Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
आणि दार बंद झाले

AND THE DOOR WAS SHUT
(Marathi)

डॉ. आर.एल.हायमर्स ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत आणि
मि. जॉन सॅम्युएल कागन यांच्याद्वारा
लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, दि. 28, मे 2017 रोजी
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Mr. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, May 28, 2017

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).


तुमच्यापैकी पुष्कळजन भविष्यासंबंधी निर्धास्त आहांत. तुम्ही निर्धास्त आहांत, कारण तुम्ही जागृत नाही. तुमचे आयुष्य सरुन जात आहे, तसे तुम्ही झोपलेले आहांत. समुपदेशना द्वारे तुम्ही झोपलेले आहांत. तुम्ही जीवनभर झोपलेले आहांत. क्रोधीविष्ट देवाच्या हातून जागे होईपर्यंत, तुम्ही झोपलेले असणार. तुम्ही जागृत होणे, आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनाची स्थिती जाणणे आवश्यक आहे. तुम्ही भ्यायला हवे. तुम्ही तुमच्या जीवाची वास्तविकता सांगायला हवी. तुम्ही घाबरायला हवे. परमेश्वराच्या भयाचा अनुभव घ्यायला हवा. तुम्ही इतके घाबरायला हवे की, तुमची झोप हरपायला हवी. पवित्रशास्त्र म्हणते,

“परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय” (नीतिसुत्रे 1:7).

ख्रिस्त मेलेले व जिवंतासाठी येणार आहे असे संपूर्ण ख्रिस्ती इतिहासामध्ये सांगण्यात आले आहे. ह्यांस रहस्य म्हटले आहे, परंतू आता ते प्रकट झाले आहे, आणि तुम्ही निर्धास्त आहांत.

1. रहस्य (“मस्टीरिऑन”), पूर्वीचे लपविलेले सत्य जे नवीन करारात प्रकट केलेले आहे. 11 अशी रहस्यें आहेत जी नवीन करारात प्रकट केलेली आहेत. वर अंतराळात उचलले जाणे हे त्यापैकी एक आहे.

2. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्व जण बदलून जाऊ (I करिंथ 15:51).

3. क्षणात, निमिषात आपण बदलून जाऊ (I करिंथ 15:52).

4. मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील, आणि आपण बदलून जाऊ (I करिंथ 15:52).


“आणि पुढे आपण काय होऊ हे अजून उघड झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हां त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल” (I योहान 3:2).

पवित्रशास्त्र म्हणते,

“कारण आज्ञाध्वनि आद्यदेवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असतां प्रभू स्वत: स्वर्गातून उतरेल; आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील; नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सोमोरे होण्यासाठी मेघारुढ असे अंतराळात घेतले जाऊ, आणि तसेच सदासर्वदा प्रभूजवळ राहू” (I थेस्सल” 4:16-17).

1. ख्रिस्त स्वत: स्वर्गातून उतरेल (I थेस्सल” 4:16)

2. तसेहि तो खाली पृथ्वीवर येणार नाही, “प्रभूला सोमोरे होण्यासाठी अंतराळात घेतले जाऊ” (I थेस्सल” 4:17).

3. ख्रिस्त अंतराळात येत असतां “आज्ञाध्वनि आद्यदेवदूताची वाणी” व देवाच्या तुतारीचा नाद होईल. (4:16)

4. पूर्वी मेलेले ख्रिस्ती लोक उठतील आणि वर अंतराळात – वर घेतले जातील (4:17अ).

5. नंतर जिवंत उरलेले जे खरे पालट झालेले ते येशूला सामोरे जाण्यासाठी वर अंतराळात घेतले जाऊ (4:17ब).


शहाण्या व मुर्ख कुमारिकेच्या दाखल्याविषयी पवित्रशास्त्र बोलते. ह्या दाखल्याचा विशेष अर्थ व उद्देश आहे. पवित्रशास्त्र म्हणते,

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

ह्या सकाळी तीन मुद्दे समजूया.


1. तुमचा पालट झाला नाही तर, तुम्हांस दार बंद होईल -- वर उचलले जाण्याच्या वेळी मागे राहणार.

2. वर उचलले जाण्याच्या समय कधीहि येईल त्याची सर्व चिन्हें होत आहेत.

3. वर उचलले जाण्याच्या समय जेव्हां चुकेल तेव्हां तुम्ही मेलेले असावे अशी इच्छा बाळगाल.

I. प्रथम, तुमचा पालट झाला नाही तर, तुम्हांस दार बंद होईल – वर उचलले जाण्याच्या वेळी मागे राहणार.

पवित्रशास्त्र म्हणते:

“त्या विकत घ्यावयास गेल्या असतां वर आला (ख्रिस्त आला); तेव्हां ज्यांची तयारी झाली होती त्या त्याच्याबरोबर आंत लग्नास (स्वर्गात) गेल्या आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

नोहाच्या काळात काय घडले हे त्याचे खूप मोठे उदाहरण आहे:

“देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहदारी प्राण्यांपैकी एकएक आंत गेली (तारुत गेली); मग परमेश्वराने त्याला आंत बंद केले” (उत्पत्ती 7:16).

आणि परमेश्वर म्हणाला:

“अजून सात दिवसांचा अवकाश आहे; मग मी चाळीस दिवस व चाळीस रात्री पृथ्वीवर पर्जन्य पाडणार” (उत्पत्ती 7:4).

महापूर येण्यापूर्वी सात दिवस अगोदर देवाने तारुचे दार बंद केले. वर उचलले जाण्याच्या वेळी, गंगाळाच्या न्यायापूर्वी दार बंद करण्याचा देवाचा हा प्रकार आहे.

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

तुमचा पालट झाला नाही तर, तुम्हांस दार बंद होईल -- वर उचलले जाण्याच्या वेळी मागे राहणार. त्यामुळे तुम्ही आपल्या जीवासंबंधाने विचार केला पाहिजे. आता तुम्ही सुवार्तेस प्रतिसाद दिला पाहिजे. तुम्ही येशूवर विश्वास ठेवला राहिजे. येशू म्हणाला:

“त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो, आम्ही तुझ्या... व तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्यें केली नाहीत काय? तेव्हां मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणा-यांनो, माझ्यापुढून निघून जा” (मत्तय 7:23).

“तुम्ही विश्वासांत आहां किंवा नाही ह्याविषयी आपली परिक्षा करा” (II करिंथ 13:5).

तुमचा पालट झाला नाही, तुम्ही खराखुरा येशूवर विश्वास ठेवणार नाही, तुम्ही केवळ भावना किंवा सिद्धांतावर विश्वास ठेवतां आहां, तर तुम्ही वर अंतराळात उचलले जाण्यास तयार नाही आहांत. वर उचलले जाण्याच्या वेळी तुम्ही मागे राहणार!

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

II. दुसरे, त्या काळची सर्व चिन्हें होत आहेत हे तुम्हांला समजले पाहिजे. आज सकाळी सुद्धा तुमच्यासाठी दार बंद होईल.

1. यहुदी लोक आपल्या मातृभूमीकडे परत आल्यावर, 1948 मध्ये इस्त्राएलचे पुनर्घटन झाले (लुक 21:24; मत्तय 24:32-34; यहेज्केल 37:21;38:8).

2. ख्रिस्ती व यहुदी लोकांचा संपूर्ण जगामध्ये छळ वाढलेला आहे (मत्तय 24:9-10; यिर्मया 30:7; दानिएल12:1).

3. संपूर्ण जगामध्ये दुष्काळ, असंतुलीत पर्यावरण, एडस् रोगाची महामारी, आणि भूकंपाचे प्रमाण वाढलेले आहे. (मत्तय 24:7).

4. ख्रिस्ती विश्वास सोडून देण्याचे वाढलेले प्रमाण (II थेस्सल.2:3; मत्तय 24:11-12).

5. नोहाच्या काळात महापूराच्या पूर्वी, लोकांची न ऐकण्याची जी मानसिकता होती ती परत आली आहे (मत्तय 24:37-40).


नोहाच्या काळ व ख्रिस्त परत येण्याच्या काळाची तुलना पवित्रशास्त्र करते.

1. नोहाच्या काळात, ते तारणासंबंधी निष्काळजी होते. ते जागृत नव्हते. ते तुमच्यासारखे होते – कसलीहि भिती आणि अपराधीपणाची भावना नाही.

2. नोहाच्या काळातील चिन्हें आजहि आहेत. आणि तुम्ही मागे राहणार आहांत!


तिने आवाज ऐकला व आपली मान वळविली – तो निघून गेला.
मी आशा करितो आपण सर्व तयार असू.
दोन माणसे डोंगरावर तढून जात आहेत,
एक अदृष्य होतो व दुसरा तेथेच राहतो,
मी आशा करितो आपण सर्व तयार असू...
तुमचे मन परिवर्तन होण्यास वेळ नसणार.
पुत्र आलेला आहे, आणि तुम्ही मागे राहीलेला आहांत.
      (“आय विश वुई वुड ऑल बीन रेडी” लॅरी नॉर्मन यांच्याद्वारा,1947-2008)

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

वर उचलले जाण्याच्या वेळी बंद होण्याची वाट पाहू नका. ह्या सकाळी देव कायमचे तुम्हांसाठी बंद करील. देवाने तुम्हांवर सोपविले आहे. तुम्हांसाठी देव तारणाचे दार बंद करील. कोणतीहि जाण न होता, तुम्ही अक्षम्य पाप कराल. तुम्ही तारण पावण्याची संधी गमावाल. जेव्हां देव तुम्हांसाठी दार बंद करील, तर तुम्हांसाठी आशा राहणार नाही. दार बंद होईल, आणि तुम्ही अनंत काळासाठी हरविलेले असाल.

III. तिसरे, वर उचलले जाण्याची संधी तुम्ही गमावाल – आणि दार बंद होईल तेव्हां तुम्हांस मेलेले बरे वाटेल.

तुम्हांला असे वाटेल ही सर्व भाकडकथा आहे. आता तुमचे मन दुसरीकडे घेऊ शकता. परंतू जर वर उचलले जाण्याच्या वेळी मागे राहीलात तर तुम्हांस मेलेले बरे वाटेल. पवित्रशास्त्र आपणास स्पष्ट सांगते:

“त्या दिवसांत माणसे मरणाची संधि शोधतील... आणि मरावयाची उत्कंठा धरतील...” (प्रकटी. 9:6).

वर उचलले जाण्याच्या वेळी मागे राहीलात तर तुम्ही सतत आत्महत्या संबंधी विचार कराल.तुम्हांला मरावेसे वाटेल. का?

1. प्रकटीकरण 9:1-2 नुसार अथांग डोहातून निघालेल्या सैतान तुमचा छळ करील. डॉ. जॉन राईस ह्यांनी दिलेल्या ह्या सैतानाचे वर्णन ऐका:

“यामध्ये कांही शंका नाही की ‘ज्या माणसाच्या कपाळावर देवाचा शिक्का मारण्यात आला नाही’ त्यांना छळण्यासाठी आलेले टोळ हे सैतानच... आहेत. नरकातून आलेल्या ह्या सैतानी ‘टोळांकडून,’ छळ व जाच केला जाईल, ‘त्या दिवसांत माणसे मरणाची संधि शोधतील...’

...इथे जो छळ सांगितलेला आहे तो आध्यात्मिक आहे, जाचलेले, क्लेशयुक्त मन. ह्या टोळांचे चित्रण विलक्षण आहे, एका भयंकर स्वप्नासारखे, माणसातील एकत्रीत सर्व प्रकारची भिती आणि त्रास आणि भयंकर दु:खासारखे ते आहे...ते जीवास (मन) जाच करतात...विचार करा जेव्हां मनुष्य नष्ट होऊन दुष्ट आत्म्यामध्ये बदलेले ते दृष्य किती भीषण असेल?” (जॉन आर. राईस, पाहा,तो येतोय! प्रकटीकरणावरील वृतांत, परमेश्वराची तलवार,1977. पृष्ठ 169-171).

सैतान तुमचा दिवस अन रात्र माणसिक छळ करील. तुम्हांस कुठलीहि मदत नसणार, शांत करण्यास कोणतेहि मादक किंवा नशीले पदार्थ नसणार. आपण महासंकटात असणार आणि तुमच्यासाठी त्या गोष्टी तेथे नसणार, त्याचबरोबर इतर हजारो लोकांना सैतान अरण्यात नेणार. तुम्हांस अक्षरश: वेडे केले जाईल. तुम्ही सतत आत्महत्येचा विचार कराल. मदतीसाठी तुमच्याजवळ कोणीहि नसणार! तुम्हांस पुष्कळ वेळ वाट पाहावी लागेल. तुम्ही मागे राहिले असणार.

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

2. त्याकाळात तुम्ही ख्रिस्ती होण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा छळ होईल. पवित्र शास्त्र म्हणते “आणि येशूविषयीच्या साक्षीमुळे व देवाच्या वाचनांमुळे ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि ज्यांनी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर व आपल्या हातावर त्याची खूण धारण केलेली नव्हती” (प्रकटी. 20:4).


तुमच्या लक्षात येईल की तुम्ही महासंकटाच्या काळात आहांत. ते तुमच्या हाताच्या किंवा कपाळाच्या त्वचेखाली, मायक्रोचीप, किंवा तत्सम कांही बसवू पाहतील. तुमच्या लक्षात येईल की ख्रिस्तविरोधीचा उपासक म्हणून तुमची निंदा होतेय. तुम्ही म्हणाल, “नाही, मी हे माझ्या शरीरात बसविणार नाही.” परंतू त्याशिवाय कांही एक खरेदी करु शकणार नाही. कांही तरी खरेदी करण्यासाठी तुमचा हात “स्कॅन” केला जाईल. तुमची उपासमार होईल. दुकानात तुम्ही अन्न खरेदी करु शकणार नाही! कोणीतरी तुमच्याकडे येईल. तुम्ही ख्रिस्ती असलेने, तुमचा शिरच्छेद केला जाईल. तुम्ही मागे राहिल्यांने, ह्या मार्गाने किंवा दुस-या मार्गाने तुम्ही सर्वकांही गमावाल!

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

3. तुम्हांस गंगाळाच्या न्यायातून जावे लागेल. कोणीतरी म्हणाले, “ठिक आहे, मी माझ्या हाताच्या त्वचेखाली फक्त चीप बसवू देतो. मी ठिक असेन. ते माझा शिरच्छेद तरी करणार नाही.” परंतू, शिरच्छेदापासून सुटला तरी, तुम्हांस गंगाळाच्या न्यायास सामोरे जावेच लागणार!

(1) भयंकर फोडे अंगावर उठतील जे तुम्हांस असह्य वेदनेचा अनुभव रात्रंदिवस देतील. (प्रकटी. 15:6).

(2) समुद्रातील व ताजे पाणी सुद्धा विषारी बनून जाईल. सगळे पाणी विषारी बनेल. तुम्हांस पिण्यासाठी कांहीच नसणार. (प्रकटी. 16:3-4).

(3) उष्णतेने तुम्ही करपून जाल. उल्कापात होईल आणि तुम्ही करपून जाल. तुमचे शरीर होरपळून जाणार. ते बरे होण्यास औषधहि नसणार. जळलेल्या शरीरातून पू गळत तुम्ही चालाल. (प्रकटी. 16:8-9).

(4) सगळीकडील वीज जाणार. तुम्ही रात्रीच्या भयंकर अंधकारात असणार, वेदनेने जीभा चावाल. (प्रकटी. 16:10-11).

(5) जगातील सैन्य हालचाल करील. त्यामुळे तुम्ही अधिकच बेचैन व्हाल व गोंधळात पडाल – जसे युद्धामुळे नेहमी होते. तुमच्यापैकी कित्येक - स्त्री व पुरुषांना - त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध सैन्यात भरती करुन घेतील. (प्रकटी. 16:12-16).

(6) पूर्वी झालेल्या भूकंपापेक्षा, अधिक महाभयंकर भूकंप होणार. नरकाप्रमाणे पृथ्वीवर अग्नी वर्षाव होणार. तुम्ही कुठे लपणार? भूकंपामुळे इमारती उध्वस्त होतील. तुम्ही कुठे लपणार? (प्रकटी. 16:17-21).


आणि लक्षात ठेवा हे सर्व तुमच्याबरोबर होईल कारण तुम्ही तुमचा पालट केला नाही. तुम्हांस ठाऊक आहे की तुमच्या पापांबद्दल खंडणी भरण्यासाठी ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला आहे. तुम्हांस ठाऊक आहे की तो मरणातून पुन्हां उठला व स्वर्गात चढला, आणि सर्व समर्थ देवाच्या उजवीकडे बसला आहे. तुम्हांस ठाऊक आहे की तुमच्या पापाची क्षमा करण्यास आणि ती त्याच्या रक्ताने धुण्यासाठी देवाच्या पुत्राची गरज आहे. तुम्हांस ह्या गोष्टी ठाऊक आहेत – पण तुम्ही मुर्ख बनलात. तुम्ही खेळलात आणि हसलात, आणि कारणें दिलीत. तुम्ही मागे राहिलांत!

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

डॉ. हायमर्स, कृपया या व भक्तीची सांगता करा.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. नोवा साँग यांनी केले : मत्तय 25:1-10.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले : “
“I Wish We’d All Been Ready” (Larry Norman, 1947-2008).


रुपरेषा

आणि दार बंद झाले

AND THE DOOR WAS SHUT

डॉ. आर.एल.हायमर्स ज्युनि. यांच्याद्वारा लिखीत आणि
मि. जॉन सॅम्युएल कागन यांच्याद्वारा
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Mr. John Samuel Cagan

“आणि दार बंद झाले” (मत्तय 25:10).

I.    प्रथम, तुम्हांस दार बंद होईल – वर उचलले जाण्याच्या वेळी मागे राहणार,
मत्तय 25:10-13; मत्तय 7:21-23; II करिंथ 13:5.

II.   दुसरे, वर उचलले जाण्याच्या वेळची चिन्हें होत आहेत हे तुम्हांस समजले पाहिजे, मत्तय 24:37-41.

III.  तिसरे, तुम्ही जेव्हां वर उचलले जाण्याची वेळ गमावाल तेव्हां तुम्हांस मेलेले बरे वाटेल, प्रकटी.9:6; 9:1-12; 20:4; 16:1-21.