Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
असाहाय्य लोकांसाठी तारण

SALVATION FOR THE HELPLESS
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
शनिवारी सायंकाळी, दि. 3, जून 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Saturday Evening, June 3, 2017


आपण उभा राहूया, आणि आपल्या मार्काच्या शुभवर्मानातील उता-याकरिता पवित्रशास्त्र उघडा. तो मार्क 9:26-27,

“तेव्हां तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले; पण येशूने त्याला हातास धरुन उठविले व तो उभा राहिला” (मार्क 9:26-27).

येशूने ह्या मुलाला सैतानाच्या तावडीतून सोडविले. ही कथा एका विशिष्ट उद्देशाने दिली आहे. येशू सध्या कसा असाहाय्य लोकांना वाचवितो हे दर्शविण्यासाठी ती दिली आहे. चार शुभवर्तमान, मत्तय, मार्क, लुक आणि योहान, यामध्ये अशा अनेक कथा आहेत. कशाप्रकारे असाहाय्य लोक वाचविले जातात हे दर्शविण्यासाठी आहे. ही कथा तारणाच्या दुस-या बाजूविषयी सांगते. हे वाचल्यावर आपण पुष्कळ गोष्टी शिकतो.

मुलाला भूत लागले होते. त्या भूताने त्यास मुका व बहिरा केला. तो ऐकू शकत नव्हता व बोलूहि शकत नव्हता. अशाप्रकारे तारणापूर्वी प्रत्येक जण असे असतात. तारणापूर्वी देव काय सांगतो ते तुम्ही ऐकू शकत नाही. आणि त्याच्याविषयी कांही बोलू शकत नाही.

परंतू ख्रिस्त सैतानास बाहेर काढतो. ख्रिस्त सैतानापेक्षा जास्त प्रबळ आहे. त्यामुळे ख्रिस्त तुम्हांस वाचवू शकतो! त्याने त्या मुलाला वाचविले आणि तो तुम्हांलाहि वाचवू शकतो! ते कितीहि असाहाय्य असे असू देत, ख्रिस्त कोणासहि वाचवू शकतो! ख्रिस्त सैतानापासून सोडवू शकतो! ह्या कथेपासून आपण तीन चांगल्या गोष्टी शिकू शकतो.

I. प्रथम, तुम्ही मेलेल्यांसारखे आहांत.

वचन म्हणते,

“आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले”(मार्क 9:26).

तारण होण्यापूर्वी प्रत्येकाचे हे चित्र आहे.पवित्रशासेत्र आपणास शिकविते संपूर्ण मानवजात आध्यात्मिक मृत अशी आहे. तुम्ही आध्यात्मिक मृत असे आहांत! पवित्रशास्त्र म्हणते,

“एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशाप्रकारे मरण पसरले...” (रोम 5:12).

आपल्या पहिल्या आईवडीलांनी देवाविरुद्ध पाप केले – आणि ते आध्यात्मिक मेलेले आहेत. एका आध्यात्मिक मरणात, देवापासून आदामाला दूर केले गेले. आणि आध्यात्मिक मरण एका माणसापासून दुस-या माणसापर्यंत सर्व मानवजातीमध्ये आले. त्यामुळेच अनेक धर्म आहेत. आध्यात्मिक अंधकार व मरण यामुळे, मानवजातीने अनेक धर्म बनविले. परंतू मानवजातीस खरा धर्म व जिवंत देव सापडलाच नाही.

अथेन्स मधील एका समुहाशी बोलतांना, प्रेषित पौल म्हणाला,

“कारण फिरता फिरता तुमच्या पुज्य वस्तु पाहताना, अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली ज्याचे तुम्ही अज्ञानाने भजन करिता ते मी तुम्हांला जाहीर करतो” (प्रे.कृ. 17:23).

त्यांच्या पुष्कळ मूर्ती व पुष्कळ दैवते होती. परंतू खरा देव मात्र त्यांच्यासाठी अनोळखी होता. ते त्यास, “अनोळखी देव” असे संबोधित होते.

आणि आज रात्री परमेश्वर तुम्हांसाठी अनोळखी आहे. तो तुम्हांसाठी “अनोळखी देव” आहे. तुम्हांसाठी देव खरा वाटत नाही. देवाच्या वस्तूकरिता तुम्ही मेलेले आहांत. तुम्ही आध्यात्मिक मेलेले आहांत. तुम्ही आपल्या कथेतील मुलाप्रमाणे आहांत.

“आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले”(मार्क 9:26).

पवित्रशास्त्र म्हणते,

“तुम्ही, तुमच्या पापात मेलेले आहांत”(कलस्सै 2:13).

पवित्रशास्त्र म्हणते

“तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेला होता” (इफिस.2:1).

उधळ्या पुत्राचा बाप म्हणाला,

“माझा मुलगा मेला होता”(लुक 15:24).

तो उधळ्या पुत्राच्या भावाला म्हणाला,

“तुझा भाऊ मेला होता”(लुक 15:32).

आज रात्री प्रत्येक व्यक्ती त्या समान आहे. आम्ही सर्वजण पापात मेलेले आहोत. आम्हांसाठी देव अनोळखी आहे. देवाला आम्ही ओळखीत नाही. पवित्रशास्त्रातील गोष्टी आपणांस भाकड कथा वाचतात, कारण आम्ही आध्यात्मिक मेलेले आहोत.

“त्यांची बुद्धि अंधकारमय झाली आहे, त्यांच्या अंत:करणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत”(इफिस 4:18).

तारणापूर्वीचे आपणा प्रत्येकाचे हे चित्रण आहे! तुमचे येशूच्या द्वारे तारण व्हायला हवे. आध्यात्मिक मरणापासून केवळ येशूच वाचवू शकतो.

II. दुसरे, तुम्हांस येशूच्या “हाताने धरुन उठविले” आहे.

आपले वचन म्हणते,

“तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले; पण येशूने त्याला हातास धरुन उठविले...” (मार्क 9:26-27).

ते खूप अद्भूत वचन आहे! “पण येशूने त्याला हातास धरुन उठविले”! हे जागे करण्याचे नमुना आहे. हे दैवी कृपेचे चित्र आहे. ही आपल्या तारणाची कथा आहे. हे असहाय्य लोकांसाठी असलेले तारण आहे!

“त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपति म्हणजे आज्ञा मोडणा-या लोकांत आता कार्य करणा-या आत्म्याचा अधिपति ह्यांच्या धोरणप्रमाणे चालत होता; त्या लोकांत आम्हीहि सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरुप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छाप्रमाणे करीत होतो व स्वभावत: इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो; तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालेले असतांहि त्याने आपल्यावरील स्वत:च्या अपरंपार प्रेमामुळे, ख्रिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले, (कृपेनें तुमचे तारण झाले आहे); आणि ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याच बरोबर स्वर्गात बसविले; ह्यासाठी की, ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्या तुम्हांआम्हांवरील ममतेच्या द्वारे येणा-या युगात त्याने आपल्या कृपेची अपार समृद्धि दाखवावी; कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी अढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही” (इफिस.2:2-9).

तारण हे कृपेनेच आहे! तारण ख्रिस्ताकडून आहे! स्वर्गात जाण्याचा तोच मार्ग आहे! आणि तो एकमेव मार्ग आहे!

तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले; पण येशूने त्याला हातास धरुन उठविले...” (मार्क 9:26-27).

येशू येण्यापूर्वी, तुम्ही निर्धास्त आणि झोपलेल्या अवस्थेत असणार. तुमच्या जीवा संबंधाने काय घडणार ह्याविषयी तुम्ही निर्धास्त राहू शकत नाही. मार्क नऊमधील मुलाप्रमाणे तुम्ही आहांत.

“तेव्हां समुदायांतील एकाने उत्तर दिले, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे घेऊन आलो ह्याला मुका आत्मा लागला आहे”(मार्क 9:17).

मी त्या मार्गावर होतो. लोक मला पुढच्या दाराने बाप्टिस्ट मंडळीत घेऊन गेले. येशूकडे ह्या माणसाने आपल्या मुलाला जसे आणले होते, तसे मला मंडळीत आणले. मला देवाविषयी, ख्रिस्ताविषयी, पवित्रशास्त्राविषयी कांहीहि माहिती नव्हती. मी कधीहि पवित्रशास्त्र वाचले नव्हते. मी मत्तयाचे शुभवर्तमान शोधू शकलो नाही. उत्पत्तीच्या पुस्तकापासून बोट ठेऊन पवित्रशास्त्र वाचायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात मला जवळ जवळ संपला होता तो मत्तयातील उपदेश मिळाला! परंतू त्यांनी मला मंडळीत आणले. देव ख्रिस्ती लोकांचा उपयोग तुम्हांस साक्ष देण्यास, लोकांना ख्रिस्ताकडे आणण्यास, जसे ह्या माणसाने केले, त्याने आपल्या मुलाला येशूकडे आणले.

त्यानंतर तुम्ही सजगतेचा अनुभव घ्याल. हे लवकर घडेल, अथवा विलंब सुद्धा होईल. लोक वेगळे आहेत. प्रबोधन ही भयंकर गोष्ट आहे. पौलाला खाली जमिनीवर टाकले. पेंटाकॉस्टच्या दिवशी लोकांच्या अंत:करणात चुटपुट लागली. वदस्तंभावरील चोराला आपला दोष दिसला. ही भयंकर गोष्ट आहे. जॉन कागन म्हणाले, “मला मेल्यासारखे वाटते. मी हसू शकत नाही. मला शांति लाभत नाही. छळणा-या भावनांना मी थांबवू शकत नाही. आता मी हे सहन करु शकत नाही.” पवित्र आत्म्याने त्यांना पापाची जाणीव करुन दिली. एमी झबालगा म्हणाले, “पवित्र आत्म्याने मला पापाची जाणीव करुन दिली. मी अत्यंत वाईट व निर्लज्ज असा होतो. मला ठाऊक आहे माझी सर्व पापे देवाने पाहिलीत. पवित्र ख्रिस्ती लोकांमध्ये मला एका कुष्टरोग्यासारखे वाटे.” जॅक नगन म्हणाले, “मी केलेले सर्वात घाणरडे पाप मला स्पष्ट आठवते – मी भयंकर मोठा पापी होतो.”

“त्यांनी त्याला त्याच्याकडे आणिले तेव्हां त्या आत्म्याने येशूला पाहताच मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला”(मार्क 9:20).

पहिल्यांदा जेव्हां जागृती येते तेव्हां अगदी असेच पुष्कळांबरोबर घडते आणि लेवीसच्या बेटावरील संजीवनामध्ये. त्यातील पुष्कळ रडले आणि पापाची जाणीव होऊन खाली जमिनीवर पडले. अमेरिकेमध्ये असे पुन्हां घडेल. ते “हसण्याचे 'संजीवन'” नसणार! मार्क नऊ मधील मुलगा हसत नव्हता! खरे संजीवन पापाची जाणीव करुन देते, हसणे नव्हे!!! मोठ्या संजीवन सभेमध्ये लोक ओरडत पापाची जाणीव होऊन कधी कधी खाली पडतात. सध्या चीन व भारतात अशाप्रकारे घडत आहे – ज्याचा ते अनुभव घेतात.

प्रत्येकजण जो जागृत आहे त्यास पापाविषयी खात्री असते. पवित्रआत्मा तुम्हांस तुमचे पाप दाखवितो.

“तो येऊन पापाविषयी, नीतिमत्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खातरी करील; ते माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत ह्यावरुन पापाविषयी”(योहान 16:8-9).

तुम्हाला तुमच्या पापाची जाणीव आहेॽ तुम्हांस तुमच्या पापाविषयी खेद वाटतोॽ तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला पापाची जाणीव होते कायॽ येशूने तुम्हांला क्षमा करावी असे वाटते कायॽ आता अजून खातरीची वाट नका! खातरी तुम्हांला तारण देत नाही! कितीहि खातरी झाली तरी ती तुम्हांस तारण देत नाही! एकदा देवाच्या पुत्राकडे या! आता लगेच या! पापाची खातरी तुम्हांस येशूकडे घेऊन जाते. केवळ येशूच आहे जो पापापासून सुटका देतो!

कष्टी, ओझ्याने दबलेले, दु:खी व तुटलेले तुम्ही सर्व माझ्याकडे या;
चांगले होण्याची वाट पाहाल तर, तुम्ही कधीहि येणार नाही
      (“कम,ये सीनर्स, पुअर अँड व्रेच्ड” जोसेफ हार्ट यांच्याद्वारा, 1712-1768).

या आणि आताच येशूवर विश्वास ठेवा, तुम्हांस खातरी पटली नाही असे वाटते तरी – आणि तो तुमचे तारण करतो! “चांगले होण्याची वाट पाहाल तर, तुम्ही कधीहि येणार नाही.” आताच या! देवाचा पुत्र, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा! तो आताच तुमचे तारण करील!

तुमच्या पापाबद्दल खंडणी भरण्याठी ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. त्याचे रक्त तुमचे पाप धूऊन टाकते. ख्रिस्त मरणातून उठला. ख्रिस्त स्वर्गात - देवाच्या उजवीकडे बसला आहे. ख्रिस्ताकडे या! ख्रिस्ताकडे या! ख्रिस्ताकडे या! ख्रिस्तावर विश्वास ठेवा! ख्रिस्तावर विश्वास ठेवा! ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि तारण होईल!

III. तिसरे, ख्रिस्ताला सामोरे जाण्यास तुम्हाला उठविले आहे.

“पण येशूने त्याला हातास धरुन उठविले व तो उभा राहिला” (मार्क 9:27).

येशूकडे कसे यायचे हे माहित असण्याची गरज नाही – इतर कशा पेक्षा उठविले कसे जाते हे मुलाला माहित पाहिजे होते. “येशूने त्याला हातास धरुन उठविले व तो उभा राहिला.” जर तुम्ही येशूकडे येऊ इच्छिता तर, ज्या सामर्थ्याने त्या मुलाला उठविले त्याच सामर्थ्याने तो तुम्हांला ख्रिस्ताकडे आणील. म्हणून येशू म्हणाला! येशू म्हणाला,

“पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि तो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

कोणीतरी असे म्हणेल, “मला खात्री नाही की देवाने मला ख्रिस्तास दिले की नाही.” तो मुर्खपणा आहे. तुम्हांला माहित नसणार, कारण फक्त देवालाच माहिती आहे. अशाप्रकारच्या ईश्वरविज्ञानाच्या तर्काने तुमचा वेळ घालवू नका. तसेच दुसरे ईश्वरविज्ञानाविषयी वाद घालतात, तुम्ही ख्रिस्ताकडे या! तसेच ते वाद घालतात तुमचे तारण होईल! येशू म्हणाला,

“तो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

ख्रिस्त तुम्हांला घालवून देणार नाही. मरण्यास व नरकात जाण्यास ख्रिस्त तुम्हांला सोडणार नाही. ख्रिस्त तुम्हांला क्षमा करील व तुमचे तारण करील, जसे त्याने ह्या गोष्टीतील मुलाला वाचविले. मी तुम्हांला विनंती करतो. तुम्हांला विनवितो. आग्रह करतो. प्रार्थना करतो. आज्ञा करतो. तुमच्या सार्वकालीक आत्म्यासाठी, ख्रिस्ताकडे य़ा! शांतीमध्ये राहण्यास दुसरा कोणताहि मार्ग तुमच्यासाठी नाही! फक्त येशूच तुम्हांला शांति व पापक्षमा देऊ शकतो! नोहा साँग म्हणाले,

“ख्रिस्ताशिवाय मी आशाहीन, आंधळा, आणि नग्न होतो. मी त्याच्यावर प्रेम करतो कारण पहिल्यांदा त्याने माझ्यावर प्रेम केले...येशूने माझ्यासाठी वधस्तंभावर रक्त सांडले, माझ्या पापाचे मोल देण्यासाठी, आणि जे प्रेम त्याने माझ्यावर केले त्याखातर, मी ते सदैव ध्यानात ठेवीन. त्याने मला पापाच्या आजारापासून वाचविले.”

माझे बंधन, दु:ख आणि रात्र यातून, येशू, मी येतो, येशू, मी येतो
तुझ्या स्वातंत्र्यात, आनंदात, आणि प्रकाशात, येशू, मी तुझ्याकडे येतो;
माझ्या आजारातून तुझ्या आरोग्यात, माझ्या इच्छेतून तुझ्या संपत्तीत,
माझ्या पापातून तुझ्या सानिध्यात, येशू, मी तुझ्याकडे येतो
      (“जीजस, आय कम” विलियम टी. स्लीपर यांच्याद्वारा, 1819-1904).

येशू ख्रिस्ताद्वारे तुमचे तारण होते ह्याविषयी मी तुमच्याशी बोलू इच्छितो. ताबडतोब, तुम्ही पुढे या व पहिल्या दोन रांगेच्या खुर्चीवर बसा. आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. नोवा साँग यांनी केले : मार्क 9:17-27.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले :
“य़स् आय नो!” (ऍना डब्लू. वॉटरमन द्वारा, 1920).
“Yes, I Know!” (by Anna W. Waterman, 1920).


रुपरेषा

असाहाय्य लोकांसाठी तारण

SALVATION FOR THE HELPLESS

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“तेव्हां तो आत्मा ओरडून व त्याला फारच पिळून निघाला, आणि तो मेल्यासारखा झाला म्हणून तो मेला आहे असेच बहुतेक म्हणाले; पण येशूने त्याला हातास धरुन उठविले व तो उभा राहिला” (मार्क 9:26-27).

I.    प्रथम, मेलेल्यांसारखे आहांत, मार्क 9:26; रोम 5:12; प्रे.कृ. 17:23;
कलस्सै 2:13; इफिस 2:1; लुक 15:24,32; इफिस 4:18.

II.   दुसरे, तुम्हांस येशूच्या “हाताने धरुन उठविले” आहे, मार्क 9:27अ;
इफिस 2:2-9; मार्क 9:17,20; योहान 16:8-9.

III.  तिसरे, ख्रिस्ताला सामोरे जाण्यास तुम्हाला उठविले आहे, मार्क 9:27ब;
योहान 6:37.