Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
संजीवनामध्ये प्रार्थनेचे युद्ध!

THE BATTLE OF PRAYER IN REVIVAL!
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, दि. 9, जुलै 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, July 9, 2017


जेव्हां केव्हां मी माझ्या उपासना संगीताच्या पुस्तकाकडे पाहतो तेव्हां मला मंडळीतील संघर्षावर एकहि गीत सापडत नाही – पण एक मिळाले. मंडळीच्या संघर्षावर केवळ एक, आणि त्या गीतामध्ये केवळ एक वचन मिळाले! “संरक्षण” संबंधी पंधरा गीते आहेत. “स्तुती” संबंधी बत्तीस गीते आहेत. “लेकरां” संबंधी वीस गीते आहेत. “आराधने” संबंधी एकवीस गीते आहेत. परंतू मंडळीच्या “संघर्षावर” केवळ एक गीत − मंडळीतील संघर्ष! आणि त्या गीतामध्ये केवळ एक कडवे आहे, आणि ते युद्ध कसे करायचे हे सांगत नाही! संपूर्ण त्या उपासना संगीताच्या पुस्तकामध्ये केवळ एक कडवे आहे आणि ते आपणांस सांगते की आपले युद्ध हे सैतान व त्याच्या दुतांबरोबर आहे! आताच मि. ग्रीफिथ यांनी ते कडवे गायले.

आपल्या विजयाची चिन्हे बघून सैतान पळून जातो;
मग, ख्रिस्ती सैनिक, विजयावर आरुढ होतात!
स्तवनाच्या आवाजाने नरकाचा पाया डळमळू लागतो;
बंधूनो, आपला कंठरव करा, तुमचे गीत मोठ्याने गा!
पुढे, ख्रिस्ती सैनिक, पुढे युद्धास जातायत,
अगोदरच येशूच्या वधस्तंभासह पुढे जात आहे.
   (“पुढे, ख्रिस्ती सैनिक” सबीन बॅरींग- गुल्ड, 1834-1924).

संपूर्ण त्या उपासना संगीताच्या पुस्तकामध्ये केवळ एक कडवे आहे आणि ते आपणांस सांगते की आपले युद्ध हे सैतान व त्याच्या दुतांबरोबर आहे! आणि ते एक कडवे आधुनिक उपासना संगीताच्या पुस्तकामधून काढून टाकले आहे! ते कडवे 1957 मध्ये काढून टाकले आहे. त्याच्याहि पेक्षा वाईट, ते पूर्ण गीतच जवळ जवळ सगळ्या आधुनिक उपासना पुस्तकामधून काढून टाकले आहे! पश्चिम जगतातील ख्रिस्ती लोकांना हे ठाऊकच नाही की एक युद्ध सुद्धा चालू आहे. आम्ही झोपलेलो आहोत. दक्षिणेकडील बाप्टिस्ट मंडळ्यातील दहा लाखातून एक तृतियांश लोक दर वर्षी निघून जात आहेत. दर वर्षी त्यांच्या एक हजार मंडळ्यांची दारे कायमची बंद होत आहेत! यामध्ये आपल्या बीबीएफआय मंडळ्यांचा सुद्धा समावेश आहे. प्रार्थना सभांचे रुपांतर पवित्रशास्त्र अभ्यामध्ये झाले आहे किंवा पूर्णत: बंद झाले आहे. पश्चिम जगतातील सगळ्या मंडळ्यामधून रविवारच्या रात्रीच्या सभा पूर्णत: बंद झाल्या आहेत. यामध्ये आपल्या बीबीएफआय मंडळ्यांचा सुद्धा समावेश आहे. ज्याला आपण “सुवार्ताप्रचार” म्हणतो तो धुळी-प्रमाणे-कोरडा असे पवित्रशास्त्राचे प्रदर्शन सुरु आहे. खराखुरा सुवार्तिक प्रचार मृत झालेला आहे. मला आता माहित नाही की एखाद्या पाळकास सुवार्तिक प्रचाराचा उपदेश तयार करता येतो की नाही – त्याहून अधिक तो देता येतो की नाही! आपल्या सध्याच्या कोणत्याहि मला सुवार्तिक प्रचार ऐकायला मिळत नाही. डॉ. मार्टीन लॉईड-जोन्स हे विसाव्या शतकातील एक महान सुवार्ता प्रचारक होते. ते म्हणाले,

      पुष्कळ वर्षे झालीत ख्रिस्ती मंडळी ही अरण्यात आहे हे देवाला ठाऊक आहे. 1840 पूर्वीचा मंडळीचा इतिहास जर तुम्ही वाचलात तर बरीच शतके नियमीत संजीवन येत होते असे तुम्हांस आढळेल... अंदाजे प्रत्येक दहा वर्षानी किंवा कमी. हे त्यासारखे नव्हते. 1859 पासून केवळ एक मोठे संजीवन होते... मंडळीच्या मोठ्या इतिहासाच्या कालखंडामध्ये एका सर्वात मोठे नापीक आहे... आणि ते अजू सुरु आहे...[कुणावरहि] विश्वास ठेऊ नका हे दर्शिवते की त्यापेक्षा आपण वेगळे आहोत, आम्ही नव्हे. अरण्यातील मंडळी (मार्टीन लॉईड-जोन्स, एम.डी., रिवायवल, क्रॉसवे, 1992 आवृत्ती, पृष्ठ् 129).

आमच्या मंडळ्या मृत का आहेत? जीवन येण्यासाठी आपण चाळीस मिनिटे समुहगान केले! ढोल व गिटार वाजवून लोकांना भावनिक अमिष दाखविण्याचा आपण प्रयत्न करतो. पण त्याचा कांहीहि फायदा झाला नाही! ज्याची मदत होईल असे कांही आपण केले नाही — देवाने—पाठविलेल्या संजीवनाचा अनुभव घेण्यास बाप्टिस्ट किंवा चमत्कारास मदत होईल असे कांही आपण केले नाही. मी पुन्हां सांगतो — आपणांस कांहीहि फायदा झाला नाही!

त्याचे उत्तर काय आहे? आपण कोणाशी लढत आहोत हे आपणांस ठाऊक नाही! आपण युद्धामध्ये आहोत हे सुद्धा आपणांस ठाऊक नाही! कृपया स्कोफिल्ड अभ्यास पवित्रशास्त्रातील पृष्ठ 1255 कडे वळूया. ते इफिस 6:11 आणि 12 आहे. कृपया उभे राहा व वचन 11 आणि 12 वाचा.

“सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे; तर सत्ताबरोबर, अधिका-यांबरोबर, सध्याच्या काळोखांतील जगाच्या अधिपतीबरोबर, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे” (इफिस 6:11, 12).

तुम्ही खाली बसू शकता. व नवीन अमेरिकन पवित्रशास्त्र वचन 12 वे असे अनुवादिक करते की,

“कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर [मानवी शत्रूबरोबर] नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिका-यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे” (इफिस 6:12 NASB).

डॉ. चार्लस् रायरी म्हणाले, “विश्वासणा-यांचे शत्रू हे दुष्ट सैतानाचे अधिपती आहेत, ते नेहमी आत्मिक युद्धासाठी एकत्र जमतात” (इफिस 6:12 वरील टिप्पणी). हे अदृष्य युद्ध आहे – सैतानाबरोबर आत्मिक युद्ध. सैतान व त्याच्या दूतांबरोबर लढण्यास आपणांकडे सामर्थ्य आणि आवेश नाही. आपणांस हे देखील माहित नाही की त्याच्याबरोबर आपणांस लढावयाचे आहे! सैतानाने आपणांस झोपविले आहे! “पुढे, ख्रिस्ती सैनिक” या गीताचे ते एक कडवे सुद्धा चुकीचे आहे. ते म्हणते, “स्तवनाच्या आवाजाने नरकाचा पाया डळमळू लागतो!” नाही – ते डळमळत नाहीत! सैतानाचे दूत “स्तवनाच्या आवाजाने” घाबरत नाहीत! ते “स्तवनाच्या आवाजावर” हसतात! ते बाप्टिस्टच्या ड्रम वाजवून! इलेक्ट्रीक गीटार वाजवून! गायलेल्या गीतांवर हसतात! ते करस्मॅटिक आवाजावर हसतात! आवाज करुन व ड्रम वाजवून त्यांना आपण घाबरवू ह्या आपल्या विचारावर ते हसतात!

आपले काम सोपे आहे असे समजू नका. संजीवनात देवाची समक्षता अगदी सहज असते असा विचार आपणांस करायला भाग पाडणे हे सैतानाचे सर्वात मोठे शस्त्र आहे, “कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे.” आपणांस युद्ध करण्यास, काळोखाच्या अधिपतींबरोबर झगडण्यास बोलाविले आहे.

ह्या शक्तींशी लढणे आणि झगडणे सोपे नाही असे समजू नका! सर्वात पहिले, आपण ज्या संस्कृतीमध्ये आहोत ती सर्वस्वी त्याच्याद्वारे नियंत्रीत होतेय. माझ्या असे लक्षात आले आहे की संजीवन हे पश्चिमी राष्ट्रांपेक्षा ते असंस्कृत राष्ट्रांत जास्त येते. याचे कारण असे की आम्ही अमेरिकेत व पश्चिमी राष्ट्रांमध्ये राहतो जेथे संस्कृती ताकदवार सैतानाद्वारे नियंत्रीत केली जातेय ज्याने सामर्थ्याने आम्हांवर ताबा घेतला आहे. आम्ही काळोखातील ह्या जगाच्या अधिपतींबरोबर झगडले पाहिजे. जसे की डॉ. अंगर त्यास अनुवादित करतात, “काळोखातील ह्या जगाच्या अधिपतीं विरुद्ध.” डॉ. रायरी म्हणाले, “दुष्ट देवदूत ह्या राष्ट्रांच्या व्यवहारावर राज्य गाजवू इच्छितो... राष्ट्रांवर ताबा मिळविण्यास चांगले व दुष्ट देवदूत यांच्यामध्ये सतत युद्ध सुरु आहे” (रायरी स्टडी बायबल, दानिएल10:13 वरील टिप्पणी). डॉ. अंगर त्यांना “काळोखातील ह्या जगाचे अधिपती” असे संबोधतात (बिब्लीकल डेमोनोलॉजी, क्रिगल, 1994, पृष्ठ 196). दानिएल10:13 मध्ये अधिराज्य करणा-या अधिपतीस, “पारसाच्या राज्याचा अधिपती” असे संबोधिले आहे. सध्या “पश्चिमी राष्ट्रांचा अधिपती” चे अमेरिका व त्याच्या युती राष्ट्रांवर नियंत्रण आहे. राज्य करणा-या अधिपतीस लोकांना भौतिक गोष्टींमध्ये गुलाम करण्याची मुभा आहे. भौतिकतेचा अधिपती अमेरिका व त्याच्या युती राष्ट्रांवर नियंत्रण करतोय. भौतिकतेचा अधिपती आपल्या प्रार्थनेस अटकाव, लोकांना गुलाम, आणि संजीवनास प्रतिबंध करतो. डॉ. मार्टिन लॉईड-जोन्स हे महान प्रचारकांपैकी एक होते त्यांना हे समजले. ते म्हणाले की ह्या अधिपतीने विधर्मी लोकांची मने आंधळी केली आहेत आणि मंडळ्या तोडल्या आहेत. ते म्हणाले, “देव व धार्मिकता व तारण... यासंबंधी देवाची संपूर्ण कल्पना अदृष्य झाली [आहे] काढून टाकली व विसरुन गेली” (रिवीयव्हल, ibid., पृष्ठ 13). भौतिकतेचा अधिपती, ज्याला मी अधिपती म्हणतो तो “पश्चिमी राष्ट्रांचा अधिपती” याच्यामुळे हे घडले आहे.

तिस-या जगांत राष्ट्रें आहेत जेथे भौतिकतेचा अधिपती जे सामर्थ्य आपल्या संस्कृतीत त्याला असते ते तेथे नसते. चीन, आफ्रिका, इंडोनेशिया तसेच मुस्लीम राष्ट्रांत सुद्धा लाखो तरुण – तेथे मुस्लीम बनत आहेत.

परंतू अमेरिकेत आणि त्याच्या युती राष्ट्रांमधील लाखो तरुण मुले मंडळ्या सोडून जात आहेत. जॉर्ज बार्ना जनमत चाचणीनुसार मंडळीमध्ये 88% जी वाढ होते ती वयाच्या 25 वर्षी आमची मंडळी सोडून जाते ती, “कधीहि परत येत नाही.”

हा भयंकर भौतिकतेचा अधिपती कसा त्यांना ताब्यात ठेवतो? त्यांना तो अश्लिलतेच्या माध्यमातून ताब्यात ठेवतो, कारण ते इंटरनेटवर तासंतास टक लावून त्या बघतात. प्रार्थनेवर ते हसतात, परंतू त्यांना तासंतास सोशल मिडीयाने संमोहित करुन टाकले आहे. सकाळी जेव्हां ते उठतात तेव्हां ते आपला स्मार्टफोन हातात घेतात. ताजा अहवालानुसार, ते दिवसातून 150 वेळा आपला स्मार्टफोन तपासतात. ते मार्जुआना सारखे मादक पदार्थ सेवन करुन गुंगीत सुस्त राहतात. ज्या गॅझेट्सनी भौतिकतेच्या अधिपतीशी जोडलेले असतात त्याने, ते सकाळपासून ते रात्रीपर्यंत अगदी त्याच्या आहारी गेलेले असतात. ते आपला प्रत्येक मोकळा वेळ स्मार्टफोनकडे बघण्यात घालवितात. होशेया संदेष्ट्याच्या काळात जसे प्राचिन इस्त्राएली मूर्त्यांकडे टक लावून बघायचे तसे ते आपल्या स्मार्टफोनकडे बघतात. मी म्हणतो की सध्याच्या तरुण पीढीचे मन व ह्रदयावर ताबा मिळविण्यासाठी सैतान ह्या सोशल मिडीयाचा मूर्तीसारखा वापर करतो! मोठ्या प्रमाणात प्रचारक असा विचार करतात की हे कांही नसून केवळ आधुनिकता आहे! त्यांना हेही कळत नाही की ते सैतानी ताकदीशी हाताळणी करत आहेत, डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले! आपल्या मंडळ्या ह्या अगदी जगीक व अशक्त आहेत याचे आश्चर्य नाही!

होशेय संदेष्ट्याच्या काळात देव त्याला म्हणाला याचे मला खूप वाईट वाटले, “[इस्त्राएल] एफ्राईम मूर्तीवर आसक्त झाला आहे, त्याचे नाव सोडून द्या” (होशेय 4:17). राष्ट्राने देवाला सोडून दिले होते. ते एकटेच होते, अधिपतीच्या सामर्थ्य व नियंत्रणामध्ये एकटेच होते — सैतानी शक्तीचे गुलाम होते!

आम्ही त्यांना मंडळीत आणतो. पण देव येथे नाही. त्यांना असे वाटते की मंडळीत देव नाही. होशेय संदेष्टा म्हणतो की ते “परमेश्वराला शोधावयास जातात; परंतू तो त्यांस सापडणार नाही; तो त्यांस अंतरला आहे” (होशेय 5:6). तो गेला आहे! त्याने आमच्या मंडळ्या सोडल्या आहेत. सध्या कित्येक आठवडे त्याने आमची मंडळी सोडली आहे. तो गेलेला नाही कारण तो अस्तित्वातच नाही. अरेरे, नाही! तो गेला कारण तो अस्तित्वात आहे! त्यामुळे त्याने आम्हांला एकटे सोडले आहे. तो सर्वस्वी पवित्र देव आहे. तो आमच्यावर सर्वस्वी क्रोधीष्ट झालेला आहे. त्यामुळे त्याने आम्हांला एकटे सोडले आहे. त्यामुळे त्याची समक्षता आमच्यामध्ये नाहीये. त्यामुळे पवित्र आत्मा निघून गेलेला आहे. त्यामुळे आमच्यामध्ये संजीवन नाही!

आम्ही त्यांना मंडळीत आणतो. आम्ही त्यांना वाढदिवसाच्या मेजवाणी आणि जेवणावळ देतो. त्यांना आम्ही कार्टून दाखवितो. परंतू आपणांकडे हे सर्व आहे! आपणांस त्या गरजू मित्रासारखे वाटते जो म्हणाला, “त्याला वाढावयास माझ्याजवळ कांही नाही” (लुक 11: 6). त्याचा मित्र आला पण त्याच्याकडे वाढावयास कांही नव्हते! थोडेसे अन्न व जुने कार्टून याहून कांही नाही. त्याला वाढावयास देवाचे कांही नाही! आणि हा दाखला ह्या शब्दाने संपतो, “तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषकरुन पवित्र आत्मा देईल?” (लुक 11: 13).

आम्ही मागे जाऊन आणि जे गेल्या वर्षी केले ते करु इच्छित नाही. आमची सुस्तीची झोप व आळशीपणा ऐवजी पवित्र आत्म्याविना मंडळी असेल. केवळ नेहमीसारखे तेच तेच. का बदलायचे? आम्हांला त्रास का देता? आपण आपल्या गुंगीतच झोपूया. देवाची समक्षता व सामर्थ्यासाठी प्रार्थना आणि उपवास करण्याचे कष्ट घेण्यास आम्हांस परत जायचे नाही.

गेली चाळीस वर्षे आमच्या मंडळीत एकहि संजीवन नाही. का नाही? मी पुष्कळ वेळा संजीवनावर प्रचार केला. परंतू आमच्यात एकहि संजीवन नाही. प्रत्येक वेळी आम्ही संजीवनावर जोर दिला तेव्हां प्रत्येक वेळी भयंकर प्रतिक्रिया होती. लोक क्रोधीविष्ट झाले. लोक मंडळी सोडून गेले. खरेतर संजीवनावर जोर देण्यास भीती वाटू लागली. आशिर्वादाऐवजी शाप वाटू लागला! याचे कारण आमच्या मंडळीतील पुष्कळ लोक हे पालट न झालेले होते. ज्यांना संजीवन हवे होते ते संख्येने खूप कमी होते. आमच्यामध्ये पालट न झालेल्यांचा भरणा होता. परंतू हळूहळू ते सोडून गेले. आता पुष्कळ लोक पालट झालेले आहेत. मला वाटते संजीवनासाठी प्रार्थना करण्याचा हा योग्य समय होता.

तेथे आता ब-यापैकी खरे ख्रिस्ती आहेत जे खोटा पालट झालेल्यांपेक्षा मोठ्या संख्येने आहेत. म्हणून आम्ही संजीवनासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली आहे. आमच्यापैकी पुष्कळ असे आहेत ज्यांचा देवावर जो आम्हांस उत्तरे देतो त्यावर विश्वास आहे. जेस्सी जकामीट्झीनचे तारण झाले. मिन्ह वुचे तारण झाले. डॅनी कार्लोसचे तारण झाले. अयोका झबलगाचे तारण झाले. तिमथी चानचे तारण झाले. जोसेफ गाँगचे तारण झाले. ज्युली सिविलेचे तारण झाले. बायांग झँगचे तारण झाले. अँड्रू मत्ससकाचे तारण झाले. अलिसिया जकामीट्झीनचे तारण झाले. थॉमस लुओंगचे तारण झाले. टॉम झियाचे तारण झाले. आयर्विन लुचे तारण झाले. जेस्सीका यीनचे तारण झाले. रॉबर्ट वँगचे तारण झाले. सुसॅन छुचे तारण झाले. वर्जेल निकेलचे तारण झाले. 17 लोकांचे तारण झाले. डॉ. चॅनचे संजीवन झाले. जॉन सॅमुएल कागॅन यानी सुवार्तेकरिता समर्पण केले. आरोन यांकी आणि जॅक नगान डिकनचे प्रतिनिधी झाले. ख्रिस्टीएन नगुएन आणि श्रीमती ली हे प्रार्थना योद्धे झाले.

परंतू आम्हांस प्रत्येक रात्री सैतान व त्याच्या दूतांबरोबर झगडावयाचे होते! डॉ. कागॅन यांनी आपल्या रोजनिशीमध्ये हा संजीवनाचा वृतांत लिहला आहे. “ही रोजनिशी वाचतांना डॉ. हायमर्स म्हणाले त्यांच्या दोन गोष्टी लक्षात आल्या. पहिली, जेव्हां देव जो पवित्र आत्मा आला, तेव्हां महान व अदभूत गोष्टी घडल्या. दुसरी, जेव्हां, देवाची उपस्थिती नव्हती, तेव्हां काहीच घडले नाही.” संजीवनाच्या काळात एका माणसांने माझ्यावर हल्ला केला आणि कुटुंबासमवेत त्याने मंडळी सोडली. आणखी एक तरुण मंडळी सोडून गेला. जुना “उघडा दरवाजा” यासारखी त्यांनी प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या प्रदर्शनाने सैतानाचे तोंड संजीवनास विरोध करते हे स्पष्ट होते.

प्रार्थनेतील सैतानाच्या संघर्षाबद्दल जॅक नगानने लिहले. जॅक हे आरोन यांकीकडे विनवनी करीत होता. तो म्हणाला, “देवाच्या समक्षतेसाठी आम्ही प्रार्थना करण्यास सुरुवात केली. जेव्हां मी माझ्या दुस-या प्रार्थनेला सुरुवात केली, माझे डोके हलके झाल्यासारखे वाटू लागले आणि चक्कर येऊ लागली. मला व्यवस्थित प्रार्थना करण्यास अवघड वाटू लागले आणि मा आरोनला सांगितले की मी पुढे प्रार्थना करु शकत नाही. मग आरोन प्रार्थना करु लागला आणि त्याला सुद्धा प्रार्थना करणे जमेना. आमच्या लक्षात आले की येथे सैतानाचे मोठे अडखळण आहे आणि सैतानाचे सानिध्य निघून जावे म्हणून आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताला गा-हाणे सांगत परत गुडघ्यावर येऊन प्रार्थना करु लागलो. थकून चेहरा जमीनीकडे करुन मी प्रार्थना संपविली. दंडवत घातलेल्या अवस्थेत आम्ही प्रार्थनेची तिसरी फेरी सुरु केली आणि अंधकार व सैतानाचे सानिध्य निघून जात आहे असे आम्हांला जाणवू लागले. आम्हांला कळले की सभा खूप महत्वाची होणार आहे. हे साधारणत: संध्याकाळी 4:00 वा. घडले.”

त्या रात्री, संध्याकाळच्या उपासनेच्या दोन तास नंतर, अमेरिका व पश्चिमेकडील मंडळ्यांमधून संजीवन का नाही यावर प्रचार केला. उपदेशामध्ये जॉन कागॅन यांची साक्षहि होती. मी जेव्हां आमंत्रण दिले तेव्हां मि. निकेल पुढे आले व ते हरविल्याचे त्यांनी कबूल केले. डॉ.कागॅन यांनी त्यांचे समुपदेशन केले आणि त्यांनी येशूवर विश्वास ठेवला आणि त्यांचे तारण झाले. आता मला कळाले की दोन तास अगोदर आरोन व जॅक नगान यांना प्रार्थनेमध्ये सैतानाशी एवढे का झगडावे लागले!

नवीन वर्षाच्या दिवशी मी उपदेश दिला त्याचे शिर्षक होते, “नरकाचे वर्ष — संजीवनीचे वर्ष!” मी म्हणालो आम्हांस नवीन करारातील ख्रिस्तीपणाचा अनुभव आला — जे की तेच आध्यात्मिक युद्ध आहे.

“कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर [मानवी शत्रूबरोबर] नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिका-यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे” (इफिस 6:12).

केवळ प्रार्थनेतील ख-या युद्धानेच हे युद्ध जिंकले जाते.

मंगळवारी जॉन सॅम्युएल व डॉ. कागॅन हे भारतात जाणार आहेत जेथे ते तीन वेगवेगळ्या सुवार्तिक सभा घेणार आहेत. मी मंडळीतील सर्वांना बुधवारी संध्याकाळी प्रार्थना सभेस येण्याची विनंती करीत आहे — त्यावेळी कोणतीहि सुवार्ता नाही. जॉन कागॅन यांच्या सभेत, लोकांचा पालट व्हावा म्हणून एक तास आणि आणखी एक तास आपल्या मंडळीत संजीवन यावे म्हणून प्रार्थना करणार आहोत. मी सर्वांना सांगतो की आपण ठिक रात्री 7:00 वा. ह्या महत्वाच्या सभेसाठी प्रार्थना करण्यास जमावे.

मी आज रात्री सुवार्तेची घोषणा केली नाही. परंतू ती मी प्रत्येक सभेमध्ये करीत असतो. येशू वधस्तंभावर तुमच्या पापासाठी मेला. तुम्हांस तुमच्या पापापासून शुद्ध करण्यासाठी त्याने रक्त सांडले. तो देवाच्या उजवीकडे आपल्यासाठी प्रार्थना करीत जिवंत आहे. येशू ख्रिस्तानर विश्वास ठेवा. तो तुम्हांस तुमच्या पापापासून आणि देवाच्या न्यायापासून वाचविल. तुम्ही येशूवर लवकर विश्वास ठेवावा म्हणून मी प्रार्थना करतो.

डॉ. कागॅन आणि जॉन कागॅन, पुढे या आणि व्यासपीठा समोरील दोन खुर्च्यांवर बसा. ते तीन आठवड्यासाठी भारताला जाण्यास मंगळवारी निघत आहेत. जॉन हा वेगवेगळ्या शहरामध्ये तीन सुवार्तिक सभामधून प्रचार करणार आहे. मंडळीतील सगळ्यानी, कृपया पुढे यावे व त्यांच्यासाठी प्रार्थना करावी.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी शास्त्रवाचन डॉ. सी. एल.कागॅन यांनी केले: इफिस 6:10-12.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकॅड ग्रिफिथ यांनी गायले: “ऑनवर्ड, ख्रिश्चन सोल्जर्स” (सबीन बॅरिंग-गुल्ड, द्वारा, 1834-1924).
“Onward, Christian Soldiers” (by Sabine Baring-Gould, 1834-1924).