Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
तीन शब्द आरंभीच्या मंडळीचे गुपित प्रकट करते!

THREE WORDS GIVE THE SECRET
OF THE EARLY CHURCH!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 19 नोव्हेंबर, 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, November 19, 2017

“ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुति करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे”
    (प्रे.कृ. 2:46, 47).


आपल्या मंडळ्या बिघाड व मृतवत झालेल्या आहेत. 16 ते 30 वयोगटातील 88% तरुणांना त्या गमावित आहेत. जॉर्ज बर्ना, प्रसिद्ध सार्वजनिक सर्व्हेक्षण करणारे, हे वर्षोन वर्षे आपणास सांगत आहेत. “द सदर्न बॅप्टिस्ट कौन्सिल कौटुंबिक जीवनांवर” सांगतात, “घरी सुवार्ता सांगितलेल्या मुलांपैकी 88% मुले वयाच्या [साधारणपणे] 18 व्या वर्षी मंडळी सोडून जातात, ती परत कधीच येत नाहीत” (बॅप्टिस्ट प्रेस, 12 जून, 2002). तसेच, हे सर्वश्रृत आहे की मंडळ्या जगातील तरुणांना क्वचितच जिंकतात. डॉ. जेम्स डॉब्सन म्हणाले, “मंडळ्यांची 80% वृद्धि ही सभासदत्वांच्या बदलीमुळे होते” (“फोकस ऑन द फॅमिली न्युजलेटर,” ऑगष्ट 1998). जेन हॅटमेकर, एक सुवार्तिक लेखक, म्हणाले, “आपण केवळ नवीन लोकांना [मंडळीकडे] आणत नाही, आपल्या जवळ आहेत केवळ त्यांनाच राखू शकत नाही. गेल्या वर्षी जवळजवळ अर्ध्या अमेरिकेतील मंडळ्यांमध्ये नवीन एकहि व्यक्ति पालट होऊन वृद्धि झाली नाही...नव्हे 94% मंडळ्यांची वृद्धिच झाली नाही किंवा ज्या समाजात सेवा करतात त्या [लोकांना] गमाविले आहे...कल हा कमी होण्याचा आहे, आणि ह्या वेगाने, [मूळ ख्रिस्तीपणा ‘तग धरुन राहणे’]” (अनुवादित: जेव्हां येशू तुमचा आरामदायी ख्रिस्तीपणा मोडून काढतो, नवप्रेस, 2014, पृष्ठ 79,80).

आत सदर्न बाप्टिस्टकडे पाहा. “कॅलिफोर्निया सदर्न बाप्टिस्ट” मधील कॅरोल पाईप यांच्या अहवाल सांगतो, “मंडळ्यांनी [मागील वर्षी] 200,000 पेक्षा जास्त सभासद गमाविले, 1881 पासूनची एका-वर्षातील सर्वात मोठी घट आहे (वार्षिक मंढळीची माहिती)... 1947 पासून मागील वर्षी सर्वात कमी घटीसह, मागील 10 वर्षापैकी 8 वर्षात बाप्टिस्ट पतन झाले अशी माहिती मिळते. थोम रॅनियर [SBC अधिकारी] म्हणाले, ‘माझे अंत:करण तुटते यासाठी की आपल्या पंथाचा उद्देश...खालावत आहे.’ डॉ. फ्रँक पेज, [आणखी एक सदर्न बाप्टिस्ट पुढारी] म्हणाले, ‘सत्य हे आहे की, आपल्या मंडळ्यात कमी लोक आहेत जे कमी पैसे देतात कारण आपण ख्रिस्तासाठी लोकांना जिंकत [नाही], आणि त्यांना आपल्या प्रभूची शिस्त आपण शिकवित नाही.’ ते पुढे म्हणतात, ‘देवा आम्हांला क्षमा कर...प्रभू आपणांस पहिल्या शतकातील मंडळीप्रमाणे...शिष्यत्वासंबंधी गंभीर होण्यास सहाय्य करो.’” (ibid., पृष्ठ 4).

हे अमेरिकेतील मंडळ्यांचे उदास, निराशाजनक चित्र आहे. ते त्यांचे सभासद गमावित आहेत, आणि हरविलेल्या जगातून क्वचितच मिळवीत आहे. हरविलेल्या जगातून महान मंडळ्यां सुद्धा परिवर्तन झालेल्या लोकांची भर क्वचितच घालतायेत.

हे अमेरिका व पश्चिम जगतातील मंडळ्यांचे निराशाजनक चित्र आहे. आता प्रेषितांच्या कृत्यांतील आरंभीच्या मंडळी बरोबर तुलना करा. आपला उतारा मी पुन्हां वाचतो,

“ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुति करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे” (प्रे.कृ. 2:46, 47).

किती मोठा विरोधाभास हा! ते आनंदाने भरले होते! ते दररोज एकत्र जमत! ते सातत्याने देवाची स्तूती करीत! “आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे” (प्रे.कृ. 2:47).

डॉ. मार्टिन लॉईड-जोन्स म्हणाले, “जेथे जाववयाचे ते प्रेषितांच्या कृत्यांचे पुस्तक आहे. हे शक्तिवर्धक औषध [ताकदीचे औषध] आहे, हे उत्साहाचे स्थळ आहे, जेथे आपण आरंभीच्या मंडळीमधील धडधडणा-या देवाचे जीवन अनुभवतो” (ऑथेन्टीक ख्रिस्टीयानिटी, आवृत्ती 1 (प्रे. कृ. 1-3), द बॅनर ऑफ ट्रुथ ट्रस्ट, पृष्ठ 225). पहिल्या शतकातील मंडळीचा आनंद, आवेश आणि सामर्थ्य यासंबंधी वाचून अंत:करण रोमांचित होते! डॉ. मायकल ग्रीन यांचे पुस्तक, आरंभीच्या मंडळीतील सुवार्ताकार्य (एर्डमन, 2003 आवृत्ती). हे पुस्तक, तसेच प्रेषितांच्या कृत्यांचे पुस्तक वाचून, मला नवीन करारातील पुष्कळ ग्रीक शब्द आढळले जे पहिल्या शतकातील मंडळीच्या जीवनाचे चित्र दर्शविते.

I. प्रथम, तेथे ग्रीक शब्द “क्युरिओस” आहे.

ह्याचा इंग्रजीत अर्थ “लॉर्ड” असा आहे. ह्याचा अर्थ “प्रभू,” “धनी,” “स्वामी,” “राज्य करणारा” असा होतो. हा तो शब्द आहे जो पेत्र प्रेषितांच्या कृत्यें 10:36 मध्ये येशूविषयी बोलतांना वापरतो,

“येशू ख्रिस्त (तोच सर्वांचा प्रभू आहे) ह्याच्या द्वारे देवाने शांतीच्या सुवार्तेची घोषणा करिताना” (प्रे.कृ. 10:36).

आरंभीचे ख्रिस्ती येशूविषयी कसे साक्षी झाले व कशी सुवार्ता सांगितली हे डॉ. ग्रीन सांगतात ते ऐका.

येशू हा मसिहा आहे, किंवा त्याच्याद्वारे प्राचिन अभिवचने पूर्ण झालीत अशाप्रकारची सुवार्ता त्यांना सांगतांना आपण पाहतो. येशूच्या द्वारे शांतीची सुवार्ता, येशूचे स्वामीत्व, येशूचे पुनरुत्थान, किंवा स्वत: येशूची घोषणा करतांना त्यांना आपण पाहतो...आरंभीच्या सुवार्तिकांकडे एकमेव विषय होता, केवळ येशू!...ओरिजन (185-254) म्हणाले, “एक चांगली गोष्ट म्हणजे जीवन आहे: परंतू येशूच केवळ जीवन आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे जगाचा प्रकाश आहे: परंतू येशूच हा प्रकाश आहे. तेच सत्य, दार, पुनरुत्थान याविषयी सांगितले जाईल. ह्या सर्व गोष्टी तारणारा शिकवितो की तो तोच आहे.” “मूळ प्रेषित व [जे त्यांच्याकडून शिकले] त्यांच्याकडून सांगितली जाणारी [सुवार्ता] ही ख्रिस्त केंद्रीत होती हे ओरिजन पुन्हां सांगतात”...ओरिजन यांनी सुवार्तिक प्रचाराचा संपूर्ण उद्देश दिला आहे: “पृथ्वीवर ख्रिस्ताच्या जीवनाचे व त्याच्या दुस-या आगमनाचे ज्ञान चिरस्थायी करण्यासाठी” (ग्रीन, ibid., पृष्ठ 80,81).

आरंभीचे ख्रिस्ती लोक स्वयं-साहाय्यता उपदेश ऐकत नसत. ते पवित्रशास्त्राचे वचना मागून वचनाचे “स्पष्टीकरण” ऐकत नसत. ते सतत शुभवर्तमान — “क्युरिओस,” म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू, पुरले जाणे आणि पुनरुत्थान याविषयी ऐकत असत! “तोच सर्वांचा प्रभू आहे” (प्रे.कृ. 10:36).

दुस-या मंडळीतील एकाने मी माझा उपदेश मृत्यू व पुनरुत्थान याने शेवट केला म्हणून टिका केली. मी त्याचा बराच वेळ विचार केला. मग मला स्पर्जन काय म्हणाले ते आठवले, “मी एक उतारा घेतो, स्पष्टीकरण करतो, आणि वधस्तंभास मधमाशी रेषा [एक सरळ रेषा] मारतो.” स्पर्जन, आरंभीच्या ख्रिस्ती लोकांप्रमाणे, अगदी ख्रिस्त केंद्रित — स्वत: येशू ख्रिस्तावर लक्ष होते, प्रभू येशू ख्रिस्त! आरंभीच्या मंडळीने हे समुहगीत चांगले गायले असेल,

तूं प्रभू आहेस, तूं प्रभू आहेस,
   तूं मरणांतून पुन्हां उठला आहेस
आणि तूं प्रभू आहेस.
   प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जिव्हा कबूल करील,
तो येशू ख्रिस्त प्रभू आहे.
   (“यु आर लॉर्ड” मार्विन व्ही. फ्रे यांच्याद्वारा, 1918-1992).

माझ्या बरोबर हे गा!

तूं प्रभू आहेस, तूं प्रभू आहेस,
   तूं मरणांतून पुन्हां उठला आहेस
आणि तूं प्रभू आहेस.
   प्रत्येक गुडघा टेकेल, प्रत्येक जिव्हा कबूल करील,
तो येशू ख्रिस्त प्रभू आहे.

पहिला शब्द “क्युरिओस,” हे दर्शवितो की ख्रिस्त हा त्यांच्या संदेशाचा मुख्य मुद्दा आणि त्यांच्या जीवनाचा प्रभू आहे! पौल असा म्हणाला त्यात कांही आश्चर्य नाही,

“आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो”(I करिंथ1:23).

“कारण येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी तुमच्याबरोबर असतांना दुसरे कांही जमेस धरु नये असा मी ठाम निश्चय केला” (I करिंथ 2:2).

आम्ही सातत्याने वधस्तंभावर खिळलेला व मरणातून उठलेला ख्रिस्त गाजवायला हवा. आणि आपला तोच मुख्य संदेश, सदा व सर्वदा असला पाहिजे! मला माहित आहे पुष्कळ मंडळ्या असे करीत नाहीत. आणि तेच मुख्य कारण आहे की ते आज मरत आहेत!

मुस्लिम कट्टरवादी लोकांना त्यांच्याबरोबर येण्यास व मरण्यास बोलावितात. अमेरिका व पश्चिम जगातून हजारो तरुण मुले तसे करतात. इसिस त्यांच्याकडे येते आणि त्यांच्या भोवती बांधते, आणि लोकांना मारण्यास जाण्यास सांगते. येशू तुम्हांस करावयास सांगतो ते हे नव्हे. सार्वकालिक जीवनाच्या देणगीसाठी तो आपणांस बोलावितो. ख्रिस्त म्हणाला, “मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीहि नाश होणार नाही” (योहान 10:28). आणि प्रभू येशू ख्रिस्त तुम्हांस शिष्य होण्यास बोलावितो. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्यांने स्वत:चा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे” (मत्तय 16:24). ख्रिस्त तुम्हांस आमच्या मंडळीत येण्यास व आत्मे जिंकण्यास बोलावितो. तुम्ही दुस-यांस आणावे व त्यांचे तारण साधण्यास मदत करावी म्हणून तो तुम्हांस बोलावितो!

तरुण मुलांनो मी तुम्हांस पूर्णत: ख्रिस्ती बनण्यास बोलावित आहे! होय, येशू ख्रिस्त — व सर्व समर्थ देवाच्या मंडळी करिता तुम्ही पूर्णत: ख्रिस्ती बनावे! शिष्य व्हावे! पूर्णत: ख्रिस्ती बनावे असे मला वाटते! रविवारी सकाळी या. रविवारी दुपारी आमच्या बरोबर आत्मे जिंकण्यास बाहेर जा. रविवारी रात्री परत या. पूर्णत: ख्रिस्ताचे शिष्य बना! ते करा! ते करा! बॅप्टिस्ट प्रचारकानी आपल्या तरुणांना वेळे संबंधी सांगितले नाही का? तुमचा वधस्तंभ घ्या व ख्रिस्ताला अनुसरा! शिष्य बना! ख्रिस्ताच्या सेनेतील सैनिक बना! ते तुमच्या शीटवर क्रमांकावर आहे. ते गा!

पहा क्रुसझेंडा पुढे चालला,
   ख्रिस्ती सैनिकांनो चला हो चला;
सरदार ख्रिस्त पुढे असतां;
   वै-यांमध्ये गेला बावटा.
पहा क्रुसझेंडा पुढे चालला,
   ख्रिस्ती सैनिकांनो चला हो चला.
(“ऑनवर्ड, ख्रिश्चन सोल्जर” सबाईन बेरिंग-गोल्ड, 1834-1924).

आणि ते आपणांस नवीन करारातील दुस-या ग्रीक शब्दाकडे नेते.

II. दुसरे, तेथे ग्रीक शब्द “अगापे” आहे.

डब्लू. इ. म्हणाले की अगापे “ख्रिस्तीपणाचा गुणधर्मिय शब्द” आहे. म्हणजे स्वत:लाच दिलेले प्रेम आहे. पहिल्या शिष्या बरोबर बोलतांना हा शब्द आला. येशू म्हणाला,

“मी तुम्हांस नवीन आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी; जशी मी तुम्हांवर प्रीति केली तशी तुम्हीहि एकमेकांवर प्रीति करावी. तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहां” (योहान 13:34, 35).

डॉ. तिमथी लीन हे चिनी मंडळीमध्ये पुष्कळ वर्षे माझे पाळक होते. डॉ. लीन म्हणाले,

प्रेषितांना आपल्या प्रभूपासून प्रीतीची ही आज्ञा थेट मिळाली, आणि त्यानंतर ते त्यानुसार सतत... अनुसरले. त्याचा परिणाम, “पाहा एकमेकांबरोबर किती प्रेमळ हे ख्रिस्तीजण आहेत!” [ख्रिस्ती-तर] लोकांमध्ये हा कौतुकाचा विषय ठरला. सध्या “एकमेकांबरोबर प्रेम करणे” हे मंडळ्यामधून एखाद्या घोषवाक्या प्रमाणे तांत्रिकपणे गायले जाते...[अशाप्रकारे] [त्यांच्या] समवेत देवाला हे अशक्य आहे. देव आपणांवर दया करो! (तिमथी लीन, S.T.M., Ph.D., द सिक्रेट ऑफ चर्च ग्रोथ, FCBC, 1992, पृष्ठ 33).

डॉ. मायकल ग्रीन, त्यांच्या पुस्तकात पहिल्या व दुस-या शतकांतील, ख्रिस्ती लोकांसंबंधी बोलतात. डॉ. ग्रीन म्हणाले की मूर्तीपूजक रोमन लोकांना ख्रिस्तीपणा खूप भावला कारण “एकमेकांवर प्रीति करण्याचे सामर्थ्य ख्रिस्ती लोकांमध्ये होते” (मायकल ग्रीन, इव्हांजिलीजम इन द अर्ली चर्च, एर्डमन्स, 2003, पृष्ठ 158).

III. तिसरे, तेथे ग्रीक शब्द “कोइनोनिया” हा आहे.

याचा अर्थ सपभागिता, संगती, चांगली सोबत, मैत्री असा होतो. सहभागिता म्हणजे मंडळीमध्ये एकमेकांमध्ये अगापे प्रीति वाढविणे.

कांही प्रचारकांनी मला सांगितले की आपण सहभागितेमध्ये ख्रिस्ती-तर लोकांना घेऊ नये. एका अर्थाने ते बरोबर आहेत. पवित्रशास्त्र म्हणते, “अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा” (इफिस 5:11). त्या वचनांनी इतर मंडळील पुष्कळजण गोंधळलेले आहेत. याचा अर्थ ते असा विचार करतात की “लहान मुलांना” नवीन लोकांपासून दूर ठेवतात. डॉ. जे. वरनॉन मॅक् गी यांच्या यासंबंधी चांगल्या टिप्पणी आहेत. त्या मूलत: डॉ. थॉमस हेल जे म्हणाले त्या सारख्याच आहेत, “पौल म्हणतो [अंधाराच्या कार्याशी] आपले कांही देणे घेणे नाही; तो असा म्हणत नाही की [हरविलेल्या लोकांसंबंधी] आमचे कांही देणे घेणे नाही...सर्वात शेवटी, येशू स्वत:पापी लोकांबरोबर जेवला” (थॉमस हेल, M.D., द अप्लायड न्यू टेस्टामेंट कॉमेंट्री, किंग्जवे पब्लिकेशन्स,1997 आवृत्ती, पृष्ठ 780, इफिस 5:11 वरील टिप्पणी).

पहिल्या शतकांतील आरंभीच्या मंडळी विषयी डॉ. ग्रीन जे बोलले ते मला आवडले. ते म्हणाले, “तेथे विचारपूस करणा-यांपासून सिद्धांत लपविलेला नव्हता; तेथे सहभागिता थांबविली नव्हती” (ibid., पृष्ठ 218). “परिवर्तन न झालेल्यां मूर्तीपूजकांना त्यांचा तीन वर्षे बाप्तिस्मा झाला नव्हता, तरी त्यांना मंडळीत, आणि सहभागितेत आणले होते” (ibid.).

सध्या आमची बॅप्टिस्ट मंडळी हे वेगळ्या पद्धतीने करते. ते नवीन तरुण मुलांचा लगोलग बाप्तिस्मा करतात, परंतू त्यांना त्यांच्या मुलांची सहभागिता नको असते. आरंभीच्या मंडळ्या अगदी बरोबर करीत होत्या.

जॅक हेल्स यांच्याकडे दोन इमारती होत्या. एक नवीन मुलांसाठी ज्यांना हाकलून दिले होते. त्यांच्यासाठी उपासना सुद्धा वेगळी होती! परंतू “खरी” मंडळी ही मूळ इमारतीत भरत होती. “मंडळीच्या मुलांना” नवीन मुलांपासून वेगळे ठेवीत होते. नवीन मुले त्यांच्या “मौल्यवान” मुलांना बिघडवतील अशी त्यांना भीति होती!

तरुणपणी मी पहिल्यांदा मंडळीत गेलो, तेव्हा मला दिसले की मंडळीची मुले मला बिघडविण्यासाठी सर्वकांही करीत होते. त्यामुळे मंडळी बाहेरील मुलांना वेगळे ठेवणे हे पवित्रशास्त्रीय नाही, आणि ते ख्रिस्तासाठी जवळजवळ हजारो लोकांपर्यंत जात होते तेव्हां, आरंभीच्या मंडळीने केले तसेहि नाही!

आम्ही आमच्या “शब्बाथ शाळेच्या” कल्पनेतून बाहेर यायला हवे. तेथे तारण न झालेल्या मुलांना आणा. त्यांना चांगले जेवण वाढा. त्यांना वाढदिवसाची मेजवाणी द्या. त्यांना चांगला वेळ द्या − “सर्वात शेवटी, येशू स्वत: पापी लोकांबरोबर जेवला” (थॉमस हेल, ibid.). “त्यांना आंत आणा” हे गीत गाऊया!

त्यांना आंत आणा, त्यांना आंत आणा,
   पापाच्या शेतांतून त्यांना आंत आणा;
त्यांना आंत आणा, त्यांना आंत आणा,
   दरदर भटकणा-यांना येशूकडे आणा.
(“त्यांना आंत आणा” अलेक्ससेनाह थॉमस, 19 वे शतक).

संतापी, जुन्या धार्मिक पुढा-यांनी येशूमध्ये दोष काढला. मत्तय एक जकातदार होता. येशूने त्याला बोलाविले, आणि मत्तय त्याच्या पाठीमागे गेला. मत्तयाने त्याच्या घरी मोठी मेजवाणी दिली. येशू व त्याचे बारा शिष्य तेथे होते. पुष्कळ जकातदार व पापी लोक तेथे येशू बरोबर जेवायला होते. धार्मिक पुढा-यांना वाटले येशू चुकतोय. ते म्हणाले, “तो पापी लोकांबरोबर का जेवतो?” येशूने उत्तर दिले, “कारण मी नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना बोलाविण्यासाठी मी आलो [आहे]” (मत्तय 9:13).

ज्या प्रचारकांना पुष्कळ पापी असण्याची भिती वाटते त्यांनी ह्याविषयी विचार करावा! मी म्हणतो, “पाप्यांना आंत आणा! तुम्हांला जेवढे मिळतील तेवढे आणा! अधिक विवाहित! त्यांना सहभागितेत आणा, जसे येशूने केले, जसे आरंभीच्या मंडळीने केले! “त्यांना आंत आणा! गीत गाऊया!

त्यांना आंत आणा, त्यांना आंत आणा,
   पापाच्या शेतांतून त्यांना आंत आणा;
त्यांना आंत आणा, त्यांना आंत आणा,
   दरदर भटकणा-यांना येशूकडे आणा.

पहिल्या शतकांतील सजीव, सामर्थ्यशाली मंडळीचे ऐका,

“ते प्रेषितांच्या शिक्षणांत आणि सहवासांत [कोइनोनिया], भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे” (प्रे.कृ. 2:42, 47).

जॅक हेल्स, आणि त्यांचा व्यभिचारी मुलगा, आणि त्यांच्या तरुण-जावयाबरोबर शरीर संबंध ठेवतात – खरेतर ते “दुस-या” इमारतीत असायला हवे होते! त्यांना बाहेर ठेवा, ते तारण न झालेल्या नवीन मुलांना इजा करु शकतात! अशा त्या सेवकांच्या “कुत्र्यांना” हरविलेल्या तरुण मुलांपासून दूर ठेवा! आणि हरविलेल्या तरुण मुलांना मुख्य मंडळीत आणा. ते बरोबर आहे, हरविलेल्यांना आणा — आणि व्यभिचारी बॅप्टिस्ट परुश्यांना, आणि बिघडलेल्या त्यांच्या शब्बाथ शाळेतील घाणेरड्या मुलांना बंद करा! हरविलेल्या मुलांना आणा आणि त्यांच्याबरोबर जेवण व वाढदिवसाची मेजवाणी करा — आणि जुने पोपेये कार्टुन पहा! आमेन! आणि ह्या म्हाता-या प्रचारकाचे ऐका, आणि कांही गीते गा, टाळ्या वाजवा आणि घोषणा करा “आमेन” — आणि चांगला वेळ घालवा!

ते तीन ग्रीक शब्द आपणांस सजीव, सामर्थ्यशाली मंडळी दर्शविते! “क्युरिओस” – प्रभू –ख्रिस्त आमचा क्युरिओस आहे! तो आमचा प्रभू आहे. पाठीमागे फिरा व ख्रिस्ताचे शिका, आणि ख्रिस्ताला अनुसरा, आणि तुमच्या सर्व अंत:करणातून ख्रिस्तावर प्रीति करा! “आगापे” — ख्रिस्ती प्रीति! मागे फिरा आणि आम्ही तुमच्यावर प्रीति करितो. आणि तुम्ही आमच्यावर प्रीति करावी याची आतुरतेने वाट पाहतो. “च्यातील प्रीती” विषयी हिप्पी बोलले. वुडस्टॉक एक “च्यातील प्रीती.” खरी “च्यातील प्रीती” येथे मंडळीत आहे! आपल्या ख्रिस्तातील प्रीतीत मागे फिरा! ते वुडस्टॉकला एका शब्बाथ शाळेच्या सहली सारखे करील! आणि तेथे शब्द “कोइनोनिया” हा आहे. त्याचा अर्थ सहभागिता, मित्रत्व, सहयोगिता, चांगली संगती! कोइनोनिया म्हणजे सहभागिता. सहभागिता ही स्थानिक मंडळीमध्ये “आगापे” प्रीतीचा विस्तारित भाग आहे!

आम्ही आहो! आम्ही तुमची वाट पाहतो आहो! पुढील रविवारच्या सकाळी या! परत शनिवारच्या रात्री या! आपण या व दुस-यांस आणण्यास मदत करा! आपण या आणि जेथे तरुण लोक येतील व चांगले मित्र करतील अशी ही मंडळी बनविण्यास सहाय्य करा; जेथे तरुण लोक येऊन आनंद करतील; जेथे तरुण लोक येऊन ख्रिस्ताचे शिष्य — आणि वधस्तंभाचे सैनिक बनतील! आमेन! गीत क्रमांक आठ गा — “ऑनवर्ड, ख्रिश्चन सोल्जर!” ते गाऊया!

पहा क्रुसझेंडा पुढे चालला,
   ख्रिस्ती सैनिकांनो चला हो चला;
सरदार ख्रिस्त पुढे असतां;
   वै-यांमध्ये गेला बावटा.
पहा क्रुसझेंडा पुढे चालला,
   ख्रिस्ती सैनिकांनो चला हो चला.

डॉ. चॅन, कृपया आम्हांस प्रार्थनेत चालवा.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले:
“द चर्च स् वन फाऊंडेशन” (सॅमुएल जे. स्टोन यांच्या द्वारा, 1839-1900).
“The Church’s One Foundation” (by Samuel J. Stone, 1839-1900).


रुपरेषा

तीन शब्द आरंभीच्या मंडळीचे गुपित प्रकट करते!

THREE WORDS GIVE THE SECRET
OF THE EARLY CHURCH!

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत, आणि देवाची स्तुति करीत हर्षाने व सालस मनाने जेवीत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे”
     (प्रे.कृ. 2:46, 47).

I.   प्रथम, तेथे ग्रीक शब्द “क्युरिओस” आहे, प्रे.कृ. 10:36; I करिंथ 1:23; 2:2;
योहान 10:28; मत्तय 16:24.

II.  दुसरे, तेथे ग्रीक शब्द “आगापे” आहे, योहान 13:34, 35.

III. तिसरे, तेथे ग्रीक शब्द “कोइनोनिया” आहे, इफिस 5:11; मत्तय 9:13;
प्रे.कृ. 2:42, 47.