Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
फटके मारणे, केस उपठणे, उपमर्द व छिथू करणे

THE SMITING, PLUCKING, SHAME AND SPITTING
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 25 मार्च, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, March 25, 2018

“मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली, केस उपठणा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही”
     (यशया 50:6).


यशयामधील हा सेवकाचा तिसरा उतारा आहे ज्यात ख्रिस्ताच्या दु:खसहना संबंधी अगदी परिपूर्ण भविष्यवाणी केली आहे. हा तो शास्त्रभाग जो, येशूने इतर शास्त्रभागाप्रमाणे याचाहि उल्लेख आपल्या शिष्यांना बोलतांना केला आहे,

“तेव्हां त्याने बारा जणांस जवळ घेऊन म्हटले; पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहों, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांच्या द्वारे लिहण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत; म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील, आणि तो तिस-या दिवशी पुन्हां उठेल” (लुक 18:31-33).

यशया 50:6 ची उल्लेखनीय भविष्यवाणी दुस-या कोणाला नव्हे परंतू येशूला संदर्भित करते. ती येशूच्या द्वारे अगदी परिपूर्ण झाली होती.

“मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली, केस उपठणा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).

या उता-यातून आज संध्याकाळी मी तीन महान गोष्टी आपल्यापुढे आणणार आहे.

I. प्रथम, येशूने स्वत:ला छळ करणा-यांपुढे “दिले”!

डॉ. स्ट्रॉँग (5414) हे इब्री शब्द “नाथान” याचा अर्थ “देणे” असा सांगतात. खरोखर, येशूने आपली पाठ मारणा-यांपुढे “दिली”. केस उपठणा-यांपुढे आपले गाल “दिले”. “उपमर्द व छिथू करणा-यांपुढे” आपले तोंड “दिले”. येशू म्हणाला,

“मी आपला प्राण घेण्याकरिता देतो...कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो” (योहान 10:17-18).

पुन्हां, गेथशेमाने बागेत, त्याला अटक करण्यास आले तेव्हां, येशू पेत्रास म्हणाला,

“तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आतांच्या आतां तो मला बारा सैन्यांच्या तुकड्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे?” (मत्तय 26:53-54).

सैन्य त्याला न्यावयास आले तेव्हां, येशू त्यांना अडविण्यास 72,000 हजार देवदूत बोलावू शकला असता. परंतू त्याने मुद्दामहून असे करण्यास नकार दिला. होय, तारणा-यांने “मारणा-यांपुढे” आपली पाठ, आपले गाल आणि आपले तोंड “दिले”. ह्या जगात येण्याचा, म्हणजे त्याच्या लोकांना तारावयाचा, त्याच्याकडे येणा-या सर्वांस मुक्ति देण्याचा त्याचा उद्देश पूर्णत्वास त्या दु:खसहनास त्याने स्वत:ला “दिले”. त्याने,

“सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वत:ला दिले” (I तिमथी 2:6).

त्याने,

“आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून ख्रिस्ताने तुमच्याआमच्या पापाबद्दल स्वत:ला दिले” (गलती 1:4).

त्याने,

“स्वत:ला आपल्याकरिता दिले, ह्यासाठी की, त्याने खंडणी भरुन आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे” (तितास 2:14).

तो म्हणाला,

“मी आपला प्राण घेण्याकरिता देतो...कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो” (योहान 10:17-18).

त्याने स्वत:ला छळ, उपमर्द व छिथू करण्यास दिले कारण तो तुम्हांवर प्रीति करितो! तो म्हणाला,

“आपल्या मित्रांकरिता आपला प्राण द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीति मोठी नाही” (योहान 15:13).

ह्याच उद्देशाकरिता येशू स्वर्गीय सिंहासनातून खाली आला: आम्हांस जीवन मिळावे म्हणून छळ व उपमर्द करणा-यांस स्वत:ला दिले! अरे, किती सुंदर विचार! तो म्हणतो, “मी आपली पाठ मारणा-यांपुढे देतो कारण मी तुम्हावर प्रीति करितो. मी आपले गाल केस उपठणा-यां पुढे केले कारण मला ठाऊक होते की तुम्हांस सोडविण्याचा हाच केवळ मार्ग होता. मी आपले तोंड उपमर्द व छिथू करणा-यां पुढे दिले कारण शेवटच्या न्यायापासून तुमचे तोंड वाचवावे!” त्याने आपला प्राण भयंकररित्या दिला कारण तो तुम्हांवर प्रीति करितो व तो तुमचा मित्र आहे! “येशू पाप्यांचा मित्र आहे!” उभे राहूया व ते गीत गाऊया!

येशू पाप्यांचा मित्र आहे,
   पाप्यांचा मित्र, पाप्यांचा मित्र;
येशू पाप्यांचा मित्र आहे,
   तो तुम्हांला मुक्त करु शकतो!
(“येशू पाप्यांचा मित्र आहे,” जॉन डब्लू. पीटरसन यांच्याद्वारा, 1921-2006).

“मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली, केस उपठणा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).

II. दुसरे, पापी जीवाला बरे करण्यासाठी येशूने छळ करणा-यांस स्वत:ला “दिले”!

त्याने “मारणा-यांस [आपली] पाठ दिली.” हे हलक्याने घेऊ नका! पवित्रशास्त्र म्हणते,

“नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले” (योहान 19:1).

स्पर्जन म्हणाले,

पिलात, सुभेदाराने, त्याला क्रुर असे फटके मारण्यास दिले...हा चाबूक...बैलाच्या कातड्यापासून बनविलेला होता...त्याच्या टोकाला अनकुचिदार धारधार, मेंढरांची हाडे लावलेली होती, यासाठी की मारल्यानंतर त्या फटक्याबरोबर मांसाचा तुकडा निघावा, ते असा भयंकर फटक्याने साध्य केले जायचे. चाबकांची फटकेमार ही अशी शिक्षा होती जी मृत्यूपेक्षाहि क्रूर होती, आणि खरोखर, पुष्कळांचा ह्या फटक्यांचा मार खाताना, किंवा खाल्ल्यानंतर अंत झालेला आहे. आपला धन्य मुक्तीदाता याने आपली पाठ मारणा-यां पुढे केली, आणि [त्यांनी] त्याच्या पाठीवर खोल [जखमां] केल्या. अरेरे न पाहण्यासारखे दु:ख! ते पाहाणे आपण कसे सहन करु शकू? (सी.एच. स्पर्जन, “द शेम अँड स्पिटींग,” द मेट्रोपोलीटन टॅबरनिकल पुलपीठ, पीलग्रीम पब्लिकेशन्स, 1972 पुनर्मुद्रित, आवृत्ती XXV, पृष्ठ 422).

“मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली, केस उपठणा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).

येशू, तूं मारणा-यांपुढे पाठ का दिली? पुन्हां, यशया याचे आपणांस उत्तर देतो,

“त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांस आरोग्य प्राप्त झाले” (यशया 53:5).

त्याच्या पाठीवरील “फटक्यांनी” आपल्या पापी जीवांस आरोग्य मिळाले! प्रेषित पेत्र जेव्हां म्हणतो व स्पष्ट करितो की,

“त्याने स्वत: तुमची आमची पापें स्वदेही वाहून खांबावर ‘नेली’, यासाठी की, आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झालां आहां” (I पेत्र 2:24).

आपले आत्मे, जे पापाच्याद्वारे नियंत्रित व नाश केले जात होते, ते येशूने सहन केलेल्या फटक्यांनी निरोगी होऊ शकतात!

तो जेव्हां तिबरीयाच्या समुद्राजवळ बसलेला होता तेव्हां मोठा समुदाय त्याच्याकडे आला,

“त्या सर्वांस त्याने बरे केले” (मत्तय 12:15).

जसे त्यांना बरे केले, तसे तुमचे पापी ह्दय, (यिर्मया 17:9) प्रमाणे “सर्वात कपटी ह्दय” सुद्धा बरे करु शकतो. चार्ल्स वेस्ली, त्यांचे नाताळाचे महान गीत “ऐका, घोषणा करणा-या देवदूताचे संगीत” यात म्हणतात की ख्रिस्त हा “त्याच्या पंखात आरोग्य घेऊन उठला आहे...जगाच्या पुत्रांना उठविण्यास जन्मला, त्यांना दुसरा जन्म देण्यास जन्मला.” तुम्ही येशूकडे या आणि तुमच्या आत्म्यातील पापाच्या जखमा त्याला बसलेल्या फटक्यांनी ब-या होतील, आणि तुमचा नवीन जन्म होईल!

III. तिसरे, एक पापी म्हणून, तुमच्या ऐवजी त्याने आपणां स्वत:ला छळ करणा-यांस सोपून “दिले”!

“मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली, केस उपठणा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).

ह्यापेक्षा अधिक स्पष्ट असू शकत नाही:

“खरे पाहिले असता तो आमच्या पापामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांस शांति देणारी अशी शिक्षा त्यास झाली; त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हांस आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकांनी आपआपला मार्ग धरिला होता; अशा आम्हां सर्वांचे पाप परमेश्वराने त्याजवर लादिले” (यशया 53:5-6).

तुम्हांला नरकाच्या भयंकर त्रासातून वाचविण्यासाठी, स्वत: येशू तुमच्या बदली सर्व प्रकारच्या त्रासातून गेला!

“तेव्हां ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपडाका मारल्या” (मत्तय 26:67).

“मग कित्येक जण त्याच्यावर थुंकु लागले, त्याचे तोंड झाकून व त्याला बुक्क्या मारुन म्हणू लागले, आतां दाखव आपले अंतर्ज्ञान! आणि कामदारांनी त्याला चपडाका मारल्या (मार्क 14:65).

“ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारु लागले” (मत्तय 27:30).

“त्यांनी त्याच्या मस्तकावर वेतानें मारिले; ते त्याच्यावर थुंकले आणि गुडघे टेकून त्याला नमन केले” (मार्क 15:19).

“ज्या लोकांनी येशूला धरले होते ते त्याची कुचेष्टा करीत त्यासा मारीत होते. त्यांनी त्याचे डोळे बांधून त्या विचारले, अंतर्ज्ञानाने बोल, तुला कोणी मारले? आणि नाना प्रकारचे अपशब्द बोलून त्याची निंदा केली” (लुक 22:63-65).

“नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले” (योहान 19:1).

“मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली, केस उपठणा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).

जोसेफ हार्ट फार छान म्हणाले,

पाहा येशूकडे किती सहनशीलता आहे,
   [या भयंकर स्थळी] त्याची कुचेष्टा केली!
सर्व समर्थ हातात असणे पाप्यांस बंधनकारक,
   ते निर्माणकर्त्याच्या तोंडावर थुंकले.
(“हिज पॅशन” जोसेफ हार्ट यांच्याद्वारा, 1712-1768; डॉ, हायमर्स यांनी बदल केलेले).

येशू सर्व प्रकारच्या त्रासातून गेला. आणि त्यांनी त्याचे हात व पाय वधस्तंभावर खिळले! त्याने तुमच्या बदली सर्व प्रकारचा छळ व यातनां भोगल्या. त्याने तुमच्या बदली दु:खसहन केले व मरण पावला, तुमच्या पापाचा दंड भरण्यास, आणि तुम्हांला आरोग्य देण्यास व देवासारखे, शुद्ध होण्यास!

“कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेहि पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता, एकदा मरण सोसले. देहरुपांत जिवें मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला” (I पेत्र 3:18).

डॉ. इसाक वॅट्स म्हणाले,

पाहा, त्याचे डोके, त्याचे हात, त्याचे पाय, यातून
   दु:ख व प्रीति खाली ओघळली;
अशा प्रकारची प्रीति व दु:ख कधी भेटली का,
   किंवा काट्यांनी विनलेला सुंदर मुगुट?

संपूर्ण क्षेत्र माझ्या निसर्गाचे होते,
   ते खूप कमी उपस्थित होते;
किती अद्भूत, किती दैवी,
   माझा जीव, माझे जीवन, माझे सर्वस्व याची मागणी.
(“व्हेन आय सर्व्हे द वंड्रस क्रॉस” इसाक वॅट्स यांच्या द्वारा, डी. डी., 1674-1748).

आणि विलीयम विलीयम म्हणाले,

मानवी पापाचे भयंकर ओझे,
   तारकावर लादले होते,
तो, जसे वस्त्राबरोबर तसे दु:खाबरोबर
   पाप्यांकरिता नियोजला होते.
पाप्यांकरिता नियोजला होते.
   (“लव्ह इन अग्नी” विलीयम विलीयम यांच्याद्वारा, 1759).

एमी झबलगा हिचा आमच्या मंडळीत जन्म झाला होता. ती प्रत्येक उपासनेस येत असे. त्यामुळे ती ख्रिस्ती झाली नाही. इतरांप्रमाणे ती सुद्धा स्वभावत: एक पापी होती. ती तिच्या पापाशी झगडत होती. पण एके दिवशी माझ्या उपदेशानंतर ती पुढे आली. ती गुडघ्यावर आली व ख्रिस्तावर विश्वास ठेवला! ती काय म्हणाली ऐका,

“अगाध कुपासारखे माझे पाप वाढले होते. आता मी अधिक सहन करु शकत नाही. मला ख्रिस्त पाहिजे होता! मला त्याचे रक्त पाहिजे होते! मी माझ्या गुडघ्यावर आले व मी येशूवर विश्वास ठेवला. माझ्या मनातील काल्पनिक मुर्ति विषयीच्या भावना, मनोविश्लेषण, आणि खात्रीची अपेक्षा याबरोबर देवाने लढाई केली. मला जाऊ दिले व त्याच्या हातात पडू दिले. चुकीच्या परिवर्तनाच्या भिती, किंवा माझ्यात मला पाहण्याऐवजी आणि जसे मी पूर्वी माझ्या भावना तपासे तसे, मी विश्वासाने ख्रिस्ताकडे पाहिले. जिवंत ख्रिस्ताने मला वाचविले. त्याच्या मोलवान रक्ताने माझे पाप धुतले. त्याने माझ्या पापाचे ओझे दूर केले. येशूने देवाचा क्रोध सहन केला यासाठी की नरकात जाऊ नये. त्याने माझ्या सर्व पापांची क्षमा केली. त्याच्या रक्ताने माझी नोंद “अपराधी नाही” अशी झाली. तो माझा मध्यस्त, माझा मुक्तीदाता, माझा नायक, आणि माझा प्रभू आहे! प्रेषित पौलाप्रमाणे मी एकच म्हणतो, “त्याचे अवर्णणीय दान — येशू याबद्दल धन्यवाद.”

ख्रिस्त तुमचा बदली आहे. तुमच्या पापाचा मोबदला देण्यासाठी — तो तुमच्या बदली मरण पावला. स्पर्जन म्हणाले, “इतर कोणी दुसरे कांहीतरी प्रचार करतील, पण या पुलपीठच्या बाबतीत, ते नेहमी ख्रिस्ताच्या बदली यासंबंधाने बोलते!”

वधस्तंभावरील दु:खसहन व मरण याद्वारे येशूने तुमच्या पापाचा-मोबदला चुकविला आहे! येशूकडे या तो तुमच्या पापाची क्षमा करील आणि तुमच्या जीवास बरे करील! तुम्ही तुमच्या अंत:करण पूर्वक म्हणाल,

मी येत आहे, प्रभू!
   आता तुझ्याकडे येत आहे!
तुझ्या रक्तात मला धू, मला शुद्ध कर
   जे कालवरीवरती वाहिले आहे.
(“आय एम कमींग, लॉर्ड लेवीस हार्टसोग यांच्याद्वारा, 1828-1919”).


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले: “माय जीजस, आय लव्ह दी” (विलियम आर. फिदरस्टोन यांच्या द्वारा, 1842-1878).
“My Jesus, I Love Thee” (by William R. Featherstone, 1842-1878).


रुपरेषा

फटके मारणे, केस उपठणे, उपमर्द व छिथू करणे

THE SMITING, PLUCKING, SHAME AND SPITTING

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“मी मारणा-यांपुढे आपली पाठ केली, केस उपठणा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू यांपासून मी आपले तोंड चुकविले नाही” (यशया 50:6).

(लुक 18:31-33)

I.   प्रथम, प्रथम, येशूने स्वत:ला छळ करणा-यांपुढे “दिले”! योहान 10:17-18;
मत्तय 26:53-54; I तिमथी 2:6; गलती 1:4; तितास 2:14; योहान 15:13.

II.  दुसरे, पापी जीवाला बरे करण्यासाठी येशूने छळ करणा-यांस स्वत:ला “दिले”!
योहान 9:1; यशया 53:5; I पेत्र 2:24; मत्तय 12:15; यिर्मया 17:9.

III. तिसरे, एक पापी म्हणून, तुमच्या ऐवजी त्याने आपणां स्वत:ला छळ करणा-यांस
सोपून “दिले”! यशया 53:5-6; मत्तय 26:67; मार्क 14:65; मत्तय 27:30;
मार्क 15:19; लुक 22:63-65; योहान 19:1; I पेत्र 3:18.