Print Sermon

संपूर्ण जगातील विशेषत: तिस-या जगात, जेथे इश्वरविज्ञान सेमीनरीज किंवा पवित्रशास्त्र शाळा कमी आहेत, तेथील पाळक व सुवार्तिक यांना मोफत लिखीत उपदेश व उपदेशाचे व्हिडीओज उपलब्ध करुन द्यावेत हा ह्या संकेतस्थळाचा उद्देश आहे.

हे अनुवादीत उपदेश आणि व्हीडिओज आता दर महिन्याला www.sermonsfortheworld.com. वर 221 देशांमधील 1,500,000 संगणकामध्ये जातात. आणखी शेकडो लोक यूट्युब वर हे व्हीडिओज पाहतात. तसेच ते यूट्युब सोडून आमच्या संकेतस्थळास भेट देतात, कारण प्रयेक उपदेश त्यांना आमच्या संकेतस्थळाकडे येण्यास मार्गदर्शन करतो. युब ट्युब लोकांना आमच्या संकेतस्थळाकडे फिड करतो. दर महिन्याला 46 भाषांमधून 120,000 संगणकाच्या द्वारे हजारो लोकांपर्यंत अनुवादीत उपदेश प्रसारित करण्यात येतात. ह्या अनुवादीत उपदेशांची नकल करण्यास मनार्इ नाही, त्यामुळे प्रचारक हे आमच्या अनुमती शिवाय वापरू शकतात. कृपया संपूर्ण जगामध्ये सुवार्ता प्रसार करण्याच्या या महान कार्यास साहाय्य करण्यासाठी तुम्ही मासिक देणगी कशी देऊ शकता हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

तुम्हीं डॉ. हायमर्स ह्यांना लिहाल तेव्हां तुम्ही कोणत्या देशात राहता ते लिहा, नाही तर ते तुम्हांस उत्तर देऊ शकणार नाहीत. डॉ. हायमर्स यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net हा आहे.




नाकारलेली वार्ता

(यशया 53 वरील उपदेश क्रंमांक 2)

THE REJECTED REPORT
(SERMON NUMBER 2 ON ISAIAH 53)
(Marathi)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

लॉस एंजल्सच्या बाप्टिस्ट टॅबरनिकल येथे दिलेला उपदेश
प्रभूवारी सकाळी, दि. 3, मार्च 2013 रोजी
A sermon preached at the Baptist Tabernacle of Los Angeles
Lord’s Day Morning, March 3, 2013

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहेॽ”(यशया 53:1).


यशया ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाविषयी बोलत आहे. मागील रविवारी मी यशया 52 मधील शेवटच्या तीन वचनांवर उपदेश दिला, ज्यामध्ये संदेष्ट्याने अगोदरच ख्रिस्ताच्या दु:खसहनाविषयी सांगितले आहे, ज्याचे स्वरुप, “त्याचा चेहरा मनुष्याच्यासारखा नव्हता, त्याचे स्वरुप मनुष्यजातीच्यासारखे नव्हते इतका तो विरुप होता” (यशया 52:14). हे येशूचे चित्र आहे, आपल्या पापासाठी त्याला मारण्यात व वधस्तंभावर खिळण्यात आले, त्यानंतर तो मरणातून पुन्हा उठला, “तो थोर व उन्नत होईल, तो...अत्युच्च होईल” (यशया 52:13). परंतू आता, आपल्या उता-यात, कांहीजण शुभवर्तमानाच्या संदेशावर विश्वास ठेवतात ह्या सत्याविषयी संदेष्टा तक्रार करतो.

डॉ. एडवर्ड जे. यंग हे जुन्या कराराचे अभ्यासक, एक वर्गमित्र, माझे माजी पाळक, डॉ. तिमथी लीन. यांचे मित्र हे आपल्या ह्या उता-यावर विधान करतात,

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे,”

डॉ. यंग म्हणाले की “प्रश्नापेक्षा हे जास्त उद्गारवाचक आहे. हे नकारात्मक उत्तराची अपेक्षा करीत नाही, परंतू ते असे रचले आहे की जगातील ख-या [थोड्या] विश्वासणा-यांचे लक्ष वेधले जावे...थोडक्यांनीच विश्वास ठेवावा म्हणून बोलून व हावभावाने भिती दाखवित, संदेष्टा हा त्याच्या लोकांचा प्रतिनिधी (आहे)” (एडवर्ड जे. यंग, पीएच.डी. द्वारा, द बुक ऑफ आयजया, विलियम बी. एर्रडमन्स प्रकाशन कंपनी,1972, आवृत्ती 3, पृष्ठ 240).

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?”

शब्द “वार्ता” म्हणजे “जाहीर केलेला संदेश.” लुथरने तो “आपला प्रचार” असा अनुवादित केला आहे (यंग, ibid.). “आमच्या प्रचारावर कोणी विश्वास ठेवला आहे?” ह्या उता-यात संमांतर भावमुद्रा अशी आहे की, “आणि “परमेश्वराचा भुज” कोणास प्रकट झाला आहे?” “परमेश्वराचा भुज” परमेश्वराचे सामर्थ्याचा संदर्भ प्रकट करते. आमच्या प्रचारावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? ख्रिस्ताचे तारणाचे सामर्थ्य कोणास प्रकट झाले आहे?

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?” (यशया 53:1).

हे वचन तुम्ही प्रथम शुभवर्तमानावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये देवाच्या सामर्थ्याने पालट झाला हे दर्शविते. आणि तरीहि संदेष्ट्याचा हा एक प्रश्न खूप थोडे लोकं विश्वास ठेवतील आणि पालट होतील हे दर्शविते.

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?” (यशया 53:1).

I. प्रथम, ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील सेवाकार्याच्या काळात थोडक्यानीच विश्वास ठेवला व थोडक्यांचाच पालट झाला.

येशू लाजारसाच्या कबरेजवळ आला. हा मनुष्य मरुन चार दिवस झाले होते. येशू त्यांना म्हणाला, “धोंड काढा”(योहान 11:39). लाजारसाची बहिण त्याला थांबवू पाहात होती. ती म्हणाली, “प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल: कारण त्याला मरुन चार दिवस झाले आहेत” (ibid.). परंतू त्यांनी त्याचे ऐकले आणि कबरेच्या तोंडावर झाकलेली धोंड बाजूला केली. मग येशूने, “मोठ्याने हाक मारुन म्हटले, लाजरा, बाहेर ये. तेव्हां जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हात पाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले ह्याला मोकळे करुन जाऊं द्या”(योहान 11:43-44).

“ह्यावरुन मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले, आपण काय करीत आहों? [आम्ही काय करावे?] कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हें करितो”(योहान 11:47).

त्यांने जी पुष्कळ चिन्हें केली ती त्यांनी पाहिली होती, आणि सामान्य लोक त्यांना सोडून त्याच्या मागे जातील याची त्यांना भिती होती.

“ह्यावरुन त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्चय केला”(योहान 11:53).

मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून “येशूला जिवे मारुन” त्याच्यापासून कशी सुटका मिळवावी याचा चांगला मार्ग कोणता यासंबंधी चर्चा केली. प्रेषित योहान म्हणाला,

“त्यांने त्यांच्यासमोर इतकी चिन्हें केली असतांहि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही; हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे, ‘प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? ”(योहान 12:37-38).

त्यांने अदभूतरित्या पाच हजारांना जेवू घातलेले त्यांनी पाहिले. कुष्टरोग्यांला बरे केलेले व आंधळ्याचे डोळे उघडलेले त्यांनी पाहिले. त्यांने भूतांना घालविलेले, व लकवेक-यास बरे केलेले त्यांनी पाहिले. त्यांने विधवेच्या मुलाला मेलेल्यातून उठविलेले त्यांनी पाहिले. पाण्याचा द्राक्षारस केल्याचे त्यांनी केवळ ऐकलेच नव्हते, तर पाहिले सुद्धा होते.

“नंतर येशू त्यांच्या सभास्थानात शिकवीत, राज्याची सुवार्तेची घोषणा करीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारची दुखणी बरी करीत नगरांतून व गावांतून फिरत होता”(मत्तय 9: 35).

आणि तरीहि, जेव्हां त्याने लाजाराला मेलेल्यांतून उठविले, तेव्हां “त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्चय केला”( योहान 11:53).

“त्यांने त्यांच्यासमोर इतकी चिन्हें केली असतांहि त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही; हे ह्यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे, ‘प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? ”(योहान 12:37-38).

होय, ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील सेवाकार्याच्या काळात थोडक्यांनीच विश्वास ठेवला व थोडक्यांचाच पालट झाला.

II. दुसरे, प्रेषितांच्या काळात थोडक्यांनीच विश्वास ठेवला व थोडक्यांचाच पालट झाला.

कृपया रोम 10:11-16 वळा. चला उभा राहूया व तो महान उतारा वाचूया.

“कारण शास्त्र म्हणते, ‘त्याच्यावर विश्वास ठेवणारा कोणीहि फजित होणार नाही,’ यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धांवा करितात त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे; कारण ‘जो कोणी प्रभूचे नांव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल’ तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करितील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? आणि घोषणा करणा-यांवाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करितील? चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणा-याचे चरण किती मनोरम आहेत! तथापि सुवार्ता सर्वांना मान्य झाली असे नाही. यशया म्हणतो, ‘हे प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?’ (रोम10:11-16).

तुम्ही खाली बसू शकता.

ध्यानात घ्या ह्या शास्त्राचा उतारा वचन 12, मध्ये म्हणतो,

“यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यामध्ये भेद नाही; कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धांवा करितात त्या सर्वांना पुरविण्याइतका तो संपन्न आहे” (रोम 10:12).

प्रेषित पौलाने हे येशू स्वर्गात वर उचललेल्याच्या तीस पेक्षा जरा कमी वर्षा नंतर लिहले आहे. अशाप्रकारे, पौलाने रोमकरांस पत्र हे पुस्तक प्रेषितांची कृत्यांच्या पुस्तकाच्या नंतरच्या भागाच्या काळा दरम्यान लिहले आहे. तो यहूदी व परराष्ट्रीय ह्या दोहोंना बोलत आहे, परंतू येशू मात्र यहूद्यांना बोलला होता. पौल म्हणाला, “यहूदी व हल्लणी ह्यांच्यामध्ये भेद नाही.” सर्व मनुष्यांस ख्रिस्ताची गरज आहे!

आणि तरीहि, तो त्याच्या मोठ्या अयहूदी समुदायास, जी गोष्ट येशू बोलला तीच गोष्ट पौल बोलला, यशयाने 53:1 मध्ये जे बोलला, खूप कमी प्रमाणात परराष्ट्रीय लोक विश्वास ठेवतात याची खंत आहे – त्याच्या उपयोगातून, यहूद्यांपेक्षा किंचित जास्त परराष्ट्रीय सुवार्तेस प्रतिसाद देतात, हे संदेष्ट्यास यशया 53:1 सांगून दर्शवायचे होते. संदेष्ट्याची तक्रार नमुद करुन पौल हे दाखवतो,

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?” (यशया 53:1).

सुवार्तेसाठी यहूद्यांपेक्षा परराष्ट्रीय अधिक खुले आहेत. तरीहि, असे असून, आपण प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्कात पाहतो की, पौल व इतर प्रेषितांच्या काळात, यहूद्यांच्या तुलनेत अगदी कमी परराष्ट्रीयांनी येशूवर विश्वास ठेवला. प्रेषितांची कृत्यें पुस्तकात पाहतो त्याप्रमाणे प्रेषितांच्या काळात मोठे संजीवन झाले. तरीहि अशाप्रकारची मोठी संजीवने सुद्धा यहूद्यांच्या तुलनेत अगदी कमी परराष्ट्रीयांना ख्रिस्ताच्या तारणात आणले गेले. सुवार्ता सांगणे कठीण होते, अगदी रोमी काळात सुद्धा!

ख्रिस्त व पौल ह्या दोघानेहि अगदी कमी पालट झालेली लोक पाहिलीत. अशाप्रकारे, पहिल्या शतकात निर्णय घेणारे, व छळणूक होणारी असे दोन्ही एकाच वेळी होते! आणि म्हणून, योहान व पौल दोघानीहि सुवार्तेस विरोध करणारे समजावू सांगण्यासाठी हा उतारा सांगितला आहे – ज्यांनी सुवार्ता ऐकली त्यापैकी कित्येकजण पालट न होता तसेच राहिले.

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?” (यशया 53:1).

आणि ख्रिस्ती इतिहासात अनेक पिढ्या आहे हे खरे आहे. सतत, प्रत्येक वेळी, केवळ थोड्या अल्पसंख्याक लोकांनी शुभवर्तमानावर विश्वास ठेविला आणि खरे पालट झालेले. आणि आजहि जगात हे खरे आहे. कांहीहि बदलले नाही. जे आपणास शेवटचा बिंदू घेऊन येतो.

III. तिसरे, आज थोडक्यांनी विश्वास ठेविला आणि थोडक्यांचाच पालट झाला.

आपण आपल्या काळात वारंवार यशयाच्या दु:खाच्या वास्तवतेचा सामना करतो, त्या दु:खीत प्रश्नात,

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?” (यशया 53:1).

दु:खाने, आपणांस म्हणावे लागते की आज कांही लोक शुभवर्तमानाच्या प्रचारावर विश्वास ठेवतात, आणि कांही लोक ख्रिस्ताच्या सामर्थ्याने तारण पावले. आमच्या जवळच्या नातलगानी सुद्धा खिस्ताचा नकार दिला. आणि तुम्हां सर्वांना ठाऊकच आहे की पालट होऊन केवळ थोडकेच मंडळीत ऐकायला आणले गेले. त्यावर मी तीन विधान करु इच्छितो:

(1) प्रथम, पुष्कळ लोकांचे तारण होईल असे कोठे पवित्रशास्त्र सांगते? ते सांगत नाही. खरे तर, येशूने अगदी विरुद्ध सांगितले. तो म्हणाला,

“अरुंद दरवाजाने आंत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आंत जाणारे पुष्कळ आहेत; परंतू जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग संकोचित आहे आणि ज्यांना तो सापडता ते थोडके आहेत ” (मत्तय 7:13-14).

थोडे तेथे सापडतात! जेव्हां आपल्या अपेक्षा कमी सुवार्तेचा परिणाम येतो तेव्हां हे आपल्या मनात नेहमी ठेवा.

आणि, मग, दुसरी गोष्ट जी मला सांगावयाची ती ही.

(2) आपलासुवार्ता सांगण्याचा उद्देश हा कितीजणांचा पालट होणार यावर अवलंबून नाही. प्रतिसाद कमी असू दे किंवा जादा, आपले लक्ष हे कितीजणांचा पालट यावर असता कामा नये. आपले जे ध्येय आहे ते देवाचे आज्ञापालन यावर आधारीत आहे. सुवार्ता सांगताना आपले लक्ष हे नेहमी देवाकडे, आणि त्याचे आज्ञपालन करण्यामध्ये असले पाहिजे; आणि जेव्हां आपण सुवार्ता सांगतो तेव्हां आपले लक्ष हे नेहमी देवाकडे, आणि त्याचे आज्ञपालन करण्यामध्ये असले पाहिजे! ख्रिस्ताने आपणांस सांगितले आहे की,

“सर्व जगांत जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा”(मार्क 16:15).

ख्रिस्ताने आपणांस हेच करण्यास सांगितले आहे, लोक वळोत वा न वळोत आम्ही ते केलेच पाहिजे. आम्हीसुवार्तेची घोषणा केली पाहिजे कारण ख्रिस्ताने आपणांस हे करण्यास सांगितले आहे! आपले यश हे मानवी प्रतिसादावर अवलंबून नाही! नाही! आपले यश हे ख्रिस्ताच्या आज्ञापालनांवर अवलंबून आहे. त्यामुळे ते विश्वास ठेवोत वा ठेवोत आम्ही सुवार्तेस गेले पाहिजे!

आणि, मग, त्यातून तिसरी गोष्ट बाहेर येते ती ही.

(3) तुम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवता कायॽ तुमचा ख्रिस्तामध्ये बदल झाला कायॽ तुम्ही ख्रिस्तामध्ये विश्वासाने येता कायॽ अजूहि जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा मित्रमंडळीमध्ये कोणाचा पालट झाला नाही, तुम्ही ख्रिस्ताचा शोध घेता कायॽ तुम्ही त्याच्याकडे येता काय? ख्रिस्त काय म्हणाला ते आठवा,

“जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल; जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल”(मार्क 16:16).

तुम्ही ख्रिस्ताकडे येऊन, पालटून, आणि मग बाप्तिस्मा घेता कायॽ किंवा ज्यानी येशूचा नाकार केला आहे, आणि अनंतकाळासाठी नरकाच्या अग्नीमध्ये नाशसाठी ऱाखले आहेत अशा मोठ्या समुदायामध्ये तुम्ही सामील आहांत कायॽ

“जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल”(मार्क 16:16).

नरकामध्ये नाश पावत आहेत अशा मोठ्या समुदायामध्ये तुम्ही सामील नाही आहांत अशी माझी तुमच्यासाठी प्रार्थना आहे, परंतू तुम्ही आमच्या स्थानिक मंडळीमध्ये सामील व्हाल. जगांतून बाहेर पडा! विश्वासाने येशूकडे या! स्थानिक मंडळीमध्ये या. आणि सार्वकालीकतेसाठी बचाव करा आणि येशूच्या रक्ताद्वारे सार्वकालीक जीवन आणि नीतिमत्व मिळवा.

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?” (यशया 53:1).

ज्यानी विश्वास ठेवला व पालट झाला अशामध्ये तुम्ही असावे! सुवार्ता सांगितली तेव्हां तुम्ही त्यावर विश्वास ठेवला असे तुम्ही असावे. तुम्ही असे म्हणावे की, “होय, येशू माझ्या पापाचे वेतन देण्यास मरण पावला. होय, तो मरणांतून उठला. होय, मी त्याच्याकडे विश्वासाने येतो.” ज्यांस परमेश्वराचा भुज प्रकट झाला आहे, येशू “देवाचा कोकरां, ज्याने जगांचे पाप हरण केले” त्यावर विश्वास ठेऊन तारणाचा अनुभव घेता आहांत असे तुम्ही असावे (योहान1:29). जो येशूकडे आला आहे, आणि आपले पाप त्याच्या मौल्यवान रक्ताने धुतले आहेत असे तुम्ही आहांत. आमच्या वार्तेवर विश्वास ठेवण्यास व प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पापापासून सुटका होऊन तारणाचा अनुभव द्यावा, अशी देवाने तुम्हांवर कृपा करावी! आमेन!

कृपया उभे राहू आणि “प्रभूकडे, मी येतोय,” हे शीटवरील सात क्रमांकाचे गीत गाऊया.

मी तुझा स्वागताचा आवाज ऐकतो, जो मला, तुझ्याकडे बोलावितो प्रभू
   कालवरीवर वाहिलेल्या मोलवान रक्ताने धुण्याकरिता.
प्रभूकडे! मी येतोय, तुझ्याकडे आता येतोय!
   कालवरीवर वाहिलेल्या मोलवान रक्ताने, तू मला धू.
अशक्त व शुद्र तरी येतोय, तुच माझे खरे सामर्थ्य;
   तुच माझे शुद्रपण घालवितोस, डागविरहीत व शुद्ध होईस्तोवर.
प्रभूकडे! मी येतोय, तुझ्याकडे आता येतोय!
   कालवरीवर वाहिलेल्या मोलवान रक्ताने, तू मला धू.
(“आय एम कमींग, लॉर्ड” लेवीस् हार्टसोग यांच्याद्वारा, 1828-1919).

येशूने तुमचे पाप धुवावे म्हणून तुम्ही आमच्याशी बोलू इच्छिता तर, कृपया आता सभागृहाच्या मागे या. डॉ. कागन हे तुम्हांस शांत स्थळी नेतील जेथे आपण बोलू. डॉ. चॅन, कृपया या व ज्यांनी प्रतिसाद दिला आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करा.


जेव्हा तुम्ही डॉ. हायमर्स ह्यांना लिहिता तेव्हा तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात हे त्यांना सांगा नाहितर ते तुमच्या इ-मेल चे उत्तर देऊ शकणार नाही. जर उपदेशाने तुम्ही आशिर्वादित झाला आहात तर डॉ. हायमर्स ह्यांना ई-मेल करुन सांगा, परत नेहमी तुम्ही कोणत्या देशातुन लिहित आहात ह्याचा उल्लेख अवश्य करा. डॉ. हायमर्स ह्यांचा ई-मेल rlhymersjr@sbcglobal.net (येथे क्लिक करा). डॉ. हायमर्स ह्यांनी तुम्ही कोणत्याही भाषेत लिहु शकता, परंतु शक्यता इंग्रजीमध्ये लिहा. जर तुम्हाला डॉ. हायमर्स ह्यांना डाक (पोस्टल मेल) द्वारे लिहायचं असेल तर त्यांचा पत्ता : PO. Box 15308, Los Angeles, CA 90015. तुम्ही त्यांना टेलीफोन करु शकता (818)352-0452.

(उपदेशाची समाप्ती)
तुम्ही दर आठवड्याला डॉ. हायमर्स ह्यांचे उपदेश इंटरनेटवर वाचु शकता. at
www.sermonsfortheworld.com “उपदेशहस्तलिपि” वर क्लिक करा.

हे उपदेशहस्तलिपि प्रतिलिप्यादिकार नाही. तरीही, तुम्ही त्यांना डॉ. हायमर्स ह्यांच्या परवानगीशिवाय
वापरु शकता. तथापी डॉ. हायमर्स ह्यांचे सर्व चर्चमधले विडिओस संदेश आणि इतर सर्व उपदेश जे
विडिओस च्या स्वरुपात आहेत. ते प्रतिलिप्यादिकार आहेत आणि ते तुम्ही परवानगी घेऊन वापरु शकता.

उपेशापूर्वी शास्त्रवाचन मि. अबेल प्रुधोम यांनी केले: यशया 52:13-53:1.
उपेशापूर्वी एकेरी गीत मि. बेंजामिन किनकैड ग्रिफित यांनी गायले: “अ क्राऊन ऑफ थ्रोन्स” (इरा एफ. स्टॅनफिल द्वारा, 1914-1993).
“A Crown of Thorns” (by Ira F. Stanphill, 1914-1993).


रुपरेषा

नाकारलेली वार्ता

(यशया 53 वरील उपदेश क्रंमांक 2)

THE REJECTED REPORT
(SERMON NUMBER 2 ON ISAIAH 53)

डॉ. आर. एल. हायमर्स, ज्युनि. यांच्या द्वारा
by Dr. R. L. Hymers, Jr.

“आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेविला आहेॽ परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहेॽ”(यशया 53:1).

(यशया 52:14,13)

I.    प्रथम, ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील सेवाकार्याच्या काळात थोडक्यानीच विश्वास ठेवला व थोडक्यांचाच पालट झाला, योहान11:39,43-44,47,53; 12:37-38,
मत्तय 9:35.

II.   दुसरे, प्रेषितांच्या काळात थोडक्यानीच विश्वास ठेवला व थोडक्यांचाच पालट झाला,
रोम 10:11-16.

III.  तिसरे, आज, थोडक्यांनी विश्वास ठेविला आणि थोडक्यांचाच पालट झाला,
मत्तय 7:13-14; मार्क 16:15,16; योहान 1:29.