Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
मूळचे पाप व त्यावर उपचार ह्याविषयी ल्युथर

(प्रोटेस्टंट सुधारणेच्या 500 व्या वर्धापनदिना दिवशी दिलेला उपदेश)
LUTHER ON ORIGINAL SIN AND ITS CURE
(A SERMON PREACHED ON THE 500th ANNIVERSARY OF
THE PROTESTANT REFORMATION)
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 29 ऑक्टोबर, 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, October 29, 2017

“कारण आंतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चो-या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अंहकार, मुर्खपणा ह्या सर्व वाईट गोष्टी आंतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात (मार्क 7:21-23).


येशूच्या शिष्यांनी खाण्यापूर्वी हात न धुतल्यामुळे परुश्यांना येशूत दोष आढळला. येशूच्या शिष्य विधीवत हात न धुता खाताना त्यांनी पाहिले तेव्हां, ते त्यांना अशुद्ध म्हणाले. परंतू येशू त्यांना म्हणाला आपण जे खातो त्यांने आपण विटाळीत नाही. तो म्हणाला लोकांच्या अंत:करणात जे असते त्यांने ते विटाळतात. “ह्या सर्व वाईट गोष्टी आंतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करतात” (मार्क 7:23). “माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात” (मार्क 7:21).

एका टोकापासून ते दुस-या टोकापर्यंत पवित्रशास्त्र शिकविते की आपले अंत:करण कपटी आहे. पवित्रशास्त्र म्हणते, “ह्दय सर्वात... कपटी आहे; ते असाध्य रोगांनी ग्रस्त आहे” (यिर्मया 17:9). पवित्रशास्त्र म्हणते, “आम्ही सर्व आपआपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे करणार” (यिर्मया 18:12). पवित्रशास्त्र म्हणते, “कारण त्याचे मन त्याच्या ठायी स्थिर नव्हते” (स्तोत्र 78:37). “मुढ आपल्या मनांत म्हणतो; देव नाही” (स्तोत्र 14:1). डॉ. वॅट्स, त्यांच्या एका गीतात ह्दयाविषयी म्हणाले.

“कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोग आपल्यांतच आहे” –

तुमच्या खोल दुष्ट ह्दयात. “अविश्वासाचे दुष्ट मन असते” असे पवित्रशास्त्र सांगते (इब्री 3:12).

“कोणतीहि बाह्य वस्तू [बाह्य आचरण – उदा. पापांगिकाराची प्रार्थना म्हणणे] शुद्ध बनवू शकत नाही; कुष्टरोग आपल्यांतच आहे” –

नाही का? नाही का? तुम्हांला ठाऊक आहे असेच आहे! कोणताहि निर्णय अथवा प्रार्थना तुम्हांला शुद्ध बनवू शकत नाही. कोणतेहि शिक्षण किंवा वाटणे तुम्हांला शुद्ध बनवू शकत नाही! आणि तुम्हांला ठाऊक आहे. “खोल दुष्ट ह्दयात (पापाचा) कुष्ठरोग” तुमच्या अविश्वाच्या दुष्ट मनांत आहे! आणि तुम्हांला ठाऊक आहे- नाही का?

तुम्ही प्रामाणिक असाल तर तुम्हांला ठाऊक आहे हे खरे आहे. तुम्ही बाह्य पाप करण्यापूर्वी तुम्हांस ते ठाऊक असते. तुम्हा ते मुद्दामहून करता. तुम्हा काय करता हे तुम्हांस ठाऊक असते. ते चुकीचे आहे हे तुम्हांला ठाऊक असतांना ते तुम्ही का करता? तुम्ही तुमच्या अपरिवर्तित स्थितीत तुम्हांला अंधकार आवडतो. तुम्ही पापाचा उपभोग घेता. पाप करतांना तुम्हांला हर्ष वाटतो. ती स्थिती तुम्हांला आवडते. ते चुकीचे असते तरी ते तुम्ही करता कारण ते तुम्हांला आवडते! त्यामुळेच तुम्हांला तुमच्या पापी अंत:करणाविषयीचे सत्य सांगण्यास तिरस्कार वाटतो! ते तुम्हांस दोष लावते व सत्य ऐकून दु:खी बनविते! “कुष्ठरोग तुमच्यातच आहे”! तुमचे अंत:करण हे तिढायुक्त व विकृत आहे! जे चांगले व सत्य करण्याऐवजी तुम्हांस पाप करण्यात आनंद वाटतो. तुमच्या खोल अविश्वासाच्या दुष्ट ह्दयात कुष्ठरोग आहे! मला ते कळले नाही. डॉ. मार्टिन लॉईड, एक वैद्य ज्यांना तुमच्या अंत:करणाविषयी माहित आहे त्यांनी मला वेगळ्या शब्दात सांगितले!

होय, तुम्ही ते पूर्वी ऐकले. डॉ. लॉईड-जोन्सचा नामानाच्या कोडाच्या शुद्धतेविषयी अर्थ मी माझ्या उपदेशामध्ये वेगळ्या शब्दात सांगितला. माझा उपदेश ऐकून एक तरुण आला जो मला म्हणाला मला तारण हवे आहे. तो तारण पावण्याविषयी बोलण्यास डॉ. कागॅन यांच्याकडे आला नाही. त्याऐवजी त्यांने जाऊन डॉ. लॉईड-जोन्सचे उपदेश वाचले हे पाहण्यासाठी की खरोखर डॉक्टर असे म्हणाले आहेत का!

होय, अर्थात “मनुष्याची मूलभूत समस्या” या उपदेशात, डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले होते. डॉक्टर म्हणाले, “आपण काय करीत आहोत हे ठाऊक असतांना, आपण ते मुद्दाम करतो. ते चुकीचे आहे हे ठाऊक असतांना आपण ते का करतो?...आता प्रामाणिक व्हा आणि स्वत:चा सामना करा. असा अपला स्वभाव आहे. त्यांना अंधकार आवडतो, ते प्रकाशाचा द्वेष करतात. ते तिढायुक्त व विकृत आहे, ते ख-याऐवजी खोटे आणि चांगले करण्याऐवजी वाईट करण्यात आनंद मानतात...आपणास खरे व चांगले ते ठाऊक आहे परंतू आपण ते करण्यास असफल होतो कारण आपला स्वभावच तसा आहे की ते करण्यास आपल्याला आवडते...हा तुमचा स्वभाव, तुमचे अंत:करण, तुमचे आवश्यक व्यक्तीमत्व व असणे जे आहे चुकीचे आहे...आपले पाप हे निसंशय, मुद्दाम व जाणूनबुजून केलेले आहे!” हे त्यांचे जसेच्या तसे शब्द आहेत – जे मी वेगळ्या शब्दात सांगितले! (पाहा डॉ. मार्टीन लॉईड-जोन्स, इव्हांजिलीस्टीक सरमन्स एट अबरावोन, बॅनर ऑफ ट्रुथ, पृष्ठ 65-77).

“कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोग आपल्यांतच आहे” –

मंडळीतील तारण झालेले डॉ. लॉईड-जोन्सचा अर्थ मी वेगळ्या शब्दात सांगितला याच्याशी सहमत आहेत. परंतू तरुण जे तारण होण्याचे ढोंग करत होते ते सभागृहामधून गेले. आणि पुढच्या आठवड्यात डॉ. लॉईड-जोन्स यांनी पापी ह्दयासंबंधी खरोखर असे म्हटले आहे का ते पडताळून पाहिले. त्यांने असे का केले? कारण त्याचे, स्वत:चे, अविश्वासू पापी ह्दय आहे! त्यामुळेच! तरुण मनुष्य,

“कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोग आपल्यांतच आहे” –

माझ्या मुला, त्यापासून तूं पळू जाऊ शकत नाही. पापी व बंडखोर ह्दयाविषयी मी जे बोललो त्यावरच डॉ. लॉईड-जोन्स यांचा विश्वास आहे! आणि जसे डॉ. लॉईड-जोन्स यांनी म्हटले तसे मी तुम्हांस या संध्याकाळी सांगत आहे की, स्वत:ला व देवाजवळ तुमचे अंत:करण ख-या अर्थाने “तिढ्याचे व विकृत” आहे म्हणून कबूल करीत नाही तोवर तुमचे तारण होणार नाही. म्हणून येशू स्वत: म्हणाला, “कारण आंतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात...ह्या सर्व गोष्टी आंतून बाहेर निघतात” तुमचे अविश्वासाचे ह्दय! (मार्क 7:21, 23). यिर्मया 17:9 प्रमाणे तुमचे “अंत:करण खचितच कपटी आहे”.

तुमचे आईवडील कितीहि वाईट असो, माझ्या आईवडीलांइतके वाईट नसले तरी. तुमच्या आईवडीलांना दोष देऊ शकत नाही. नाही, तुमचे आईवडील कितीहि वाईट असले तरी, तुम्ही त्यांना दोष देऊ शकत नाही! केवळ स्वत:ला दोष देऊ शकता. डॉक्टरांच्यातील मी जे तुमचे दुष्ट ह्दय स्पष्ट केले ते तुम्ही ऐकले. तुमचा दोष आहे, आणि तुम्ही स्वत:, जे तुमचे दुष्ट, तिढायुक्त व विकृत अविश्वासाचे ह्दय आहे असे डॉक्टर म्हणतांना तुम्ही ऐकले. तुम्ही व स्वत: तुम्ही ख्रिस्ताला नाकारण्याचे ठरविले. तुम्ही व स्वत: तुम्ही पापी गोष्टी केल्यात. ते करण्यास कुणी सांगितले नाही. तुम्ही त्या केल्यात कारण त्या तुम्हांला आवडतात. पाप करतांना तुम्हाला आनंद केला. पाप करतांना तुम्हाला हर्ष झाला. त्याची चव तुम्हांला आवडली! ते अगदी चुकीचे आहे हे माहित असतांना सुद्धा तुम्हांला ते आवडले. मनाचा-धिक्कार करण्याच्या पापाचा कुष्ठरोग तुमच्या अविश्वासू दुष्ट ह्दयात खोल आहे! त्यामुळेच तुम्ही तुमच्या पापी ह्दयाविषयी सांगण्याचा द्वेष करता- नाही का?

“कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोग आपल्यांतच आहे.”

तुमच्या खोल पापी अंत:करणात!

शिवाय तुम्ही परिस्थितीला सुद्धा दोष देऊ शकत नाही. जलप्रलयानंतर जलप्रलयाच्या पूर्वीची परिस्थिती निघून गेली. देव नोहाला म्हणाला, “मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन” (उत्पत्ती 6:13). जलप्रलयाच्या पूर्वीच्या सर्व दुष्ट लोक निघून गेले. आणि तरीहि, जलप्रलयानंतर लगेचच, देव म्हणाला, “कारण मानवाच्या मनांतील कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात” (उत्पत्ती 8:21). ल्युथर म्हणाले, “तारुमध्ये होते त्यापेक्षा इतर कोणतेही लोक जलप्रलयातून वाचले नाहीत. तरीहि देव त्यांना म्हणतो मानवाच्या मनांतील कल्पना दुष्ट असतात” (उत्पत्ती 8:21 वरील ल्युथरचे समालोचन). तुमचे अंत:करण दुष्ट नाही कारण तुम्ही इतरांपासून शिकला आहांत. तुम्ही ज्या क्षणी आईच्या उदरात गर्भधारणा केली तेव्हां पासून तुमचे ह्दय पापी आहे. ल्युथर म्हणाले की पापाचे हदय हे जे “तरुण, अर्भक, किंबहूना, उदरात असलेले अर्भक, जसे स्तोत्र 51:5 दर्शिविते...[ह्दयाचे पाप] नाही [शिकलो नाही]; तो गर्भात निद्रीस्त असतो.” योग्य संधी येईल तेव्हां तो सूड घेण्यास तयार आहे!

कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोग आपल्यांतच आहे!

दुष्ट अंत:करण, हे आपणांकडे पहिला पापी आदामाकडून आले आहे. आपण सर्व त्याची संतती आहोत. ल्युथर म्हणाले, “मानवाच्या मनांतील कल्पना ह्या बाळपणापासून दुष्ट असतात, मनुष्याचे कारण सांगणे... [तुमचे] कारण. [तुमच्या अंत:करणातील विचार हे] नेहमी [देवाच्या] नियमशास्त्राविरुद्ध असतात, नेहमी पापाच्या अधीन, नेहमी [देवाच्या] क्रोधाधीन, आणि स्वत:च्या ताकदीने ह्या भयंकर दु:खातून सुटण्यास असमर्थ असे आहेत.” पवित्रशास्त्र म्हणते,

– तुम्ही सर्व “स्वभावत: क्रोधाची लेकरें” आहांत (इफिस 2:3).

– तुम्ही सर्व “पापाच्या अधीन” आहांत (रोम 3:9).

– तुम्ही सर्व “पापात मेलेले” आहांत (इफिस 2:5).

का? कारण

– “कारण एका माणसाच्या [आदामा] द्वारे पाप जगांत शिरले” (रोम 5:12).

– त्यामुळे “कोणीहि नीतिमान नाही, नाही, एकही नाही...सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही” (रोम 3:10, 12).

– “मानवाच्या मनातील कल्पना ह्या बाळपणापासून दुष्ट असतात” (उत्पत्ती 8:21) .

“कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोगाचे [पाप] [तुमच्यातच] आहे.”

आपण मार्टिन ल्युथर यांची वर्धापन दिन साजरा करीत आहोत, जो रोमन खोट्या शिक्षणाच्या विरुद्ध लढला, 500 पूर्वी ह्या, विटेनबर्ग जर्मनी येथे सुरुवातीला त्याच्या दरवाजाला त्याला पंच्यानव्व वर्षात खिळण्यात आले. तुमच्या ह्दयातील “मूळ पाप” हे पन्नासावा दिवस आणि बॅप्टिस्ट सुधारणेचा केंद्रबिंदू आहे. पवित्रशास्त्र शिकविते की तुमचे दुष्ट अंत:करण आहे- आणि तुम्ही ते बदलू शकत नाही!

“कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोग आपल्यांतच आहे” –

“कल्पना” हा इब्री शब्दातून आला आहे आहे याचा अर्थ तुमचे मन, तुमचे अविश्वासू दुष्ट मन.

“मानवाच्या मनातील कल्पना [विचार] बाळपणापासून दुष्ट असतात” (उत्पत्ती 8:21).

मंडळीतील प्रत्येक मनुष्याच्या ह्दयातील मूळच्या पापाचे शिक्षण हे आहे – आज रात्री कोण नव्या जन्माविना राहतो! तुम्ही प्रत्येकजण! ल्युथर म्हणाले, “पवित्र आत्मा व देवाच्या कृपेविना, आपण मनुष्यांस धरले आहे, कांही करु शकत नाही परंतू पाप करतो, आणि पाप अनंत, एकामागून एक अपराध...[आणि] तो देवाचा शत्रू आहे, जेव्हां तो त्याच्या दुष्ट अंत:करणाचे... पालन करतो...जेव्हां तुम्ही नीतिमान असण्याचा बनाव करता.”

“कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोग आपल्यांतच आहे” –

ल्युथर हे खरे असल्याचा आपल्या मंडळीतील बहुंतांश लोकांनी पाहिले नाही का? एका मागून एक व्यक्ती ख्रिस्ताकडे येण्याचे ढोंग करते – आणि मग मंडळीतून बाहेर पडणे व पापाच्या जीवनांत असलेले आपण पाहतो नाही का? थोड्या वेळे करिता ख्रिस्ती असल्याचे ढोंग केलेले, आणि मग देवाचे शत्रू पुष्कळ आपण पाहतो ना? ओलीवास व त्याच्या लोकांनी काय केले नाही का? आमचे मंदीर नाश करण्याचा प्रकार त्यांनी केला, ल्युथर हा बरोबर होता,

“मानवाच्या मनातील कल्पना [विचार] बाळपणापासून दुष्ट असतात” (उत्पत्ती 8:21).

का आपली मंडळी फिन्ने पासून दूर गेली आणि ल्युथर, सुधारक, आणि जुने बाप्टिस्ट यांच्याकडे वळले नव्हते का? फिन्नेचे सर्वात प्रसिद्ध उपदेश हा, “पापी हे त्यांचे ह्दय बलण्यास बांधील आहेत” आहे. तुम्ही ते कसे करता? कसे? कसे? तुम्ही तुमचे ह्दय कसे बदलाल? तुम्ही बदलू शकत नाही! फिन्ने हा वारसाने पूर्णत: पेलाजियन होता. मानवाचे दुष्ट ह्दय, आणि मूळचे पाप याविषयी ल्युथर व सुधारक यांनी जे शिकविले त्याविरुद्ध फिन्ने लढला.

तुम्ही तुमचे बदलू शकत नाही! मला समजाविण्यात आले फिन्ने हा सैतानान-बाधीत आहे. त्याच्यावर विश्वास टेऊ नका! त्या ऐवजा तुम्ही तुमच्या अंत:करमाकडे पाहा; परंतू पाप व देवाविरुद्ध बंड याशिवाय कांही नसणार!

“कोणतीहि बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध बनवू शकत नाही;
कुष्टरोग आपल्यांतच आहे.”

फक्त प्रभू येशू ख्रिस्तच तुमचे ह्दय शुद्ध करु व बदलू शकतो. येशू तुमच्या पापाचा मोबदला देण्यासाठी वधस्तंभावर मरण पावला. तुम्हांस तुमच्या सर्व पापापासून शुद्ध करण्यासाठी वधस्तंभावर येशूने आपले रक्त सांडले. तुम्हास नवे ह्दय देण्यासाठी येशू मरणातून पुन्हां उठला! जेव्हां तुम्हा येशूवर विश्वास ठेवाल तर तुम्हांस “नवे ह्दय देईल... आणि आत्मा तुमच्या ठायी घालील” (यहेज्केल 36:26).

प्रभू येशू, ह्याकरिता मी अगदी लीनतेने विनंती करतो,
   मी वाट पाहतो, धन्य प्रभू, तुझ्या खिळलेल्या पायाशी.
विश्वासाने, माझ्या शुद्धतेसाठी, तुझा रक्त ओघ मी पाहतो,
   आता मला धू, आणि मला बर्फाहून शुभ्र कर.
बर्फाहून शुभ्र कर, होय, बर्फाहून शुभ्र कर;
   आता मला धू, आणि मला बर्फाहून शुभ्र कर.

प्रभू येशू, तुझी मी धीराने वाट पाहतो,
   आता ये, आणि माझ्या ठायी नवे ह्दय निर्माण कर;
जे तुझा धावा करतात त्यांना, तूं कधीहि “नाही” म्हणत नाही,
   आता मला धू, आणि मला बर्फाहून शुभ्र कर.
बर्फाहून शुभ्र कर, होय, बर्फाहून शुभ्र कर;
   आता मला धू, आणि मला बर्फाहून शुभ्र कर.
(“व्हाईटर दॅन स्नो” जेम्स निकोलसन यांच्याद्वारा, 1828-1876).

मानवाच्या अंत:करणातील मूळच्या पापासंबंधीच्या ल्युथरच्या ईश्वरविज्ञानावर मी बोललो आहे. जरी तुम्हांस कांहीच कळले नसेल, तर मी तुम्हांस विनंती करतो आज रात्री, येशूवर विश्वास ठेवा. तो तुमच्या पापाची क्षमा करील. तो तुम्हांस तुमच्या पापापासून शुद्ध करील. तो तुम्हांस नवे ह्दय व नवा आत्मा देईल. “प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे तारण होईल” (प्रे.कृ. 16:31).


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले:
“व्हाईटर दॅन स्नो” (जेम्स निकोलसन यांच्या द्वारा, 1828-1876).
“Whiter Than Snow” (by James Nicholson, 1828-1876).