Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
जेव्हां देव रक्त पाहातो

WHEN GOD SEES THE BLOOD
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 27ऑगष्ट, 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, August 27, 2017

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).


इब्री लोक दुष्काळाच्या काळात खाली मिसरास गेले. याकोबाचा पुत्र, योसेफ, हा तेथे फारोचा मुख्याधिकारी असल्याने सुरुवातीला त्यांना आदराने वागविले. इस्त्राएलाचा वंश वाढला व बहुगुणीत झाला, परंतू तेथे नवीन फारो आला जो योसेफास ओळखीत नव्हता. इब्री लोक संख्येने वाढले आहेत व ते आपल्या भूमीचा ताबा घेतील अशी त्याला भिती वाटली. आणि म्हणून त्याने त्यांना गुलाम बनविले. इब्री लोकांनी देवाकडे धावा केला, आणि त्याने त्यांना सोडविण्यास मोशेला पाठविले. परंतू फारो हा कठोर व क्रुर होता. त्याने देवाच्या लोकांना जाऊ दिले नाही. आणि त्यामुळे देवाने मिसरावर नऊ पीडा आणल्या. प्रत्येक वेळा पीडा त्यांच्यावर यायची, मोशे फारोसमोर यायचा व म्हणायचा, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांस जाऊ द्यावे” पण फारोने कधीच ऐकले नाही. त्याचे ह्दय कठीण झाले होते. आता देवाला दहावी पीडा पाठविण्याची पाळी आली.

“नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, मी फारोवर व मिसर देशावर आणखी एक पीडा आणीन; त्यानंतर तो तुम्हांला जाऊ देईल...” (निर्गम 11:1).

आणि मोशे पुन्हां फारोच्या अंगणात आला, व म्हणाला,

“मग मोशे म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो की, आज मध्यरात्रीच्या सुमारास मी मिसर देशातून फिरेन. तेव्हां मिसर भूमीतील सर्वांचे ज्येष्ठ पुत्र व गुरांचेहि प्रथमवत्स मरतील...कारण ह्या रात्री मिसर देशात फिरुन त्यांतील मनुष्य व पशु ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारुन टाकीन” (निर्गम 11:4-5; 12:12).

परंतू त्याच्या लोकांना दंड व्हावा असे देवाला वाटत नव्हते. त्याने मोशेला सांगितले प्रत्येक कुटुंबाने एक कोकरु घ्यावे व त्याचा वध करावा.

“...त्या घराच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला त्याचे कांही रक्त लावावे” (निर्गम 12:7).

आता उभे राहूया व निर्गम 12:12-13 मोठ्याने वाचूया.

“कारण ह्या रात्री मिसर देशात फिरुन त्यांतील मनुष्य व पशु ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारुन टाकीन आणि मिसरातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे. आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खूण असे होईल. रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन; मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हां तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही” (निर्गम 12:12-13).

जवळजवळ 1,500 वर्षे यहुदी लोकांनी हा वल्हांडण पाळला. मिसरातील दास्यत्वातून सुटल्याच्या स्मरणार्थ त्यांनी कोकराचे व बेखमीराचे विशेष अन्न खाल्ले आणि वल्हांडणाच्या समयी हा शास्त्रलेखाचा उतारा वाचला. “वल्हांडण” हे नाव ह्या उता-यातून आले आहे,

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

तुम्ही ह्या उता-याचा तीन प्रकारे विचार करावा असे मला वाटते. प्रथम, रक्ताचा अर्थ. दुसरे, रक्ताचा परिणाम. आणि, तिसरे, रक्ताचा वापर.

I. प्रथम, रक्ताचा अर्थ.

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन.”

ह्या वचनात आजच्यासाठी कांहीतरी आहे काॽ होय, ह्यात भरपूर अर्थ आहे, जे रक्त पहिल्या वल्हांडणाच्या वेळी सांडले गेले ते येशू - वल्हांडणाच्या वेळी वधस्तंभावर सांडणा-या रक्ताकडे निर्देशित करते. होय, येशूला वल्हांडणाच्या वेळी वधस्तंभावर खिळले होते.

“त्याचे शिष्य त्याला म्हणाले, आपण वल्हांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे?” (मार्क14:12).

मग ते भोजन करण्यास माडीवर गेले आणि हे वचन वाचा, निर्गम 12:13,

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

प्रथम येशूने त्यांना बेखमीर भाकरी दिल्या. .

“आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुति करुन त्यांना तो दिला; आणि... तो त्यांना म्हाणाला, हे [नवीन] करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरिता ओतिले जात आहे” (मार्क14:23-24).

निर्गम 12:13 मधील दाराच्या कपाळपट्टीला लावलेले रक्त हे नवीन कराराच्या रक्ताचे चित्रण आहे, जे तो पुढच्याच दिवशी वधस्तंभावर सांडणार होता.

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

हे इतर कुठल्याहि रक्ताविषयी बोलत नाही. हे तर ...च्या रक्ताविषयी बोलते

“हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!” (योहान1:29).

दाराच्या कपाळपट्टीला लावलेले रक्त हे पुढील दर्शविते आणि नाश पावलेल्या पाप्यांच्या खंडणीसाठी सांडलेल्या रक्ताचे चित्रण करते, त्यांना ...मध्ये रुजविते

“देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वत:करिता मिळविली” (प्रे.कृ. 20:28).

तुम्ही विचारु शकता की ह्या रक्तात एवढे सामर्थ्य का आहे. स्पर्जन म्हणाले,

ख्रिस्त जर एक साधारण मनुष्य असता... तर त्याच्या रक्तात तारण्याचे सामर्थ्य नसते; परंतू ख्रिस्त हा “देवाचा देव” होता; येशूने जे रक्त सांडले ते रक्त देवासारखे होते. ते मनुष्याचे रक्त होते, कारण तुमच्या आमच्या सारखा मनुष्य होता; परंतू दैवीपणा मनुष्या इतका सदृष्य आहे की, रक्त त्यातून...सतत सार्वकालिकतेचे अद्भूत सामर्थ्य मिळविते, यासाठी की देवाने मरण्यासाठी मनुष्य व्हावे. अरेरे! ख्रिस्त हा सृष्टीचा निर्माणकर्ता होता असा जेव्हां आपण विचार करतो, आणि आपल्या समर्थ खांद्यावर पेलून धरली आहे. त्याचा मृत्यू सुटका, आणि त्याचे रक्त पाप शुद्धी करण्यास समर्थ आहे म्हणून आश्चर्य करता कामा नये...कारण तो दैवी आहे, “जे त्याच्यापासून खूप दूर आहेत परंतू त्याच्याद्वारे देवाकडे येतात अशांना तारण्यास तो समर्थ” आहे. त्याचे रक्त असे रक्त आहे जे तुम्हांस राग व देवाचा क्रोध यापासून सोडविते (सी. एच. स्पर्जन, “रक्त,” द न्यू पार्क स्ट्रीट पुलपीट, पीलग्रीम पब्लिकेशन, 1981, पुनर्मुद्रण, आवृत्ती व्ही, पृष्ठ 27-28).

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

दाराच्या कपाळपट्टीवरील रक्त हे देव-मनुष्य, येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे चित्रण आहे.

“कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले” (I करिंथ 5:7).

आणि तोच ह्या रक्ताचा अर्थ आहे! !

II. दुसरे, रक्ताची परिणामकारकता.

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

“मी तुम्हांला ओलांडून जाईन.” तुमच्यावर न्याय ओढावणार नाही. तुम्हांवर शाप येणार नाही – जर ते रक्त तुम्हांजवळ आहे.

“कारणपरमेश्वर मिस-यांचा वध करण्यासाठी देशांतून फिरणार आहे; ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लाविलेले परमेश्वर पाहील ते ते दार तो ओलांडून जाईल आणि वध करणा-याला तुमचा वध करण्यासाठी तुमच्या घरात शिरु देणार नाही” (निर्गम 12:23).

ज्याच्याजवळ रक्त आहे अशा कोणत्याहि स्त्री किंवा पुरुषांवर न्याय ओढावणार नाही.

“नंतर एजोब झाडाची एक जुडी घेऊन पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यांतले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे...” (निर्गम12:22).

कपाळपट्टी – चौकटीच्या वरच्या बाजूवरील रक्त. दोन्ही बाह्यां, बाजूच्या पट्ट्यावरील रक्त. पात्रातील रक्त. अगदी वर. तळाशी. दोन्ही बाजूवर. ह्या दिशा ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे निर्देशन करतात!

पाहा, त्याचे डोके, त्याचे हात, त्याचे पाय यापासून,
   दु:ख आणि प्रेम एकत्र खाली वाहते;
कधी पाहिले का अशा प्रकारे प्रेम व दु:ख एकत्र आलेले,
   किंवा काट्यांनी मोलवान मुगुट बनविलेला?
³“व्हेन आय सर्वे द वंडरस क्रॉस” इसाक वॅटस यांच्याद्वारा, 1674-1748´.

“कारण वाडवडिलाच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून, ‘सोने रुपे’ अशा नाशवंत वस्तूनी नव्हे, तर निष्कंलक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त, त्याच्या मूल्यवान रक्ताने ‘तुम्ही मुक्त झाला आहां’” (I पेत्र1:18-19).

मार्टिन ल्युथर विचारतात,

आता काय, असा निधी आहे ज्याने आपली खंडणी भरली? नाशवंत सोने रुपे नव्हे परंतू देवाचा पुत्र, ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने. हा निधी खूप महाग व थोर असा आहे जो मानवी संवेदना किंवा कारण समजू शकत नाही, इतका की त्याच्या पवित्र रक्ताचा एक थेंब संपूर्ण जगाच्या पापासाठी पुरेसा आहे. तरीहि पिता मोठ्याप्रमाणात आपल्.वर त्याची कृपा करु इच्छितो आणि आपल्या मुक्तीची किंमत मोजण्यास त्याचे रक्त आमच्यासाठी सांडावे म्हाणून त्याचा पुत्र, ख्रिस्त यांस त्यांने परवानगी दिली आणि अशाप्रकारे त्यांने त्याचे संपूर्ण निधी बहाल केला (लुथर, एक्पोजिशन ऑफ I पेत्र 1:18-19).

गेथशेमाने बागेत ख्रिस्ताचे रक्त हे घामातून जमीनीवर पडले. पिलाताच्या खोलीत जेव्हां त्याला चाबकाचे फटके मारले तेव्हां त्या चाबकाच्या फटक्याबरोबर त्याचे रक्त वाहिले. त्याच्या डोक्यावर काट्याचा मुगुट घातला तेव्हांहि रक्त त्याच्या डोळ्यावरुन खाली आले. त्याच्या हातापायात खिळे मारले, व रक्त वधस्तंभावरुन घळाघळा वाहिले. मग सैनिकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला,

“आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले” (योहोन19:34).

“[देवाने] त्याचा पुत्र, ख्रिस्तास, त्याचे सर्व रक्त आपल्यासाठी सांडले आणि अशाप्रकारे त्याचे संपूर्ण धन आपमास बहाल केले” (लुथर, ibid.).

आणि

“त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करिते” (I योहोन1:7).

सर्व पाप येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध होतात! कोणतेहि पाप एवढे मोठे नाही की जे त्याच्या रक्ताने धुतले जात नाही! असे कोणतेहि पाप जे रक्ताने धुतले जात नाही. त्यांने मरीया मग्दालीयामधून सात भूतें काढली. ते सैतानी वेडेपणा काढून टाकते. ते कुष्ठरोग्याचे न सांगता येणा-या जखमा बरे करते. असा कोणताहि आध्यात्मिक आजार नाही जो बरा होऊ शकत नाही. कोणतेहि प्रकरण त्याच्यासाठी मोठे नाही, कांही हरकत नाही कितीहि किळसवाणे किंवा शुद्र असले तरी त्याठी ख्रिल्ताचे रक्त पुरेसे आहे.

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

आणि अशाप्रकारे ते रक्ताची परिणामकारता दर्शविते!

III. तिसरे, रक्ताचा उपयोग..

जर कोक-याला गळा दाबून किंवा विष देऊन मारले तर, मारणा-याच्या घरातील प्रत्येक प्रथम जन्मलेले मरण्याचा न्याय येत असे. कोक-याला मारुन त्याचे शव दाराला लटकविले तरी मारणा-यावर दंड येत असे. मग असे कोण म्हणतो नोंद घेण्यासारखे रक्तात कांही नाही. केवळ त्या कोक-याचा म-त्यू पुरेसा नाही, परंतू त्या कोक-याचे रक्त वेगळे बनविते. खरयं, कोक-याला मरायंच आहे, आणि तरीहि देव म्हणतो,

रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

परंतू पात्रात उरलेले रक्त न्याय थोपवू शकत नाही. त्याचा वापर केला पाहिजे. एजोब झाडाची एक जुडी

“घेऊन पात्रातील रक्तात बुचकळावी...रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे...” (निर्गम12:22).

रक्त हे शिंपडले पाहिजे अन्यथा त्याचा कांही उपयोग नाही. अरे, पाप्या, ख्रिस्ताचे रक्त घे! येशूच्या रक्ताने आपले पाप धू!

“ख्रिस्त येशू: त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले” (रोम 3:24-25).

हे वेगळे आहे की NASV भाषांतर चुकीचे आहे, तथाकथीत भाषांतर! आणि तरीहि NIV भाषांतर बरोबर आहे, “त्याच्या रक्तामध्ये विश्वासाच्याद्वारे.” मला मागे व पुढे केलेचा तिटकारा आहे. त्यामुळे मी जुन्या विश्वासू KJV ला धरुन आहे, जी अगदी तंतोतत भाषांतरीत व विश्वासनीय आहे.

“त्याच्या रक्तामध्ये विश्वासाच्याद्वारे.”

विश्वासाची बाब ही ख्रिस्त येशूचे रक्त आहे. अशा प्रकारे त्याचा संबंध आहे. अशा प्रकारे रक्त तुम्हांला उपयोगी आहे - “त्याच्या रक्तामध्ये विश्वासाच्याद्वारे

“अरे नाही,” कांही-नवीन सुवार्तिक म्हणतील, “तुमचे त्याच्या रक्तामध्ये विश्वासाच्याद्वारे तारण झालेले नाही!” ठीक, त्याच्या शिवायमचे कसे तारण झाले हे मला जाणून घ्यायचे आहे! “ठीक, जर एखादा मनुष्य रक्तावर अवलंबून राहिला तर, त्याचा नाश होईल.” कधीहि नाही! त्याचा कधीहि नाश होणार नाही! ख्रिस्ताच्या रक्तावर अवलंबून राहिल्यास जर त्याचा नाश होत असेल तर देव स्वत:शीच अप्रामाणिक ठरला जाईल!

“हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापाची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे” ...पापाच्या क्षमेसाठी (मत्तय 26:28).

असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना रक्त वापरावे असे वाटत नाही.परंतू कांही हरकत नाही, आपला जो उतारा आहे तो कधीहि म्हणत नाही की तुम्ही ते आहांत ज्यांना रक्त पाहण्याची आवश्यकता आहे. अरे नाही! ते म्हणते,

मी रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

देव आहे ज्याला रक्त पाहण्याची आवश्यकता आहे. असा एकमेव देव आहे ज्याला रक्त पाहायचे आहे किंवा जाणीव करुन घ्यायची आहे जे तुमचे सर्व पाप शुद्ध करिते. ते असे म्हणत नाही की “तुम्ही रक्त पाहाल तेव्हां.” ते असे म्हणत नाही की ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे होणा-या शुद्धतेविषयी तुम्ही सर्वकांही समजून घ्यावे. ते म्हाणते, “मी ते पाहीन तेव्हां.” तुमचा विश्वास मोठा नसेल. परंतू जेव्हां तुम्ही येशूकडे येता व त्याच्या रक्तावर विश्वास ठेवता, तेव्हां देव ते पाहतो. तो असा एकमेव आहे जो हे जाणतो. आणि

मी रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

इब्री रक्त पाहू शकत नव्हते. ते त्यांच्या घरांमध्ये होते. दरवाजाच्या दोन्ही बाजूपट्टीला व कपाळपट्टीला काय होते ते ते पाहू शकत नव्हते. परंतू त्यावरील रक्त देव पाहू शकत होता. केवळ तीच एक अशी अट होती ज्यावर पाप्याचे तारण अवलंबून होते – तुम्ही वापरलेले रक्त देव पाहतो, ना की तुम्ही पाहता. मग देव प्रार्थनेत देवाकडे या व म्हणा, “प्रभू, ख्रिस्ताच्या रक्ताच्या खातर आमचे तारण कर. तसेच मी ते पाहू शकत नाही, परंतू प्रभू, तूं ते पाहतो, आणि तूं म्हणाला,

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

“प्रभू, तूं रक्त पाहतोस. तुम्ही पाहता की मी त्याच्या तारणयोग्य सामर्थ्यावर विश्वास ठेवतो. केवळ ख्रिस्ताच्या रक्ताच्या खातर आम्हांला क्षमा कर आणि शुद्ध कर.” तुमची अंत:करण पूर्वक प्रार्थना व इच्छा आणि तुम्ही लवकरात लवकर येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे धुतले जा!”


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी पवित्रशास्त्राचे वाचन : मार्क14:12-25.
उपेशापूर्वी एकेरी गीत गायले: मि.बेंजामिन किनकैड ग्रीफ्थ:
“व्हेन आय सी द ब्लड” (जॉन फुटी, 19 वे शतक)


रुपरेषा

जेव्हां देव रक्त पाहातो

WHEN GOD SEES THE BLOOD

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“रक्त पाहीन तेव्हां मी तुम्हांला ओलांडून जाईन” (निर्गम 12:13).

(निर्गम 11:1, 4-5; 12:12, 7)

I.    प्रथम, रक्ताचा अर्थ, मार्क 14:12, 23-24; योहान 1:29;
प्रे. कृ. 20:28; I करिंथ 5:7.

II.   दुसरे, रक्ताची परिणामकारकता, निर्गम 12:23, 22; I प्रेत्र 1:18-19;
योहान 19:34; I योहान 1:7.

III.  तिसरे, रक्ताचा उपयोग, रोम 3:24-25; मत्तय 26:28.