Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
तुम्ही ख्रिस्ताकडे आला आहात काय?

HAVE YOU COME TO CHRIST?
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 9 नोव्हेंबर, 2003
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, November 9, 2003

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40).


ख्रिस्ताच्या काळात आध्यात्मिक पुढा-यांनी जुन्या कराराचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता. परंतू शास्त्रलेख ख्रिस्तासंबधी बोलत होता ह्या सत्याला ते मुकले – आणि म्हणून, ते ख्रिस्ताकडे आले नाहीत, आणि त्याच्याद्वारे तारण मिळवू शकले नाहीत. त्यांच्यामध्ये एक सामान्य म्हण होती, “त्यांच्याजवळ नियमशास्त्र आहे त्याद्वारे त्यांस सार्वकालीक जीवन आहे” (मॅथ्यू हेन्री, योहान 5:39 वरील भाष्य). परंतू येशू म्हणाला शास्त्रलेख त्याच्या संबंधी साक्ष देतो,

“तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्याच्याद्वारे तुम्हांला सार्वकालीक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्या विषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्या कडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही” (योहान 5:39-40).

ते शास्त्रलेखाच्या शब्दावर विश्वास ठेवीत होते, परंतू ते ख्रिस्त सांगत होता त्या शास्त्रलेखावर विश्वास ठेवीत नव्हते. डॉ. वॉलवुर्ड म्हणाले, “त्याचप्रमाणे पवित्रशास्त्र अभ्यास हेच सर्वस्व आहे असे मानणारे पुष्कळ लोक आजहि आहेत” (वॉलवुर्ड आणि झुक, द बायबल नॉलेज कॉमेंट्री, विक्टर बुक्स, 1984, आवृत्ती II, पृष्ठ 292).

ते पवित्रशास्त्राकडे वळतात, आणि पवित्रशास्त्रातील वचनांवर विश्वास ठेवतात – परंतू ते ख्रिस्ता कडे येत नाहीत व त्याच्या वर विश्वास ठेवीत नाहीत.

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40).

पतित मानवाची एक भयंकर सवय आहे की ते ख्रिस्ताकडे येण्याऐवजी दुसरीकडे जातात, तसेच ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याऐवजी दुस-या कशावर तरी ठेवतात.

“त्याच्यापासून आम्ही आपली तोंडे फिरविली” (यशया 53:3).

“त्यांच्या जिवास माझा कंटाळा आला” (जख-या 11:8).

“ह्यावरुन ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा” (योहान 19:15).

हा तो मार्ग आहे सर्व मनुष्यांनी ख्रिस्ताला वागविले. देवाच्या कृपेव्यतिरिक्त, एका मार्गाने किंवा दुस-या, सर्व मनुष्य असे म्हणू शकतील,

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40)

देवाच्या कृपेविना, कोणताहि मनुष्य ख्रिस्ताकडे येऊ शकत नाही. येशू म्हणाला,

“ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही” (योहान 6:44).

ह्या संध्याकाळी देव तुम्हांस आकर्षित करीत आहे का? येशूची तुम्हांस गरज वाटते का? त्याच्याशिवाय तुम्ही हरविलेले आहांत असे वाटते का? जर वाटते, तर देव स्वत: तुम्हांस तुमच्या खोट्या कल्पनेतून बाहेर काढून, ख्रिस्ताकडे आकर्षित करीत आहे. मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका, तुमच्या खोट्या कल्पना काढून टाका, आणि ख्रिस्ताकडे या. आता पर्यंत, तुम्ही ख्रिस्ताकडे आला नाही. आता पर्यंत, ख्रिस्त तुम्हांस म्हणाला,

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40).

I. प्रथम, ख्रिस्ताकडे येण्याऐवजी लोक काय करतात.

पेंटॅकॉस्टल किंवा करस्मॅटिक पार्श्वभूमि असेलेल्या लोकांना तारण हे अनुभव व भावना यातून येते असे वाटते. साधारणत: “पवित्र आत्मा” हा देव व मनुष्य यांच्यामधील मध्यस्ती म्हणून येशूची जागा घेतो (व. I तिमथी 2:5). येशू, वास्तवात, पुष्कळदा “पवित्र आत्म्या” द्वारे बदली केलेला आहे.

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40).

रोमन कॅथलिक पार्श्वभूमीच्या लोक ख्रिस्ताला प्रायश्चित – पश्चाताप, कबुली आणि सत्कृत्यें यामध्ये बदलवतात. एका मागून एक त्यांची पापे कबुल करुन, किंवा दिवसेंदिवस ख्रिस्ताचे अनुकरण करुन तारण मिळविण्याचा प्रयत्न करतात. ही मानवी कृत्यें ख्रिस्ताच्या ऐवजी बलतात.

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40).

बौद्ध, हिंदू, मुस्लिम, यहुदी, या व इतर जागतिक धर्माच्या पार्श्वभूमीचे लोक तारण हे ख्रिस्तावर अवलंबून नाही असा विश्वास ठेवतात. ते कदाचित ख्रिस्ताला “महान संदेष्टा” असा पुज्यभाव देतील, परंतू एकमेव ख्रिस्त हा तारण देतो असा विश्वास ठेवीत नाहीत. तारणाकरिता साधारण: ते “चांगले जीवन” जगण्यावर अवलंबून असतात.

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40).

बाप्टिस्ट व इव्हांजिकल सुद्धा ख्रिस्ता शिवाय इतर गोष्टीवर भरवंसा ठेवतात. डॉ. जॉन आर. राईस म्हणाले.

मंडळींचे हजारो सभासद परिवर्तन, शुद्धीकरण न झालेले, देवाच्या क्रोधात जगणारे पापी असे आहेत. सध्या नरकांत अगणित...सनातनी बाप्टिस्ट आहेत... जे [नरकांत] गेले आहेत, कधीहि त्यांचे खरे तारण झाले नाही. [ते] मार्ग भटकले आहेत, खोटी आशा होती आणि आता ते यातनेत आहेत (डॉ. जॉन आर. राईस, रिलीजिस बट लॉस्ट, स्वोर्ड ऑफ द लॉर्डस, 1939, पृष्ठ 8).

डॉ. राईस मग म्हणाले,

फार काळापासून हे पवित्रशास्त्रामध्ये आणले गेले, असा पुरावा आहे की एखादा फसला आहे तो भयंकर धोक्यात आहेत आणि खोट्या आशेवर अवलंबून आहे, शेवटी शोधणे की तो सार्वकालीक हरविलेला आहे (ibid.).

बाप्टिस्ट व इव्हांजिकल्स ब-याचदा ख्रिस्ता ऐवजी “पाप्यांची प्रार्थना” यावर विश्वास ठेवतात. ते म्हणतात, “तूं तारावेस म्हणून मी त्याला विचारले. ते पुरेसे नाही का?” नाही, ते नाही! तारण पावण्यास तुम्ही येशूकडे आले पाहिजे! तुम्ही केवळ तुमच्या प्रार्थनेवर विश्वास ठेऊन चालणार नाही! तुम्ही देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवला पाहिजे! ख्रिस्त त्यास मागा असे म्हटला नाही. माझ्याकडे या असे तो म्हणाला. ख्रिस्त म्हणाला,

“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन” (मत्तय 11:28).

त्याच्याकडे येण्याऐवजी, त्याच्याकडे मागण्याद्वारे तुम्ही फसविले जात आहात!

ख्रिस्ताकडे येण्याऐवजी, पवित्रशास्त्रात जे सांगितले त्यावर विश्वास ठेवण्याद्वारे इतर फसले जात आहेत. पवित्रशास्त्रातील “तारणासंबंधीची योजना” त्यांना ठाऊक आहे. तो पाप्यांकरिता मेला हे त्यांना ठाऊक आहे. तो मेलेल्यांतून उठला हे त्यांना ठाऊक आहे. पवित्रशास्त्रातीय सत्य ते जाणतात, परंतू ते कधीही स्वत: येशूकडे येत नाहीत. जसे की डॉ. वॉलवुर्ड म्हणतात, “केवळ पवित्रशास्त्र अभ्यास करणे पुरेसे आहे असा बरेच लोक विचार करतात.”

तुम्ही परुश्यांपेक्षा वेगळे कसे आहांत? येशू त्यांना म्हणाला,

“तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता; कारण त्याच्याद्वारे तुम्हांला सार्वकालीक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते; आणि तेच माझ्या विषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्या कडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही” (योहान 5:39-40).

मग, ह्या, अशा कांही गोष्टी लोक ख्रिस्ताकडे येण्याऐवजी करतात. तुम्ही अशाप्रकारची चुक केली असण्याची शक्यता आहे का?

II. दुसरे, ख्रिस्ताकडे येण्याऐवजी दुसरा मार्ग तारण का देत नाही?

जेव्हां तुम्ही शेवटच्या न्यायसमयी, देवाच्या सिंहासनापुढे उभे राहता, येशू तुम्हांस म्हणेल,

“मला तुमची कधीच ओळख नव्हती; अहो अनाचार करणा-यांनो, माझ्यापुढून निघुन जा” (मत्तय 7:23).

तुम्ही त्यांच्यापासून निघून नरक अग्नीत जाण्यास तो का सांगतो? कारण त्याला तुमची कधी “कधीच ओळख नव्हती.” तो तुम्हांला ओळखीत नाही कारण तुम्ही त्याच्याकडे कधीहि आला नाही! हे अगदी साधे सरळ आहे!

तारणांसाठी पवित्रशास्त्रातील प्रार्थनेची वचनें म्हणून किंवा पवित्रशास्त्रातील कांही गोष्टीवर विश्वास ठेऊन तुम्ही थकला असेल. परंतू त्या गोष्टी आपणांस तारण देत नाही. पवित्रशास्त्र म्हणते,

“ह्यावरुन ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावे म्हणून आम्ही काय करावे, येशूने त्यांना उत्तर दिले, ज्याला त्यांने पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवावा” (योहान 6:28-29).

केवळ “काम” जे ग्रहणीय आहे ते म्हणजे येशूवर विश्वास ठेवणे! “येशूवर विश्वास ठेवणे” हे दुस-या पद्धतीने सांगणे म्हणजे “येशूकडे येणे.” “येशूवर विश्वास ठेवणे” आणि “येशूकडे येणे” हे एकच गोष्ट दोन वेगळ्या पद्धतीने सांगणे होय. येशू म्हणाला,

“ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही; त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहले आहे की, 'ते सर्व देवाने शिकविलेले असे होतील' जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही; जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला खचित खचित सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालीक जीवन प्राप्त आहे,” (योहान 6:44-47).

आपण ह्या, उता-यात पाहतो की, येशूवर विश्वास ठेवणे व येशूकडे येणे एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने सांगणे. आता, माझा प्रश्न तुम्हाला हे आहे की – तुम्ही येशूकडे आला काय? तुम्ही येशूवर विश्वास ठेवला काय?

येशूकडे येणेचा परिणाम तारण मिळण्यात होतो – कारण कोणीहि नाही केवळ येशूच तारण देतो! दुसरे कोणी नाही केवळ येशूच तुमच्या पापाची खंडणी भरण्यास वधस्तंभावर मरण पावला. दुसरे कोणी नाही केवळ येशूच तुम्हांला जीवन देण्यास मरणातून दैहिकरित्या पुन्हां उठला.

आणि तारण दुस-या कोणाकडून नाही; कारण जेणेंकरुन आपले तारण होईल असे दुसरे कोणतेहि नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही” (प्रे.कृ. 4:12).

तुम्ही येशूकडे आले पाहिजे नाहीतर तुमचे तारण होणार नाही. इतर सर्व पद्धती, आणि इतर सर्व मार्ग नरकाकडे घेऊन जातात. आता पर्यंत तुम्ही त्याच्याकडे आला नाही, ना? त्याच्याविषयी पवित्रशास्त्र काय शिकविते त्यावर विश्वास ठेवता. तुम्ही अजून त्याला तारणासाठी विचारणा केली नाही. परंतू तुम्ही त्याच्याकडे आला नाही - ना?

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40).

III. तिसरे, तुम्ही ख्रिस्ताकडे आला किंवा नाही ते कसे ओळखावे.

तुम्ही म्हणाला, “मी ख्रिस्ताकडे आलो किंवा नाही मला माहित नाही. मी हे कसे सांगू?” हे सांगण्याचा मार्ग II करिंथ 13:5 मध्ये सांगितला आहे. प्रेषित पौल म्हणाला,

“तुम्ही विश्वासात आहां किंवा नाही ह्याविषयी आपली परिक्षा करा; आपली प्रतीति पाहा...” (II करिंथ 13:5).

ह्या वचनांसंबंधी, स्पर्जन म्हणाले,

आपली परिक्षा करा कारण तुम्ही जर चुक केलेली असेल तर ती तुम्हांस कळणार नाही, केवळ ह्या जगाशिवाय... माझा जीव विनाश गर्तेत पडलेला माला परवडणार नाही. किती भयावह धोका आहे जे तुम्ही व मी धावत आहोत, जर आम्ही आमचे परिक्षण करणार नाही! तर तो सार्वकालीक धोका असणार; स्वर्ग किंवा नरकाचा धोका असणार, देवाचा सार्वकालीक कृपा किंवा त्याचा सार्वकालीक शाप. ठीक प्रेषितास म्हणावयाचे आहे, “आपली परिक्षा करा,” (द न्यू पार्क स्ट्रीट पुलपीठ, पीलग्रीम प्रकाशन,1981 पुनर्मुद्रण, आवृत्ती IV, पृष्ठ 429).

डॉ. जे. वरनॉन मॅक् गी यांनी II करिंथ 13:5 वर भाष्य केले आहे,

आम्ही विश्वासात आहे किंवा नाही यासाठी आपले परिक्षण करा असे पौल म्हणतो. आम्ही ह्या समस्येस सामोरे जाण्यास तयार असले पाहिजे (जे. वरनॉन मॅक् गी, थ्रु द बायबल, थॉमस नेल्सन, 1983, आवृत्ती V, पृष्ठ 145).

असाहेल नेटलीटॉन, दुस-या मोठ्या संजीवनातील मोठे प्रचारक, म्हणाले,

[स्वयं परिक्षणाच्या] कामामध्ये, प्रत्येक व्यक्ति स्वत:च्या न्यायाकरिता न्यायासनावर बसते. तुम्ही तुमच्या जीवाचा खरेपणाने न्याय करा. खोटी आशा कांही नसण्यापेक्षा भंयकर आहे. ह्या वेळेची चुक भंयकर आहे. ज्या पायावर तुमची स्वर्गाची आशा आहे त्याचे परिक्षण नीट करा, असे होऊ नये की तुमची चुक नंतर सापडू नये (असाहेल नेटलीटॉन, सरमन्स फ्रॉम द सेकंड ग्रेट अवेकींग, इंटरनॅशनल आऊटरिच, 1995 पुनर्मुद्रण, पृष्ठ 323, 333).

परत जा आणि तुमच्या तारणाचा क्षण शोधा. तुम्ही ख्रिस्ताकडे आला आहांत काय? किंवा तुम्ही दुसरे काय केले? जसे की डॉ. नेटलीटॉन म्हणाले, “ज्या पायावर तुमची स्वर्गाची आशा आहे त्याचे परिक्षण नीट करा.” तुम्ही खरेच येशूकडे आलात काय? तुमच्या, आशेचा पाया स्वत: येशू आहे का? तुम्ही अजून खरेच ख्रिस्ताकडे आला नसाल तर परत फिरा, आज रात्री तुम्ही त्याच्याकडे यायला हवे. येशू म्हणाला,

“जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही” (योहान 6:37).

येशू म्हणाला,

“अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन” (मत्तय 11:28).

माझी आशा ही येशूचे रक्त व त्याचे नीतिमत्व याशिवाय दुसरे कशावर नाही,
मी गोड अपराधीपणावर विश्वास ठेवण्याचे धाडस करीत नाही,
परंतू येशूच्या नावामध्ये लीन होतो. ख्रिस्तावर, मजबूत खडकावर, मी उभा राहतो; बाकी सर्व जमीन सरकणा-या वाळूसारखी आहे,
बाकी सर्व जमीन सरकणा-या वाळूसारखी आहे.
(“द सॉलीड रॉक” यांच्याद्वारा, 1797-1874).


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी पवित्रशास्त्राचे वाचन डॉ. क्रिगटन एल. चॅन यांनी केले: योहान 5:39-47.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि.बेंजामिन किनकैड ग्रीफ्थ यांनी गायले :
(“द सॉलीड रॉक” यांच्याद्वारा, 1797-1874). “The Solid Rock” (by Edward Mote, 1797-1874).


रुपरेषा

तुम्ही ख्रिस्ताकडे आला आहात काय?

HAVE YOU COME TO CHRIST?

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही” (योहान 5:40).

(योहान 5:39; यशया 53:3; जख-या 11:8; योहान 19:15; 6:44)

I.   प्रथम, ख्रिस्ताकडे येण्याऐवजी लोक काय करतात, I तिमथी 2:5; मत्तय 11:28.

II.  दुसरे, ख्रिस्ताकडे येण्याऐवजी दुसरा मार्ग तारण का देत नाही, मत्तय 7:23;
योहान 6:28-29, 44-47; प्रे. कृ. 4:12.

III. तिसरे, तुम्ही ख्रिस्ताकडे आला किंवा नाही ते कसे ओळखावे, II करिंथ 13:5;
योहान 6:37.