Print Sermon

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 37 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. तसेच मुस्लीम हिंदू राष्ट्रांसह संपूर्ण जगामध्ये, सुवार्ता प्रसार करण्याच्या कार्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.
मला तुझे तेज दाखीव

SHOW ME THY GLORY
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बॅप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
शनिवारी संध्याकाळी, दि. 12, ऑगष्ट 2017 रोजी.
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Saturday Evening, August 12, 2017


कृपया माझ्यासह तुमच्या पवित्रशास्त्रातून निर्गमचा अध्याय 33 उघडा. ते स्कोफिल्ड स्टडी बायबलमध्ये पृष्ठ क्रं.115 वर आहे. आता उभा राहा व निर्गम 33:18 कडे पाहा. इथे देवाला केलेली मोशेची प्रार्थना आहे,

“तो त्याला म्हणाला, कृपा करुन मला तुझे तेज दाखीव” (निर्गम 33:18).

आपण खाली बसू शकता. तुम्हांला जॉन सॅम्युएलचा उपदेश, “प्रार्थनेतील व्यवस्था व विवाद,” आठवत असेल तर तुम्हांस निर्गम अध्याय 32 आणि 33 मध्ये, अशा पुष्कळ प्रार्थना सापडतील. मोशे देवाक़डे प्रार्थना करतो, वचन 15 आणि 18 मध्ये शिगेला पोहंचते. वचन 15 मध्ये मोशे म्हणतो, “तूं स्वत: येत नसलास तर आम्हांला येथून पुढे नेऊ नको.” वचन 18 मध्ये मोशे म्हणतो, “कृपा करुन मला तुझे तेज दाखीव.” “तेज” साठी इब्री शब्द कावोद आहे ज्याचा अर्थ “देवाचे वजन” असा आहे. माझ्या जीवनात मी कांही वेळेस व्यक्तीगतरित्या “वजन” अनुभवले आहे. जेव्हां मी 15 वर्षाचा होतो तेव्हां मी वनराशीच्या कबरेमध्ये गवत घालत असायचो तेव्हां, एखाद्या बेडशीट प्रमाणे हळूवार देवाचे वजन खाली आल्याचा अनुभव घेतला. तीन वेगवेगळ्या संजीवनातील हवेमध्ये, माझ्याभोवती कावोद अनुभवल्याचा मी साक्षी आहे. ब्रायन एच. एडवर्ड म्हणाले, “देवाची ‘समक्षता’ मानवी स्पष्टता परिभाषित करते, परंतू संजीवनाच्या अनभूतीसाठी अपवादात्मक जबाबदार आहे”(संजीवन: देवा बरोबर संतृप्त असलेले लोक, पृष्ठ 136). “आदाम आणि हवा देवाची समक्षतेपासून लपले, आणि काईन ‘देवाच्या समक्षतेतून निघून गेला’’’(ibid., पृष्ठ 135). “संजीवनामध्ये देवाची समक्षतेची वास्तव [स्पर्शनीय] अनभूती घेतली” (ibid., पृष्ठ 134). “संजीवनामध्ये [देवाची समक्षता] इतकी वास्तविक होते की ती त्यावेळी भरभरुन जाते” (ibid., पृष्ठ 135).

“संजीवन काय याची ही गुरुकिल्ली आहे. आरधनेसाठी एकच पैलू असता तर त्याची आज कमतरता आहे, हा देवाच्या समक्षतेचा अनुभव आहे...त्यामुळेच आराधनेत आपण निष्काळजी वागतो. संजीवनामध्ये आत्म्याचे खोल कार्य हे अनुभव जो देवाची समक्षता आहे हे जाणवून देतो यासाठी ओळखले जाते...संजीवन वेगळे आहे. देव तेथे असल्याचे ओळखले जाते, आणि अविश्वासू सुद्धा जोरकसपणे कबूल करतात की ‘खरोखर तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य आहे,’ I करिंथ 14:25” (ibid., पृष्ठ 134). “जेव्हां देवाचा आत्मा [खाली] येतो तेव्हां तो मंडळीच्या प्रार्थना वर घेतो आणि त्यांच्यात नवजीवन फुंकतो” (ibid., पृष्ठ 129). “संजीवनामध्ये, प्रार्थना ही आनंद व हर्ष बनून जाते” (ibid., पृष्ठ 128) पाप कबूली ख्रिस्ती लोकांच्यामध्ये ख्रिस्ताच्या रक्ताने नवीन शुद्धता घेऊन येतो.

सॅक्सोनीमध्ये, “ख्रिस्ताच्या जवळीकतेची जाणीव आम्हां सर्वांना त्याचवेळी देण्यात आली...परमेश्वराने [तेथे] काय केले, त्यावेळेपासून त्यावर्षीच्या हिवाळ्यापर्यंत, व्यक्त न करण्यासारखा आहे. माणसांसह संपूर्ण जागा देवाच्या मंडपासारखी दिसली” (ibid., पृष्ठ 135). 1907 मध्ये कोरियात, “जेवढ्या व्यक्ति मंडळीत आल्या त्या [प्रत्येकांस], देवाच्या पूर्ण समक्षतेचा अनुभव त्या खोलीत आला...त्या रात्री तेथे देवाच्या जवळीकतेच्या जाणीवेचे वर्णन करणे अशक्य आहे” (ibid., पृष्ठ 135,136).

नोव्हेंबर 1980 मध्ये मी व माझा मित्र दूरदर्शन कार्यक्रम करीत होतो त्यासाठी डॉ. जॉन राईस यांची मुलाखत घेण्यासाठी, मरफ्रीस्बोरो, टेनेसीला गेलो. डॉ. राईस हे खूप वयस्क, आणि स्ट्रोकमुळे अपंग झाले होते. वयाच्या 85 व्या वर्षी व्हीलचेअरवरुन त्यांना आम्हांला बघण्यासाठी आणले होते. मला व माझ्या मित्राला हवेत “कावेद” मोठ्या प्रकाशासारखे खाली आल्याचे जाणवले. मला ठाऊक आहे की देव खाली आला कारण मागील तीन संजीवनामध्ये जे अनुभवले अगदी तसेच मला जाणवले.

त्या शहरात आम्हांजवळ भाड्याच्या कॅमेरा व कॅमेरामन होता. जो मनुष्य कॅमेरा चालवित तो कॅथलिक पार्श्वभूमिचा होता, परंतू त्याने मंडळी सोडली होती. जसा आम्ही डॉ. राईस यांची मुलाखत घेतली तसा त्या कॅमेरामनच्या डोळ्यातील अश्रू गालावर आले, डॉ. राईस आपल्या केलेल्या आपल्या महान सुवार्तिक सेवेबद्दल ओघवते सांगत होते तसे तो रडत होता. मग मुलाखत संपली व ते डॉ. राईस यांना बाहेर कारकडे घेऊन गेले. खोलीमध्ये कॅमेरामनबरोबर मी व माझा मित्र एवढेच राहिलो. तो अजूनहि रडत होता. त्याने डॉ. राईस यांच्याबद्दल विचारले, आणि ते देवाचा महान माणूस आहेत असे मी त्याला सांगितले. मी बोलताना, मला देवाची समक्षता अधिक स्पर्शनीय जाणवत होती. तो मनुष्य रडत होता. मी जे सर्व सांगितले ते म्हणजे, “येशू तुज्यावर प्रेम करितो. त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुला तुझ्या सर्व पापापासून शुद्ध करील.” मला त्याला सांगायचे नव्हते. तो गुडघ्यावर आला व डोळ्यातून अश्रू गाळत त्याने येशूवर विश्वास ठेवला. ते खूप सोपे होते कारण तेथे देवाची समक्षता होती. मला एका वचनाची आठवण होते, “प्रभूचा आत्मा आहे, आणि जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळीकता आहे” (II करिंथ3:17). मला ठाऊक आहे की अभ्यागताचे परिवर्तन होणे सोपे आहे, प्रथम आलेले अभ्यागत सुद्धा, डॉ. राईस यांच्या प्रमाणे देवाच्या आत्म्याचे सामर्थ आपणांकडे असते तर!

परंतू देवाच्या समक्षतेचा आणखी एक मोठा फायदा आहे. हे स्वर्गाचा पूर्वस्वाद आहे. मला ठाऊक आहे आता स्वर्ग तुम्हांपैकी कित्येकांना खरा वाटत नाही. परंतू जेव्हां खाली देवाचा “कावोद” आपल्या मंडळीत येतो, आणि जेव्हां तो तुला स्पर्श करितो, तेव्हां तुम्हांला स्वर्गात गेल्यासारखे वाटेल. ती “एक दैवी तेजाचा पूर्व स्वाद असेल.” स्वर्ग हा कथीत काल्पनिक आहे असे तुम्हाला कधीहि वाटणार नाही. जेव्हां तुम्ही मंडळीत प्रवेश करता तेव्हा येथे देव आहे, तुम्ही अगदी खरोखर स्वर्गाचे वास्तव व त्याचा आनंद याचा “स्वाद” घ्याल. आणि मग तुम्ही मोठ्या आनंदाने जॉन डब्लू. पीटरसन यांचे गीत गाण्यास समर्थ व्हाल!

स्वर्ग खाली आला आणि माझा जीव तेजाने भरला,
जेव्हां तारणारा वधस्तंभाजवळ होता तेव्हां त्याने मला परिपूर्ण केले.
माझे पाप धुवून शुद्ध झाले, आणि माझी रात्र दिवसात बदलली –
स्वर्ग खाली आला आणि माझा जीव तेजाने भरला.
   (“स्वर्ग खाली आला” जॉन डब्लू. पीटरसन यांच्या द्वारा, 1921-2006).

आता मी थोडे जंगली, बेलगाम पेंटॅकॉस्टल, किंवा करस्मॅटिक लोकांच्या चुकीच्या धर्मांधतेविषयी बोलत आहे. अरेरे, नाही! ते वारंवार ढोल बडवून आणि अन्य भाषेत बोलून देवाच्या आत्म्याला खाली आणण्याचे प्रयत्न करतात. ते कदाचित बरोबर असतील, परंतू असे केल्याने सभेमध्ये देव खाली आला नाही आणि 1905 मधील पेंटॅकॉस्टलीझम सुरुवात होण्यापूर्वी लोकांना संजीवित केले नाही. आम्हांला परत जुन्या मार्गाने जायला हवे – कारण जुना मार्ग खरा मार्ग आहे – आणि तो अजूनहि खरा मार्ग आहे!

आम्हांस खाली जमिनीवर पाडून कावोद खाली आमच्याकडे येण्यास प्रयत्न करु नये, तरीहि जेव्हां देव खाली येतो तेव्हां कांहीजन खाली जमिनीवर पडतात. परंतू आम्ही भावनावश होऊन किंवा आरडाओरडा करुन आनंद करु नये. अरेरे, नाही! ज्या पापामुळे ख्रिस्ती लोक रांगताहेत, ज्या पापाची लाज वाटते, जे पाप देवाजवळ कबूल केले पाहिजे – आणि दोष जे इतरांबरोबर कबूल केले पाहिजेत, त्यामुळे आपला देव, स्वर्गीय बाप याच्याकडून आम्ही आध्यात्मिक निरोगी होणार आहोत, त्या पापाची जाणीव त्यांना होईल तेव्हां आम्ही आनंद करावा! कृपया उभे राहा व आपल्या शीटमधील गीत क्रं. 10 गाऊया.

“हे देवा, माझी झडती घेऊन माझे ह्दय जाण:
मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण:
आणि माझे ह्दय जाण;
मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण;
माझ्या ठायी दुष्टपणाकडे कांही प्रवृत्ती असेल तर पाहा,
आणि मला सनातन मार्गाने चालीव.”
   (स्तोत्र 139:23, 24).

घाबरु नका! देव तुम्हांवर प्रेम करितो. जेव्हां तुम्ही आपले पाप कबूल कराल तेव्हां तो तुमचा न्याय करणार नाही. घाबरु नका. तुमचे पाप कितीहि घाणेरडे असो, देव त्यास शुद्ध करु शकतो. येशूच्या रक्ताने देव त्यास धुवून शुद्ध करील. व्यासपीठच्या बाजूला इथे खाली या. कोणाचा तरी हात पकडा व दोघा दोघानी प्रार्थना करा. पाप कबूली देण्यासाठी एकमेकांसाठी प्रार्थना करा. मी तुम्हांवर प्रेम करितो! देव तुम्हांला आशिर्वादित करो! आज रात्री तुम्ही कांहीहि सांगितले तरी, तुम्ही खूप चांगले—प्रेमळ असे आहांत, तुम्हांवर प्रेम करण्याचे आम्ही थांबणार नाही! आम्हांवर विश्वास ठेवा व घाबरु नका. येशूकडे परत या, परत या व आपले पाप कबूल करा यासाठी की आपला तारणारा, येशूच्या रक्ताने शुद्ध केले जाईल. आणि त्यानंतर तुम्ही तरुण नसला तरी, तुम्ही ह्या संध्याकाळी येऊ शकता. माझ्याकडे व्यासपीठच्या बाजूला दोन खुर्च्या आहेत. तुमची कबूली सार्वजनिक होऊ नये असे तुम्हांला वाटत असेल तर, आताच येथे या आणि त्याविषयी सांगा, आणि तुम्ही देऊ किंवा देऊ नये हे मी सांगू शकेन.

आमचे बंधू जॅक नगान यांनी मला माझ्या 76 व्या वाढदिवशी खालील शब्द लिहले.

प्रिय डॉ. हायमर्स,

मागील सर्व वर्षाच्या तुमच्या विश्वासूपणाबद्दल मी आपले आभार मानू इच्छितो. मी ब-याचदा विचार केला की मोठा धर्मत्याग केला त्यावेळी अवशेषाचे कारण [किमान अंशी] देवामुळे तुमचा उपयोग होत आहे...जे सत्य तुम्ही सांगितले ते अगदी ठिणगीचा भाग आहे त्याने संजीवनाची ज्योत पेटवण्यासाठी मदत होते...तुमच्या सेवेचा सुगंध सतत दरवळत राहो आणि तुमचा प्रचाराचा प्रतिध्वनी [इंटरनेटवर] सनातन पसरत राहो. मी तुमच्यावर प्रेम करितो, पाळकसाहेब.

ख्रिस्तात तुमचा,
जॅक नगान

बरं ठीक आहे पाळकसाहेब, या शब्दाने आम्ही सांगता करितो कारण, “तुम्ही ख्रिस्तामध्ये आहांत” तुमच्या सेवाकार्यामुळे [आम्हांला तुम्ही ख्रिस्तातील तारणात नेले].

बंधू जॅक नगानला ठाऊक आहे की मी माझ्या मंडळीची, आणि तुम्हां सर्वाची खूप काळजी करितो. त्यामुळेच मी संजीवनावर जोर देतो. ख्रिस्ती जीवनात पालट झालेल्या एका साक्षीवर कोणीहि आयुष्यात यशश्वी होत नाही. तुम्ही कृपेत वाढले पाहिजे – आणि ते ब-याचदा कष्टदायी असेल. आपण पाप व दोषाशी सामना करीत आहोत त्यामुळे तुमच्या जीवनात तुम्ही रांगत आहो. गीताचा विचार करणे तुम्हांला आवडत नाही, “हे देवा, माझी झडती घेऊन माझे ह्दय जाण. मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, आणि माझे ह्दय जाण, मला कसोटीस लावून माझे मनोगत जाण, माझ्या ठायी कांही दुष्ट प्रवृत्ती असेल तर पाहा...” परंतू तुम्हांला त्याचा विचार करावा लागेल. दु:ख दायी असले तरी, तुम्हांला तुमचे परिक्षण करावे लागेल. येशूच्या रक्ताद्वारे शुद्ध केले जावे आणि तुम्ही तुमच्या पापाची कबूली द्यायला हवी. मग तुम्ही देवाच्या समक्षतेचा, कावोद, संजीवनातील देवाचा रोमांचकारी अनुभव घ्याल!

“कृपा करुन, मला तुझे तेज दाखीव”

प्रार्थना करा व पाप कबूली द्या आणि देवाने मोशेला जसे उत्तर दिले तसे तुम्हांलाहि उत्तर मिळेल.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी पवित्रशास्त्र वाचन डॉ.क्रिघटन एल. चॅन यांनी केले: यशया 64:1-3.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रिफित यांनी गायले: “मे जीजस ख्राईस्ट बी प्रेज्ड” (एडवर्ड कासवॉल द्वारा अनुवादित, 1814-1878).
“May Jesus Christ be Praised” (translated by Edward Caswall, 1814-1878).