Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
जितक्यांनी त्याचा स्विकार केला!

AS MANY AS RECEIVED HIM!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 15 एप्रिल, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, April 15, 2018

“जे त्याचे स्वत:चे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्विकार केला नाही, परंतू जितक्यांनी त्याचा स्विकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणा-यांना त्यांने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही” (योहान 1:11-13).


येशू यरुशलेममध्ये होता. तो वल्हांडण सणाचा काळ होता. येशूला चमत्कार करतांना पुष्कळ लोकांनी पाहिले होते. त्यांनी ते चमत्कार पाहून त्याच्यावर विश्वास ठेवला. परंतू त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी चमत्कारावर विश्वास ठेवला पण त्याच्यावर ठेवला नाही. त्यामुळे त्यांचा विश्वास हा अर्थहीन होता. ते मला आजच्या पुष्कळ लोकांची आठवण करुन देते. त्यांचा विश्वास हा चमत्कार केंद्रीत आहे. त्याचा खरा अर्थ “चिन्हें” आहे. ते नेहमी चिन्हें व चमत्कार याकडे पाहतात. याने अशा लोकांचे तारण होत नाही.

“पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वत:ला त्यांचा भरवंसा नव्हता; शिवाय, मनुष्यांविषयी कोणीहि साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्यांत काय आहे हे त्याला स्वत:ला ठाऊक होते” (योहान 2:24, 25).

येशू त्यांच्या ह्दयात पाहू शकत होता. त्याला ठाऊक होते की ते त्याच्यावर कधीहि विश्वास ठेवणार नव्हते. त्यांनी केवळ चमत्कारावर विश्वास ठेवला. त्याला ठाऊक होते की त्यांचा चिन्हें व चमत्कारावरील विश्वास त्यांना तारण देऊ शकणार नव्हता. “त्यांच्यात काय होते हे त्याला ठाऊक होते.” तो “सर्व मनुष्यांचे” ह्दये जाणतो. तो तुमचे ह्दय जाणतो. तुम्हांला नवीन जन्माचा अनुभव आहे किंवा नाही हे त्याला ठाऊक होते. तुमचा नव्या जन्माचा अनुभव घेण्यापूर्वी तुमचे अंतकरण अगदी पापाने भ्रष्ट झाले आहे. पवित्रशास्त्र म्हणते,

“ह्दय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगानी ग्रस्त आहे...” (यिर्मया 17:9)

येशूने ती रात्र कोठे व्यतित केली हे पवित्रशास्त्र सांगत नाही. परंतू प्रसिद्ध विद्वान निकेदम “त्या रात्री येशूकडे आला” (योहान 3:1, 2). आता योहान 1:11-13 कडे पाहा,

“जे त्याचे स्वत:चे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्विकार केला नाही, परंतू जितक्यांनी त्याचा स्विकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणा-यांना त्यांने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही” (योहान 1:11-13).

पापी ख्रिस्ताचा स्विकार करतात तेव्हां तारण मिळते. त्याचा स्विकार करण्याची रुपरेषा ही तीन वचनें देतात. 11 व्या वचनात, पुष्कळांनी त्याचा स्विकार केला नाही असे सांगितले आहे. पुष्कळ लोक नरकात जाणार. ते म्हणते,

“जे त्याचे स्वत:चे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्विकार नाही” (योहान 1:11).

“त्याचे स्वत:चे” ह्या शब्दाचा पहिला वापर हा जगातील सर्वसाधारण मनुष्यांविषयी बोलतो. “त्याचे स्वत:चे” ह्या शब्दाचा दुसरा वापर हा यहुदी लोकांविषयी बोलतो. त्यांच्याकडे जुन्या कारारतील पुष्कळ भविष्यवाण्या असल्या तरी, त्यांच्यातील मोठ्या प्रमाणातील लोकांनी त्याला मसीहा व प्रभू म्हणून स्विकारले नाही. ख्रिस्त या भूतलावर आला तेव्हां यहुदी व सर्वसाधारण मनुष्य ह्या दोहोनी त्याला स्विकारले नाही — आणि ते आजहि स्विकारीत नाहीत.

“तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला...तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत” (यशया 53:3).

हरविलेल्या पाप्यांना ख्रिस्ताकडे आणणे हे देवाचे सार्वभौम कार्य आहे. पण तो आपणांस आपला मुख्य उतारा योहान 1:12 कडे घेऊन जाते,

“परंतू जितक्यांनी त्याचा स्विकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणा-यांना त्यांने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला” (योहान 1:12).

ह्या उता-यातून आपण तीन मुद्दे काढू शकतो.

I. प्रथम, ख्रिस्ताचा स्विकार करणे म्हणजे काय ते मी सांगतो.

ग्रीक शब्द “लंबानो” हा “स्विकारणे” असा अनुवादित केला आहे. त्याचा अर्थ “घेणे,” “स्विकारणे,” “मिळविणे.” असा होतो. तुम्ही ख्रिस्ताला स्विकारावे करावा अशी आम्ही विनंती करितो. तुम्ही ख्रिस्ताचा स्विकार करा अशी आम्ही विनंती करितो. तुम्ही आपला तारणारा व प्रभू म्हणून त्याला मिळवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याला घ्या असे आम्ही सांगतो.

ख्रिस्ताला स्विकारण्यास पवित्रशास्त्रात जसा तो आहे तसे तुम्ही त्याला स्विकारावे. ख्रिस्त हा इम्मानुएल आहे — आम्हांबरोबर देव. देवाने देहात प्रगट केले. देव जो बाप त्याचा एकुलता एक पुत्र. त्र्यैक्यातील दुसरा व्यक्ति, जो मनुष्यांसमान झाला. देव-माणूस, जो आता स्वर्गातील देव पित्याच्या उजव्या हाताला बसला आहे. मनुष्य म्हणून कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला. आरंभ वा अंत नसलेला—तो सार्वकालीक प्रभू, देवाचा सार्वकालीक पुत्र आहे. तुम्ही त्याला स्विकारले किंवा नाही स्विकारले तर काय? तो तारणारा आहे, केवळ तोच तुमचे पाप सार्वकालीकतेसाठी नाहीसे करु शकतो व तुम्हांला तारु शकतो!

जोवर तुम्ही येशूला राजा म्हणून स्विकारणार नाही तोवर तुम्ही त्याला स्विकारु शकत नाही. त्यांने तुमच्या जीवनावर राज्य केले पाहिजे. तुम्ही स्वत:ला त्यांस देऊन टाकले पाहिजे. तुम्ही त्याला समर्पित व्हायला हवे. तुम्ही तुमचे शरीर व आत्मा ख्रिस्ताने राज्य करावे म्हणून द्यायवा हवे. तुम्ही त्याच्या ताब्यात स्वत:ला त्यांस देऊन टाकायला हवे. तुम्ही स्वत:ला त्यांस समर्पित करायला हवे आणि तुमची इच्छा, तुमचे विचार, तुमची आशा यावर त्याला राज्य करु द्या, आणि तुमचे स्वत:चे जीवन, त्याला नियंत्रित करु द्या. तुम्ही पुढे असे म्हणू नये की, “आम्हांवर राज्य करण्यास हा मनुष्य आमच्याकडे नाही.” जॉन कागॅननी ऐकले “ख्रिस्ताला वाहा! ख्रिस्ताला वाहा!” पण त्यामुळे ते खिन्न झाले. त्यांना “येशूला द्यायचे” नव्हते. येशूने त्यांच्यावर नियंत्रण करु नये असे त्यांना वाटत होते. पण जॉन दुर्दैवी होते. “येशू माझ्यासाठी वधस्तंभी गेला...पण मी त्याला वाहणार नाही. या विचाराने मी तुटलो...” त्या क्षणी जॉनने स्वत:ला येशूला दिले. तो म्हणाला, “मी स्वत: मरावे, आणि ख्रिस्ताने मला जीवन द्यावे.” जॉर्ज मॅथेसन (1842-1906) खूप छान म्हणाले. “प्रभू, मला बंदिवान कर” असे त्यांच्या गीतास संबोधतात.

प्रभू, मला बंदिवान कर, आइ मग मी मुक्त होईन;
माझी तलवार टाकण्यास मला जबरदस्ती कर, आणि मग मी विजयी होईन;
मी स्वत: उभा राहतो तेव्हां, मी जगाच्या भीतीने बुडतो;
तुझ्या बाहूत मला बंदिस्त कर, आणि मग माझे हात बळकट होतील.

ख्रिस्ताला स्विकारण्यास, तुम्ही त्याला तुमचा तारणारा व तुमचा राजा म्हणून स्विकारले पाहिजे. तुम्ही स्वत:स त्याला देऊन टाकले पाहिजे. हे तुमच्या बाबतीत घडले पाहिजे. त्याच्या मौल्यवान रक्ताने तुमचे पाप धुऊन काढले काय? त्याच्या रक्तावर तुम्ही विश्वास ठेवला काय? त्याने तुम्हांस तुमच्या पापापासून धुऊन शुद्ध केले काय? तुमचा राजा म्हणून तुम्ही त्याला समर्पित झाला काय? जोवर तुम्ही त्याला कवटाळत नाही आणि तुमचा स्वत:चा म्हणून हक्क सांगत नाही जोवर तुम्ही ख्रिस्ताला स्विकारले असे होत नाही. त्याला “स्विकारण्यास” त्याच्यावर “विश्वास ठेवावा” लागेल — जो तुम्हांला तुमचा वैयक्तिक तारणारा, व तुमचा वैयक्तिक राजा म्हणून विश्वास ठेवावा लागेल. जसा की स्तोत्रकर्ता लिहतो, “पुत्राने रागावू नये आणि वाटेने नाश पावू नये, म्हणून त्याचे चुंबन घ्या...त्याला शरण जाणारे सगळे धन्य होत” (स्तोत्र 2:12). देवाच्या पुत्राचे चुंबन घ्या! देवाच्या पुत्राच्या अधिन व्हा! देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवा! देवाच्या पुत्राचा “स्विकार करणे” म्हणजे हे सर्व होय.

II. दुसरे, देव त्याच्या पुत्रास स्विकारण्याचे सामर्थ्य देतो हे आपण शिकतो.

“परंतू जितक्यांनी त्याचा स्विकार केला तितक्यांना...देवाची मुले होण्याचा अधिकार दिला

“सामर्थ्य” हा शब्द “एक्सोसिया” पासून अनुवादित केला आहे. जमीसन, फॉसेट व ब्राऊन म्हणतात, “हा शब्द...अधिकारक्षमता दर्शवितो. यात हे दोन्ही आहेत” (पृष्ठ 348). “देवाचे पुत्र” या ऐवजी “देवाची मुले” हा अनुवाद चांगला आहे (NKJV). ख्रिस्ताला स्विकारणे म्हणजे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवणे आणि तुम्ही स्वत:ला त्याच्याकडे आणणे. तुम्ही देवाचे मुल कसे बनू शकता? येशू ख्रिस्ताचा स्विकार करण्याद्वारे.

मी दोन वर्षाचा असतांना माझे वडील मला सोडून गेले, आणि पुन्हा कधी मी त्यांच्याबरोबर राहिलो नाही. मी जसा मोठा होत गेलो तसे मोठी मुले मला चिडवू लागली. माझी चेष्टा करुन ते म्हणत, “रॉबर्टला वडील नाहीत.” त्यानंतर मी माझे नाव “रॉबर्ट एल. हायमर्स, ज्यु.” असे लिहण्यास सुरुवात केली. माझ्या वडीलाच्या नंतर माझे नाव पडले. मला खरोखर वडील आहेत हे दर्शविण्यासाठी मी माझ्या नावाच्या पुढे “ज्युनियर” लावतो. मी हे दररोज करतो. मला वडील होते हे सर्वांस कळावे अशी माझी इच्छा आहे! तुमचे वडील तुमचा देव असणे त्याहून अधिक महत्वाचे आहे! प्रत्येक माणूस, प्रत्येक स्त्री आणि मुल जितके येशूचा स्विकार करतात! तितक्यांस देव त्यांचा वडील आहे! आज रात्री जर मी उभा राहिलो आणि मी तुम्हांला सांगतो तर मी युनायटेड स्टेटचा राष्ट्राध्यक्ष असतो, तुम्ही माझ्या जळफळाट झाला असतो. मी देवाचे मुल आहे हे सांगण्यास मला अत्याधिक अभिमान आहे. मी येशूचा स्विकार केला, आणि येशूने मला देवाचे मुल, जो संपूर्ण विश्वावर अधिराज्य गाजवितो त्याचे एकुलते एक मुल!

मी राजाचे मुल आहे,
   राजाचे मुल:
माझ्या तारणा-या येशू बरोबर,
   मी राजाचे मुल आहे.
(“राजाचे मुल” हॅरिएट इ. बुएल यांच्याद्वारा, 1834-1910).

तुम्ही देवाचे मुल आहांत तर, तुम्हांवर देवाकडून भरपूर प्रेम केले जाते. तुम्ही देवाचे मुल आहांत तर, तुम्ही त्याच्याशी नाते संबंधात आहां, “दैवी स्वभावाचे भागिदार आहोत.” तुम्ही देवाचे मुल आहांत तर, रात्रीच्या कोणत्याही ताशी त्याच्याकडे येऊ शकता, आणि तो तुम्हांस सहाय्य व मार्गदर्शन करण्यास सदैव तयार आहे. जॉन कागॅनचे वडील चांगले आहेत. “माझ्या बाबांकडे दोन पी.एचडी पदव्या आहेत,” असे म्हणून त्यांच्या वडीलांचा परिचय त्यांनी कधीच करुन दिला नाही. पण मी माझ्या वडीलांविषयी अधिक सांगू शकतो! माझे जगातील बाबा माध्यमिक शाळेतून पदवीधर सुद्धा झाले नव्हते. परंतू माझा स्वर्गीय पिता सा-या विश्वाचा राजा आहे!

माझा बाप घर व जमीनीमध्ये श्रीमंत आहे,
   ह्या जगाची धनसंपत्ती आपल्या हातात धरतो!
माणिक व मोती, चांदी व सोने,
   त्याची भांडारे भरलेले आहेत, त्याच्याकडे भरपूर धन आहे.
मी राजाचे मुल आहे, राजाचे मुल:
   मी राजाचे मुल आहे, माझ्या तारणा-या येशूबरोबर.

महाविद्यालयीन किंवा सेमीनरीचा शुल्क भरण्यास किंवा नवीन कार खरेदी करण्यास माझ्याकडे माझे बाबा नव्हते. परंतू माझ्याकडे स्वर्गीय बाप आहे जो “[माझ्या] सर्व गरजा ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या स्वर्गीय संपत्यनुरुप तो गौरवाने पुरवील” (फिलिप्पै 4:19). माझ्याकडे स्वर्गीय बाप आहे जो मला अद्भूत अभिवचन देतो की, “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व कांही करावयास शक्तिमान आहे” (फिलिप्पै 4: 13). सर्व गौरव, स्तुती आणि सन्मान माझ्या बाप आणि माझआ राजा जो मला सामर्थ्य देतो, आणि तो माझ्या सर्व गरजा माझ्या संपूर्ण जीवनात पुरवितो. माझ्या आत्मचरित्राच्या आतल्या बाजूत, डॉ. कागॅन असे म्हणाले,

     ही कथा अशा माणसाची आहे जो अडखळलेला, वाकलेला आणि तुटलेला आहे, येशू ख्रिस्त त्यालाहि मदत करतो हे लोकांना दाखविण्यासाठी तो स्वत:ला उभे करतो व मोठ्या अडथळ्यावर मात करतो!
     ते दारुड्या भांडखोर अशा तुटलेल्या कुटुंबात वाढलेले होते — परंतू ज्याने हजारो जणांचे जीवन बदलेले असे प्रेरणा देणारे ते झाले. ते महाविद्यालयात नापास झाले — पण त्यांनी तीन डॉक्टर्स पदव्या मिळविल्या व 17 पुस्तके लिहली. त्यांनी परदेशात मिशनरी बनण्याचा प्रयत्न केला व अपयशी झाले — पण परत येऊन जगभरातील लोकांच्या सामर्थ्याचा स्त्रोत बनले!
     एखादा व्यक्ती एखाद्या ठिकाणाहून निघून जातो, तेथे वेगवेगळ्या वीस वांशिक गटांमध्ये, लॉस एंजिल्सच्या खालच्या मध्यवर्ति भागात, डॉ. हायमर्स अद्भूतरित्या मंडळी उभारतात, आणि जगभर पसरलेली विस्तृत सेवा जी जगाच्या अंतापर्यंत पोहंचते...
     ही डॉ. हायमर्स, ज्युनि. यांची जीवन कथा आहे, जो मनुष्य अशक्य ते मिळविण्यास — सर्व भीतीच्या विरुद्ध. मला माहित आहे, कारण मी त्यांच्या बरोबर गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ काम केलेले आहे.
            - डॉ. ख्रिस्टोफर एल. कागॅन.

मी राजाचे मुल आहे!

तरुणांनो, येशू ख्रिस्तावर विश्वास व भरवंसा ठेवा. ख्रिस्ताचा स्विकार करा व देवाचे पुत्र व कन्या होण्याचे सामर्थ्य देईल. मोठे घर, एका अद्भूत मंडळीचा पाळक, सुंदर पत्नी, दोन चांगले पुत्र, आणि दोन सुंदर नाती असा आशिर्वाद मला दिला तसा तो तुमच्या जीवनातहि आशिर्वाद देईल. मी राजाचे मुल आहे!

तुम्ही त्याचा स्विकार करा व त्याच्यासाठी जगाल तर, तो तुम्हांस अशाप्रकारे आशिर्वाद करील की दुनिया आश्चर्यचकीत होईल — तुम्ही सुद्धा राजाची मुले आहांत. आणि तुम्ही गीत गाल,

मी राजाचे मुल आहे,
   राजाचे मुल:
माझ्या तारणा-या येशू बरोबर,
   मी राजाचे मुल आहे.

“जे त्याचे स्वत:चे त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्विकार केला नाही, परंतू जितक्यांनी त्याचा स्विकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणा-यांना त्यांने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला; त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही” (योहान 1:11-13).

III. तिसरे, आपण त्याचा स्विकार करतो तेव्हां देव नवीन जन्म देतो हे आपण शिकतो.

“त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही” (योहान 1:13).

महान स्पर्जन यांचा “प्रचारकांचा राजकुमार” या उपदेशातून मी ह्या उपदेशाची रुपरेखा व मूळ विचार घेतला आहे.

जो प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तो प्रत्येकजण नवीन जन्मलेला आहे. कांही शास्त्राचे अभ्यासक गोंधळात आहेत काय प्रथम आहे — विश्वास की नवी उत्पत्ती. मी स्पर्जन यांच्याशी सहमत आहे. ते म्हणाले की विश्वास व नवी उत्पत्ती “बरोबरीने असले पाहिजेत.” नवीन जन्मासाठी नवी उत्पत्ती ही पविशास्त्रीय संज्ञा आहे. स्पर्जन म्हणाले, “मी येशूवर विश्वास ठेवतो तर, मला मी नवी उत्पत्ती आहे की नाही हे विचारण्याची गरज नाही, नवी उत्पत्ती न झालेला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकत नाही; आणि मी नवी उत्पत्ती आहे तर येशूवर विश्वास ठेवला पाहिजे, तो असे करीत नाही तर तो पापात मेलेला आहे असे नाही...विश्वासाची कृति ही तो व्यक्ति नवी उत्पत्ती आहे.”

आपण ख्रिस्ती म्हणून जन्मलो नाही. किंवा “मनुष्याच्या इच्छेनेहि” जन्मलो नाही. जगातील सर्वात महान ख्रिस्ती आपणांस नवी उत्पत्ती करु शकत नाही. आपला “देहाच्या इच्छेने” नवीन जन्म झाला नाही. आपल्या स्वैर इच्छेनेहि झाला नाही. मनुष्याची इच्छा नवी उत्पत्ती करण्यास सक्षम नाही. आपण वरुनच नवीन जन्मलो पाहिजे. पवित्र आत्मा ती उर्जा असली पाहिजे जी आपल्यात शिरते व आपणांस नवी उत्पत्ती बनविते.

येशूमध्ये जेथे विश्वास असतो तेथे नवीन जीवन असते. जेथे विश्वास नसतो तेथे नवीन जीवन नसते. तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता तर तुम्ही नव्याने जन्मलेले असले पाहिजे, “मनुष्याच्या इच्छेने नव्हे तर देवाच्या.” मला तुम्हांला हा प्रश्न विचारायला हवा की — तुम्ही ख्रिस्ताचा स्विकार केला काय? होय किंवा नाही. तुम्ही येशू ख्रिस्ताचा स्विकार केला काय? केवळ त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवता काय? तुम्ही असे म्हणू शकता काय,

ख्रिस्त ह्या मजबूत खडकावर मी उभा,
इतर जमीन ही बुडणारी वाळू आहे का?

तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता काय? तुम्ही त्याचा स्विकार केला काय? तुम्ही त्याचा स्विकार केला नाही तर, का नाही केला? त्याचा स्विकार करण्यास कांही कठीण असे आहे काय? त्याच्यात विश्वास असणे ही एक गोष्ट आहे. पण येशूवर विश्वास ठेवणे ही वेगळी एक गोष्ट आहे. त्याच्यात विश्वास असणे म्हणजे त्याच्यावर भरवंसा ठेवणे. त्याच्यावर भरवंसा ठेवणे म्हणजे त्याचा स्विकार करणे होय.

डॉ. कागॅन तुम्हाला हा प्रश्न विचारतील की “तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला काय?” तेव्हा तुमचे उत्तर काय असेल? त्याला तुम्ही पाहण्याची आवश्यकता नाही. त्याला तुम्ही अनुभवण्याची आवश्यकता नाही. तुम्हांस केवळ त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. डॉ. कागॅन तुम्हांल फसविण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यांना तुम्हांस पुढे न्यावयाचे, आणि मला तुमचा बाप्तिस्मा करावयाचा आहे. तुमच्यासारखे लोक येशूवर विश्वास ठेवतांना पाहाणे आम्हांस आवडते. येशू तुमच्या पापाची खंडणी भरण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता काय? येशू आज रात्री तुम्हांवर खूप प्रेम करतो आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता काय? आता, आज रात्रौ, तुम्ही त्याच्यावर का विश्वास ठेवत नाही? तुम्ही म्हणता, “मला त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे.” मग आताच का ते करीत नाही? अनुभवण्याची वाट पाहू नका. येशूकडे पाहा. एखाद्या मोठ्या अनुभवाची वाट पाहू नका. येशूकडे पाहा. तुम्ही स्वत:मध्ये पाहू नका. तुमचे तारण करील असे कांही तुमच्यात नाही. तुमच्या स्वत:च्या विचारावर विश्वास ठेऊ नका. केवळ येशवर विश्वास ठेवा. येशूचा स्विकार करा, आणि तो तुमचा स्विकार करील!

आता का नाही? आता का नाही?
   आता तारणा-यावर विश्वास का ठेवत नाही?
आता का नाही? आता का नाही?
   आता तारणा-यावर विश्वास का ठेवत नाही?

तुम्ही जगात शोधण्यास अपयशी ठरला
   त्रस्त मनास शांति हवी;
ख्रिस्ताकडे या, त्याच्यावर विश्वास ठेवा,
   शांति अन सांत्वना तुम्हांला मिळेल.

आता का नाही? आता का नाही?
   आता तारणा-यावर विश्वास का ठेवत नाही?
आता का नाही? आता का नाही?
   आता तारणा-यावर विश्वास का ठेवत नाही?
(“व्हाय नॉट नाऊ?” डॅनिएल डब्लू. व्हिटल यांच्याद्वारा, 1840-1901, पाळकाने बदल केला आहे).

येशूवर विश्वास ठेवणे सोपे आहे. एमी झबालगा काय म्हणाली ते ऐका, “माझा विश्वास सिद्ध करण्यासाठी मी भावना किंवा एखादा अनुभव शोधत होते...येशूला अंतहीन नाकारणे. मी वाट पाहणा-या तारणा-याकडे जाण्यास व पडण्यास स्वत:ला जाऊ दिले.” जॉन कागॅन म्हणाले, “कृति किंवा मनाची इच्छा नाही, पण माझ्या अंत:करणासह, ख्रिस्तातील साधा विसावा, त्यांने मला तारले.” एमी व जॉनने येशूवर विश्वास ठेवला. त्यांनी त्याला स्विकारले. बस एवढेच! आज रात्रौ तुम्ही येशूवर विश्वास ठेवावा अशी प्रार्थना मी करितो. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले:
“अ चाईल्ड ऑफ द किंग” (हॅरीयट इ. ब्युएल यांच्या द्वारा, 1834-1910).
“A Child of the King” (by Harriet E. Buell, 1834-1910).


रुपरेषा

जितक्यांनी त्याचा स्विकार केला!

AS MANY AS RECEIVED HIM!

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“परंतू जितक्यांनी त्याचा स्विकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणा-यांना त्यांने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला” (योहान 1:12).

(योहान 2:24, 25; यिर्मया 17:9; योहान 3:1, 2; 1:11-13; यशया 53:3)

I.   प्रथम, ख्रिस्ताचा स्विकार करणे म्हणजे काय ते मी सांगतो, स्तोत्र 2:12.

II.  दुसरे, देव त्याच्या पुत्रास स्विकारण्याचे सामर्थ्य देतो हे आपण शिकतो,
फिलिपै 4:19, 13; योहान 1:11-13.

III. तिसरे, आपण त्याचा स्विकार करतो तेव्हां देव नवीन जन्म देतो हे आपण
शिकतो, योहान 1:13.