Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते

THIS SAYING WAS HID FROM THEM
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 11 मार्च, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, March 11, 2018

“त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही; आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:34).


लुकाच्या शुभवर्तमानातील, ही तिसरी वेळ आहे की, येशू तो मरणार आहे हे शिष्यांना सांगत आहे (लुक 9:22; 9:44). लुक 18:31-33 मध्ये, येशू स्पष्ट करितो की, तेव्हां तो म्हणाला,

“तेव्हां त्याने बारा जणांस जवळ घेऊन म्हटले; पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहों, आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांच्या द्वारे लिहण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत; म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील, आणि तो तिस-या दिवशी पुन्हां उठेल” (लुक 18:31-33).

ह्या पेक्षा अधिक स्पष्ट काय असू शकते? तरीहि, “त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही: हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:34). मार्क 9:32 म्हणते, “परंतू ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारणायास ते भ्याले” (मार्क 9:32). मार्क 9:32 वर डॉ. ए. टी. रॉबर्टसन प्रतिक्रिया देतात, “त्यांना सतत कांही कळले नाही. [ख्रिस्ताच्या] मृत्यू व पुनरुत्थानासंबंधाने ते अक्षेयवादी [अविश्वासू] होते” (ए.टी. रॉबर्टसन, लिट. डी., वर्ल्ड पिक्चर् इन द न्यू टेस्टामेंट, ब्रॉडमन प्रेस, 1930, आवृत्ती I, पृष्ठ 344; मार्क 9:32 वर टिपण्णी).

प्रेषित पौलाने ख्रिस्ताचे शुभवर्तमान थोडक्यात व स्पष्ट सांगितले,

“शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापाबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिस-या दिवशी त्याला पुन्हां उठविण्यात आले” (I करिंथ 15:3-4).

तरीहि, ह्या समयी, ख्रिस्ताचे शुभवर्तमान बारा शिष्यांना कळले नाही किंवा त्यांनी विश्वास ठेवला नाही.

“त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही; आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:34).

जसे की डॉ. ए. टी. रॉबर्टसन म्हणाले, “[ख्रिस्ताच्या] मृत्यू व पुनरुत्थानासंबंधाने ते अक्षेयवादी [अविश्वासू] होते” (ibid.). अजूनहि बारा शिष्यांचा शुभवर्तमानावर विश्वास नव्हता! मार्क 9:30-32 वर टिप्पणी करतांना डॉ. जे. वरनॉन मॅक् गी म्हणाले, “त्याच्या मृत्यू व पुनरुत्थानासंबंधी त्याने त्यांना कांही पहिल्यांदा सांगितलेले नव्हते, आणि तरीहि त्यांना ते कळले नाही” (जे. वरनॉन मॅक् गी, टीएच.डी., थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 1983, आवृत्ती IV, पृष्ठ 201; मार्क 9:30-32 वरील टिप्पणी).

“त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही; आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:34).

आपणांस उता-यातील तीन शब्द त्यांचा शुभवर्तमानावरील अविश्वास सांगतात.

I. प्रथम, त्यांना शुभवर्तमान कळले नव्हते.

“त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही.” ग्रीक शब्द “कळले” असा अनुवादित केला ज्याचा अर्थ “मानसिकरित्या [कळणे]” (पक्के). ख्रिस्ताने त्यांना सरळ व अगदी खरेखरे सांगितले तरीहि, त्यांना सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ कळला नाही. उतारा म्हणतो, “त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही.” मॅथ्यू पूल म्हणाले, “ते शब्द कळण्यास सोपे होते” (अ कॉमेंट्री ऑन द होल बायबल, द बॅनर ऑफ ट्रुथ ट्रस्ट, 1990 पुनर्मुद्रण, आवृत्ती 3, पृष्ठ 258; लुक 18:34 वरील टिप्पणी), तरीहि, त्यांना सांगितलेल्या गोष्टींचा अर्थ कळला नाही! ख्रिस्ताला “परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल” हे शिष्यांना कळले नाही. “त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील” हे त्यांना कळले नाही. त्याच्या पाठीवर चाबकाने “फटके मारतील” हे त्यांना कळले नाही. ते त्याला वधस्तंभावर खिळून “ठार मारतील” हे त्यांना कळले नाही. तो “तिस-या दिवशी पुन्हा उठेल” हे त्यांना कळले नाही. जसे की आपणांस मार्काच्या शुभवर्तमानात सांगितलेले आहे,

“मनुष्याचा पुत्र माणसांच्या हाती दिला जाणार आहे; ते त्याला जिवे मारतील; आणि मारला गेल्यानंतर तिस-या दिवशी तो पुन्हां उठेल; परंतू ह्या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही व त्याला विचारण्यास ते भ्याले” (मार्क 9:31-32).

त्यांच्या दुर्लक्षाचे मानवी उत्तर विलियम मॅक् डोनाल्ड यांनी दिले आहे,

त्यांच्या मनात एक पक्के होते की राजकीय मुक्तीदाता येऊन त्यांना रोमच्या जोखडातून सोडवील, आणि लगेच आपले राज्य स्थापील, त्यामुळे त्यांनी दुस-या कोणत्या कार्यक्रमावर [विश्वास ठेवणे] नाकारले (विलियम मॅक् डोनाल्ड, बिलीवर्स बायबल कॉमेंट्री, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, 1989 आवृत्ती, पृष्ठ 1440; लुक 18:34 वरील टिप्पणी).

28 जानेवारी, 2006 रोजी यित्झक कादुरी, इस्त्राएल मधील एक गुरु, मरतांना एक नोंदवही सोडली, जी त्यांच्या मरणोपरांत उघडायची होती. मध्य वयस्क गुरुजींचा असा विश्वास होता की दोन मसीहा होते — मसीहा बिन योसेफ जो त्यांच्या पापाकरिता दु:खसहन करण्यास येणार होता, त्याप्रमाणे योसेफाने आपल्या बंधूंकरिता दु:खसहन केले आणि मिसरातील गुलामगीरीतून त्यांना सोडविले, आणि मसीहा बिन दाविद, जो दाविदासारखा त्यांच्या शत्रूंवर विजय मिळविणार आणि त्यांच्यावर राजा म्हणून राज्य करणार. परंतू गुरु कादुरीच्या मृत्यू नंतर त्यांची नोंदवही उघडण्यात आली, तेव्हां त्या नोंदवहीत म्हटले होते की ते एकाच मसीहावर विश्वास ठेवतात. असे म्हटले जाते की मसीहा — येशूआ असे त्याचे नाव प्रकट केलेले इब्रीतील पहिलेच पत्र आहे. मराठीत त्याचे नाव येशू! ह्याचा इस्त्राएलच्या धार्मिक पंडीतांना त्रास झाला. दु:खसहन करणारा व राज्य करणारा मसीहा हा एकच आहे! “दोन मसीहा” हे ख्रिस्ताचे पहिले व दुसरे आगमन होय — ना की दोन मसीहा!

शिष्य मसीहा बिन योसेफची नव्हे, तर मसीहा बिन दाविदाची वाट पाहात होते! दु:खसहन करणा-या (मसीहा बिन योसेफ) मसीहा संबंधी त्यांची मने पूर्वग्रह दुषित होती कारण तात्कालीन यहुदी मसीहा जो त्यांना रोमच्या गुलामगीरीतून त्यांना सोडवणार (मसीहा बिन दाविद) अशा मसीहाची वाट पाहात होते. दोन्ही मसीहा एकच होते हे त्यांना कळले नाही. पाहा माझा उपदेश, “शिष्यांची भीति”— वाचण्यासाठी येथे क्लिक करा. परंतू शुभवर्तमानाकडे दुर्लक्ष करण्यामागे आणखी एक कारण आहे.

आमचा एक तरुण म्हणाला, “पुष्कळदा शुभवर्तमान ऐकून, दर रविवारी ऐकून माझे ह्दय कठीण झाले असे वाटते. शुभवर्तमानाच्या साधेपणामुळे मी निराश झालो...कांहीहि घडणार नाही असा मी विचार करतो...माझ्या भावना व मी स्वत:ला विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करतो. [त्यास मसीहा बिन दाविद हवा होता, मसीहा जो मानसोपचार तज्ञ होईल व त्याचा भावनिक त्रास कमी करील.] येशू माझ्यावर प्रेम करितो हे डॉ. हायमर्सनी मला वारंवार सांगितले. शेवटी मी कांहीहि करायला तयार झालो. मला डॉ. हायमर्सनी जे सांगितले ते केले. मी येशूवर विश्वास ठेवला, कारण तो येशू होता जो वधस्तंभावर खिळला, माझ्या भावना नव्हे. [त्यास मसीहा बिन दाविद हवा होता, मसीहा जो मानसिक आरोग्य देईल.] आणि येशूने आपल्या रक्ताने माझी पापे धुवून शुद्ध केली.” तो तरुण त्या शिष्यांसारखा आहे. त्याने त्याच्या पापाकरिता मरणा-या येशूविषयी ऐकले, परंतू त्याने विश्वास ठेवला नाही. त्याला मानसिक आरोग्य हवे होते, पापाची क्षमा नको होती. आजरात्रौ तुमच्यापैकी कांहीजण त्याच्यासारखे आहांत.

II. दुसरे, शुभवर्तमान त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते.

“त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही; आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते...” (लुक 18:34).

“गुप्त ठेवले” हा शब्द ग्रीकमधून अनुवादित केला आहे ज्याचा अर्थ “लपवलेले, गुप्त ठेवलेले” (पक्के). हा तोच ग्रीक शब्द आहे जो आपणांस योहान 8:59 मध्ये आढळतो जो म्हणतो, “येशू गुप्तपणे निघून गेला.” त्यामुळे, आपल्या उता-यात, “हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते.” येशू गुप्तपणे निघून गेला तेव्हां तेथे तो एक अलौकीक घटक होता, कारण मंदिरात त्यांनी त्याला मारण्याकरिता दगड उचलले (योहान 8:59). आपल्या उता-यातहि तो अलौकीक घटक आहे, “हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते.” लुक 18:34 मध्ये या दोन शब्दावर बोलतांना, डॉ. फ्रँक गएबिलिनचे कॉमेंट्री म्हणते, “लुक हा शिष्यांच्या दुर्लक्षासंबंधी जो कांही समज ते नाकारतात सकृत दर्शनी अलौकीक आहे” (फ्रँक गएबिलिन, डी.डी., सर्वसाधारण संपादक, द एक्सपोजिटर्स बायबल कॉमेंट्री, झोंडेरवॅन पब्लिशिंग हाऊस, 1984 संस्करण, आवृत्ती 8, पृष्ठ 1005, लुक 18:34 वरील टिप्पणी). मी जो विचार करितो तोच ह्या उता-याचा अर्थ आहे. समजपणाचे अलौकीक नाकारणे हे आहे. “आणि हे वचन [शुभवर्तमान] त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते.”

सैतान तुम्हांला बांधून ठेवते. पवित्रशास्त्र म्हणते, “पंरतू आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणा-या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने [सैतानाने] आंधळी केली आहेत” (II करिंथ 4:3-4). त्यामुळे तुम्ही येशूवर विश्वास ठेवण्याऐवजी भावना शोधता!

आपण पाहातो की त्या वेळी शिष्य हे कांही महान संत नव्हते. ते केवळ साधारण माणसे होती. मनुष्य म्हणून, ते तुमच्याआमच्या बाकींच्या सारखे, आदामाचे वंशज होते. अशाप्रकारे, ते “आपल्या पापांत व अपराधांत मेलेले” असे होतो जसा, मी तारणापूर्वी होतो; आणि तसे तुमच्या पैकी कित्येकजण आहेत (इफिस 2:1, 5). आदामाचे वंशज म्हणून त्यांची दैहिक मनें “देवाचे वैरी” होते (रोम 8:7). आदामाचे वंशज म्हणून ते केवळ स्वाभाविक वृत्तीचे होते, आणि “स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्विकारीत नाही” (I करिंथ 2:14). आदामाचे वंशज म्हणून, “ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मुर्खपणाचा आहे” (I करिंथ 1:18). ख्रिस्ताने जसे निकेदमास सांगितले, “तुला नवीन जन्म घ्यावा लागेल” (योहान 3:7), म्हणून शिष्यांनीहि “नवीन जन्म घ्यायला हवा.” त्यांचा कामधंदा सोडून व ख्रिस्ताला अनुसरुन ते नवीन जन्म मिळवू शकत नव्हते. जे कर्माद्वारे तारण असते! तोच तो प्रकार आहे त्याप्रकारे रोमन कॅथलिक अनुवाद करतात! परंतू पवित्रशास्त्र शिकविते की कृपेने तारण आहे, म्हणून कदाचित त्यांना ख्रिस्ताला अनुसरुन तारण मिळू शकले नाही!

“कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही” (इफिस 2:8-9).

यहुदा हा बारा शिष्यांपैकी एक होता. तो नव्याने जन्मला होता काय? ख्रिस्त म्हणाला तो “नाश पावला,” आणि त्यांस “नाशाचा पुत्र” असे म्हटले (योहान 17:12). थोमा नव्याने जन्मला होता काय? पुनरुत्थानानंतर तो लगोलग म्हणाला, “मी विश्वास धरणारच नाही” (योहान 20:25). मला माहित आहे की पेत्राला देवाकडून कांहीतरी प्रकटीकरण होते (मत्तय 16:17) परंतू अगदी कांही मिनिटानंतर “तो मारला जाईल, व तिस-या दिवशी पुन्हां उठेल” असे म्हणत येशूचा त्याने नाकार केला (मत्तय 16:21-22), आणि येशू “पेत्राला म्हणाला, अरे सैताना, माझ्यापुढून निघून जा; तूं मला अडखळण आहेस; कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे [लक्ष] नाही, माणसांच्या गोष्टीकडे आहे” (मत्तय 16:23). पेत्राने स्पष्टपणे शुभवर्तमानाचा नकार केला, आणि सैतानाच्या अधिन होऊन वधस्तंभ व त्याचे पुनरुत्थान त्या रात्री त्याने नाकारले. आज रात्री तुम्ही पेत्रासारखे आहांत. तुम्ही मसीहा बिन दाविदाचा शोध करता आहांत (तुम्हांला चांगले वाटण्यासाठी, तुम्हांला चांगले जीवन देण्यासाठी, तुम्हांला भौतिक गोष्टी देण्यासाठी), मसीहा बिन योसेफचा शोध घेत नाही (वधस्तंभावर तुमच्या पापाचा मोबदला देण्यासाठी).

“त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही; आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते…” (लुक 18:34).

प्रेषित पौल म्हणाला,

“पंरतू आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठायी ती आच्छादलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणा-या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने [सैतानाने] आंधळी केली आहेत...” (II करिंथ 4:3-4).

सैतान तुम्हांला आंधळे करतो यासाठी की तुम्ही तुमच्या पापाची क्षमा झालेली न पाहाता, केवळ भौतिक गोष्टीकडे पाहावे.

होय, तेथे “अलौकीक” आंधळेपणा होता, शिष्यांना सैतानाने बांधलेले होते, तसेच त्यांच्या दैहिक, आदामाच्या स्वभावाद्वारे शुभवर्तमानहि बांधले होते. येशू म्हणाला, “तुमचा पालट होऊन तुम्ही लहान बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” (मत्तय 18:3). हे तो कोणास सांगितले? तो हे “शिष्यांस” म्हणाला (मत्तय 18:1). मत्तय 18: 1-3 काळजीपूर्वक ऐका,

“त्यावेळेस शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठा कोण? तेव्हां त्याने एका बाळकाला बोलावून म्हटले; मी तुम्हांस सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही लहान बालकांसारखे झाल्या शिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” (मत्तय 18: 1-3).

स्वर्गाच्या राज्यात सर्वात मोठे कोण हे शिष्यांना जाणून घ्यायचे होते (मत्तय 18:1). येशूने शिष्यांस म्हटले, “तुमचा पालट होऊन… स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” (मत्तय 18:3).

“त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही; आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते…” (लुक 18:34).

III. तिसरे, अनुभवाने त्यांना शुभवर्तमान समजले नव्हते.

आपल्या उता-याचा शेवट म्हणतो, “सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक18:34). ग्रीक शब्द “लक्षात” हा “ची जाणीव होणे, खातरी होणे, अनुभवाने समज येणे” (जॉर्ज रिकर बेरी, अ ग्रीक-इंग्लिश लेक्सिकॉन ऑफ न्यू टेस्टामेंट सिनॉनिमस, कोडेड टू स्ट्राँग, क्र. 1097). हा तोच शब्द फिलिप्पै 3:10 मध्ये वापरला आहे, “तो त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दु:खाची सहभागिता मी ओळख करुन घ्यावी...” शिष्यांना अनुभवाने शुभवर्तमान कळले नव्हते. त्यांनी वचनें ऐकली होती, परंतू शुभवर्तमानाची सत्यता अनुभवली नव्हती. ते स्वर्गीय राज्यात त्यांच्या पापांची क्षमा नव्हे, तर पारितोषिक शोधित होते. आता संपूर्ण परिच्छेद ऐका. तो लुक 18:31-34 आहे.

“तेव्हां त्याने बारा जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटले; पाहा, आपण वर यरुशलेमेस चाललो आहों आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्ट्यांच्या द्वारे लिहण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत; म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील, त्याचा जीव घेतील, आणि तो तिस-या दिवशी पुन्हां उठेल. त्यांस ह्या गोष्टींपैकी कांहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:31-34).

तुम्ही हे आता पाहू शकता? त्यांस ह्या गोष्टींपैकी कांहीच कळले नाही, आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी (अनुभवाने) त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या.”

सी.एच. स्पर्जन यांची साक्ष ऐका. ते त्यांचे वडिल — सुवार्ता प्रचार करणा-या पाळकाच्या घरी वाढले. ते उन्हाळ्याची सुट्टी आपल्या आजोबाच्या घरी घालवित, जे एक सुवार्ता प्रचारक होते. त्यांच्या संपूर्ण हयातीत, ते दर रविवारी सुवार्ता प्रचार ऐकीत. तरीहि जसे शिष्य पुनरुत्थानापूर्वी होते तसे ते सुद्धा पालट झालेले नव्हते. स्पर्जन म्हणाले,

माझ्या तरुणपणा पर्यंत मी येशूच्या बलिदाना द्वारे जी तारणाची योजना होती ती ऐकली, परंतू त्याविषयी माझ्या अंतरमनात अधिक कांहीच कळले नाही ज्यामुळे मी नव्याने जन्मलो असतो [त्या विधर्मी भूमीत]. परंतू [नंतर] मला जेव्हां कळले...ते माझ्याकडे नवीन प्रकटीकरण, एकदम नवीन जसे मी पहिल्यांदाच वाचले तसे आले आणि विश्वासाने पाहिले की जो देवाचा पुत्र तो मानव झाला आणि, त्याच्या स्वत:च्या आशिर्वादित व्यक्तीसाठी, माझी पातके त्या झाडावर [वधस्तंभावर] आपल्या देहात सहन केली...तुम्ही ते पाहिलेत का? (सी.एच. स्पर्जन, न्यायी देव पापी माणसाला न्यायी ठरवितो?, चॅपेल लायब्ररी, पेन्साकोला, फ्लोरिडा).

स्पर्जन ख्रिस्ताविषयी सर्व कांही जाणून होते. त्यानी तारणाची योजना ऐकली होती. पंरतू त्यांना “ह्या गोष्टींपैकी कांहीच कळले नाही, आणि हे वचन [सुवार्ता] [त्यांच्या] पासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी [अनुभवाने] त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या.” अचानक त्यांच्याकडे शुभवर्तमान आले, अशा सामर्थ्याने, ते म्हणाले, “ते माझ्याकडे नवीन प्रकटीकरण, एकदम नवीन जसे मी पहिल्यांदाच वाचले तसे आले.” नवीन प्रकटीकरण काय होते? ख्रिस्त पापाची क्षमा करितो! त्यांनी आपल्या उरलेल्या आयुष्यात पापा पासून तारणाचा प्रचार केला.

तुमच्या जीवास तुमच्या पापाचे ओझे जाणवते — आणि तुम्ही पुनरुत्थित ख्रिस्ताकडे आकर्षित होता — तेव्हांच तो खरा पालट होय. कोणी तरी मला म्हटले, “पवित्रशास्त्र कुठे शिकविते की शिष्यांचा पुनरुत्थित ख्रिस्ताशी सामना होऊन पालट झाला?” उत्तर सोपे आहे — चारी शुभवर्तमानाच्या शेवटी — मत्तय 28 मध्ये; मार्क 16; लुक 24 (विशेषत: वचन 36-45 मध्ये स्पष्ट आहे); आणि योहान 20:19-22 मध्ये. डॉ. जे. वरनॉन मॅक् गी, अमेरिकेचे सुप्रसिद्ध पवित्रशास्त्राचे शिक्षक, योहान 20:22 वर म्हणाले, “माझा वैयक्तिक असा विश्वास आहे की ज्याक्षणी येशूने त्यांच्यावर फुंकर टाकली, आणि म्हणाला, ‘पवित्रआत्म्याचा स्विकार करा’ त्यानंतर ती माणसे [पुनर्जन्मले] नव्याने जन्मले आहेत. त्यापूर्वी ते [नव्याने जन्मले] नव्हते.” त्यांनी भौतिक सुखाच्या मागे जाण्याचे सोडले, ते ख्रिस्ताला सोडून गेले आणि ते पापी आहेत हे जेव्हां त्यांना कळून आले केवळ तेव्हांच त्यांचा नव्याने जन्म झाला. तुमच्या पापामुळे जोवर तुम्हांला त्रास होत नाही तोवर तुमचे तारण होत नाही. केवळ तेव्हांच तुमचे येशूच्या द्वारे तारण होणार. (पाहा जे. वरनॉन मॅक् गी, टीएच.डी., थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन पब्लिशर्स, आवृत्ती IV, पृष्ठ 498; योहान 20:21 वरील टिप्पणी). तुम्ही मॅक् गी यांना इंटरनेटवर www.thruthebible.org. येथे ऐकू शकता.

आता तुम्हांस तुमच्या पापाची जाणीव पवित्र आत्म्याने करुन द्यावी, देवाच्या आत्म्याने तुमचे अंत:करण उघडावे, आणि ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताने तुमचे पाप धुतले जाण्यास, येशू ख्रिस्त, देवाचा पुनरुत्थित पुत्र याकडे तुम्ही ओढले जावे म्हणून आमची प्रार्थना आहे.

आमच्या मंडळीतील एक तरुण स्त्री म्हणाली, “मी स्वार्थी, मत्सराने भरलेली, इतरांचा राग करणारी होते. मला जे वाटायचे त्यावर माझा ताबा नसायचा. मी माझ्या पापी स्वभावात येशूला नाकारले. माझा खोटा पालट झाला होता कारण मी येशूवर नव्हे तर माझ्या बुद्धीवर विश्वास ठेवला होता. [पालट न झालेले शिष्य भौतिक सुखाच्या मागे लागले होते, त्यानंतर पापापासून तारण्यासाठी ख्रिस्ताच्या दु:खसहनाचे खूप महत्व आहे ह्याची जाणीव झाली तशी ती होती.] माझे मला तारण हवे होते. मी स्वत:हून जेवढा प्रयत्न करायची तेवढी मी पापात जायची. त्यानंतर मला कळून चुकले की येशूने माझ्यासाठी वधस्तंभावर नरक यातना भोगल्या आहेत. मग मी त्याचे प्रेम कशी काय नाकारु शकते? आता माझ्याकडे येशू आहे, जो माझ्यावर इतर कोणापेक्षाहि अधिक प्रेम करितो...मी माझ्या उर्वरित आयुष्यात त्याच्यावर विश्वास ठेवणार.”

“जीजस पेड इट ऑल” ह्या गीताने सर्वजण मॅक गीच्या कार्यक्रमाची सांगता करीत.

तारणारा बोलतांना मी ऐकले, “तुझी शक्ति खरोखर कमी आहे,
अशक्त मुला, जागृत राहा व प्रार्थना कर, माझ्यामध्ये तुझे सर्वस्व शोध.”
येशूने सर्व किंमत मोजली आहे, मला त्यांस सर्वस्व देणे आहे;
माझे किरमिजी रंगाचे पाप नाहीसे होऊन, ते त्याने बर्फाहून शुभ्र केले.

प्रभू, आता खरोखर तुझे सामर्थ्य मला मिळाले, आणि केवळ तुझेच,
कुष्ठ रोग्याचा डाग घालवितो, आणि पाषाणमय ह्दय मऊ करितो.
येशूने सर्व किंमत मोजली आहे, मला त्यांस सर्वस्व देणे आहे;
माझे किरमिजी रंगाचे पाप नाहीसे होऊन, ते त्याने बर्फाहून शुभ्र केले.

तुझी कृपा मागावी असे कांही माझ्याकडे नव्हते –
कालवरीच्या कोक-याच्या रक्ताने मी माझी वस्त्रे शुभ्र करीन.
येशूने सर्व किंमत मोजली आहे, मला त्यांस सर्वस्व देणे आहे;
माझे किरमिजी रंगाचे पाप नाहीसे होऊन, ते त्याने बर्फाहून शुभ्र केले.

आणि जेव्हां, त्याच्या सिहांसनापुढे, पूर्णत: त्याच्यात मी उभा राहतो,
“मला तारण्यासाठी येशू मेला,” माझे ओठ पुन्हा म्हणते.
येशूने सर्व किंमत मोजली आहे, मला त्यांस सर्वस्व देणे आहे;
माझे किरमिजी रंगाचे पाप नाहीसे होऊन, ते त्याने बर्फाहून शुभ्र केले
   (“जीजस पेड इट ऑल” एलविना एम. हॉल यांच्या द्वारा, 1820-1889).

ह्या उपदेशापूर्वी मि. ग्रिफिथ यांनी सुंदर गीत गायले “इन क्राईस्ट अलोन.” प्रेसबिटेरियन चर्च (युएसए) यांनी त्यांच्या उपासना गीतांतून हे गीत वागळले कारण लेखकांने दुस-या कडव्यातील, “देवाचा क्रोध शांत झाला होता” हे शब्द बदलण्यास नकार दिला. खरेतर त्या गीतातील शब्द हे अगदी बरोबर होते! मि. ग्रिफिथ हे पुढे येऊन गातील ते ऐका.

केवळ ख्रिस्तात माझी आशा सापडते;
तो माझा प्रकाश, माझे सामर्थ्य, माझे गीत आहे;
ही कोनशिला, ही खंबीर जमीन,
दुष्काळ व वादळातहि स्थिर व अटळ.
केवढी प्रीतीची उंची, केवढी शांतीची केली,
जेव्हां भीति थांबते, जेव्हां प्रयत्न संपतात!
माझा सांत्वनदाता, माझे सर्वातील सर्व —
येथे मी ख्रिस्ताच्या प्रीतीत उभा राहतो.

केवळ ख्रिस्तात, जो देहधारी झाला,
असाहाय्य मनुष्यामध्ये देवाचे पूर्णत्व!
हे प्रीती व नीतिमत्वाचे दान,
जो तारावयास आला त्याची निंदा केली.
मरण तेहि वधस्तंभावरचे मरण पत्करले,
देवाचा क्रोध शांत झाला होता;
प्रत्येक पाप जे त्याच्यावर लादले त्यासाठी-
ख्रिस्ताच्या मरणात मी जगतो.

त्याला पुरले ती भूमि आहे,
जगाचा प्रकाशाला अंधकाराने वधिले;
मग गौरवाच्या दिवशी उदयास येणार,
कबरेतून तो पुन्हां उठला!
आणि जसा तो विजयात उभा राहतो,
पापाच्या शापाने माझ्यावरील पकड सैल केली;
कारण आता मी त्याचा व तो माझा आहे —
ख्रिस्ताच्या मौल्यावान रक्ताने विकत घेतले.

माझ्या जीवनात अपराधीपणा, मरणाची भीति नाही —
हे माझ्यातील ख्रिस्ताचे सामर्थ्य होय;
जीवनाच्या पहिल्या रडण्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत,
येशू माझ्या ध्येयावर अधिकार गाजवितो.
नरकाचे सामर्थ्य नाही, माणसाची योजना नाही,
त्याच्या हातातून मला कोणीहि हिरावित नाही;
तो परत येई किंवा मला घरी बोलावी पर्यंत —
येथे ख्रिस्ताच्या सामर्थ्यात मी उभा राहीन.
(“इन क्राईस्ट अलोन” किथ गेट्टी आणि स्टुअर्ट टाऊनएंड यांच्या द्वारा, 2001).

आता मि. ग्रिफिथ दुसरे कडवे पुन्हां गातील ते ऐका.

केवळ ख्रिस्तात, जो देहधारी झाला,
असाहाय्य मनुष्यामध्ये देवाचे पूर्णत्व!
हे प्रीती व नीतिमत्वाचे दान,
जो तारावयास आला त्याची निंदा केली.
मरण तेहि वधस्तंभावरचे मरण पत्करले,
देवाचा क्रोध शांत झाला होता;
प्रत्येक पाप जे त्याच्यावर लादले त्यासाठी-
ख्रिस्ताच्या मरणात मी जगतो.

आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

एकेरी गीत मि, बेंजामिन किनकैड ग्रिफिथ यांनी गायले:
“इन क्राईस्ट अलोन” (किथ गेट्टी आणि स्टुअर्ट टाऊनएंड यांच्या द्वारा, 2001).
“In Christ Alone” (by Keith Getty and Stuart Townend, 2001).


रुपरेषा

हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते

THIS SAYING WAS HID FROM THEM

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“त्यांस ह्या गोष्टीपैकी कांहीच कळले नाही; आणि हे वचन त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते आणि सांगितलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या नव्हत्या” (लुक 18:34).

(लुक 18:31-33; मार्क 9:32; I करिंथ 15:3-4)

I.   प्रथम, त्यांना शुभवर्तमान कळले नव्हते, लुक 18:34a; मार्क 9:31-32.

II.  दुसरे, शुभवर्तमान त्यांच्यापासून गुप्त ठेवण्यात आले होते, लुक 18:34b;
योहान 8:59; II करिंथ 4:3-4; इफिस 2:1, 5; रोम 8:7; I करिंथ 2:14; 1:18;
योहान 3:7; इफिस 2:8-9; योहान 17:12; 20:25; मत्तय 16:17, 21-22, 23;
मत्तय 18:1-3.

III. तिसरे, अनुभवाने त्यांना शुभवर्तमान समजले नव्हते, लुक 18:34c; फिलिप्पै 3:10.