाग गळून पडले.

(जे. वरनॉन मॅक् गी, टीएच.डी., थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 1983, आवृत्ति V, पृष्ठ 890, 891; प्रकटी 1:5-6 वरील टिप्पणी).

हे स्पष्ट आहे की डॉ. मॅक् गी जे, ख्रिस्ताचे रक्त शुल्लक लेखतात त्यांना संदर्भित करतात, उदा. आर. बी. थिम, जॉन मॅक्आर्थर, आणि चार्ल्स सी. रेरी सुद्धा, जे काईनच्या अर्पणाविषयी म्हणाले, “रक्ताशिवाय जे अर्पण आहे ते परिपूर्ण आहे” (चार्ल्स सी. रेरी, टीएच.डी., द रेरी स्टडी बायबल, मुडी प्रेस, 1978; उत्पत्ति 4:3 वरील टिप्पणी). डॉ. रेरींची ती टिप्पणी वाचली तेव्हां माझ्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. वारेन विरस्बी यांनी रेरीनी असे म्हटल्यावर त्यांचे “अभिनंदन” केल्यावर मला तितकेच आश्चर्य वाटले! (वारेन डब्लू. विरस्बी, 50 पिपल एव्हरी ख्रिश्चन शुड नो, बेकर बुक्स, 2009, पृष्ठ 207). हे सर्व मला उदारमतवादी पक्षपात्यांच्या घरासारखे वाटते. उदारमतवादी विद्वानांच्या — कालखंडास मान्यता मिळविण्याचे आम्ही थांबविले पाहिजे!

ह्या माणसांना तारणा-याच्या रक्ताचे अद्भूत सामर्थ्य समजले नाही असे वाटते! पुष्कळांनी त्यांचे अनुकरण केले, आणि ते त्यांच्या प्रचारात रक्ताची स्तुति करत नाहीत. माझ्यासाठी ही शेवटच्या—काळातील गंभीर फसवणूक आहे. सैतान ख्रिस्ताच्या रक्ताचा द्वेष करतो, आणि तो लबाड व फसविणारा आहे हे जर आम्ही ध्यानात ठेवणार नाही तर आपणहि त्यात पडू! आमेन. सगळे पाळक ख्रिस्ताच्या मुल्यवान रक्तावर प्रचार वारंवार करतात! सरते शेवटी, त्यालाच पवित्रशास्त्र म्हणत आहे की,

“ख्रिस्ताच्या मुल्यवान रक्ताने...” (I पेत्र 1:19).

III. तिसरे, ख्रिस्ताचे रक्त आपणांस पापापासून मुक्त करते.

I पेत्र संपूर्ण उता-यात म्हणतो,

“कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणूकीपासून, ‘सोने रुपे’ अशा नाशवंत वस्तूनी नव्हे, तर निष्कलंक व निर्दोष कोकरा जो ख्रिस्त, त्याच्या मुल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहां’” (I पेत्र 1:18-19).

तुम्ही सोने देऊन मुक्त होणार नाही. रुपे दिल्यामुळे देव तुमचे तारण करणार नाही. मंडळीत तुम्ही किती पैसे देता यामुळे देव तुमचे तारण करणार नाही. आपण “ख्रिस्ताच्या मुल्यवान रक्ताने” मुक्त झालो आहोत.

मुक्तता म्हणजे गुलामगीरीतून सोडवून कोणाला तरी विकत घेणे. येशू म्हणाला “पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास” तो आलो आहे (मत्तय 20:28). त्याला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही कारण जगातील दोन-तृतियांश लोक परत आले जे गुलामगीरीत होते. प्रत्येक वंशात गुलाम होते, प्राचिन ब्रिटन मधून, स्पेन मधून, आफ्रिकेतून — सगळीकडून होते. जगातील प्रत्येक वंश कांही काळासाठी गुलामगीरीत होता. जसे मी थोड्याच वेळापूर्वी सांगितले की, यहुदी लोक मिसर देशात 400 वर्षे गुलामगीरीत होते.

प्रेषित पेत्र म्हणाला ख्रिस्ताने तुम्हांस स्वत:च्या रक्ताने गुलामगीरीतून विकत घेतले आहे. कशातून तुम्हांला त्यांने परत विकत घेतले? पापाच्या गुलामगीरीतून. लॉस एंजिल्समध्ये हजारो लाक पापाच्या गुलामगीरीत आहेत. ते सिगारेटमध्ये अडकले आहेत — व बाहेर पडू इच्छित नाहीत. ते अश्लिलता पाहण्यात गुंतले आहेत, आणि ते पाहणे बंद करु इच्छित नाहीत. त्या पापाचे तुम्ही गुलाम आहांत! परंतू पवित्रशास्त्र म्हणते की ख्रिस्त तुम्हांला मुक्त करु शकतो. तो तुमच्या बंडखोरी अविश्वासू अंत:करणाच्या पापातून मुक्त करु शकतो. मला वाटते ती खूप कठीण गोष्ट आहे. तुमच्या अविश्वासू दुष्ट अंत:करणातून ख्रिस्त तुम्हांला मुक्त करु शकतो! मला सांगण्यासारखे कबप आहे पण माझ्याकडे वेळ नाही! तुमचे संपूर्ण तारण हे ख्रिस्ताच्या रक्तावर अवलंबून आहे! ख्रिस्ताच रक्त तुम्हांस तुमच्या सर्व पापातून मुक्त करु शकते! विलियम काऊपर यांचे ऐका,

नुकतीच विश्वासाने, मी धार पाहिली
   तुझ्या जखमेतून पाहणारी,
प्रीति माझा विषय आहे ह्याची भरपाई करीत,
   आणि ती मी मरे पर्यंत असेल.

रक्ताने भरलेला झरा तेथे आहे
   इम्मानुएलाच्या [तारणा-याच्या] धमन्यातून वाहणारे,
आणि पापी, त्या पुरात बुडून निघाले,
   त्यांचे सर्व दुषित डाग गळून पडले.
(“देअर इज अ फाऊंटेन” विलियम काऊपर, 1731-1800; “अमेझिंग ग्रेस” च्या चालीवर).

आणि फॅनी क्रॉस्बी म्हणाले,

मुक्त केले, मुक्त केले,
   मुक्त केले, कोक-याच्या रक्ताने;
मुक्त केले, मुक्त केले,
   त्याचे मुल, आणि सदासर्वकाळ, मी आहे!
(“रिडीम्ड्” फॅनी जे. क्रॉस्बी यांच्याद्वारा, 1820-1915).

IV. चौथे, ख्रिस्ताचे रक्त तुम्हांस तुमच्या सर्व पापापासून शुद्ध करु शकते.

येशू कोण आहे हे विसरु नका! तो असाच कोणीहि नाही! कोणीहि ज्याला तुम्ही ओळखता तो तुम्हांस पापापासून शुद्ध करीत नाही. पण येशू असा रस्त्यावरील कोणीपण नाही. अरे, हो! तो देवाचा सार्वकालिक पुत्र, पवित्र त्र्यैक्यातील दुसरा व्यक्ति, “एकमेव देवाचा एकमेव देव” आहे ना.

“सर्व कांही त्याच्याद्वारे झाले आणि जे कांही झाले ते त्याच्यावाचून झाले नाही” (योहान 1:3).

प्रभू येशू ख्रिस्ताने तो स्वर्गातून खाली येण्यापूर्वी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली. तो असा व्यक्ति आहे की ज्याचे रक्त तुम्हांस पापापासून शुद्ध करते — आणि तुम्हांस स्वर्गात जाण्यास शुद्ध करते! प्रेषित योहान म्हणाला,

“त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करिते” (I योहान 1:7).

आपला उतारा तीच गोष्ट सांगत आहे,

“जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकापासून मुक्त केले’” (प्रकटीकरण 1:5).

तुमच्याबाबत हे घडावे असे तुम्हांला वाटते काय? सैतानाच्या साखळीतून वाचावे असे तुम्हांला वाटते काय? ख्रिस्ताचे रक्त हे करु शकते! तुम्हांला पापापासून मुक्त व्हायचे आहे का? ख्रिस्ताचे रक्त हे करु शकते! तुम्ही तुमच्या सर्व पापापासून शुद्ध होऊन, स्वर्गात जाऊन आम्हांसह आनंद करु इच्छिता काय? ख्रिस्ताचे रक्त हे करु शकते!

परंतू तुम्हांला कांही तरी करावे लागेल. ख्रिस्ताचे रक्त तुमच्यासाठी हे करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या पापापासून मागे फिरायला हवे. ती पहिली गोष्ट. तुम्ही तुमच्या पापापासून वळलेच पाहिजे. मग, दुसरे, तुम्ही येशूवर विश्वास ठेवला पाहिजे. विश्वासाने तुम्ही त्याच्याकडे या व त्याच्यावर विश्वास ठेवा. कोणीतरी म्हणेल, “एवढेच काय?” होय! एवढेच! आणि त्याचे रक्त सर्व पातके सुद्ध करील, आणि देव जो बाप याच्या सहभागितेत व आनंदात तुम्हांस आणील! काय तुम्ही पापापासून वळून येशूवर विश्वास ठेवाल? या गीताचे कडवे गाताना मि. ग्रीफ्फिथ यांना पुन्हां ऐका. मि. ग्रीफ्फिथ, खूप जलद म्हणू नका.

माझी मुक्ति ना रुप्याने ना सोन्याने मिळविली,
   किंवा जगातील श्रीमंती माझा प्राण वाचवू शकली नाही;
केवळ वधस्तंभावरचे रक्त माझा पाया आहे,
   माझ्या तारकाच्या मरणाने आता मला परिपूर्ण केले.
मी मुक्त झालो, पण ना रुप्याने,
   मला विकत घेतले, पण ना सोन्याने;
किंमत देऊन विकत घेतले, येशूच्या रक्ताने,
   न सांगितलेल्या प्रीतीच्या अनमोल किंमतीने.
(“ना रुप्याने, ना सोन्याने” डॉ. जेम्स एम. ग्रे, 1851-1935).

येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधी तुम्ही आमच्याशी बोलू इच्छिता, तर इतर लोक वरच्या मजल्यावर जेवायला जाताना, तुम्ही पुढे येऊन पहिल्या दोन रांगेत बसा. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “ना रुप्याने ना सोन्याने”
(डॉ. जेम्स एम. ग्रे यांच्याद्वारा, 1851-1935).
“Nor Silver Nor Gold” (by Dr. James M. Gray, 1851-1935).


रुपरेषा

ख्रिस्ताच्या रक्तात धुऊन शुद्ध केले!

WASHED IN CHRIST’S BLOOD!

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत
व रेव्ह. जॉन सॅमुएल कागॅन यांच्याद्वारा दिलेला उपदेश
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Rev. John Samuel Cagan

“जो आपल्यावर प्रीति करितो, ज्याने आपल्या रक्ताने तुम्हांआम्हांला ‘पातकापासून मुक्त केले’” (प्रकटीकरण 1:5).

(प्रकटीकरण 7:14).

I.    प्रथम, रक्ताचे अर्पण अगदी आरंभीच्या काळापर्यंत मागे जाते, निर्गम 12:13;
मत्तय 26:26-28.

II.   दुसरे, सैतान ख्रिस्ताच्या रक्ताचा द्वेष कडवटपणे करतो, प्रकटी 12:10-11;
I पेत्र 1:19.

III.  तिसरे, ख्रिस्ताचे रक्त आपणांस पापापासून मुक्त करते, I पेत्र 1:18, 19;
मत्तय 20:28.

IV.  चौथे, ख्रिस्ताचे रक्त तुम्हांस तुमच्या सर्व पापापासून शुद्ध करु शकते,
योहान 1:3; I योहान 1:7.