Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
नोहाच्या तारु द्वारे शुभवर्तमानाचे चित्रण केले

THE GOSPEL PICTURED BY THE ARK OF NOAH
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, दि. 18, जून 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Evening, June 18, 2017

“तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत, व त्याला तुच्छ लेखीत; आणि त्याला आम्ही मानिले नाही” (यशया 53:3).


तुमचा पालट झाला नाही तर तुम्ही असे करणार. ख्रिस्तापासून तुम्ही आपले तोंड लपविणार. ख्रिस्ताला तुम्ही तुच्छ लेखणार. त्याला तुम्ही मानणार नाही. अशाप्रकारे तुम्ही ख्रिस्ताविषयी विचार करणार. असे तुम्ही म्हणणार नाही का. येशूचा अशाप्रकारे विचार करीत नाही असे तुम्ही म्हणाल. तुम्ही येशूवर प्रीति करता आहां असे तुम्हांला वाटते, तर तुम्ही स्वत:ला फसविता आहांत. यिर्मया संदेष्टा म्हणाला, “ह्रदय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने त्रस्त आहे” (यिर्मया 17:9). तुम्ही येशूवर प्रीति करता असे तुम्हांस सांगितले जाते तेव्हां तुमचे ह्रदय बरोबर आहे असे तुम्हांस वाटते. तुमचे ह्रदय प्रामाणिक आहे असे तुम्ही समजता, परंतू ते खोटे असते. “सर्व गोष्टींमध्ये” ते कपटी आहे. तुमच्या ह्रदयापेक्षा इतर कोणतीहि गोष्ट कपटी नाही. ते दुपट्टीपणा, मायाजाळ व खोटेपणाने भरले आहे. तुमचे ह्रदय “सर्व गोष्टींमध्ये” खोटे आहे. तुमच्या ह्रदयापेक्षा इतर कोणतीहि गोष्ट खोटारडी नाही.

इतरांपेक्षा तुमचे ह्रदय अधिक खोटे नाही असे तुम्ही स्वत:चे सांत्वना करतां. आणि तुमचे बरोबर आहे. परंतू मुळातच सर्वांचे ह्रदय भ्रष्ट झालेले आहे हे तुम्ही ध्यानातच घेतलेले नसते. मी ह्या पाऊण शतकासाठी वेगळ्या कारणांसाठी पाहतो. मी तुमचे लक्ष परत मुळच्या पापाकडे वेधतो, दुस-या कोणत्या कारणांसाठी नव्हे तर जसे आदामाने एदेन बागेत देहधारणेपूर्वीच्या ख्रिस्तापासून आपले मुख लपविले तसे प्रत्येक मनुष्य “आपले मुख त्याच्यापासून लपवितो” त्याचे मला स्पष्टीकरण ठाऊक आहे.

“आम्ही त्याच्यापासून तोंडे फिरवली, त्याला तुच्छ लेखीले; आणि त्याला आम्ही मानिले नाही” (यशया 53:3).

येशूला तुम्ही किमंत दिली नाही. येशू महत्वाचा आहे असा विचार केला नाही.

हे वचन खोटे आहे अशा भ्रमात तुम्ही जगतां – की तुम्ही खरोखर येशूवर प्रेम करतां, की तुम्ही त्याला मोठा मान देतां आहांत. परंतू तुमचे ह्रदय काय आहे हे समजण्याऐवजी, मुळ व वैयक्तिक पापाने ते विषयुक्त आणि वेडेवाकडे झालेले आहे, तुम्हांस सांगतो – तुमच्या ह्रदयाच्या मूल्यमापनांवर तुम्ही शंका घ्यायला हवी.

तुमच्याकडे प्रेमळ ख्रिस्ताची आंतरिक विचारप्रणाली आहे? तुम्ही हे सांगू शकता? ऐका आणि मग तुम्ही हे प्रामाणिकपणे (प्रामाणिक होऊन) सांगू शकता का हा स्वत:ला प्रश्न विचारा — तुम्ही सांगू शकता, “शुभवर्तमान, पूर्वी जे कंटाळवाणे व मृत वाटे, जेव्हां येशू विषयी ऐकतो तेव्हां थरारक वाटते ना”? ते तुम्ही प्रामाणिकपणे सांगू शकता? जर नाही, तर हे सिद्ध होते की एमी झबालगा येशूला जसा मान देतो तसा तुम्ही देत नाही!

किंवा तुम्ही असे म्हणू शकता: “मी त्याचा शत्रू होतो, तरी येशू माझ्यासाठी वधस्तंभांवर गेला, आणि मी त्याला शरण गेलो नाही. ह्या विचाराने मी भग्न झालो. माझ्यासाठी ख्रिस्ताने आपला प्राण दिला, आणि यासाठी नी आपले सर्वस्व त्याला देईन... येशू माझा मुक्तीदाता, माझे विश्रामधाम, आणि माझा तारणारा. ख्रिस्तासाठी मी कधीही फार कांही करु शकत नाही. येशूची सेवा करणे माझा आनंद आहे”? तुम्ही हा शब्द प्रामाणिकपणे म्हणू शकता — जसे जॉन कागन त्यांना म्हणाले? जर तुम्ही कचराल, कारण तुम्हाला ठाऊक आहे की येशूपासून आपले तोंड लपविता की नाही, म्हणजे तुम्ही येशूला उच्च समजत नाही ना?

येशूप्रती तुमचे प्रेम तपासण्यासाठी दुसरा मार्ग म्हणजे पापाची जाणीव होणे. येशूला नाकारण्यास जोवर तुम्ही पापमय होत नाही, तोवर तुम्ही येशू ख्रिस्ताला मान देणार नाही! येशू म्हणाला,

“तो [पवित्र आत्मा] येऊन, पापाविषयी... जगाची खातरी करील, ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत”(योहान 16:8, 9).

येशूला नाकारण्यासाठी तुम्हांला पापाची खातरी होत नाही तर, हे तुम्ही त्याला “मान देत नाही” याचे द्योतक होय. डॉ. डब्लू. जी. टी. सेड आपणांस म्हणाले, “जोवर तो मनुष्यास जाणीव करुन देत नाही तोवर पवित्र आत्मा साधारणपणे मनुष्याचे पुननिर्माण करीत नाही.” पापाची जाणीव प्रभूच्या द्वारे सुटका होण्यास मनुष्याची तयारी करतो.

ख्रिस्त किती मोलवान आहे हे तोवर तुम्हांस समजणार नाही जोवर तुम्ही
   खेळ खेळण्यातून.
     मरणाचे भयातून जात नाही.
       स्वत:ला देऊन टाकणे.
         पापाची जाणीव होणे होय.

कोणीतरी म्हणेल, “ती खूप कठीण तयारी आहे.” परंतू त्या तयारीची गरज आहे!

संपूर्ण पवित्रशामध्ये येशू हा महान विषय आहे. जेव्हां येशू दोन शिष्यांना भेटला, तो त्यांना विस्तृतपणे म्हणाला. लुक 24:25-27 उघडा. स्कोफिल्ड अभ्यास पवित्रशास्त्रात ते 1112 पानावर आहे. वाचत असतानां आपण उभे राहूया.

“मग तो त्यांना म्हणाला, अहो निर्बुद्धि व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो! ख्रिस्ताने ही दु:खे सोसावी आणि आपल्या गौरवांत जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय? मग त्यांने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करुन संपूर्ण शास्त्रातील आपणांविषयीच्या गोष्टीचा अर्थ [स्पष्टीकरण] त्यांना सांगितला” (लुक 24:25-27).

येशूने ह्या शिकविण्यास पुष्कळ तास घालविले. माझ्या किंग जेम्स भाषांतरामध्ये, जुना करार 948 पानांचा असा मोठा आहे. जेव्हां येशूला उत्पत्तीचे अध्याय 6वा, 7वा आणि 8वा मिळाले, तेव्हां नोहाची तारुने त्याला काय सांगितले ते त्यांने स्पष्ट केले असेल. जसा तो नोहाच्या, मोठा महापूर, आणि तारु ह्या इतिहासामध्ये आला असेल तेव्हां त्याने “स्वत:च्या संबंधातील गोष्टी” दाखविल्या असतील (लुक 24:27). उत्पत्तीमधील हा अध्याय खूप महत्वाचा आहे, आणि तो त्याच्यावर भाष्य केल्यावाचून पुढे गेला नसेल.

खरोखर उत्पत्तीचे 6व्या, 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये ख्रिस्ताचे विविध प्रकार, उदाहरणे आणि चित्रणे आढळतात. आणि त्यांने मोशे ह्या, उत्पत्तीच्या मानवी लेखकाच्या लिखाणापासून सुरु केले, आणि “त्याच्या संबंधातील सगळे शास्त्रभाग” (लुक 24:27). स्पष्ट करुन सांगितले, त्याने निसंशयपणे तारु त्याच्या संबंधी बोलते हे सांगितले असेल.

होय, येशू हा संपूर्ण पवित्रशास्त्राचा मुख्य विषय आहे, आणि तारुचा अभ्यास करुन आपण आणखी त्यातून शिकू शकतो. हे पाहा शुभवर्तमानातील पुष्कळ मुद्दे आहेत ज्याला येशूने स्पर्श केला व निसंशयपणे “संपूर्ण शास्त्रातील आपणां विषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यांना सांगितला” (लुक 24:27).

I. प्रथम, तारु अनाकर्षक ख्रिस्ताचे चित्र चित्रित करतो.

जसे मी सांगितले, नोहाचे तारु हे सुंदर नव्हते, चमकदार रंगाचे जहाज असे कांही मुर्ख शिक्षक शब्बाथ शाळेच्या मुलांना शिकवितात. नाही! नाही! हे तारु अवाढव्य काळ्या पेटीसारखे लाकडाचे बनविलेले होते. ते आतून व बाहेरुन, काळ्या डांबराने झाकलेले होते. देव म्हणाला:

“तूं आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारु कर, त्या तारवांत कोठड्या कर आणि त्यास आंतून व बाहेरुन डांबर लाव”(उत्पत्ती 6:14).

हे तारु सपाट तळ असलेल्या एखाद्या निमुळत्या – काळ्या पेटीसारखे होते. ते 500 फूट लांब होते. ते 90 फूट रुंद व 60 फूट उंच होते. ते पाण्यावर चालण्यास नव्हे, तर केवळ तरंगण्यासाठी केले होते. ते आंतून व बाहेरुन, कुरुप, काळे जहाज होते. त्यामध्ये कुठलीहि सुंदरता नव्हती. हे येशूचे चित्रण आहे. ख्रिस्ताविषयी पवित्रशास्त्र सांगते की:

“त्याला रुप नव्हते, त्याला शोभा [वैभव] नव्हती, त्याजकडे पाहिले तर त्याजवर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला...तो पुरुष पाहून तोंडे फिरवीत, व त्याला तुच्छ लेखीत; आणि त्याला आम्ही मानिले नाही”(यशया 53:2-3).

जलप्रलय येण्यापूर्वी जेव्हां, तारु जमीनीवर उभे राहिलेले लोकांनी पाहिले, तेव्हां ब-याच लोकांनी तारुकडे अशाचप्रकारे बघितले ना? त्याला रुप नव्हते व शोभा नव्हती. ते मन बसेल असे नव्हते. आणि ते येशूप्रमाणेच, मनुष्यांनी तुच्छ लेखिलेले व टाकिलेले होते. जसे त्यांनी येशूपासून तोंडे लपविली, तशी त्या तारुपासून ते आपली तोंडे लपवित. त्या तारुला तुच्छ लेखिले व त्याला त्यांनी मानिले नाही. त्यामुळेच त्यांनी त्या तारुमध्ये चढण्यास नकार दिला, जसा त्यानंतर लोकांनी येशूकडे येण्यास नकार दिला.

“हा कुरुप, काळा विचित्र आमचे तारण कसा करील?” असे त्यांनी म्हटले असेल. आणि त्यामुळेच सध्या लोक येशूकडे यावे आणि तारण साधावे यांस नकार देतात. त्यांना असे वाटते की, “ह्या जुन्या, कुरुप काळ्या जहाजात चढण्यासाठी आपणाला आमचे दैनंदिन जीवन, आमची चैनी व आमचा आनंद सोडून द्यावा लागतो की काय?” मत्तय चोवीस, सदतीस व त्याच्यापुढे वचन आपणांस सांगते की:

“नोहाच्या दिवसांत होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हां जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसांत ‘नोहा तारवांत गेला’ त्या दिवसांपर्यंत लोक खातपीत होते, लग्न करुन देत होते, आणि जलप्रलयय येऊन सर्वांस वाहवून नेईपर्यंत त्यांस समजले नाही; तसेच मनुष्याच्या पुत्राचेहि येणे होईल.”(मत्तय 24:37-39).

आपणांस हे दर्शविते की त्यांना जेवणांवळीतील खाणे व पिणे सोडावयाचे नव्हते. त्याकाळी लोक अवास्तव खर्चाचे व खूप दिवस लग्न लावण्याचा प्रघात होता ते थांबू नये असे त्यांना वाटे. जशी त्यांना वाटत होती ती कुठलीहि “मौज” तेथे होणार नव्हती, अशा त्या जुन्या काळ्या जहाजात जाऊन त्यांनी त्यांच्या मेजवाण्या, त्यांच्या “क्लबींग” व नाचणे, व पिणे — व मजा — का सोडाव्यात.

परंतू ते पूर्णत: चुकीचे होते. त्या जलप्रलयाच्या समयी तारु असे एकच ठिकाण होते जेथे “मौज” आणि मस्ती चालू होती. तेव्हां संपूर्ण पृथ्वी पाण्याने भरली होती तेव्हां नोहा व त्याचे कुटुंब एकत्रपणे प्राण्यांची निगा राखणे व त्यांना भरवित सहभागिता करीत होते.

भयंकर जलप्रलयाच्या समयी संपूर्ण जगात तारु ही एकच मंडळी होती. त्यावेळी नोहा व त्याचे सात कुटुंबातील सदस्य ही एकच मंडळी होती, आणि तारुमध्ये त्यांची सुंदर सहभागिता, आणि चांगली आराधना, आणि दैवी आनंद होता.

परंतू सध्याच्या स्थानिक मंडळीमध्ये असे अपरिवर्तीत लोक पाहतो ना? पुष्कळ हरविलेले पालक म्हणतात, “का ह्या तरुणांना त्या मंडळीचा भाग असावा असे खूप वाटते? त्यांना काय आकर्षण आहे? त्या मंडळीमध्ये मद्यपान, नशापान, किंवा वन्य मेजवाणी नाही. त्या मंडळीमध्ये व्यभिचार नाही. परंतू त्यांना संपूर्ण वेळ तेथे राहवेसे वाटते. त्या कुरुप, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतीच्या मंडळीमध्ये जेथे माझ्या मुलांस किंवा मुलीस संपूर्ण वेळ जावेसे वाटते असे काय आहे?”

ठीक आहे, तुम्ही तुमच्या अविश्वासू कुटुंबाला आणि मित्रांना असे सांगू शकता: “आमची मंडळी हे एक तारु आहे. ते आम्हांस जळण्यापासून, ज्या एकाकी जगामध्ये आम्ही राहतो त्यापासून आम्हांस वाचवितो. आता आपण स्थानिक बाप्टीस्ट मंडळी आहोत. जे स्वप्न आम्ही पाहिले होते, त्यापेक्षा जास्त चांगली, मजा येथे मंडळीमध्ये शक्य आहे! एकाकी का असावे? घरी — मंडळीकडे या! या कुरुप, कांहीतरी गैरसोयीच्या जुन्या मंडळीच्या इमारतीमध्ये, आपल्याला थंडी व एकाकी जगापासून आश्रय मिळतो. स्थानिक मंडळी, देवाच्या घरामध्ये आपणांस आनंद, आणि मैत्री, आणि संरक्षण मिळते तेथे तुम्ही येऊ नये का? कृपया ह्या तारुत, ह्या मंडळीमध्ये नियमीत या, जेथे तुम्हांस तीच शांति आणि आनंद मिळेल जो आम्हांस मिळाला.”

होय, तारु कुरुप, काळे जुन्या गोष्टीचे आहे, परंतू ते आनंदाचे, मैत्रीचे आणि प्रेमाचे ठिकाण आहे. घरी या! आमच्या बरोबर ह्या स्थानिक मंडळीच्या तुच्छ, जुनाट तारुमध्ये या. तुम्ही वाचाल आणि आमच्या बरोबर आनंदी जीवनाचा अनुभव घ्याल!

II. दुसरे, तारु ख्रिस्ताच्या रक्ताचे चित्रण करते.

कृपया आपल्या पवित्रशास्त्रातील उत्पत्ती, अध्याय सहा, वचन चौदाकडे वळूया. देव नोहाला म्हणाला:

“तूं आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारु कर, त्या तारवांत कोठड्या कर आणि त्यास आंतून व बाहेरुन डांबर लाव” (उत्पत्ती 6:14).

सनातनी समालोचक एच.सी. लुपोल्ड हे असे भाषांतर करतात की, “आणि त्यास आतून व बाहेरुन डांबर फासले होते”(एक्स्पोजीसन ऑफ जेनेसीस, बेकर, 1976, आवृत्ती 1, पृष्ठ. 269).

डॉ. लुपोल्ड पुढे आपणांस तारुतील खोल्या व डांबर लावण्याविषयी सांगतात.

“कोठडी” (क्विन्नीम) हा शब्द “घरटे” यासाठी सुद्धा वापरला जातो. यामुळे, अशाप्रकारच्या खोल्या विविध प्राण्यांना राहण्यास गरज होती...हे जहाज नव्हते परंतू भली मोठी तरंगती पेटी होती अगदी जहाजाच्या मोजमापाची. हे जहाज होते ते समुद्रावर चालविण्यासाठी किंवा प्रवासासाठी नव्हते. ते पाण्यावर तरंगावे यासाठी फक्त होते. त्यात पाणी शिरु नये म्हणून त्यास आतून व बाहेरुन “डांबर” (गोफेर) लावलेले होते (ibid.,पृष्ठ 270).

डॉ. लुपोल्ड पुढे सांगतात “गोफर” हा शब्द “गोफेर” शब्दापासून आला आहे (ibid.).

“गोफर” हा इब्री शब्द जो “दुस-या बद्दल केलेले प्रायश्चित” असा पवित्रशास्त्रात अनुवादित केला आहे.

“गोफर” पासून “दुस-या बद्दल केलेले प्रायश्चित” असा जुन्या करारात सत्तर वेळा अनुवादित केला आहे.

आपणास या शब्दाचा अर्थ लेवीय 17:11 देते.

“शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जिवाबद्दल प्रायश्चित करण्यासाठी ते मी तुम्हांला दिले आहे; कारण रक्तात जीव असल्याकारणांने रक्तानेच प्रायश्चित होते” (लेवीय 17:11).

दोन्ही वेळेस “गोफर” हा शब्द “प्रायश्चित” असा अनुवादित करण्यात आला ज्याचा अर्थ “पांघरुण घालणे” असा होतो. येशू ख्रिस्ताचे रक्त आमच्या पापावर “पांघरुण घालते”. नवीन करारात हे आपणांस स्पष्ठ सांगितले आहे:

“ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्याच्या पापावर पांघरुण घातले आहे ते धन्य.” (रोम 4:7).

तारु हे जलप्रयाच्या न्यायापासून दूर ठेवण्यासाठी डांबराने होते. जेव्हां तुम्ही ख्रिस्ताकडे येता, तेव्हा तुम्ही त्याच्या रक्ताने झाकलेले आहां, आणि देवाचा न्याय तर तुम्हांस कांही एक इजा करणार नाही. देव नोहास म्हणाला, “आंत... तारुमध्ये या” (उत्पत्ती 7:1). जेव्हां नोहा आत आला, तो डांबर फासलेल्या भिंतीने वेढला होता. डांबर म्हणजे ख्रिस्ताच्या रक्ताचा प्रकार होय. जेव्हां तुम्ही ख्रिस्ताकडे येता, तेव्हां तुम्ही खरोखरीचे ख्रिस्ताच्या रक्ताच्या रक्ताने वेढलां आहात, आणि तुमचे “पाप झाकलेले आहे” (रोम 4:7)!

“त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते” (I योहान 1:7).

याचसाठी येशू वधस्तंभावर मरण पावला – यासाठी की त्याचे रक्त तुमचे सर्व अपराध धुवावे आणि तुमची पापे झाकली जावी.

“ज्यांच्या अपराधाची क्षमा झाली आहे व ज्याच्या पापावर पांधरुण घातले आहे तो धन्य”(रोम 4:7).

III. तिसरे, तारु पुनरुत्थानाचे चित्रण करते.

तारु हे एक पुनरुत्थानाचा प्रकार आहे. ख्रिस्त मृतातून उठला त्या दिवशी अरारत पर्वतावर तारु येऊन थांबले.

मला तुमच्या कांहीतरी लक्षात आणून द्यायचे आहे. उत्पत्ती, अध्याय आठ, वचन आठरा ऐका:

“तेव्हां नोहा आपले पुत्र, बायको व सुना घेऊन बाहेर निघाला” (उत्पत्ती 8:18).

हे ख्रिस्त मृतातून पुनरुत्थित झाल्याचे चित्रण करते:

“शब्बाथानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मग्दालीया मरीया वदुसरी मरीया ह्या कबर पाहावयास आल्या. तेव्हां पाहा, मोटा भूमिकंप झाला; कारण प्रभूचा दूत स्वर्गातून उतरला, त्याने येऊन धोंड एकीकडे लोटली आणि तीवर तो बसला. त्याचे रुप विदेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते. त्याच्या भयाने पहारेकरी थरथर कापले व मृतप्राय झाले. देवदूतांने त्या स्त्रीयांस म्हटले, तुम्हीं भिऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशूचा शोध तुम्हीं करीत आहां, हे मला ठाऊक आहे. तो येथे नाही; कारण त्यांने सांगुतल्याप्रमाणे तो उठला आहे. या, तो निजला होता तो हे स्थळ पाहा”(मत्तय 28:1-6).

जसा नोहा तारुमधून बाहेर आला, तसा येशू कबरेतून पुनरुत्थानाच्या सकाळी बाहेर आला. ते म्हणते, “तेव्हां नोहा आपले पुत्र, बायको व सुना घेऊन बाहेर निघाला.” हे अंतराळात आपण येशूला भेटावयास, उचलले जाण्याचे चित्रण करते(I थेस्सल 4:16-17). नोहा तारुतून बाहेर आला हे, येशू कबरेतून बाहेर आला हे चित्रित करते. त्याचे कुटुंब त्ययाच्यामागून बाहेर आले हे ख्रिस्ती लोक उचलले जाणार हे चित्रित करते.

हे सर्व प्रतिकात्मक व चिन्हांत्मक असे आहे. डॉ. जॉन वार्विक मॉन्टगोमेरी म्हणाले:

नोहाच्या सुटकेची घटना – पाणी व [तारु] यामधून ही केवळ देवाची दया होय – आरंभीची मंडळी ती एक अघटीत असून चिन्हांत्मक दिसते ही संपूर्ण घटना जे तारण नवीन करारात देऊ करणार होते त्याचे ते पूर्वचिन्ह असे होते. तारु स्वत:च एक मंडळीचे चिन्ह आहे (ज्यांनी कृपेचा शोध केला व पुढे पापमय जगात जलप्रलयातून वाचले गेले); मंडळीची रचना सुद्धा ही ह्या ठशाच्या प्रतिमेप्रमाणे कायमस्वरुपाची आहे (उदा. “नाव” लॅटिन पासून “नावीस” “जहाज” असा होतो). आरंभीच्या मंडळीचे [चित्र] – कबरेमध्ये उदाहरणत: − तारु हे पुरणे किंवा शवपेटीचे चिन्ह म्हणून वापरतात, जेथून देव मेलेल्या विश्वासणा-यांना शेवटच्या दिवशी उठवील, आताहि देवाने भयंकर अशा जलप्रलयाच्या पाण्यातून नोहाला वाचविले. (जॉन वार्विक मॉन्टगोमेरी, पीएच.डी.,द क्वेस्ट फॉर नोहाज आर्क, बेथानी, 1972, पृष्ठ 284).

दुस-या शतकाच्या पहिल्या अर्ध भागात. शहिद जस्टीन म्हणाले:

नोहा जलप्रलयातील आपले लोक, म्हणजे त्याची बायको, त्याची तीन मुले आणि त्यांच्या बायका, मिळून आठजण आणि त्या दिवसाचे चिन्ह लागू पडते, अंकाने आठ परंतू सामर्थ्यात प्रथम, ज्यामुळे येशू मृतातून उठला. आता ख्रिस्त, “सर्व निर्मितीतील प्रथम जल्मलेला असा,” तो नव्या अर्थाने दुस-या कुळाचाहि प्रमुख बनला, त्यांचा पाणी, विश्वास आणि लाकूड ज्यामध्ये धस्तंभाचे रहस्य आहे, त्याद्वारे त्यांने नवीन जन्मास घातले आहे, जसा नोहा लाकडाच्या तारुमध्ये वाचला, त्याच्या कुटुंबासमवेत पाण्यावर तरंगत राहिला (जस्टिन शहिद, डायलॉग वुईथ ट्रायफो, cxxxvii, 1-2).

संपूर्ण शुभवर्तमान हे नोहाच्या तारुमध्ये चित्रीत केले आहे, जे आरंभीचे ख्रिस्ती पाळत होते. (1) ते कुरुप तारु होते, डोळ्यास किंवा मनास आकर्षक वाटत नाही. म्हणून, ख्रिस्त मनुष्यांस आकर्षक वाटत नाही तर, सुवार्ता मुर्खपणाची आहे. (2) आतून व बाहेरुन, डांबर लावलेले होते. हे ख्रिस्ताचे रक्त पालट झालेल्यांना झाकते, कारण देवाला दिसू नये याचे चित्रण करते. (3) आरारत पर्वतावर तारु येऊन थांबला, आणिनोहा त्यातून जीवंत बाहेर आला. हे पुनरुत्थानाच्या सकाळी, ख्रिस्त कबरेतून बाहेर आल्याचे, मृतातून उटल्याचे चित्रण आहे.

आणखी एक गोष्ट. तारु पर्वताच्या शिखरावर येऊन थांबले होते. ह ख्रिस्त सियोन पर्वत, देवाची नगरी, वरुन वर तिस-या स्वर्गात उचलला गेल्याचे चित्रण आहे. आता ख्रिस्त वर स्वर्गात, देवाच्या उजव्या हाताला बसला आहे. येशूकडे या व तुम्हांस तारण मिळेल. येशूकडे या व “डांबराप्रमाणे” येशूचे रक्त तुमची सर्व पापे झाकून टाकील. येशूकडे या, आणि तुम्हीं स्वर्गात जाऊ शकाल. जसा नोहा व त्याचे कुटुंब जलप्रलयातून सहीसलामत सुटले, तसे तुम्हींहि नरकातून सुटले जाल. जसा नोहा तारुमध्ये आला, तसे तुम्हीहि येशूकडे येणे गरजेचे आहे!


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी शास्त्रवाचन मि. नोहा साँग यांनी केले: मत्तय 28:1-6.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रिफित यांनी गायले:
“सेव्हड बाय द ब्लड” (एस.जे. हेंडरसन द्वारा, 19 वे शतक).
“Saved by the Blood” (by S. J. Henderson, 19th century).


रुपरेषा

नोहाच्या तारु द्वारे शुभवर्तमानाचे चित्रण केले

THE GOSPEL PICTURED BY THE ARK OF NOAH

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा by Dr. R. L. Hymers, Jr.

“तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत, व त्याला तुच्छ लेखीत; आणि त्याला आम्ही मानिले नाही” (यशया 53:3).

(यिर्मया 17:9; योहान 16:8, 9; लुक 24:24-27)

I.   प्रथम, तारु अनाकर्षक ख्रिस्ताचे चित्र चित्रित करतो, उत्पत्ती 6:14;
यशया 53:2-3; मत्तय 24:37-39.

II.  दुसरे, तारु ख्रिस्ताच्या रक्ताचे चित्रण करते, उत्पत्ती 6:14;
लेवीय 17:11; रोम 4:7; उत्पत्ती 7:1; I योहान 1:7.

III. तिसरे, तारु पुनरुत्थानाचे चित्रण करते, उत्पत्ती 8: 18;
मत्तय 28:1-6; I थेस्सल 4:16-17.