Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
खरे परिवर्तन - 2015 प्रकाशन

REAL CONVERSION – 2015 EDITION
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स, जुनियर व्दारे.
by Dr. R. L. Hymers, Jr.

4 जानेवारी, 2015, बॅप्टीस्ट टेबरनॅकल ऑफ लास एंजलेस लोर्डस डे मोरनिंग,
मध्ये प्रसारीत झालेला उपदेश
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord's Day Morning, January 4, 2015

“मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” (मत्तय 18:3).


येशु स्पष्टपणे म्हणला, “तुमचा पालट (परिवर्तन) झाल्याशिवाय… स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.” तर, त्याने पूर्णपणे स्पष्ट केले की तुम्हाला परिवर्तनाचा अनुभव आलाच पाहिजे. तो म्हणाला की, तुम्ही जर परिवर्तनाचा अनुभव घेतला नाही तर “तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणारच नाही.”

आज सकाळी मी तुम्हाला सांगणार आहे की जो ख-या तारणाचा अनुभव घेतो त्या व्यक्ती बरोबर काय होते. लक्ष द्या मी म्हणालो “खरा” परिवर्तन. “पाप्याची प्रार्थना” ह्याचा वापराने, आणि निश्चयवादाचे इतर प्रकारांमुळे लक्षवादी लोकांना फक्त खोट्या परिवर्तनाचा अनुभव आला आहे.

माझ्या पत्नीला धरुन आमच्या मंडळीमध्ये काही लोक आहेत, ज्यांनी प्रथमच शुभवर्तमानाचा प्रचार होताना ऐकला आणि परिवर्तीत झाले. हे पौढ होते जे शुभवर्तमान ऐकण्याआधी जीवनाच्या परिस्थीतीशी चांगले तयार होते. त्यांमधला कोणीही लहान लेकरु नव्हता. आमच्या खरे परिवर्तीतांमधील बहुतेक तरुण पौढ आहेत जे शुभ संदेश काहिक महिने (वर्षे देखील) एकल्यावर ख्रिस्ताकडे आले. स्पर्जन म्हणाले “पहिल्या नजरेत विश्वास अशी देखील कोणती गोष्ट असु शकते, परंतु सहसा विश्वासावर आम्ही ट्प्या-ट्प्यांनीच पोहोचलो आहोत.” (सी.एच.स्पर्जन, अराऊंड द विकेट ग्रेट, पिलग्रीम प्रकाशन, 1992 पुनरछाप, P.57). पुढील “टप्प्यातुन” बहुतेक लोक जातात.

I. प्रथम, तुम्ही मंडळीमध्ये परीवर्तीत होण्याऐवजी इतर काही कारणांनी येतात.

तुमच्या विषयी काय? तुम्ही एकटे होता म्हणुन तुम्ही मंडळीमध्ये आलात का - किंवा तुमच्या पालकांनी लेकरु या नात्याने तुम्हाला आणिले? जर आज सकाळी तुम्ही एक लहान लेकरु ज्याप्रकारे मंडळीत संगोपीत होत त्याप्रमाणे असाल तर, ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही परिवर्तित आहात. किंवा तुम्ही माझ्या सारखे आला आहात का? कारण तुम्ही एकटे होता आणि कोणीतरी तुम्हाला बोलावीले आणि ते लोक तुमच्याशी फार चांगले होते. जर असे असेल तर याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही परिवर्तित आहात. मला चुकीच समजु नका. मला आनंद होत आहे की तुम्ही येते आहात - ते मंडळीच्या लेकरांप्रमाणे सवयबध्द असो वा माझ्यासारखे जेव्हा मी तेरा वर्षाचा होतो, एकटेपण हा तुमचा कारण असु शकतो. हे मंडळीत येण्याकरीता समजु शकणारे कारणे आहेत – परंतु त्याने तुमचे तारण होणार नाही. तारणाकरिता तुम्हाला ख-या परिवर्तनाची गरज आहे. नक्कीच तुम्हाला येशुकडुन तारण हवे असेल तेच “योग्य” कारण आहे - एकमात्र कारण जे तुम्हाला पापी जीवनापासुन तारील.

हे वाईट नाही की, येथे सवयबध्द किंवा एकटेपणामुळे असणे. हे योग्य कारण नाही. परिवर्तित होण्याकरीता तुम्हाला देखील आणखी काहीतरी हवे असेल आणि ते फक्त ह्याकरीता नव्हे की मंडळीत येण्याकरीता बरे वाटावे.

II. दुसरे, तुम्ही जाणुन घेण्यास सुरुवात करीता की खरोखर देव आहे.

तुम्ही मंडळीत येण्याआगोदर तुम्हाला लक्षात आले असेल की देव अस्तित्वात आहे. परंतु बहुतेक लोकांचा जोपर्यंत शुभ वर्तमानाशी सामना होत नाही तो पर्यंत त्यांचा विश्वास अंधुक आणि अस्पष्ट असतो. जर तुम्हाला कोणी येथे आणले असेल, तर तुमच्या बाबतीत देखील कदाचीत तसेच असु शकते.

जर तुमचे मंडळीमध्ये संगोपन झाले असेल, तर तुम्हाला शास्त्रलेखाविषयी भरपुर काही माहीत असेल. तुम्ही सोप्यारीत्या पवित्रशास्त्रात संदर्भ शोधु शकता. तुम्हाला तारणाची योजना ठाऊक आहे. तुम्हाला पवित्रशास्त्रातील बरेचसे वचने आणि स्तोत्रे ठाऊक असतील. तरी देखील देव तुम्हाला काल्पनिक आणि अस्पष्ट आहे.

तर जरी तुम्ही मंडळीतले लेकरु असाल किंवा नवीन व्यक्ती, काहीतरी होण्यास सुरुवात होते. तुम्हाला हे जाणवत की खरोखर देव आहे - फक्त देवाविषयी बेलणे नाही. तर देव तुमच्याकरीता एक खरा जवळीक व्यक्ती बनतो.

मी एक लहान मुल असल्याकारणाने देवावर माझा अंधुक आणि अस्पष्ट असा विश्वास होता. परंतु मी ह्याविषयी जागृत नव्हतो की “देव महान आणि भयानक” देखील आहे (नेहम्या 1:5) पवित्रशास्त्रातला जो पर्यंत मी 15 वर्षाचा नाही झालो - दोन वर्षापेक्षा जास्त मी माझ्या शेजा-यांबरोबर बॅप्टीप्ष चर्चला जात असे. ज्या दिवशी माझ्या आजीला पुरण्यात आले, मी धावत जाऊन स्मशानात घामाघुम होऊन पडलो. अचानक देव खाली माझ्यावर आला - आणि मला समजले की तो खरा आहे, आणि सर्व सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या पवित्रेत भयानक देखील. तरी अद्याप मी परिवर्तित नाही.

तुम्ही कधी अशाप्रकारे अनुभवले आहे का? पवित्र शास्त्रातील देव तुम्हाला खरा व्यक्ती आहे का? ते प्रचंड महत्वाचे आहे. पवित्र शास्त्र म्हणते,

“विश्वासावाचुन त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणा-याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, [ते म्हणजे, तो अस्तित्वात आहे]” (इब्री 11:6).

देवावर भरोसा ठेवण्यासाठी काही विश्वासाची गरज असते - परंतु त्या विश्वासाने तारण होत नाही. ते परिवर्तन नाही. माझी आई नेहमी म्हणत असे, “मी नेहमी देवावर भरवसा ठेवीला” आणि माझ्या मनात प्रश्न नाही की तीने ते केल. तीने लहानपणापासुन देवावर विश्वास ठेवला, परंतु 80 वर्षाची होईपर्यंत ती परिवर्तित झाली नव्हती. हे महत्वाचे आहे की ती देवावर विश्वास ठेवत असे, परंतु त्याहुनही अधिक काही झाले पाहिजे की एका व्यक्तीचे खरे परिवर्तन होईल.

तर, मी म्हणत आहे की, आज सकाळी तुम्ही कदाचीत देवाची वास्तविकता न जानता मंडळीमध्ये आला असाल. तर कदाचिक हळूवारपणे, कदाचित पटकन तुम्ही देवाचे सत्य पाहता. हे दुसरा आहे, परंतु परिवर्तन आहे.

III. तिसरे, तुम्हाला जाणीव होते की, तुम्ही देवाला आपल्या पापामुळे अपमानीत आणि क्रोधीत केले आहे.

पवित्र शास्त्र म्हणते, “जे देहात आहेत [म्हणजेच जे परीवर्तीत नाही] ते देवाला संतोषतु शकत नाही” (रोम 8:8). तर अपरिवर्तित व्यक्ती या नात्याने तुम्हाला जाणवते की, तुम्ही जे काही करता त्याने देव संतोषवला जात नाही, खरे पाहता, तुम्हाला हे देखील जाणवते की तुम्ही पापी आहात. प्रत्येक दिवशी आपल्या “पश्यातापहीन अंत:करणाने स्वत:साठी क्रोध साठवून ठेवता” (रोम 2:5). पवित्र शास्त्र म्हणते:

“देव दुर्जनाविषयी प्रतिदिन क्रोधीत होतो” (स्तोत्र 7:11).

जेव्हा तुम्हाला खरोखर ही जाणीव होते की, खरोखर देव आहे, तुम्हाला हे देखील जाणीव होते की तुम्ही आपल्या पापांनी देवाला अपमानीत केले आहे. त्यावर प्रिती न दाखविल्याने देखील तुम्ही त्याला अपमानीत केले आहे. जे पाप तुम्ही केले ते देवाच्या आणि त्याच्या आज्ञांच्या विरुध्दात होते. की नंतर तुम्हाला समजेल हे फार खरे आहे. आणि ह्यावेळेस देवाविषयीच्या प्रीतीतील कमतरता तुम्हाला महान पाप असे वाटेल. परंतु त्याहूनही अधिक, तुम्ही हे पाहता की तुमचा स्वभावच पापी आहे, की तुमच्यामध्ये काहिच चांगले नाही, तुमचा ह्रदय पापी झाला आहे.

पुरीटंस द्वारे ह्या टप्याला बहुतेक वेळा “जागृती” चा टप्पा म्हणण्यात आला. जोपर्यंत पापाची तीव्र जाणीव आणि स्वदोष जाणवत नाही तोपर्यंत जागृती होणार नाही. तुम्हाला जॉन न्युटन सारखे वाटेल, जेव्हा त्यांनी लिहीले:

हे प्रभु, मी कीती अधम, अपवित्र अणि अशुध्द आहे!
   मी पापाचा हा मोठा भार घेऊन जवळ येण्याची हींमत कशी करु?

हे प्रदुषित अंत:करण तुझ्या वसण्याची जागा आहे का?
   हाय हाय! प्रत्येक भागात, काय मी पाहतो ते वाईट!
(“हे प्रभु, मी कीती अधम आहे” जॉन न्युटनद्वारे, 1725-1807).

तर तुम्ही आपल्या मना आणि अंत:करणाच्या आतिल पापीपणाविषयी आता गहणरित्या विचार कराल. “माझे अंत:करण अगदी पापी आणि देवापासुन दुर आहे.” त्याविचाराने तुम्ही त्रस्त व्हाल. देवाविषयी तुमच्या प्रितीच्या कमतरतेमुळे आणि स्वत:च्या पापी विचारांमुळे तुम्ही फार दुखी आणि कष्टी व्हालं. ह्या टप्यावरील तुमच्या अंत:करणातील शीतल जीवनरहितपणा जे देवाविषयी आहे, ते तुम्हाला त्रास देईल. तुम्हाला जाणवेल की तुमच्यासारख्या पापी अंत:करणाच्या व्यक्तीला आशा नाही. जेव्हा तुम्ही जागृत आणि आपल्या पापाविषयी ज्याने तुम्ही देवाला अपमानीत केले सतर्क व्हाल, तुम्ही पहाल की, देवाने तुम्हाला नरकात पाठवने योग्य आणि अनिवार्य आहे - कारण तुम्ही नरकास पात्र आहात असंच तुम्ही विचार कराल. हा जागृतीला टप्पा महत्वाचा आहे, तरी देखील अद्याप हे परीवर्तन नाही, जो व्यक्ती हे पाहतो की तो कीती पापी आहे, तो जागृत होतो - परंतु अद्याप परीवर्तीत नाही. परिवर्तन हे फक्त पापाचा अंगीकार केल्याने होत नाही.

तुम्हाला कदाचीत अचानक जाणवेल की तुम्ही देवाला नाखुश केले आहे, किंवा ही जागृती फक्त सिध्दांत न राहता पूर्ण समजपणामध्ये बदलुन जाते की तुम्ही देवाला अपमानीत केले आहे आणि देव नाखुश झाला आहे. फक्त पापाविषयी पूर्ण जागृती झाल्यावरच तुम्ही परीवर्तनाच्या चौथ्या आणि पाचव्या “टप्प्यावर” जाण्यास तयार आहात.

चालर्स स्पर्जन 15 वर्षाचे असताना आपल्या पापाविषयी जागृत झाले. त्यांचे पिता आणि आजोबा दोघे प्रचारक होते. ते अशा दिवसांमध्ये राहिले जेव्हा आधुनिक “डीसीनिसम” ने खरे परिवर्तनास धुळी आणि अस्पष्ट केले नव्हते. तर, त्याचे पिता आणि आजोबा ह्यांनी त्याला “धकलले” नाही की त्याने “ख्रिस्ताकरिता” पोकळ “निर्णय” घ्यावा. पण ते तर देवाच्या गहन परिवर्तनाची वाट पाहत होते. मला वाटत की ते बरोबर होते.

15 वर्षाचा असता स्पर्जन पापाच्य गहण समजणुकीवर आले. स्पर्जन ह्यांनी पुढील शब्दांनी आपल्या पापीपनाच्या जागृकतेचे स्पष्टीकरण दिले:

सर्वस्वी अचानक, मी मोशेला भेटलो, जो आपल्या हातामध्ये देवाचा नियमशास्त्र घेऊन चालला होता, आणि जसे त्याने माझ्याकडे पाहिले, ते असे दिसले की, तो मला आपल्या अग्नीच्या डोळ्यांद्वारे पाहत आणि शेधत होता. त्याने मला “देवाचे दहा शब्द” - [वाचन्यास सांगीतले] दहा आज्ञा - मी ते वाचल्यावर ते मला पवित्र देवाच्या नजरेत दोषी ठरवत होते.

त्या अनुभवाने त्याने स्वत:स पापी असे पाहिले, तसेच देवाच्या दृष्टीत देखील, आणि “धर्म” आणि “चांगुलपणा” ह्यांचा कोणताच भाग त्याचे तारण करु शकत नव्हता. तरुन स्पर्जन मोठ्या निराशेच्या काळातून गेला. तो स्वत:च्या कर्मांनी देवाबरोबर शांती मिळवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु देवाबरोबर शांती मिळवण्याचे त्याचे सर्व श्रम व्यर्थ झाले. ते आपणांस परिवर्तनाच्या चौथ्या टप्यावर नेहते.

IV. चौथे, तुम्ही तारण कमवण्याचा प्रयत्न करीता, किंवा शिकता कि कसे तारले जावे.

जागृत व्यक्तीला स्वत:चे पापीपणा जाणवेल, परंतु ते तरीही येशुकडे वळणार नाही. यशया संदेष्ट्याने ह्या परिस्थितीला लोकांचे वर्णन केले, जेव्हा तो म्हणाला, “त्याला पाहुन… लोक तोंड फिरवीत व त्याला तुच्छ लेखित” (यशया 53:3). आपण आदामाप्रमाणे आहोत, ज्याला स्वत:चे पाप माहित असता देखील तारण कर्त्यापासुन लपत होता. आणि स्वत:चे पाप अंजीराच्या पानांनी झाकत होता (उत्पत्ति 3:7,8).

आदामाप्रमाणे, जे जागृत पापी आहेत ते स्वत:स पापापासुन वाचवण्याचा काहीतरी प्रयत्न करतात. “तो शिकण्याचा प्रयत्न तारले जावे.” परंतु त्याला समजते की “शिक्षणाने” त्याचा काही लाभ होत नाही. की तो “सदा शिकत आहे, परंतु काहिही सत्याच्या परिपुर्ण ज्ञानाकडे पोहचत नाही”. (II तिमीथी 3:7). किंवा येशूला सोडून तो “भावनांकडे” पाहिल. काही लोक जे “भावनांकडे” पाहतात ते काही महीण्यांपर्यंत असेच राहतात. स्पर्जन आपल्या पापाविषयी जागृत झाले होते. परंतु त्यांनी असा विश्वास ठेवीला नाही की फक्त येशुवर विश्वास ठेवील्याने त्याचे तारण होईल. ते म्हणाले,

ख्रिस्ताकडे येण्यापुर्वी, मी स्वत:शी म्हणालो, “मी जसा आहे तसाच मी जर येशुवर विश्वास ठेविला, तर माझे तारण होईल असे नाही? मला काही भासायला हवं; मी काहीतरी केले पाहिजे” (उक्ती).

आणि ते तुम्हास पाचव्या टप्प्यावर घेऊन जाते.

V. पाचवे, सर शेवटी तुम्ही येशुकडे येता, आणि फक्त त्याच्यावरच भरवसा ठेवीता.

तरुण स्पर्जन ह्यांनी शेवटी एका प्रचारकाला असे म्हणताना ऐकले, “ख्रिस्ताकडे पहा… स्वत:कडे पाहून काही उपयोग होणार नाही… ख्रिस्ताकडे पहा.” त्याच्या सर्व संघर्षानंतर आणि आतील गोंधळा आणि दु:खानंतर - स्पर्जन ह्यांनी शेवटी येशुकडे पाहिले आणि त्याच्यावर भरवसा ठेवीला. स्पर्जन म्हणाले, “[येशुच्या] रक्ताद्वारे माझे तारण झाले! मी घरी नाचत जाऊ शकलो असतो.”

त्या सर्व संघर्षां आणि शंकां नंतर, त्याने भावनेकडे पाहण्याचे थांबवले आणि स्वत:मध्ये देखील काही शोधण्याचे थांबवले. त्यांनी फक्त येशुवर भरवसा ठेवीला - आणि तेव्हापासुन येशुने त्याचे तारण केले. क्षणभरात येशु ख्रिस्ताच्या रक्ताने तो पापापासुन शुध्द झाला! हे साध, आणि तसेच अगदी गहण अनुभव आहे जो मनुष्य घेऊ शकतो. ते, माझ्या मित्रा, खरा परिवर्तन आहे! पवित्रशास्त्र म्हणते, “प्रभु येशु ख्रिस्तावर, विश्वास ठेवा आणि तुमचे तारण होईल ”(प्रेषित 16:31). जेसोफ हार्ट म्हणाले,

ज्या क्षणी पापी विश्वास ठेवीतो,
   आणि त्याच्या क्रुसावर मेलेल्या देवावर भरवसा ठेवतो,
एकदाच तो आपली क्षमा मिळवतो,
   त्याच्या रक्ताने पुर्ण मुक्ती.
(“द मुमेंट अ सिनर बिलिव्स” जोसेफ हार्ट व्दारे, 1712-1768).
(“The Moment a Sinner Believes” by Joseph Hart, 1712-1768).

समाप्ती

येशु म्हणाला,

“तुमचा पालट होऊन, तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय, स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही”
       (मत्तय 18:3).

Pilgrim’s Progress, मधल्या मुख्य चारीत्रासारखा, कोणत्याही ख्रिस्तिविषयी निर्यणावर कोणत्याही “ख्रिस्ताविषयी निर्णयावर” जे पोकळ आहेत स्थित होऊ नका. नाही! नाही! खात्री करुन घ्या की तुमचा परिवर्तन खरा आहे, का जर तुम्ही खरे परीवर्तीत नसाल तर “तुमचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही” (मत्तय 18:3).

ख-या परिवर्तनाकरीता,

1.  तुम्ही अशा ठिकाणी आलाच पाहिजे जिथे तुम्ही विश्वास ठेविता कि, खरोखर देव आहे - एक खरा देव जो पाप्यांस नरकात टाकतो, आणि तारण झालेल्यांना ते मेल्यावर तो स्वर्गात नेतो.

2.  खोल आत, तुम्ही हे जानवले पाहिजे, की तुम्ही पापी आहात ज्याने देवाला अपमानीत केले आहे. अशा प्रकारे तुम्ही दीर्घकाळापर्यंत असु शकता (किंवा काहिकांकरीता ही वेळ लघु असु शकते). डॉ. कॅगन, आमचे सह पाळक, म्हणाले, “देव जेव्हा मला खरा झाला तेव्हा बहुत महिने झोपहीन रात्रींशी मी झगडलो. ह्या काळाला मी माझ्या जीवनातील वेदनांचे दोन वर्षे असे संबोधितो” (सी.एल.कॅगन, Ph.D., From Darwin to Design, Whitaker House, 2006, P.41).

3.  तुम्ही हे जानवले पाहिजे की अपमानीत आणि क्रोधीत झालेल्या देवाबरोबर मेळ करण्याकरीता मी काहीच करु शकत नाही. तुमचे म्हणणे, शिक्षण, कर्म, किंवा भावना तुमची मदत करु शकत नाही. हे तुमच्या मना आणि अंत:करणामध्ये स्पष्ट झालं पाहिजे.

4.  तुम्ही येशु ख्रिस्ताकडे आलेच पाहिजे, जो देवाचा पुत्र आहे, आणि त्याच्या रक्ताद्वारे आपल्या पापांनी शुध्द झाले पाहिजे., डॉ. कॅगन म्हणाले, “मला आठवते, ते क्षण देखील, जेव्हा मी [येशुवर] विश्वास ठेविला… मी नक्कीच [येशु] ख्रिस्ताच्या उपस्थितीत होतो आणि त्याची उपस्थिती माझ्याकरीता उपलब्ध होती. बरेच वर्षे मी त्याला दुसरीकडे फिरवले, जरी तो नेहमी माझ्या जवळ होता, प्रेमाने मला तारण देत होता. परंतु त्या रात्री मला समजले की त्याच्यावर विश्वास ठेवण्याची वेळ आली आहे. मला समजले की मी त्यावर विश्वास ठेवावा किंवा त्यापासुन वळावे. त्या क्षणी, काही क्षणातच, मी येशुकडे आलो. मी ह्यापुढे स्वत:वर भरवसा ठेविण्यास अविश्वासी नव्हतो. मी येशु ख्रिस्तावर भरवसा ठेवीला होता. मी त्याच्यावर भरवसा ठेवीला होता. हे सोप होत की... संपुर्ण जीवन मी पळत होतो, परंतु त्या रात्री मी फिरुन सरळ आणि पटकन येशु ख्रिस्ताकडे आलो.” (सी.एल.कॅगन, उक्ती, पान क्रं. 19). ते खरं परिवर्तन आहे. ख्रिस्त येशु मध्ये परिवर्तीत होण्याकरिता तुम्हाला हा अनुभव आलाच पाहिजे ! येशुकडे या आणि त्यावर विश्वास ठेवा ! क्रुसखांब्यावर त्याने सांडलेल्या रक्ताने तो तुमचे पाप धुवुन तारण करील ! आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशाआदील प्रार्थना ही मी. एबल प्रुढोमी द्वारे झाली.
उपदेशाआदील सोलो गीत मी. बेंजामीन कींकेड ग्रीफेथ द्वारे:
“अमेझींग ग्रेस” (जोन न्युटन व्दारे, 1725-1807).
“Amazing Grace” (by John Newton, 1725-1807).


रुपरेषा

खरे परिवर्तन - 2015 प्रकाशन

REAL CONVERSION – 2015 EDITION

डॉ. आर. एल. हायमर्स, जुनियर व्दारे.
by Dr. R. L. Hymers, Jr.

“मी तुम्हाला सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बालकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही” (मत्तय 18:3).

I.    प्रथम, तुम्ही मंडळीमध्ये परीवर्तीत होण्याएवजी इतर काही कारणांनी येता.

II.   दुसरे, तुम्ही जाणुन घेण्यास सुरुवात करीता की खरोखर देव आहे, नेहम्या 1:5; इब्री 11:6.

III.  तिसरे, तुम्हाला जाणीव होते की तुम्ही आपल्या पापांनी देवाला अपमानीत आणि क्रोधीत केले आहे, रोम 8:8, 2-5; स्त्रोत 7:11.

IV.  चौथे, तुम्ही तारण कमवण्याचा प्रयत्न करिता, किंवा शिकता कि कसे तारले जावे, यशया 53:3; उत्पत्ती 3:7,8; दुसरे तिमथ्य 3:7.

V.   पाचवे, सर शेवटी तुम्ही येशुकडे, येता आणि त्याच्यावरच भरवसा ठेवीता, प्रेषित 16:31.