Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




स्वतः ख्रिस्त येशू

JESUS CHRIST HIMSELF
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सचे बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे प्रभूवारी सकाळी,
12 एप्रिल, 2015 रोजी दिलेला उपदेश
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, April 12, 2015


मला व माझी पत्नी एलिनासाठी हा महान दिवस आहे. आम्हां दोघांचेही वाढदिवस आज साजरे केले जात आहेत. हा विशेष दिवस, 12 एप्रिल, माझा चौ-याहत्तरवा वाढदिवस आहे. तसेच आज 1958 साली मला पाचारण झालेच्या सेवेचा सत्तावनवा वाढदिवस आहे. परंतू, सर्वात महत्वाचे म्हणजे, हा आमच्या मंडळीसाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. बरोबर चाळीस वर्षापूर्वी युसीएलए (UCLA) तील कांही ब्लॉक, अर्थात पश्चिम लॉस एंजिल्स येथील महान विद्यापीठापासून, वेस्टवुड व विल्शायर बोलीवर्डच्या चौकातील, माझ्या अपार्टमेंटमध्ये सहा किंवा सात तरुणांबरोबर मी माझ्या सेवेला सुरुवात केली. त्या दोन व्यक्ति आजही येथे आहेत, मि. जॉन कुक व मी. चाळीस वर्षानंतर — आज या सकाळी देवाच्या कृपेने, जॉन व मी येथे हजर आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुति असो!

ही मंडळी चाळीस वर्षाच्या संकटातून उभी राहीली आहे. जसे की इस्राएलच्या लेकरांनी चाळीस वर्षे अरण्यात घालविली, त्याचप्रमाणे ही मंडळी पुष्कळ कठीण प्रसंग, पुष्कळ जाच, आणि पुष्कळ प्रतिकूल परिस्थीतितून मार्ग काढीत उभी आहे. आज मी त्या रात्री संबंधाने अधिक सांगणार आहे. परंतू येथे लॉस एंजिल्सच्या नागरी मध्यवस्तीमध्ये शुभवार्ता गाजविणारी मंडळी आपणांजवळ आहे. आणि आपणांस ठाऊक आहे की, आपल्या सर्व छळामध्ये, देव आपणांबरोबर आहे आणि आज आपल्या मंडळीचा चाळीसावा वर्धापन, दिन साजरा करण्यास हा विजय दिला आहे! प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुति असो!

काल रात्रीच्या आपल्या प्रार्थना सभेमध्ये पास्टर रॉजर हॉफमॅन बोलले. ते आजही आपल्या वर्धापन दिनाच्या सभेत बोलणार आहेत. आज सकाळच्या सभेत बोलण्याची मी विनंती केल्यावर त्यानी नकार दिला. ते म्हणाले, “डॉ. हायमर्स, रविवारच्या सकाळी तुम्ही बोलतांना मला ऐकायचे आहे.” त्यानंतर, मी काय सांगावे यासाठी प्रार्थना करीत असतांना, ऑगष्ट, 2010 मध्ये मी दुस-या एका बाप्टिस्ट मंडळीत दिलेला उपदेश पुन्हां सांगावा असे मला आत्म्याने सुचविले. तुम्ही माझ्याबरोबर इफिसकरांस पत्र, अध्याय दुसरा उघडा. स्कोफिल्ड अध्ययन पवित्रशास्त्राच्या पृष्ठ 1251 वर आहे. मी इफिस 2:19; 20 वाचतांना आपण उभे राहा,

“तर ह्यावरुन तुम्ही आतापासून परके व उपरी नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरीक व देवाच्या घरचे आहांत; प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहांत; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे” (इफिस 2:19, 20).

आपण खाली बसू शकता.

येथे प्रेषित पौल आपणांस सांगत आहे की मंडळी ही देवाच्या घरची अशी आहे. त्यानंतर तो सांगतो की ही मंडळी प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर रचली गेली आहे, परतूं स्वतः ख्रिस्त येशू हा “मुख्य कोनशिला” आहे. डॉ. जे. वरनॉन मॅक गी म्हणाले याचा अर्थ “ख्रिस्त तो खडक आहे ज्यावर मंडळी उभारली आहे” (थ्रु द बायबल, आवृत्ती V, थॉमस नेल्सन, पृष्ठ 241, इफिस 2:20 वरील टिपण्णी). डॉ. ए. टी. रॉबर्टसन म्हणाले, “अक्रोगोनईस...पायाचा प्रथम खडक” (वर्ल्ड पिक्चर्स, ब्रॉडमॅन, 1931; इफिस 2:20 वरील टिपण्णी). स्वतः ख्रिस्त येशू हा आपल्या सर्व कार्याचा व आपल्या सर्व जीवनाचा पाया आहे. “स्वतः ख्रिस्त येशू” हा आपल्या मंडळीचा प्रथम पाया आहे. आज सकाळी मी इफिस 2:20 वचनातील शेवटचे शब्द आपला उतारा म्हणून घेत आहे.

“स्वतः ख्रिस्त येशू” (इफिस 2:20).

स्वतः ख्रिस्त येशू ह्या उपदेशाचा विषय आहे. स्वतः ख्रिस्त येशू इतका ख्रिस्ती विश्वासातील गाभा अद्भूत नाही. येशू ख्रिस्ता सारखा कोणी नव्हता व कोणी नसणार. मानवी इतिहासात तो एकमेवाद्वितिय असा आहे. स्वतः ख्रिस्त येशू देव-मनुष्य आहे. स्वतः ख्रिस्त येशू स्वर्गातून खाली उतरला व त्याने मानवांत वसति केली. आपल्या पापाकरिता स्वतः ख्रिस्त येशूने दुःख सोसले, रक्त सांडले आणि मरण पावला. आपल्या नीतिमत्वाकरिता स्वतः ख्रिस्त येशू शरीराने मरणातून उठला. स्वतः ख्रिस्त येशू स्वर्गात चढला व प्रार्थनेत आपल्याकरिता रदबदली करण्यास देवाच्या उजवीकडे तो बसला आहे. एक हजार वर्षाकरिता आपले राज्य प्रस्थापित करण्यासाठी पुन्हां स्वतः ख्रिस्त येशू परत येणार आहे. तो स्वतः ख्रिस्त येशू आहे! चला आपण उभा राहून ते समुहगीत गाऊया!

केवळ येशू, मला त्याला पाहू द्या,
   केवळ येशू शिवाय, कोणीही त्याला वाचवित नाही,
त्यानंतर माझे गीत हे सदासर्वकाळ असेल –
   केवळ येशू! येशू!
(“केवळ येशू, मला त्याला पाहू द्या” डॉ. ओसवाल जे. स्मिथ, 1889-1986).

आपण खाली बसू शकता.

स्वतः ख्रिस्त येशू हा विषय इतका खूप खोल, खूप खठीण, आणि खूप महत्वाचा आहे की जो एका उपदेशात कधीही स्पष्ट करु शकत नाही. स्वतः ख्रिस्त येशू ह्या विषयासंबंधाने आज सकाळी कांही मुद्दयांना केवळ आपण स्पर्श करु.

I. प्रथम, स्वतः ख्रिस्त येशू मनुष्यांकडून तुच्छ मानला व नाकारला गेला.

सुवार्तिक संदेष्टा यशया हे स्पष्ट करतांना म्हणाला,

“तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशानी व्यापलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही (यशया 53:3).

डॉ. टोरी म्हणाले, “येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास अपयशी ठरणे हे दुर्दैव नसून ते पाप, जाचक पाप, भयंकर पाप, धिक्कारलेले पाप आहे” (आर. ए. टोरी, डी.डी., ख्रिस्तासाठी कसे काम करणे, फ्लेमिंग एच. रिवेल कंपनी, एन. डी., पृष्ठ 431). यशया संदेष्ट्याने ख्रिस्ताला तुच्छ लेखणे व नाकारण्याच्या पापाचे वर्णन केले आहे, आंतरिक दुष्टपणामुळे ख्रिस्तापासून पापी लोक आपली तोंडे फिरवित. मनुष्यांचा एकूणात दुष्टपणाचा मोठा पुरावा हा की ते स्वतः ख्रिस्त येशूबद्दल त्यांनी संकोचित विचार केला. मनुष्यांने जाणीवपूर्क व नेहमीप्रमाणे त्याच्यापासून आपली तोंडे फिरविली हा दुष्टपणाचा मोठा पुरावा आहे त्यामुळे पापी मनुष्य जो अनंतकालीन अग्नीच्या सरोवराच्या दंडास पात्र आहे.

परिवर्तन न झालेल्या स्थितीत मनुष्य स्वतः ख्रिस्त येशूला तुच्छ लेखतो. ते त्यांच्या पूर्ण दुष्टपणात, स्वतः ख्रिस्त येशूला मानीत नाही. जोवर तुमच्या सद्सदविवेकास टोचणी नाही, जोवर तुम्हांला तुमच्या पापाची जाणीव होत नाही, जोवर देवासंबंधाने तुमचे अंतःकरण मृत आहे, तोवर तुम्ही स्वतः ख्रिस्त येशूला तुच्छ लेखणार व त्याला नाकारणार.

आपल्या मंडळीत आपण पाहतो की ते चौकशी खोलीत, उपदेशानंतर होते आहे. लोक पुष्कळ गोष्टीविषयी सांगतांना आपण ऐकतो. ते पवित्रशास्त्रातील वचनांसंबंधाने बोलतात. ते ही गोष्ट व ती गोष्ट याची “जाणीव” होण्यासंबंधाने बोलतात. त्यांना काय वाटते आणि त्यांनी काय केले यासंबंधाने आपणांस सागंतात. “त्यानंतर आम्ही येशूकडे आलो” असे म्हणून शेवट करतात. झाले सर्व! ते येशूविषयी याहून अधिक कांही शब्द बोलू शकत नाहीत! स्वतः ख्रिस्त येशूविषयी बोलण्यास त्यांच्याकडे शब्द नसतात! त्यांचे कसे काय तारण होईल?

महान स्पर्जन म्हणाले, “स्वतः ख्रिस्ताला शुभवर्तमानातून काढून टाकण्याची घाणेरडी सवय मनुष्यांजवळ आहे” (सी. एच. स्पर्जन, दुष्ट दरवाजा भोवती, पिलग्रिम पब्लिकेशन्स, पुनर्मुद्रण 1992, पृष्ठ 24).

तारणची योजना समजावून घेऊन कोणाचेही तारण होत नाही! अधिक पवित्रशास्त्राचा अभ्यास करुन तुमचे तारण होत नाही! अधिक उपदेश ऐकून तारण होत नाही! पापाबद्दल खेद वाटल्याने तारण होत नाही! त्यामुळे यहुदाचे तारण झाले, नाही का? तुमचे जीवन समर्पित करुन तारण होत नाही! तुम्ही अश्रू गाळल्याने तुमचे तारण होत नाही! तुम्हांला कशाचीही मदत होणार नाही जोवर तुम्ही येशू ख्रिस्ताला तुच्छ लेखणे व त्याला नाकारणे थांबविणार नाही — जोवर तुम्ही तुमचे तोंड त्याच्यापासून फिरविण्याचे थांबविणार नाही — जोवर तुम्ही स्वतः ख्रिस्त येशूकडे आकर्षिले जात नाही! ते गीत पुन्हां म्हणूया!

केवळ येशू, मला त्याला पाहू द्या,
    केवळ येशू शिवाय, कोणीही त्याला वाचवित नाही,
त्यानंतर माझे गीत हे सदासर्वकाळ असेल –
    केवळ येशू! येशू!

आपण खआली बसू शकता,

II. दुसरे, संपूर्ण पवित्रशास्त्राचा स्वतः ख्रिस्त येशू हा मुख्य विषय आहे.

स्वतः ख्रिस्त येशू हा तुमच्या विचाराच्या केंद्रस्थानी असला पाहिजे हे तुम्हांला सांगणे असंयुक्तिक आहे का? नाही, हे असंयुक्तिक नाही. का, याचा विचार करा, उत्पत्ती ते प्रकटीकरण — संपूर्ण पवित्रशास्त्राचा स्वतः ख्रिस्त येशू हा विषय आहे! ख्रिस्त मरणातून उठल्यानंतर तो अम्माऊसकडे जातांना वाटेवर दोन शिष्यांना भेटला. त्याने त्यांना जे कांही सांगितले ते आजही लागू पडते.

“मग तो त्यांना म्हणाला, ‘अहो निर्बुद्ध व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीविषयी विश्वास धरण्यास मतिमंद अशा माणसांनो! ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे, ह्याचे अगत्य नव्हते काय?’ मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे ह्यांच्यापासून आरंभ करुन संपूर्ण शास्त्रलेखांतील आपणाविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला ” (लुक 24:25-27).

मोशेच्या पाच पुस्तकातून, आणि संपूर्ण पवित्रशास्त्रातून, “त्याच्याविषयीच्या सर्व शास्त्रलेखाचा” ख्रिस्ताने त्यांना अर्थ सांगितला. काय चांगले असू शकते? संपूर्ण पवित्रशास्त्राचा मुख्य विषय हा स्वतः ख्रिस्त येशू आहे! जर संपूर्ण पवित्रशास्त्राचा मुख्य विषय हा स्वतः ख्रिस्त येशू आहे, तर तुमच्याकरिता तुमच्या विचाराचा व जीवनाचा मुख्य विषय असणे संयुक्तिक नाही का? मी तुम्हांला सांगतो, ह्या सकाळी स्वतः येशू ख्रिस्त याविषयी खोलवर विचार करा! हे गा!

केवळ येशू, मला त्याला पाहू द्या,
   केवळ येशू शिवाय, कोणीही त्याला वाचवित नाही,
त्यानंतर माझे गीत हे सदासर्वकाळ असेल –
   केवळ येशू! येशू!

मी विश्वास करतो की, ख-या परिवर्तनामध्ये, स्वतः ख्रिस्त येशूला जाणणे, हे तुमच्या बाबतीत आजवर घडलेली सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतः येशू ख्रिस्तावर ख-या अर्थाने विश्वास ठेवत असाल तर तुम्हांला थोड्या समुपदेशाची गरज आहे. मला विश्वास आहे की येशू ख्रिस्ताचे खरे ज्ञान झालेने 90% ख्रिस्ती समुपदेशन गरज संपते! ख-या परिवर्तनामध्ये, जेव्हां एखादा व्यक्ति ख्रिस्ताला ओळखतो, तेव्हां त्याला ख्रिस्त सापडतो,

“...[तो] देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरुन प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे” (I करिंथ 1:30).

जर आपण मंडळ्यामधून “निर्णायकता” वर मात केली, जर आम्ही खात्रीशीर ख्रिस्ताकरिता परिवर्तित झालेले लोक आहोत, तर सध्या मंडळ्याधून जे समुदेशन केले जाते 90% नाहीसे होईल! स्वतः येशू ख्रिस्त ह्याला तुमचा समुदेशक होऊ द्या! हे गीत गाऊया!

केवळ येशू, मला त्याला पाहू द्या,
   केवळ येशू शिवाय, कोणीही त्याला वाचवित नाही,
त्यानंतर माझे गीत हे सदासर्वकाळ असेल –
   केवळ येशू! येशू!

III. तिसरे, स्वतः येशू ख्रिस्त हा शुभवर्तमानाचा सुवास, केंद्रीय गाभा, मुख्य ह्दय आहे.

यशया संदेष्टा स्वतः येशू ख्रिस्ताला शुभवर्तमानाते ह्दय असे संबोधतो,

“आम्ही मेंढराप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हां सर्वांचे पाप त्याच्यावर लादले” (यशया 53:6)

“परमेश्वराने आम्हां सर्वांचे पाप त्याच्यावर लादले.” ख्रिस्ताचे बदली, प्रायश्चितरुपी मरण, हे तुमच्य़ा जागी, तुमच्या जागी खंडणी भरत आहे व देवाचा क्रोध सहन करीत आहे — आणि तेच शुभवर्तमानाचे ह्दय आहे! तो स्वतः येशू ख्रिस्त आहे जो त्या गेथशेमानेच्या अंधारात तुमचे पाप घेत आहे. स्वतः येशू ख्रिस्त त्या बागेत, तो म्हणाला,

“माझ्या जिवाला मरणप्राय अति खेद झाला आहे” (मार्क 14:34).

तोच स्वतः येशू ख्रिस्त आहे जो,

“मग अत्यंत विव्हळ...होऊन त्याने आग्रहाने प्रार्थना केली, तेव्हां रक्ताचे मोठेमोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता” (लुक 22:44).

स्वतः येशू ख्रिस्त त्या गेथशेमाने बागेत त्याला करण्यात आली. तो स्वतः येशू ख्रिस्त आहे. स्वतः येशू ख्रिस्त ज्याला सन्हेदरीनच्या समोर, तोंडावर मारले, चेष्टा केली आणि लाज आणली. स्वतः येशू ख्रिस्ताच्या तोंडावर ते थुंकले! स्वतः येशू ख्रिस्ताच्या दाढीचे केस त्यांनी उपटले. स्वतः येशू ख्रिस्त ज्याला पंत पिलातासमोर उभे केले, त्याच्या पाठीवर रोमी चाबकाने फटके मारले, त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला, स्वतः येशू ख्रिस्ताच्या कपाळावरुन आशिर्वादीत रक्त ओघळत त्याच्या चेह-यावर आले, त्याचे तोंड ओळखण्याच्या पलीकडे त्याला मारले,

“त्याचा चेहरा... मनुष्याच्या चेह-यासारखा नव्हता, त्याचे स्वरुप मनुष्यजातीच्या स्वरुपासारखे नव्हते इतका तो विरुप होता” (यशया 52:14).

“त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले” (यशया 53:5).

तोच तो स्वतः येशू ख्रिस्त होता ज्याला पिलाताच्या न्यायालयातून, त्याचा वधस्तंभ खांबी देण्याच्या ठिकाणापर्यंत वाहून न्यावा लागला. तोच तो स्वतः येशू ख्रिस्त होता ज्याला त्या शापीत झाडावर खिळे मारुन टांगले. स्वतः येशू ख्रिस्ताने केवळ हाता पायात मारलेल्या खिळ्याचे दुःख सहन केले नाही — तर ज्यावेळी त्याच्यावर “आपणां सर्वांचे पाप त्याच्यावर लादले” (यशया 53:6) ते दुःख फार भयंकर मोठे होते. स्वतः येशू ख्रिस्ताने “तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली” (I पेत्र 2:24). डॉ. वॅट्स म्हणाले,

त्याचे मस्तक, त्याचे हात, त्याचे पाय, पाहा,
   दुःख आणि प्रेम एकत्र मिसळून खाली वाहिले:
हे प्रेम व दुःख एकत्र आले,
   वा काट्यानी सुंदर मुकुट विनला काय?
(“जेव्हां मी अद्भूत वधस्तंभाचे सर्वेक्षण केले” यांच्याद्वारा इसाक वॅट्स, डी.डी., 1674-1748).

उभे राहूया व गाऊया! आता आपले समुहगीत गाऊया!

केवळ येशू, मला त्याला पाहू द्या,
   केवळ येशू शिवाय, कोणीही त्याला वाचवित नाही,
त्यानंतर माझे गीत हे सदासर्वकाळ असेल –
   केवळ येशू! येशू!

आपण खाली बसू शकता.

IV. चौथे, स्वतः येशू ख्रिस्त हा अनंतकाळच्या आनंदाचा एकमेव स्त्रोत आहे.

त्यांनी येशूचे पार्थिव शरीर वधस्तंभावरुन खाली उतरले व बंदिस्त कबरेत ठेवले. परंतू तिस-या दिवशी, तो मरणातून दैहिकरितीने पुनरुत्थित झाला! मग तो आपल्या शिष्यांकडे आला व म्हणाला, “तुम्हांबरोबर शांति असो” (योहान 20:19).

“असे बोलून त्याने आपले हात व कूस त्यांना दाखविली; तेव्हां प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला” (योहान 20:20).

“तेव्हां प्रभूला पाहून शिष्यांना आनंद झाला” (योहान 20:20). स्वतः येशू ख्रिस्ताने त्यांना आनंद दिला “तेव्हां प्रभूला पाहून.” स्वतः येशू ख्रिस्ताला तुम्ही जाणत नाही, तोवर तुम्हांला खोल शांति व प्रभूचा आनंद कधीही प्राप्त होणार नाही!

ओ, मी आज सकाळी तुम्हांस सांगतो – जेव्हां स्वतः येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तो क्षण मला आठवतो! किती पवित्र तो अनुभव! त्याच्याकडे मी धावत गेलो! किंवा, नव्हे, असे वाटते तोच माझ्याकडे धावत आला. त्याच्या मोलवान रक्ताने माझे पाप धुऊन शुद्ध झाले! देवाच्या पुत्रामुळे मी जीवंत झालो! ते समुहगीत गाऊया!

केवळ येशू, मला त्याला पाहू द्या,
   केवळ येशू शिवाय, कोणीही त्याला वाचवित नाही,
त्यानंतर माझे गीत हे सदासर्वकाळ असेल –
   केवळ येशू! येशू!

आपण खाली बसू शकता.

स्वतः य़ेशू ख्रिस्ताकडे या! तुमच्या जीवनातून आपल्या तारकाला घालवून देऊ नका. तुमच्या साक्षीमधून त्याला सोडू नका. स्पर्जन जसे म्हणतात की “शुभवर्तमानामधून स्वतः ख्रिस्ताला वगळण्यासाठी...वाईट सवयी” प्रमाणे वागू नका. नाही! नाही! आताच स्वतः येशू ख्रिस्ताकडे या. मी हे गीत गात असतांना काळजीपूर्वक गीत ऐका.

जसा मी आहे, विनवणी न करता
   पण तुझे रक्त माझ्याकरिता संडले गेले,
आणि पैज लावतो की मी तुझ्याकडे येतो,
   हे देवाच्या कोकरा, मी येतो! मी येतो!
(“जसा मी आहे” शार्लोट इलियोट, 1789-1871)

तुमच्या पापाचा दंड भरण्यासाठी स्वतः येशू वधस्तंभावर मरण पावला. सर्व दुष्कर्मापासून शुद्ध करण्यासाठी त्याने त्याचे पवित्र रक्त सांडले. येशूकडे या. त्याच्यावर विश्वास ठेवा व तो तुमच्या सर्व पापापासून शुद्ध करु तारण देईल. आमेन.


जेव्हां तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना र्इ-मेल पाठवाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. जर तुम्ही ह्या उपदेशामुळे आशिर्वादीत झाला आहात तर डॉ. हायमर्स यांना र्इ-मेल करा अथवा त्यांना सांगा, परंतू तुम्ही कोणत्या देशातून लिहीत आहां ते नेहमी सांगा. डॉ. हायमर्स यांचा र्इ-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे. (येथे क्लिक करा) . तुम्ही डॉ. हायमर्स यांना कोणत्याहि भाषेतून लिहू शकता, परंतू तुम्हांस शक्य असल्यास इंग्रजीत लिहा. तुम्ही डॉ. हायमर्स यांना पत्राद्वारे लिहीत आहां तर त्यांचा पत्ता आहे. P.O. Box 15308, los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना (818)352-0452 ह्या क्रमांकावर दूरध्वनी करू शकता.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवडी डॉ. हायमर्स यांचे उपदेश इंटरनेटवर वाचू शकता.
www.sermonsfortheworld.com वर
“मराठीतील उपदेश” असे क्लिक करा.

ह्या अनुवादीत उपदेशाची नकल करता येते. तुम्ही हे डॉ.हायमर्सच्या अनुमती शिवाय वापरू शकता.
मात्र डॉ. हायमर्सचे सर्व व्हिडीओ, आमच्या मंडळीतील व्हिडीओवरील सर्व उपदेश अनुमती शिवाय
नकल करता येणार नाही.

उपदेशापूर्वी शास्त्रभाग वाचन मि. आबेल प्रुढोम यानीं वाचला: यशया 53:1-6.
उपदेशापूर्वी एकेरी गीत गायलेः
“जेव्हां सकाळी आकाश प्रकाशमान होते” (जर्मनीतून अनुवादित केले आहे एडवर्ड कासवाल यांच्याद्वारा, 1814-1878).


रुपरेषा

स्वतः ख्रिस्त येशू

JESUS CHRIST HIMSELF

जॉ. आर. एल हायमर्स (ज्युनि.) यांच्याद्वारा

“स्वतः येशू ख्रिस्त” (इफिस 2:20).

I.   स्वतः ख्रिस्त येशू मनुष्यांकडून तुच्छ मानला व नाकारला गेला, यशया 53:3.

II.  दुसरे, संपूर्ण पवित्रशास्त्राचा स्वतः ख्रिस्त येशू हा मुख्य विषय आहे, लुक 24:25-27:
I करिंथ 1:30.

III. तिसरे, स्वतः येशू ख्रिस्त हा शुभवर्तमानाचा सुवास, केंद्रीय गाभा, मुख्य ह्दय आहे, यशया 53:6; मार्क 14:34; लुक 22:44; यशया 52:14; 53:5; I पेत्र 2:24.

IV. चौथे, स्वतः येशू ख्रिस्त हा अनंतकाळच्या आनंदाचा एकमेव स्त्रोत आहे.
योहान 20:19, 20.