Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
मवाळ व हिंसक औदासिन्य (खिन्नता)

A SOFT AND VIOLENT SADNESS
(Marathi)

मि. जॉन सॅम्युएल कागन यांच्याद्वारा
by Mr. John Samuel Cagan

लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, दि. 30, एप्रिल 2017 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, April 30, 2017

“तेव्हां बारा वर्षे रक्तस्त्राव होत असलेली व कोणालाहि बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्त्राव थांबला”
   (लुक 8:43-44).


ती स्त्री भयंकर आजाराने त्रस्त होती. आपला आजार बरा व्हावा म्हणून तिने शक्य ते सर्व केले. ती वैद्यांकडे गेली, परंतू त्यांनी तिला बरे केले नाही. आपला आजार बरा व्हावा म्हणून तिने तिचा सर्व पैसा खर्च केला. तिला शक्य असलेला सर्व प्रकारचा उपचार तिने केला, परंतू कशानेहि ती बरी झाली नाही. तिच्या काळात वैद्यांकडून उपचार घेत असताना, त्यांनी जे जे उपचार केले त्यामुळे तिला भयंकर त्रास झाला. तिच्या काळात यहुदी लोकांनी तिला अशुद्ध समजले होते. ती धार्मिक व सामाजिक वाळीतले जीवन जगत होती. ती एकटी होती आणि कोणीहि तीच्याशी बोलत नव्हते.

पर्यायापासून ती पळत होती. आशे पासून ती पळत होती. येशूला बघेपर्यंत, तिला कसलीच आशा नव्हती. तिने येशूला जमावामध्ये पाहिले. येशू तिला बरे करील हे तिला ठाऊक होते. तिला येशूपर्यंत जायचे होते. येशूपर्यंत ती सुखरुप पोहंचेल की नाही हेहि तिला ठाऊक नव्हते. तो इतका दूर आहे की तो तिला बरी करील हे तिला अशक्य असे वाटत होते. परंतू तिने सर्व प्रयत्न केलेले होते, आणि केवळ येशू हाच व्यक्ति तिला मदत करु शकत होता हे तिला ठाऊक होते. मोठ्या लोकसमुदयाशी झगडली, आणि ती येशूजवळ पोहंचली. ती व्यवस्थित येशूजवळ पोहंचू शकली नाही, मात्र ती त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवू शकली. ज्या क्षणी तिने ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले, त्या क्षणी तिचा आजार बरा झाला, आणि येशूला तिचे हे सर्व कळाले. ही कथा प्रत्य़क्षपणे तुमच्याशी संबंधीत आहे.

I. प्रथम, तुम्ही आजारी आहात.

सर्व मानवजात आजारी आहे. मानवजातीस आजाराचा संसर्ग झाल्याने मानवजात स्वत:हून बदलली आहे. ह्या आजाराचा परिणाम असा की, लोक एकमेकांस इजा पोहंचवू लागले, एकमेकांचा फायदा उठवू लागले, आणि शेवटी, एकमेकांचा ऩाश करु लागले. आजारपण हे गुपित नाही. शास्त्र व इतिहास ह्यां दोहोनी ह्या आजाराचा सामना केला, तसेच तुम्ही त्यास वेगवेगळी नावें दिली. ह्या आजारांस देव पाप म्हणून ओळखतो. पापाने तुम्हांस संसर्ग केला आहे. पवित्रशास्त्र म्हणते,

“सर्वांनी पाप केले आहे, आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत” (रोम 3:23).

प्रत्येकजन पापाच्या आजाराने संसर्गित झाले आहेत. पाप जीवनभर केले जाते आणि पूर्ण होते तरी, पाप करण्यास शिकवावे लागत नाही. तुमच्यात पाप नैसर्गिकपणे वाढते आणि पसरते. तुम्ही जे कांही करता त्यावर पापाचा परिणाम होतो. ज्यावेळी तुम्ही अप्रामाणिक वागता तेव्हां तो पाप्याच्या आजाराचा पुरावा होय, तुम्ही अश्लिल चित्रे पाहाता, याचे कारण तुम्ही पापात आहात. चुकीच्या गोष्टी केल्याने तुम्ही पापी होत नाही. तुमचा पापाचा हा आजार अनुवांशिक आहे. तुम्ही पापी म्हणून जन्माला आलेले आहात. तुम्ही पापी आहात, आणि ह्याचे कारण तुम्ही पापी असल्याने चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करता. पापाने तुमचे अंत:करण दुषित केले आहे. तुम्ही एकांतात शांत असताना, ज्या गोष्टी तुम्ही करु नये अशा भयंकर गोष्टींचा विचार तुम्ही करता. तुम्हांस शक्य झाले तर ह्यापेक्षा भयंकर गोष्टीं तुम्ही कराल. फुफुस्सात श्वास जेवढ्या सोप्या रितीने होतो तेवढ्याच सोप्या रितीने तुमचे अंत:करण खोट्याचा विचार करते. तुमचे अंत:करण गुप्तपणे भयंकर वासनांना वाव देते त्याचवेळी तुम्ही एक चांगले व्यक्ति असलेचा बनाव सुद्धा करत असता. तुम्ही पापाने दुषित आहात, आणि त्यामुळे लोक स्वार्थी, फसवेगीरी करणारे, आणि दुष्ट झालेले आहेत. पवित्रशास्त्र म्हणते,

“आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहो; आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत, आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहो, आमच्या अधर्माने आम्हांस वादळांप्रमाणे उडवून दिले आहे” (यशया 64:6).

पाप एक आजारपण आहे. पापाची लक्षणे तसेच त्याचे परिणाम सुद्धा आहेत. पापाच्या परिणामाने, लोक त्यांच्या जीवनांत ब-याचदा खूप दु:खी राहतात. पापाच्या परिणामाने, लोक अपमानीत, नैराश्येत, आणि वेदनेत राहतात. क्षणात दिसलेल्या प्रतिबिंबामुळे, तुमच्या आत खोलवर तुम्हांस कधीकधी अंधकार जाणवेल. वेळो वेळी, तुम्हांस खिन्नता जाणवेल त्यामुळे तुम्हांस निष्पापपणाची कमतरता भासेल. जी सांगता येत नाही अशी पोकळी निर्माण होऊन जीवन थांबले आहे. तुमच्याकडे फक्त पापाची लक्षणें राहिली आहेत. एखाद्या वेळेस, तुम्ही स्वत:स खोल हरवून जाता, त्या स्थितीच्या गुरुत्वाने, तुम्ही मवाळ आणि हिंसक औदासिन्यतेत ओढले जाता. असा एक क्षण येतो की अशाप्रकारे तुम्हांस वाटत राहते, पण कसे तरी तुम्हांस कळते की अशा प्रकारच्या भावनेशिवाय तुम्ही फार काळ जगू शकत नाही. जसं की जगण्यास उपजत प्रतिसाद देता, तसे तुम्ही त्यावरील उपचार शोधता. आणि बाकीचे सगळे जग जसे विश्रांती घेते, तसे तुम्हीहि जगात मिळणारे उपचार शोधता.

“तेव्हां बारा वर्षे रक्तस्त्राव होत असलेली व कोणालाहि बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री” (लुक 8:43).

II. दुसरे, तुम्ही तुमच्या आजारपणावर उपचार शोधला आहात.

पापाच्या लक्षणांसाठी देऊ केलेले पुष्कळ उपचार आहेत. आनंदी आनंद राहून पापाची लक्षणें बाहेर कशी दिसणार नाहीत ह्याची दक्षता घेण्यास लोक शिकले आहेत. संपूर्ण जगात, पापाच्या लक्षणातून सुटण्यासाठी लोक अमंली पदार्थाचे सेवन करतात. कधी कधी त्यांना जीवंत असण्यात एवढा खेद वाटतो की, मग ते गोळी, किंवा सुई, किंवा बाटली ह्या माध्यामातून नशा करुन, थोड्या काळापुरते दु:ख दूर करतात. पापाच्या लक्षणातून सुटण्यासाठी, तुम्ही कदाचित जगिक आनंदात दंगून जाल. तुमच्या अमंली पदार्थांची निवड कदाचित हिरॉईन किंवा मद्य नसेल, परंतू जे कांही असेल, तो उपचार असेल, आणि ते व्यसनहि असेल.

आनंद मिळविण्यासाठी बरेच उपाय केले जातात. लोक सद्या काल्पनिक विश्वातील आनंदाच्या व्यसनाधीन झाले आहेत. बिझनेस इनसायडर मध्ये केलेल्या अभ्यासानुसार सरासरी एक व्यक्ति दिवसाला 2,000 ते 5,000 वेळा स्मार्टफोनला स्पर्श करते. तंत्रज्ञानाने देऊ केलीली माहिती, संवादात्मक दळणवळण, आणि त्याचे उदात्तीकरण हे मिळविण्यासाठी लोक व्यसनाधीन झाले आहेत. माहितीने ते इतके भरुन गेले आहेत की, त्यांना पापाच्या लक्षणांचा विचार करु वाटत नाही - जाणीव होत नाही.

तुमच्या खिशामध्ये सुद्धा स्मार्टफोन असेल. तुमचा प्रत्येक मोकळा वेळ, तुम्ही तुमच्या फोनमध्ये खर्ची करता आहात. तुम्हांला त्यातून सुटण्याची गरज आहे. तुम्हांस उपाय आहे. तुम्ही पापाच्या लक्षणांवर उपचार करता आहात, तरीहि तुम्ही त्यातून बरे होत नाही.

“तेव्हां बारा वर्षे रक्तस्त्राव होत असलेली व कोणालाहि बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री” (लुक 8:43).

तंत्रज्ञानाने तुम्ही दुस-या जगात प्रवेश कराल. ज्या जगात जन्मलेले आहात त्यापेक्षा आकर्षक जगात जाण्याची संधी तंत्रज्ञान तुम्हांला देत असेल. सोशल मिडीयाच्या संकेतस्थळावर लोक रोज तासन् तास घालवितात. स्वत:चे परिपूर्ण चित्र दाखवावे म्हणून काल्पनिक वास्तवात जतन करुन ठेवण्यासाठी, लोक स्वत:चीच दहा किंवा पंधरा किंवा वीस चित्रे घेतात. ते जे आहेत तसे असू नयेत, असे ते स्वत:ला सादर करतात. ते इतके काळजीपूर्वक चित्रावर कलाकुसर करतात व पाठवतात, की जगाने त्यांना एका परिपूर्ण अशा रुपात पाहावे.

तुमचे फेसबुक खाते आहे. तुमचे इन्स्टाग्राम खाते आहे. स्वत:च्या चित्राचा योग्य कोन व रुप निवडून पाठविण्यास, तुम्ही वेळ खर्च करता अशासाठी की, तुम्ही स्वत:ला जसे ओळखता तसे तुम्हांला जगाने पाहू नये. जर तुम्ही असे करत आहात, तर तुम्ही सुंदर आहात, तुम्ही चांगले आहात, तुम्ही पापाच्या लक्षणांनी त्रस्त नाही आहात असे कदाचित जग तुमची खात्री करुन देईल. तुम्हांला उपचार सापडला आहे, तरीहि तुम्ही बरे होत नाही.

“तेव्हां बारा वर्षे रक्तस्त्राव होत असलेली व कोणालाहि बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री” (लुक 8:43).

तुमचे जीवन किती व्यस्त झाले आहे ते ध्यानात घ्या. तुमच्या ख-या संवेदना कळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे या वास्तवातील स्थितीतून सुटण्यासाठी, तुमच्या जीवनांतील रिकाम्या वेळेचे नियोजन करा. तुमचा रिकामा वेळ सुद्धा रिकामा नाही. तुमची सदसद्विवेक बुद्धी गोंधळाने भरलेली आहे. तुम्ही दरदिवशी व्हिडीओ गेम खेळण्यास तासन् तास घालविता. तुमच्या वास्तवातील जीवनांवर काल्पनिक जगाने आक्रमण केले आहे. तुम्ही वर्गात बसलेले असता, किंवा रहदारीत अडकले असता, किंवा उपदेशात असता, तेव्हां तुम्ही घरी जाण्याचा, आणि जरा जास्त वेळ व्हिडीओ गेम खेळण्याचा विचार करता. तुमच्या जीवनांतील मवाळ व हिंसक खिन्नतेची जाणीव होण्यास, तुम्ही खूपच व्यस्त झालेले आहात. तुमच्या स्वत:च्या वास्तव परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यास, तुम्ही खूपच व्यस्त झालेले आहात.

तुम्ही संपूर्ण दिवस संगणकाच्या पडद्यासमोर घालविला आहां. एकाकी बसून मनाला जे करावेसे वाटते ते तुम्हांला करावयास आवडत नाही, त्यामुळे तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून संगणकाची संगती चालूच ठेवता. तुम्हांला ती थोड्या वेळा पुरती सुद्धा थांबवावी वाटत नाही त्यामुळे तुम्ही सतत जोडले गेले असतां. तुम्ही संगीताशी, व्हिडीओ गेमशी, इंटरनेटशी, मौजमस्ती देणा-या गोष्टीशी, इतर कशाशीहि सतत जोडले गेलेले असतां परंतू वास्तविक जीवनाशी नाही. तुम्ही पापाच्या लक्षणांस घाबरत नाही, हे तुम्ही स्वत:लाच सांगा. तुम्ही जे कांही सर्व करता ते कंटाळपणामुळे करतां. तुम्ही जे कांही करता, त्या करण्याने मजा येते, त्याची तुम्हांस गरज नसते. आणि तरीहि, किती कठीणपणे मजेच्या मागे तुम्ही जात आहां हे थांबून बघणार नाही तर, तुमच्या लक्षात येईल की तुम्ही तुमचे जीवन वाया घालवत आहां. काळजी करण्यास किंवा घेण्यास वेळ नाही, कारण तुम्ही तुमचे जीवन अगदी व्यस्त करुन ठेवले आहे. पवित्रशास्त्र म्हणते,

“कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या दोन मुठींपेक्षा शांतीने भरलेली एक मुठ पुरवली” (उपदेशक 4:6).

तुम्ही स्वत:ला सांगता की तुम्ही खूप व्यस्त असल्याने मदत करु शकत नाही. तुमच्याकडे मध्यंतरीचा काळ, आणि त्यानंतर प्रकल्प, आणि त्यानंतर नोकरी आहे. हा कधीतरी होणारा बदल नव्हे. तुम्ही असेच व्यस्त राहणार. अशाप्रकारचे जीवन असण्याची तुम्हांस गरज आहे. तुम्हांस असे कुठेतरी वाटते की, तुमच्या भविष्यात तुम्ही निराळे असणार. तुम्हांस वाटते की तुम्ही पदवीधर होणार, आणि पैसा कमाविण्यास सुरु करणार, आणि शेवटी असे कांही तरी बनणार ज्यामुळे तुम्हांला अभिमान वाटणार. तुम्ही कुठून पदवी घेतली कांही फरक पडत नाही, तुम्ही किती पैसा कमाविता कांही फरक पडत नाही, कारण तुम्ही समाधानी होणार नाही, आणि ते कधीहि पुरेसे होणार नाही. पवित्रशास्त्र म्हणते,

“तो मातेच्या उदरातून निघाला तसाच नग्न परत जाईल, आपल्या श्रमाचे काहीहि फळ आपल्याबरोबर घेऊन जाणीर नाही” (उपदेशक 5:15).

तुमच्या आशांची तुम्हांस किंमत काहीच नसणार. कितीहि पैसा, आणि परिपूर्ण नोकरी ज्याच्यासाठी तुमचा जीव तान्हेला आहे तो जगण्याचा शुद्ध अनुभव तुम्हांस देणार नाही. तुमचे जीवन तुम्हांस कधीहि समाधान देणार नाही. तुम्ही समाधानी नाही. तुम्ही पापाच्या लक्षणांने त्रस्त आहां, आणि त्यावर तुम्ही उपचार करता आहां. तुम्ही पापाच्या लक्षणांवर उपचार करता आहां, परंतू तुम्ही कधीहि बरे होणार नाही.

“तेव्हां बारा वर्षे रक्तस्त्राव होत असलेली व कोणालाहि बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री” (लुक 8:43).

कोणताहि मोठा उपचार पापास बरा करणार नाही. जगातील कितीहि मोठा आनंद पापाच्या आजारास कधीहि बरा करणार नाही. जगातील सर्व पैसा एकत्र केला तरी आरोग्य विकत घेऊ शकणार नाही. एक जुने गीत असे आहे,

एकर भरुन हिरे, सोन्याचे पर्वत,
   रुप्याच्या नद्या, अगणित दागिने,
हे सर्व मिळून तुम्हांला व मला, झोपतानाची शांति,
   किंवा मोफत मिळालेली सजगता विकत घेऊ शकत नाही.
(“एकर्स ऑफ डायमंड” आर्थर स्मिथ यांच्या द्वारा, 1959).

पापाच्या आजारपणासाठी तुम्हांस आणखी उपचाराची गरज नाही. तुम्ही एका मागून एक करता ते केवळ तुमची लक्षणें हाताळण्याठी. उपचार लक्षणें हाताळतो, परंतू आजारावर उपाय करीत नाही. तुमचे जे कांही आयुष्य आहे ते संपे पर्यंत तुम्ही उपचार चालू ठेवाल. आणि एके दिवशी, अचानक, खूप उशीर झालेला असेल. तुमचा पापाचा आजार अगदीच बळावलेला असेल, आणि तो बळावतच राहील. आता तुमचा आजार भयंकर, घातकी आणि संपवणारा झाला आहे. पापाचा आजार तुमचा नाश करणार. पवित्रशास्त्र म्हणते,

“कारण पापाचे वेतन मरण आहे; पण देवाचे कृपादान आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे”
   (रोम 6:23).

तुमच्या पापाच्या आजारातून बरे होण्याची आवशक्यता आहे. तुम्हांला फक्त बरे होण्याची आवशक्यता आहे. तुम्हांला येशू ख्रिस्ताची आवशक्यता आहे.

III. तिसरे, तुमचा पापाचा आजार बरा होण्यासाठी येशू आहे.

तुमचा पापाचा आजार बरा होण्यासाठी वरवरचा नव्हे खोलवरचा उपचार केला पाहिजे. ज्याप्रकारे आपल्या ह्या उता-यातील स्त्रीने केला, तुमच्या उपचारापासून दूर गेले पाहिजे, आणि येशूकडे वळले पाहिजे.

“तेव्हां बारा वर्षे रक्तस्त्राव होत असलेली व कोणालाहि बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्त्राव [थांबला]” (लुक 8:43-44).

या स्त्रीने तिला जे शक्य होते ते सर्व केले, आणि येशूकडे जाई पर्यंत, ती कशानेहि बरी झाली नाही. पुष्कळांनी प्रयत्न केला, कोणीहि तिचा आजार बरा करु शकला नाही. तीने तिची शेवटची साहसी आशा धरली, आणि येशूने तिला बरे केले. पापाचा आजार बरा करणारा केवळ येशू आहे. केवळ येशू पापाचा आजार बरा करु शकतो, कारण केवळ येशूच तुमच्या पापाकरिता मरण पावला आहे. सर्वप्रकारे येशू परिपूर्ण आहे. येशू निष्कलंक, निर्दोष कोकरा आहे, ज्याने आपल्या शरीरावरुन वधस्तंभापर्यंत तुमचे पाप वाहून नेले. तुमच्या पापाबद्दल दंड भरण्याकरिता त्यालावधस्तंभावर खिळले. येशूने सांडलेले रक्त हे तुमच्या पापावरचा उतारा आहे. पवित्रशास्त्र म्हणते,

“खरोखर आमचे व्याधि त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्यावर प्रहार केलेले व त्याला पीडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हांस शांति देणारी अशी शिक्षा त्यांस झाली; त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हांस आरोग्य प्राप्त झाले” (यशया 53:4-5).

येशूने हे सर्व केले आहे कारण तो तुम्हांवर प्रेम करतो. येशू वधस्तंभावर मेला कारण तुमच्या पापाचा आजार बरा व्हावा. तुम्ही पापी आहांत. तुम्ही उपचार करुन पाहिला आहांत. त्या उपचाराने तुमचा पापाचा आजार बरा झाला नाही. कोणत्याहि उपचाराची मात्रा तुम्हाला बरे करणार नाही. तुम्ही पापाचा असाध्य रोगाने त्रस्त आहांत. तुम्हांस पटले पाहिजे की तुम्ही आजारी आहांत. तुम्ही आजारी आहांत हे जोवर तुम्हांस समजत नाही, तोवर तुमच्यात पापाची लक्षणें नाहीत हे सिद्ध होऊन तुम्हांला बरे व्हायची गरज नाही याची खात्री तुम्हांस होईल. परंतू तुम्हांला बरे होण्याची आवशक्यता आहे. येशू म्हणाला,

“निरोग्यास वैद्याची गरज नसते, तर रोग्यांस असते; मी नीतिमानांस नव्हे तर पाप्यांस बोलावयास आलो आहे”
   (मार्क 2:17).

तुमच्या पापाच्या आजाराचे वास्तव तुम्ही पाहिले आणि जाणविले पाहिजे. एकदा का तुम्हांला ते जाणवले, मग दुस-या कोणत्या उपचाराकडे वळू नका, बरे होण्यासाठीच वळा. पापाच्या लक्षणांना झाकू नका, आणि येशूकडे वळा. तुम्हांस पापातून फक्त येशूच वाचवू शकतो. येशू देऊ करत असलेले तारण आपण मिळवू शकत नाही. स्त्रीला आरोग्य मिळाले, पापाची क्षमा मिळाली, आणि येशूकडून तारण मिळाले. तिच्या आरोग्यासाठी तिने कांहीहि मोबदला दिला नाही. बरे करण्यासाठी तिला येशूला पटवावे लागले नाही. ती येशूपर्यंत पोहंचेल की नाही असे वाटत होते, पण ती तशीच त्याच्यापर्यंत पोहंचली. ती येशूपर्यंत पोहंचली, आणि तिने त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले, आणि विश्वासाने तिचे तारण झाले! तुम्ही येशूपर्यंत पोहंचू शकला नाही तरी, त्याच्याजवळ पोहंचण्याचा प्रयत्न करा! तुम्ही बरे होणार नाही असे जरी वाटले तरी येशूकडे जा, विश्वासाने ख्रिस्तापर्यंत पोहंचा, आणि तो तुमचे तारण करील! विश्वासाने येशूकडे जा, आणि तो तुमचे तारण करील! येशूवर विश्वास ठेवा, आणि पापाच्या आजारातून बरे व्हा. आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन मि. नोवा साँग यांनी केले : लुक 8:43-48.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायन मि. बेंजामिन किनकैड ग्रीफ्फीथ साँग यांनी केले :
“टर्न युवर आय अपॉन जीजस” (हेलन एच.लीम्मेल द्वारा, 1863-1961).
“Turn Your Eyes Upon Jesus” (by Helen H. Lemmel, 1863-1961).


रुपरेषा

मवाळ व हिंसक औदासिन्य (खिन्नता)

A SOFT AND VIOLENT SADNESS

मि. जॉन सॅम्युएल कागन यांच्याद्वारा
by Mr. John Samuel Cagan

“तेव्हां बारा वर्षे रक्तस्त्राव होत असलेली व कोणालाहि बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्त्राव [थांबला]”
   (लुक 8:43-44).

I.    प्रथम, तुम्ही आजारी आहांत, रोम 3:23; यशया 64:6.

II.   दुसरे, तुम्ही तमच्या आजारपणावर उपचार शोधला आहांत,
उपदेशक 4:6; 5:15; रोम 6:23.

III.  तिसरे, तुमचा पापाचा आजार बरा होण्यासाठी येशू आहे,
यशया 53:4-5; मार्क 2:17.