Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




त्याच्या रक्ताने आपण शुद्ध झालो आहोत!

BY HIS BLOOD WE ARE CLEANSED!
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 28 जानेवारी, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, January 28, 2018

“तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत, व त्याला तुच्छ लेखीत; आणि त्याला आम्ही मानिले नाही” (यशया 53:3).

“खरे पाहिले असतां तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला;...त्यास बसलेल्या फटक्यांनी [त्याच्या जखमानी] आरोग्य प्राप्त झाले” (यशया 53:5).


गेल्या रविवारी रात्री मी ख्रिस्ताच्या रक्ताची गरज यावर उपदेश दिला (“रक्तासह किंवा रक्ताशिवाय”). त्या उपदेशामध्ये दोन मुद्दे होते. पहिला, ख्रिस्ताच्या रक्ता विना तुमचे काय होईल. दुसरा, ख्रिस्ताचे रक्त तुमच्याकडे असेल तर काय होईल.

पहिल्या मुद्द्याच्या आरंभी मी नरक केवळ दोन छोट्या परिच्छेदामध्ये उल्लेख केला आहे. त्यानंतर मी मुद्दा एक पाप वर थांबलो. मी म्हणालो येशूच्या रक्ता विना, “तुमच्या पापा पासून स्वातंत्र्य नाही. तुमच्या पापा पासून सुटका नाही. तुमच्या पापा पासून मुक्तता नाही. तुमच्या पापाची क्षमा नाही.” त्यानंतर मी दुस-या मुद्द्याकडे गेलो, “तुमच्याकडे येशूचे रक्त असल्यास तुमचे काय होईल.” “तुमचे पाप घालविण्यास,” “तुमच्या पापाची क्षमा होण्यास,” “तुमच्या पापातून सुटका होण्यास,” “तुमच्या पापातून स्वतंत्रता मिळण्यास,” “तुमच्या पापाची पापक्षमा मिळण्यास,” आणि “तुम्हांला स्वर्गात नेण्यास” ख्रिस्ताच्या रक्ताचे अदभूत सामर्थ्य यासाठी मी संपूर्ण चार पाने खर्च केली. मी म्हणालो की जे स्वर्गात असतील ते, “ख्रिस्ताच्या रक्ताने तारण झाले” असे गीत गातील. मी पॅनी क्रोस्बी यांचे गीत उल्लेखिले, “कोक-याच्या रक्ताने तारण झाले.” मी स्पर्जन जे म्हणाले ते सांगितले, “रक्ता विना शुभवर्तमान...हे सैतानाचे शुभवर्तमान आहे.” मी चार्ल्स वेस्लीचे गीत सांगितले, ते म्हणते,

त्याचे रक्त दुर्गंधी स्वच्छ करते,
त्याचे रक्त माझ्यासाठी लाभदायक आहे.
   (“ओ फॉर अ थाऊजंड टंग्ज टू सिंग” चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788).

मी तुम्हांल ते गीत गायला सांगितले. मग मी तुम्हांला हे गीत गायला सांगितले, “सामर्थ्य, सामर्थ्य कोक-याच्या अनमोल रक्तात अदभूत कार्याचे सामर्थ्य आहे” (लेवीस इ. जोन्स यांच्याद्वारा, 1865-1936). खरे तर ते मी तीन वेळेला गायला सांगितले! त्यानंतर मी ऑक्टाविअस विन्स्लो यांच्या परिच्छेदातून सांगितले, जे एक 19 व्या शतकातील महान प्रचारक होते ते म्हणाले, “ख्रिस्ताला शरण या आणि रक्त जे क्षमा करते, पाप झाकते आणि सर्व अपराधीपणा नाहीसा करते त्याच रक्ताने तुमचा विवेक शुद्ध होतो.” मग मी स्पर्जनचे तरुणास बोललेले म्हणणे सांगितले, “स्वत: येशूकडे या. तो त्याच्या मुल्यवान रक्ताने तुमचे पाप धुऊन शुद्ध करील.” मग मी गीत सांगितले “जसा मी आहे” जे म्हणते की येशूचे रक्त “माझ्यासाठी सांडले होते.” मग मी हे सांगून उपदेश संपविला, “येशूवर विश्वास ठेवा, येशूकडे या, आणि येशूच्या मुल्यवान रक्ताने तुमच्या पापापासून शुद्ध व्हा.” मला माहित नाही की आणखी किती स्पष्ट करायला हवे होते!

रविवारच्या सकाळच्या उपदेशात, मि. जॉन सॅमुएल कागॅनने “ख्रिस्ताचे प्राबल्य” यावर प्रचार केला. मि. कागॅनने कलैस्स 1:14 सांगून उपदेश संपविला,

“ज्याच्यात त्याच्या रक्ताद्वारे आपणास मुक्ति आहे, पापाची क्षमा सुद्धा आहे.”

मग मि. कागॅन म्हणाले, “त्याचे रक्त तुमच्यासाठी प्रायश्चित आहे. त्याच्या दयेत स्वत:ला झोकून द्या. केवळ तोच तुमच्या पापापासून त्याच्या रक्ताने सोडविल. मी प्रार्थना करितो की तुम्ही आजच येशूवर ठेवाल.” मि. यानी गायलेल्या “अहो पवित्र मस्तक, आता जखमी झाले,” ह्या गीता नंतर मि. कागॅनचा उपदेश झाला जे गीत ख्रिस्ताने आपल्या पापासाठी केलेल्या रक्ताच्या बलिदानाचे स्तुतीगान करते. अहो, रविवारी रात्रीच्या माझ्या उपदेशापूर्वी मि. ग्रिफ्फिथ यांनी गायलेल्या, “तेथे झरा आहे” विलियम काऊपर यांच्याद्वारा — जे म्हणते,

तेथे झरा आहे रक्ताने भरलेला,
   इम्मानुएलच्या रक्तवाहिन्यातून काढलेला;
आणि पाप्यांना, तो प्रवाह खाली जोराने पुढे नेतो,
   त्यांचा सर्व अपराधीपणाचा कलंक निघून जातो.

तरीहि सर्व प्रचार व येशूच्या पाप-शुद्धी करणार-या गीताविषयी ऐकले त्यानी तुझ्या पुष्कळ हरविलेल्या लोकांवर कांही एक परिणाम केला नाही! अतिबात कशावरहि झाला नाही! संध्याकाळच्या उपदेशानंतर एक मुलगी मला पहावयास आली. मी म्हणालो, “गुडग्यावर या आणि येशूवर विश्वास ठेवा.” तिने माझ्याकडे रागाने पाहिले व म्हणाली, “नाही!” मी कष्टाने विश्वास ठेऊ शकलो! ती मला पहावयास का आली होती? मला पहायला येऊन तिला वाटते की मी तिला वाचवू शकतो? मी आश्चर्यचकीत झालो होतो! मग एक तरुण मला पाहायला आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, म्हणून मला वाटले त्याला त्याच्या पापाची जाणीव झाली आहे. पण, नाही. केवळ तो नरकात जायला घाबरला होता, ज्याचा उल्लेख मी माझ्या उपदेशात केला होता! तो नरकात जायला घाबरला होता! इतकेच बाकी कांही नाही! त्याने त्याच्या पापाचा कांहीहि उल्लेख केला नाही. आणि त्याने येशूचे रक्त व त्याचे पाप शुद्धी करण्याच्या सामर्थ्याविषयी तो एक शब्द — एकहि शब्द बोलला नाही! संपूर्ण दिवस — रविवार सकाळचा जॉन कागॅनच्या उपदेशापासून ते माझ्या रात्रीच्या उपदेशापर्यंत त्यांने येशूच्या रक्ताच्या शुद्धीकरणाच्या सामर्थ्याविषयी ऐकले — तरी त्यांने चकार शब्दहि काढला नाही. तसेच सर्व गीते जी येशूच्या रक्ताच्या पाप शुद्धीकरणा विषयी होती ती सुद्धा त्यांने उल्लेखली नाहीत. हे असे होते की त्यांने संपूर्ण दिवस येशूच्या रक्ताच्या पाप शुद्धीकरणा विषयी एक शब्दहि ऐकला नाही — त्याला एक शब्दहि आठवला नाही!

येशूची प्रीति व पापासाठी रक्ताचे बलिदान याचा जराहि विचार न करता, ती मुलगी क्रोधीत चेह-याने का आली? येशूच्या रक्ताच्या पाप-शुद्धीकरणा विषयी एक शब्द न काढता — तो तरुण केवळ नरकाच्या भीतीने का आला? याचे उत्तर आपल्या पहिल्या उता-यात आहे,

“तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला... असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवीत, व त्याला तुच्छ लेखीत; आणि त्याला आम्ही मानिले नाही” (यशया 53:3).

माझ्या प्रिय मित्रानो, हरविलेले पापी येशूला तुच्छ लेखण्याचे व नाकारण्याचे थांबविण्यास कृपेचा चमत्कार लागतो. पाप्यांना येशूपासून तोंड लपविणे थांबविण्यास — आणि त्याच्या रक्ताच्या पाप शुद्धीकरण बलिदानाचा आदर करण्याची जागृती येण्यास पवित्र आत्म्याचे कार्य हवे.

आता पर्यंत तुम्ही येशूला व त्याच्या तारणा-या रक्तास तुच्छ लेखीत व नाकारीत आलो असलो तरी, येशूने तुम्हांला तारण्यासाठी काय केले हे आपला दुसरा उतारा सांगतो. त्याला व त्याच्या रक्तास तुम्ही नाकारले तरी,

“खरे पाहिले असतां तो [तुमच्या] अपराधांमुळे घायाळ झाला, [तुमच्या] दुष्कर्मांमुळे ठेचला गेला;...त्यास बसलेल्या फटक्यांनी [त्याच्या जखमानी] तुम्हांला आरोग्य प्राप्त झाले” (यशया 53:5).

मी रविवार रात्री उपदेश देण्यापूर्वी स्पर्जनच्या मंडळीतील दोन तरुण स्त्रीयांची साक्ष वाचली. त्यातील पहिली अशी म्हणाली, म

मि. स्पर्जन यांचा उपदेश ऐकेपर्यंत माझे ह्दय कठीण होते. तिच्या पापाच्या न्यायासंबंधाने ती खूप घाबरली. ती मंडळीस येत होती पण कित्येक महिने ती नैराश्येत होती. मग तिने स्पर्जन यांचा उपदेश ऐकला [व] येशू व त्याच्या प्रायश्चिताच्या रक्तावर विश्वास ठेवला, आणि आनंदी झाली. तिने केवळ येशूवर विश्वास ठेवला, आणि ती तारण पावली.

त्यातील दुसरी स्त्री अशी म्हणाली,

ती उत्सुकता म्हणून मि. स्पर्जन यांचा उपदेश ऐकायला आली. भीतीने तिने मंडळी सोडली. ती म्हणाली, “मला कधीहि उपदेश ऐकायला जायचे नव्हते. मी पुन्हा जायचे नाही असे ठरविले. परंतू दूर राहिल्यावर मला दु:खी वाटले. उपदेश ऐकायला आले तरी दु:खी, व दूर राहिले तरी दु:खी. सरते शेवटी मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि त्याच्यामध्ये मला शांती व सांत्वना मिळाली. इतर कशात तरी शांति शोधण्याचे सोडून देईपर्यंत शांति मिळाली नाही परंतू येशूत मिळाली. पहिले मी सर्वकांही प्रयत्न केले. परंतू ख्रिस्त व त्याचे सर्व-तारक रक्त मिळेपर्यंत कोणीहि मला शांति दिली नाही.”

मुक्त केले! कोरस माझ्याबरोबर गा!

मुक्त केले, मुक्त केले, मुक्त केले कोक-याच्या रक्ताने;
मुक्त केले, मुक्त केले, त्याचे मुल आणि सदासर्वकाळ आहे मी.
   (“रिडीम्ड” फॅनी जे. क्रोस्बी, 1820-1915).

पुन्हा एकदा गा!

मुक्त केले, मुक्त केले, मुक्त केले कोक-याच्या रक्ताने;
मुक्त केले, मुक्त केले, त्याचे मुल आणि सदासर्वकाळ आहे मी.

येशूचे रक्त जे आम्हांस मुक्त करते ते सर्वसाधारण रक्त नाही. प्रे. कृ. 20:28 मध्ये येशूचे रक्त किती महान आहे हे शिकतो. इफिस येतील वडीलांस पौल म्हणाला,

देवाच्या मंडळीस चार, जी त्यांने त्याच्या स्वत:च्या रक्ताने विकत घेतली आहे.”

तुम्हांला असे वाटते का की पवित्रशास्त्र किंग जेम्सचे भाषातंर चुकीचे आहे? तर मग न्यू इंटरनॅशनल भाषातंर ऐका,

“देवाच्या मंडळीचे मेंढपाळ व्हा, जिला त्यांने आपल्या स्वत:च्या रक्ताने विकत घेतली आहे.”

कदाचित अजूनहि तुम्हांला पटलेले नाही. म्हणून मी तुम्हांला न्यू अमेरिकन स्टॅंडर्ड भाषातंर देतो,

“देवाच्या मंडळीचे पाळकत्व करा, जिला त्यांने आपल्या स्वत:च्या रक्ताने विकत घेतली आहे.”

आपण स्पष्टपणे पाहतो की येशूचे रक्त, जे तुमचे पाप धुते, ते सर्वसाधारण रक्त नाही. आपण पापातून “देवाच्या रक्ताने” मुक्त झालो आहोत. येशू ख्रिस्त हा त्रैक्यातील दुसरा व्यक्ति — देव जो पुत्र आहे. देवाने अवतार घेतला. मानवी देहात देव. त्यामुळे त्याचे रक्त “देवाचे रक्त” असे संबोधने योग्य आहे. त्यामुळे महान स्पर्जन म्हणाले, “असे कोणतेहि पाप नाही जे ख्रिस्ताचे रक्त शुद्ध करु शकत नाही.” चार्ल्स वेस्ली यांनी चांगले म्हटले आहे,

त्यांने रद्दबादल केलेल्या पापाचे सामर्थ्य मोडले,
   त्यांने बंदिवानास मुक्त केलेले आहे;
त्याच्या रक्त दुर्गंधी स्वच्छ करते,
   त्याचे रक्त माझ्यासाठी लाभदायक आहे.
(“ओ फॉर अ थाऊजंड टंग्ज टू सिंग” चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1788; टू द टुनर ऑफ “ओ सेट ये ओपन अनटू मी”).

ते गा!

त्यांने रद्दबादल केलेल्या पापाचे सामर्थ्य मोडले,
   त्यांने बंदिवानास मुक्त केलेले आहे;
त्याच्या रक्त दुर्गंधी स्वच्छ करते,
   त्याचे रक्त माझ्यासाठी लाभदायक आहे.

तुम्ही पापी नाही असे तुम्हांला वाटते का? मला शंका आहे की चार्ल्स वेस्ली तारणापूर्वी जेवढे शुद्ध होते तेवढेच तुम्हीपण शुद्ध आहांत. त्यांनी कित्येक जेवणांचा उपवास केला. तुम्ही केला का? शेवटी त्यांनी कित्येक तास प्रार्थना केली. तुम्ही केली का? तसेच ते अमेरिकन भारतीयांमध्ये ते मिशनरी म्हणून गेले. तुम्ही जाल का? तो पापी आहे हे कबूल करितो. तो स्पर्जनच्या मंडळीतील त्या मुलीसारखा आहे जी म्हणाली,

पहिल्यांदा सर्वकांही गोष्टी केल्या. येशूशिवाय दुस-या कशाततरी शांति शोधण्याचे सोडले नाही तोवर मला शांति मिळाली नाही. पहिल्यांदा सर्वकांही गोष्टी केल्या. परंतू जोवर मी [येशूवर विश्वास ठेवला] व त्याचे सर्व-तारणारे रक्त मिळाले नाही तोवर दुस-या कशानेहि मला शांति मिळाली नाही.”

तुम्ही असे केले नाही का? तुम्ही सगळे प्रयत्न केले. परंतू त्या कशानेहि शांति दिली नाही — दिली की? दिली का? अर्थात नाही! तुम्हांला कधीहि शांति मिळाली नाही. कधीहि शांति नाही! कधीहि शांति नाही! तुम्ही जोवर इतर कशात तरी शांति शोधण्याचे सोडत नाही आणि तुम्हांला त्याचे सर्व-तारणा-या रक्ताची गरज आहे ते येशूजवळ कबूल करत नाही तोवर शांति मिळणार नाही!

त्यातील दुसरी तरुण स्त्री म्हणाली होती,

      ती मंडळीस येत होती परंतू कित्येक महिने ती निराशेतच होती. मग तिने मि. स्पर्जनचा येशूच्या प्रीतीवरील प्रचार ऐकला [आणि शेवटी] तिने येशूवर व त्या प्रायश्चितच्या रक्तावर विश्वास ठेवला, आणि आनंद केला. तिने केवळ येशूवर विश्वास ठेवला, व तारण पावली.
      येशूशिवाय दुस-या कशाततरी शांति शोधण्याचे सोडले नाही तोवर मला शांति मिळाली नाही. पहिल्यांदा सर्वकांही गोष्टी केल्या. परंतू जोवर ख्रिस्त व त्याचे सर्व-तारणारे रक्त मिळाले नाही तोवर दुस-या कशानेहि मला शांति मिळाली नाही.

पवित्रशास्त्र म्हणते,

“ज्यात आपणास त्याच्या रक्ताद्वारे मुक्ति, तसेच पापाची क्षमा आहे.”

त्यानंतर जॉन सॅमुएल कागॅन म्हणाले, “त्याचे रक्त तुमच्या पापासाठी प्रायश्चित आहे. त्याच्या दयेमध्ये स्वत: झोकून द्या. त्याच्या रक्ताने केवळ तोच तुम्हांस तुमच्या पापापासून सोडवू शकतो.”

“तुच्छ मानिलेला, मनुष्यांनी टाकिलेला...आणि लोक तोंडे फिरवीत...खरे पाहिले असतां तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला;...त्यांस बसलेल्या फटक्यांनी [त्याच्या जखमानी] आरोग्य प्राप्त झाले” (यशया 53:3, 5).

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही” (इब्री 9:22). देवाची स्तूती असो “त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करिते” (I योहान 1:7). अहो, आजरात्री, तुमचे शब्द शार्लोट इलिओट (1789-1871) च्या शब्दासारखे असावेत. त्या म्हणाल्या,

जसा मी आहे, एकाहि विनंती विना
   परंतू तुझे रक्त माझ्यासाठी सांडले आहे;
आणि तूं मी तुझ्याकडे येण्याची विनंती ऐक,
   हे देवाच्या कोक-या, मी येतो! मी येतो!

वयाच्या पंधराव्या वर्षी, जॉन सॅमुएल कागॅन म्हणाले,

मला कुठल्याहि प्रकारची शांति लाभली नाही...क्लेशाची भावना थांबवू शकलो नाही...संघर्ष करुन खूप थकलो होतो, सगळ्याला मी अगदी कंटाळलो होतो मी होतो...मी तारण मिळविण्याचा प्रयत्न करीत होतो. मी ख्रिस्तावर विश्वाल ठेवण्यास प्रयत्न करीत होतो व शक्य झाले नाही. मी स्वत: ख्रिस्तावर विश्वास ठेऊ शकलो नाही. ख्रिस्ती होण्याचा निर्णय घेऊ शकलो नाही, आणि त्यामुळे मी अगदी आशाहीन झालो...येशूने त्याचे जीवन माझ्यासाठी दिले. येशू माझ्यासाठी वधस्तंभावर गेला...ह्या विचाराने मी भग्न झालो. मला सर्व ते सोडायला हवे होते...मला येशू हवा होता. त्या क्षणी मी त्याला देऊन टाकले आणि विश्वासाने...त्याच्याकडे आलो...माझ्या ह्दयातून, ख्रिस्तावर साधे अवलंबून राहिल्याने त्यांने मला तारिले! त्याच्या रक्ताने माझी पापे धुऊन शुद्ध केली!...मला भावनेची गरज नव्हती. माझ्याकडे ख्रिस्त होता! ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतरहि जसे माझे पाप संपले तसा माझा जीवहि संपला कि काय असे वाटले. मी माझ्या पापापसून माघारी, आणि केवळ ख्रिस्ताकडे पाहू लागलो! येशूने मला तारिले...माझा विश्वास येशूवर आहे, कारण मला त्याने बदलले...त्यांने मला नवजीवन व शांति दिली...ख्रिस्त माझ्याकडे आला, आणि त्याकरिता मी त्याला सोडणार नाही...त्याच्या रक्ताने माझी पापे धुऊन शुद्ध केली.

जसा मी आहे, एकाहि विनंती विना
   परंतू तुझे रक्त माझ्यासाठी सांडले आहे;
आणि तूं मी तुझ्याकडे येण्याची विनंती ऐक,
   हे देवाच्या कोक-या, मी येतो! मी येतो!

जसा मी आहे, आणि वाट पाहत नाही
   काळ्या गडद डागापासून माझ्या जीवाची सुटका होण्याची,
ज्याचे रक्त प्रत्येक डाग शुद्ध करते,
   हे देवाच्या कोक-या, मी येतो! मी येतो!

जसा मी आहे, तुला मिळेल,
   स्वागत, क्षमा, शुद्धता, सुटका मिळेल,
कारण तुझ्या अभिवचनावर विश्वास ठेवतो,
   हे देवाच्या कोक-या, मी येतो! मी येतो!

ज्याचे रक्त प्रत्येक डाग शुद्ध करते,
   हे देवाच्या कोक-या, मी येतो! मी येतो!

तुम्ही येशूकडे येऊन त्याच्या मौल्यवान रक्ताने तुमच्या पापाची शुद्धी मिळवाल काय? तुम्ही येशूकडे याल तर आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करण्यास उत्सुक आहोत. इतर लोक रात्री भोजसाठी वरच्या मजल्यावर जातील, तेव्हां तुम्ही पुढच्या पहिल्या दोन रांगेत येऊन बसा. आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले: “सेव्हड् बाय द ब्लड ऑफ द
क्रुसिफाईड वन” (एस.जे.हेंडरसन, यांच्या द्वारा, 1902)
“Saved by the Blood of the Crucified One” (by S. J. Henderson, 1902).