Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




स्नान करा व शुद्ध व्हा! - परिवर्तनाचे प्रकार

WASH AND BE CLEAN! – THE TYPOLOGY OF CONVERSION
(Marathi)

डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एजिल्स बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, 15 ऑक्टोबर, 2017
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, October 15, 2017

“जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तूं शुद्ध होशील” (II राजे 5:10).


ही एक साधी गोष्ट आहे. परंतू ह्याल खूप गहन अर्थ आहे. तुमचे अजून तारण झाले नसेल तर तुम्ही हे लक्षपूर्वक ऐका. तुम्हांला त्यावर कृति करावयाची आहे. ख-या अर्थाने तारण होण्याचा एकमेव मार्ग आहे हे तुम्हांला दाखवितो.

ही एक साधी गोष्ट आहे. तारणाचा व खरे ख्रिस्ती होण्याचा एकमेव मार्ग हे तुम्हांला दाखविण्यासाठी हे पवित्रशास्त्रात दिले आहे.

नामान हा मोठा मनुष्य होता. तो अरामी सेनेचा सेनापति, मुख्य होता. तो पराक्रमी वीर होता. तो धन्याच्या पदरी एक थोर, व प्रतिष्ठित मनुष्य होता. परंतू तो एका भयंकर असा कोडाच्या आजाराने त्रस्त होता. तो त्या कोडाने मरत होता व ते त्याला माहित होते. त्याने सर्वकांही प्रयत्न केले होते, पण कशानेहि त्याचा कोड बरा झाला नाही. एक तरुण इब्री मुलगी नामानाच्या घरात काम करत होती. तिने त्याला सांगितले की इस्त्राएलमध्ये एक संदेष्टा आहे जो हे कोड बरा करु शकतो. त्याने सर्वकांही प्रयत्न केले होते, पण कशानेहि त्याचा आजार बरा झाला नाही. शेवटी नामाने विचार केला, “कदाचित हा संदेष्टा मला बरे करील.” बरे होण्याची ही त्याची शेवटची संधी होती, म्हणून तो देवाचा संदेष्टा, अलिशास बघायला आला.

परंतू संदेष्टा हा देवाचा प्रामाणिक मनुष्य होता. तो घरा बाहेर जाऊन नामानसाठी प्रार्थना केली असती तर, त्या मनुष्याने विचार केला असता की, संदेष्ट्याने त्यांस बरे केले. संदेष्ट्यास नामानाला दाखवायचे होते की तो देव होता ज्याने त्यांस बरे केले, संदेष्टा स्वत: नाही. म्हणून नामान आपल्या रथातून संदेष्ट्याच्या घरी आला. परंतू संदेष्टा त्याच्याशी बोलण्यास गेला नाही. त्याऐवजी त्यांने नामानास एक संदेश पाठविला,

“जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तूं शुद्ध होशील” (II राजे 5:10).

त्यामुळे नामान अगदीच रागाविला. “का, हा संदेष्टा मला पाहायला सुद्धा आला नाही! असो, हा स्वत:ला कोण समजतो?” त्याला वाटत होते की त्याने बाहेर येऊन “आपला हात पुढे करुन रोगाच्या जागी ठेवावा, आणि मला कोडातून बरे करावे.” बेन्नी हिन प्रमाणे हा संदेष्टा आहे असे त्याला वाटले. त्याचा त्याला मोठे प्रदर्शन करायचे होते, त्या माणसास महान विश्वासाने आरोग्य देणारा करायचे होते. परंतू संदेष्ट्यास सर्व गौरव देवाला द्यायचे होते. त्याने नामानाला साधा एक संदेश पाठविला,

“जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तूं शुद्ध होशील” (II राजे 5:10).

नामानाला खूप राग आला. रागाच्या भरात तो परत जाऊ लागला!

मग नामानाचा सेवक त्याला म्हणाला, “संदेष्ट्याने आपल्याला कांही अवघड काम सांगितले असते तर, आपण केले नसते काय? तर स्नान करुन शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते का करु नये का?” मग नामानाने विचार केला, “ठिक आहे, संदेष्ट्याने जे सांगितले ते केले.” तो यार्देन नदीत गेला आणि सात वेळा बुचकाळ्या मारल्या, “तेव्हां त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरा [सारखे] होऊन तो शुद्ध झाला” (II राजे 5:14).

पुष्कळ मोठे उपदेश शास्त्राच्या ह्या उता-यावर सांगितले गेले. स्पर्जन सारखे, महान प्रचारक, नामानाची कोडातून शुद्धता होणे म्हणजे येशूने वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताने पाप्याची शुद्धता होणे हे त्यांचे सांगणे बरोबर आहे. ऐका आणि आज सकाळी तारण व आपल्या पापातून शुद्धता कशी मिळवावी हे नामानाची गोष्ट आपणांस दर्शविल!

I. प्रथम, त्याला कोड होते.

“तो कोडी होता” (II राजे 5:1). `

मग तुम्ही आहांत. तुम्ही पापाच्या कोडाने भरलेले आहांत! पापाच्या कोडाने तुम्हांस पहिला पापी, आदामापासून खाली आणले. प्रेषित पौल म्हणतो,

“एका माणसाच्या द्वारे पाप जगांत शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वानी पाप केल्यामुळे लर्व माणसांमध्ये अशाप्रकारे मरण पसरले” (रोम 5:12).

ह्या सकाळी तुमचे काय वर्णन आहे! डॉ. वॅट्स यांनी तुमची स्थिती ह्या गीतात सांगितली आहे,

प्रभू, मी क्षुद्र आहे, पापाची जाणीव झाली,
   आणि अपवित्र व अशुद्ध असा जन्मलो;
जो पापाने पडला त्या माणसातून बाहेर आलो
   भ्रष्ट पीढी, आम्हांस कलंकीत करणा-यांतून.

पाहा, मी तुझ्या मुखासमोर पडलो,
   तुझी कृपा हे माझे आश्रयस्थान;
कोणतीही बाह्य वस्तू मला शुद्ध करीत नाही;
     कोड माझ्यात खोलवर आहे.
(डॉ. इस्साक वॅट्स, 1674-1748).

कोडाचे पाप तुमच्या “आत खोलवर आहे”! ह्या सकाळी तुमचे वर्णन आहे! “कोडाचे पाप तुमच्या आत खोलवर” आहे! येशू म्हणाला,

“आतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चो-या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अंहकार, मुर्खपणा ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करितात...” (मार्क 7:21-23).

हे तुमच्या अंत:करणाचे चित्रण आहे, पूर्ण दुष्ट विचाराने भरलेले. तुमचे अंत:करण पूर्ण कोडाच्या पापाने भरलेले आहे!

कोणतीही बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध करीत नाही;
कोड माझ्यात खोलवर आहे-

नाही का? नाही का? तुम्हांला ते माहित आहे हो ना! आणि कोणतीही बाह्य वस्तू [बाह्य कृति] तुम्हांला शुद्ध करीत नाही! कोणताही निर्णय अथवा प्रार्थना तुम्हांला शुद्ध करीत नाही! कोणतीही जाणीव अथवा शिक्षण तुम्हांला शुद्ध करीत नाही! आणि तुम्हांला ते माहित आहे! “कोडाचे [पाप] तुमच्या आत खोलवर” आहे! आणि तुम्हांला ते माहित आहे - नाही का?

तुम्हांला माहित आहे ते सत्य आहे. तुम्ही बाह्य पाप करण्यापूर्वी तुम्हांला माहित असते. तुम्ही ते जाणूनबुजून केले! तुम्ही काय करीत आहां हे तुम्हांला माहित असते. ते चुकीचे आहे ते माहित असताना तुम्ही का केले? तुम्ही तुमच्या अपरिवर्तित स्थितीत तुम्हांस अंधकार आवडतो. तुम्ही पाप उपभोगले. पाप करताना तुम्ही आनंदी होता. तुम्हांला त्याची चव आवडली. चुकीचे आहे हे तुम्हांला माहित असताना सुद्धा ते तुम्हांला आवडले! त्यामुळेच तुम्हांला तुमच्या पापी अंत:करणाविषयीचे सत्य ऐकायला आवडत नाही! तुम्ही मला तुमच्या दुष्ट अंत:करणाविषयी सांगायला आवडत नाही – नाही का? ते तुम्हांला दोष लावते आणि सत्य ऐकायला दु:ख होते. कोड आत खोलवर आहे! तुमचे अंत:करण पिळवटलेले व विकृत आहे. जे चांगले व बरोबर आहे ते करण्याऐवजी तुम्ही पापात आनंद करता. तुमच्या अविश्वासू दुष्ट खोल अंत:करणात कोड वसते! मी ते वर केले नाही. डॉ. मार्टीन लॉईड-जोन्स, एक वैद्कीय तज्ञ ज्यांना तुमच्या सारख्या पापी अंत:करणाविषयी सर्वकांही ठाऊक होते त्यांचा मी चुकीचा अर्थ काढला होता!

II. दुसरे, शुद्ध कसे व्हावे हे संदेष्ट्याने सांगितल्यावर तो खिन्न झाला.

संदेष्याने “जा व स्नान कर” असे सांगितले तेव्हां त्यास राग आला. तो म्हणाला, “मला वाटले [संदेष्टा माझ्यासाठी प्रार्थना करील].” “मला वाटले.” तुम्हांला वाटते तारणासाठी काय करायला पाहिजे हे तुम्हांला ठाऊक आहे. “मला वाटले.” तुमच्या चुकीच्या विचारापासून दूर! तारणाविषयी तुम्हांला काय वाटते या विचारावर मात करा. त्याच्याविषयी तुम्हांला कांही माहित नाही! मुडी म्हणाले,

नामानाला आजार होता – गर्व व कोडाचा. कोडा एवढाच गर्व सुद्धा बरा व्हायला हवा. गर्वाच्या रथातून नामानाला खाली उतरायला हवे होते; त्यानंतर जसे सांगितले होते तसे स्नान करायला हवे होते.

आणि तेच ह्या सकाळी तुमच्याबाबतीत व्हायला हवे. तुम्हांला तारण हवे असेल तुम्हांला सुद्धा तेच करायला हवे. “तुम्हांला काय वाटते” यातून बाहेर या. तुमचा गर्व व तारण कसे मिळेल या तुमच्या विचारातून बाहेर या. तुम्हांला जसे सांगितले होते तसे तुम्ही स्नान करायला पाहिजे. “जाऊन स्नान कर... आणि तूं शुद्ध होशील.” हरविलेली व पापी व्यक्ति म्हणून येशूकडे या. येशूकडे या तो तुमचे पापी अंत:करण त्याने शुद्ध होण्यासाठी वधस्तंभावर सांडलेल्या रक्ताने शुद्ध करील! “त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते” (I योहान 1:7). “स्नान करा व शुद्ध व्हा!” तेच परमेश्वर स्वत: तुम्हांला आता सांगत आहे! “स्नान करा व शुद्ध व्हा!”

तुमच्या गर्वावर मात करीत नाही तोवर तुम्ही शुद्ध होत नाही. तुमचे ह्दय बदलले पाहिजे. तुम्ही पश्चाताप करीत नाही तोवर तुम्हांस क्षमा मिळत नाही. तुमचे ह्दय बदलले पाहिजे. तुमचा स्वार्थीपणा तुम्हांस जाणविला पाहिजे. तुम्हांस तारण जाणविले पाहिजे. तुमचे तारण झाले आहे ह्याची खात्री हवी. तुम्ही जे आहांत ते तुम्ही बदलू इच्छित नाही. तुम्हांस तुमचे तारण व्हावेसे वाटते म्हणून तुम्ही स्वार्थी जीवन जगू शकता.

पालट आपल्यास आपल्या ह्दयाचा संपूर्णत: झालेला बदल सांगतो. तुमचा मूलत: स्वभाव खोटा आहे. तुमचा स्वभाव आतून कुजलेला आहे. तुमच्यातील बदल हा एवढा पायाभूत असला पाहिजे की तुम्ही स्वत: मेले पाहिजे आणि नवीन जीवनांत पुन्हा जन्मले पाहिजे, स्वत:स खुष करण्याऐवजी देवाला खुष करण्यास जीवनाचे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. कांही पापे सोडून देणे साहाय्यभूत होणार नाही केवळ मंडळीत जाणे आणि केवळ प्रार्थना म्हणणे हे तुम्हांला साहाय्यभूत होणार नाही. तुमच्याकडे नवीन स्वभाव, संपूर्ण नवीन जीवन असले पाहिजे.

त्यांच्या परिवर्तनासाठीचा संघर्ष जॉन कागॅनकडून ऐकला पाहिजे. “माझ्याकडे सर्वकांही होते त्याने मी कंटाळलो होतो. मला माझ्या पापाची जाणीव झाली होती तरीहि माझ्याकडे ख्रिस्त नाही. तारण व्हावे म्हणून मी प्रयत्न करीत होतो. मी ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास प्रयत्न करीत होतो परंतू ठेऊ शकत नाही. ख्रिस्ती होण्याचा मी [निर्णय] घेऊ शकत नाही. मला ते असाहाय्य बनविते. नरकात ढकलतांना मला माझे पाप जाणवत होते तरीहि माझा कठोरपणा माझे अश्रू गाळतांना जाणवत होता. मी ह्या वादात अडकलो होतो.”

तुम्हांला ह्या सकाळी असे कांही वाटते का? जर वाटते, तर तुम्हांला ते का आवडते? कारण तुम्हांला तुमच्या ह्दयात बदल न करता तारण व्हावेसे वाटते. तुम्हांला तुमच्या ह्दयात बदल न करता तुम्हांस आम्ही स्विकारावे असे तुम्हांला वाटते. परंतू हे शक्य नाही! तुम्ही नव्याने जन्मले पाहिजे. तुमच्या जीवनापेक्षा देवावर जास्त प्रेम करणारे नवीन ह्दय पाहिजे. तुम्ही पश्चाताप केला पाहिजे. तुम्ही जे आहांत त्याचा द्वेष केला पाहिजे! तुम्ही तुमचा गर्व सोडला पाहिजे अन्यथा तुम्ही तुमच्या पापातच मराल. कोडाच्या पापाने तुमचे अंत:करण नियंत्रित केले आहे. जॅक नगान म्हणाले, “देवाने तुम्ही स्वत:चा द्वेष करणारे बनवावे.”

कोणतीही बाह्य वस्तू [तुम्हांला] शुद्ध करीत नाही;
कोड माझ्यात खोलवर आहे.

मुडी बरोबर होते,

नामानाला आजार होता – गर्वकोडाचा. कोडा एवढाच गर्व सुद्धा बरा व्हायला हवा. गर्वाच्या रथातून नामानाला खाली उतरायला हवे होते; त्यानंतर जसे सांगितले होते तसे स्नान करायला हवे होते.

जॉल कागॅन म्हणाले, “मी अधिक काळ माझ्या स्वत:ला सावरु शकलो नाही. मला येशू हवा होता. त्या क्षणाला मी ख्रिस्ताला विरोध करण्याचे थांबविले. हे अगदी स्पष्ट होते की मला करायचे होते जे म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचा; मला चांगले [आठवते] मला हे होणे बंद झाले आणि तो केवळ ख्रिस्त होता...मी माझ्या पापापासून मागे फिरलो, आणि केवळ येशूकडे पाहिले!....येशूने [माझ्या अंत:करणातील पाप] घालविले आणि त्याऐवजी मला प्रेम दिले...येशूने माझी सर्व पापे घालविली. त्यांने मला नवीन जीवन दिले.”

देवाचा पुत्र, येशूवर ज्या क्षणाला तुम्ही विश्वास ठेवता, “त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे रक्त [तुम्हांस] सर्व पापापासून शुद्ध करते” (I योहान 1:7). सर्व पाप! सर्व पाप – तुमच्या ह्दयाचे पाप असो, अथवा तुम्ही केलेले पाप असो – येशूचे रक्त सर्व पापापासून शुद्ध करते – आणि केवळ देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्या रक्ताद्वारे. तुम्हाला शुद्ध करण्यासाठी त्याने वधस्तंभावर रक्त सांडले. त्याने हे का केले? कारण तो तुच्यावर प्रेम करतो. त्याच्या रक्ताने तो तुम्हांस शुद्ध करु इच्छितो!

माझे पाप कसे शुद्ध होऊ शकते?
   येशूच्या रक्ताशिवाय कोणी नाही;
पुन्हा मला परिपूर्ण कोण करु शकते?
   येशूच्या रक्ताशिवाय कोणी नाही.
हो! मोलवान असा प्रवाह आहे
   जो मला बर्फासारखा पांढरा करतो;
दुसरा कोणता उगम मला ठाऊक नाही,
   येशूच्या रक्ताशिवाय कोणी नाही.
(“नथिंग बट द ब्लड” रॉबर्ट लॉवरी यांच्या द्वारा, 1826-1899).

तुम्ही बराच काळापासून पापात आहांत. जॉन कागॅनसारखे तुमचे तारण झाले असते असे तुम्हांला वाटत होते. त्याच्या सारखी वाट पाहात होता. परंतू ते तुम्हांला अशक्य असे वाटले. तुम्ही पशूवत आहांत असे तुम्हांला वाटले. तुम्ही भयंकर पापी आहांत असे तुम्हांला वाटले. तुम्ही आशाहीन आहांत असे तुम्हांला वाटले. परंतू तुम्ही चुकीचे होता! येशू तुमच्यावर प्रेम करितो. तुम्ही ओळखित असलेल्या कोणापेक्षाहि तो तुमच्यावर प्रेम करितो. तुमच्या ह्दयात पाप आहे हे त्यांना ठाऊक असल्यास ते तुमच्यावर प्रेम करणार नाहीत. परंतू येशू कोणत्याहि स्थितीत प्रेम करितो. येशू म्हणतो, “माझ्याकडे या – आणि माझ्या रक्ताने शुद्ध व्हा.” येशू म्हणतो, “स्नान करा व शुद्ध व्हा.” तुम्ही तुमचा गर्व सोडावा आणि त्याच्यावर विश्वास ठेवावा एवढीच त्याची तुमच्याकडे मागणी आहे. मग एके दिवशी तुम्ही स्वर्गात गीत गाणार,

“जो आपल्यावर [माझ्यावर] प्रीति करितो, आणि आपल्याला [मला] त्याच्या स्वत:च्या रक्ताने पापापासून शुद्ध करितो” (प्रकटी 1:5).

“स्नान करा व शुद्ध व्हा.” मि. ग्रिफिथ या आणि पुन्हा गा “यस्, आय नो.”

ज्यांना शुद्ध व्हायचे आहे त्यांनी त्यांच्या पुढच्या जागेवरच थांबा आणि येशूवर विश्वास ठेवण्यासंबंधी आम्ही तुमच्याशी बोलू.

डॉ. चान, कृपया पुढे या व त्यांच्यासाठी प्रार्थना करा, आणि मग आपण सहभागिता हॉलमध्ये भोजन करणार आहोत त्यावर आशिर्वाद मागा व धन्यवाद द्या. आमेन.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपदेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रीफिथ यांनी गायले:
“यस्, आय नो!” (अण्णा डब्लू. वॉटरमॅन यांच्याद्वारा, 1920).
“Yes, I Know!” (by Anna W. Waterman, 1920).


रुपरेषा

स्नान करा व शुद्ध व्हा! - परिवर्तनाचे प्रकार

WASH AND BE CLEAN! – THE TYPOLOGY OF CONVERSION

डॉ. आर.एल. ङायमर्स, ज्युनि. यांच्याद्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“जाऊन यार्देनेत सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तूं शुद्ध होशील” (II राजे 5:10).

(II राजे 5:14)

I.   प्रथम, त्याला कोड होते, II राजे 5:1; रोम 5:12; मार्क 7:21-23.

II.  दुसरे, शुद्ध कसे व्हावे हे संदेष्ट्याने सांगितल्यावर तो खिन्न झाला,
I योहान 1:7; प्रकटीकरण1:5.