Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
संजीवनासाठी अंत:करणातून आरोळी!

HEARTCRY FOR REVIVAL!
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, दि. 16, जुलै 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Morning, July 16, 2017

“मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन” (यिर्मया 33:3).


यिर्मया हा तुरुंगात होता. यहुदी लोक बंदिवासात जाणार हे सांगण्यासाठी तो तुरुंगात होता. यिर्मयाला कांहीच आशा वाटत नव्हती. देवाने त्याच्या लोकांना सोडले आहे असे त्याला वाटत होते. त्याने त्याची आशा पूर्णपणे गमाविली होती आणि तुरुंगात बंद होता. आता देव त्याच्या अंतकरणाशी बोलला. देव त्याला म्हणाला,

“मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन”(यिर्मया 33:3).

गेल्या रविवारी रात्री मी “संजीवनामध्ये प्रार्थनेचे युद्ध! ” या उपदेशावर बोललो मी म्हणालो आपण भौतिकवादाच्या मोठ्या अधिपती खाली जगतो. मी म्हणालो, “देव निघून गेला आहे! त्याने आमच्या मंडळ्या सोडल्या आहेत. त्याने आमची मंडळी सोडली आहे...परंतू देवाने खाली यावे असे आम्हांस वाटत नाही. आमच्या गाढ निद्रेमुळे आमची मंडळी आत्म्याविना असेल. मळलेल्या मार्गाने फक्त जायचे. का म्हणून बदलावे? आम्हांला का त्रास देता? आम्हांला आमच्या गुंगीत झोपू दे. देवाची समक्षता व सामर्थ्य मिळावे म्हणून प्रार्थना व उपवास करण्याचे श्रम करण्यास आम्हांला परत जाऊ वाटत नाही.” कांही आठवड्यात सतरा लोकांचे तारण झाले. डॉ. चान हे पुन्हां भरले आणि संजीवित झाले. जॉन सॅमुएल कागॅन यांनी शुभवर्तमान प्रचार करण्यास समर्पण केले. आरोन यांकी व जॅक नगान डिकन झालेत. ख्रिस्टिन नगुयेन आणि मि. ली हे दोघे प्रार्थना योद्धे झालेत.

आपणास “स्पर्शाचे” संजीवन मिळाले. त्या दिवसात मी व डॉ. कागॅन शिकलो की देव उपस्थित होता तेव्हां लोकांचे परिवर्तन झाले, परंतू जेव्हां देव उपस्थित नव्हता तेव्हां कांहीहि घडले नाही. आरोन व जॅक नगान हे वेगळे कांहीतरी शिकलेत. प्रार्थनेत सैतानी शक्तीशी कसे लढावे हे ते शिकले. जॅक म्हणाले,

‘आम्ही देवाच्या समक्षतेसाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली.जेव्हां मी दुस-यांदा प्रार्थना करण्यास सुरुवात केली, तेव्हां मला माझे डोके हलके आणि चक्कर आल्यासारखे वाटू लागले. प्रार्थना करण्यास अवघड जाऊ लागले. मोठे सैतानी अढखळण असल्याचे आम्हांस जाणवले आणि मला प्रार्थना चालू ठेवणे अशक्य झाले. आम्ही आमच्या गुडघ्यावर आलो आणि सैतानाची उपस्थिती निघून जावी म्हणून देवाकडे प्रार्थना केली तसेच ख्रिस्ताच्या रक्ताकडे विनवणी केली. माझा चेहरा खाली जमीनीकडे गेला असतांना माझी प्रार्थना संपवली. या अवस्थेत आम्ही प्रार्थनेची तिसरी फेरी सुरु केली आणि आम्हांस जाणवू लागले की देवाने अंधकार व सैतानाची उपस्थिती काढून टाकलेली आहे. आम्हांला समजले की [संध्याकाळची उपासना] ही खूप महत्वाची होणार होती. हे साधारण 4:00 वा. घडले.’

संध्याकाळच्या उपासनेमध्ये, दोन तासांनंतर, मि. व्हर्जिन निकेल हे अश्रूपूर्ण नयनाने पुढे आले, आणि डॉ. कागॅननी त्यांना ख्रिस्ताकडे नेले. नंतर आम्हांला कळाले की का आरोन व जॅक ह्या दोघानां दोन तासापूर्वी प्रार्थनेत एवढा संघर्ष का करावा लागला!”

“कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर [मानवी शत्रूबरोबर] नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिका-यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे” (इफिस 6:12).

आध्यात्मिक युद्ध हे प्रार्थनेच्या द्वारे जिंकले जाते!

“मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन” (यिर्मया 33:3).

“प्रार्थनेतील सामर्थ्य,” उभे राहून गाऊया!

प्रार्थनेतील सामर्थ्य, प्रभू, प्रार्थनेतील सामर्थ्य,
   येथे जमिनीचे पाप, आणि दुख: आणि काळजी; आम्हाला
आम्हाला संजीवन हवे आहे, निराशेतील जीवाला;
   ओ मला सामर्थ्य दे, प्रार्थनेतील सामर्थ्य!
(“मला प्रार्थना करण्यास शिकीव” अल्बर्ट एस. रिट्झ द्वारा, 1879-1966).
मी तिसरी ओळ “आम्हाला संजीवन हवे आहे, जीव निराशेत;
   ओ मला सामर्थ्य दे, प्रार्थनेतील सामर्थ्य!” अशी बदलली

आपण खाली बसू शकता.

संजीवनासाठी प्रार्थना करण्यापासून पुष्कळांना सैतानाने अडविले आहे. गेल्या गुरुवारच्या रात्री मी मतदान घेतले. मी म्हणालो, “संजीवनासाठी प्रार्थना करण्यास सांगितले तेव्हां तुमच्यापैकी कितीजनांनी असा विचार केला की आपल्या मंडळीत मला आणखी लोक हवेत?” तुमच्यापैकी जवळजवळ अर्ध्या लोकांनी हात उंचाविला. मग मी म्हणालो, “संजीवनासाठी प्रार्थना करण्यास सांगितले तेव्हां तुमच्यापैकी कितीजनांनी असा विचार केला की आपल्या मंडळीत मला आणखी काम हवे?” तुमच्यापैकी जवळजवळ एक तृतियांश जनांनी हात उंचाविला. हे धक्कादायक होते. खूप, खूपदा मी तुम्हांस सांगितले की, “हे आणखी लोकांकरिता नाही!” खूप, खूपदा मी तुम्हांस सांगितले की, “हे आणखी कामाकरिता नाही!” खूप, खूपदा मी तुम्हांस सांगितले की, “जेव्हां संजीवन येईल तेव्हां कमी काम होईल!”

आता आपणांसाठी एक पाहुणा मिळविण्यास शेकडोच्या आणि शेकडो नावे तुम्हांस मिळवावी लागतील. आणि तो एक पाहुणा परत येत नाही! संजीवनामध्ये खूप कमी नावे आणि खूप कमी पाहुणे तुम्हांस मिळतील परंतू त्यातील बरेचसे पाहुणे परत येतील. कदाचित आपण संपूर्ण सुवार्ताकार्य बंद करु आणि तरी पुष्कळ लोक येतील व तारण मिळवितील! चीनच्या एका मंडळीत सुवार्ताकार्य अजिबात नाही. ते कुठलीहि सभा आयोजीत करत नाहीत. आणि तरीहि 2,000 लोक आले आणि राहिले. का? कारण त्यांच्यात संजीवन होते! त्यामुळे! पूर्वी मी हे सांगितले, परंतू तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही कारण तुम्ही ते पाहिले नाही. पुन्हां एकदा आपला उतारा ऐकूया,

“मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन” (यिर्मया 33:3).

तुला ठाऊक नाहीत अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन.” त्यावर तुम्ही विश्वास ठेऊ शकता? तुम्ही पूर्वी कधीहि पाहिल्या नाहीत अशा गोष्टी देव करील असा विश्वास ठेवण्यास तुम्ही लीन व्हाल काय? “तुम्हाला ठाऊक नाहीत” अशा गोष्टी देव प्रार्थनेच्या उत्तरादाखल करील असा तुम्ही विश्वास ठेऊ शकता? उभे राहा आणि हे गा!

प्रार्थनेत सामर्थ्य, प्रभू, प्रार्थनेत सामर्थ्य,
     येथे ‘मध्ये पृथ्वीचे’ पाप व दु:ख व काळजी;
आम्हांस संजीवन हवे, निराशेतील आत्म्यांना;
   मला सामर्थ्य दे, प्रार्थनेत सामर्थ्य !
(“मला प्रार्थना करण्यास शिकीव” अल्बर्ट एस. रिट्झ, 1879-1966).

आम्ही हरविलेल्या मुलांना मंडळीत आणण्यासाठी अंत:करणापासून बाहेर पडतो. परंतू ते जेव्हां येथे येतात तेव्हां त्यांना देव अनुभव येत नाही. का नाही? कारण तो येथे सामर्थ्याने नाही. देव सर्वस्वी पवित्र आहे. “तुम्हांस ठाऊक नाहीत अशा, महान व गहन गोष्टी” तो करितो असा तुमच्यातील कित्येकांचा खरेतर विश्वास नाही. तुम्ही विश्वास ठेवत नाही. तुम्हाला असे वाटते की ह्या सर्व भाकड कथा आहेत. आपण वयस्क झालो आहोत, असा तुम्ही विचार करता. जो चमत्कार तुम्ही पाहिलाच नाही, त्या चमत्काराविषयी बाष्कळ बडबड करता, त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवत नाही.

आम्ही पुष्कळ चमत्कार पाहिलेत, परंतू तरीहि आम्ही विश्वास ठेवीत नाही! ही मंडळीची इमारत वाचविण्यासाठी एकोणचाळीस लोकांनी दोन दसलक्ष डॉलर्स दिले आहेत. ज्यांच्याशी मी बोललो अशा कोणत्याहि प्रचारकाने असा विचार केला नाही की हे पूर्ण केले जाईल. परंतू हे केले होते! हा खूप मोठा चमत्कार आहे! तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊ नका! गेल्या वर्षी कांही आठवड्यातच 17 लोकांचे तारण झाले. परंतू ते तुम्ही पाहू नका! तो चमत्कार आहे हा विश्वास ठेवू नका! आपले दात आपटत ते म्हणाले, “मी हे कधीहि करणार नाही” तरी आता आमचे प्रचारक, नवीन पाळक, म्हणून जॉन कागॅन आम्हांस मिळाले आहेत! हा चमत्कार आहे. परंतू तो तुम्ही ते पाहत नाही! तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊ नका! संपूर्ण – जगात आपली 35 भाषातील – संपूर्ण जगात उपदेश पाठविण्याची सेवा आहे. परंतू तो तुम्ही ते पाहत नाही! तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊ नका!

हो, मी प्रार्थना करितो की तुम्ही जागृत व्हाल व संजीवनाच्या चमत्काराठी प्रार्थना कराल! हो, तुम्ही परुशांसारखे असणार नाही, त्यांच्याबद्दल म्हटले जाते, “त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हें केली असतांहि त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही”(योहान12:37).

आणि मला ठाऊक हे की तुमच्या धर्मात आता आनंद नाही, आणि कधीकधी माझे अंत:करण तुमच्यासाठी रडते. तुम्हांस आनंद नाही. तुम्हांस आशा नाही. गरीब शमशोनासारखे तुरुंगात एक गुलाम होऊन तुम्ही फक्त भरडले जात आहां. होय! तुमच्यातील कांहीजनांना मंडळी ही तुरुंग वाटते, असा तुरुंग जेथे तुम्ही सेवा देताय, जेथे तुम्ही सुवार्ताविषयक गुलामाचे कार्य करता. तुम्ही त्याचा तिरस्कारहि करता! परंतू सुटका कशी करुन घ्यावी हे तुम्हांस माहीत नाही! तुम्ही आशेशिवाय आध्यात्मिक साखळीने बांधले, भरडले, भरडले, भरडले आहां. कधीकधी तुम्ही सोडून जाण्याचा विचार करता. मला माहित आहे तुमच्यापैकी कांहीजन हे करतात. परंतू तुम्ही सुटू शकणार नाही. तुमचे जे मित्र आहेत तेच फक्त येथे आहेत. तुमचे जे नातेवाईक आहेत तेच फक्त येथे आहेत! न थांबणारे भरडणे, तिरस्करणीय कष्ट आणि जे मंडळीचे काम तुम्हांस तुरुंग घरासारखे वाटते त्यापासून कशी सुटका करुन घ्याल? मला तुम्हांला मदत करायची आहे! देवाला माहिती आहे मी ते करितो! सुटका करुन घेण्याचा एकच मार्ग आहे. प्रचारकाला, तुम्ही कसे ओळखाल? कारण आता तुम्ही ज्या ठिकाणी आहात तेथे मीहि होतो! मी मंडळीत बांधला, भरडला, भरडला, द्वेष केला जातो आहे – परंतू सुटकेचा मार्ग सापडत नाही! सुटण्याचा एकच मार्ग आहे! आपल्या पापाची कबूली द्या! का नाही? तुमचे पाप हा साखळदंड आहे जे तुम्हांला बांधून ठेवतो! त्यातून सुटका करुन घ्या! पश्चाताप करा आणि त्याच्या रक्ताने शुद्ध व्हा, केवळ येशू तुमचे साखळदंड ढिले करतो आणि तुमची सुटका करुन पुन्हा मोकळे करतो.

“तेव्हां तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करुन एकमेकांसाठी प्रार्थना करा...” (याकोब 5:16).

तुमची भीती, तुमच्या शंका, तुमचे पाप, तुमचा राग, तुमचा कडवटपणा, तुमचा जळफळाट, कबूल करा. “तेव्हां तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करुन एकमेकांसाठी प्रार्थना करा...” (याकोब 5:16). एका स्त्रीने ते केले! आणि येशूने तिला बरे केले. एका माणसाने ते केले, आणि येशूने त्याला बरे केले. आता तेथे एक आशेचा किरण आहे. तुम्ही विचार करता, “काय हे खरे आहे?” होय! हे खरे आहे! कोणीतरी आपली पातके कबूल करावीत येशूने त्यांना बरे करावे म्हणून आणि प्रार्थना करा.

“ख्रिस्त म्हणाला, ‘जे शोक करीत आहेत ते धन्य’ (मत्तय 5:4) ज्यांना त्यांच्या पापाची जाणीव होते व त्यामुळे ते रडतात याचा ते संदर्भ देते. ख्रिस्ती व्यक्ति ज्यांस संजीवनाची उत्कट इच्छा आहे त्यास पाप ही एक समस्या आहे, आणि संजीवन हे नेहमी जग ज्या गोष्ट पाहू शकत नाही त्या ते हाताळते. संजीवन अंधा-या जागेत प्रकाश देतो...संजीवनाच्या तयारीसाठी, इव्हान रॉबर्ट त्यांना आठवण करुन देतो की लोक जोवर तयारी करीत नाहीत जोवर [पवित्र] आत्मा येत नाही: 'आपण सर्वानी [मंडळी] वाईट भावना − सर्व द्वेष, मत्सर, पूर्वग्रह, आणि गैरसमज यातून बाहेर पडले पाहिजे. तुमच्या सर्व गुन्ह्यांची जोवर क्षमा केली जात नाही, तोवर तुम्ही [प्रार्थना करु नका]: परंतू जर तुम्हांला वाटते तर तुम्ही क्षमा करु शकत नाही, धुळी समान होऊ शकत नाही आणि क्षमेच्या आत्म्यासाठी याचना करु शकत नाही. त्यानंतर तुम्हांस ते मिळेल'”... केवळ शुद्ध ख्रिस्ती देवाजवळ राहू शकतो (ब्रायन एच. एडवर्ड, संजीवन, इव्हांजिकल प्रेस, 2004. पृष्ठ 113)... “प्रत्येकाने प्रत्येकांस क्षमा करा. [जसे ते त्यांच्या पापाची कबुली देतात] तसे प्रत्येकांस देवाला सोमोरे जायचे आहे... जवळजवळ नोंदलेल्या संजीवनाप्रमाणे [हे आहे]. पापाची खोलवर, अस्वस्थ आणि नम्र करणारी जाणीव होत नाही तोवर संजीवन नाही”(ibid, पृष्ठ 116)... सध्या आपली मंडळी अपवित्र आहे कारण ख्रिस्ती लोकांना पापाची जाणीव व भिती वाटत नाही... जे बराच काळ संजीवनाची वाट पाहत आहेत त्यांनी देवासमोर आपल्या अंत:करणाचे आणि जीवनाचे परिक्षण करण्यास सुरुवात करावी. जर आम्ही आमच्या पापावर पांधरुण घालू व कबुल करणार नाही तर [आपल्यात संजीवन येणार नाही]... लहानातल्या लहान पापाची सुद्धा जाणीव देव करुन देतो...आपण देवाच्या समक्षतेत आहोत हे ज्यांना कळते ते आपल्या व्यक्तीगत पापासंबंधी जागरुक असतात... ही खोल जाणीव आपणास क्षमाशीलतेच्या नवीन अनुभवातील स्वातंत्र्य आणि आनंदात नेते. तारणाच्या आनंदामुळे 'ह्दयातील हास्य' उफाळून बाहेर येते” (ibid., पृष्ठ 120).

“तुझ्या लोकांनी तुझ्या ठायी हर्ष पावावा म्हणून तू आमचे पुनरुज्जीवन करणार नाहीस काय? (स्तोत्र 85:6).”

अश्रू गाळून आपल्या पापाची कबुली देत नाही तोवर आपण ह्दयात हर्ष पावणार नाही! हे चीनमध्ये होत आहे. आपल्या मंडळीत का होऊ नये? एकमेकांबरोबर पापाची कबुली देण्यास, आणि एकमेकांसाठी प्रार्थना करण्यास आपण घाबरतो, ज्यामुळे आपण बरे होऊ शकतो. दुस-याच्या भितीमुळे आपण कबुली देण्याचे थांबवितो. यशया म्हणाला, “तू मर्त्य मनुष्याला... भितेस अशी तू कोण? परमेश्वर तुझा कर्ता... याला तू का विसरलीस?” (यशया 51:12, 13).

गीत क्रमांक 10!

“हे देवा, माझी झडती घेऊन माझे ह्दय जाण:
मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण:
माझ्या ठायी दुष्टपणाकडे कांही प्रवृत्ती
असेल तर पाहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव.”
   (स्तोत्र 139:23, 24).

गीत क्रमांक 17!

माझे सर्व दृष्टांत भर, पाप शुन्य होऊ दे
   सावली जाऊन माज्यात प्रकाश उजळू दे.
केवळ तुझा आशिर्वादित चेहरा मला दिसू दे,
   तुझ्या अनंत कृपेने माझा आत्मा हर्ष करितो.
माझे सर्व दृष्टांत भर, दैवी तारका,
   तुझ्या गौरवी येण्यापर्यंत माझा आत्मा चमकू दे.
माझे सर्व दृष्टांत भर, जे मी पाहणार आहे
   तुझी पवित्र प्रतिमा माझ्यातून दिसू दे.
(“माझे सर्व दृष्टांत भर” अविज बर्गेसन ख्रिस्टीएनसेन, 1895-1985).

पूर्वी तुम्ही कधी कबुली दिली नाही. तुम्हांला ठाऊक आहे तुम्ही द्यायला हवी, परंतू तुम्ही भिला. एका स्त्रीने मला फोनवरुन सांगितले की ती खूप मागे फिरतेय. मग मी रविवारी सकाळी तिच्याकडे पाहिले आणि तिने माझ्याकडे पाहिले. मला दिसत होते तिला यायचे होते. मी तिचा हात घेऊन म्हणालो, “या.” ती आली. ती यायला भित होती. शेवटी, ती एका डिकनची बायको होती! तिने पाप कबुल केले असते तर लोकांनी तिच्याबद्दल काय विचार केला असताॽ इतर काय विचार करतात ते विसरा! आपण उभे राहून गीत गात असताना, पुढे या आणि गुडघ्यावर या, आपले पाप कबूल करा. देव तुम्हाला तुमच्या पापाची खातरी करुन देईल, आणि वधस्तंभावर सांडलेले ख्रिस्ताचे रक्त तुम्हांस धुवून नवीन करील.

गीत क्रमांक 17!

माझे सर्व दृष्टांत भर, पाप शुन्य होऊ दे
सावली जाऊन माज्यात प्रकाश उजळू दे.
केवळ तुझा आशिर्वादित चेहरा मला दिसू दे,
   तुझ्या अनंत कृपेने माझा आत्मा हर्ष करितो.
माझे सर्व दृष्टांत भर, दैवी तारका,
   तुझ्या गौरवी येण्यापर्यंत माझा आत्मा चमकू दे.
माझे सर्व दृष्टांत भर, जे मी पाहणार आहे
   तुझी पवित्र प्रतिमा माझ्यातून दिसू दे.
(“माझे सर्व दृष्टांत भर” अविज बर्गेसन ख्रिस्टीएनसेन, 1895-1985).


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी शास्त्रवाचन मि. नोहा सॉंग यांनी केले: I योहान 1:5-10.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकॅड ग्रिफिथ यांनी गायले: “ओ ब्रिद ऑफ लाईफ”
(बेस्सी पी. हेड, द्वारा, 1850-1936).
“O Breath of Life” (by Bessie P. Head, 1850-1936).