Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




रक्तासह किंवा रक्ताशिवाय

WITH OR WITHOUT BLOOD
(Marathi)

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजिल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी संध्याकाळी, 21 जानेवारी, 2018 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Evening, January 21, 2018

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही” (इब्री 9:22).


स्पर्जनचे पुष्कळ पालट झालेले लगेच झाले नव्हते, परंतू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे आणि आनंद व खातरी होणे याच्यापूर्वी कांही आठवडे नव्हे कांही महिने वेदनादायी पापाची खातरी व दु:ख सुरु झाले होते. स्पर्जनच्या प्रचारामुळे पालट झालेल्या दोन तरुणींची ही साक्ष पहा.

मेरी एडवर्ड,

     मि. स्पर्जनचा प्रचार ऐके पर्यंत तिचे ह्दय कठीण होते. ती तिच्या पापाच्या दंडाविषयी खूप घाबरली. ती मंडळीस येत होती परंतू कित्येक महिने ती निराशेतच होती. मग तिने मि. स्पर्जनचा येशूच्या प्रीतीवरील प्रचार ऐकला. तिने येशूवर व त्या प्रायश्चितच्या रक्तावर विश्वास ठेवला, आणि आनंद केला. तिने केवळ येशूवर विश्वास ठेवला, व तारण पावली. ती अजूनहि केवळ येशूकडे लक्ष लावते.

मेरी जोन्स, ,

     ती उत्सुकता म्हणून मि. स्पर्जनचा प्रचार ऐकण्यास आली. तिने घाबरुन मंडळी सोडली. ती म्हणाली, “मला वाटते त्यांचा प्रचार ऐकण्यास मी गेलो नाही. पुन्हा कधीहि जायचं नाही असे मी ठरविले. मी दूर राहतो तर दु:खी होतो असे मला वाटले. मी त्यांचा प्रचार ऐकतो तर दु:खी होतो, आणि मी दूर राहतो तर दु:खी होतो. सेवटी मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि मला शांति व सांत्वना मिळाली. येशूशिवाय दुस-या कशाततरी शांति शोधण्याचे सोडणार नाही तर मला ख्रिस्त मिळणार नाही. पहिल्यांदा सर्वकांही गोष्टी. परंतू जोवर मला ख्रिस्त व त्याचे सर्व-तारणारे रक्त मिळत नाही तोवर दुसरे कांही मला शांति देत नाही.”

मी प्रचाराकडे येण्यापूर्वी मि. ग्रिफ्फिथ येऊन एक गीत गातील जे स्पर्जनच्या मंडळीत गायले जायचे ज्याची अनेक तरुणांना ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास मदत झाली.

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही” (इब्री 9:22).

महान स्पर्जन यांना “प्रचाराचा राजकुमार” म्हटले जायचे. खरेच, त्यांच्यापेक्षा कोणीहि सुवार्तेचा महान प्रचारक नाही. त्यांच्या संपूर्ण सेवेचा विषय येशूच्या वधस्तंभावरील बलिदानाच्या द्वारे पाप्यांचे तारण हा नेहमी राहिलेला आहे. आणि पापक्षमा होण्यासाठी तारकाचे रक्त, वधस्तंभावर सांडले हा विषय नेहमीच त्यांच्या प्रचारातून अधोरेखीत झालेला आहे. अशाप्रकारे स्पर्जन यांनी वारंवार आपल्या ह्या उता-यावर प्रचार केला व सांगितले आहे.

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही” (इब्री 9:22).

परंतू शब्द “पापक्षमा” हा सध्याच्या पुढारलेल्या लोकांना ठाऊक नाही. त्याचा अधिक चांगला अर्थ समजण्यासाठी आपण हा “पापक्षमा” ज्या मूळ ग्रीक मधून आलेला आहे तो पाहू. स्ट्रॉंग याच्या शब्द सुचीचे पुस्तक आपणास सांगते की ग्रीक शब्द “अफेसिस” हा आहे. ज्याचा अर्थ “स्वातंत्र्य,” “माफी,” “सुटका,” “मुक्तता,” आणि “क्षमा” असा आहे. आपला हा उतारा ह्या शब्दांची भर घालून अधिक स्पष्टता देतो,

“रक्त ओतल्यावाचून स्वातंत्र्य नाही, माफी नाही, सुटका नाही, मुक्तता नाही, क्षमा नाही.”

स्पर्जन रक्ताच्या वचनाचा वारंवार उल्लेख करतात यात आश्चर्य नाही. एका प्रसिद्ध उपदेशात ते असे म्हणाले,

“असे कांही प्रचारक आहेत जे येशू ख्रिस्ताच्या रक्ताविषयी प्रचार करीत नाहीत, आणि त्यांच्यासंबंधी मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे: त्यांचे कधीहि ऐकायला जाऊ नका! त्यांचे कधीहि ऐकू नका! ज्या सेवेत रक्त नाही ते मृतवत आहे, आणि मृतवत सेवा कोणासाठीहि चांगली नाही.”

आपल्या ह्या उता-यातून रक्ताचे महत्व विदित होते,

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही”(इब्री 9:22).

I. प्रथम, ख्रिस्ताने रक्त ओतल्यावाचून तुमचे काय होईल ते समजा.

ख्रिस्ताने रक्त सांडण्याशिवाय तुमच्या पापापासून तुम्हांला मुक्तता नाही. ख्रिस्ताच्या रक्त ओतल्यावाचून तुमच्या पापाची माफी नाही. ख्रिस्ताने रक्त ओतल्यावाचून तुमच्या पापापासून तुमची सुटका नाही. ख्रिस्ताने रक्त ओतल्यावाचून तुमच्या पापापासून तुम्हांला स्वातंत्र्य नाही. ख्रिस्ताच्या रक्त ओतल्यावाचून तुमची पापक्षमा नाही. केवळ मृत्यू जो नरकाचा अग्नि आहे तो तुमची वाट पाहतोय.

स्कॉटलंड मधील महान कॅंबस्लॅंग संजीवनात नरकाचा प्रचार केला होता. “नरकातील सर्व यातनेसह, कॅंबस्लॅंग येथील प्रचारकानी त्यावर खरोखर विश्वास ठेवला होता. नरकाविषयी श्रोत्यांना चेतावणी न देण्यासंबंधी ते गंभीर होते. पुष्कळांनी त्यांना समजून घेतले. एक एकवीस-वर्ष-वयाचा-मनुष्य ‘मी एका कूपासारखा नरक कांही अंतरावरुन पाहिला, ज्यात हरविलेले आत्मे जळत होते, आणि सैतान त्यांच्यामधून जातोय असा मी विचार केला.’ पंधरा वर्षाचा मुलगा, मृत्यूपूर्वी म्हणाला, ‘मी नरकाचा अग्नि माझ्याकडे येताना पाहिला.’ एक तरुण स्त्री गंधकाच्या वासामुळे अगदी कष्टाने श्वासोच्छवास घेत होती, ‘अगाध कुपातील अग्नि सरोवर व गंधकाचा वास.’” (द कॅंबस्लॅंग रिवाव्हल, द बॅनर ऑफ ट्रुथ, 1971, पृष्ठ 154).

तथापि, नरकावरील माझ्या विश्वासाचा पाया, ह्या मानवी अनुभवावर नाही. मी नरक आहे असा विश्वास धरतो कारण मला पवित्रशास्त्रात देवाने शिकविले आहे. शास्त्रलेखात इतर कुणापेक्षाहि येशूकडे नरकाविषयी सांगण्यासारखे अधिक आहे. त्याच्या काळातील अविश्वासणा-यांना तो म्हणाला, “तुम्ही नरकदंड कसा चुकवाल?” (मत्तय 23:33). ख्रिस्ताने अविश्वासणा-यांना चेतावणी दिली की तुम्ही “नरकात म्हणजे न विझणा-या अग्नीत जाणार” (मार्क 9:43). ख्रिस्ताने श्रीमंत मनुष्य जो नरकात आक्रोश करीत होता त्याविषयी सांगितले, “मी ह्या जाळांत क्लेश भोगीत आहे” (लुक 16:24). स्पर्जन म्हणाले,

नरकात एक तास घालविणे किती क्लेशदायी असेल! अरे, मग तुला तारणारा म्हणून मदत करावी अशी अपेक्षा तुम्ही कशी करता! परंतू दुर्दैव, असा एक तासभर नरकात असे कांही नाही. एकदा का हरविलात, तर तुम्ही अनंतकाळ हरविलात!

पुन्हा स्पर्जन म्हणाले,

तुम्ही एका धाग्याने नरकाच्यावर लटकत आहांत: आणि तो धागा तुटत आहे. केवळ श्वासासाठी धापा टाकणे, एका क्षणासाठी तुमचे ह्दय थांबणे, आणि तुम्ही देवाविना, आशेविना, क्षमेविना, सार्वकालिकतेच्या जगात असणार. अरे, तुम्ही याचा सामना कराल?

एकदा का तुम्ही नरकात गेला, की तुम्हांला कळेल, खूप उशीर झालेला आहे

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही”(इब्री 9:22).

येशू ख्रिस्ताने सांडलेल्या रक्ताने तुमचे पाप शुद्ध होत नाही तोवर तुमच्याबाबत हे घडणार!

मग, तेथे तुमचे पाप ज्यामुळे तुम्ही न्यायसमयी तुम्हांला सामना करावा व शिक्षा सुद्धा भोगावी लागेल. तुम्हंला वाटेल तुमचे पाप गुप्त होते. तुम्ही ते विसरला की

“सगळ्या ब-यावाईट गुप्त गोष्टीचा न्याय करितांना देव सगळ्या कृत्यांची झाडाझडती घेईल... ”(उपदेशक 12:14).

येथे असे कोणी तरी आहे की ज्यांना वाटते आपले पाप लपविले जाईल, आणि त्याच्याविषयी कोणालाहि माहित नाही. ते हे विसरतात की

“परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरे वाईट पाहत असतात...” (नीतिसुत्रे 15:3).

आणि पुष्कळ लोक पाप जे ध्यानात ठेवतात त्याने विषबाधीत झाले आहेत. खरेतर ते त्यांच्या गुप्त पातकामुळे दुर्बळ झाले आहेत. दाविदासारखे त्यांना वाटते “माझे पाप माझ्यापुढे नित्य आहे” (स्तोत्र 51:3). मला वाटते ह्दयरोग, व इतर आजार हे, कबूल न केलेल्या व क्षमा न झालेल्या पापाच्या त्रासाने येतात. महान धार्मिक विद्वान जॉन ओवेन म्हणाले, “विश्वासाने आपणास शुद्धतेचा गुण आणि ख्रिस्ताच्या रक्ताचा प्रभाव मिळतो.” परंतू तुम्हांला कधीहि शांति मिळणार नाही, कारण

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही”(इब्री 9:22).

आणि मग तेथे ह्दयाची पातके आहेत. तुम्हांला असे वाटते की तुमच्या ह्दयातील पातके कोणी पाहात नाही. परंतू तुम्ही चुकीचे आहांत. पवित्रशास्त्र म्हणते,

“ह्दय सर्वात कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे...ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर ह्दय चाळून पाहतो; अंतर्याम पारखितो”(यिर्मया 17:9, 10).

तुमच्या ह्दयातील पातके कोणीहि जाणत नाहीत, परंतू पमेश्वर ह्दय चाळून पाहतो, आणि परमेश्वर त्या गुप्त पातकांचा न्याय करणार, कारण

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही”(इब्री 9:22).

तुमच्या पापापासून स्वातंत्र्य नाही. तुमच्या पापापासून मुक्तता नाही. तुमच्या पापापासून सुटका नाही. तुमच्या पापाची क्षमा नाही. कधीहि त्याच्यापासून स्वातंत्र्य नाही. कधीहि त्याच्यापासून मुक्तता नाही. कधीहि त्याच्यापासून सुटका नाही. कधीहि त्याची क्षमा नाही. किती भयानक दुर्दैवामध्ये तुम्ही आहांत!

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही”(इब्री 9:22).

परंतू देवाचे आभार पवित्रशास्त्रात अधिक कांही आहे.

II. दुसरे, समजा ख्रिस्ताने रक्तसिंचन तुमच्याकडे आहे तर काय होईल.

ख्रिस्ताचे रक्त आपल्या उता-याचा क्रम उलटा करते. येशूच्या रक्ताने तुमची पापे कायमस्वरुपी पुसली जातात! येशूच्या रक्ताने तुमच्या पापाची क्षमा होते. येशूच्या रक्ताने तुमची पापातून सुटका आहे. येशूच्या रक्ताने तुम्हांला पापाच्या बंधनातून स्वातंत्र्य आहे. येशूच्या रक्ताने तुम्हांला पापाची क्षमा आहे. तुम्ही जे स्वर्गाच्या वैभवाची वाट पाहता आहांत ते येशूच्या रक्ताने आहे! आपणास प्रकटीकरणाच्या पुस्तकात ख्रिस्ती लोक येशूसाठी गीत असतांनाची स्वर्गाची झलक दिलेली आहे,

“ते ‘नवे गीत गाऊन’ म्हणतात: तूं गुंडाळी घ्यावयास व तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस; कारण तूं वधिला गेला होतास आणि तूं आपल्या रक्ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत” (प्रकटीकरण 5:9).

आपणांस जे येशूच्या रक्ताने विकत घेतले आहोत ते संपूर्ण अनंतकाळ त्याच्या तारणा-या रक्ताचा महिमा गाऊ! जसे फॅनी क्रोस्बी यांनी तिच्या सुंदर गीतात म्हटले आहे,

तारले आहे, हे सांगण्यास किती मला आवडते!
   तारले आहे कोक-याच्या रक्ताने मला;
तारले आहे त्याच्या अनंत कृपेने मला,
   त्याचे मुल आहे मी अनंतकाळ.
तारले, तारले, तारले आहे कोक-याच्या रक्ताने मला;
तारले, तारले आहे, त्याचे मुल आहे मी अनंतकाळ.
   (“रिडीम्ड” फॅनी जे. क्रोस्बी यांच्याद्वारा, 1820-1915).

माझ्याबरोबर समुहगीत गाऊया!

तारले, तारले, तारले आहे कोक-याच्या रक्ताने मला;
तारले, तारले आहे, त्याचे मुल आहे मी अनंतकाळ.

आम्हांला तारणारे रक्त हे सामान्य रक्त नाही. ख्रिस्ताचे रक्त किती महान आहे हे प्रे. कृ. मध्ये आपण शिकतो. अधिक स्पष्टीकरणासाठी मी न्यू इंटरनॅशनलचे भाषांतर देतोय:

देवाची जी मंडळी त्यांने आपल्या रक्ताने स्वत:करिता मिळविली तिचे पालन तुम्ही करावे”(प्रे. कृ. 20:28).

आपण येथे स्पष्टपणे पाहातो की “देवाच्या रक्ताने” विकत घेतलेले आहोत. ख्रिस्त देवाचा अवतार आहे, “स्वयं देवाचा स्वयं देव” – मानवी देहात देव. त्यामुळे रक्त संबोधने हे बरोबर आहे, “देवाचे रक्त.” त्यामुळे महान स्पर्जन म्हणाले,

“रक्ताविना शुभवर्तमान म्हणजे...सैतानाचे शुभवर्तमान होय.”

“कालवरीवर केलेले रक्ताचे होमार्पण हेच केवळ पाप्यांसाठी आशा आहे.”

म्हणून आधुनिक प्रचारक जे “रक्त” हे केवळ येशूसाठी असलेले दुसरे नाव आहे अशांपासून − सावध असा! रक्ताविना शुभवर्तमान म्हणजे सैतानाचे शुभवर्तमान होय! पुन्हां, महान स्पर्जन म्हणाले,

“अशी कांही पातके असतात ती आपण बोलू शकत नाही, परंतू अशी कोणतेहि पातके नाहीत जी ख्रिस्ताच्या रक्ताने धुतली जात नाहीत.”

चार्ल्स वेस्ली खूप छान म्हणाले,

त्यांने रद्दबादल केलेल्या पापाचे सामर्थ्य मोडले,
   त्यांने बंदिवानास मुक्त केलेल आहे;
त्याच्या रक्त दुर्गंधी स्वच्छ करते,
   त्याचे रक्त माझ्यासाठी लाभदायक आहे.
(“ओ फॉर अ थाऊजंड टंग्ज टू सिंग” चार्ल्स वेस्ली यांच्याद्वारा, 1707-1888; टू द टुनर ऑफ “ओ सेट ये ओपन अनटू मी”).

ते गाऊया!

त्यांने रद्दबादल केलेल्या पापाचे सामर्थ्य मोडले,
   त्यांने बंदिवानास मुक्त केलेल आहे;
त्याच्या रक्त दुर्गंधी स्वच्छ करते,
   त्याचे रक्त माझ्यासाठी लाभदायक आहे.

“तारले आहे, हे सांगण्यास किती मला आवडते!” ते गाऊया!

तारले आहे, हे सांगण्यास किती मला आवडते!
   तारले आहे कोक-याच्या रक्ताने मला;
तारले आहे त्याच्या अनंत कृपेने मला,
   त्याचे मुल आहे मी अनंतकाळ.
तारले, तारले, तारले आहे कोक-याच्या रक्ताने मला;
तारले, तारले आहे, त्याचे मुल आहे मी अनंतकाळ.

“सामर्थ्य आहे रक्तात”! ते गाऊया!

सामर्थ्य, सामर्थ्य, आहे अद्भूत कार्याचे सामर्थ्य
   कोक-याच्या रक्तात;
सामर्थ्य, सामर्थ्य, आहे अद्भूत कार्याचे सामर्थ्य
   कोक-याच्या अनमोल रक्तात!
(“देअर इज पॉवर इन द ब्लड” लेविस इ. जोन्स, 1865-1936).

ते पुन्हा गाऊया!

सामर्थ्य, सामर्थ्य, आहे अद्भूत कार्याचे सामर्थ्य
   कोक-याच्या रक्तात;
सामर्थ्य, सामर्थ्य, आहे अद्भूत कार्याचे सामर्थ्य
   कोक-याच्या अनमोल रक्तात!

मी जेव्हां दक्षिण सॅनफ्रँन्सीस्कोतील सेमीनरी मध्ये होतो तेव्हां हिप्पीरबरोबर पुष्कळ पवित्रशास्त्र अभ्यासास हजेरी लावली. तो काळ 1970 मधील आरंभीच्या येशू चळवळीचा होता. एलएसडी सारखे मन-फिरविणारे औषध पुष्कळ तरुण घेत होते. त्या पापामुळे त्यातील कांहीजण भूतबाधित झाले होते. ते एखाद्या हिंसक जमावासारखे − जंगली बनले होते. मला आठवते की कांही बंधू एका तरुण हिप्पी मुलीमधून सैतानाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनी सैतानाला बाहेर पडण्याचा आदेश दिला, परंतू कांहीच घडले नाही. त्यानंतर एक बंधू गायला लागला,

सामर्थ्य, सामर्थ्य, आहे अद्भूत कार्याचे सामर्थ्य
   कोक-याच्या रक्तात;
सामर्थ्य, सामर्थ्य, आहे अद्भूत कार्याचे सामर्थ्य
   कोक-याच्या अनमोल रक्तात!

ती मुलगी मोठ्याने किंचाळली. त्याने ते गीत पुन्हा गायले,

सामर्थ्य, सामर्थ्य, आहे अद्भूत कार्याचे सामर्थ्य
   कोक-याच्या रक्तात;
सामर्थ्य, सामर्थ्य, आहे अद्भूत कार्याचे सामर्थ्य
   कोक-याच्या अनमोल रक्तात!

ती मुलगी पुन्हा किंचाळली आणि तिच्या मुखातून तो सैतान बाहेर पडला, येशू पृथ्वीवर असतांना जसे केले तसेच त्यांनी केले. थोड्या वेळाने ती मुलगा मुक्त झाली! खाली जमीनीवर बसली व पेलाभर पाणी प्यायली. त्यानंतर मी बराच काळ ओळखीत होतो. ती एक चांगली, खंबीर ख्रिस्ती बनली. मी आमच्या चीनी बॅप्टिस्ट मंडळीच्या पाळक डॉ. लीन यांना ह्याविषयी सांगितले. ते म्हणाले, “होय बॉब. चीनमधील बॅप्टिस्ट मंडळीच्या पाळकांना ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याने भूत काढता येत नसेल तर त्यांचा प्रचार ऐकायला कोणी येणार नाही!” मला ठाऊक आहे की मी ख्रिस्ताच्या रक्ताच्या सामर्थ्याचे अदभूत प्रदर्शन पाहिले आहे! मला खातरी आहे की स्वत: स्पर्जन सुद्धा खुश झाले असते! एलएसडी, हेरॉइन, किंवा सैतान आपल्या तरुणांच्या नाशासाठी वापरतो त्या इतर कुठल्याहि मादक द्रव्यापेक्षा अधिक येशूच्या रक्ताचे सामर्थ्य आहे! येशूचे रक्त आपल्या ह्दयातील किंवा जीवनातील कोणतेहि पाप शुद्ध करिते!

मी “द फ्री ग्रेस ब्रॉडकास्टर” ची प्रत शोधत होतो. ती – जॉन गील, जे.सी.रेल, ऑक्टॅविस विन्स्लो, आणि स्पर्जन सारख्या पुष्कळ महान प्रचारकाच्या उपदेशाने नियमीत अद्यावत केलेली असायची. प्रायश्चित, शांत करणे, पाप विमोचन यातील ख्रिस्ताचे सामर्थ्य या विषयावरील ह्या थोरांचे उपदेशाची प्रत मी शोधत होतो. त्यातील महान काल्पनिक प्रचारक असे म्हणाले,

ख्रिस्ताच्या रक्तातील अमुल्य अशा महत्वाच्या घटकांचे अस्तित्व आहे. पापाच्या व्हायरसाद्वारे ते रक्त वाहिन्यातून अस्पृश्य, अस्पष्ट असे वाहते...पवित्र तारणारा अपवित्र, पापी मनुष्याकरिता आपले निष्कलंक प्रायश्चिताचे अर्पण केले. त्यामुळे त्याच्या रक्ताचे अमुल्यत्व आहे.
      प्रियांनो, ह्यातील प्रकाशाकडे, पाहा: आणि जसे तुम्ही ख्रिस्त व त्याचे [ज्याने तुमचा विवेक शुद्ध होतो] रक्त जे तुम्हांला क्षमा करते, पांघरुन घालते, व तुमचा अपराधीपणा काढून टाकते त्याच्यापुढे गुडघ्यावर याल तर तुमचे ह्दय प्रेमळ भक्तीने व स्तुतीने भरुन जाईल.

आणि ज्यांचे अजून परिवर्तन झाले नाही त्यांना पापापासून सुटका, पापक्षमा ह्यांचा वापर करु. मुस्लीम लोकांची पापक्षमा होत नाही. असे तो म्हणतहि नाही, कारण पापक्षमा कशी मिळते हे कुराण त्यांना सांगत नाही. चांगला मनुष्य बनून तारण मिळविण्याचा प्रयत्न करण्या-या माणसाला भेटा. तो म्हणतो, “मला आशा आहे की माझ्या पापाची क्षमा होईल.” एका नास्तिक किंवा देलाला न मानणा-या माणसाला भेटा. त्यांच्या पापाची क्षमा होते हे त्यांना माहितच नसते.

ह्या संध्याकाळी मला एक हरविलेला माणूस, किंवा स्त्री, किंवा तरुण मनुष्य मिळेल का? हरविलेला व्यक्ति! तुम्ही हरविले आहांत असे तुम्हांला वाटते का? असे जर असेल मला खूप आनंद वाटेल. येशऊ ख्रिस्ताच्या रक्ताच्याद्वारे – त्यांच्यासाठी पापातून सुटका, व पापक्षमा आहे. अहो पाप्यांनो, पाहा! गेथशेमाने बागेत येशू ख्रिस्त तुमच्यासाठी रक्ताच्या घामाचे थेंब गाळत असलेले तुम्ही पाहता का? वधस्तंभावर खिळलेला येशू तुम्ही पाहता का? तो तेथे तुमच्यासाठी खिळलेला आहे. हो, ह्या संध्याकाळी तुमच्यासाठी वधस्तंभावर मी खिळलेलो असतो तर, तुम्ही काय केले असते ते मला ठाऊक आहे: तुम्ही खाली पडून माझ्या पायाचे चुंबन घेतले असते, आणि मी तुमच्यासाठी रडून आक्रोश केला असता. परंतू, हरविलेल्या पाप्यांनो, येशू तुमच्यासाठी मरण पावला – तुमच्या साठी! आणि त्यांने तुमच्यासाठी रक्त सांडल्याने, तुम्ही त्याच्याकडे आला व त्याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही हरवू शकणार नाही. काय तुम्ही, मग, पापी आहांत? तुम्हांला पापाची खातरी झाली कारण तुम्ही अजून पूर्णपणे ख्रिस्तावर विश्वास ठेवला नाही ना? तुम्हांला प्रचार करण्याचा मला अधिकार आहे. येशूवर विश्वास ठेवा आणि तुम्ही हरविणारच नाही! शू स्वत: येशूवर विश्वास ठेवा, कारण तो तुमच्यासाठी मेला म्हणून नव्हे. परंतू स्वत: ये ख्रिस्तावर विश्वास ठेवा.

तुम्ही पापी नाही असे तुम्हांला वाटते काय? क्षमा करण्यास तुम्ही कोणतेच पाप केले नाही असे तुम्हांला वाटते काय? मग तुम्हांला सांगण्यास माझ्याकडे ख्रिस्त नाही. तो चांगल्या लोकांना तारावयास आला नाही; तो पाप्यांना तारावयास आला. तुम्ही पापी आहांत का? तुम्हांला तुमचे पापीपण जाणवते का? तुम्ही हरविलेले आहांत का? तुम्हांला ते ठाऊक आहे का? तुम्ही पापी आहांत का? तुम्ही ते कबूल करता का? पाप्यांनो! आज या संध्याकाळी येशू येथे असता तर, त्यांने त्याचे रक्ताने माखलेले हात पसरले असते व म्हटला असता, “पाप्यांनो, मी तुमच्यासाठी मेलो आहे. तुम्ही विश्वास ठेवता काय?” तो येथे व्यक्तीश: हजर नाही, परंतू त्यांने मला हे सांगण्यास पाठविले आहे. त्याच्यावर विश्वास ठेवता काय? “अरेरे!” परंतू तुम्ही म्हणता, “मी खूप भयंकर पापी आहे!” “अरेरे!” येशू म्हणतो, “त्याचमुळे मी तुमच्यासाठी मेलो आहे, कारण तुम्ही पापी आहांत.” “परंतू,” तुम्ही म्हणता, “मी अशा कांही गोष्टी केल्या व असा कांहीं विचार केला आहे त्याची मला लाज वाटते.” येशू म्हणतो, “त्या सर्वांची क्षमा झाली आहे, माझे हात, व पाय, व कुशीतून वाहिलेल्या रक्ताने ते सर्व धुऊन गेले आहे. केवळ माझ्यावर विश्वास ठेव; एवढेच मी तुझ्याकडे मागतो.” स्वत: येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा.

पण कोणी ती म्हणेल, “मला तारणा-याची गरज नाही.” मग माझ्याकडे याशिवाय बोलण्यासारखे कांही नाही − “क्रोध येणार आहे! क्रोध येणार आहे!” तुम्हांवर न्याय येत आहे!

परंतू तुम्हांला वाटते का तुम्ही अपराधी आहांत? तुम्ही तुमच्या पापाचा द्वेष करता का, आणि त्या पासून वळण्याची व ख्रिस्ताकडे येण्याची तुमची इच्छा आहे का? मग मी तुम्हांला सांगू शकतो की ख्रिस्त तुमच्यासाठी मेला आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवा! त्याच्यावर विश्वास ठेवा! स्वत: येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा!

एका शहरात स्पर्जन प्रचारासाठी जात असतांना एका तरुणाने त्यांना पत्र लिहले. तो म्हणाला, “महोदय, जेव्हां तुम्ही याल तेव्हां माझ्यासाठी योग्य असा उपदेश सांगा. मी ऐकलेले आहे की आम्ही स्वत:ला जगातील सर्वात दुष्ट व्यक्ति समजावे, नाही तर आमचे तारण होणार नाही. मी स्वत:ला दुष्ट समजण्याचा प्रयत्न केला, परंतू ते शक्य झाले नाही. मला तारण मिळवायचे आहे, परंतू कसा पश्चाताप करावा ते ठाऊक नाही.” स्पर्जन म्हणाले, “तेथे मी जेव्हां प्रचाराला जाईन तेव्हां तो पहायला मिळेल तर, मी त्याला सांगेन, की तुम्ही स्वत:ला जगातील सर्वात दुष्ट व्यक्ति समजावे अशी देव अपेक्षा करीत नाही, कारण तेथे तुमच्यापेक्षा अधिक लोक दुष्ट आहेत. तेथे असे कांही लोक आहेत जे दुस-यां एवढे पापी नाहीत.”

देवाला काय हवे ते हे आहे: तो मनुष्य म्हणतो, ‘माझ्याविषयी मला इतर लोकांपेक्षा अधिक माहिती आहे. त्यांच्याविषयी मला अधिक माहिती नाही. परंतू जे कांही माझ्याविषयी पाहातो, विशेषत: माझ्या ह्दयाविषयी, पुष्कळजण माझ्या एवढे वाईट आहेत असे मला नाही. माझ्यापेक्षा अधिक वाईट गोष्टी ते करत असतील, परंतू मी अधिक उपदेश, अधिक इशारे, ऐकले आहेत त्यामुळे मी अधिक अपराधी आहे.’ तुम्ही स्वत: ख्रिस्ताकडे यावे असे मला वाटते, आणि म्हणा, ‘प्रभू, मी पाप केले आहे.’ तुमचे कर्तव्य हे की तुम्ही यावे व म्हणावे, ‘प्रभू येशू, माझ्यासारख्या, एका पाप्यावर दया कर.’ केवळ एवढेच. तुम्ही हरविले आहांत असे वाटते काय? मग मी पुन्हा म्हणतो, ‘स्वत: येशूकडे या. तो तुमचे पाप त्याच्या मौल्यवान रक्ताने शुद्ध करील.’”

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही”(इब्री 9:22).

ह्या उपदेशाच्या शेवटी मी म्हणेन येथे हरविलेला पापी नाही, ज्याला माहित आहे की तो हरविलेला आहे, ज्याच्या सर्व पापांची क्षमा झालेली नाही आणि “देवाची आशा आणि महिमा यात आनंद करितो.” नरकातील पापासारखे तुम्ही काळे असाल तरी, तुम्ही याच संध्याकाळी स्वर्गासारखे शुभ्र व्हाल. ज्या क्षणी पापी येशूवर विश्वास ठेवतो त्याक्षणी तो येशूच्या रक्ताने तारला जातो. हे वचन तुमच्या ह्दयात व जीवनात खरे होऊ दे:

जसा मी आहे, एकाहि विनंती विना
   परंतू तुझे रक्त माझ्यासाठी सांडले आहे;
आणि तूं मी तुझ्याकडे येण्याची विनंती ऐक,
   हे देवाच्या कोक-या, मी येतो! मी येतो!
(“जस्ट एज आय एम” चार्ललोट एलिओट यांच्याद्वारा, 1789-1871).

पहिल्या दोन रांगेत या. देवाकडे आपले पाप कबूल करा. मग येशूवर विश्वास ठेवा, येशूकडे या, आणि येशूच्या मौल्यवान रक्ताने तुमचे पाप धुऊन शुद्ध व्हा.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले: “देअर इज अ
फाऊंटेन”(विलीयम काऊपर, यांच्या द्वारा, 1731-1800; “अमेझिंग ग्रेस” ची चाल).
“There Is a Fountain” (by William Cowper, 1731-1800; to the tune of “Amazing Grace”).


रुपरेषा

रक्तासह किंवा रक्ताशिवाय

WITH OR WITHOUT BLOOD

डॉ. आर.एल. हायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“रक्त ओतल्यावाचून पापक्षमा नाही” (इब्री 9:22).

I.   प्रथम, ख्रिस्ताने रक्त ओतल्यावाचून तुमचे काय होईल ते समजा, मत्तय 23:33;
 मार्क 9:43; लुक 16:24; उपदेशक 12:14; नीतिसुत्रे 15:3;
स्तोत्र 51:3; यिर्मया 17:9, 10.

II.  दुसरे, समजा ख्रिस्ताने रक्तसिंचन तुमच्याकडे आहे तर काय होईल, प्रकटी 5:9;
प्रे.कृ. 20:28.