Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
मनुष्याचे पतन

THE FALL OF MAN
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
शनिवारी संध्याकाळी, 28 एप्रिल, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Saturday Evening, April 28, 2018


उत्पत्तीचे पुस्तक हे पवित्रशास्त्राची “सुपीक जमीन” आहे. उत्पत्तीच्या पुस्तकाचे सर्वात मनोरंजक वैशिष्ट म्हणजे ते पुष्कळ आधुनिक खोटेपणाचे उत्तर देते. सी. एस. लेविस, त्यांच्या आयुष्याच्या शेवटी, म्हणाले की डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत हा आधुनिक काळातील सर्वात “मुख्य खोटेपणा” आहे.

डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत उत्पत्तीच्या पुस्तकात दोन वेळा नाकारलेला आहे. प्रथम, आपणांस वारंवार सांगितले आहे की प्राणी व वनस्पती सुद्धा सरळ देवाने निर्माण केल्या आहेत. दुसरे, उत्पत्तीचे पुस्तक सांगते की सर्व वनस्पती व प्राणी हे केवळ “त्यांच्याच जातीमध्ये” पुनर्उत्पादन करु शकतात. वनस्पती व प्राणी हे केवळ त्यांच्या “जाती” मध्येच पुनर्उत्पादन करु शकतात. हे उत्क्रांती सिद्धांत नाकारते, जे सांगते की पुनर्उत्पादन हे त्यांच्याच “जाती” मध्ये होते. उत्क्रांतीचे सर्वात कमजोर म्हणणे हे आहे की एका “जाती” मधून दुस-या जातीमध्ये रुपांतर, तो एका “जातीचा” दुस-या जातीत उत्क्रांत होतो. हे सिद्ध झाले नाही. अशाप्रकारे, उत्पत्ति दर्शविते की उत्क्रांती सिद्धांताची मूळ कल्पना ही पूर्णत: खोटी आहे! एक कुत्रा कदापि घोडा बनू शकत नाही. एक गरुड कदापि कोंबडी बनू शकत नाही. एका “जातीचा” दुस-या जातीमध्ये रुपांतर नाही. उत्पत्ति दर्शविते की उत्क्रांती सिद्धांताची मूळ कल्पना ही धांदात खोटी आहे!

दुसरे, उत्पत्ति नाकारते ते खोटे हे की, मानव जाती निसर्गाने निर्माण केली. आपले पहिले आईवडील हे परिपूर्ण वातावरणात राहिले. तरीहि ते पतित झाले. आणि त्यांचा प्रथम पुत्र हा खुनी होता!

तिसरे, दुष्टतेची समस्या समजण्यास अशक्य आहे ही कल्पना उत्पत्ति नाकारते. एदेनची बाग ही दुष्ट व सैतानी कृत्यांची जागा होती. हवेला पाप करण्यास ज्या सापाने प्रलोभीत केले त्यात सैतान वसति करीत होता. “नेफिलीम” हे सहाव्या अध्यायातील दुष्टतेचे मानव पुत्र सामान्य स्त्रीयांशी संबंध ठेवतात. अशाप्रकारे दुष्टतेची “समस्या” ही खोटी आहे, आधुनिक मनुष्य जो त्याच्या संबंधीत जो सैतान व भूते यांचे वास्तव समजण्यास अपयशी ठरला.

चौथे, आधुनिक भूगर्भशास्त्राचा एकसमान सिद्धांत उत्पत्ति खोटा ठरविते. पृथ्वी वैश्विक पुराचे पुष्कळ पुरावे दाखविते. एकसमान सिद्धांत म्हणतो, “उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे” (II पेत्र 3:4). नोहाच्या काळातील महाजलप्रलय त्यांनी “जाणून बुजून दुर्लक्षित” केला आहे. ग्रँड कॅनीओन सारखा मोठा भूप्रदेश कसा तयार झाला, किंवा समुद्रात आढळणा-या प्राण्याचा अवशेष उंच पर्वतावर कसा आढळतो याचे सयुंक्तिक उत्तर आधुनिक भूगर्भशास्त्राकडे नाही. अशाप्रकारे आधुनिक भूगर्भशास्त्रातील खोटेपणा उत्पत्ति नाकारते.

पाचवे, मानवाची दुष्टता विश्वासार्हतेने स्पष्ट करता येत नाही, आणि सर्व सिद्धांत आभासी व खोटे ठरलेले आहेत, कारण कसा मूळ मनुष्य नीतिमत्वातून दुष्ट-राक्षसी प्रवृत्ती जी आपल्या आजूबाजूला ह्या आधुनिक जगात दिसतो त्यात तो पडला हे उत्पत्ति हुबेहुब दाखविते, “देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत; देवाला ओळखूनसुद्धा त्यांनी देव म्हणून त्याचे गौरव केले नाही किंवा त्याचे आभार मानले नाहीत” (रोम 1:21). अशाप्रकारे, उत्पत्तीचे पुस्तक विविध आधुनिक मानसशास्त्रीय सिद्धांत खोटे ठरविते.

आज रात्री ह्या खोटारडेपणावर विस्तृतपणे आपण लक्ष देणार आहोत. कृपया उत्पत्ति 3:1-10 काढा.

“परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता, तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याहि झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हांस सांगितले हे खरे आहे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हांला मोकळीक आहे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका; त्याला स्पर्शहि करु नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील; आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने तिचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरेबर आपल्या पतीसहि ते दिले; व त्याने ते खाल्ले. तेव्हां त्या उभयंताचे डोळे उघडले आणिआपण नग्न आहो असे त्यांस कळून आले; तेव्हां त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणांसाठी कटिवेस्टने केली. यानंतर शिळोप्याचा वारा सुटला असता, परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांस ऐकू आला, तेव्हां परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडांत लपली. तेव्हां परमेश्वर देवाने आदामास हाक मारुन म्हटले, तूं कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हां मी नग्न आहे म्हणून म्हणून भिऊन लपलो” (उत्पत्ती 3:1-10).

आर्थर डब्लू. पिंक हे एक ब्रिटीश पवित्रशास्त्राचे अभ्यासक व समालोचक होते. पिंक बरोबर म्हणाले होते की संपूर्ण देवाच्या वचनांमध्ये उत्पत्तीचा तिसरा अध्याय हा खूप महत्वाचा आहे. पिंक म्हणाले,

हा एक “पवित्रशास्त्राच्या बीज-जमीनीचा तुकडा” आहे. हाच तो पाया ज्यावर आपल्या पुष्कळ विश्वासाचा मुख्य सिद्धांत रचलेला आहे. येथे आपण दैवी विश्वासाच्या नदीचा उगम शोधून काढणार आहे. येथे एका मोठ्या नाट्याचा आरंभ होतोय जो मानवी इतिहासाच्या मंचावर चालू आहे...येथे आपणांस [मानव] जातीच्या सध्याच्या पतन व नाश पावलेल्या स्थिती संबंधी दैवी स्पष्टीकरण दिले आहे. येथे आपला शत्रू, सैतान याच्या शुक्ष्म हत्यारा संबंधी शिकतो...येथे आपल्या कृत्यांद्वारे मानवी दोष लपविण्याचा वैश्विक मानवी स्वभाव आपणांस दिसून येतो (आर्थर डब्लू. पिंक, ग्लेनिंग्ज इन जेनिसीस, मुडी प्रेस, 1981 आवृत्ती, पृष्ठ 33).

एदेन बागेत सैतान कसा शिरला, अजून न्याय-न-झालेला सर्प त्याच्यात राहतो व त्याच्या मुखाद्वारे बोलतो हे अध्याय आपणांस सांगतो. तेथे आपण पाहतो की देवाने जे सागितले त्याविषयी शंका उत्पन्न करीत, देवाने दिलेल्या वचनाचा अनर्थ करीत, सैतान स्त्रीशी बोलला की खाण्यास मनाई केलेले झाड, “बरेवाईटचे ज्ञान करुन देणा-या झाडाचे फळ”, तुम्ही खाल तर “तुम्ही खरोखर मरणार नाही.”

सैतान त्यावेळी धूर्त फसविणारा होता हे ध्यानात घेतले पाहजे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात पवित्रशास्त्र सागंते की,

“त्याच्या शेपटाने आकाशातील ता-यांपैकी एक तृतियांश तारे ओढून काढून पृथ्वीवर पाडले...” (प्रकटी 12: 4).

ह्या वचनांचा स्पष्ट अर्थ ह्या नंतरच्या कांही वचनात दिलेला आहे, प्रकटी 12:9,

“मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो ‘दियाबल’ व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दुतांस टाकण्यात आले” (प्रकटी 12:9).

डॉ. हेन्री एम मॉरिस म्हणाले की,

हा जो मोठा साप आहे तो एदेन बागेतील सर्प (उत्पत्ती 3:1)...आणि येशूची ज्याने [अरण्यात] परिक्षा घेतली तो सर्प तोच आहे (हेन्री एम. मॉरिस, पीएच.डी., द डिफेन्डर्स स्टडी बायबल, वर्ल्ड पबल्शिंग, 1995, पृष्ठ 1448; प्रकटी 12:9 वरील नोंदी).

देवा विरुद्ध बंड करणे व त्याच्या सिहांसन अपेक्षा केलेने सैतानाला खाली टाकण्यात आले (यशया 14:12-15; यहज्केल 28:13-18). सैतानाला स्वर्गातून खाली पृथ्वीवर टाकण्यात आले, जेथे तो बनला

“...अंतरिक्षातील राज्याचा अधिपति, म्हणजे आज्ञा मोडणा-या लोकांत आता कार्य करणा-या आत्म्याचा अधिपति” (इफिस 2:2).

पण सैतानाच्या बंडखोरीच्या वेळी जे देवदूत त्याच्यासह होते त्यांचे काय? प्रकटी 12:9 म्हणते,

“सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला, व त्याबरोबर त्याच्या दुतांस टाकण्यात आले” (प्रकटी 12:9).

सैतानाबरोबर किती देवदूतांनी बंड केले? त्यापैकी किती जणांना “त्याच्यासह खाली पृथ्वीवर टाकण्यात” आले? प्रकटी 12:4 म्हणते,

“त्याच्या शेपटाने आकाशातील ता-यांपैकी एक तृतियांश तारे ओढून काढून पृथ्वीवर पाडले...”(प्रकटी 12:4).

डॉ. मॉरिस म्हणाले,

प्रकटी 12:9 मध्ये ह्या “आकाशातील ता-यांना” सैतानाचे दूत म्हणून ओळखतात (मॉरिस, ibid., पृष्ठ 1447).

अशाप्रकारे, आपण विश्वास ठेवतो की सैतान ह्या त्यांच्या पुढा-यांसह एक तृतियांश दूतांनी बंड केले व त्या सर्वांना खाली पृथ्वीवर टाकण्यात आले, ज्या भूतांना येशू पृथ्वीवरील सेवेच्या काळात ब-याचदा भेटला.

सैतान ह्या देवदूतानां खोटे बोलला. यात शंका नाही की जसे एदेनच्या बागेत आदाम व हवेशी तो खोटा बोलला तसाच, जेव्हां तो म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही” (उत्पत्ति 3:5). तुम्ही माझ्या सोबत या, व तुम्ही देव बना “निश्चितपणे” असे खोटे बोलून त्यांने त्या देवदूतांचे जीवन उध्वस्त केले. त्यांना सैतानाच्या खोट्यावर विश्वास ठेवला, पण ते कांही “देव बनले नाहीत.” अरेरे, नको! ते जगात क्रोध, लालसा व राग याची गर्जना करणारा, तो भयंकर अशुद्ध भूत झाला!

जसे त्यांने देवदूतांशी खोटे बोलून, देवाविरुद्ध त्यांना भडकाविले, तसेच तो मनुष्यांशी खोटे बोलतो तेव्हां तो तसे करतो. जी कल्पना त्या देवदूतांबरोबर केली, ज्याने त्यांचा नाश झाला, तशीच कल्पना घेऊन त्यांने आदाम व हवेशी खोटे बोलला. उत्पत्ति 3:4-5 ऐका,

“सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील; आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल” (उत्पत्ति 3:4-5).

त्या देवदूतांना त्यांच्या उंच स्वर्गातील स्थानातून एक तृतियांश देवदूत असा मोठा समुदाय खाली टाकण्यासाठी सैतानाने तोच युक्तीवाद, तेच खोटे, वापरले असणार.

आणि आतो तो ते खोटे, आणि जगाचा नाश, आपले पहिले आईवडिल यांच्याकडे आणले. आणि, त्या देवदूतांप्रमाणे, एदेन बागेत आपल्या आईवडिलांनी त्याच्या खोट्यावर विश्वास ठेवला आणि ज्या देवदूतांनी “लबाडाचा बाप” यावर विश्वास ठेवून मुर्ख बनले तसे तेहि बनले, त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त परुश्यांना बोलावितांना सैतान असे बोलावितो,

“तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहां आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता, तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यांत टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हां तो स्वत:चे बोलतो; कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे” (योहान 8:44).

ह्या वचनांमध्ये येशूने सैतानाविषयी दोन महत्वाच्या गोष्यी सांगितल्या आहेत: (1) “तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि (2) तो लबाड, व त्याचा बाप आहे.”

सैतान देवदूत त्याच्याकडे येण्यासाठी त्यांच्याबरोबर खोटे बोलला. सैतानाने आदाम हवेला ज्या झाडाचे फळ खाण्यास मना केली होती ते खाण्यास जेव्हां भाग पाडले तेव्हां तो खोटे बोलला.

सैतान “प्रारंभापासून मनुष्यघातक होता.” त्याच्या खोटेपणाने जे देवदूत त्याच्याबरोबर गेले त्यांचा “घात” झाला, त्यामुळे “त्याचे दूत” स्वर्गातून खाली टाकण्यात आले, जेथे ते नरक अग्नि, जो “सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी तयार करण्यात आला” (मत्तय 25:41) त्यात निश्चित नाशाची वाट पाहातायेत. “तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता,” त्यांने त्याच्या फसवणूक व खोटेपणाने केवळ स्वर्गातील देवदूतांची “हत्या” केली नाही, तर संपूर्ण मानव जातीची हत्या केली आहे. येशू म्हणाला,

“तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता आणि तो सत्यांत टिकला नाही; कारण त्याच्यामध्ये सत्य नाही...” (योहान 8:44).

सैतानाने एक तृतियांश देवदूतांचा त्यांच्या पतनात “नाश” केला. आणि सैतानाने जीवंत देवाला नाकारायाला लावून त्यांना पापाच्या जाळीत पकडून संपूर्ण मनुष्य जातीची हत्या केली, आणि सैतानाला अनुसरुन मनुष्यास पतनात पाडून नाशात नेले, जो उत्पत्ति 3:1-10 ह्या सुरुवातीच्या आपल्या उता-यात नमुद आहे.

आदामाने पाप केले तेव्हां तो साधारण मनुष्य नव्हता. तो स्वाभाविकपणे संपूर्ण मनुष्य जातीचा प्रमुख होता, आणि संघराज्याचा सुद्धा प्रमुख होता. जशी सैतानाची बंडखोरीने स्वर्गातील एक तृतियांश देवदूतांवर थेट परिणाम झाला, तशी आदामाची बंडखोरी व पापात पतन पावण्याने इतरांवर मोठा परिणाम झाला. आदाम हा संघिय प्रमुख असल्याने संपूर्ण मनुष्य जात पतन पावली. एक जुने धार्मिक पुस्तक बरोबर म्हणाले, “आदामाच्या पतनात, आपण सर्व पापी झालो.” सैतानाच्या खोटेपणावर विश्वास ठेऊन, व मना केलेले फळ खाऊन, आदामाने त्याच्या संपूर्ण संततीत — संपूर्ण मनुष्य जातीत मरण आणले. जसे की प्रेषित पौल लिहतो,

“एका माणसाच्या [आदाम] द्वारे पाप जगांत शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले...सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले” (रोम 5:12).

आदामाच्या पापाचा परिणाम मनुष्य जातीवर भयंकर होता. पतन होण्यापूर्वी देव व मनुष्य हे सहभागितेत होते. पतनानंतर ही सहभागिता संपली. त्यांना देवापासून विभक्त करण्यात आले. पतनानंतर ते देवापासून लपण्याचा प्रयत्न करु लागले.

पतन होण्यापूर्वी मनुष्य हा निष्पाप व पवित्र होता. आदाम व हवेमध्ये पापी स्वभाव नव्हता. पतनानंतर ते पापी व लज्जास्पद झाले. प्रेषित पौल म्हणाला,

“एका माणसाच्या द्वारे पाप जगांत शिरले” (रोम 5:12).

“पाप” जगांत शिरले असे हे वचन म्हणत नाही. ते म्हणते “पाप,” एकवचनी आहे. वाईट उदाहरण ठेऊन आदामाने जगांत पाप आणले नाही. त्याच्या पापाची कृतीने त्याच्या मूळ स्वभावात बदल केला. त्याचे ह्दय भ्रष्ट झाले.

पतन होण्यापूर्वी मनुष्य जीवनाच्या झाडाचे फळ खाऊ शकला असता व अनंतकाळ जगला असता (उत्पत्ती 2:9; 3:22). पतनानंतर देहाचे मरण हे आदामाच्या पापाच्या दंडाचा भाग झाला. रोम 5:12 म्हणते,

“एका माणसाच्या [आदाम] द्वारे पाप जगांत शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले...” (रोम 5:12).

हे आध्यात्मिक व दैहिक अशा दोन्ही संबंधी संदर्भित करते. आदामाच्या पापानंतर, देव म्हणाला,

“...तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील” (उत्पत्ति 3:19).

अशाप्रकारे, आदामाच्या पापाचा परिणाम हा आध्यात्मिक व दैहिक मरणात झाला.

आदामाच्या पापाचा परिणाम असा की, मनुष्यांत पाप वैश्विक झाले. आदामाच्या द्वारे, मनुष्य जातीचा संघिय प्रमुख म्हणून, सध्या सर्व मनुष्य जात पापात जन्मते. पवित्रशास्त्र म्हणते,

“एका माणसाच्या [आदाम] द्वारे पाप जगांत शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले” (रोम 5:12).

पतित मानवाचा पापी-स्वभाव हा संपूर्ण पवित्रशास्त्रात दिला आहे.

“कारण पाप करीत नाही असा कोणीच नाही” (I राजे 8:46).

“सदाचाराने वागणारा व पाप न करणारा असा धार्मिक पुरुष पृथ्वीवर आढणार नाही” (उपदेशक 7:20).

“नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही; समंजस कोणी नाही; देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही; सर्व बहकले आहेत, ते सारे निरोपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा असा कोणी नाही, एकहि नाही” (रोम 3:10-12).

“प्रत्येक तोंड बंद व्हावे व अवघे जग देवासमोर शिक्षेस पात्र ठरावे” (रोम 3: 19).

“आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, तर आपण स्वत: फसवितो, व आपल्या ठायी सत्य नाही” (I योहान 1:8).

आदामाचे पाप हे त्याच्या सर्व पीढ्यांवर आले, त्यामुळे ते, संपूर्ण मानव जातीवर आले. कारण मनुष्यजातीची अवयवासंबंधीच्या एकतेमुळे, देवाने लगेचच आदामाचे पाप त्याच्या सर्व वंशजांवर लादले. अशाप्रकारे, सर्व मनुष्य जातीचा स्वभाव हा आदामाच्या पतनानंतर त्याचा जसा भ्रष्ट झाला तसा आहे. रोम 5:12 प्रमाणे मरण (आध्यात्मिक व दैहिक दोन्ही) हे मनुष्य जातीत आले, कारण त्यांचा स्वाभाविक प्रमुख, आदामामध्ये सर्वांनी पाप केले आहे.

मनुष्य जातीची “संपूर्ण भ्रष्टता” म्हणजे काय ते हे होय. म्हणजेच मनुष्याच्या स्वाभाविक भ्रष्ट स्थितीत त्याचे देवावर खरे प्रेम नसते. म्हणजेच तो देवापेक्षा स्वत:ला महत्व देतो, म्हणजे तो निर्माणकर्त्यापेक्षा स्वत:वर अधिक प्रेम करितो. संपूर्ण भ्रष्टता याचा अजूनहि एक अर्थ सा की प्रत्येक मनुष्य त्याच्या स्वाभाविक भ्रष्ट स्थितीत त्याला देव आवडत नाही, त्याच्याबद्दल तिटकारा किंवा वीट असतो, आणि त्याच्याविरुद्ध उभा राहतो.

“कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे” (रोम 8:7).

“दैहिक मन” हे “मनुष्य नव्याने जन्मला नाही,” तो पुन्हां जन्मला नाही संदर्भित करते (द जेनेवा बायबल, 1599, रोम 8:7 वरील नोंदी).

अशाप्रकारे, उत्पत्ति तिस-या अध्यायातील, आदामाचे पतन, याचा थेट परिणाम तुमच्यावर होतो. तुम्ही मंडळीत उभे असला किंवा नाही, तुम्हांला तो स्वभाव मिळाला आहे ज्यामुळे तुम्हांला देव व ख्रिस्त आवडत नाही, ते तुमचा पूर्वज आदाम याच्याकडून तुमच्याकडे आला आहे. तुम्हांस वारश्याने मिळालेली भ्रष्टता त्याविरुद्ध तुम्ही विचार, शिकणे किवा कांही कृति करणे तुम्हांस जमत नाही. त्यामुळे, तारण हे “बाह्य” स्त्रोताने मिळते, जो स्त्रोत जो संपूर्णत: बाहेरचा असतो. आणि तो स्त्रोत हा स्वत: देव आहे. तुमच्या आतील भ्रष्टतेसंबंधी देवाने तुम्हांला जागृत करायला हवे. तारणासंबंधीच्या तुमच्या खोट्या कल्पना देवाने काढून टाकल्या पाहिजेत. शुद्धता व तुमच्यात एक नवीन मनुष्याची निर्मिती करण्यास असा दोन्हा करण्यास देवाने तुम्हांस ख्रिस्ताकडे आणले पाहिजे. कारण आदामाच्या पापापासून, दुसरे कोणी नाही, केवळ ख्रिस्त “शेवटचा आदाम,” तुम्हांस तारु शकतो. ख्रिस्ताच्या द्वारे, कृपेने तारण ते हेच होय. त्यामुळेच आम्हा विश्वास ठेवतो व प्रचार करितो.

आदामाच्या पतनापूर्वी, त्याचा देवाबरोबर परिपूर्ण नातेसंबंध होता. मित्राप्रमाणे तो देवाबरोबर चालत असे. पण पाप केल्यानंतर, आदाम व त्याची पत्नी हवा देवापासून बागेच्या झुडपात लपले.

तुम्ही आदामाचे मुल आहांत. त्यामुळे देव चुकीचा आहे असा तुम्ही विचार करताय! त्याच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी, जसे तुमचा पूर्वज आदामाने केले, तसे तुम्ही त्याच्याविरुद्ध बंड करता, आणि त्याच्यापासून लपता. त्यामुळे तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करता तेव्हां एका मागून एक चुक करता. त्यामुळे तुमचे मन एका वर्तुळात जाते – पुन्हा अन् पुन्हा, अन् पुन्हा, अनंत त्याच चुका करता.

एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याची साक्ष

माझ्याकडे एकापेक्षा एक खोटे परिवर्तन आहे. मला वाटते मला परिवर्तनाची भावना यायला हवी. खोट्या परिवर्तनामुळे मला भयंकर भोगावे लागले.

मी समुपदेशनासाठी आलो तेव्हां, मी कांहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होतो. उपदेशात काय सांगितले ते आठवण्याचा प्रयत्न करीत होतो, म्हणून मी त्यातील कांही सांगू शकतलो. पण माझ्या शब्दात कांही अर्थ नव्हता. मी दुस-या कोणाची तरी साक्ष तशीच सांगत होतो. किती हा मुर्खपणा!

मी एकांतात प्रार्थना करीत होतो व माझ्या पापाविषयी विचार करीत होतो. मग शुभवर्तमानाचा प्रचार माझ्यासाटी स्पष्ट झाला. कुठलीच आशा नसलेला मी कष्टी पापी असा मी येशूकडे आलो – पण माझी आशा ही येशू ख्रिस्तात होती. येशूकडे येणे व त्याच्या रक्ताने माझे पाप धुतले जाणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मी त्याच्या रक्तावर विश्वास ठेवला.

एका महाविद्यालयीन वयाच्या – स्त्रीची साक्ष

सैतान मला सतत सांगत होता की, “ही माणसे चुकीची आहेत. तूं ज्या मार्गात आहेस तो बरोबर आहे. तुला येशूची गरज नाही.” मी मी मंडळीत आलो आणि मला कळाले की मी चुकीचा आहे. मी रडू लागलो व रडे थांबवू शकेना. डॉ. कागॅननी मला विचारले, “तूं ख्रिस्ताकडे येतोस काय?” मी उत्तर दिले, “होय, मी त्याच्याकडे येतो. मी त्याच्याकडे येतो.” त्यादिवशी मी स्वत:ला येशूला देऊन टाकले. मी स्वत:ला येशूला पूर्णत: समर्पित केले. येशू ख्रिस्ताने मला कवटाळले आणि त्याच्या रक्ताने माझी पातके धुऊन गेली.

एका महाविद्यालयीन तरुण माणसाची साक्ष

माझे ह्दय कपटी, बंडखोर, दुष्टतेने भरलेले, आणि देवाविरुद्ध वागणारे होते हे सांगणे मी थांबवू शकलो नाही. मी चांगला व्यक्ति आहे हे सांगून अधिक काळ मी स्वत:ला फसवू शकत नाही. मी चांगला नव्हतो व माझ्यात कांहीच चांगले नव्हते. मला माहित आहे मी त्यावेळी मेलो असतो तर थेट मी नरकात गेलो असतो. मला नरकाच्या शिक्षेस पात्र होतो. मी पापी होतो. मी लोकांपासून माझी पातके लपवू शकेन असे मला वाटे. पण मी ते देवापासून लपवू शकतो नाही. देवाने माझी सर्व पातके पाहिली. आदामाने फळ खाल्ल्यावर जसे तो देवापासून लपला तसे मीहि देवापासून लपण्याचा प्रयत्न करु लागलो. मला अगदी आशाहीन वाटत होते. माझ्यासारख्या दुष्ट पाप्यास माझी सत्कर्मे वाचवू शकली नाहीत. केवळ ख्रिस्ताने मला तारले. त्याच्या रक्ताने मला झाकले व माझी सर्व पापें धुऊन शुद्ध केलीत. त्याच्या नीतिमत्वाची वस्त्रें त्यांने मला घातली. माझे पापी ह्दय त्याच्या रक्ताने शुद्ध केले. माजा विश्वास व खातरी ही केवळ ख्रिस्तावर आहे. मी पापी होतो – पण येशूने मला तारले.

एका महाविद्यालयीन वयाच्या मुलीची साक्ष

मी मंडळीत गेलो व माझे ह्दय जड जाले होते. मी पापी आहे असे मला वाटले. माझे ह्दय कपटी, बंडखोर, दुष्टतेने भरलेले, आणि देवाविरुद्ध वागणारे होते हे सांगणे मी थांबवू शकलो नाही. मग, उपदेश संपत आला होता, मी शुभवर्तमान पहिल्यांदा ऐकले. यापूर्वी मला त्याचा कांहीच अर्थ नव्हता. माझ्या पापाचा दंड भरण्यासाठी, ख्रिस्त वधस्तंभावर माझ्याबदली मेला. ख्रिस्त वधस्तंभावर माझ्यासाठी मेला! त्याचे रक्त माझ्यासाठी सांडले! मला येशूची खूप गरज होती. माझ्या भुवया उंचाविल्या. मी पहिल्यांदा ख्रिस्ताकडे पाहिले, आणि त्याक्षणी मला ख्रिस्ताने तारण दिले! “अद्भूत कृपा! माझ्यासारख्या पापाचे तारण केले, किती तो चांगला आवाज! पूर्वी मी हरविलेला होतो, पण आता मी सापडलो आहे, मी अंध होतो पण आता पाहू शकतो!” हे जॉन न्यूटन म्हणाले ते मला आता कळाले. मी पापी होतो, आणि माझ्या पापातून मला येशू ख्रिस्ताने वाचविले.

मी येशूला पाहू किंवा अनुभवू शकत नव्हतो. मला दैवी धार्मिक अनुभव नव्हता. मी फक्त येशूवर विश्वास ठेवला. ज्या क्षणी मी येशूवर विश्वास ठेवला, त्या क्षणी त्यांने त्याच्या रक्ताने माझी पापे धुऊन शुद्ध केलीत.

मी माझ्या तारकाचे ऐकू शकतो, मी माझ्या तारकाचे ऐकू शकतो,
मी माझ्या तारकाचे ऐकू शकतो, मी त्याच्याबरोबर जाईन, दूर त्याच्याबरोबर जाईन!
(“व्हेअर ही लीड्स मी” अर्नेस्ट डब्लू. ब्लॅँडी, 1890).

मी येत आहे, आता तुझ्याकडे येत आहे;
मला धू, कालवरीवर वाहिलेल्या रक्ताने मला शुद्ध कर.
(“आय एम कमिंग,प्रभू” ल्युईस हार्टसोग यांच्या द्वारा, 1828-1919).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “आय एम कमिंग, प्रभू”
(लेविस हार्टसोग यांच्याद्वारा, 1828-1919).
“I Am Coming, Lord” (by Lewis Hartsough, 1828-1919).