Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
डॉ. हायमर्स त्यांच्या सेवाकार्याच्या 60व्या वर्धापनदिन प्रसंगी बोलतात
“माझ्या जीवनातील आशिर्वाद”

DR. HYMERS SPEAKS ON HIS 60TH ANNIVERSARY IN MINISTRY
"THE BLESSINGS OF MY LIFE"
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

रिचर्डसन निक्सन प्रेसिडेन्सियल लायब्ररी योर्बा लिन्डा, कॅलिफोर्निया,
येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 8 एप्रिल, 2018 रोजी
A sermon preached at the Richard Nixon Presidential Library,
Yorba Linda, California
Lord’s Day Evening, April 8, 2018


कृपया उभे राहून माझ्या जीवनाचे वचन वाचा.

“ख्रिस्त मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व कांही करावयास शक्तिमान आहे” (फिलीप्पै 4:13).

आपण खाली बसू शकता.

माझ्या सेवाकार्याचा साठावा वर्धापन साजरा करण्यास निक्सन लायब्ररी का निवडली म्हणून तुम्हीं चकीत झाला असेल. माझे आत्मचरित्र तुम्ही वाचाल तेव्हां राष्ट्राध्यक्ष निक्सन यांच्याद्वारे मला जीवनाचे वचन कसे मिळाले हे तुम्हांला कळेल.

“ख्रिस्त मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व कांही करावयास शक्तिमान आहे” (फिलीप्पै 4:13).

मी दोन वर्षाचा असतांना माझे सोडून गेले. त्यानंतर मी त्यांच्यासोबत कधीहि राहिलो नाही. मी 12 होईस्तोवर फक्त माझ्या आईसोबत राहिलो. मग त्यानंतर नातेवाईक ज्यांना मी नको होतो, त्यांच्यासोबत एका ठिकणाहून दुस-या ठिकाणी राहत गेलो. माध्यामिक शाळेतून पदवी घेण्यापूर्वी मी विविध 22 शाळांमधून शिक्षण घेतले. मी दरवेळी “नवीन मुलगा” असायचो. अक्षरश: अनाथ झालो होतो. पित्याशिवाय वाढणे हा माझा सर्वात मोठा तोटा होता. कोणाचेहि पाठबळ किंवा मदती शिवाय, मी माझ्या स्वत:च्या हिमतीवर वाढलो. सर्वात वाईट हे की, मला आदर्श म्हणून वडील नव्हते. म्हणून मी ऐत्याहासिक पात्रांकडे पाहू लागलो आणि कसा माणूस हवा ते मी तयार करु लागलो. मग ही माणसे माझे नायक झालेत.

त्यांना मी धर्मनिरपेक्ष व ख्रिस्ती आदर्श अशा प्रकारात गणू लागलो. माझे नायक हे सर्व पुरुष होते जे पुष्कळ संकटातून जाऊन विजयी झाले होते. माझे ख्रिस्ती नायक अब्राहाम लिंकन, जॉन वेस्ली, रिचर्ड वुरंब्रॅंड आणि जॉन आर. राईस हे होते. माजे धर्मनिरपेक्ष नायक विट्सन चर्चिल आणि रिचर्ड निक्सन हे होते. निक्सनच्या आत्मचरित्राचा एक लेखक म्हणाला, “ते बहिर्मुख व्यवसायात अंतर्मुख व्यक्तिमत्व होते. आश्चर्यकारकरित्या ते एक यशश्वी राजकारणी होते. लाजाळू व वाचनाची आवड असणारे होते, त्यांना मारले जाऊ शकते, हिशेब मागितला जाऊ शकतो, हे ठाऊक असतांना आणि तरीहि — सतत कोणता तरी अडथळा असतांना सुद्धा — ते पुन्हा उभे राहिले.” नव्हते, ते बिल्कुल ख्रिस्ती नव्हते. परंतू, होय, ते नेहमी पुन्हा लढायला यायचे. पवित्रशास्त्रातील फिलीप्पै 4:13 हे निक्सनचे आवडते वचन होते.

राष्ट्राध्यक्ष निक्सन यांना हे वचन का आवडायचे हे समजल्यावर, ते मला कधीहि नावडते झाले नाहीत. त्यांनी पुष्कळ अडथळ्यांवर मात केलीली मी त्यांच्या पातळीत जाऊन पाहिले आहे. माझ्या जीवनातील अंधारलेल्या समयी, मी असा वारंवर विचार केला की, “रिचर्ड निक्सन वॉटरगेटच्या माध्यमातून जगू शकतात, तर मीहि त्यातून जाऊ शकतो.” वार्ताहर वॉल्टर क्राँकीट म्हणाले, “तुम्ही किंवा मी जर रिचर्ड निक्सन असतो तर आपण मेलो असतो.” माझ्यासाठी ते एक मूलत: निग्रही होते. निक्सन म्हणाले, “माणसाचा पराभव होतो तेव्हां तो संपत नाही. तो माघार घेतो तेव्हां संपतो.” त्याला कोणीहि थांबवू शकत नाही. 1960 साली राष्ट्राध्यक्षाच्या निवडणूकीत जॉन एफ. केनडी यांच्या विरोधात ते हरले. 1962 साली कॅलिफोर्नियातील राज्यपालाची निवडणूक हरले. 1968 साली ते राष्ट्राध्यक्षाची निवडणूक जिंकले. त्यांना कार्यालयातून बाहेर वॉटरगेटकडे हाकलून दिले होते. परंतू ते नेहमी परत आले. त्यामुळे ते ख्रिस्ती नसले तरी, ते माझे धर्मनिरपेक्षवादी नायक आहेत.

प्रेषित पौल म्हणाला,

“ख्रिस्त मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व कांही करावयास शक्तिमान आहे” (फिलीप्पै 4:13).

याचा अर्थ असा नव्हे की मीहि माझ्या डोक्याचे केस वाढवावे! याचा अर्थ असा नव्हे की मी उंच उडावे! याचा अर्थ असा नव्हे की मी गणितात हुशार असावे! प्रेषितास म्हणावयाचे आहे की तो सर्व संकटे सहन करतो, तो सर्व कर्तव्य बजावितो, तो सर्व अडथळ्यांवर मात करतो — ख्रिस्ताकडून जो त्याला सामर्थ्य देतो. आणि ते माझ्याबाबतीत सुद्धा खरे आहे हे मला कळाले. या वचनासाठी मी देवाचे आभार मानतो. परंतू मी देवाचे अधिक आभार मानतो यासाठी की ख्रिस्त मला सामर्थ्य देतो! मी महाविद्यालयात नापास झालो, परंतू परत मागे जाण्यास व तीन डॉक्टर्स पदव्या मिळविण्याचे ख्रिस्ताने मला सामर्थ्य दिले. मी मिशनरी होण्यात अपयशी ठरलो, परंतू ख्रिस्ताने वेबसाईटच्या माध्यमातून जगभरातील लोकांच्या सामर्थ्याचा स्त्रोत बनविले.

आणि तुम्ही माझे पुस्तक वाचले, तर तुमच्या लक्षात येईल की का मि. ग्रिफ्फिथ यांनी माझे आवडते उपासना गीत गायले.

धन्याने आपणांस बोलाविले; मार्ग कदाचित कंटाळवाणा असेल
   आणि धोका व दु:ख मार्गात पसरला;
परंतू थकलेल्यांस देवाचा पवित्र आत्मा तुम्हांला सांत्वना देईल;
   आम्ही तारकाच्या मागे जातो आणि मागे फिरु शकत नाही;
धन्याने आपणांस बोलाविले; शंका व प्रलोभन यातून जाण्यास
   आमचा प्रवास उदळून लावतात, तरी आम्ही आनंदाने गातो:
“पुढे दाबा, वरती बघा,” पुष्कळ संकटातून;
   शियोनेच्या मुलांनो तुमच्या राजाच्या मागे जा.
(“द मास्टर हॅथ कम” सारा दौंडनी यांच्याद्वारा, 1841-1926).

माझा मुलगा रॉबर्ट याने सांगितल्यामुळे मी माझे आत्मचरित्र लिहले. माझे जीवन संपूर्ण समस्याग्रस्त, संघर्षपूर्ण व यातनेने भरलेले असल्याने मला लिहतांना आनंद झाला नाही. ब-याचदा हे हस्तलिखित फेकून द्यावीशी वाटले कारण ते भयंकर नकारात्मक होते. पण जॉन सॅमुएल कागॅन म्हणाले, “डॉ. हायमर्स, ते फेकून देऊ नका. सर्वाना आणखी एका अध्यायाची गरज आहे. तुमच्या आईने ‘तुझे आशिर्वाद मोज’ असे म्हटलेले याविषयी सांगा.” मी जॉनचे ऐकले व शेवटचा अध्याय लिहला, जो मी आता तुम्हांस संक्षिप्त रुपात देतो.

दवाखान्यात मी माझ्या आईच्या खाटेच्या बाजूला उभा होतो. उपकारस्तूतीच्या कांही दिवसानंतर हे होते. आम्ही आमचे आवडते लोक, अब्राहाम लिंकन, आणि राष्ट्राध्यक्ष लिंकन, यांनी उपकारस्तूती कशाप्रकारे राष्ट्रीय सुट्टी बनलिली याविषयी बोलत होतो. आम्ही उपकारस्तूतीच्या वेळी गायलेले गीत होते.

जीवनाची लाट उसळते तेव्हां तूं वाद घातला आहेस,
तुम्ही निराश असता तेव्हां, विचार करणे संपते,
तुमचे पुष्कळसे आशिर्वाद मोजा, एक एक त्याला नाव द्या,
आणि तुम्हांस आश्चर्य वाटेल की हे सर्व परमेश्वराने केले आहे.
तुमचे आशिर्वाद मोजा, एक एक त्याला नाव द्या,
तुमचे आशिर्वाद मोजा, पाहा देवाने काय केले!
तुमचे आशिर्वाद मोजा, एक एक त्याला नाव द्या,
तुमचे आशिर्वाद मोजा, पाहा देवाने काय केले.
   (“काउंट युवर ब्लेसिंग्ज” जॉनसन ओटमॅट, ज्युनि. यांच्याद्वारा, 1856-1922).

जेव्हां आम्ही गीत गायचे संपविले, आई म्हणाली, “अरे, रॉबर्ट, आपल्या जीवनात उपकारस्तूती करण्यासारखे भरपूर आहे.” त्यानंतर आम्ही “एका मागून एक” असे आशिर्वाद गणू लागलो. ती आपली मुले रॉबर्ट व जॉन, याबद्दल धन्यवाद देऊ लागली. नंतर तिने माझी पत्नी, इलिना हिच्याबद्दल धन्यवाद दिला. “ती माझ्यासाठी खूप चांगली होती, रॉबर्ट, ती एक खूप चांगली आई व पत्नी आहे.” ती आमच्या घरात राहते म्हणून तिने देवाचे आभार मानले. तिने मंडळीसाठी देवाचे आभार मानले. आभार मानले. तिने मंडळीच्या सभासदांसाठी देवाचे आभार मानले, “एका मागून एक.” मग मी पुष्कळ दिल्या ज्याविषयी उपकारस्तूती करावी. आणि ते गीत पुन्हां गायले.

तुमचे आशिर्वाद मोजा, एक एक त्याला नाव द्या,
तुमचे आशिर्वाद मोजा, पाहा देवाने काय केले.

एका उशीरा रात्री. मी तिचे चुंबन घेतले, आणि खोलीतून निघतांना तिने जो कांही म्हटले ते मी आयुष्यभर विसरणार नाही. ती म्हणाली, “रॉबर्ट, मला आजवर जे मिळाले त्यामध्ये तूं माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे.” खोलीतून बाहेर पडतांना माझे डोळे पाण्याने भरले, आणि त्या रात्री मी दवाखान्यातून बाहेर पडलो. तिच्या सोबत केलेले ते माझे शेवटचे संभाषण होते. नंतर त्या रात्री तिला मेंदूचा मोठा झटका आला त्यामुळे तिचा प्राण गेला.

”डॉ. हायमर्स, तुमचे पुस्तक फेकून देऊ नका. आणखी एका अध्यायाची सर्वांना गरज आहे. ‘तुमचे आशिर्वाद मोजा’ असे तुमच्या आईने सांगितले याविषयी सांगा.” माझ्या तिर्थरुपी जीवनात मिळालेले कांही अद्भूत आशिर्वाद पाहा.

सर्वांत प्रथम, माझ्या आईचे तारण झाले म्हणून देवाला धन्यवाद. ती ऐंशी वर्षे वयाची होती आणि तिचे कधीहि परिवर्तन होणार नाही असे मला वाटले. मी एलिना व न्यूयार्क मधील मुले यांच्यासह होतो, जेथे मी पुष्कळ मंडळ्यांतून प्रचार करीत होतो. आमच्या खोलीत मी येरझ-या घालीत होतो, मी माझ्या आईच्या तारणासाठी प्रार्थना करीत होतो. मग, अचानक, मला कळाले की तिचे तारण होणार. जुन्या-काळी सांगितल्या प्रमाणे मी “पूर्ण रात्र” प्रार्थना केली. मी डॉ. कागॅन यांना फोन केला आणि त्यांना आईला ख्रिस्तामध्ये चालविण्यास सांगितले. यापूर्वी तिने माझे कधीहि ऐकले नाही. पण यावेळी मात्र तिने येशूवर विश्वास ठेवला. तिचे ख-या अर्थाने झालेले परिवर्तन, एक चमत्कार होता. त्या दिवसापासून तिने नशापान व धुम्रपान बंद केले. आकडीवरचे औषध घेतल्याशिवाय अचानकपणे दारु पिणे बंद केल्यास तिला आकडी येऊ शकते असे मला डॉक्टराकडून सांगण्यात आले. पण तिला ते दिले नाही. हा एक चमत्कार होता. तिने पुन्हा कधी सिगारेट ओढले नाही व कधीहि दारु प्यायली नाही. तिने पुष्कळदा पवित्रशास्त्र पूर्ण वाचले आणि माझ्यासोबत आठवड्यातून चार वेळा मंडळीत येऊ लागली. तिचा आवडता सुट्टीचा दिवस, 4 जुलै रोजी मी तिला बाप्तिस्मा दिला. माझ्या आईच्या परिवर्तनासाठी देवाचे आभार मानतो.

दुसरे, एलिना, माझी संदर पत्नी हिच्यासाठी देवाचे आभार मानतो. मी आयोजित केलेल्या एका लग्नात ती आली होती. लग्न लागण्यापूर्वी मी योहान 3:16 वर छोटासा उपदेश दिला. पेटँकॉस्ट मंडळीत ऐकलेला तिचा पहिला उपदेश होता. तिने आवाहानास प्रतिसाद दिला व तिचे लगोलग तारण झाले! पहिल्यांदा जेव्हां मी तिला लग्नाची मागणी घातली तेव्हां तिने “नकार” दिला. माझे अंत:करण तुटले. प्युर्टो रिको येथे त्यांच्याबरोबर जाण्यास ओर्लेंन्डो व आयरेन वाजक्विझ (जे त्या रात्री तेथे होते) यांनी मला बोलाविले. मी त्यांच्याबरोबर गेलो, पण मी एलिनाचाच विचार करीत होतो. ती सुद्धा, माझाच विचार करीत होतो. ती म्हणाली, “मला आशा आहे तो मला परत विचारणार.” मी विचारले, आणि यावेळी ती “होय” म्हणाली. पस्तीस वर्ष झाले आम्ही विवाहित आहोत. माझ्या गोड पत्नीसाठी मी दररोज देवाचे आभार मानतो! तिने माझ्यासाठी एक चिठ्ठी लिहली त्यात ती म्हणाली, “रॉबर्ट, मी माझ्या सर्व अंत:करण व जीवापासून तुझ्यावर प्रेम करते. सदैव प्रेम करते, एलिना.” 31 व्या नीतिसुत्रात सांगितली तशी ती सद्गुणी स्त्री आहे. माझी प्रेमळ, एलिना हिचे वर्णन पाहण्यासाठी तुम्हांला तो अध्याय वाचावा लागेल. तिच्या प्रेमळ आठवणी माझ्या ह्दयात कायमस्वरुपी जतन करुन ठेवल्या आहेत. आज रात्री इथे तिचे वडील हजर आहेत. ते इथे ग्वॉटेमाला येथून आले आहेत. मि. स्युएलार, धन्यवाद! आणि तिचे भाऊ व कुटुंब सुद्धा इथे आले आहे. एरविन, धन्यवाद!

तिसरे, मी माझी दोन मुले, रॉबर्ट व जॉन यांच्याविषयी देवाला धन्यवाद देतो. ती जुळी आहेत, आणि आता ते चौतीस वर्ष वयाची झालीत. ते दोघेहि कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी नॉर्थरीज येथील विद्यापिठातून पदवीधर झाले आहेत. रॉबर्ट हा सुंदर कोरियन मुलगी जीन हिच्याशी विवाहबद्ध झाला आहे. तिचे आईवडील आज रात्री इथे आहेत, तसेच तिचा भाऊ व त्याची पत्नी सुद्धा. आल्याबद्दल धन्यवाद! रॉबर्ट व जीन हे हन्ना व सारा ह्या दोन मुलींचे आईवडील आहेत. अशी सुंदर नातवंडे मला दिलीत म्हणून देवाला धन्यवाद.

माझा दुसरा मुलगा जॉन वेस्ली, महान इंग्रज प्रचारक यांच्या नावावरुन नाव ठेवले. रॉबर्ट व जॉन दोघेहि मंडळीच्या प्रत्येक सभेला हजर असतात. वेस्ली हा प्रार्थनाशील मनुष्य आहे. कधीकधी तासंतास, तो प्रार्थना करतो व पवित्रशास्त्र वाचतो. तो एक चांगला ख्रिस्ती व माझा मित्र आहे. मी माझ्या दोन्ही मुलांबद्दल आनंदी आहे. मला व माझ्या पत्नीसाठी ते अनमोल आशिर्वाद आहेत.

मी डॉ. ख्रिस्टोफर कागॅन यांच्या बद्दल देवाचे आभार. त्याच्या सारखा मला भाऊ मिळाला तसा कुठेही नाही. आम्ही एकमेकांचा इतका आदर एवढा करतो की एकमेकांची नावें घेऊन हाक मारत नाहीत. आम्ही एकत्र असतांना देखील मी त्यांना नेहमी डॉ. कागॅन म्हणून हाक मारतो व ते नेहमी मला डॉ. हायमर्स अशी मला हाक मारतात. त्यांच्यासारखा ज्ञानी व विश्वासू माणूस याबद्दल देवाला धन्वाद. आम्ही एकमेकांस समजून घेतो. आम्ही दोघे अंतर्मुखी होतो, आणि आम्ही दोघे बराच वेळ प्रार्थनेत व पवित्रशास्त्र वाचण्यात खर्ची केला. तो त्याच्या विचारात अधिक शास्त्रीय व गणिती आहे. मी अधिक रहस्यवादी व अंतर्ज्ञानी असा आहे. परंतू आम्ही परिपूर्णपणे एकत्रतीत काम सहजपणे करतो. होम व वॅटसन, किवा जॉनसन व बॉसवेल यांच्यासारखे, आम्ही भागीदार आहोत (कोणीतरी भर घातली, “लॉरेल व हार्डी किंवा अबॉट व कोस्टेलो,” जुन्या—काळातील विनोदी कलाकार).

मी नव्या कल्पना मांडणारा व ते एक संघटक आहेत. मी वास्तव-वादी आहे. ते गणित-वादी आहेत. ते मला एक पुढारी मानतात. मी त्यांना अलौकीक बुद्धीमत्ता असलेले मानतो. आमची भागिदारी दोघानाहि आशिर्वादित ठरली आहे. मी ख्रिस्टोफर कागॅन यांच्यासाठी देवाला धन्यवाद देतो.

मी जॉन सॅमुएल कागॅन साठी देवाला धन्यवाद देतो. ते डॉ. व मिसेस कागॅन यांचे जेष्ठ सुपुत्र आहेत. जॉन तरुण आहेत जे उपासनेचे पुढारीपण करतात. बॅप्टिस्ट सेवक म्हणून त्यांची काल दिक्षा झाली. त्यामुळे ते आता रेव्हरंड जॉन सॅमुएल कागॅन आहेत! ते एक खूप चांगले प्रचारक व समुपदेशक आहेत. मी जॉनला सेवेतील माझा “पुत्र” समजतो. तो बिओला विद्यापिठातील ताल्बोट स्कूल ऑफ थिऑलॉजी येथे दुस-या वर्षात शिकत आहे. ते खूप हुशार आहेत. यात आश्चर्य नाही कारण त्यांच्या वडीलाकडे दोन पी.एचडी. व त्यांची आई ज्युडी ह्या वैद्यकीय डॉक्टर आहेत. जॉन सरळ मार्गी विद्यार्थी आहे. पी.एचडी. मिळविण्याचा त्याचा मानस आहे. वयाच्या 24 व्या वर्षी त्याने भारतात, डॉम्निशिएन रिपब्लिक, आणि आफ्रिकेतील देशांमधून प्रचार सभा घेतल्या आहेत. तो आमच्या मंडळीत दर रविवारी सकाळी प्रचार करतो. आम्ही दर गुरुवार दपारी, ईश्वरविज्ञान व सेवाकार्यासंबंधी एकत्रित विचारविनिमय करीत असतो. मी जॉन संबंधाने देवाचे आभार मानतो. आमच्या मंडळीचा पुढील पाळक म्हणून तो माझे अनुकरण करील. तो माझा मित्र आहे. हे अगदी साधे सरळ आहे.

मी नोहा साँग याच्या संबंधाने देवाचे आभार मानतो. तो माझा आणखी एक “प्रचारक मुलगा” आहे. नोहा आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत आहे आणि नंतर ते सेमीनरीला जाणार आहे. त्याचा व जॉनचा चांगला संघ आहे, आणि भविष्यात आमच्या मंडळीस पुढे नेतील.

मी नोहा, आरोन यान्की व जॅक नगान यांच्या संबंधाने देवाचे आभार मानतो. ते आमचे नवीन दिक्षित डिकन आहेत. आरोन माझा मित्र आहे. तो मला एकच पिलू असलेल्या कोंबडीसारखे पाहातो. तो माझ्या जवळीत मित्रांपैकी एक आहे. जॅक नगान हा विवाहित असून त्याला दोन मुलगे आहेत. आणि हे पाहा तुम्हांला कदाचित माहित नसलेले कांही. अजून माझे संपूर्ण झाले नाही! पुढील वर्षी मी एक नवीन चीनी मंडळी जॅक नगान याच्या घरी उभारणार आहे.

जॉन कागॅन, नोहा साँग, ओरोन यान्की, जॅक नगान आणि बेन ग्रिफ्फिथ हे सर्व माझे प्रार्थनेतील भागिदार आहेत. आम्ही प्रत्येक बुधवारी आमच्या घरी प्रार्थनेसाठी एकत्र जमतो. मी या सर्वांसाठी देवाचे आभार मानतो. त्या सर्वांनी कटीण प्रसंगातून जाताना मला सावरले आहे, विशेषत: माझ्यावरील कर्क रोगाच्या उपचाराच्या दरम्यान.

मी डॉ. चान, मिसेस सलाझार व “39” विषयी देवाला धन्यवाद देतो. डॉ. चान हे आमचे सहाय्यक पाळक, सुवार्तिक व टेलिफोन पाठ-पुरावा सेवा या विभागाचे प्रभारी आहेत. मिसेस सलाझार ह्या स्पॅनिश सेवेच्या प्रभारी आहेत. “39” हे विश्वासू लोक आहेत ज्यांनी माझ्या पडत्या काळात व मंडळी फुटण्यापासून मला वाचविले. त्या प्रत्येकांबद्दल मी देवाचे आभार मानतो. मि. अबेल प्रुढोम यांच्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. हा तो मनुष्य आहे ज्यांने मंडळी फुटीपासून वाचविली. आणि वर्जेल व बेव्हर्ली निकेल यांच्याबद्दल मी देवाचे आभार मानतो. ते हे जोडपे आहे ज्यांनी आम्हांला मंडळीची इमारत बांधण्यास मोठी रक्कम कर्जाऊ दिली. आम्हांला केलेल्या मदतीचा त्यांनी कधीहि बाऊ केला नाही. ते आता आमच्या मंडळीचे सन्माननीय सभासद आहेत.

आमची मंडळी जवळजवळ पन्नास टक्के ही तीस वर्षाखालील तरुणांनी बनलेली आहे. तरुण लोकांमध्ये पाळकीय सेवेचा मी आनंद घेत आहे. माझ्या माहितीप्रमाणे आमचा तरुणांचा जो संघ आहे तो सर्वोत्तम आहे. आमच्याकडे डिकनचा एक चांगला संघ आहे. आमच्याकडे आठ दिक्षित डिकन आहेत, आणि आम्ही दर दोन वर्षांनी बदलतो. आरोन यान्की हे कायमचे डिकनचे अध्यक्ष आहेत, त्यामुले त्यांना कधीहि बदलले जात नाही. या सर्व माणसांबद्दल देवाचे आभार.

मंडळीतील वडीलधारी माणसे आम्ही जे कांही करतो त्यांस पाठींबा देतात. ते प्रत्येक सबेस हजर राहतात. ते खूप छान प्रार्थना करतात, आणि आमची मंडळी उभारण्यास कष्ट करतात. माँटेबेलोला नवीव चीनी मंडळी सुरु करण्यास जातांना, जॉन कागॅन व त्याचे वडील यांच्या हाती रविवारची सकाळची उपासना देतांना मला भीति वाटत नाही. माझा त्यांच्यावर पूर्ण भरवंसा आहे. मी माझ्या मातृ मंडळीत दर रविवारी रात्री यईन.

माझे संपूर्ण जीवन आमच्या मंडळी भोवती फिरते. ते माझ्या “कुटुंबातीलच” आहे. अशा प्रकारच्या विस्तृत कुटुंबाचा प्रमुख असणे खूप आनंदाचे आहे. येशू म्हणाला,

“तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्हा माझे शिष्य आहां” (योहान 13:35).

अधिक चांगल्या पद्धतीने मी ह्या संदेशाचा शेवट करण्यास खरी गोष्ट सांगण्यापेक्षा दुसरा विचार मी करु शकत नाही. मी मरीन देशात उघडे दरवाजे असलेल्या मंडळीत प्रचार करतांना, प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी रात्री सॅनफ्रान्सिस्को येथे जातांना मी नेहनी तरुणांना घेऊन जातो. ते जेव्हां हस्तपत्रिका वाटायचे तेव्हां मी प्रचार करायचो. आम्ही नगराच्या उत्तरेच्या बीचवर वारंवार जायचो. ती एक ओंगळ जागा आहे, जेथे लोक नशा करतात, तसेच तेथे “चेष्टा मस्करीचे” पुष्कळ जोड आहेत. मी “एदेनची बाग” म्हटलेल्या पट्टी जोडच्या समोर असलेल्या पायवाटेच्या बाजूला प्रचार करतो!!!

एका रात्री लहान मुलांनी माझ्याकडे एका तरुणास आणले. त्यांने मला सांगितले की त्या महागड्या हिरॉईनची सवय आहे. त्यापासून त्याला सुटका हवी होती असे त्यांने सांगितले. मी जसा त्याच्याशी बोलू लागलो तेव्हां मला कळले की तो गंभीर आहे. शेवटी संध्याकाळी मी

त्याला सांगितले माझ्या कारमध्ये ये आणि मी त्याला परत माझ्या अपार्टमेंटमध्ये नेले. मी त्याला माझ्या स्वयंपाक खोलीत ठेवले, माझ्या झोपण्याच्या खोलीच्या दारला कुलुप लावले, आणि मी झोपी गेलो.

स्वयंपाक खोलीतील फरशीवर पुढील कांही दिवस तो नशा सोडण्याच्या भयंकर लक्षणांमधून त्याला जावे लागले. शेवटी कसातरी तो शांत झाला आणि मला विचारले की कोणाकडे गिटार आहे का. आमच्याकडे लहान मुले होती त्याच्यासाठी एक आणा. वेदना होत असतांनाच तो फरशीवर बसला. त्यांने मग गीताची

विचारणा केली. त्याच्यासाठी आम्ही एक गीत आणले व तो त्या गीतासाठी एक चाल लावू लागला. मी त्या मुलाचे खरे नाव विसरलो. मी त्याला नेहमी डीए अशी हाक मारतो, म्हणजे ड्रग अडीक्ट (व्यसनाधीन)!

एके दिवशी मला डीए म्हणाला, “हे ऐका.” त्याने गिटार उचलले, उपासना संगीत उघडले, व अल्बर्ट मिडलेन (1825-1909) यांचे गीत, “रिवायव्ह दाय वर्क” नवीन चालीत गायले. अगदी मधूर चाल! आम्ही त्या दिवशी डीएच्या चालीवर ते गीत गायले!

हे प्रभू, तुझे कार्य संजीवीत कर! तुझे सामर्थ्यशाली हात मोकले कर;
   असे शब्द बोल ज्याने मेलेले उठतील, आणि तुझे ऐकणारे लोक कर.
संजीवीत कर! संजीवीत कर! आणि ताजा अभिषेकाचा वर्षाव कर;
   सर्व महिमा केवळ तुझाच आहे; आशिर्वाद आमचे आहेत.
(“रिवायव्ह दाय वर्क” अल्बर्ट मिडलेन यांच्याद्वारा, 1825-1909).

मी लॉस एंजिल्सला घरी आलो, आणि डीएचा संपर्क क्रं. हरविला. जीवन पुढे गेले व आम्ही जेथे जमतो तेथे मंडळीची इमारत उभी आहे. एके रात्री फोन वाजला. मी माझ्या ऑफिसमध्ये गेलो व “हॅलो” म्हणालो. फोनमधील आवाज म्हणाला, “अहो, डॉ. हायमर्स, मी डीए आहे.” मी म्हणालो, “कोण?” तो म्हणाला, “डीए. तुम्हांला आठवतं, नशा करणारा — डीए.” मी जवळजवळ पडलो. जवळजवळ तीस वर्षे त्याचा आवाज ऐकला नव्हता! मी म्हणालो, “तूं कोठे आहेस?” तो म्हणाला, “मी फ्लोरिडात आहे. मी विवाहित आहे. मला दोन मुले, आणि चांगली पत्नी आहे. मी आमच्या शब्बाथ शाळेत मुलांना शिकवितो.”

मी आनंदाने हसलो! मी त्या रात्री सर्ववेळ गीत गात राहिलो! ती अशी वेळ होती त्यांने मी इतका आनंदी झालो की मी 60 वर्षाच्या माझ्या सेवेच्या काळात हरवून गेलो. शेवटी मी सहन केलेले दु:ख व भोगलेल्या वेदनांचे सार्थक झाले! डीए सारख्या, तरुणांना जिंकीत, माझा आनंद पूर्ण झाला!

मी विचार करतो की सर्व तरुण मुले तारण पावलें तेव्हां वेदना व दु:ख वितळून गेले. माझ्या साठ वर्षाच्या सेवेने मला खूप आनंद झाला. मी कशासाठीहि सेवा व्यापार करीत नाही!

नेहमी प्रमाणे, मला दोन मिनिटे शुभवर्तमानाचा उलगडा करण्यास घेतली. येशू स्वर्गातून एका मुख्य कारणांसाठी आला — तो आमच्या पापासाठी मोबदला देण्यास वधस्तंभावर मरण्यास आला. तो पुनरुत्थान दिवशी, तो देहाने, मांसाने आणि हाडाने उठला. पापापासून शुद्धता मिळावी म्हणून त्यांने आपले अमुल्य रक्त सांडले. त्यांने त्याच्यावर विश्वास ठेवण्यास सांगितले, आणि आपण आपल्या पापापासून शुद्ध होऊ.

मी परिपूर्ण होऊन मी तारण मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. मी परुशी होतो. पण 28 सप्टेबर, 1961 मध्ये बिओला महाविद्यालयात, मी येशूवर विश्वास ठेवला. हे ते गीत होते ज्याने मला ख्रिस्ताकडे आणले:

लांब माझा बंदिस्त आत्मा घाल
   पाप व नैसर्गिक रात्री घट्ट बांधला.
तुझ्या डोळ्यातूंन वेगवान किरणे बाहेर पडतात,
   मी जागा झालो, अंधार कोठडीत प्राकाशाच्या ज्योति आल्या.
माझ्या साखळ्या गळून पडल्या, आणि माझे ह्दय मुक्त झाले,
   मी उठलो, पुढे गेलो, आणि त्याच्या मागे गेलो.
अद्भूत प्रीति! ते कसे असू शकते
   ती तुझी, माझा देव, तूं माझ्यासाठी मेला?
(“न्ड कॅन इट बी?” चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).

येशूने देहधारणा केलेली आहे. तो माझ्यासाठी मेला. मी त्याचा नव्याने विचार करतो. मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला. ही माझी प्रार्थना आहे की तुम्ही येशूवर विश्वास ठेवावा व तारण मिळवावे. त्यानंतर पवित्रशास्त्रावर-विश्वास ठेवणा-या मंडळीत जा आणि आपले जीवन ख्रिस्तासाठी जगा.

आणि मी सर्वांना सांगतो, “सर्व विपरीत परिस्थितीत व सर्व विपरीत भीतीत त्यांने मला आशिर्वादित केले तसे तो तुम्हांला आशिर्वादित करो.” “माझी मुले सत्यात चालतात याहून मला मोठा आनंद नाही” (III योहान 4). आमेन.

आता मी उपदेशाच्या समाप्तीस, पुन्हां एकदा रेव्ह. जॉन कागॅन यांच्या कार्यक्रमाकडे वळतो. (जॉन डॉ. व मिसेस हायमर्स यांचा वाढदिवस दोन केकसोबत घोषित करतो, आणि “हॅपी बर्थडे टू यु” म्हणतो)


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी शास्त्रभाग मि. जॉन वेस्ली यांच्याद्वारा वाचण्यात आला: स्तोत्र 27:1-14.
एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले:
     “मस्ट जीजस बिअर द क्रॉस अलोन” (थॉमस शेफर्ड यांच्या द्वारा, 1665-1739;
     पहिले व शेवटले कडवे “द मास्टर हॅथ कम”(सारा दौडनी, 1841-1926; शेवटची दोन कडवी).