Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
स्पर्जनच्या “सर्व ईश्वरविज्ञानाचे सार”

SPURGEON’S “SUBSTANCE OF ALL THEOLOGY”
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 6 मे, 2018 रोजी
Preached by Dr. R. L. Hymers, Jr.
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, May 6, 2018


स्पर्जन हे केवळ 27 वर्षाचे होते. पण ते लंडनमध्ये अगोदरच एक प्रसिद्ध प्रचारक म्हणून सुपरिचित होते. ते दर रविवारी 30,000 लोकांना सुवार्ता प्रचार करायचे. मंगळवार दि. 25, जून 1861, रोजी ह्या तरुण प्रचारकाने स्वानसी नगराला भेट दिली. त्या दिवशी पाऊस पडला होता. त्यामुळे ते दोन जागी प्रचार करतील असे लोकांना सांगण्यात आले होते. दिवसा पाऊस थांबला. त्या संध्याकाळी अभिषिक्त सेवक बाहेर मोठ्या लाकसमुदायाशी बोलला. तोच हा उपदेश आहे त्यात थोडा बदल करुन मी आज रात्री सांगणार आहे. कृपया आपल्या उता-याकडे वळूया, योहान 6:37 उघडा.

“पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

हा उतारा आहे एखादा व्यक्ति हजारदा उपदेश देईल. आपण ह्या जीवनभराच्या उता-यातून दोन मुद्दे घेणार आहोत− आणि नाहीतर त्यातील महान सत्य कधीहि उघड होणार नाही.

उता-याच्या पहिला अर्धा भाग “पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येते...” यावर असे पुष्कळ वक्ते आहेत जे अधिक चांगले बोलतील.

दुसरा अर्धा भाग “आणि माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” यावर पुष्कळ अर्मेनियम प्रचारक अधिक चांगले बोलतील. परंतू ते पहिला अर्धा भाग “पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल...” यावर भाग पडते म्हणू बोलतील.

अशाप्रकारे दोन्हा प्रकारच्या प्रचारकामध्ये असे आहेत ज्यांना दोन्हा बाजू दिसत नाही. ते उता-याकडे एका डोळ्याने पाहतात. दोन्ही डोळे उघडे ठेऊन बघितल्यावर जे दिसलो असते ते सर्व पाहू शकत नाहीत.

आज रात्री मी दोन्ही बाजूवर सर्वोतपरी बोलण्याचा प्रयत्न करीन – आणि येशूला सर्व जे आपल्याकडून ऐकायचे आहे ते मी सांगतो.

I. प्रथम, पाया ज्यावर तारण उभा असते.

“पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल”

आम्ही जे कांही कृत् येंकरितो त्यावर तारण अवलंबून नाही. तर परमेश्वर पिता जे कांही करितो त्यावर असते. त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याला पिता कांही लोक देतो. आणि पुत्र म्हणतो, “पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल.” याचा अर्थ असा की ख्रिस्ताकडे जो येतो त्या प्रत्येकांस पित्याने ख्रिस्ताला दिलेले असते. आणि ते ख्रिस्ताकडे येतात कारण पिता त्यांच्या ह्दयात येण्याची प्रेरणा घालतो. एखाद्या व्यक्तीझालेल्याचे तारण का होते, व दुस-या व्यक्तीचे पतल का होते, याचे कारण – तारण झालेल्यालेले जी कांही कृत्यें केली अथवा केली नाहीत यामध्ये नाही तर देवामध्ये आढळते. तारण झालेल्यास कांही वाटले किंवा कांही वाटले नाही यामध्येहि नाही. परंतू कांहीतरी त्याच्या बाहेर – देवाच्या सार्वभौम कृपेत सुद्धा. देवाच्या सामर्थ्याच्या दिवशी, तारण झालेल्या व्यक्तीस येशूकडे येण्याची इच्छा देव निर्माण करितो. पवित्रशास्त्राने हा मुद्दा स्पष्ट केला पाहिजे. पवित्रशास्त्र म्हणते,

“परंतू जितक्यांनी त्याचा स्विकार केला तितक्यांचा म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणा-यांना त्यांने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्याचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला” (योहान 1:12, 13).

पुन्हा, पवित्रशास्त्र म्हणते,

“ह्यावरुन हे इच्छा बाळगणा-यावर नव्हे किंवा धावपळ करणा-यावर नव्हे, तर दया करणा-या देवावर अवलंबून आहे” (रोम 9:16).

प्रत्येक व्यक्ति जी स्वर्गात आहे, ती तेथे आहे कारण देवाने त्याला ख्रिस्ताकडे आणले आहे. आणि प्रत्येक व्यक्ति जी स्वर्गाच्या वाटेवर आहे कारण केवळ देवाने त्याला “इतरांपेक्षा वेगळे केले आहे” (I करिंथ 4:7).

सर्व माणसे, स्वभावत:च, येशूकडे येण्याचे आमंत्रण नाकारतात. “ते सर्व पापवश झाले आहेत...समंजस कोणी नाही, देवाचा झाटून शोध करणारा कोणी नाही. ते सर्वा बहकले आहे” (रोम 3:9, 11, 12). येशूकडे न येण्यास लोक पुष्कळ निमित्त सांगतात. “तेव्हां ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले” (लुक 14:18). कांहीजन म्हणतात ते येशूकडे येऊ शकत नाहीत कारण ते त्याला पाहू शकत नाहीत. कांहीजन म्हणतात ते येशूकडे येऊ शकत नाहीत कारण ते त्याला अनुभवू शकत नाहीत. तरीहि इतरांनी म्हटलेली वचने ऐकून त्यांची नकल करुन ते येशूकडे येण्याचा प्रयत्न करतात. ते सर्व येशूकडे न येण्यासंबंधाने निमित्त सांगतात. पण देव, सार्वभौम कृपेत, कांहीजनामध्ये फरक करितो. परमेश्वर कांही पुरुष व स्त्रीयांनी आपल्याकडे आकर्षित करितो आणि तो त्यांना येशूकडे येण्यास प्रवृत्त व सक्षम करतो. “पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल.” “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने” पुडे येतात (स्तोत्र 110:3). परमेश्वर, त्याच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, कांही लोकांना ख्रिस्ताकडे आकर्षित करितो. “”पहिल्याने त्यांने आपणांवर प्रीति केली म्हणून आपण प्रीति करितो” (I योहान 4:19). ती, माझ्या मित्राची, निवड आहे.

मी हा विश्वास फार काळ ठेवला नाही. तरीहि माझे तारण कसे झाले ह्याचे मला सारखे आश्चर्य आहे. हंटिंग्टन पार्कच्या पहिल्या बॅप्टिस्ट मंडळीतील शब्बाथ शाळेत मला नेण्यात आले. माझ्या माहिती प्रमाणे त्या मोठ्या वर्गातून केवळ मी आजहि ह्या मंडळीत आहे. मला जेवढे माहित आहे त्याप्रमाणे, परिवर्तन झालेला केवळ मीच होतो. हे कसे घडू शकते? मी भयंकर परिस्थितीतून आलो होतो. मी मंडळीत यायचो त्यामुळे माझी चेष्टा व मस्करी केली जायची. मला कसलेहि प्रोत्साहन मिळाले नाही. आणि तरीहि मला माझ्या ह्दयात ठाऊक होते की येशूशिवाय कोणतीच आशा नाही. मला ते कसे समजून आले? अगेन्स्ट ऑल फिअर्स, हे माझे आत्मचरित्र वाचा. मला कोणताहि आशेचा किरण नव्हता. आणि तरीहि येथे मी आहे, साठ वर्षानंतरहि, तारणाचा प्रचार करतोय! मला ठाऊक आहे की माझ्या वर्गातील कोणीहि ख्रिस्ती नाही, आणि कोणीतरी साठ वर्षे शुभवर्तमानाचा प्रचार केला असाहि कोणी खात्रीने नाही. हे कसे घडू शकते?

डॉ. कागॅन यांच्याकडे पाहा. ते नास्तिक म्हणून वाढले. त्यांना कोणीहि मदत केली नाही. त्यांची कोणी काळजी घेतली नाही. तरीहि ते माझ्या माहिती प्रमाणे सर्वात चांगले ख्रिस्ती आहेत. हे कसे घडू शकते?

मिसेस. सलाझार यांच्याकडे पाहा. मंडळीत येतात म्हणून त्यांचे पति त्यांना मारायचे. त्यांच्या मुलांनी मंडळी सोडली व देवासाठी निरुपयोगी झाले. तरीहि त्या कष्टाने चालत आहेत. आणि तरीहि त्या एक आनंदी स्त्री आहेत. मंडळीतील तरुण लोकांना मदत करण्यात आपला वेळ त्या घालवितात. हे कसे घडू शकते?

आरोन यान्कीकडे पाहा! त्याच्या कुटुंबात कोणीहि चांगले ख्रिस्ती नव्हते. तरीहि आरोन माझ्या माहिती प्रमाणे सर्वात चांगला ख्रिस्ती आहे. हे कसे घडू शकते?

मिसेस. विनी चानकडे पाहा. ती येशूकरिता नेहमी शांतपणे पडद्यामागे कार्य करीत असते. कोणत्याहि इतर मुलीपेक्षा तिने सुवार्तेकरिता अधिक नावे आणली आहेत. पुढे जाण्यास तिला कोण प्रेरणा देते? हे कसे घडू शकते?

जॉन सॅमुएल कागॅनकडे पाहा. तो मंडळीच्या मोठ्या दुफळीतून गेला आहे. त्याचे सर्व मित्र अपयशी ठरले. तरीहि जॉन कागॅन दर रविवारी सकाळी प्रचार करतोय. तरीहि जॉन कागॅन प्रचारक बनण्यास सेमीनरीमध्ये शिकायला जातो. हे कसे घडू शकते?

मिसेस. हायमर्स यांच्याकडे पाहा. मी प्रचार करतांना तिने पहिल्यांदा शुभवर्तमान ऐकले व तिचे अद्भूतरित्या तारण झाले. तिच्या सर्व मित्रांनी जगातील स्वार्थी व पापी जीवनासाठी मंडळी सोडली. परंतू मिसेस. हायमर्स ह्या देवाची एक समर्थ स्त्री म्हणून त्यातून बाहेर आल्या! हे कसे घडू शकते? ह्या लोकांचे परिवर्तन, आणि त्यांचा ख्रिस्त व मंडळीसंबंधीचा विश्वासूपणा स्पष्ट करण्यास माझ्याकडे दुसरा कोणता मार्ग नाही. निवड हे एकच उत्तर! आपला पूर्वज इयोब प्रमाणे म्हणू शकतात,

“तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन” (इयोब 13:15).

पास्टर रिचर्ड वुरंब्रॅंड हे एक महान ख्रिस्ती मला ठाऊक आहेत. टॉर्चर्ड फॉर ख्राईस्ट, हे त्यांचा चरित्र वाचा. तुम्ही ते वाचल्यानंतर, ते देवाच्या दृष्टीत बिली ग्रॅहम, पोप जॉन पॉल II, किंवा 20व्या शतकातील कोणत्याहि सेवकापेक्षा महान होते हे तुम्ही माझ्याबरोबर मान्य करावे लागेल. कमुनिस्टानी त्यांना 14 वर्षे तुरुंगात मरणप्राय यातना दिल्या, मरे पर्यंत मारले, वेडा होईस्तवर भुकेले ठेवले. तो पूर्वज इयोबाप्रमाणे म्हणू शकतो,

“तो मला ठार मारणार; तरी मी त्याची आस धरीन” (इयोब 13:15).

देवाच्या सार्वभौम दयेने त्यांना निवडले व येशू ख्रिस्ताकडे ओढले नसते तर हे कसे घडले असते? ख्रिस्ताचे वचन सत्य नसते तर हे कसे घडले असते? त्यामुळे स्वत: येशू म्हणाला,

“तुम्ही मला निवडले नाही तर, मी तुम्हांला निवडले आहे” (योहान 15:16).

“पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल.”

II. दुसरे, येशूला दिलेले अशा सर्वांचे सार्वकालिक तारण.

“पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल.”

हे सार्वकालिक सिद्ध केले आहे, आणि ते असे सिद्ध केले आहे की कोणीहि मनुष्य किंवा सैतान ते बदलू शकत नाही. तो महान ख्रिस्त विरोधक सुद्धा, ज्यांची नावे “जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोक-याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहलेली आहेत” अशा एकासहि येशूकडे येण्यापासून थांबवू शकत नाही (प्रकटी 13:8). त्यातील शेवटला प्रत्येक व्यक्ति पवित्र आत्म्याद्वारे त्याच्या समयी आकर्षिक केला जाईल, आणि तो येशूकडे येईल, आणि ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने देव त्याला सुरक्षित ठेवील, व त्याच्या मेंढराबरोबर स्वर्गात, गौरवी पर्वतावर घेऊन जाईल!

ऐका! “पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल.” जे नाश पावतील केवळ त्यांनाच पिता येशूकडे देत नाही. नाश पावणारा एक सुद्धा, “जवळजवळ सर्व” किंवा “एक नव्हे सर्व” असे उता-यात म्हणायला हवे. पण ते म्हणते, “सर्व” कोणत्याहि अपवादाविना. ख्रिस्ताच्या मुगुटातून एखादा हिरा हरविला, तर ख्रिस्ताच्या मुगुटास सर्व-महिमा नसणार. ख्रिस्ताच्या अंगाचा एक सभासद नाश पावला, तर ख्रिस्ताचे शरीर परिपूर्ण नसणार.

“पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल.” “पण समजा ते आले नाहीत.” अशाप्रकारची कोणतेहि गोष्ट मी समजत नाही. म्हणून ख्रिस्त म्हणतो ते “येतील.” देवाच्या सामर्थ्याच्या दिवशी त्यांना अनुकूल बनविल. मनुष्य जरी मुक्त प्राणी असला, तरी देव त्यांना अडकवू शकतो, स्वइच्छेने, येशूकडे येण्यासाठी. मनुष्याला कोणी बनविले? देवाने! देवाला कोणी बनविले? देवाच्या सार्वभौम सिंहासना पर्यंत मनुष्याला उंच करु काय? धनी कोण असेल, आणि ह्या मार्गाने काय? देव की मनुष्य? देवाची इच्छा, ती म्हणते, “येतील,” येण्यास कसे प्रवृत्त केले जाते ते ठाऊक आहे.

आता आपण शेकडोने कठोर मुस्लिम येशूकडे येत असल्याच्या बातम्या वाचतो. जेव्हां पासून एसावच्या वंशाचे डोळे सैतान-प्रेरित धर्माने अंध केले होते तेव्हांपासून आता अधिक मुस्लिम येशूकडे येत आहेत. “पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल.” इराण मध्येहि, चीन मध्येहि, समुद्राच्या बेटांमध्येहि, सैतानाच्या ताब्यातील तुरुंगातहि देव उपयोग करीत आहेत, याचे बरेच अर्थ आहेत. फिनीची चुकीचा सिद्धांतहि सर्वसमर्थ देवाची सार्वभौम कृपेवर मात करु शकत नाही! हा शास्त्रलेखाचा सिद्धांत होय! हाच तो सिद्धांत आहे देवाने संजीवनात वारंवार वापरलेला आहे. हिप्पींचे मादक द्रव्य व स्वैराचार सुद्धा दहा हजाराच्या पेक्षा जास्त सैतानाच्या लेकरांना येशूच्या चळवळीने देवाच्या राज्यात आणण्यापासून थांबवू शकले नाहीत! आणि तो हे पुन्हा करु शकतो! “पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल.”

पण समजा देवाने निवडलेला असा एक कठोर मनाचा झाला आहे की कांही आशाच नाही? मग काय? तो निवडलेला आहे तर तो मनुष्य देवाच्या कृपेत असेल. त्याचे अश्रू गालावरुन येतात, आणि येशूकडे येण्यास मन वळविले जाते व त्याचे तारण होते. 8 वर्षे मी माझ्या कृत्याने तारणात हरविलो होतो. देव माझी इच्छा वाकवितो, आणि येशूकडे घेऊन येतो तर, तो कोणासहि आणू शकतो! निवडलेला जीव आशेच्या बाहेर नाही, निवडलेल्या कोणास देवाकडून येशूकडे आणले जात नाही असे होत नाही, नरकाच्या दारातूनहि! देव त्याचा हात घेऊन, त्याचा हात घालून, कोलीत “अग्नीतून बाहेर काढू” तसे तो आणू शकतो (जख-या 3:2).

III. तिसरे, उता-याचा दुसरा भाग ऐका.

“पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

येथे कुठलीहि चुक नाही. चुकीचा व्यक्ति येऊ शकत नाही. एखादा पापी येशूकडे येतो तर, तो योग्य आहे की नाही याची खातरी होते. कोणीतरी म्हणेल, “मी चुकीच्या मार्गाने आलो तर.” तुम्ही चुकीच्या मार्गाने येशूकडे येऊ शकत नाही. येशू म्हणाला, “माझ्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही” (योहान 6:44, 65). तुम्ही सर्वस्वी येशूकडे येता तर, तुम्हांस आकर्षित होण्याचे सामर्थ्य पित्याकडून मिळते. तुम्ही येशूकडे आलात तर, तो तुम्हांस मुळीच घालवून देणार नाही. जे पापी त्याच्याकडे येतात त्यांना परत घालवून देण्याचे कोणतेच कारण येशूजवळ नाही. येशू म्हणतो,

“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन” (मत्तय 11:28).

हे त्याचे आमंत्रण व त्याचे अभिवचन, सुद्धा आहे.

स्पर्जन हे केवळ 27 वर्षे वयाचे होते. तरुण प्रचारकाने आपल्या उपदेशाची सांगता या शब्दाने केली:

येशू ख्रिस्ताला प्रत्येकाला जे सांगावयाचे ते हे आहे – हे शुभवर्तमानाचे आमंत्रण आहे. “या, या, येशूकडे या, जसे आहांत तसे या, तुम्ही म्हणता, “मला अधिक जाणीव होणे आवश्यक आहे.” “नाही, जसे आहांत तसे तुम्हा या.” “पण मला घरी जाऊ द्या व प्रार्थना करु द्या.” “नाही, नाही, येशूकडे जसे आहांत तसे तुम्हा या.” तुम्ही येशूवर विश्वास ठेवाल तर, तो तुमचे तारण करील. अहो, मी प्रार्थना करितो की तुम्हांला विश्वास ठेवण्याचे सामर्थ्य येवो. जर कोण हरकत घेतो, “तर तुम्हा अगदी वाईट पापी आहांत,” प्रतिउत्तर, “होय, हे खरे आहे, मी पापी आहे; पण स्वत: येशूने त्याच्याकडे येण्यास सांगितले आहे.”

अहो, पापी, दरिद्री व दुबळे तुम्ही या,
   अशक्त व घायाळ, आजारी व पिडलेले तुम्ही या;
तुम्हांला तारण्यास येशू तयार उभा आहे,
   करुणेने भरुन सामर्थ्याने जोडला गेला;
तो समर्थ आहे,
   त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा आहे,
      आता शंका नाही.
(“अहो, पापी या” जोसेफ हार्ट यांच्याद्वारा, 1712-1768).

पाप्यानों, येशूवर विश्वास ठेवा, येशूवर विश्वास ठेवण्याने तुमचा नाश झाला तर, तुमच्याबरोबर मी सुद्धा नाश पावेन. पण ते कधी होणार नाही; जे जे येशूवर विश्वास ठेवतील त्यांचा नाश कधीच होणार नाही. येशूकडे या, आणि तो तुम्हांला मुळीच घालवून देणार नाही. जास्त विचार करण्याचा प्रयत्न करु नका. केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा, आणि तुमचा कधीहि नाश होणार नाही, कारण तो तुम्हांवर प्रेम करितो.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी शास्त्रवचन वाचले: योहान 6:35-39.
   एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “कम, ये सिनर्स (जोसेफ हार्ट यांच्याद्वारा, 1712-1768).
   “Come, Ye Sinners” (by Joseph Hart, 1712-1768)


रुपरेषा

स्पर्जनच्या “सर्व ईश्वरविज्ञानाचे सार”

SPURGEON’S “SUBSTANCE OF ALL THEOLOGY”

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

I.    प्रथम, पाया ज्यावर तारण उभा असते, योहान 6:37अ; योहान 1:12, 13;
रोम 9:16; I करिंथ 4:7; रोम 3:9, 11, 12; लुक 14:18; स्तोत्र 110:3;
I योहान 4:19; इयोब 13:15; योहान 15:16.

II.   दुसरे, येशूला दिलेले अशा सर्वांचे सार्वकालिक तारण, योहान 6:37a;
प्रकटी 13:8; जख-या 3:2.

III.  तिसरे, उता-याचा दुसरा भाग ऐका, योहन 6:37b; मत्तय 11:28.