Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
संजीवन नाकारलेपणा नाहीसा करते

REVIVAL CURES REJECTION
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
बुधवारी संध्याकाळी, दि. 9, ऑगष्ट 2017 रोजी.
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Wednesday Evening, August 9, 2017

“प्रीतिच्या ठायी भीति नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीति भीति घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीति बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही” (I योहान 4:18).


एका प्रसिद्ध मनोरुग्ण चिकित्सकाने एक पुस्तक लिहले ज्यात 288 भीतींची यादी दिली, भीति जी लोक जीवनामध्ये अनुभवतात – त्या 288 आहेत! सहा ज्या सामान्य भीति आढळतात त्या म्हणजे नाकारलेपणाची भीति, मृत्यूची भीति, वृध्दापकाळाची भीति, आणि निंदेची भीति. गरीबीची भीति, आजाराची भीति. मनोरुग्ण चिकित्सक पुढे म्हणाले, “नकाराची भीति ही सर्वात मोठी भीति आहे. मृत्यूच्या भीतीपेक्षा नाकारलेपणाची भीति मोठी असते!” याचा विचार करा! लोक नाकारलेपणा पेक्षा मरणे पसंद करतात!

डॉ. क्रिस्टोफर कागॅन हे कदाचित इतर कोणापेक्षाहि जास्त जाणतात. ते म्हणाले, “डॉ. हायमर्स हे सामान्य कुटुंबात वाढले नाहीत. जर ते वाढले असते तर ते जास्त बहिस्त व सामाजिक झाले असते. परंतू सर्व चल व नकार ह्यामुळे ते जास्त अंतर्मुख — व्यक्ति जे आंतरिक पाहतात. तुम्ही त्यांस आंतर्मुखी समजू नका कारण ते चांगला प्रचार करतात. परंतू ते आंतरिक खूप संवेदनशील, स्वत:च्या कमजोरीची जाणीव असलेले असे आहेत.” डॉ. कागॅन हे बरोबर आहेत. मी आनंदी लोकांमध्ये असेन, त्यांच्या संगतीचा आनंद उपभोगीत असेन, तेव्हां अचानक माझा मूड बदलतो आणि मला माझ्या अस्तित्वासंबधी चिंता आणि एकाकीपणाची वेदना आणि नाकारलेची भावना व निराशा वाटू लागते. जेव्हां मी एकटा असतो किंवा जेव्हां मला देवाची समक्षता जाणवते तेव्हां फक्त मला नाकारलेची भावना जाणवत नाही.

संजीवनाच्या समयी — जेव्हां देव वास्तवात असतो जो की तो माझी नाकारलेची भावना व एकाकीपणा झाकोळून टाकतो तेव्हां मला घरी असल्यासारखे वाटते.

त्यामुळे तरुण मुले मंडळीत येतात तेव्हां त्यांना काय वाटते ते मला कळते. त्यांना आपण स्विकारार्हता व प्रेम देतो. परंतू ते कांही वेळेकरिता येतात तेव्हां आपणास वाटते ते “आत” आहेत. ते व्यवस्थित आहेत असे वाटते. लगेचच ज्यांना अगोदर वाटत होती तशी वेगळे केल्याची व नाकारलेची भावना वाटू लागते. केवळ तेच थांबतात जे स्विकारार्हतेच्या भावनेशिवाय राहण्यास समर्थ असतात. मी जसे केले तसे ते थांबतात. मला नाकारलेची भावना झाली तरी, मी मंडळीत थांबलो कारण मला इतर कुठे जाण्यास मार्ग नव्हता. मी जरी एकाकी होतो, तरी मंडळीत पुष्कळ लोक होते. म्हणून मला बोचणी लागलेली व नाकारलेची भावना होती तरी मी स्विकारार्हतेच्या भावनेचे सोंग केले. रविवारच्या रात्री, जेव्हां मी घरी गेलो, तेव्हां मी नाकारलेची भावनेने भरुन गेलो. जसे मला घरी नेले तसे मला प्रसिद्ध गीताचे बोल, “एकाकी पुन्हां, निसर्गत:” आठवू लागले.

एक तरुण व्यक्ति मंडळीत स्विकारार्हता व प्रेम शोधत होती, परंतू त्यांस केवळ थंडावा व नाकारलेपणा मिळाला. ज्यांनी मंडळी सोडली आहे असे जवळजवळ सर्व तरुण असे करतात कारण अभिवचन काय दिले आहे ह्याची पूर्तता करण्यास मंडळी अपयशी ठरली आहे. आपण गाऊ

मंडळीस व खाण्यास घरी या,
गोड सहभागितेसाठी एकत्र या,
एका उपचाराने मी शांत करीन
जेव्हां आम्ही खाण्यास खाली बसतो.

ते आमचे गीत ऐकतात व त्यांना उपहासात्मक वाटते. ते मंडळीस चेष्टेचा विषय बनवितात. त्यांच्या चेह-यावर उपहासात्मक हास्य असते कारण आपण “गोड सहभागिता” संबंधी खोटे बोलतो आहोत. “जेव्हां आपण खाण्यास बसतो तेव्हां गोड सहभागिता” त्यांस वाटत नाही. त्यांना वाटते की, “हे लोक 'गोड सहभागिता' संबंधी बोलतात परंतू ती त्यांना जाणवत नाही. डॉ. हायमर्सनां सुद्धा जाणवत नाही.” म्हणून, ते जगाकडे परत वळतात. ते जगाकडे परत वळतात कारण, मंडळी पेक्षा वाईट इतर कुठेहि एवढे वाईट जाणवत नाही. किमान जग “गोड सहभागिता” संबंधी खोटे बोलत नाही. जगात तुम्हाला स्विकारणारे किमान मित्र तरी भेटतात. कांहीतरी असे आहे जे मंडळीत तुम्हांला कधीहि आढळत नाही. येथे तुम्हां सर्वांस ढोंगीपणा, व थंडपणा आणि नकार आढळतो.

काय आहे जे आम्हांला मंडळीत ख्रिस्ती प्रेम राखण्यापासून दूर ठेवते? ती भीति आहे जी आमच्यापासून खरे ख्रिस्ती प्रेम चोरते. ते माझ्याबद्दल काय विचार करतात? ते माझ्याबद्दल काय म्हणतील? खरोखर मला ते ओळखतील काय होईल? मी काय विचार करतो वा मला काय वाटते हे खरोखर त्यांना कळले तर काय? ते मला नाकारतील –हेच ते करतील! नाकारलेपणाची भीति ही सर्वात मोठी भीति आहे – मृत्यूच्या भीतिपेक्षा मोठी भीति! आजारीपणाच्या भीतीपेक्षा मोठी भीति. संपूर्ण जगातील इतर भीतीपेक्षा मोठी भीति आहे!

कवी रॉबर्ट फोर्स्ट हे चांगल्या प्रकारे व्यक्त करतात. “प्रकटीकरण” असे त्यांच्या कवितेस म्हणतात.

आपण आपल्यासाठी वेगळी जागा बनवितो
हलके जे त्रासदायक व तुच्छ शब्दाच्या मागे,
परंतू ओहो, व्यस्त ह्दय
जोवर खरोखर आम्हांस बाहेर पाहत नाही.

ह्या बाबीची गरज आहे तर हे केवलवाणे आहे
³किंवा म्हणून आपण म्हणतो´ त्याच्या शेवटी
प्रेरणेसाठी आपण वास्तवदर्शी बोलतो
मित्राला समजून घेऊन.

लांबूनच देवाबरोबर लपवा छपवी करतात,
म्हणून जे सर्व लपतात ते दूर असतात
ते कोठे आहेत ते आम्ही सांगावयास आणि बोलावयास हवे.
   (“प्रकटीकरण” रॉबर्ट फोर्स्ट द्वारा, 1874-1963).

आणि ते आपला उतारा आणतो.

“प्रीतिच्या ठायी भीति नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीति भीति घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीति बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही” (I योहान 4:18).

नाकारलेपणाच्या भीतीवर कशी मात करुया? परिपूर्ण प्रेमाने! परंतू “परिपूर्ण” प्रेम कसे मिळेल? “मी तुझ्यावर प्रेम करितो! मी तुझ्यावर प्रेम करितो!” असे फक्त बोलून नव्हे. I योहान 3:18 पाहा, “मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व सत्याने आपण प्रीति करावी.” ते आपण कसे करु? ते सोपे नाही. आपण ते करण्यास घाबरतो. कदाचित आपणांस नाकारले जाईल!!! जर आपणांस खरोखर व प्रामाणिकपणे संजीवन यावेसे वाटते तर ते आम्ही करायला हवे. आम्ही ते करण्यास पुढाकार घेतला पाहिजे. “मित्राची समजेस प्रेरणा देण्यास आम्ही वास्तवदर्शी बोललो पाहिजे.” “म्हणून जे [स्वत:ला] लपवितात त्यांना ते कोठे आहेत हे सांगायला हवे.” आपणांस खरोखर संजीवन हवे आहे तर तेच हे प्रकटीकरण आहे! कृपया I योहान1:9 आणि 10 वाचा. उभे राहून वाचूया.

“जर आपण आपली पापे पदरी गेतली, तर तो विश्वनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापाची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतिपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही; असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही.” I योहान1:9, 10).

आपण खाली बसू शकता. आपले पाप कबूल करणे ही संजीवनाची गुरुकिल्ली आहे. देवाविरुद्ध आम्ही पाप केले आहे तर अश्रू गाळून आपले पाप त्याच्याजवळ कबूल करणे पुरेसे आहे. केवळ शब्दाने नव्हे, तर अश्रू गाळून, जसे चीनमध्ये केले, जसे की इतर सर्व संजीवनात करतात. ब्रायन एडवर्ड बरोबर म्हणाले, “संजीवनासारखी इतर कोणतीहि गोष्ट अश्रू गाळल्याशिवाय जाणीव होत नाही” (संजीवन, पृष्ठ 115). पुन्हां ते म्हणाले, “खोलवर, बेचैन होऊन व नम्रपणे पापाविषयी जाणीव झाल्याशिवाय संजीवन नाही” (पृष्ठ 116). “खोलवर जणीव होण्याचे कारण पापाची जाणीव होणे व त्याची तिरस्कार करणे होय (पृष्ठ 122). पापाची जाणीव होणे ही संजीवनाची गुरुकिल्ली आहे! आपण पाप केले तर, अश्रू गाळून आपण कबूल करु शकतो, आणि तो आपल्याला सर्व अनीतिपासून शुद्ध करील.” “हे देवा, माझी झडती घे” हे गीत उभे राहून गाऊया.

“हे देवा, माझी झडती घे, आणि माझे ह्दय जाण:
मला कसोशीस लाव आणि माझे मनोगत जाण:
आणि माझे ह्दय जाण;
मला कसोशीस लाव आणि माझे मनोगत जाण;
माझ्या ठायी दुष्टपणाकडे कांही प्रवृत्ती असेल तर पाहा,
आणि मला सनातन मार्गाने चालीव”
   (स्त्रोत्र 139:23, 24).

आपण खाली बसू शकता. आपणांस कधीहि पूर्ण संजीवन मिळाले नाही कारण आम्ही नेहमी “आम्हांस वेगळी हलके जे त्रासदायक व तुच्छ शब्दाच्या मागे जागा बनवितो (उपहास, खोचून बोलणे, चेष्टा करणे, मस्करी करणे).”

परंतू, दुसरे, आपण खोलात गेले पाहिजे. याकोब 5:16 कडे वळूया, कृपया ते वाचण्यास उभे रहा.

“तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करुन एकमेकांसाठी प्रार्थना करा, नीतिमानांची प्राथना कार्य करण्यास फार प्रबळ असते” (याकोब 5:16).

आपण खाली बसू शकता. मॅथ्यू हेन्री म्हणाले,

येथे कबूल करणे म्हणजे ख्रिस्ती लोकांनी एकमेकांची क्षमा करणे...आपल्यापेक्षा भिन्न आहेत त्यांच्यांशी समेट करणे यासाठी कबूलीची गरज आहे ज्यामुळे पापाची क्षमा व त्याच्याविरुद्ध सामर्थ्य मिळावे म्हणून त्यांनी एकमेकांस साहाय्य करावे. जे आपल्या चुकांची एकमेकांजवळ कबूली करतात त्यांनी एकमेकांसह आणि एकमेकांसाठी प्रार्थना करावी.

याकोब 5:16 वर अप्लाइड न्यू टेस्टामेंट समालोचन हा विचार देते की,

खरी सहभागिता म्हणजे एकमेकांजवळ पाप कबूल करणे होय. ज्यावेळी असे आपण करतो त्यावेळी आपणांस आत्मिक आरोग्य प्राप्त होते. एकमेकांपासू आपण कांहीहि लपविता कामा नये.

दुस-यांबरोबर प्रत्येक ख्रिस्ती लोकांस दोष आहेत. कारण आपल्या वारसाने आलेला स्वार्थीपणा आपण सर्व एकमेकांबद्दल प्रेमात मागे पडलो आहोत. तुम्हांस, किंवा तुमच्याविषयी कोणीतरी रागाने मंडळीत बोलते. कोणीतरी तुमची पर्वा करीत नाही असे वाटते. प्रभूसाठी जी सेवा तुम्ही करता त्याचे कोणीहि कौतुक करीत नाही. कोणीतरी तुम्ही नाराज व्हावे म्हणून कांहीतरी करते. कोणीतरी तमच्या भावना दुखाविते. आम्ही आपले दोष इतरांपासून लपवू नये. देवाची समक्षता असणे खूप मोलवान आहे. आपल्या वेदना आणि दु:ख धरुन दुस-यांवर प्रेम करण्यापासून थांबतो. “ही पापाची खोल जाणीव कधीकधी आपणांस जाहिररित्या व सार्वजनिक कबली देण्यास भाग पाडतो... जेथे चुकीचा [असलेला] नातेसंबंध पुन्हां चांगला होतो...महिमा व आनंदाच्या अगोदर, जाणीव होते, आणि देवाच्या लोकांबरोबर नातेसंबंध सुरु होतो. तेथे अश्रू आणि दैवी दु:ख असते. तेथे चुकीचे, बरोबर ठेवले जाते, गुपीत, माणसाच्या डोळ्याच्या पलीकडचे, फेकून द्यायला हवे आणि खराब नातेसंबंध पुन्हां उघडपणे सुरळीत करायला हवे. आपण हे [करण्यास] तयार नसू, तर संजीवनासाठी आपण प्रार्थना न करणे चांगले. संजीवन हे मंडळीच्या आनंदासाठी नाही, परंतू तिच्या शुद्धतेसाठी आहे. सध्या आपली मंडळी ही अशुद्ध आहे कारण ख्रिस्ती लोकांना पापाची जाणीव होत नाही [अश्रूपूर्ण नयनांने एकमेकांजवळ पाप कबूल करा]” (एडवर्ड्स, संजीवन, पृष्ठ 119, 120).

आपण अश्रूपूर्ण नयनांने एकमेकांजवळ पाप जोवर कबूल करीत नाही तोवर आपण अंत:करणात आनंदी होऊ शकत नाही. हे चीनमध्ये वारंवार घडते. आपल्या मंडळीमध्ये का घडत नाही? आपले पाप कबूल करण्याचा अभिमान सुद्धा आहे. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतील यांस आपण घाबरतो. सैतान आपणास पाप कबूली देण्यापासून दूर ठेवण्यासाठी ह्या भीतीचा उपयोग करतो. सैतानाला ठाऊक आहे की दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतील असे आपल्याला घाबरवून संजीवनाच्या आनंदापासून दूर ठेवू शकतो. सैतानाला ठाऊक आहे की आपल्याला घाबरवून आपल्या मंडळीस दुबळेपणात व नुकसानीत ठेवील. दुसरे आपल्याबद्दल काय विचार करतील ही भीति आपणांस पाप कबूली देणे व आत्म्याचे आरोग्य यापासून थांबवितो. यशया म्हणाला, “तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तूं मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तूं कोण...परमेश्वर तुझा कर्ता, याला तूं का विसरलीस?”(यशया51:12, 13). पवित्रशास्त्र म्हणते, “मनुष्याची भीति पाशरुप होते” (नीतिसुत्रे 29:25). कृपया उभे राहा व नीतिसुत्रे 28:13 वाचा. हे स्कोफिल्ड स्टडी बायबलच्या पृष्ठ 692 वर आहे. सर्वांनी हे मोठ्याने वाचा!

“जो आपले दोष झाकितो त्याचे बरे होत नाही; जो ते कबूल करुन सोडून देतो त्याजवर दया होते” (नीतिसुत्रे 28:13).

“हे देवा, माझी झडती घे” - हे गाऊया.

“हे देवा, माझी झडती घे, आणि माझे ह्दय जाण:
मला कसोशीस लाव आणि माझे मनोगत जाण:
आणि माझे ह्दय जाण;
मला कसोशीस लाव आणि माझे मनोगत जाण;
माझ्या ठायी दुष्टपणाकडे कांही प्रवृत्ती असेल तर पाहा,
आणि मला सनातन मार्गाने चालीव”
   (स्त्रोत्र 139:23, 24).

“जिवंत देवाच्या आत्म्या”! हे गीत गाऊया!

आम्ही प्रार्थना करितो, जिवंत देवाच्या आत्म्या, खाली ये.
आम्ही प्रार्थना करितो, जिवंत देवाच्या आत्म्या, खाली ये.
मला वितळव, मला आकार दे, मला भग्न कर, मला वाकीव.
आम्ही प्रार्थना करितो, जिवंत देवाच्या आत्म्या, खाली ये.
(“जिवंत देवाच्या आत्म्या” डॅनिएल आयव्हर्सन यांच्या द्वारा, 1899-1977; पाळकानी बदल केलेला).

आपण खाली बसू शकता.

ख्रिस्त म्हणाला “जे दु:ख करतात ते धन्य.” जे आपले पाप कबूल करतात व त्यावर अश्रू ढाळतात याचा ते संदर्भ देते. जे संजीवनाची प्रतिक्षा करतात त्यांस पाप ही मोठी समस्या आहे. संजीवन हे जग जे पाहू शकत नाही त्या आंतरिक पापाविषयी विचार करण्यास लावते. आपल्या ह्दयातील पापावर संजीवन प्रकाश टाकते. इव्हान रॉबर्ट मंडळीस संजीवनास उत्तेजन देऊन तयार करीत असतांना, ते म्हणाले जोवर पवित्र आत्मा येत नाही तोवर लोक तयार होणार नाहीत. ते म्हणाले, “सर्व वाईट वासनेवर विजय मिळवायला हवा” — सर्व कडूपणा, सर्व विवाद, सर्व राग. तुम्हांला वाटते तुम्ही क्षमा करु शकत नाही, दंडवत घाला व क्षमेच्या आत्म्यासाठी प्रार्थना करा — दुस-या व्यक्तिकडे जाऊन व क्षमेची याचना करण्याची इच्छा बाळगा — केवळ त्यानंतरच तुम्हांस देवाच्या गोड समक्षतेचा अनुभव घेऊ शकता. केवळ शुद्ध ख्रिस्तीच देवाच्या प्रेमाचा व समक्षता अनुभवा शकता. आमच्या सारख्या अश्रूच्या नयनाने पाप कबूल करण्यापूर्वीच्या अशुद्ध मंडळीत संजीवनाचा आनंद येऊ शकत नाही. केवळ त्यानंरच देवाच्या समक्षतेचा आनंद उपभोगू शकतो. रविवारच्या रात्री कबूली द्यावी म्हणून प्रार्थना करण्याची संधी आम्ही देत असताना आपल्या बहिणी “माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर” हे गीत वाजवतील. पवित्र आत्म्याने तुम्हांस व इतरांना रविवारच्या रात्री कबूली देण्याचे दाखवावे म्हणून प्रार्थना करा. दोघे दोघे किंवा तिघे एकमेकांकडे जा, आणि रविवारच्या रात्री कबूली द्यावी म्हणून कडक प्रार्थना करा. आता उभे राहूया व “माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर” हे गीत गाऊया. ते 17 क्रमांकाचे आहे.

तारका, मी प्रार्थना करतो, माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर,
   आज मला फक्त येशू दिसू दे;
मृत्यू छायेच्या दरीतूनहि जात असलो तरी,
   तुझा अक्षय महिमा मला वेढून टाकता.
दैवी तारका, माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर,
   तुझ्या महिमेने माझा आत्मा प्रकाशित करतो.
सगळेजन पाहतील असे, माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर
   यासाठी की तुझी पवित्र प्रतिमा माझ्यातून दिसावी.

प्रत्येक मनीषा; माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर
   माझा उत्साहित आत्मा, तुझ्या महिमेसाठी राख,
तुझे पवित्र प्रेम, तुझ्या परिपूर्णते सह,
   स्वर्गीय प्रकाशाने माझा मार्ग उजळवून टाक.
दैवी तारका, माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर,
   तुझ्या महिमेने माझा आत्मा प्रकाशित करतो.
सगळेजन पाहतील असे, माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर
   यासाठी की तुझी पवित्र प्रतिमा माझ्यातून दिसावी.

माझे पाप संपव, माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर
   अंघारात तुझा प्रकाश उजळू दे.
केवळ तुझे पवित्र मुख मला पाहू दे,
   तुझ्या अनंत कृपेने माझा आत्मा उल्हासितो.
दैवी तारका, माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर,
   तुझ्या महिमेने माझा आत्मा प्रकाशित करतो.
सगळेजन पाहतील असे, माझ्या संपूर्ण दृष्टांताने भर
   यासाठी की तुझी पवित्र प्रतिमा माझ्यातून दिसावी.
(“फिल ऑल माय व्हिजन” अविज बर्गुसन ख्रिस्टीअनसेन यांच्या द्वारा, 1895-1985).

आता “मला ते पुढे नेऊ वाटते.” हे तुमच्या गीतांच्या शीटमध्ये 18 क्रमांकावर आहे हे गाऊया.

अग्नि पेटण्यासाठी एका ढिणगीची गरज आहे.
आणि जे चमकण्यासाठी भोवताली फिरतात,
ते असे देवाच्या प्रेमासह, एकदा का तुम्ही त्याचा अनुभव घेतलात,
त्याचे प्रेम सर्वांपर्यंत पोहंचवाल, तुम्हांला ते पुढे नेऊ वाटते.

वंसताचा काळ केवढा अद्भूत, जेव्हां सर्व झाडाची पाने गळूल पडतात,
पक्षी गाणी गातात, फुले उमलू लागतात,
ते असे देवाच्या प्रेमासह, एकदा का तुम्ही त्याचा अनुभव घेतलात,
ताजा वंसतासह, गाऊ वाटते, तुम्हांला ते पुढे नेऊ वाटते.

मला जे सुख मिळाले, माझ्या मित्रा, ते तुला देऊ वाटते,
तूं कसल्या जोखडात आहे हे विशेष नाही, तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहू शकता,
पर्वत शिखरावरुन आरोळी मारीन, माझा शब्द माहित व्हावा ,
ख्रिस्ताची प्रीति माझ्याकडे येते, मला ती पुढे नेऊ वाटते.
   (“पास ट ऑन” कुर्त कैसर यांच्या द्वारा, 1969; पाळकानी बदल केलेला).

येशूने तुमचे पाप धुवावे म्हणून तुम्ही आमच्याशी बोलू इच्छिता तर, कृपया आता सभागृहाच्या मागे या. डॉ. कागन हे तुम्हांस शांत स्थळी नेतील जेथे आपण बोलू. डॉ. चॅन, कृपया या व ज्यांनी प्रतिसाद दिला आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रिफित यांनी गायले: “रिवायव्ह अस अगेन” (विलियम पी. मॅके द्वारा, 1839-1885).
“Revive Us Again” (by William P. Mackay, 1839-1885).