Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
“नवीन” नवीन बाप्टिस्ट टॅबरनिकल !

THE “NEW” NEW BAPTIST TABERNACLE!
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, दि. 2, जुलै 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Morning, July 2, 2017

“अहाहा! तूं आकाश विदारुन उतरतोस, तुझ्या दर्शनानें पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते!” (यशया 64:1).


जेव्हां परमेश्वर खाली उतरतो “[त्याच्या] समक्षतेने पर्वत कंपायमान होतात.” त्याच्या समक्षतेने अविश्वासाचा पर्वत खाली गळून पडतो. त्याच्या समक्षतेने संशयाचा पर्वत खाली गळून पडतो. त्याच्या समक्षतेने भितीचा पर्वत खाली गळून पडतो.त्याच्या समक्षतेने गर्वाचा पर्वत खाली गळून पडतो. त्याच्या समक्षतेने निराशेचा पर्वत खाली गळून पडतो. त्याच्या समक्षतेने स्वार्थीपणाचा पर्वत खाली गळून पडतो. त्याच्या समक्षतेने सैतानी कृत्याचा पर्वत खाली गळून पडतो. जेव्हां देव संजीवनाने खाली येतो जेव्हां सर्व पर्वत जे ख्रिस्ताच्या विरोधात उभे आहेत ते गळून पडतात! “परमेश्वराच्या समक्षतेने [जसा ज्वालामुखीतून लावारस बाहेर येतो तसे] पर्वत खाली गळून पडतील!”

खरी संजीवीत प्रार्थना म्हणजे देवाचा ताबा घेणे आणि त्यास जाऊ न देणे — जसा याकोब प्रार्थेनेत संपूर्ण रात्र ख्रिस्ताशी झगडला तसे आणि तो म्हणाला, “तूं मला आशिर्वाद दिल्यावांचून मी तुला जाऊं द्यायचा नाही” (उत्पत्ती 32:26). डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले की संजीवीत प्रार्थना म्हणजे “त्याला कैफियत सांगून, त्याला कारणें देऊन, त्याच्याशी विनवणी करुन, देवाला धरुन ठेवणे, आणि म्हणणे की केवळ ख्रिस्ती त्या पदावर आल्यावर तो प्रार्थना करण्यास सुरुवात करतो” संजीवीत प्रार्थना! (लॉयड-जोन्स, रिवायवल, पृष्ठ 305).

परंतू संजीवीत प्रार्थना यशया सारख्या माणसांकडून आल्या पाहिजेत, त्या संदेष्याशी बोलणारी माणसें, “हा मी आहे, मला पाठीव” (यशया 6:8) – देव आणि त्याचा ख्रिस्त यांच्या सेवेशी आपले जीवन समर्पित करु इच्छिणारी माणसें! डॉ. ए. डब्लू. टोझर म्हणाले,

“ख्रिस्तीपणा जिवंत राहायचा असेल तर तिला माणसांची आवशक्यता आहे; तेहि योग्य माणसांची. जे बोलण्याचे धाडस करीत नाहीत अशा दुर्बल लोकांना तिने नाकारणे आवश्यक आहे...तिने काम करणारे संदेष्ट्ये व हतात्मे झाले आहेत अशांना शोधले पाहिजे. ती देवाची माणसें व धैर्यशाली माणसें असतील...त्यांच्या प्रार्थना आणि कामाच्या द्वारा लांबलेले संजीवन [देव पाठवील]” (डॉ. ए. डब्लू. टोझर, वुई नीज मेन ऑफ गॉड अगेन) .

या घडीला आपल्या मंडळ्यांनी असे करण्याची गरज आहे — “देवाची माणसें, आणि धैर्यवान माणसें.” ज्यांनी ह्या जगाची निरुपयोगीता पाहिली आहे, माणसें जी सुरक्षेपेक्षा त्याग करु इच्छितात अशी माणसें आपणांस पाहिजेत. पुरुष व स्त्रीयां जी भययमुक्त आहेत, पुरुष व स्त्रीयां जी संदेष्ट्यांबरोबर बोलतील की, “हा मी आहे, मला पाठीव” (यशया 6:8), तरुण पुरुष व स्त्रीयां जी त्यांच्या अंत:करणाच्या खोलीतून प्रार्थना करतील,

“अहाहा! तूं आकाश विदारुन उतरतोस, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते! अग्नि जसा काड्याकुड्या जाळितो व पाणी उकळवितो तसा तूं आपल्या शत्रूस आपले नाम प्रगट करण्यासाठी उतरला असतास” (यशया 64:1-2).

तरुण लोकहो, उठा आणि आवेश व सामर्थ्याने प्रार्थना करण्यांस आपले ओठ उघडा. तरुण लोकहो, उठा आणि तुमची शांति, तुमची समृद्धी, तुमची जीवनें ख्रिस्त देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्यांसाठी अर्पण करा! तरुण लोकहो, उठा आणि प्रार्थनेत तुमच्या सर्व सामर्थ्यानिशी सैतान व त्याचे दुष्ट दूत याच्याशी लढा, देवाचे वैभव संजीवनाचा वर्षाव सामर्थ्याने आपल्या मंडळीत खाली उतरावा म्हणून प्रार्थना! “पुढे, ख्रिस्ती सैनिक.” हे गीताच्या यादीमध्ये क्रं. एकवर आहे. ते म्हणा! उभे राहा व म्हणा!

पुढे, ख्रिस्ती सैनिक, युद्धासाठी पुढे जात आहेत,
येशूच्या वधस्तंभावर जाण्यापूर्वी:
ख्रिस्त, राजकीय धनी, शत्रूच्या पुढे चालवितो;
युद्धात पुढे व्हा, त्याचे निशाण पाहा.
पुढे, ख्रिस्ती सैनिक, युद्धासाठी पुढे जात आहेत,
येशूच्या वधस्तंभावर जाण्यापूर्वी.
   (“ऑनवर्ड, ख्रिश्चन सोल्जर” द्वारा सबीन बॅरिंग-गुल्ड, 1834-1924).

तुम्ही खाली बसू शकता.

तरुणानों, मी सुद्धा तरुण होतो, पण आता मी वयस्क आहे. तसेच आमचे पुढारी. खूप काळ आम्ही ह्या मंडळीचे पुढारीपण केले, दुभंगलेल्या मंडळीमुळे कंटाळवाणी वर्षे. जसे चांगले आहे तसे आम्ही ही मंडळी चांगली बनविण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही आमचा वेळ, आमचे पैसे, आणि आमचे तारुण्य व्यतित केले. आणि ते चांगले आहे. आम्ही किंमत मोजली आहे. आम्ही वैश्विक सेवाकार्यासाठी किंमत मोजली ही मंडळी इंटरनेटवर आहे. आमच्या भुवयावर तरुणपणाचा ताजेपणा नाही. ही मंडळी पुढच्या स्तरावर नेण्यास आमच्याकडे सामर्थ्य व धमक नाही. ही मंडळी पुढच्या स्तरावर नेण्यास आमच्याकडे जोम, चेतना वा संकल्प नाही. ही मंडळी वाचविण्यास आम्ही आमचे तारुण्य घालविले, परंतू आता “नवीन” नवीन बाप्टिस्ट टॅबरनिकल करण्यास आमच्याकडे सामर्थ्य नाही. तुम्ही तरुणांनी करायला पाहिजे, किंवा करायला नको का. करा! करा! करा!

मी आवेशी पाळक होतो. झंजावताप्रमाणे रविवारी मी तीन वेळेस उपदेश सांगत असे. मी 1,000 लोकसंख्या असलेल्या मंडळीचे लक्ष वेधून घेत असे, त्यातील एक तृतियांश लोक हे पहिल्यांदा आलेले असे. परंतू मी आता अठ्ठ्या-अत्तर वर्षाचा कर्करोगातून वाचलेला असा आहे. त्यासाठी मी आता खूप वयस्क आहे. पुष्कळ चिंतन व प्रार्थना केल्यानंतर, मला कळून चुकले की आम्ही फार काळ वाट पाहू शकत नाही. मी म्हणतो आता मला आमच्या तरुणांवर नेतृत्वाची जबाबदारी सोपविणे सुरु केले पाहिजे – तसेच थांबून तुम्हांस मदत व मार्गदर्शन करण्यास आपल्याकडे अजून वेळ आहे. पुढच्या वसंत ॠतूत मला माझ्या सेवेस साठ वर्षे पूर्ण होत आहेत. साठ वर्षाच्या सेवेनंतर कांही पाळक अजून सेवेत आहेत. मला स्वत:ला असे वाटते की मी पुढारी बनून राहण्यापेक्षा, आता पायउतार होऊन तुम्हांला मार्गदर्शन करावे. त्यामुळे, मी मंडळीच्या पुढे प्रस्ताव करतो की जॉन सॅम्युएल कागन यांना पुढील सेवेसाठी नेमावे, आणि यावेळेपासून तो आपल्या मंडळीचा पाळक असेल! यावेळेपासून पायउतार होतो व सेवानिवृत्त-पाळक म्हणून, मी त्याचा मार्गदर्शक होतो. माझा पुढचा प्रस्ताव असा आहे की यावेळेपासून नोहा साँग ह्यांनाहि सेवा करण्याचा परवाना देत आहोत, आणि आरोन यान्सी, जॅक नगान, अबेल पुढ्रोम आणि क्यू डाँग यांना मंडळीचे वडिल म्हणून सेवा देण्यात येत आहे. आणि आरोन यांकी यास ह्या “वडिल मंडळाचे अध्यक्षपद” कायमस्वरुपी देण्यात येत आहे. आपण एक नवीन यंत्रणा राबविणार आहोत, यातील प्रत्येकांस आळीपाळीने आपल्या मंडळीत “क्रियाशील वडिल” करणार जेणेकरुन ते चांगला माणूस बनतील. आता येथे थांबविण्याची आणि आता ही मशाल मंडळीच्या तरुणांकडे सोपविण्याची वेळ आहे. त्यांनी असे नेतृत्व करावे की आपणांस “नवीन” नवीन बाप्टिस्ट टॅबरनिकल करावे. ऑनवर्ड, ख्रिश्चन सोल्जर! उभे राहूया व याचे दुसरे कडवे आणि ध्रुवपद गाऊया.

कर्णा वाजण्याच्या चिन्हांसमयी सैतानाचा धनी निघून जातो;
मग, ख्रिस्ती सैनिक, विजयावर आरुढ होतो!
स्तवनाच्या आवाजाने नरकाचा पाया हलू लागतो;
बंधूनो, मोठा कंठरव करा, मोठ्या आवाजात गीत गा!
पुढे, ख्रिस्ती सैनिक, युद्धासाठी पुढे जात आहेत,
येशूच्या वधस्तंभावर जाण्यापूर्वी.

माझ्या साठ वर्षाच्या अनुभवानंतर मला कळते की केवळ ही तरुण मुले हे कार्य पुढे नेऊ शकणार नाहीत. आम्हांला देवाच्या आत्म्याचा ताजा आभिषेक होणे आवश्यक आहे नाहीतर ते तुम्ही करु शकणार नाही.

डॉ. तिमथी लीन हे चायनीज बाप्टिस्ट चर्चमध्ये 24 वर्षे माझे पाळक होते. डॉ. लीन हे एक महान प्रार्थनाशील व्यक्ति होते. डॉ. लीन म्हणाले, “प्रार्थनेचा उद्देश हा देवाची समक्षता मिळविणे हा आहे.” ते म्हणाले, “शेवटच्या काळातील मंडळीला वृद्धी करायची असेल तर तिला देवाची समक्षता हवी आहे. देवाच्या समक्षतेशिवाय तुमचे सर्व प्रयत्न हे निष्फळ आणि अयशश्वी असे आहेत.” देवाच्या समक्षतेच्या सामर्थ्याशिवाय आपण वृद्धी करु शकत नाही हे सैतानाला अगदी ठाऊक आहे. डॉ. लीन म्हणाले की ख्रिस्ताच्या दुस-या आगमनाच्या आपण जवळ आलो आहोत, “सैतानाचा सर्वात मोठा दबाव हा प्रार्थनेच्या विरुद्ध असेल” (ही सर्व विधाने डॉ. लीन यांचे पुस्तक, द सिक्रेट ऑफ चर्च ग्रोथ यातून घेतली आहेत). प्रेषित पौल म्हणतो, “आपले झगडणे हे रक्तमांसाबरोबर नव्हे,” …तर सैतान व त्यांच्या दूतांबरोबर आहे (इफिस 6:12). आम्ही अंधकाराच्या शक्तीबरोबर कसे काय लढू शकतोॽ पौल त्याचे उत्तर देतो. “सर्व प्रकारची प्रार्थना व विनवणी करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा” (इफिस 6:18). जेव्हां कोणीतरी प्रार्थना करीत असते, तेव्हां तुमच्या मनास पुढारी ज्या विनंत्या करीत आहे त्या ऐकण्यास भाग पाडते. प्रत्येक विनंतीच्या शेवटी, “आमेन” म्हणता. आणि त्या पुढा-याची प्रार्थना तुमची प्रार्थना होते! त्यामुळे ती प्रार्थना सैतानाच्या विरुद्ध एक जबरजस्त शक्ति म्हणून उभी ठाकते! उभे राहूया व दुसरे कडवे आणि ध्रुवपद पुन्हां गाऊया!

कर्णा वाजण्याच्या चिन्हांसमयी सैतानाचा धनी निघून जातो;
मग, ख्रिस्ती सैनिक, विजयावर आरुढ होतो!
स्तवनाच्या आवाजाने नरकाचा पाया हलू लागतो;
बंधूनो, मोठा कंठरव करा, मोठ्या आवाजात गीत गा!
पुढे, ख्रिस्ती सैनिक, युद्धासाठी पुढे जात आहेत,
येशूच्या वधस्तंभावर जाण्यापूर्वी.

आणि आमची मुख्य प्रार्थना देवाने आमच्या कामामध्ये यावे – देवाची समक्षता मोठ्या संजीवनासह खाली उतरावी ही असायला हवी!

“अहाहा! तूं आकाश विदारुन उतरतोस, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते!” (यशया 64:1).

जेव्हां देव खाली आमच्यामध्ये उतरतो “[त्याच्या] समक्षतेने पर्वत कंपायमान होतात.” त्याच्या समक्षतेने अविश्वासाचा पर्वत पर्वत खाली गळून पडतो! त्याच्या समतेक्षने संशयाचा पर्वत खाली गळून पडतो! त्याच्या समक्षतेने मत्सराचा पर्वत खाली गळून पडतो! आपणांस एकमेकांपासून विभक्त करणारा पर्वत खाली गळून पडतो! त्याच्या समतेक्षने एकमेकांसाठी अतीव प्रेम वाहू लागेल. आपला देव व त्याचा ख्रिस्त याच्या विरोधात उभे असणारा पर्वत जसा ज्वालामुखीतून लावारस बाहेर येतो तसा खाली गळून पडेल, आपणांस अग्नीसारखा वाहवील, संजीवनामध्ये वाहून नेईल! मी तुम्हांला उत्तेजीत करितो की मोठ्या संजीवनाने देवाची समक्षता तुम्हांमध्ये उतरुन यावी म्हणून तुम्ही रोज प्रार्थना करा! संजीवनासाठी प्रार्थना म्हणजे याकोबासारखे देवाला धरुन ठेवणे आणि त्याच्या सारखी प्रार्थना करणे होय, “तूं मला आशिर्वाद दिल्यावांचून मी तुला जाऊं द्यायचा नाही.” जसे डॉ. लॉईड-जोन्स म्हणाले, “त्याला कैफियत सांगून, त्याला कारणें देऊन, त्याच्याशी विनवणी करुन, देवाला धरुन ठेवणे...हे तेव्हां शक्य आहे जेव्हां ख्रिस्तीलोक [अशी प्रार्थना करतात, म्हणजेच तो संजीवीत प्रार्थना करतो],”रिवायवल, पृष्ठ 305.

तुमच्यातील कांहीजणांना आम्ही संजीवनासाठी पुन्हां प्रार्थना करु नये असे वाटते! तुम्ही असा विचार कराल की गेल्या वर्षीचा “संजीवनाचा स्पर्श” आमच्यासाठी फरसा लाभदायक नव्हता! पण तुम्ही चुकीचे आहांत! गेल्या वर्षी फक्त संजीवनाचा “स्पर्श” होता, परंतू परिणाम काय झाला ते पहा — जॉन कागॅन यांनी विरोध थांबविला आणि सुवार्ता सांगण्यास समर्पित झाले! आपणांकडे आता एक नवीन पाळक आहे — आणि तो त्या संजीवनाच्या “स्पर्शा” तून आलेला आहे! आपणांस आरोन यान्सी, नोहा साँग आणि जॅक नगान हे सर्वजण गेल्या वर्षीच्या संजीवनाच्या “स्पर्शा” तून लाभले आहेत! पुढच्या येण्यात मागीलपेक्षा तिप्पट संख्येने लोकांचा बाप्तिस्मा होईल! नवीन पालट झालेले लोक कुठून आले? ते गेल्या वर्षीच्या लहानग्या संजीवनाच्या “स्पर्शा” तून आलेले आहेत, अशाप्रकारे जेथून ते आले आहेत! दुसरे कडवेपुन्हां गाऊया! उभारु व गाऊया!

कर्णा वाजण्याच्या चिन्हांसमयी सैतानाचा धनी निघून जातो;
मग, ख्रिस्ती सैनिक, विजयावर आरुढ होतो!
स्तवनाच्या आवाजाने नरकाचा पाया हलू लागतो;
बंधूनो, मोठा कंठरव करा, मोठ्या आवाजात गीत गा!
पुढे, ख्रिस्ती सैनिक, युद्धासाठी पुढे जात आहेत,
येशूच्या वधस्तंभावर जाण्यापूर्वी.

तुम्ही खाली बसू शकता.

गेल्यावर्षी जेव्हां संजीवन सभा संपविली तेव्हां मी सांगितले होते की आपणांस फक्त संजीवन “स्पर्श” झाला, परंतू ह्या वर्षी मोठ्या प्रमाणात देवाच्या समक्षेतेचा अनुभव येईल. माझ्या साठ वर्षाच्या अनुभवानंतर मी म्हणतो की हे घडू शकते. ओहोळातील स्नानापूर्वी तुम्हांस संजीवनाचा “स्पर्श” झाला आहे! खरे तर असेच चीनच्या मंडळीत घडले. ते अशआच प्रकारे येते. प्रथम – स्पर्श! दुसरे - ओहोळातील स्नान! माझ्या जीवनात मी तीन मोठे संजीवन पाहिलेत! मला ठाऊक आहे की येथे आपल्या मंडळीत पुन्हां देव हे करु शकतो! आणि मला ठाऊक आहे की केवळ तरुण माणसांना नेतृत्व सोपवून मंडळीस सामर्थ्य प्राप्त होणार नाही, किंवा देवाचे अद्भूत सामर्थ्य आपल्यामध्ये उतरुन येण्यासाठी आपण गुढघ्यावर येणार नाही तोवर “नवीन” नवीन बाप्टिस्ट टॅबरनिकल पाहणार नाही!

“अहाहा! तूं आकाश विदारुन उतरतोस, तुझ्या दर्शनाने पर्वत कंपायमान झाले असते, तर बरे होते!” (यशया 64:1).

कृपया उभे राहा आणि गीत क्रमांक 3 गाऊया, “जुन्या काळातील सामर्थ्य” पौल राडर यांच्याद्वारा, 1879-1938.

तुझ्या आशिर्वादासाठी जमलो, आम्ही आपल्या देवाची वाट पाहातो;
जो आम्हांवर प्रेम करतो त्यावर विश्वास ठेवतो, ज्याने रक्ताने आम्हांस विकत घेतले.
आत्म्या, आता आम्हांस वितळव आणि तुझ्या प्रेमाने आमची सर्व अंतकरणे हलीव,
जुन्या काळातील वेळेच्या वर श्वास घ्या.

आम्ही तुझ्या सामर्थ्यात गौरव करु, तुझी अद्भूत कृपा आम्ही गातो;
आपल्यात, जसे तूं वचन दिलेस, या, या, तूं तुझी जागा घे.
आत्म्या, आता आम्हांस वितळव आणि तुझ्या प्रेमाने आमची सर्व अंतकरणे हलीव,
जुन्या काळातील वेळेच्या वर श्वास घ्या.

तुझ्यापुढे, आम्हांस खाली आण, आणि विश्वासाने आमचा आत्मा उत्तेजन देतो,
तोवर विश्वासात, पवित्र आत्मा किंवा अग्नी मध्ये आम्ही शांत.
आत्म्या, आता आम्हांस वितळव आणि तुझ्या प्रेमाने आमची सर्व अंतकरणे हलीव,
जुन्या काळातील वेळेच्या वर श्वास घ्या.
   (“जुन्या करारातील सामर्थ” पौल राडर यांच्याद्वारा, 1879-1938).

माझ्या प्रिय मित्रांनो, तुमच्या पापाबद्दल खंडणी भरण्यास येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. तुमची पापे धुण्यासाछी येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपले रक्त सांडले. येशू ख्रिस्त मरणातून पुन्हां उठला. तो स्वर्गात, तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहे. केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा. केवळ त्याच्यावर विश्वास ठेवा. तो तुमचे तारण करील. तो तुमचे तारण करील. तो तुमचे आता तारण करील!

एक पापी स्त्री शिमोन परुशाच्या घरात येशूकडे आली. पवित्रशास्त्र म्हणते,

“तेव्हां पाहा, त्या गावांत कोणी एक पापी स्त्री होती; तो परुशाच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले” (लुक 7:37-38).

त्या गावांत ती पापी स्त्री अशी ओळख होती. ती पापी होती हे लोकांना माहित होते. तीची समाजात वाईट प्रतिमा होती. येशूला दिसू नये म्हणून त्याच्या पाठीमागे तो जेवत असतांना उभी होती आणि तीने त्याच्या पायावर तेलाचा अभिषेक केला, आणि त्याच्या पायाचे मुके घेतले. ती येशूकडे आली.

“मग त्याने तिला म्हठले, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. त्व्हां त्याच्याबरोबर भोजनास बसलेले आपसांत म्हणू लागले, पापाची क्षमा देखील करणारा हा कोण? मग त्याने त्या स्त्रीला म्हटले, तुझ्या विश्वासाने तुला तारिलें आहे, शांतीने जा” (लुक 7:48-50).

ती खूप मोठी पापी होती. तरीहि ती येशूकडे आली. ती येशूकडे आली व तिने त्याच्या पायाचे मुके घेतले. आणि त्याने तिला म्हटले, “तुझ्या पापाची क्षमा झाली आहे.” तिने जे केले ते सर्व येशूला ठाऊक होते. परंतू तेवढे पुरेसे होते! तिच्या पापाची क्षमा झाली व तिचे तारण झाले!

तारण होण्यासाठी तुम्हांला करावे लागणार ते म्हणजे तीने जे केले ते करणे. ती केवळ येशूकडे येऊन तारण पावली. आणि येशू तुम्हांस म्हणतो,

“तुम्हीं सर्व माझ्याकडे या...म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन” (मत्तय 11:28).

जर तुम्ही आता आज सकाळी, येशूकडे याल, तर तो तुमच्या पापाची क्षमा करील व तो तुमचा जीव वाचविल, जसे त्याने पवित्रशास्त्राच्या काळात लोकांना वाचविले तसे. जर तुम्ही त्याच्याकडे याल तर तो तुमचे तारण करील. त्याने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताने तो तुमची पापे धुऊन स्वच्छ करील. तो तुम्हांस त्याच्या नीतिमत्वाची वस्त्रे घालील. तो तुमचे तारण करील. तुम्हांला एवढेच करायचे आहे की तुम्ही त्याच्याकडे यायचे आहे. तो आताहि जिवंत आहे, स्वर्गात, देवाच्या उजवीकडे आहे. काय तुम्ही त्याच्याकडे याल? एक जुने गीत म्हणते,

माझे बंधन, दु:ख आणि अंधकारी रात्र यामधून,
   येशू, मी येतो, येशू, मी येतो;
तुझे स्वातंत्र्य, आनंद व प्रकाश यामध्ये,
   येशू, मी तुझ्याकडे येतो–
माझ्यातून तुझ्या प्रेमात राहण्यासाठी,
   निराशेतून मोठ्या आनंदात,
कबूतराच्या पंखावर आरुढ होऊन वर जाण्यास तयार,
   येशू, मी तुझ्याकडे येतो.
(“येशू, मी येतो” विलियम टी. स्लीपर, 1819-1904).


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी शास्त्रवाचन मि. नोहा साँग यांनी केले: यशया 64:1-4.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि. नोहा साँग यांनी गायले:
“रिवायव्ह दाय वर्क, ओ लॉर्ड” (अल्बर्ट मिडलेन, द्वारा, 1825-1909).
“Revive Thy Work, O Lord” (by Albert Midlane, 1825-1909).