Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




केवळ ख्रिस्तामध्ये!

IN CHRIST ALONE! (Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 22 एप्रिल, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, April 22, 2018

“चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्यांने आम्हांस फाडिले आहे; व तोच आम्हांस बरे करील; त्यांने आम्हांस जखम केली आहे, व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिस-या दिवशी तो आम्हांस उठवून उभे करील; आणि त्याजसमोर आम्ही जिवंत राहू” (होशेय 6:1, 2).


ह्या वचनांचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. हे परमेश्वराचे इस्त्राएलासाठी शेवटचे पाचारण होते. लवकरच ते अश्शूर व त्यानंतर बाबेलोनच्या बंदिवासात जाणार होते. त्यानंतर तेथे त्यांना मारहाण व फाडले गेल्यावर ते म्हणतील, “चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ.”

होय, भविष्यवाणी पूर्ण झाली, आणि ते बाबेलोनच्या बंदिवासात गेले. भविष्यवाणी भविष्यासंबंधी बोलते. भविष्यात परमेश्वर त्यांना बरे करणार. “तो आम्हांस उठवून उभे करील; आणि त्याजसमोर आम्ही जिवंत राहू.” त्या दिवसांत परमेश्वराने इस्त्राएलास त्यांच्या भूमीत परत आणण्याचे व वाचविण्याचे अभिवचन दिले आहे. परमेश्वराने ती भविष्यवाणी पूर्णत्वाची सुरुवात आमच्या काळात केली आहे. 1948 साली इस्त्राएल हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. त्यावेळेस पासून यहुदी लोक त्यांने देवाने-दिलेल्या मायभूमीत परतू लागले आहेत. लवकरच ते त्याच्या दृष्टीसमोर राहतील, “ह्या रितीने सर्व इस्त्राएल लोकांचे तारण होईल” (रोम 11:26). हाच ह्या वचनांचा अर्थ आहे.

पण त्यात आणखी कांहीतरी आहे. कोणीतरी म्हणाले, “त्याचा एक अर्थ असला तरी त्याचे पुष्कळ उपयोग आहेत.” ह्या वचनांचे हे दोन उपयोग आहेत ते पाहा.

I. प्रथम, हा उतारा ख्रिस्ती लोकांकरिता लागू होतो.

हा उतारा ख्रिस्तीजणांच्या लागूकरणासंबंधी बोलतो. अगदी थोडके ख्रिस्ती कोणत्याहि खंडाविना परमेश्वराचे अनुकरण करतात. ते त्यांच्या ख्रिस्ती जीवनांत स्थिर असतात. पण काळ जसा जातोय पुष्कळजण थंड थंड होतायेत. त्यामुळे देव समस्या व दु:ख आपणांत पाठवितो. तो समस्या व दु:खाने आपणांस फाडू व जखमी करु देतो. परमेश्वर तुमचे शांतीचे मन काढून घेतो. परमेश्वर तुम्हांस दु:खी व जड-अंत:करणाचे बनण्यास भाग पाडतो. आज रात्रौ तुम्ही येथे मंडळीत बसला असला तरी. परमेश्वर तुमच्या बाबतीत असे का घडू देतो? हे अशासाठी की तुमच्यासाठी त्याने नवीन कांहीतरी करावे. कदाचित हे अशासाठी की तुम्ही जावे व मला पुढच्या वर्षी एक नवीन मंडळी उभारण्यास मदत करावी यासाठी तुमची परमेश्वर तयारी करीत आहे. किंवा तुम्ही ह्या मंडळीत दुसरी कांहीतरी जबाबदारी स्विकारण्यास तुमची तो तयारी करीत आहे. मानव म्हणून, आम्ही बदलू इच्छित नाही. त्यामुळे जोवर आम्ही वेगळी जबाबदारी स्विकारण्यास तयार होत नाही तोवर परमेश्वर आम्हांला फाडतो व फटके मारतो. त्याच्या राज्यासाठी अधिक उपयोगी पडावे म्हणून आपण ज्याकांही मुर्ति मनांत पकडून ठेवल्या त्या तो फाडतो. डॉ. टोझर म्हणाले, “मोठे दु:ख दिल्याशिवाय देव एखाद्या व्यक्तीला मोठा आशिर्वाद देतो याची मला शंका आहे.” तुमचे परिवर्तन झाले आहे तर, देव तुमचा नाश करणार नाही. पण तो तुम्हांला हादरवतो आहे. कदाचित तो तुमचा संजीवनात उपयोग करु इच्छितो!

“तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिस-या दिवशी तो आम्हांस
उठवून उभे करील; आणि त्याजसमोर आम्ही जिवंत राहू.”

माझा विश्वास आहे की नवीन मंडळी सुरु करण्याने तुम्हांस भक्कम ख्रिस्ती होण्यास मदत होईल. मुले बाल्यावस्थेतून पौंगाडावस्थेत जातांना त्यांच्या हाता पायात ब-याचदा वेदना जाणवतात. त्यांना ते “वृद्धीच्या वेदना” म्हणतात. घाबरवून जाऊ नका. दोन दिवसांने तो तुमचे पुनरुज्जीवन करील व तो तुम्हांस अधिक विश्वास व अधिक जीवन देईल! जो कांही तो फाडेल, ते तो त्याच्या प्रिय पुत्राच्या द्वारे अधिक भरपाई करुन देईल! “अद्भूत कृपा” हे जॉन न्यूटन यांनी लिहले. त्यांनी त्यांची कविता सुद्धा लिहली.

मी वाढावे म्हणून मी परमेश्वराला विचारले
विश्वासात, व प्रेमात आणि सर्वप्रकारच्या कृपेत;
त्याचे तारण अधिक जाणून घ्यावे,
व त्याच्या मुख दर्शनाचा, अधिक प्रामाणिकपणे, शोध घ्यावा.

अशाप्रकारे त्यांने मला प्रार्थना करण्यास शिकविली,
व तो, प्रार्थनेचे उत्तर देतो, माझा विश्वास आहे!
पण ते मला अशाप्रकारे,
निराशेत जवळजवळ लोटते.

मला आशा हे की कांही काळ कृपा,
व माझ्या प्रार्थनेचे तो उत्तर देईल;
मल आणि त्याच्या प्रीतीच्या सामर्थ्याने बांधतो,
तो माझे पाप घेतो, व मला विसावा देतो.

ह्या ऐवजी, तो माझ्या अंत:करणात
लपलेला सैतान जाणवून देतो;
आणि नरक क्रोधीत सामर्थ्याने प्रत्येक
अंगातील माझ्या जीवावर हल्ला करतो.

त्यानंतर तो देव काय म्हणतो ते सांगतो,

ह्या आंतरिक कसोटीचे मी सामना केल्याने,
स्वत:चा स्वार्थ, व गर्व यातून मुक्त होतो;
आणि जगातील आनंदाची त्याची योजना संपते,
यासाठी की तुला माझ्यात त्याचे सर्वकांही मिळावे.”
   (“आय आस्क्ड द लॉर्ड दॅट आय माईट ग्रो” जॉन न्यूटन यांच्याद्वारा, 1725-1807).

II. दुसरे, हा उतारा परिवर्तन न झालेल्या लोकांकरिता लागू होतो.

ह्या संध्याकाळी तुम्हांस हा दुसरा उपयोग देण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, तुमचे अजून परिवर्तन झाले नसल्यास हा उतारा तुमच्याशी कसा बोलतो हे दाखविणे! परमेश्वर तुम्हांस म्हणतो,

“चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्यांने आम्हांस फाडिले आहे; व
तोच आम्हांस बरे करील; त्यांने आम्हांस जखम केली आहे, व तोच पट्टी बांधील.
तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिस-या दिवशी तो आम्हांस
उठवून उभे करील; आणि त्याजसमोर आम्ही जिवंत राहू” (होशेय 6:1, 2).

परिवर्तन वेदनादायी आहे. हे वेदनादायी आहे कारण तुम्हांला परिवर्तित व्हायचे नसते. तुम्ही म्हणता तुम्हांला परिवर्तित व्हायचे नसते — पण हे खरे नाही. तुम्ही विचार करता की तुम्हांला परिवर्तित व्हायचेय — पण ते सुद्धा खरे नाही! पवित्रशास्त्र म्हणते, “देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही” (रोम 3:11). मग कांही लोक ख्रिस्ताला शोधण्याचा का प्रयत्न करतात? उत्तर योहान 16:8 मध्ये आहे, जे आम्हांला सांगते की पवित्र आत्मा “पापाविषयी जगाची खातरी करील.” खातरी शब्द ग्रीक मध्ये “एलेंगखो” — “दोषी ठरविणे,” “दोष दाखविणे,” “दोष देणे,” “खात्री करणे.”

तुम्ही हरविलेले पापी आहांत असे सांगितल्यावर कोणालाहि आनंद होत नाही. पण सुवार्तिक प्रचारात हे सांगणे आवश्यक आहे. तुमचे अजूनहि परिवर्तन झाले नाही कारण तुम्हांला तुमच्या पापाची जाणीव झाली नाही. त्यामुळे देवाने पवित्र आत्मा खाली पाठवून द्यावा, व पापात हरविलेल्या माणसांची अंत:करणे फाटावीत, व जखमी व्हावीत, आणि पापाची खातरी व्हावी, दोष दिसावेत, आणि त्यांच्या स्वार्थीपणाबद्दल खातरी व्हावी, व त्यांचा देवाविरुद्ध असलेला बंडखोरपणा त्यांना कळावा म्हणून, अधिक प्रार्थना करण्याची गरज आहे. तुमच्या अंत:करणात बंडखोरपणा व पाप भरलेले असतांना तुम्ही शेवटल्या न्यायाच्या दिवशी देवासमोर कसे उभे राहू शकता? तुम्ही अशाप्रकारचा उपदेश ऐकता व मग वरच्या मजल्यावर जाऊन रात्रभोज करता व मित्रांबरोबर हसता हे कसे करु शकता? रोज एकहि उपदेश न वाचता किंवा एखादा व्हिडोओ न पाहता संपूर्ण आठवडा कसा घालवू शकता? तुम्ही देवाला भ्यायले हवे, ख-या देवाला, जो देव तुमच्या थंड विचार व कठीण ह्दयासाठी तुम्हांला दोषी ठरवितो व क्रोधीत होतो!!! हे गंभीर आहे! संपूर्ण जगात यापेक्षा कांहीच गंभीर नाही. नरकातील अग्नि तुमची वाट पाहतेय, आणि तुम्ही उपदेश संपल्या संपल्या तुमच्या मित्रावर हसता! अशाप्रकारे तुम्हांमध्ये कसलीच आशा नाही!

जॉन कागॅनचे ऐका, “परिवर्तना पूर्वी मला मेल्यासारखे वाटले होते. मी झोपलो नव्हतो. मी हसू शकत नव्हतो. मला कसलीहि शांति मिळाली नाही...पीडेची भावना थांबवू शकलो नाही. मी अगदी पिळून गेलो होतो. मी दमून गेलो होतो. मी स्वत:चा तिरस्कार, माझ्या पापाचा तिरस्कार करु लागलो आणि त्यामुळे मला...माझे पाप अनंतकाळासाठी भयंकर झाल्यासारखे वाटले. मला त्याचे ओझे पेलवेना. मला ठाऊक आहे की मला नरकाची शिक्षा देण्यास देव न्यायी आहे. संघर्ष करुन मी थकलो होतो. माझ्याकडे जे कांही होते त्यामुळे मी थकलो होतो...माझ्याकडे अजून येशू नव्हता...मी वाचण्याचा ‘प्रयत्न करीत’ होतो. मी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याचा ‘प्रयत्न करीत’ होतो व शक्य होत नव्हते. मी ख्रिस्ती होण्याचा निर्णय घेऊ शकत नव्हतो, आणि त्यामुळे मी आशाहीन झालो होतो.

ह्या ऐवजी, तो माझ्या अंत:करणात
लपलेला सैतान जाणवून देतो;
आणि नरक क्रोधीत सामर्थ्याने प्रत्येक
अंगातील माझ्या जीवावर हल्ला करतो.

मला नरकात ढकल्यावर माझ्या पापाची जाणीव होऊ शकली, अजूनहि माझे अश्रू दूर लोटतांना माझा कठोरपणा जाणवत होता...मी सर्व कांही मरण्यास द्यायला हवे होते!”

जॉनविषयी हे कसे घडले? योग्य शब्द शिकल्यामुळे नव्हे! अरे देवा, नाही! शब्द त्याला कधी मदत करु शकले नाहीत! “भावने” मुळे नाही. अरे देवा, नाही! भावना त्याला मदत करु शकली नाही.

परमेश्वराने “त्याला फाडले. त्यांने त्याला जखमी केले!” त्यांने
जॉनचे अंत:करण भग्न केले! त्याने जॉनला मारुन खाली पाडले!

खरे परिवर्तन वेदनादायी आहे! तुम्ही सर्वसमर्थ देवाशी लढता! तुम्ही स्वत:ला फसवू शकत नाही. त्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही! त्याशिवाय तुम्ही कांही शिकू शकत नाही!!!

ह्या आंतरिक कसोटीचे मी सामना केल्याने,
स्वत:चा स्वार्थ, व गर्व यातून मुक्त होतो;
आणि जगातील आनंदाची त्याची योजना संपते,
यासाठी की तुला माझ्यात त्याचे सर्वकांही मिळावे.”

“पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरीत पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत” (स्तोत्र 2:12).

एमी झबलगाचे ऐका, “माझ्या पापासंबंधाने मी स्वत:च्या-दयेत गुरफटलेलो होतो...तुमच्या अंत:करणाचा काळेपणा व अशिष्टता जे कांही पाहात होतो ते मी वर्णू शकत नाही. देवाने जे पाहिले ते माहित झाल्यामुळे मला अगदी घृणास्पद व लज्जित झाल्यासारखे वाटत होते. सर्वकांही-पाहणा-या देवासमोर मी शुद्रासारखा झालो होतो. मंडळीत जे कांही मी केले ते म्हणजे मी स्वार्थी पापांत अधिक मुळावलो. शुद्ध ख्रिस्तीजणांमध्ये मला अगदी ओंगळ कुष्टरोग्यासारखे वाटत होते. तरीहि मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही. येशू हा एक शब्द होता...जो खूप दूर होता...मला चांगले वाटण्याची... ज्याने माझे तारण झाले हे सिद्ध होण्यास अशा कांही अनुभवाची वाट पाहात होतो...सर्वसमर्थ देवाशी खेळणा-या पाप्यांचा डॉ. हायमर्सनी भयंकर तिटकारा केला. भीतीने थरथर कापत, मी माझ्या जागेवर बसलो. मला ठाऊक होते तो ते मी होतो. डॉ. हायमर्स ह्या उता-यातून बोलले,

‘चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्यांने आम्हांस फाडिले आहे; व तोच आम्हांस बरे करील; त्यांने आम्हांस जखम केली आहे, व तोच पट्टी बांधील...तिस-या दिवशी तो आम्हांस उठवून उभे करील; आणि त्याजसमोर आम्ही जिवंत राहू’ (होशेय 6:1, 2).”

एमी म्हणाली, “अगाध तळाच्या समुद्रासारखे माझे पाप लांबले. मी अधिक सहन करु शकत नव्हतो. मला येशू पाहिजेच होता. मला त्याचे रक्त पाहिजेच होते.”

परमेश्वराने “तिला फाडले. त्यांने तिला जखमी केले!” त्यांने
एमीचे अंत:करण भग्न केले! त्याने एमीला मारुन खाली पाडले!

खरे परिवर्तन वेदनादायी आहे! तुम्ही सर्वसमर्थ देवाशी लढता! तुम्ही स्वत:ला फसवू शकत नाही. त्याशिवाय तुम्ही बोलू शकत नाही! त्याशिवाय तुम्ही कांही हसू शकत नाही!!!

तुम्हांला ह्या सर्वांचा तिटकारा आला नाही का? तुम्ही घाबरत नाही का? तुम्हांला धार्मिक मानेचा कंटाळा आला नाही का? अरे देवा, त्या अग्निपासून त्यांना वाचव!

“पुत्राने रागावू नये आणि तुम्ही वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या; कारण त्याचा क्रोध त्वरीत पेटेल; त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत” (स्तोत्र 2:12).

तुम्हांस देवाने फाडले काय? त्याच्या हाताने तुम्हांस जखमी केले काय? देवाने तुमच्यावर प्रेम केले नाही ह्यामुळे तुम्हांला दु:ख व वेदना झाल्या काय? त्याविषयी तुम्ही कोणालाहि सांगू शकला नाही ह्याच्या तुम्हांला वेदना झाल्या काय? गेथशेमाने बागेत ख्रिस्ताला जसे वाटले तसे तुम्हांला एकाकी व देवाने त्याग केलेची भावना झाली काय? “देवाने माझ्या त्याग का केला” — असे तुम्ही स्वत:शीच म्हटले काय? सैतान पुटपुटतो, “का पुढे गेला नाही? तुमची कोणास फिकीर नाही. तुमच्यावर कोणी प्रेम करीत नाही.” मी तुम्हांला विनंती करतो, “तुम्ही सैतानाचे ऐकू नका!”

ऐकण्यास मीच योग्य व्यक्ति आहे. अशाप्रकारच्या जाचातून किमान सहावेळा गेलो आहे. परिवर्तन होण्यापूर्वी, आणि तर पाचवेळा.

“कारण त्यांने आम्हांस फाडिले आहे; व तोच आम्हांस बरे करील; त्यांने आम्हांस
जखम केली आहे, व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन
करील; तिस-या दिवशी तो आम्हांस उठवून उभे करील; आणि त्याजसमोर आम्ही
जिवंत राहू” (होशेय 6:1, 2).

प्रत्येकवेळी मी अशाप्रकारच्या जाचातून गेलो आहे, देवासाठी अधिक करण्यासाठी ती तयारी होती. प्रत्येकवेळी त्या वेदना इतक्या मोठ्या होत्या की त्या अधिक होऊ नयेत असे वाटायचे. आणि येशू मला म्हणाला,

ह्या आंतरिक कसोटीचे मी सामना केल्याने,
स्वत:चा स्वार्थ, व गर्व यातून मुक्त होतो;
आणि जगातील आनंदाची त्याची योजना संपते,
यासाठी की तुला माझ्यात त्याचे सर्वकांही मिळावे.”

पहिल्यांदा माझे परिवर्तन झाले तेव्हां. अगदी नुकतेच मला जेव्हां कर्करेगाचा त्रास झाला तेव्हा. ते म्हणाले, “तुम्हांला कर्करोग झाला आहे.” त्यांनी संपूर्ण औषधोपचार केला. अरण्यातील एकाकी झालेल्या मोशेसारखे मला वाटले. त्या मध्यरात्री, मला पुन्हां पुन्हां रडू आले! मला वाटले मी संपलो. मी फाटलो. मला माहित आहे तुम्हांला काय वाटते. प्रत्येक वेळी मी जीवाच्या अंधा-या रात्रीतून गेलो आहे, नवीन कशासाठी तरी देव माझी तयारी करीत होता. ह्या वेळेस तो मला नवीन मंडळी सुरु करण्यास तयार करीत होता.

प्रिय मित्रहो, देवाने तुम्हांला सोडले नाही. होय, तो तुम्हांला फाडतो — पण तुम्हांला बरेहि करतो! होय, तो तुम्हांला जखमी करतो — पण तो तुम्हांला पट्टीहि बांधतो! एका विशेष उद्देशासाठी तो तुम्हांला जखमी करतो व फाडतो — केवळ ख्रिस्तच तुम्हांला आशा देतो हे तुम्हांला समजाविण्यासाठी! केवळ ख्रिस्तामध्येच तुम्हांला शांति मिळते हे तुम्हांला समजाविण्यासाठी! केवळ ख्रिस्तामध्येच तुम्हांला आनंद मिळतो हे तुम्हांला समजाविण्यासाठी! तो तुमच्या पापाचा मोबदला देण्यास मरण पावला हे तुम्हांला समजाविण्यासाठी! तो तुम्हांला नवीन जीवन देण्यास मरणातून पुन्हां उठला हे तुम्हांला समजाविण्यासाठी!

केवळ ख्रिस्तात मला माझी आशा मिळते; तो माझा प्रकाश, माझे सामर्थ्य, माझे गीत आहे;
   हा पायाचा दगड, ही भक्कम जमीन, जी भयंकर अशा दुष्काळ व वादळात अचल राहते.
प्रीतीची केवढी ती उंची, शांतीची केवढी ती खोली, जेव्हां भीति थांबते, जेव्हां प्रयत्न संपतात!
   माझा सांत्वनकर्ता, माझे सर्वकर्ता — येथे मी ख्रिस्ताच्या प्रीतीत उभा राहतो.

केवळ ख्रिस्तात, ज्याने देह धारण केला, त्या असाहाय्य बालकामध्ये देवाचे पूर्णत्व झाले!
   हे प्रीती व नीतिमत्वाचे दान, ज्याचा तिरस्कार झाला जो तारावयास आला त्याद्वारे.
येशूने वधस्तंभावरचे मरण पत्करलेने, देवाचा क्रोध शांत झाला होता;
   प्रत्येक पाप जे त्याच्यावर लादले होते — येथे मी ख्रिस्ताच्या प्रीतीत उभा राहतो.

त्या तेथे त्याचा देह जमीनीवर पडला आहे, जगाचा प्रकाश अंधकाराने ग्रासला;
   मग गौरवाच्या दिवसांत तो बाहेर आला, कबरेतून तो पुन्हां बाहेर आला!
आणि तो विजयात उभा असलेने, पापाच्या शापाची माझ्यावरील पकड नाहीशी झाली;
   कारण मी त्याचा व तो माझा आहे — ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने मला विकत घेतले.
(“इन ख्राईस्ट अलोन” किथ गेट्टी व स्टुअर्ट टाऊनएंड यांच्याद्वारा, 2001).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “इन ख्राईस्ट अलोन”
(किथ गेट्टी व स्टुअर्ट टाऊनएंड यांच्याद्वारा, 2001).
“In Christ Alone” (by Keith Getty and Stuart Townend, 2001).


रुपरेषा

केवळ ख्रिस्तामध्ये!

IN CHRIST ALONE!

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“चला आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्यांने आम्हांस फाडिले आहे; व तोच आम्हांस बरे करील; त्यांने आम्हांस जखम केली आहे, व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिस-या दिवशी तो आम्हांस उठवून उभे करील; आणि त्याजसमोर आम्ही जिवंत राहू” (होशेय 6:1, 2).

(रोम 11:26)

I.   प्रथम, हा उतारा ख्रिस्ती लोकांकरिता लागू होतो.

II.  दुसरे, हा उतारा परिवर्तन न झालेल्या लोकांकरिता लागू होतो,
रोम 3:11; योहान 16:8; स्तोत्र 2:12.