Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
केवळ असंतुष्टांकरिता सुटका

DELIVERANCE IS ONLY FOR THE DISSATISFIED
(Marathi)

डॉ. आर.एल.हायमर यांच्याद्वारा लिखीत आणि
मि. जॉन सॅम्युएल कागन यांच्याद्वारा
लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, दि. 14, मे 2017 रोजी
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Mr. John Samuel Cagan
at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, May 14, 2017

“येशूने त्यांस उत्तर दिले, निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते. मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे” (लुक 5:31-32).


येशू गेला व एका लेवी नावाच्या जकातदाराला त्याने बघितले. हे मत्तयाचे दुसरे नाव होते. येशूने मत्तयास आपल्या मागे यावयास सांगितले,

“तेव्हां तो सर्व कांही तेथेच सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला” (लुक 5:28).

मत्तय हा एक जकातदार, रोमसाठी जकात गोळा करणारा होता. यहुदी जकातदारांचा द्वेष करीत, कारण ते नियमांनुसार लागणा-या जकातीपेक्षा जास्त जकात यहुदी लोकांकडून वसूल करीत असत. त्यानंतर ते त्यांनी जमा केलेल्या पैशांकडे जायचे, आणि शिल्लक राहिलेले पैसे स्वत:साठी ठेवायचे. अशाप्रकारे, बरेच जकातदार श्रीमंत होते, आणि इतर यहुदी त्यांचा द्वेष करीत. यहुदी लोक त्यांना शुद्र पापी समजत.

जेव्हां .मत्तय येशूच्या मागे गेला, त्याने “सर्व कांही सोडले” म्हणजेच त्याने फायदेशीर व्यवसाय सोडून दिला, “आणि त्याच्यामागे गेला.”

मग त्याने आपल्या घरामध्ये मेजवाणी केली. जकातदारांचा, आणि प्रत्येक प्रकारच्या पापी लोकांचा मोठा समुदाय ह्या मोठ्या मेजवानीस आला. ते सगळे टाकाऊ असे लोक होते. झेनो, कवी म्हणाले, “सगळे जकातदार हे लुटारुच आहेत.” ह्या जकातदारांशी किंवा त्यांच्या मित्रांशी, परुशांचे कांही देणे घेणे नव्हते, ज्यांना ते परुशी “पापी” असे संबोधित असत.

जेव्हां या मेजवानीस जकातदार व पाप्यांच्या मोठ्या समुदायाने घर भरले, तेव्हां तेथे परुशी तक्रार व कुरकुर करत आले. ते शिष्यांना म्हणाले,

“जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर तुम्ही का खाता व पिता?” (लुक 5:30).

परुश्यांना उत्तर देण्यासाठी येशू मेजवानीतून बाहेर गेला,

“येशूने त्यांस उत्तर दिले, निरोग्यांस [जे निरोगी आहेत त्यांना] वैद्याची गरज नसते, तर रोग्यास असते. मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे” (लुक 5:31-32).

पापी लोकांस मेजवानीस बोलविण्याचे येशूने परुश्यांस कारण दिले. तो म्हणाला की जे तब्बेतीने निरोगी आहेत त्यांना वैद्याची गरज नाही. जे आजारी आहेत फक्त त्यांनाच गरज आहे. त्यांच्या स्वत:च्या मतानुसार, ते शास्त्री व परुशी पापाच्या आजारापासून मुक्त आहेत. शास्त्री व परुशी हे नियमशास्त्र पाळणारे असल्याने, ते स्वत:स आजारी, आणि पापी असे समजत नव्हते. परुशी हे त्याकाळचे सनातनी यहुदी होते. शास्त्री ते लोक होते जे पवित्रशास्त्राच्या प्रती बनवित व ते शिकवित. महान वैद्य, येशूची त्यांना आवशक्यता आहे असे त्यांना वाटत नव्हते. ते असा विचार करीत बोते की

“आपण धार्मिक आहों असा जे कित्येक स्वत:विषयी भरवंसा धरुन इतर सर्वांस तुच्छ मानीत होते” (लुक 18:9).

जे गर्विष्ट, स्वसंतुष्ट परुशी त्यांना वाक्ताडन करण्यासाठी येशूचे उत्तर होते,

“येशूने त्यांस उत्तर दिले, निरोग्यांस [जे निरोगी आहेत त्यांना] वैद्याची गरज नसते, तर रोग्यास असते. मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे” (लुक 5:31-32).

तुम्ही निरोगी आहांत असे जर तुम्हांस वाटत असेल, तर तुम्हांस येशूची आवशक्यता भासणार नाही. पापाच्या स्थितीत नाश पावत आणि मरत आहांत असे जर तुम्हांस वाटत असेल, तर येशू तुम्हांसाठी खूप महत्वाचा असेल आणि तुमचा जीव बरा करण्यास आणि पाप व पापाच्या परिणामापासून वाचण्यासाठी तुम्ही येशूचा शोध कराल. तुम्हांस पापाची, आशाहीनतेची, कमीपणाची जाणीव होणे अत्यावशक आहे – नाही तर तुम्हांस ख्रिस्ताची गरज भासणार नाही.

“निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते” (लुक 5:31).

I. प्रथम, जे आपल्या जीवनातील मार्गाने संतुष्ट असतील त्यांना येशूची आवशक्यता भासणार नाही.

शुभवर्तमान वाचल्यानंतर, तुमच्या लक्षात येईल की, येशूने अनेकदा पापी लोकांबरोबर जेवण केले आहे. पापी लोक आपल्या जीवनांमध्ये असंतुष्ट असतात. पापी लोकांना कळते की आपल्या जीवनांमध्ये कांही तरी भयंकर चुकीचे घडत आहे. यातून कांही तरी शिकू शकतो. हे हरविलेले लोक येशूकडे येत कारण तो त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागे. आणि त्यांच्यातील कित्येकांचे तारण झाले.

ते त्यांच्या जीवनाविषयी इतके असंतुष्ट झाले होते की ते ख्रिस्ताकडे वळाले. लुकाच्या पाचव्या अध्यायात पाहतो की, जकातदार मत्तयाने ते केले. तसेच एकोणीसाव्या अध्यायात पाहतो की, जकातदार जक्कयाने ते केले. आणि येशू त्यांना म्हणाला,

“जक्कया, त्वरा करुन खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. तेव्हां त्याने त्वरेने खाली उतरुन आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करु लागले की, पापी मनुष्याच्या घरी हा उतरावयास गेला आहे. तेव्हां जक्कय उभा प्रभूला म्हणाला, प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे कांही घेतले असेल तर ते चौपट परत करितो. येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाहि अब्राहामांचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र 'हरविलेले शोधावयास' व तारावयास आला आहे” (लुक 19:5-10).

घमेंडी शास्त्री व परुश्यांना ख्रिस्ताची गरज भासली नाही; ते आपल्या जीवनांमध्ये संतुष्ट होते. परंतू जकातदार व पापी लोक आले आणि त्यांनी तारण साधून घेतले.

“निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते” (लुक 5:31).

ज्यांना आपण निरोगी आहोत असे वाटते त्यांना येशूची आवशक्यता भासत नाही. परंतू ज्यांना आपल्या जीवनांमध्ये आजारीपण जाणवते ते त्याच्याकडे येतात आणि तारण साधून घेतात.

तुमचे काय? माझ्या अनुभवातून मला ठाऊक आहे की हे पुष्कळांच्या बाबतीत खरे आहे. तुम्ही जीवनांमध्ये ज्या मार्गाने जात आहांत त्यात तुम्ही संतुष्ट असाल तर, तुम्हांस येशूची गरज भासणार नाही, आणि तुम्हांस तारण मिळणार नाही. तुम्ही जीवनांमध्ये ज्या मार्गाने जात आहांत त्यात तुम्ही समाधानी असाल तर, ख्रिस्त येऊन तुमच्यात कांही तरी बदल करावा याची तुम्हांस गरज भासणार नाही.

“निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे” (मत्तय 9:12).

II. दुसरे, जे आपल्या स्वत:च्या चांगुलपणामध्ये संतुष्ट आहेत त्यांना येशूची गरज भासत नाही.

आपल्या नगराकडे पाहा. त्यातील लोकांविषयी विचार करा. त्यांच्यातील पुष्कळजन देवाविषयी गंभीरपणे विचार करतात कायॽ तुम्हांस ठाऊक आहे की ते करीत नाहीत. पवित्रशास्त्र म्हणते,

“देवाचा शोध झटून करणारा कोणी नाही” (रोम 3:11).

जोवर पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य होऊन तुमच्याकडे देवाची कृपा येत नाही तोवर, तुम्ही ख्रिस्तामध्ये देवाला शोधणार नाही. तुम्ही अधार्मिकतेमध्ये, संतुष्ट होऊन देवाशिवाय मरुन जाणार.

परंतू देवाची कृपा तुमच्या अंत:करणात कार्य करु लागली की, तुमचे जे जीवन आहे त्यामध्ये तुम्ही असंतुष्ट व्हाल. तुम्हांला सर्व कांही वेगळे दिसू लागेल. तुम्ही कदाचित लोकांच्या गर्दीमध्ये असाल आणि विचार करु लागाल की, “हे लोक कशासाठी जगत आहेतॽ देवाविषयी त्यांना कांहीच कसे वाटत नाहीॽ” तुम्ही तुमचे जीवन व येणा-या मरणांविषयी विचार करु लागाल. तुमचा स्वत:चा धर्म तुम्हांस शुल्लक व बिनकामाचा वाटू लागेल. जी कारणे लोक देतील, ती तुम्हांस पुरेशी किंवा योग्य वाटणार नाहीत. केवळ खाणे, झोपणे, अभ्यास करणे, आणि खेळणे ह्याहिपेक्षा अधिक कांहीतरी जीवन आहे असे तुम्हांस वाटू लागेल.

जेव्हां देवाची कृपा तुमच्या अंत:करणात कार्य करु लागेल तेव्हां तुमच्या अधार्मिकपणाची जाणीव तुम्हांस होईल. तुम्हांस असे वाटू लागेल की

“देवाच्या जीवनाला पारखे झालेले आहेत” (इफिस. 4:18).

देव तुमच्यासाठी अनोळखी आहे, आणि त्याच्याशिवाय तुम्ही भयंकर स्थितीत जगत आहां असे तुम्हांस वाटू लागेल,

“आशाहीन व देवविरहित असे जगत होता” (इफिस. 2:12).

आणि म्हणून मी तुम्हांस विचारतो की, जे तुमचे जीवन आहे त्यात तुम्ही पूर्ण संतुष्ट आहांत कायॽ जर असाल, तर तुम्ही ख्रिस्ताकडे येण्याची थोडीबहुत आशा आहे. तुम्ही आहांत तसे जाणार – व्यक्तीगतरित्या आनंदाने जगणार आणि देवाला न ओळखता मरुन जाणार.

“निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते” (लुक 5:31).

तुम्ही तुमच्या अधार्मिक जीवनांविषयी संतुष्ट असाल तर तुम्हांस येशूची गरज भासणार नाही.

अशी एक प्रवृत्ती आहे, विशेषत: तरुण लोकांमध्ये, ते असा विचार करतात की धार्मिक गोष्टीमध्ये जास्त रुची घेणे म्हणजे कमकुवतपणाचे लक्षण होय. ख्रिस्ती नसणारे लोक विचार करतात की देवामध्ये जास्त रुची घेणारे साधारणत: विचित्र, विक्षिप्त, अस्वाभाविक असतात.

हे साधारणत: बोलले जाते की नाही. साधारणत: लोक असे म्हणत नाहीत की, “तो मनुष्य विचित्र आहे. तो जातो आणि स्वत:च प्रार्थना करतो.” असा नियम आहे असे ते म्हणत नाहीत. पण ते असा विचार करतात. आणि तुमचा अ-ख्रिस्ती मित्र असा विचार करतो. ते असे म्हणतील, “खूप धार्मिक होऊ नको. कट्टरपंथी होऊ नको” – अशाच कांही गोष्टी. याचे महत्वाचे कारण साधारण आहे कारण मानवीयता पापात आहे.

“कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे [देवाला विरोध]” (रोम 8:7).

सर्व मानवजाती त्यांच्या, तारण न झालेल्या स्थितीत आहेत

“स्वभावत: इतराप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो” (इफिस. 2:3).

त्यामुळे तारण न पावलेले मित्र व नातेवाईक तुम्ही गंभीरपणे देवाचा शोध घेऊ नये म्हणून तुमचे मन वळविण्यासाठी शक्य तो सर्व करतील. ते तुम्हांस दुस-याच्या मंडळीत, किंवा “त्यांच्या” मंडळीत घेऊन जातील, - ह्या मंडळीत परत येऊ न देण्यासाठी कांहीहि करतील! का? त्यांना ठाऊक आहे की “त्यांची” मंडळी थंड पडलेली आहे, आणि तेथे देवाचे वसति नाही. यामध्ये त्यांचा खरा हेतू तुम्हांस देवापासून दूर ठेवणे हा असतो,

“कारण देह स्वभावाचे चिंतन हे देवाबरोबर वैर आहे” (रोम 8:7).

पुनर्निर्माण न करण्याच्या स्थितीत, मानवजात देवाप्रती बंडखोरी करतेय. जेव्हां देव तुम्हांस पाचारण करु लागतो, तेव्हां तुमचे मित्र व नातेवाईक मागे ओढण्याचा व देवापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. आईवडील व हरविलेले मित्र सुद्धा अशाच प्रकारचा प्रयत्न करतील.

परंतू येशू म्हणाला,

“मी तुम्हांला खचित खचित सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे” (योहान 5:25).

इफिस 2:1,5 प्रमाणे तुम्ही आध्यात्मिक मृत असला तरी, देवाचा पुत्र तुम्हांस बोलाविल. तुमच्या मृत स्थितीत, तुम्ही “देवाच्या पुत्राची वाणी ऐकाल.” असे जेव्हां घडेल तेव्हां येशू, देवाच्या पुत्रा शिवाय जगतांना तुम्ही संतुष्ट होणार नाही. तुम्हांस आणखीन कांही तरी हवेसे वाटणार. मग तुम्ही येशू ख्रिस्ताला शोधणार. परंतू जोवर तुम्ही निद्रावस्थेत आणि मृत आहांत तोवर, जगण्यात संतुष्ट राहाल व ख्रिस्ताविना मरुन जाल. जोवर केवळ पवित्र आत्मा तुमच्यातील दोष – तुमचे अंत:करण अधर्मी आहे - हे तुम्हांस दाखविणार नाही तोवर तुम्ही तुमच्यातील दोष पाहू शकणार नाही व येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांस रुचि निर्माण होणार नाही.

“निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते” (लुक 5:31).

III. तिसरे, आपल्या अंतकरणातील दुष्टाईमध्ये जे संतुष्ट होतात त्यांना येशूची गरज भासत नाही.

साधारणपणे देव प्रथम आपल्या भावनांशी बोलतो. जेव्हां पवित्र आत्म्याचे पटवून सांगण्याचे कार्य सुरु होते, तो आपणांस पाप अपराधीपणाची जाणीव करुन देतो.

जेव्हां लोकांचा पालट झाला तेव्हां ते भावनिक होऊन गेले असे पवित्रशास्त्र आपणांस सांगते हे लक्षात घ्या. ज्या स्त्रीने येशूच्या चरणाचे चुंबन घेतले ते भावनावश होऊनच.

“तेव्हां पाहा, कोणीएक पापी स्त्री होती; तो परुश्यांच्या घरात जेवावयास बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली; आणि त्याच्या पायाशी मागे रडत उभी राहिली व आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली; तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायाचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले” (लुक 7:37-38).

येशूकडे ती लगेच आली व तारण पावली.

पेंटाकॉस्टच्या दिवशी, ज्यानी पेत्राचे भाषण ऐकले

“हे ऐकून त्यांच्या अंत:करणात चुटपुट लागली” (प्रे.कृ. 2:37).

“त्यांची अंत:करणे भेदून गेली” असा त्याचा खरा अर्थ आहे. हे भावनेविषयी बोलते. फिलिप्पै नगराचा तुरुंग अधिकारी

“कापत कापत आला” (प्रे.कृ. 16:29).

प्रेषित पौल म्हणाला,

“किती मी कष्टी माणूस! मला ह्या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडवीलॽ” (रोम 7:24).

पवित्रशास्त्रातील ही उदाहरणे हे दर्शवितात की देव साधारणपणे माणसांच्या भावना चाळवितो यासाठी की त्यांनी त्यांच्या दुष्ट अंत:करणात असंतुष्ट व्हावे. खरे परिवर्तन झालेल्या लोकांमध्ये एक समान दुवा असतो, खरे परिवर्तन झालेल्यांमध्ये समान असलेली गोष्ट म्हणजे – लोक आंतरिक रिक्त होतात. ते आपल्या अंत:करणात पाहातात व त्यातील पापहि पाहतात. त्यांच्या स्वत:मध्ये ते जे पाहातात ते त्यांना आवडत नाही. ते स्वत:च्या अंत:करणाचा तिरस्कार करु लागतात! ते जे आहेत त्याचा ते तिरस्कार करतात.

जे जकातदार व पापी लोक येशूकडे लगेच आले त्यांच्यात मानवी घटक आहे – त्याचवेळी शास्त्री व परुशी हे त्याच्यापासून अलिप्त राहिले.

“निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते” (लुक 5:31).

तिम्हांस आजच्या सकाळी हा प्रश्न आहे की: तुम्ही रिक्त आहांत काॽ तुम्ही तुमच्या जीवनाविषयी संतुष्ट आहांत काॽ आपण देवाविना जगण्यास कमजोर आहांत काॽ तुम्ही स्वत:च्या अंत:करणाचा तिरस्कार करता काॽ तुम्हांस पापाची जाणीव झाली आहे काॽ तुम्हांस तुमच्या पापाविषयी थोडा जरी तिरस्कार व जाणीव झालेली आहे तर तुम्ही महान वैद्य, येशूकडे येण्यास तयार आहांत. सर्वात शेवटी, तुम्हांस तुमच्या पापापासून तारु शकणारा येशू केवळ एकच आहे. तोच आहे ज्याने तुमच्या पापाविषयी खंडणी भरण्यासाठी वधस्तंभावर मरण पत्करले. तुम्हांस जीवन देण्यासाठी तोच देहासह मरणातून उठला. तोच स्वर्गात, देवाच्या उजवीकडे बसला आहे, व तुम्हांसाठी मध्यस्ती करीत आहे. तुम्ही त्याच्याकडे येण्यास तयार आहांतॽ त्याच्या रक्ताने तुमचे पाप धुण्यास तयार आहांतॽ

“निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते” (लुक 5:31).

ख्रिस्तातील तारणाविषयी तुम्ही आमच्याशी बोलू इच्छिता तर, कृपया पुढे या व पहिल्या दोन रांगेत बसा तसेच बाकीच्यांनी वर मेजवानीस जावे. डॉ. हायमर्स, कृपया पुढे या व सभेची सांगता करा.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. नोवा साँग यांनी केले : लुक 5:27-35.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले :
“आय एम अमेझ्ड” (ए. एच. एक्ली द्वारा, 1887-1960).
“I Am Amazed” (by A. H. Ackley, 1887-1960).


रुपरेषा

केवळ असंतुष्टांकरिता सुटका

DELIVERANCE IS ONLY FOR THE DISSATISFIED

डॉ. आर.एल.हायमर यांच्याद्वारा लिखीत आणि
आणि मि. जॉन सॅम्युएल कागन यांच्याद्वारा
A sermon written by Dr. R. L. Hymers, Jr.
and preached by Mr. John Samuel Cagan

“येशूने त्यांस उत्तर दिले, निरोग्यांस वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते. मी नीतिमानांस बोलावण्यास आलो नाही तर पापी लोकांस पश्चातापासाठी बोलावण्यास आलो आहे” (लुक 5:31-32).

(लुक 5:28,30;18:9)

I.    प्रथम, जे आपल्या जीवनातील मार्गाने संतुष्ट असतील त्यांना येशूची आवशक्यता भासणार नाही, लुक 19:5-10; मत्तय 9:12.

II.   दुसरे, जे आपल्या स्वत:च्या चांगुलपणामध्ये संतुष्ट आहेत त्यांना येशूची गरज भासत नाही, रोम 3:11; इफिस 4:18; 2:12; रोम 8:7; इफिस 2:3; योहान 5:25.

III.  तिसरे, आपल्या अंतकरणातील दुष्टाईमध्ये जा संतुष्ट होतात त्यांना येशूची गरज भासत नाही, लुक 7:37-38; प्रे.कृ. 2:37; 16:29; रोम 7:24.